Saturday, June 13, 2015

पाकिस्तानला कशाला घाम फ़ुटलाय?



मंगळवारी म्यानमारमध्ये जी कारवाई झाली, त्याने अनेकांना धक्का बसलेला आहे. अगदी भारतीयांनाही थक्क व्हायची पाळी आलेली आहे. अर्थात तो सवयीचाच भाग असतो. सतत लाथ खायच्या आणि पुन्हा लाथा मारणार्‍याचीच माफ़ी मागायची सवय अंगवळणी पडली, मग चोख प्रत्युत्तर द्यायची भिती मनात घर करून रहाते. आपण कुणाचा आणि कसलाच प्रतिकार व प्रतिवाद करू शकत नाही, असा एक वैफ़ल्यग्रस्त ‘आत्मविश्वास’ मनात घर करून रहातो. परिणामी अन्यायाला चोख उत्तर देण्याची इच्छा इतकी मरून जाते, की तशी भाषा आपल्यातला कोणी बोलला, तरी आपल्या मनाचा थरकाप उडून जातो. मागल्या तीनचार दशकात तशीच मानसिकता भारतीय बुद्धीजिवींमध्ये बळावत गेली. म्हणूनच कोणी नुसती पुरूषार्थाची वा शौर्याची भाषा बोलला तरी त्याच्यावरच तमाम विचारवंत तुटून पडू लागले. उलट कोणाही पुढे आपले सरकार वा राजकीय नेते शेपूट हलवताना दिसले तर त्यांची पाठ थोपटली जाऊ लागली. जणू शेपूट घालणे व शरणागती पत्करणे हाच भारतीयांसाठी पुरूषार्थ असल्याचा एक सेक्युलर शांततावादी सिद्धांत प्रस्थापित झाला होता. शत्रूसैनिक वा घातपात्यांनी यावे आणि सीमेवरून भारतीय जवानांची मुंडकी कापून न्यावी. मुंबईपर्यंत मुसंडी मारून पाकिस्तानी जिहादी राजरोस शेकडो लोकांची कत्तल करू शकत होते. परदेशात फ़सलेल्या वा अपहरण करून नेलेल्यांना सुखरूप परत आणायची अपेक्षा करायचेही आपण पुरते विसरून गेलेलो होतो. अशा पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी वा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर शत्रूंना इशारे देऊ लागले, तेव्हा त्यांच्यावर परदेशापेक्षा मायदेशातूनच टिका होऊ लागली व प्रतिकार होऊ लागला, तर नवल नव्हते. त्यामुळेच आपल्या अधिकार पदाची शपथ घेतल्यापासून मागल्या सहा महिन्यात पर्रीकर यांच्या प्रत्येक शब्दाची हेटाळणी करण्यातच धन्यता मानली गेली.

असे करणार्‍यांना कधीच आधीचे संरक्षणमंत्री अंथोनी वा तत्सम नेते आणि पर्रीकर यांच्यातला फ़रक जाणवला नव्हता, की देशातले सत्तांतर म्हणजे काय त्याचाही उलगडा झालेला नसावा. म्हणूनच मग म्यानमारमध्ये जे काही झाले, त्याचा धक्का बसणे स्वाभाविक होते. अर्थात त्यात थक्क होण्यासारखे काहीच नव्हते. कारण पर्रीकर अत्यंत मोजक्या शब्दात आपल्या धोरणाचे मुद्दे मांडत होते आणि काही प्रमाणात त्याचे अनुकरण होतानाही दिसत होते. येमेनमध्ये जे युद्ध छेडले गेले, त्यानंतर तिथे तळ ठोकून माजी लष्करप्रमुख व आजी मंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी अडकलेल्या हजारो लोकांची मुक्तता केली. ते युद्धापेक्षा छोटे शौर्य नव्हते. भारतीयच नव्हेत, तर ४३ विविध देशाच्या नागरिकांना येमेनमधून सुखरूप बाहेर काढण्याचा तो पराक्रम अबोटाबादच्या बिळातून ओसामाला बाहेर काढण्यापेक्षा किंचित कमी नव्हता. पण त्याकडे गांभिर्याने बघून व त्यातली रणनिती समजून घेण्यापेक्षा इथल्या दिवट्या राजकीय अभ्यासकांनी सिंग यांच्या ‘प्रेस्टीट्युट’ या शब्दालाच इतके महत्व दिले, की भारतीय संरक्षण धोरणातला आमुलाग्र बदल ओळखण्याचे भानच इथल्या बुद्धीमंतांना व माध्यमांना राहिले नाही. सिंग, संरक्षण खाते व परराष्ट्रखाते यांच्या सुसुत्रिकरणाने किती मोठे शिवधनुष्य उचलले गेले, तेच अशा अर्धवटरावांना उमगले नाही. पण पाकिस्तानच्या पोटात मात्र तेव्हापासून गोळा उठलेला होता. कारण त्याच येमेन युद्धाने पाकिस्तानची आणखी एक आंतरराष्ट्रीय कोंडी होऊन गेलेली आहे. त्यात आपल्या सेनेला न पाठवून पाकने सौदी व आखाती देशांची मोठी नाराजी ओढवून आणलेली आहे. आपले पैसेवाले पाठीराखे गमावलेले आहेत. त्यातून पाकिस्तान अधिकच हतबल होऊन गेलेला आहे. अशा पार्श्वभूमीवर पर्रीकर बोलत असतात. पाकिस्तानला तो किती दुबळा बनला आहे, त्याची जाणिव करून देत असतात.

