(आजकाल सेक्युलॅरिझम वा पुरोगामी म्हणून मिरवणारे आधुनिक ब्राह्मण झालेत. म्हणूनच ही कथा जन्माधिष्ठीत ब्राह्मणांविषयीची वाटत असली तरी ती आजच्या संदर्भात घ्यावी. आजकाल गळ्यात सेक्युलर जानवे घातले की तुम्ही पुरोगामी ब्राह्मण म्हणून हेच तर्कशास्त्र राबवायला मोकळे असता)
तशी ही गोष्ट नवी नाही. मी कधीतरी पुर्वी ऐकलेली आहे. आणि अनेकदा माझ्या लिखाणातून सांगितलेली सुद्धा आहे. एका गावामध्ये मुले मोकळ्या माळावर खेळत होती. त्यातली मस्तवाल होती त्यांचा आडदांडपणा चालू होता तर बिचारी शांत मुले आपल्या कुवतीप्रमाणे साधेच काही खेळत होती. इतक्यात कुठून तरी एक बारकेसे मांजर तिकडे पोरांच्या घोळक्यात आले. पोरांच्या धावपळीत फ़सले आणि त्याला निसटावे कसे तेच कळेना. तेव्हा गोंधळलेल्या मुलांप्रमाणेच मांजराचीही तारांबळ उडाली. मग त्यातल्या एका मस्तीखोर मुलाला कुरापत सुचली. त्याने आपल्यासारख्याच इतर आडदांड मुलांना एक कल्पना सांगितली. गोल फ़ेर धरून उभे रहा आणि नेम धरून त्या मांजरावर दगड मारायचा. बघू कोणाचा नेम सरस आहे ते. सर्वांनाच त्यात मौज वाटली आणि सगळे फ़ेर धरून मांजरावर दगडधोंड्यांचा वर्षाव करू लागले. बिचारे ते इवले मांजर त्या मुलांच्या तावडीतून सुटायला सैरावैरा पळू लागले. पण पळणार तरी किती आणि कुठे? ज्या दिशेने पळायचे, त्या बाजूच्या पोराने जवळून मारलेला दगड त्याला अधिक जोरात दुखापत करत होता. जेवढी त्या मांजराची तारांबळ उडत होती, तेवढा या पोरांना जोश चढत होता. शेवटी अशी वेळ आली, की धावण्याचे पळण्याचे त्राण अंगी उरले नाही आणि मांजर एकाच जागी थबकून केविलवाणे इकडेतिकडे बघू लागले. इतक्यात त्याच्या दिशेने आलेला दगड त्याच्या असा वर्मी बसला, की तिथेच कोसळून ते मांजर गतप्राण झाले. मग अकस्मात दगडफ़ेक थांबली. आणि भोवताली जमलेल्या घोळक्यात एकदम शांतता पसरली.
मांजर सैरावैरा पळत असताना त्याच्यावर दगड मारणार्यांप्रमाणेच बाकीची मुलेही जल्लोश करतच होती. पण मांजर मेल्यावर सर्वांची पाचावर धारण बसली. काहीतरी गडबड झाली आहे, याची जाणिव एकूणच त्या वानरसेनेला झाली होती. त्यामुळेच एकामेकाकडे शंकास्पद नजरेने बघत प्रत्येकाने पाय काढता घेतला. पोरे आपापल्या घरी पळाली. आपापल्या घरात जाऊन गुपचुप बसली. हू नाही की चू नाही. अशा सुट्टीच्या दिवशी आणि सूर्य अजून मावळला नसताना मुले घरोघरी परतली आणि निमुट बसली म्हटल्यावर पालकांनाही शंका आली. घरोघर मुलांकडे विचारणा झाली, तेव्हा खेळाच्या नादात मांजर मारले गेल्याचे उघडकीस आले. दुपार उलटून संध्याकाळ होत असताना, ती बातमी गावभर पसरली आणि गावकरी एकमेकांशी पोरांच्या मस्तीबद्दल बोलत हसू लागले होते. पण कुठून तरी मांजराला मारणे पाप असल्याची वदंता गावकर्यात पसरली आणि विनोदाची जागा चिंतेने घेतली. पण मांजर मारले म्हणजे कुठले पाप झाले व त्याव्रचा उपाय कोणता; याची कोणालाच अक्कल नव्हती. तेव्हा दिवेलागणीच्या वेळी तमाम गावकर्यांच्या जमाव शास्त्रीबोवांच्या अंगणात येऊन धडकला. कारण धर्मशास्त्र व पापपुण्याचे गावातले जाणकार व ठेकेदार शास्त्रीबोवाच होते ना?
