Tuesday, December 4, 2018

कटकारस्थानाचा ‘कुमार’संभव

संबंधित इमेज

कुमार केतकर हे विद्यमान पत्रकारितेतले एक व्यासंगी नाव आणि व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे ते कुठल्याही राजकीय वा सामाजिक विषयावर भाष्य करतात, त्याकडे काणाडोळा करणे योग्य नाही. त्याकडे गंभीरपणे बघणे भाग असते. सहाजिकच कालपरवा त्यांनी मोदींच्या सत्तेत येण्यमागे चार दशकांचे जुने कटकारस्थान आहे, असा संशय व्यक्त केल्यावर त्यातील ‘कुमार’संभव शोधण्य़ाला पर्याय उरत नाही. सध्या २०१८ साल चालू आहे आणि त्यामुळे नरेंद्र मोदी सत्तेत येण्याविषयी केतकर म्हणतात, ते कटकारस्थान बहुधा १९८०-८३ सालात सुरू झालेले असावे. ते केतकरांचा कुठून उमजले असे आपण विचारू नये. कारण तसे काही असते, तर त्याविषयी त्यांनी तेव्हाच गवगवा केला असता. निदान त्यानंतर तीस पस्तीस वर्षात त्यावर टिप्पणी नक्कीच केली असती. पण तेव्हा केतकर जगाला भलताच ‘हितोपदेश’ करीत होते. ते कुठल्या वेगळ्याच कारस्थानाविषयी जगाला जागृत करीत होते. ते त्यात कुठेही नरेंद्र मोदी वा संघ भाजपाचा उल्लेख आढळत नाही. उलट आज केतकरांच्या सहवासात असणारे सगळे कसे बदमाश कारस्थानी आहेत; त्याची जंत्री केतकरांनी आपल्या हितोपदेशात सादर केलेली होती. त्यामुळे ज्या कोणाचे हवाले देऊन केतकर मोदींच्या हुकूमशाही वा एकाधिकारशाहीची कथा सांगत आहेत, ते तमाम साक्षिदारच चोर ठरतात. म्हणजे अशा शंका घेणा‍र्‍या, दोषारोप करणार्‍यांना केतकरांनी तेव्हा शहाजोग म्हटलेले होते आणि त्यातला ‘शहा’ अमीट होता, अमित नव्हे. अन्य कोणाला सोडा, खुद्द केतकरांना आपला तो हिरतोपदेश आज आठवत नसेल, तर त्यांना स्मृतीभ्रंश झाला की बुद्धीभ्रंशाने त्यांना पछाडले, अशी शंका येते. १५ नोव्हेंबर १९९६ म्हणजे तब्बल बावीस वर्षापुर्वी महाराष्ट्र टाईम्सचे संपादक म्हणून लिहीलेल्या अग्रलेखात केतकर काय म्हणतात बघा.

‘सर्वसाधारणपणे फ़क्त राजकारणी भ्रष्टाचारी असतो आणि इतर व्यवसाय तुलनेत अधिक पवित्र असतात असा अनेकांचा समज असतो. न्यायालये, वकील मंडळी, पत्रकार, लेखक-कवि-नाटककार, कलावंत, विचारवंत, नोकरशहा, उद्योगपती, लष्करी अधिकारी, असे समाजातील अनेक गट राजकीय व्यक्तीला खलनायक ठरवण्याच्या खटपटीत असतात.’... ‘सध्या तरी भारतात न्यायालयीन शुचिर्भूततेचा इतका दरारा तयार झाला आहे की, जामिन नाकारला जाणे याचा अर्थ गुन्हा सिद्ध झाला आहे, असा समज करून दिला जात आहे. त्याचप्रमाणे वृत्तपत्रांनी एखाद्या संस्थेला वा व्यक्तीला लक्ष्य केले की, त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत, असेही मानण्य़ाची प्रथा पडली आहे. "शोध पत्रकारिता" हा या व्यवसायातील शहाजोगपणाचा नमूना ठरू पहात आहे. पत्रकारांनी व्यवस्थेवर अंकुश ठेवावयास हवा, परंतु पत्रकारितेवर तो कोण ठेवणार? अजून तरी प्रेस कौन्सिल, न्यायालये किंवा पत्रकारांच्या संस्था याबाबत कोणतेही मापदंड निर्माण करू शकलेले नाहीत’

केतकरांच्या अग्रलेखातील उपरोक्त उतारा काळजीपुर्वक वाचलात. आता केतकरांचा ताजा आरोप व संशय त्याच बावीस वर्षे जुन्या अग्रलेखाच्या निकषावर तपासून बघा. आज केतकर सोनिया गांधींना वाढदिवसाचे अभिवादन करताना पुण्यात म्हणाले, ‘मोदी आणि अमित शहा यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप आहेत. सत्ता परिवर्तनानंतर पुरावे उघड झाल्यास त्यांना जन्मठेपेपर्यंत शिक्षा होवू शकते.’ हे गंभीर आरोप कोणी केलेले आहेत? तर केतकर ज्याना शहाजोगपणाची शोधपत्रकारिता म्हणतात, त्याच लोकांचे आरोप आहेत. म्हणजे शहाजोगपणा हा केतकरांचा बुद्धीवाद झाला आहे. कारण केतकरांचा आरोप शोधपत्रकारांच्या लेखावर आधारलेला आहे आणि न्यायालयात त्याला पुष्टी देणारा कुठलाही पुरावा मागल्या पंधरा वर्षात कोणी सादर करू शकलेला नाही. पण ज्या इसमाने असे आरोप प्रतिज्ञापत्र देऊन केले, त्या संजीव भटला सुप्रिम कोर्टाने तद्दन खोटारडा म्हणून घोषित केले आहे. पण केतकर मात्र पुन्हा त्याच खोट्या पडलेल्या आरोपाचा आधार घेऊन शहाजोगपणा करीत आहेत. त्याच्याही पुढे जाऊन कटकारस्थानाची हमीही देऊ लागले आहेत. मोदी आजपर्यंत देशाचे सामान्य पंतप्रधान होते. पण केतकरांनी त्यांना इतिहासपुरूष बनवून टाकलेले आहेत. म्हणजे मोदी २००२ सालात मोदी मुख्यमंत्री झाले आणि बारा वर्षानंतर पंतप्रधान झाले. त्यापुर्वी त्यांनी साधी नगरसेवक म्हणूनही निवडणूक लढवली नव्हती, की त्यासाठी उमेदवारी सुद्धा मागितली नव्हती. पण जागतिक पातळीवर नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी कारस्थान शिजवले गेले होते. सोळा वर्षापुर्वी जो माणूस स्वपक्षात साधा पदाधिकारी होता आणि ज्याची गणना कुठला महत्वाचा ज्येष्ठ नेता म्हणूनही होत नव्हती, त्याच्यासाठी आधी सतराअठरा वर्षे त्याला पंतप्रधान बनवण्यासाठी जगात कारस्थान रचले गेले, असा केतकरांचा दावा आहे. तेवढेच नाही, त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर नामवंत किर्तीवंत लोकांचे मुडदेही पाडले गेले. याला म्हणतात प्रतिभा. उगाच केतकर व्यासंगी नाहीत. त्यांची गणना बुद्धीमान पत्रकारांमध्ये उगाच होत नाही.

मोदींना पंतप्रधान करायचा चंग जगातल्या कोणी कधी बांधला ठाऊक नाही. पण जगातल्या कुठल्याही घटना मोदींच्या सत्तेत येण्याशी जुळवण्याचा चंग केतकरांनी नक्की बांधलेला असावा. त्यासाठी केतकर इंदिराजी व त्यांचे सुपुत्र राजीव गांधी यांची हत्या घडवून आणतात. त्यात फ़ारशी रंगत येत नाही, म्हणुन बांगलादेशाचे पहिले राष्ट्रपती शेख मुजीबुर रहमान यांचाही मुडदा पाडून घेतात. त्यासाठी केतकर अमेरिका व पाकिस्तानला कामाला जुंपतात. मग त्यातूनही त्यांचे समाधान झाले नाही, म्हणून पाकिस्तानच्या पंतप्रधान झुल्फ़ीकार अली यांना लष्कराच्या माध्यमातून फ़ासावर लटकावून घेतात. त्यातच हरीन पंड्या ह्या गुजरातच्या माजी मंत्र्याच्या हत्येची कथा घालून घेतात. इतके सगळे कशासाठी? तर भारतात मोदींना सत्तेत आणायचे म्हणून. यातून अनेक महत्वाचे धागेदोरे सुटून गेलेत. कदाचित स्मृतीभ्रंश झाल्याने केतकरांना आठवले नसावेत. पाकिस्तानात भुत्तोकन्या बेनझीरची हत्या होऊन गेलेली आहे आणि भुत्तोंना फ़ासावर लटकावणारे लष्करशहा जनरल झिया उल हक यांचा विमान अपघातात शंकास्पद मृत्यू झालेला होता. ते एकटेच नाही तर पाकिस्तानचे दहा ज्येष्ठ लष्करी अधिकारीही मारले गेले होते. त्यांची हत्या काय वाजपेयींना सत्तेवर आणुन बसवण्यासाठी होती? की केतकरांना मटाचा संपादक करण्यासाठी होती? अडवाणींना पाकिस्तानात नेवून महंमद अली जिनांचे गुणगान करण्यातही बहुधा तेच कारस्थान असावे. जेणे करून अडवाणी मोदींच्या मार्गातले अडथळा होण्यापुर्वी बाजूला करण्याचे ते उपकारस्थान असावे. किंबहूना खुद्द केतकरांना थेट महाराष्ट्र टाईम्स या मराठी अग्रगण्य दैनिकाच्या थेट संपादक पदावर आणून बसवणे, हेही कारस्थान नव्हते का? अन्यथा त्याचे काय प्रयोजन होते? बहुधा बिल क्लिन्टन व रशियाचे येल्तसिन यांनी एका भेटीत ते कारस्थान शिजवले आणि त्याला उकळी फ़ुटेना म्हणून चुलाणाखालच्या आगीला हवा देण्यासाठी केतकरांना फ़ुंकणी हाती देऊन बसवले. त्यामुळेच त्यांना इतक्या मोठ्या कारस्थानाची बित्तंबातमी लागलेली असावी. अन्यथा इतके तपशील व बारकावे कुणा गुप्तचरालाही मिळणे अवघड होते.

याला म्हणतात अस्सल दर्जेदार शहाजोगपणा. केतकरांच्याच व्याख्येनुसार त्यांनी केलेले वक्तव्य किंवा गौप्यस्फ़ोट, हा त्यांच्याच हितोपदेशानुसार शहाजोगपणाच आहे. कारण त्यात बाकी सगळ्यांच्या साक्षी काढून केतकर आता राजकीय नेता नरेंद्र मोदींना खलनायक ठरवण्याची खटपट करीत आहेत. त्यांनी आरोप करायला हरकत नाही. पण त्यात काळाचे, प्रसंगाचे व संदर्भाचे तरी भान असायला हवे ना? पण समोर सगळे गणंग व मुखंडच नंदीबैलासारखी मान डोलवायला बसलेले असतील, तर कुमार केतकर तरी कशाला गंभीर बोलतील? त्यांनी मस्तपैकी कल्पनाविलास सादर केला. २०१९ च्या निवडणुका तरी होतील की नाही, याची सर्वांना शंका असल्याची भितीही केतकरांनी व्यक्त केली आहे, हे सगळे कोण? त्यांच्या समोर बसलेले गणंग की काय? कारण त्याची खात्री नसती, तर राहुलचा इतका आटापिटा व महागठबंधनाची तयारी कशाला चालली आहे? राहुल घरी आरामात बसले असते, किंवा त्यांनी आजीच्या कुशित शिरून मस्त गोष्टी ऐकत नाताळ साजरा केला असता ना? पण केतकरांना कुठे चिंता आहे? शहजोगपणाच करायचा, तर तो बेधडक करावा आणि त्याला बुद्धीवाद म्हणून लेबल लावले की झाले. नशीब तुमचेआमचे केतकरांनी नथूराम गोडसे आणि महात्मा गांधींपर्यंत इतिहास मागे नेला नाही. अन्यथा मोदींना सत्तेत आणण्याच्या कारस्थानाची सुरूवात गांधीहत्येपासून झाल्याचाही शोध केतकरांनी लावायला मागेपुढे बघितले नसते. किंबहूना त्याच्याही मागे जाता आले असते. मोदीना सत्तेत आणायचे कारस्थान म्हणून ब्रिटिशांनी सत्ता सोडली. दुसरे महायुद्ध झाले. मोदींना सत्तेत आणण्यासाठीच सोवियत युनियन जमिनदोस्त करून तिथे पुतीन यांना सत्तेत आणले गेले आणि त्यांच्याकरवी मोदींचा मार्ग मोकळा करण्यात आला, असेही केतकर म्हणु शकतात. अमेरिकेने अणुबॉम्बचा शोधही मोदींना २०१४ साली सत्तेत आणुन बसण्यासाठीच लावला होता, अशी साक्ष केतकर देऊ शकतात. त्यांना कालचक्र आत्मसात झालेले आहे. कालौघातील कुठलेही प्रसंग कुठेही आणुन ठेवण्याची सिद्धी त्यांनी सोनिया भक्तीतून आत्मसात केली असेल, तर काय अशक्य आहे?

एका गोष्टीचे नवल वाटले, ज्या हत्याकांडांची क्रमवारी केतकर मांडतात व सांगतात, त्यातली एक सुसंगती त्यांच्या कशाला लक्षात आलेली नाही काय? सोनिया गांधी यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केतकर बोलत होते आणि पांडित्य सांगत होते, त्यांच्या हाती सत्तासुत्रे जाण्याचा अशा अनेक हत्याकांडांशी संबंध अजिबात नाहॊ काय? मोदी बाजूला ठेवा. सोनियांकडे कॉग्रेस व पर्यायाने भारताची सत्तासुत्रे कशी आली? काही हत्याकांडे झाली नसती तर सोनिया भारतीय राजकारणात इतक्या महत्वाच्या जागी जाऊन बसू शकल्या असत्या काय? इंदिराजीचा वारस म्हणून जाहिर झालेल्या संजय गांधी यांचे संशयास्पद अपघाती मरण कितपत शंकास्पद होते? केतकरांना ते आठवत नाही. त्यातून इंदिराजी व नेहरूंचा वारसा राजीव या पुत्राकडे आणला गेला व त्याच्या पत्नी सोनिया होत्या. मग इंदिराजींची हत्या झाली आणि सर्व सत्तासुत्रे राजीव गांधीकडे आली. त्यांचीही घातपाती हत्या झाल्यावर सगळा वारसा अलगद सोनियांकडे आला. ज्या जन्माने भारतीय नाहीत, पण देशाची सत्तासुत्रे त्यांच्याकडे का आली? त्यांच्या मार्गातले अडथळे व कुटुंबातले खानदानातले तीन मोठे खरे वारस अनैसर्गिक मृत्यूने बाजूला करण्यात आले. ह्यात केतकरांना काहीही खटकले नाही की संशयही आलेला नाही. किती कुशाग्र बुद्धी आहे ना? जे साध्या कालक्रमातून घडताना दिसते आणि साध्या डोळ्यांना व सामान्य मेंदूलाही उमजणारे आहे. नेहरू गांधी कुटुंबात झालेल्या या तीन संशयास्पद मृत्यूचा एकमेव लाभार्थी सोनिया आहेत आणि कारस्थान वा फ़ौजदारी प्रकरणात पहिला संशयित लाभार्थी असतो. त्याच लाभार्थी सोनिया गांधींविषयी केतकरांना तीळमात्र शंका येत नाही? ते त्याच सोनियांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भाषण देतात आणि मोदींना सत्तेत आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय कारस्थान शिजल्याचा शोध लावतात. सगळे पुरावे नेमके सोनिया लाभार्थी असल्याचे सादर करतात? याला चोराच्या उलट्या बोंबा असे म्हणतात. म्हणून हा ‘कुमार’संभव शोधण्य़ाची गरज भासली. राजीव गांधी पंतप्रधान होईपर्यंत भारताचे नागरिकत्वही न घेणार्‍या सोनियांच्या सत्तेत येण्यामागे कोणती दैवी योजना असल्याचा केतकरांचा अंदाज आहे, तेही त्यांनी राहुलच्या वाढदिवशी भाषण करून सांगावे अशी नम्र विनंती आहे.

63 comments:

  1. छानच भाऊ एकदम.. केतकरांना सिरियसली घेण्याचे काम नाही . परभणीच्या एका संमेलनात काही स्फोटक विचार मांडले होते .. दुसर्‍या दिवशी लोकमत संपादकीय मध्ये जेवढ्या त्यांच्या कपड्यांच्या चिंध्या केल्या त्यापेक्षा त्यांच्या विचारांच्या ... अश्या भाषेत फटकारले होते .. तो संपूर्ण लेख अगदी आपल्या शैलीतच होता ..

    ReplyDelete
  2. This is a known fact that Sonia is a mole of arms mafia.

    ReplyDelete
  3. Bhau sir ........ pls would you speak about raj thackrays statment on riots?

    ReplyDelete
  4. अहो भाऊ, म्हणून तर कुमार केतकर अस्मादिकांचे आवडते पत्रकार आहेत. तुमचं ठिक आहे हो. तुम्हाला फक्त गंभीरपणे खोडता न येणारे मुद्देसूद ब्लॉग लिहायचे आहेत. पण अस्मादिकांचे मनोरंजन कोण करणार? कोल्हापूरमधील संघर्ष यात्रेचे भाषण ऐका त्याशिवाय तुम्हाला मुनी केतकरांची किंमत कळणार नाही. असो. फुंकणी घेवून 'कुके' कसे दिसतील याचे एखादे कार्टून ठेवायचे ना सुरूवातीला.

    ReplyDelete
  5. अप्रतिम विषयमांडणी...

    कुमारांचा शवविच्छेदन अहवाल अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं आणि संदर्भासह आपण भाऊशैलीने सादर केलेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लेखाचा शेवट वाचकाला अंतर्मुख करून विचार करण्यास भाग पाडणारा आहे...

    उत्कृष्ट लेखाबद्दल धन्यवाद...

    ReplyDelete
  6. सुमार बुध्दीचा कुमार हा लक्षात रहावा फक्त त्याच्या कोकणस्थ व्यक्तीमत्वा मुळे. बाकी त्याच्या बोजड लिखाणाचा फॅन्स क्लब तयार व्हावा असं काहीच नाही. आयुष्याच्या संध्याकाळी सोनियाचे तळवे चाटावेत आणि त्यात धन्यता मानावी हि केवढी शोकांतीका म्हणावी.

    ReplyDelete
  7. ' वडाची साल पिंपळाला लावणे ' या ' दिव्य मराठी ' कौशल्यात ' कुमार केतकर ' यांचा कोणी हात धरू शकणार नाही. तरी अजून मी विचार करतोय की कुमार केतकरांनी या कटकारस्थानाचा ' बादरायण संबन्ध ' नथुराम गोडसे यांच्याशी कसा काय लावला नाही बुआ. कोणीतरी त्यांना आठवण करून द्यायला हवी.....या बद्दल..!! कुमार केतकरही म्हणतील की ' खरंच की '...................विसरूनच गेलो होतो....!! नाहीतरी कुमार केतकरांसाठी प्रत्येक ' विपरीत ' गोष्टीचा संबन्ध ' नथुरामाशी ' असायलाच हवा.

    ReplyDelete
  8. एकदा का पत्रकार कुणाच्या वळचणीला बांधला गेला की त्याची पत्रकारिता संपली म्हणून समजा. मग तो कितीही नावाजलेला पत्रकार असो.

    ReplyDelete
  9. english changal bolata ale mhanje aakal astech ase nahi , Ketkarana he kon sammjwaanar. ani he sare vidwan amchyach vatyala Ka ?
    Bhau excellent postmorem of Kumar ketkar Dhanyavad. Prasanna Rajarshi

    ReplyDelete
  10. कुके व्यंगचित्र.
    व्वा! काय झकास कल्पना आहे! कुणीतरी मनावर घ्या रे.

    ReplyDelete
  11. "सुमार" केतकारा कडे दुर्लक्ष करणेच ठीक,कोणीही त्यांना विचारवन्त समजत नाहीत,फक्त गांधी,नेहरू,सोनिया भाट च समजतात

    ReplyDelete
  12. सुमार केतकर

    ReplyDelete
  13. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर काही महिन्यांनी पुण्यात टिळक स्मारक मंदिरात राजदीप, बगळे,आणि सुमार बुद्धीचे पत्रकार एकत्र आले होते. तिथेही तिघांनी आकलेचे तारे तोडले होते. आणि त्यांचा वारस चालवू पाहणारे विद्यापीठातील राजकारणी, झोलाछाप टाळ्या पिटत होते.
    फक्त संघ,ब्राह्मण,मोदी,बाळासाहेब,हिंदुत्ववादी यांना काही शिव्या दिल्या की यांचे पुरोगामित्व सिद्ध होते.
    अर्थात पुरोगामी असण्याचा तोच एकमेव निकष आहे.
    आणि विशेष म्हणजे हे मान्यवर पुरोगामी,सोनिया मातेचे भक्त तिच्या वतीने किल्ला लढवत होते.
    अर्थात एनजीओ,पत्रकार,वकील,कलाकार,साहित्यिक,विचारवंत,सरकारी अधिकारी, आणखीनही बरेच लोक जे इतके वर्षे असलेल्या ecosystem चे लाभ घेणारे आता बोंबा मारणारच.
    लोकसत्तेत संपादक असताना महाराष्ट्रात किंवा इतरत्र कुठल्याही महत्वाच्या राज्यातील निवडणूक आली की संघ, हिंदुत्ववादी संघटना यांना शिव्या,शाप देणाऱ्या लेखांचा पूर यायचा. निवडणूक संपली की पुरही ओसरायचा .
    कुमार बुद्धीचे, सुमार दर्जाचे , चावके पत्रकार या शिवाय दुसरे काय करणार ?

    ReplyDelete
    Replies
    1. I was there in tilak smarak that time. विषय होता खरंच अच्छे दिन येणार का? That was the first time I understood existence of kubbber bhai

      Delete
  14. खुपच उत्कृष्ट लिखाण... कुमार केतकरांनी पोलखोल...��������

    ReplyDelete
  15. मुळ भाषण सोबत जोडावे

    विश्लेषण उत्तम

    ReplyDelete
  16. Bhau , Surekh lekh. Kumar Ketker vagere lokanche vagane baghun , bhismacharyanche vastraharan veleche vakya athvate. अर्थस्य पुरुषो दासः दासस्त्वर्थो न कस्यचित्‍ । इति सत्यं महाराज बद्धोऽस्म्यर्थेन कौरवैः

    ReplyDelete
  17. कुमार केतकर बिथरला आहे, गिरीश कुबेर माझी जागा तर घेणार नाही ह्या भयाने त्यांला पछाडले आहे, त्या मुळे हे दोघे ही अजून खालच्या पातळीवर जाणार.

    ReplyDelete
  18. नावातच कुमार,बाकी वय झाल्यामुळे बुद्धी नाठी झालीय. सुमार
    अध:पतन!

    ReplyDelete
  19. Congratulations bhau mast Article

    ReplyDelete
  20. "कुमार" केतकर नावाप्रमाणेच"कुमार" आहेत ते त्या नावाला साजेसंच बोलणार.जत्रेतून लहान मुले रंगीत चष्मा आणतात व सारखा लावून बसतात,तसेच या कुमारने पिवळ्या रंगाचा चष्मा कायमचा लावला आहे.मोगल सैनिकांच्या घोड्याला पाण्यात जसे धनाजी संताजी दिसत तसे याना जळी स्थळी पाषाणी संघ,भाजप दिसतो

    ReplyDelete
  21. भाऊ, एकदम साफ केलेत हो तुम्ही या कुमारना. मला वाटते त्यांनी एक स्टेटमेंट केले आहे फक्त ते हुडकावे लागेल. मोदींना पंतप्रधान बनविणे हा एक कटाचा भाग होता म्हणजेच भारतातील सर्व मतदारांनी सुद्धा या कटात भाग घेतला आहे. सामान्य मतदार सुद्धा कपटी असतो असे त्यांचे सांगणे आहे. काँग्रेस श्रेष्ठीनी यावर त्यांचे मत बोलले पाहिजे. ते जर केटकरांशी सहमत असतील तर धन्य ते केतकर ! आणि धान्य ते काँग्रेस !
    आता आम्ही कट करतो आहोत तर केतकर सर तुम्ही खरे आहात. एकदा निडणूक लढवून दाखवा, म्हणजे तुमच्या विरुद्ध कट करायला आम्ही मोकळे.

    ReplyDelete
  22. भाऊ, केतकरांच्या भाषणाची लिंक देणार काय !

    ReplyDelete
    Replies
    1. https://www.opindia.com/2018/12/kumar-ketkars-rant-global-conspiracy-that-murdered-mujibur-rahman-indira-gandhi-bhutto-wants-modi-to-stay-in-power/

      Delete
  23. Ketkar is blind with Congress love and extreme hate of Modi.With growing age ,he seems to have lost mental balance.I have good fortune of not hearing his so called lecture. But from your writing ,content is clear .He is stark stupid .To ignorant his barking.

    ReplyDelete
  24. काँग्रेस चा पिंड म्हणजे केतकर ह्या पलीकडे काही सांगण्या सारखे नाही

    ReplyDelete
  25. बरेच वर्षांपूर्वीच मी त्यांच्यासाठी एक पदवी तयार केली होती ती अशी:
    'सोनियापादत्राणतलवसुंधराविहारधन्य'
    अर्थात: सोनिया मावशींच्या चपलेखाली व्यापल्या जाणाऱ्या पृथ्वीच्या तेवढ्याशाच भागात विहार करण्यात धन्यता मानणारा

    ReplyDelete
  26. अतीशय मार्मिक लेख. केतकरकाकानां इतकं गांभिर्याने घ्यायचं कांही कारण नाही. ते विनोदी शैलीतसुध्दा बोलुं शकतात इतकेच त्यानी आज दाखवलय्.

    ReplyDelete
  27. भाऊ अप्रतिम! कुमार केतकर स्वतःला पत्रकार म्हणवून घेतात. शिवाय ते आता राज्यसभेचे खासदार पण आहेत. किमान त्यांनी त्या पदाची तर इज्जत ठेवावी. कधी काळी आपण ह्यांना चांगले पत्रकार संपादक समजत होतो. २०१४ च्या सत्ता बदलाचा हा हि चांगला परिणाम म्हणायला हवं.बरखा दत्त,राजदीप सरदेसाई,सागरिका, निखिल वागळे,कुमार केतकर हे सर्व एकाच पठडीतले आहेत. लोकांचे 'अच्छे दिन' आलेत का नाही ते 2019 ला कळेलच पण केतकरांसारख्या लोकांचे 'बुरे दिन' आलेत हे मात्र नक्की

    ReplyDelete
  28. मी गेली काही वर्षे नुसता मराठी पेपर नव्हे तर कुठलाच पेपर वाचत नाही. कोणत्यातरी पक्षाला किंवा विचारांना बांधील असतात हे पेपर. आपले पैसे देऊन त्यांचे विकृत विचार का वाचायचे ?

    ReplyDelete
  29. भाऊ एक नंबर । कमरेचे गुंडाळून ठेवलेच आहे या लोकांनी । पण तुमचे परखड विचार आणखी लोकांपर्यंत पोहचले पाहिजेत । तुमची परवानगी असेन तर आम्ही हा लेख शेअर करू शकतो का? तुमच्या नावानिशी.

    ReplyDelete
  30. काँग्रेसमध्ये मी फक्त राहुल गांधी विनोदवीर वाटत होता. कुमार केतकरांच्या भाषणानंतर माझ्या ज्ञानात भर पडली की अशा वाचाळ व्यक्तींचा तुटवडा नाही. माझी आता ईश्वराकडे प्रार्थना आहे की यांना दीर्घायुष्य लाभो आणि पिढ्या न पिढ्या देशवासियांची करमणूक होत राहो|

    ReplyDelete
  31. ऋणाईत आहेत, उतराई व्हायचा प्रयत्न करताहेत..नाहीतरी पत्रकार म्हणून काही साधता आले नाही, आता ऐषोआरामाची लागलेली सवय या वयात बदलता येणार नाही म्हणून ही चाटुकारीता करणे याचा संबंध बुध्दी पेक्षा अपरिहार्यतेत आहे असे वाटते.

    ReplyDelete
  32. It is high time to find out source of "financial aid" to people like Kumar ketkar. Without any personal gain they will not become sychopant.

    ReplyDelete
  33. केतकरांवर केवळ मोदीप्रेमातून टिका दिसते.पण केतकरांनी मांडलेली भूमिका समजून घ्यायला केवळ उथळ अभ्यास पोपटपंची न करता जर अंतरराष्ट्रीय तत्कालीन घडामोडी,कांही संघटनांना सरकारला अंधारात ठेऊन मिळणारी अमेरिकी मदत तसेच भारतात विद्वेषाचा जागर करणाऱ्या व्यक्तीनां मिळणारा अमेरिका व तत्सम देशातून मिळणारा आश्रय या बाबींचा सुसंगत अभ्यास केल्यास कुमारसंभवचे ऊत्तर होय असेच मिळेल

    ReplyDelete
    Replies
    1. कसे? जरा सांगू शकता का?

      Delete
    2. Could you explain please Mr Rajan? How does it work? Which tools and papers/research services you have used? If you are using regular newsservices then it is high time you should realize that everything is manufactured for years. So better clear your own eyes and try to get more experience.

      Delete
  34. श्री भाऊ अहो केतकर हे काँग्रेस च्या वळचणीला बांधलेलं पत्रकार आहेत तेव्हा त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा ठेवणार

    ReplyDelete
  35. खूप च छान भाऊ

    ReplyDelete
  36. Bhau
    I think Kumar ketkar Marathi Siddhu.
    They r supporting Modi to come again in power

    ReplyDelete
  37. झिया यांच्या विमानात त्यावेळचे अमेरिकन राजदूत श्री अर्नॉल्ड राफेलसुद्धा मृत्यू पावले!

    ReplyDelete
    Replies
    1. Hyanchyach eka vanshjane pudhe Rafael viman tayar kele... Aata samjla ka cut Kai hota to...��

      Delete
  38. गांधीहत्या झाली तेंव्हां मोदी जन्मलेले नव्हते त्यामळे बिचाऱ्या ‘सुमार’ केतकरांचा नाइलाज झाला, भाऊ!

    ReplyDelete
  39. समजावून सांगता येईल का

    ReplyDelete
  40. मोदींच्या बाजूने लिहिलेली पत्रे या केतकराचा मानसपुत्र गिरीश कुबेर लोकसत्तेत अजिबात छापत नाही. लोकसत्तेत कायम मोदी द्वेषाची पत्रेच येतात.

    ReplyDelete
  41. शेवटचा परिच्छेद जबरदस्त आहे.
    लाचार आणि चाटुकार एवढा विचार स्वप्नात सुद्धा करणार नाहीत.

    ReplyDelete
  42. ल्युटेनवुड मध्ये राहुल-कुमार जोडीने असेच नविन रहस्यपट लिहावेत . सोबत जाणत्या राजाला पण संवाद लेखनासाठी घ्यावे . लोकांचे चांगले मनोरंजन होईल.

    ReplyDelete
  43. किती हाणायचं एखाद्याला काही मर्यादा!! एकदम कडक!!

    ReplyDelete
  44. केतकरांसारख्या लाचार विदूषकाला संपादक करणे आणि आता त्यांना खासदार करणे हा देखील त्याच आंतरराष्ट्रीय कटाचाच एक महत्वाचा भाग आहे अशी थेअरी आता कुणी मांडू नका ।

    ReplyDelete
  45. Bhau kaka lekh lihitat te pn kahi international agenda aslyamule mule... :D

    ReplyDelete
  46. Some popular Congress leaders such as Rajesh pilot, Madhavrao Scindia and Jitendra prasad died in suspicious circumstances. Beneficiary of all those deaths apparently too was the madam.were they eliminated because they were getting weightier than the madam, I wonder.

    ReplyDelete
  47. Are bap re......
    Asehi kat asu shaktat ka? Unbelievable....
    Mala ekach goshta ithe namud karavisi vatate ti mhanje maharashtratla samanya vyaktihi aata eka peksha jast vartman Patra vachayla shiklay aani tyachi swatahchi sadsadvivek buddhi tyane ajun (paishyasathi) gahan thevleli nahi ...
    Mhanun aapan Kay boltoy aani tyala jari koni gambhiryane ghenar nasel tarihi.....tyamule aaple kiti hase hoil yacha vichar ek vel nahi kela Tari chalel pan aaplya eka vaktavyane jar deshhitache ( swatahachya soyinusar nahi) Jara dekhil nuksaan hotey ase aaplyala vatat asel tar kiman ya deshacha ek samanya manus mhanun Tari tase koni Karu naye hich apeksha....

    ReplyDelete
  48. श्रीयुत कुमार केतकरांचा जन्म भारत देशात होणे हा सुद्धा एक आंतरराष्ट्रीय कट असू शकतो

    ReplyDelete