जेव्हा जुलै २००६ मध्ये भिवंडीमध्ये रझा अकादमीच्या मेळाव्यातून मिळालेल्या चिथावणीने गांगुर्डे व जगताप नावाच्या पोलिस शिपायाना दगडांनी ठेचून ठार मारण्यात आले व नंतर पेटलेल्या बसमध्ये ढकलून देण्यात आले, तेव्हा मी इथे भारतात नव्हतो, तर अमेरिकेत होतो. पण तेव्हा तिथून मी दोन लेख साप्ताहिक ‘विवेक’साठी लिहिले होते. त्याचे छापील अंक माझ्याकडे नाहीत. पण जे हस्तलिखित कागद मी ईमेलने पाठवले होते, त्याच्या स्कॅन कॉपीज मला जुन्या मेलमध्ये मिळाल्या. त्या मुद्दाम ब्लॉगवर टाकल्या आहेत. त्या हस्ताक्षरातील असल्याने वाचायला त्रासदायक ठरू शकतात. पण तेवढा उत्साह ज्यांना असेल त्यांनी जरूर वाचावेत असे दोन्ही लेख आहेत.
पहिल्या लेखाचे शिर्षक होते, "भविष्यवेत्ता दादा कोंडके, गृहमंत्री आर. आर. पाटील" आणि दुसर्या लेखाचे शिर्षक होते, "नागरिक अफ़वांवर विश्वास का ठेवतो?"
जमल्यास हे लेख नंतर टाईपसेट करून ब्लॉगवर टाकायचा प्रयत्न करीन.