अंगणातली कुजबुज शास्त्रींच्या कानावर आली आणि अंधारलेल्या अंगणात लोकांचा जमाव दिसल्यावर शेंडीला गाठ मारून, बंडी सारखी करीत ते पडवीत आले. समोरचा चिंताक्रांत घोळका काही विपरित घडल्याचे सुचवत होता. मात्र काय घडले असावे याचा अंदाज येत नव्हता. अखेर शास्त्रींनीच काय काम काढलेत अशी विचारणा केली; तेव्हा त्या सुतकी चेहर्याच्या जमावा्तील वडीलधार्या व पिकल्या केसाच्या गावकर्याने घटना सांगितली आणि बुवांचा चेहराही आक्रसला. शेंडीची गाठ सोडून बुवा म्हणाले, घोर पापकर्म झाले आहे आणि त्याची विषारी फ़ळे संपु्र्ण गावालाच भोगावी लागणार आहेत. अहो शेवटी मांजर म्हणजे व्याध्रवंशीय. मांजराला वाघाची मावशी म्हणतात ना? आणि वाघ हे तर साक्षात देवी भवानीचे वाहन. त्याचीच हत्या झाल्यावर देवीचा गावावर कोप होणार नाही तर काय? त्यातून आता सुटका नाही. अंधारल्या अंगणात एकदम स्मशानशांतता पसरली. जमावातल्या सर्वच गावकर्यांचे चहरे काळवंडले होते. प्रत्येकाच्या चेहर्यावरून अपराधी भावना ओसंडून वहात होती. आणि आपण धर्मशास्त्राचा गहन अर्थ उलगडून दाखवल्याचा सार्थ अभिमान शास्त्रीबोवांच्या विजयी मुद्रेतून त्या अंधारातही स्पष्टच दिसत होता. काही मिनिटे अशीच शांततेत गेली आणि मग एका म्हातारीने तोंड उघडले. ती म्हणाली ‘शास्त्रीबुवा, अहो तुम्हीच गावातले काय ते एकमेव जाणकार. तेव्हा आता या संकटातून बाहेर पडण्याचा मार्गही तुम्हालाच माहीत असणार ना? मग आम्हाला कोड्यात कशाला टाकता? झटपट काय प्रायश्चित्त घ्यायचे ते सांगून टाका. आम्ही काय तुमच्या शब्दाबाहेर आहोत?’
आता शास्त्रीबोवांच्या चेहर्यावरले स्मित मावळले आणि ती जागा गांभिर्याने घेतली. कपाळाच्या उजव्या बाजूला थोडे हलकेसे खाजवत बुवा म्हणाले, घडले आहे मोठे विपरीतच. पण त्याचे उत्तर किंवा प्रायश्चित्त असे झटपट सांगता येणार नाही. असे आधी कधीच गावात घडलेले नाही. अघटित घडले आहे. त्यामुळेच त्याचा शास्त्रार्थ शोधावा लागणार आहे. मगच त्यावरचा उपाय व प्रायश्चित्त सांगता येईल. आता तुम्ही आपापल्या घरी जा आणि मनोमन देवीची करूणा भाका. प्रार्थना करा. मी आज रात्री पोथ्या व ग्रंथांचे अवलोकन करून घडल्या गोष्टीचा शास्त्रार्थ लावतो. उद्या सकाळी पुढले बघू. लोक आपापल्या घरी गेले. कोणाचे जेवणात लक्ष नव्हते, की रात्रभर अनेकांचा डोळ्याला डोळा लागला नाही. शास्त्रीबोवा इथे समई पेटवून पोथ्या व ग्रंथांचे अवलोकन करीत मध्यरात्रीपर्यंत जागत होते. पहाटे केव्हातरी त्यांनी गाशा गुंडाळला आणि झोपी गेले. त्यामुळेच सकाळी त्यांना जाग यायलाच उशीर झाला. प्रातर्विधी उरकायालही उशीरच झाला. पण तांबडे फ़ुटण्याआधीपासून एक एक गावकरी येऊन शास्त्रीबोवांच्या अंगणात बसला होता. बुवा आपले दैनंदिन सोपस्कार उरकून बाहेर येईपर्यंत अवघा गाव त्यांच्या अंगणात हजर झाला होता. चेहरे सर्वांचे कालच्या सारखेच सुतकी होते. गावात शांतता होती. पोरेही कुठे खेळायला हुंडडायला घराबाहेर पडली नव्हती. गावावर जणू त्या मांजराच्या हत्येने मोठीच अवकळा आलेली होती. आणि त्यावरचा उपाय आता शास्त्रीबोवा देणार म्हणुन अवघा गाव, जीव कानात आणुन त्यांच्या अंगणात प्रतिक्षा करत उभा होता. ऊन चढू लागण्यापुर्वी बुवा पडवीत आले आणि अत्यंत चिंतातूर नजरेचा कटाक्ष त्यांनी गावकर्यांच्या समुदायावरून फ़िरवला. पुन्हा कालच्या त्या म्हातारीनेच विषयाला तोंड फ़ोडले. ‘काय करायचे शास्त्रीबुवा?’ त्यावर काही क्षण शांत राहून आणि शेंडीशी खेळत बुवांनी कथन सुरू केले.