पर्रीकर हे संघाचे आहेत आणि भाजपाचे नेता आहेत. म्हणून पर्यायाने हिंदूत्ववादी आहेत. मग त्यांच्याकडून कुठले सुबुद्ध काम होईलच कसे? हा सेक्युलर माध्यमांचा पक्का पुर्वग्रह आहे. सहाजिकच संरक्षणमंत्री म्हणून पर्रीकर बोलतील, त्याची टवाळी करण्यात धन्यता मानली गेली. पण त्यांनी उच्चारलेल्या शब्द व धोरणाचा सुसंगत विचार मात्र माध्यमातून झाला नाही. सहाजिकच गुजरात सीमेलगत समुद्रात उडवून देण्यात आलेल्या संशयास्पद बोटीचे प्रकारण असो, किंवा दहशतवादी विरोधात त्यांचे फ़ुटलेले सहकारी वापरण्याची कल्पना असो. त्याचा मतितार्थ शोधला गेलाच नाही. तो शोधला असता, तर म्यानमारमध्ये नेमक्या जागी व निशाण्यावरच कमांडो इतकी अल्पावधीत कारवाई का करू शकले, ते कसे उमजावे? मागल्या आठवड्यात मणिपुरमध्ये ज्या घातपात्यांनी १८ जवानांना शहीद केले, त्यांचा ठावठिकाणा दोनचार दिवसात भारतीय सेना व रणनितीकारांना कुठून मिळाला? नुसत्या लपण्याच्या जागाच नव्हेत, तर घातपात्यांचे लष्करी तळ भारतीय सैन्य अकस्मात शोधू शकत नाही. ती माहिती त्यांच्यातलेच कोणीतरी नेमकी देऊ शकतात. आणि त्यांच्या अशा मदतीने भारतीय कमांडो व सैनिक नेमबाजाप्रमाणे भेदक कारवाई करू शकतात. म्यानमारच्या हद्दीत जाऊन वा सीमेलगतच्या घनदाट जंगलात ही कारवाई कशी यशस्वी होऊ शकेल, त्याचे सुत्रच पर्रीकरांची महिनाभर अगोदर खुलेआम सांगितलेले नव्हते काय? पण तेव्हा इथल्या दिडशहाण्यांना पाकिस्तानशिवाय अन्य शेजारी देशातही भारताला सतावणारे घातपाती असतात, याचे भानही नव्हते. म्हणूनच जिहादींना पर्रीकर आश्रय देणार, की सैन्यात सहभागी करून घेणार; असले अकलेचे तारे तोडण्यात धन्यता मानली गेली. जे म्यानमारमध्ये होऊ शकते, तेच बलुचिस्तान नावाच्या पाकप्रदेशात होऊ शकते. त्यातली रणनिती साफ़ आहे. आणि तिचा पहिला प्रयोग इशान्य सीमेवर झाला आहे.

