विधीमंडळात मंगळवारी घडलेली घटना शोभादायक नव्हती याबद्दल दुमत होण्याचे कारण नाही. पण तेवढे निमित्त घेऊन एकूणच लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांवर जी झोड उठवली जात आहे, त्याची थोडी गंमत वाटते. ज्याला मारहाण झाली वा जखमा झाल्या; त्याच्या बाजूने समर्थनाला उभे रहाणे हा मानवी स्वभाव आहे. रस्त्यात कुठे शाळकरी मुले वा बालकासह, दारूड्याला धावत्या गाडीचा धक्का बसला; तर एका क्षणात गाडीचा चालक त्यातला गुन्हेगार असतो. प्रसंग कसा ओढवला याकडे बघायला कोणी राजी नसते. तात्काळ जमलेला जमाव त्या चालकावर तुटून पडत असतो. त्यापेक्षा विधीमंडळात घडलेल्या घटनेनंतरचा प्रकार वेगळा वाटत नाही. आमदारांनी कुणाला लाथाबुक्क्यांनी मारणे योग्य अजिबात मानता येणार नाही. पण ते आमदार असले तरी तुमच्याआमच्या सारखीच तीही माणसे आहेत आणि अनवधानाने माणसाप्रमाणे वागणे शक्य आहे, याचा विचार कोणाच्या मेंदूला कसा स्पर्ष करीत नाही याचेच नवल वाटते. कोणी निवडून आला, मंत्री वा लोकप्रतिनिधी झाला; म्हणजे त्याला रागलोभ आवरण्याचे काही खास अवयव उपलब्ध होतात, अशी कोणाची समजूत आहे काय? याच विधीमंडळात चार दशकांपुर्वी सभापतींच्या दिशेने एका आमदाराने पेपरवेट भिरकावल्याचे उदाहरण आहे. त्याने सभापतीला ठार मारायला किंवा जखमी करायला तशी कृती केलेली नव्हती. रागाच्या आवेशात माणसे अशीच वागतात. आपण कुठल्या पदावर आहोत याचे भान प्रत्येकाला राखता येतेच असे नाही. ज्याला इतका संयम वा समतोल राखता येतो, तो महात्माच असू शकतो. म्हणजेच निवडून येणारे सगळेच महात्मे असू शकत नाहीत, हे विसरता कामा नये. म्हणूनच असे प्रकार घडतात. त्याचा निषेध जरूर झाला पाहिजे. पण त्याचे अवडंबर मात्र माजवले जाते ती निव्वळ अतिशयोक्ती आहे.
विरारचे तरूण आमदार क्षितीज ठाकूर यांचा कुठल्या टोलनाक्यावर पोलिसांशी खटका उडालेला होता. त्यातून त्यांनी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणला होता. त्याचवेळी सभागृहाच्या प्रेक्षक कक्षामध्ये तोच पोलिस अधिकारी उपस्थित होता आणि त्याने काही चिडवणारे इशारे व संकेत केल्याचा दावा आहे. त्यानंतर ठाकूर यांच्यासह काही आमदार धावत सभागृहाबाहेर पडले व त्यांनी त्या अधिकार्याला गाठून मारहाण केली. अगदी इस्पितळात दाखल करण्यापर्यंत मारहाण झालेली आहे. अशी इजा करणारी मारहाण निषेधार्ह आहेच. पण आमदारांना विधीमंडळात असताना व आसपास सतत कॅमेरे चित्रण करत असतानाही भान सुटावे, असे काय घडले, त्याचा विचारच करायचा नाही काय? या संबंधीचा जो एक व्हिडीओ संबंधित टोलनाक्याच्या परिसरातला उपलब्ध आहे; त्यात हा पोलिस अधिकारी सतत आमदाराला अरेतुरेची उर्मट भाषा बोलताना दिसतो आहे. उलट त्याच्याशी जो कोणी आमदार वा अन्य व्यक्ती बोलतेय ती त्याला अहोजाहो, असे आदरार्थी बोलताना ऐकू येते. ते शब्द व संवाद स्पष्टपणे पोलिसाच्या मस्तवालपणाची साक्ष देणारे आहेत. ज्याला विधान भवनात मारहाण झाली; तोच हा अधिकारी आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी तो उर्मट व उद्धटपणे कुरापत करणाराच वाटतो. आपल्याला शिवी दिली, असा त्या संवादात तो सातत्याने दावा करतो आहे. पण ज्याला शिवी दिल्याचा इतका संताप आहे, त्याला स्वत: आमदाराशी अहोजाहो बोलायचे भान का नसावे? जी अपेक्षा आपण इतरेजनांकडून करतो, तसे आपणही वागले पाहिजे ना? व्हिडीओ बघितल्यास पोलिसाला व्यक्तीगत अभिमान वा गणवेशाचा सन्मान यापेक्षाही आपल्या अधिकाराचा माज चढल्याचे स्पष्टपणे जाणवतो. त्याच्या वतीने तमाम माध्यमांनी इतका गळा काढणे म्हणूनच नवलाचे वाटते.
एक गोष्ट कोणी नाकारू शकणार नाही. जेव्हा मूळ घटना घडली, तेव्हा ठाकूर हा एकच आमदार दुखावलेला होता. पण सभागृहात अन्य आमदार त्यांच्यासोबत असताना प्रेक्षक कक्षातले असे काय त्यांनी पाहिले, की ते सर्वच खवळले? ठाकूर या एका आमदाराच्या अपमानासाठी हे अन्य आमदार आपली प्रतिष्ठा पणाला लावून असे पोलिस अधिकार्याच्या अंगावर धावून जाण्याची अजिबात शक्यता नाही. सामान्य बुद्धीच्या माणसाला हे लक्षात येऊ शकते, की इतक्या आमदारांचा संताप अनावर व्हावा, असे काहीतरी घडलेले आहे. आणि त्यांनी प्रतिष्ठा वा कारवाईची फ़िकीर न करता धाव घेतली व त्याला मारहाण केलेली आहे. एका आमदाराचा सूड म्हणून इतकी किंमत बाकीचे कशाला मोजतील? स्वत: त्यांनाही कुठेतरी इजा झाल्याशिवाय पुढला प्रकार नक्कीच घडलेला नाही. पण दिवसभरची चर्चा, बातम्या व दुसर्या दिवशीचे त्यावरील विवेचन पाहिल्यास असे वाटते, की आमदारांना मारामारी व हिंसा करण्याचीच उबळ आल्याने विधीमंडळातील प्रसंग घडला असावा. हे निखळ असत्य आहे. जे घडले ते कितीही अश्लाघ्य असले तरी, त्याला संबंधित पोलिस अधिकार्याचा काही तरी खोडसाळपणा नक्कीच जबाबदार आहे. त्याबद्दल अवाक्षर बोलायचे नाही, त्याचा तपशील तपासायचा नाही, आणि नियम वा सभ्यता सोडली म्हणून आमदारांना फ़ाशी द्यायला पुढे सरसावायचे; ही पत्रकारिता नाही की सुसंस्कृतपणाही नाही. गर्दीत मुलीची छेड काढलेली दिसत नाही, पण खवळून तिने उलट हाणलेली चप्पल मात्र नजरेत भरते, त्यातला हा प्रकार नाही काय? मग चप्पल मारणारीला गुन्हेगार व दोषी मानायचे काय?

No comments:
Post a Comment