‘मोठाच घोर अपराध घडला आहे. देवीच्या कोपातून सुटका मोठी अवघड गोष्ट आहे. मोठीच किंमत मोजावी लागणार आहे. शांती करावी लागेल, होमहवन करावे लागेल. दोन दिवसांच्या हवनानंतर सोन्याचे मांजर ब्राह्मणाला दान करावे लागेल.’ सगळीकडे एकच शांतता पसरली. पण प्रायश्चित्ताचा उपाय असल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला होता. आता सवाल होता, तो या प्रायश्चिताच्या मोठ्या खर्चाचा. तेव्हा त्याच म्हातारीने शास्त्रींना विचारले, बुवा उपाय शोधून काढलात हे आम्हा गावकर्यांवर आपले खुप मोठे उपकार झाले. आता एकच राहिले, तेवढे सांगा मग आपण सगळे कामाला मोकळे झालो. इतका वेळ विजयी मुद्रेने जमावाकडे बघणार्या बुवांच्या भुवया ताणल्या गेल्या. काहीशा क्रोधातच त्यांनी म्हातारीला विचारले, ‘आणखी काय राहिले?’ म्हातारी उत्तरली, ‘बुवा हे तुम्ही म्हणता ते प्रायश्चित्त करायचे कोणी?’ मग बुवांचा चेहरा खुलला, तुच्छतेने त्या म्हातारीकडे बघत बुवा म्हणाले, ‘एवढेही कळत नाही तुम्हा मुर्खांना? अरे ज्याच्या हातून मांजर मारले गेले, त्या पोराने नाही तर त्याच्या कुटुंबाने प्रायश्चित्त घ्यायला हवे ना?’
या उत्तराने जमावातून इतका मोठा सुस्कारा निघाला, की शास्त्रीबोवांनाही चकित व्हायची पाळी आली. इतका वेळ सुतकी चेहर्याने तिथे उभ्या असलेल्या तमाम गावकर्यांच्या चेहर्यावर आता सुटकेचा भाव स्पष्ट दिसत होता. त्यामुळे बुवा अधिकच गोंधळले. कारण चिंतेने गप्प आलेल्या त्या घोळक्यात आता कुजबुज सुरू झाली होती. त्याकडे बुवा प्रश्नार्थक मुद्रेने बघत होते. तेवढ्यात गावचा म्होरक्या म्हातारा उत्तरला, ‘मग तर चिंताच मि्टली गावाची शास्त्रीबुवा’. आता बुवांना अधिकच बुचकळ्यात पडायची पाळी आली. कारण इतका गंभीर व खर्चिक उपाय असूनही लोक निर्धास्त का व्हावे? मात्र त्याचे उत्तर गावकर्यांकडुनच घ्यायला हवे होते. म्हणुन बुवांनी त्या म्हातार्याला विचारले, ‘चिंता संपली म्हणजे काय?’ आणि म्हातारा उत्तरला, ‘बुवा आता गावाची चिंता संपली कारण ही आता तुमचीच चिंता आहे. ते मांजर गावातल्या पोराच्या हातुन मारले गेले, त्या पोराचे नाव चिंताच आहे. तो दुसरातिसरा कोणी नसून तुमचा चिंत्याच आहे. तुमचा चिंतामणी’. काही क्षण बुवाही गडबडून गेले. आणि गावकर्यातही खसखस माजली होती. पण लगेच स्वत:ला सावरत बुवा समोरच्या जमावावर गरजले,
‘मुर्खांनो हे कधी सांगणार? माझा वेळ आणि दिवस खराब केलात. अरे माझ्याच मुलाकडून मांजर मारले गेले होते तर कालच संध्याकाळी सांगायचे नाही का? इतकी रात्र बघून उपाय व प्रायश्चित्त शोधायला लावलेत मला. मुर्खांनो. माझ्याच मुलाकडून त्या मांजराचा मृत्य़ु झाला असेल तर प्रायश्चित्त वगैरे काहीही करायला नको. पळा आपापल्या कामाला, मुर्ख लेकाचे.’
एकदम गावकर्यांचा जमाव शांत झाला. सगळेच शास्त्रीबोवांकडे आश्चर्यचकित होऊन बघत होते. गावकर्यापैकी कोणाकडुन मांजर मारले गेले तर घोर पाप असते आणि प्रायश्चित्त घ्यायला हवे. पण बुवांच्या मुलाकडून मांजर मारले गेले तर पापसुद्धा होत नाही? हा काय मामला आहे? ‘निघा’ असा फ़तवा बुवांनी काढला तरी जमाव तसाच स्तब्ध उभा होता. आणि त्या शंकेचाशी शास्त्रार्थ त्याच म्हातारीने बुवांना विचारला. ‘हे कसे काय हो बुवा?’
‘म्हातारे, अगोबाई माझा मुलगा चिंतामणी हा ब्राह्मणाचा पुत्र म्हणजे ब्राह्मणच ना? मग त्याच्या हातून मांजर मेले तर त्याला थेट मोक्षच मिळाला ना? मांजराला मोक्ष देणे हे पाप कसे होईल? उलट आमच्या चिंत्याने केले ते पुण्य़कर्मच आहे. त्याचे कसले आले आहे प्रायश्चित्त? हे पुण्य कालच संध्याकाळी सांगितले असते तर तुमच्या झोपा खरा्ब झाल्या नसत्या आणि माझा वेळ वाया गेला नसता.’
भाऊ काहीच सांगायची सोय ठेवली नाही सगळ्या मुद्द्यांचा परामर्श होऊन गेला....अत्यंत मार्मिक- सचोट आणि समर्पक ! सुंदर कथा... उत्कट प्रबोधन !!
ReplyDeleteसमजलं :)
ReplyDeleteHE VACHUN SANTAP VYAKT JKARAVE? HASAVE ? KI AAPLYA SAMAJATIL ASHA PRAVARUTINVAR TIKA KARAVI? KHUP SUNDA SHABDAT VASTAV MANDALA AAHAT! gREAT bHAVU!
ReplyDeleteभाऊ सुंदर कथा....
ReplyDeleteछान
ReplyDeleteChan Bhau khupach chan asa kuni tari zanzanit anjan ghatala pahijee dolyat pan chayla aamchya lokana samjatach nahi
ReplyDeleteमस्त.
ReplyDeletesuperb @@@
ReplyDeletebhau, tumhi lihile khup chhan ahe. Pan tumhi mhntat tyat tathya nahi. He brahmandveshatun badnami karayache udyog ahe. Vastvikata khup vegali ahe. Anek khedyat brahmanana don vel jevayachi bhrant ahe. Tumchyasarkhya vyaktikadun asle udyog apekshit nahi.
ReplyDeleteतेजस कुलकर्णीसाहेब,
Deleteकृपया गैरसमज करून घेऊ नये. जातीपाती विरोधी भाऊ कधी काही लिहीत नाहीत. त्यांना फक्त सेक्युलर लोकांचा बुरखा फाडायचा होता. म्हणून त्यांनी सुरुवातीलाच लिहले आहे की,
"आजकाल सेक्युलॅरिझम वा पुरोगामी म्हणून मिरवणारे आधुनिक ब्राह्मण झालेत. म्हणूनच ही कथा जन्माधिष्ठीत ब्राह्मणांविषयीची वाटत असली तरी ती आजच्या संदर्भात घ्यावी. आजकाल गळ्यात सेक्युलर जानवे घातले की तुम्ही पुरोगामी ब्राह्मण म्हणून हेच तर्कशास्त्र राबवायला मोकळे असता"
म्हणून कोणत्याही प्रकारचा राग मनात ठेऊ नका ही विनंती! धन्यवाद!
नक्कीच... ह्यात राग येण्यासारखे काहीही नाही... मी तर कोब्रा आहे... असे ब्राम्हण होते... हे मान्य करायला हवं... आपली खुर्ची जातेय कळल्यावर अश्या भिती पसरवल्या जात...
Deleteभाऊ मस्तच. एका कथेतून अनेक पैलूंवर प्रकाश पडला . समजणारे सारं काही समजतील पण आपला हेका काही सोडणार नाहीत हे ही नक्की .
ReplyDeleteapratim,
ReplyDeleteitkya utkrusht barkavyanche varnan karnarya kathalekhakala janun ghenyachi ichha ahe, apanach lihilit ka?
its really best detailed screenplay, i just want to know the writer.
Dhanyavad bhau.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteब्राह्मण हा शब्द प्रवृतीशी, सखोल ज्ञान प्राप्तीशी, संतुलीत वीचार पातळीशी संबंधीत आहे असे मला अनूभवातून समजले आहे. जन्माने ब्राह्मण व कर्तृत्वाने ब्राह्मण असणे ह्यातला फरक मी पूर्ण समजलो आहे व समजून घेणे आवश्यक आहे. जसे डॉक्टर, इंजीनिअर अथवा प्रोफेसरची सन्तान जन्माने डॉक्टर, इंजीनिअर अथवा प्रोफेसर म्हणून मान्य नसते तर शिक्षण व अनुभवाने ती मान्यता मीळवावी लागते. तेच ब्राह्मण म्हणण्यात आवश्यक आहे, समाजाने हे समजून घेण्याचा प्रयत्न कधीच केला नाही, नुसतेच पुरोगामी म्हणवून घेण्यात वेळ घालवला आहे व घालवणार आहेत !! ब्राह्मण ही जात मानणे चुकीचे आहे. वरील कथेतील शीर्षक आिण "धर्मशास्त्र व पापपुण्याचे गावातले जाणकार व ठेकेदार शास्त्रीबोवा" हे दोन वेगळे प्रकार भाऊंनी एकत्र केले. डॉक्टर पदवी मीळवणे व तसे कर्तृत्व असणे ह्यात फार तफावत आहे हे समजणे जर सहज शक्य आहे तर ब्राह्मण, पुरोहीत, शास्त्रीबोवा हे फरक समजणे तीतकेच साधे-सोपे आहे. पण जाणूनबुजन तो फरक नाकारणे जास्त सोयीचे व फायद्याचे आहे हे पटवुन दिले जाते हेच समाजाचे दूर्दैव आहे !!!!!!!!! मंडळी प्रत्येक जाती जमातीत ब्राह्मण व्यक्ती होत्या, आहेत. जरुर शोधा प्रयत्न करा आणि त्यांना मान्यता द्या, एक प्रार्थना !!!!
ReplyDeleteछान।..
DeleteVK,
ReplyDeleteतुमच्याशी सहमत आहे. पेशवाईच्या वेळेस भिक्षुकशाही मजली होती हे खरंय. पण म्हणून सरसकट ब्राह्मणांना दोष देणे अनुचित आहे. अनेक ब्राह्मण भिक्षुकशाहीचे बळी ठरले आहेत. उदा. : दैवज्ञ ब्राह्मण. या लेखाचं नाव 'फुकटखाऊपणा किंवा भिक्षुकी तर्कट' असं हवं होतं.
जाताजाता : या कथेत मध्ययुगीन चर्चचा कोणी बिशप अधिक चपखलपणे बसला असता.
आपला नम्र,
-गामा पैलवान
भाऊ,
ReplyDeleteयाला "ब्राह्मणी" हे नाव देणे खरोखर शाब्दिक भिकारडे पणाचे लक्षण आहे. तुमच्या सारख्या पत्रकाराच्या डोक्यात तरी हे यायला पाहिजे की असे एका जातीचे नाव देवून लेख लिहिणे याने कारण नसताना त्या जाती बद्दल इतरांच्या मनात द्वेष वाधतो. त्याला तुम्ही खत पाणी घातले ही शरमेची गोष्ट आहे.
महाराष्ट्रातल्या सत्ताधार्यांच्या कहाण्या लिहून त्यांच्या "जातीचा" उल्लेख करून तुम्हाला असे लिहिता येईल का ? का ती तुमची मर्यादा समजायची . मग इतर पत्रकार आणि भाऊ यांच्यात फरक तो काय उरला ? समाजवादि लोकांनी केलेला ब्राह्मण विरोधी विषारी खोटारडा प्रचार इतक्या थराला गेला आहे की "समाजवाद शाही" ला आणि जात दांडग्यानच्या " दंडुके शाही "
ला तुम्ही पण घाबरलात.
या लेखा मुळे नाही मात्र त्याच्या "ब्राह्मणवाद किंवा ब्राह्मणी तर्कशास्त्र " या नावा मुळे मात्र तुमची आणि महाराष्ट्रातल्या तमाम पत्रकारांच्या निर्भीड पणा ची दया आली
प्रिय मंदार संतसाहेब,
Deleteकृपया गैरसमज करून घेऊ नये. जातीपाती विरोधी भाऊ कधी काही लिहीत नाहीत. त्यांना फक्त सेक्युलर लोकांचा बुरखा फाडायचा होता. म्हणून त्यांनी सुरुवातीलाच लिहले आहे की,
"आजकाल सेक्युलॅरिझम वा पुरोगामी म्हणून मिरवणारे आधुनिक ब्राह्मण झालेत. म्हणूनच ही कथा जन्माधिष्ठीत ब्राह्मणांविषयीची वाटत असली तरी ती आजच्या संदर्भात घ्यावी. आजकाल गळ्यात सेक्युलर जानवे घातले की तुम्ही पुरोगामी ब्राह्मण म्हणून हेच तर्कशास्त्र राबवायला मोकळे असता"
म्हणून कोणत्याही प्रकारचा राग मनात ठेऊ नका ही विनंती! धन्यवाद!
Aho Bhau Brahman samajachi Avastha tya manjara sarakhi jhali ahe! Tyamulech sagalikade undir vadhale ahet samajat ase nahi vatat. Paha jara ajubajula.
ReplyDeleteप्रिय रमेशसाहेब,
Deleteआपण म्हणता तशी खरेच ब्रम्हणांची स्थिती खुपच दयनीय आहे. परंतु भाऊंच्या लेखाविषयी कृपया गैरसमज करून घेऊ नये. जातीपाती विरोधी भाऊ कधी काही लिहीत नाहीत. त्यांना फक्त सेक्युलर लोकांचा बुरखा फाडायचा होता. म्हणून त्यांनी सुरुवातीलाच लिहले आहे की,
"आजकाल सेक्युलॅरिझम वा पुरोगामी म्हणून मिरवणारे आधुनिक ब्राह्मण झालेत. म्हणूनच ही कथा जन्माधिष्ठीत ब्राह्मणांविषयीची वाटत असली तरी ती आजच्या संदर्भात घ्यावी. आजकाल गळ्यात सेक्युलर जानवे घातले की तुम्ही पुरोगामी ब्राह्मण म्हणून हेच तर्कशास्त्र राबवायला मोकळे असता"
म्हणून कोणत्याही प्रकारचा राग मनात ठेऊ नका ही विनंती! धन्यवाद!
द्विजाची कैफियत
ReplyDeleteहल्ली मी दहशत वाद्यांच्या विरोधात बोलायचे टाळतो,
कारण बुरसटलेली विचारसरणी अशी हेटाळणी होईल
हल्ली मी आंदोलनात भाग घ्यायचे टाळतो,
कारण आंदोलनाचा पाठिंबा कमी होईल
हल्ली मी आरक्षणावर बोलायचे टाळतो,
कारण राजकारणी त्याचा फायदा घेतील
हल्ली मी समाजसुधारकांचे नाव ही घ्यायचे टाळतो,
कारण खोटा इतिहास सांगण्याचा खटला होईल
हल्ली मी टिळक, सावरकरांचे लिखाण वाचणे टाळतो,
कारण सनातनी विचारांचा शिक्का बसून जाईल
हल्ली मी सभ्य, सुसंस्कृत पणे बोलणे टाळतो,
कारण त्याला नपुंसकता समजले जाईल
हल्ली मी समाजसेवा करण्याचे टाळतो
कारण त्यातच आमच्या घरांची बरबादी, कुटुंबांची ससेहोलपट झाली
हल्ली मी आडनाव घ्यायचे टाळतो,
कारण त्यातून माझी जात ओळखली जाईल
हल्ली मी चारचौघात विचार मांडणे टाळतो,
कारण त्यात कुणालाही जातीय कावा दिसतो
हल्ली मी देशभक्तीच्या घोषणा देणे टाळतो,
कारण त्यात संघाचा प्रभाव दिसतो
नाही दादोजींना इमान, रामदासांना चारित्र्य,
शहिदांची जात येते वृत्तपत्रात मात्र
हळू बोला,आपल्या जातीचे नाव कुणी घेवू नका,
कृष्णाजीशिवाय कोणाचाही वारसदार स्वतःला मानू नका
आम्हाला शिव्या दिल्या शिवाय इतर मागासलेले ठरत नाहीत,
रात्री पुतळे हलवल्याशिवाय भ्रष्टाचारावरून जनतेचे चित्त हटत नाही
ही जात इतकी बदनाम कशी,प्रश्न मला पडला आहे,
जातीयतेच्या राजकारणात सारा देश सारा देश सडला आहे
जरी म्हटलं या साऱ्या अफवा खोट्या आहेत,
पण विषमता मिटली तरी आमच्या मनात मोठ्या दऱ्या आहेत
आमचा जप करून पोट काहींचे भरते यात आनंद आहे,
शेवटी त्यांच्या कडेही द्यायला शिव्या उरत नाहीत
आतातर यासाठी विशेष धर्म, संघटना निघाल्या आहेत,
भावी देशासाठी त्यांच्या आपापल्या घटना निघाल्या आहेत
त्यांच्या या घटनांमध्ये एका जातीला स्थान नाही,
म्हणून तिथे कवी कलशाला उल्लेखाचा ही मान नाही
काय करणार शेवटी ही जातच बदनाम आहे,
मान वर करून चालण्याची आमची काय बिशाद आहे
धर्म तोडणार्यांना, सत्ताधीशांना आगीत तेल ओतावे लागते,
त्यांच्या कडेही दुसरा फायद्याचा उपाय नाही
वाघ, सिंहाच्या वाटेला कुणी भक्त जातो काय,
यज्ञात बळी होतो बकरा, राजकारणात कोण होते पाहा,
धरली तर चावते, सोडली तर पळते अशी ही जात आहे,
ही तर कट्टरतेची माणुसकी वर मात आहे
स्वातंत्र्यानंतरही घरे जळाल्यावर आम्ही मागे हटलो आहोत,
समाजसेवा,परमार्थ करण्याला घाबरू लागलो आहोत
सोडा आता विचार सारे, पूर्वजांच्या चुका पुन्हा करू नका,
अहंगंडाच्या कोशात राहून वाट वाकडी धरू नका
जिभेवर असली सरस्वती तरी सत्य बोलावत नाही,
मानाने जगण्याचा हक्क ही आम्ही मागत नाही
आम्हाला आदर न दिल्याने समाज कुठे चालला आहे,
शिक्षणात पावित्र्य, समाजात नैतिकता, राजकारणात सौजन्याची ऐशी तैशी,
जीवनात रामापेक्षा दामाची जागा झाली मोठी
द्वेषाला द्वेषाने आम्ही उत्तर देत नाही,
द्वेषाचा धंदा करणार्यांचे दुकान बंद होत नाही
वोट बँक बनवल्याशिवाय प्रश्न कधी सुटणार नाहीत,
पैसा, सत्ता आल्याशिवाय समाजाला तुम्ही चांगले वाटणार नाहीत
शेंडी आणि जानव्याचे तेज कमी झालेले नाही,
हार मानण्याइतकी परिस्थिती हाताबाहेर गेली नाही
सोडून सारे न्यूनगंड,हताशा, वर्तमानात जगूया,
गेली संकटे, झाल्या चुका, बदलण्याची वेळ आहे.
हिम्मतीने जगण्याचा हा काळ आहे.
उज्ज्वल भवितव्य घडवायचे आहे,
यश खेचून आणायचे आहे
होऊन गेला भूतकाळ, भविष्य बाकी आहे,
द्वेष कुणीही करो, राम आमच्या पाठीशी आहे
अतिशय शोकार्त ब्राह्मण समाजाच्या ह्या भावना अंतर्मुख करायला लावणारी पुरेश्या
Deletemi hi kawita copy karu shakto ka ?
DeleteU can copy. no problem.
DeleteAgreed to Mandar Sant.
याला "ब्राह्मणी" हे नाव देणे खरोखर शाब्दिक भिकारडे पणाचे लक्षण आहे. तुमच्या सारख्या पत्रकाराच्या डोक्यात तरी हे यायला पाहिजे की असे एका जातीचे नाव देवून लेख लिहिणे याने कारण नसताना त्या जाती बद्दल इतरांच्या मनात द्वेष वाधतो. त्याला तुम्ही खत पाणी घातले ही शरमेची गोष्ट आहे.
हा लेखक / पत्रकार धूर्त आहे.
Deleteमाधवन काय समर्पक कविता किंवा ओळी लिहिल्या आहेत शतशः धन्यवाद्धन्यवाद
Deleteप्रिय माधवनसाहेब,
Deleteआपल्या सर्वांना माहीत आहेकी आपल्या भारताच्या जडणघडणीत, सुधारणेत ब्राम्हणांचे किती मोठे योगदान आहे. स्वातंत्रवीर सावरकर, आगरकर, टिळक, गोखले, हुतात्मा राजगुरु, चाफेकर बंधू असे कित्येक नावे घेता येतील. भाऊंना हे माहीत नाही असे आपणास म्हणायचे आहे काय? कृपया गैरसमज करून घेऊ नये. जातीपाती विरोधी भाऊ कधी काही लिहीत नाहीत. त्यांना फक्त सेक्युलर लोकांचा बुरखा फाडायचा होता. म्हणून त्यांनी सुरुवातीलाच लिहले आहे की,
"आजकाल सेक्युलॅरिझम वा पुरोगामी म्हणून मिरवणारे आधुनिक ब्राह्मण झालेत. म्हणूनच ही कथा जन्माधिष्ठीत ब्राह्मणांविषयीची वाटत असली तरी ती आजच्या संदर्भात घ्यावी. आजकाल गळ्यात सेक्युलर जानवे घातले की तुम्ही पुरोगामी ब्राह्मण म्हणून हेच तर्कशास्त्र राबवायला मोकळे असता"
म्हणून कोणत्याही प्रकारचा राग मनात ठेऊ नका ही विनंती! धन्यवाद!
MADHVAN
ReplyDeleteatishay sundar atyant yogya shabdat tumhi vastustithi mandleli ahe Dnyavad
कथा खूप छान आहे , पण हि कथा गावागावापर्यंत पोहोचली पाहिजे जेणेकरून अंधश्रद्धा जागृतीकरण तरी होईल
ReplyDeleteसमाजामध्ये मनु ने समाजव्यवस्था निर्माण केली ती कर्माधिष्टित होती. कुवतीप्रमाणे कामाचे वाटप केले होते त्याला नंतर ज्यांच्या कडे सत्ता आली त्यांनी जातीयता निर्माण केली. ब्राम्हण कार्य हे विद्यादान व समाजाचे प्रभोधन हे असल्याने त्यांच्या कडे अनाहुत पणे समाजाचे नेतृत्व आले. पर्यायाने सत्ता आली. सत्ता ही व्यक्तीला मदांध करते. ब्राम्हणांच्याच चार पोरांना याच व्यवस्थेने अनाथ केले. त्यांच्या आईवडिलांना आत्महत्त्या करण्याची शिक्षा दिली निवृत्ती,ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांना कधी विस्ररता येईल का. त्याकाळी महाराष्ट्रातील पैठण हे सत्तापिठ होते.
ReplyDeleteआज देखील सत्ताधिश आपली मनमानी करीत आहेत त्याचे मुळ असे आहे. नंतर ब्राम्हणांकडुन ही सत्ता गेली असे कसे म्हणता येईल. आजही हे नविन सत्ताधिश हेच ब्राम्हण आहेत. ब्राम्हण या शब्दाचा अर्थ विकृत झाला आहे. मास मच्छी खाणारा हा ब्राम्हण असुच शकत नाही कारण ब्राम्हण या शब्दाची व्याख्या कर्मानुसार होती. समाजाचे प्रबोधन आपल्या कृतीने करणारा तो ब्राम्हण. आजही असे ब्राम्हण समाजात आहेत. त्याचा जातीशी काहीच संबंध नाही.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteWhat is the point of this story , if at all there is any? You always seem to criticize about how other journalists are wrong, how they dont do this but how only you do all that is making you Arvind Kejriwal of journalists.. Holier than thou ... milk the same cow...
ReplyDeleteआजकाल सेक्युलॅरिझम वा पुरोगामी म्हणून मिरवणारे आधुनिक ब्राह्मण झालेत. म्हणूनच ही कथा जन्माधिष्ठीत ब्राह्मणांविषयीची वाटत असली तरी ती आजच्या संदर्भात घ्यावी. आजकाल गळ्यात सेक्युलर जानवे घातले की तुम्ही पुरोगामी ब्राह्मण म्हणून हेच तर्कशास्त्र राबवायला मोकळे असता.
ReplyDeleteगोष्ट रंजक वाटली... पण छोटा विषय मोठा करून सांगण्याचा हा द्राविडी प्राणायाम कशासाठी?
ReplyDelete"आपला तो बाब्या दुसरयाच ते कार्ट" हा साधा व सोपा जागतिक,कालातीत मनुष्य स्वभाव नियम...
सर्व जाती,धर्म,पंथ,समाज,देशात युगानुयुगे प्रचलीत व स्वीकृत.....
अखंड चविष्ट व चघळट जातीय मथळा देऊन "शिळ्या भाजीचा" रीगरम वडा वाचकांच्या माथी मारून खपवायचा
व पुरोगामी म्हणून अजून छाती फुगवायची बास करा भौ..
ही टीका करणारा आधी सच्चा पुरोगामी माणूस व जन्म आणि कर्मानेही ब्राह्मण आहे..
ज्याचा दुराभिमान नाही आणि शरमही नाही..
प्रिय डोक्टर,
Deleteआपल्या सर्वांना माहीत आहेकी आपल्या भारताच्या जडणघडणीत, सुधारणेत ब्राम्हणांचे किती मोठे योगदान आहे. स्वातंत्रवीर सावरकर, आगरकर, टिळक, गोखले, हुतात्मा राजगुरु, चाफेकर बंधू असे कित्येक नावे घेता येतील. भाऊंना हे माहीत नाही असे आपणास म्हणायचे आहे काय? कृपया गैरसमज करून घेऊ नये. जातीपाती विरोधी भाऊ कधी काही लिहीत नाहीत. त्यांना फक्त सेक्युलर लोकांचा बुरखा फाडायचा होता. म्हणून त्यांनी सुरुवातीलाच लिहले आहे की,
"आजकाल सेक्युलॅरिझम वा पुरोगामी म्हणून मिरवणारे आधुनिक ब्राह्मण झालेत. म्हणूनच ही कथा जन्माधिष्ठीत ब्राह्मणांविषयीची वाटत असली तरी ती आजच्या संदर्भात घ्यावी. आजकाल गळ्यात सेक्युलर जानवे घातले की तुम्ही पुरोगामी ब्राह्मण म्हणून हेच तर्कशास्त्र राबवायला मोकळे असता"
म्हणून कोणत्याही प्रकारचा राग मनात ठेऊ नका ही विनंती! धन्यवाद!
dr kulkarni mala tumchat chitamani disala krupakarun manjar marnyache kam karu naka
DeleteVartulat tar pratek jan hota. Mag Chintamani ekta doshi kasa ? Manjaracha jiv ghenara to pratek jan doshi ahe, jyane jyane dagad marla.!
Deleteजगदंब जगदंब जगदंब
ReplyDeleteडॉक्टर कुलकर्णी आपण एक लक्षात घ्यावे ब्राम्हण कुलाचा मक्ता आपण घेतला नाहीय .... जात / वर्ण हे संकराने नाही तर संस्काराने सिद्ध होते याचाच अर्थ ब्राम्हण कुलदीपक जर माठ असेल तर अंगमेहनतीचे हमालीचे , हजामाचे काम करेल आणि ती त्याची जात असेल .... तर खालच्या जातीतील जन्म घेतलेला हुशार निघाला तर तो ब्राम्हण असेल ! उगाच माझा बाप ब्राम्हण म्हणून मीसुद्धा ब्राम्हण म्हणण्यात काही अर्थ नाही !
ReplyDeletesundar
ReplyDeleteआपला तो बाळया दुसर्याच ते कार्ट
ReplyDeleteहेच चाललंय या तथाकथीत बुद्धीवादयांच
भाऊ छानच,👌पण काहींचा मुखवट्या मागील जातीचा भेसूर चेहराअजून डोकावतोय हेच खरे
ReplyDelete