कारवाई म्यानमारच्या हद्दीत व सीमेवर झाली आणि तो प्रदेश पाकिस्तानपासून हजारो मैल दूर आहे. पण म्यानमारपेक्षा पाकिस्तानच विचलीत होऊन गेला आहे. जणू भारतीय सेनेने व कमांडोंनी पाकप्रदेशात घुसण्याचा प्रयत्न केला असावा, इतक्या संतापाने पाकिस्तानी प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. याचेही कारण समजून घ्यावे लागेल. जितके म्यानमारचे लष्करी सरकार गोंधळलेले व विस्कळीत आहे, त्यापेक्षा बलुचिस्तान व अफ़गाण सीमेलगत पाकिस्तानी प्रदेशात अराजक माजलेले आहे. तिथे पाक सरकारला खडी सेना उभी करूनही कारभार करणे अशक्य झालेले आहे. अफ़गाण जिहादच्या कारवाईपासून तिथे ज्यांना सैतान बनवण्यात आले, त्याच मुजाहिदीन व फ़िदायिनचा तिथे मुक्त वावर आहे. पाक सेनेने त्यांच्यावर बॉम्ब टाकण्यापासून हवाई हल्ले करूनही त्यांना काबुत आणणे अशक्य झालेले आहे. त्यातले अनेकजण पाकविरोधात उलटलेले असून पाकचा सूड घ्यायला उतावळे झालेत. त्यांच्याशी भारतीय हस्तकांनी हातमिळवणी केल्यास काय होऊ शकेल? इराण सीमेलगतच्या प्रदेशात बहुतांश शिया वस्ती आहे आणि त्यांच्याशी अखंड सुन्नी जिहादींचा संघर्ष पेटलेला आहे. त्यांना चुचकारण्याचा उद्योग पाकिस्तानच्या नाकात दम आणु शकतो. अशक्य नक्कीच नाही. म्यानमारचा प्रयोग छोट्या प्रमाणावरचा किंवा प्रयोगशाळेसारखा आहे. बलुचिस्तान वजिरीस्तान तिथल्या नाराजांनी स्वतंत्र देश करायचा ठरवला, तर काय होईल? त्यासाठीच म्यानमारच्या कारवाईने पाकिस्तानला घाम फ़ुटला आहे. म्हणून मिया मुशर्रफ़ थेट अण्वस्त्राची भाषा बोलण्यापर्यंत बरळले आहेत. पाकचे गृहमंत्री निसार अली बाव़चळले आहेत आणि पाकचे लष्करप्रमुख राहिल शरीफ़ धमकीची भाषा बोलू लागले आहेत. मागल्या सहा महिन्यातील पर्रीकरांची विधाने सुसंगत वाचली व उलगडली, तरच म्यानमारची पाकला का भिती वाटली, त्याचा अर्थ लागू शकेल.

4 comments:

  1. भाऊराव,

    हमीद गुलांच्या वक्तव्यात त्यांनी ज्यांना इंडियन म्हंटलंय ते लोकं खरे तर अँटी इंडियन आहेत. वागळ्यांनी लगेच प्रचीती आणून दिलीच. म्हणतात ना खाई त्याला खवखवे!

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  2. Wagale is an Idiot and a liar too. Here in this picture he has added his own reply to Gen Hameed Guls statement to portray his patriotism.... whereas in reality we all what kind of jackass wagale is....

    ReplyDelete
  3. "Your comment will be visible after approval." Really? Really???
    If you are so afraid of public opinion then why the hell do you invite comments... if you cant stand against opposite views then Fuck you and fuck your blog... you are an asshole like wagale...

    ReplyDelete
  4. Anonymous,

    १.
    >> If you are so afraid of public opinion then why the hell do you invite comments.

    वाचकांच्या टिपण्या प्रसिद्ध करण्यापूर्वी त्या विषयाशी सुसंगत आहेत ना, हे भाऊरावांना पडताळून पहायचं आहे. तुम्हाला त्यांच्या अनुदिनीचे (=ब्लॉगचे) नियम पटत नसतील तर ती न वाचणेच उत्तम.

    २.
    >> if you cant stand against opposite views then Fuck you and fuck your blog...

    नेमक्या अशाच शब्दांत विरोध व्यक्त होऊ नये. एक वाचक म्हणून माझी अशी अपेक्षा आहे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete