Friday, May 1, 2020

चावून दातओठ, खातो कुबेर पोहे

Koshyari declines Shiv Sena's request for more time to submit ...

अखेरीस निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुका कोरोनाचे संकट असतानाही उरकून घेण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील घटनात्मक पेच सुटलेला आहे. खरेतर त्याला सत्ताधारी आघाडी प्रामुख्याने जबाबदार आहे. जेव्हा युती मोडून सरकार स्थापन केले, तेव्हाच तातडीने उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा विषय संपवायला हवा होता. तर अशी पाळी आली नसती. कोरोना आधी आमंत्रण देऊन येत नसतो. पण तिथे मुळात झालेली चुक कशामुळे झाली, त्याचा उहापोह कुठलाही संपादक करीत नाही, तेव्हा त्याची पत्रकारिता संपून वकिली सुरू झालेली असते. खरेच भाजपाला यात राजकारण खेळायचे असते, तर आताही राज्यपालांनी पुढाकार घेऊन त्यात तोडगा काढला नसता. पण विषय कुठलाही असो, त्यात भाजपाला गुन्हेगार ठरवणे किंवा मोदी सरकार आल्यापासून देशाच्या राजकारणाचा विचका झाल्याचे सिद्ध करणेम; इतकीच इतिकर्तव्यता उरली असेल तर यापेक्षा काय वेगळे व्हायचे? अन्यथा लोकसत्ता वा महाराष्ट्र टाईम्स अशा दोन प्रमुख वृत्तपत्रांनी संपादकीय लिहून राज्यपाल कोश्यारींना लक्ष्य केले नसते. एक मात्र मान्य करावे लागेल, हल्ली बहुतांश मराठी वर्तमानपत्रांचे संपादक कपील सिब्बलशी स्पर्धा करू शकण्याइतके घटनातज्ञ वा कायदेपंडीत होऊन गेलेले आहेत. अन्यथा राज्यपाल घटनेचा राखणदार म्हणून राज्यात काम करतो, याचेही भान त्यांनी सोडले नसते. नामनियुक्त व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याचा संकेत नाही. कायद्याच्या शब्दाबरोबरच त्यातला आशयही जपला गेला पाहिजे, याचे भान संपादकांना न ठेवण्याची मुभा असली तरी राज्यपालांना नसते. अग्रलेख मागे घेण्याचे पराक्रम करणार्‍यांना आपण काय लिहीत आहोत, याचेही भान नसते. तर त्यांनी किती लांब जिभ करून बोलावे लिहावे, यालाही मर्यादा कुठे असतात? पण त्या मर्यादा सभ्य लोकांसाठी असतात. आजकाल संपादकांना लज्जेतूनही सुटका मिळालेली असावी. अन्यथा कोश्यारी यांच्यावर दोषारोप करण्याचे काहीही कारण नव्हते.

ज्या विषयावरून हा गदारोळ माजलेला आहे. त्यातून एक वाईट पायंडा निर्माण झाला असता. आधी मुख्यमंत्री व्हायचे आणि मग आपल्यालाच आमदारही नेमून घ्यायचे, हा पायंडा चुकीचा आहे. पण तसे यापुर्वीही घडल्याचे मटाच्या संपादकांनी इतिहासातून शोधून काढलेले आहे. त्यातले आपल्याला हवे तितके सांगायचे आणि जिथे बेशरमपणा उघडा पडेल तिथे झाकायचे. ही पत्रकारिता नसते तर शुद्ध बदमाशी असते. १९५२ सालात मद्रास प्रांतामध्ये सी. राजगोपालाचारी हे आमदार नसताना आघाडी जमवून मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांना निवडणूक लढवायची नव्हती. म्हणून त्यांनी राज्यपालांकडून आपली आमदार म्हणून नियुक्ती करून घेतली. इथपर्यंत सत्य आहे. पण त्यामुळे पंतप्रधान नेहरूही संतापले होते आणि त्यांनी राज्यपालांसह राजाजींबद्दल व्यक्त केलेली नाराजी कोणी सांगायची? अशा रितीने सत्तेला चिकटून रहाण्यासाठी वाटेल ते करणे अयोग्य आहे, असा नाराजीचा सुर नेहरूंनी लावला होता. पण राजाजींनी त्यांनाही दाद दिली नाही. म्हणजेच कॉग्रेस पक्षालाही राज्यपाल नियुक्त आमदारानेच मुख्यमंत्री होणे शरमेची गोष्ट वाटली होती. ते मटाच्या संपादकांना तीच अभिमानास्पद गोष्ट वाटते. नागरिक सुधारणा कायद्यावर जगभर वाटेल ते बरळून झाल्यावर कपील सिब्बल राज्यसभेत मात्र त्यामुळे कुणाच्याही नागरिकत्वाला धोका नसल्याची कबुली देतात. पण जनतेच्या कोर्टात मात्र अर्धसत्य बोलतात. मग मटाचा असला अग्रलेख तब्बल सिब्बल शैलीतला नाही काय? राजाजींनी नियुक्त आमदार असून मुख्यमंत्रीपदी रहाणे लज्जास्पद होते आणि हे संपादक मजकूर ती कशी प्रतिष्ठेची वा अब्रुदार बाब असल्याप्रमाणे उदाहरण म्हणून पेश करीत आहेत. सुदैवाने कोश्यारी तितके पुरोगामी सभ्य नाहीत. म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांना पेचातून बाहेर काढण्यासाठी सभ्य व कायदेशीर मार्ग शोधला आहे. कारण राज्यपालांनीच लिहीलेल्या पत्रामुळे निवडणूक आयोगाने परिषदेची निवडणूक अलिकडे आणून वेळेत आमदारकीचा मार्ग प्रशस्त केला आहे. कारण कोश्यारी कधी लोकसत्तेचे संपादक नव्हते ना?

ज्यांना आपला रोजचा अग्रलेखही विचारपुर्वक लिहीता येत नाही आणि छापून आल्यावर दोनचार दिवसांनी कंबरेत लाथा बसल्यावर तोच अग्रलेख मागे घ्यायचीही लाजलज्जा उरलेली नाही, असे लोक आजकाल प्रतिष्ठीत म्हणून उजळमाथ्याने वावरत असतात. मग कोश्यारींना राज्यपाल पदाची प्रतिष्ठा राखून काम करणे अवघडच होणार ना? लोकसत्ताचे संपादक झाल्यापासून कुबेर अकस्मात ‘कुमारा’वस्थेत गेलेले आहेत. त्यामुळे रोजच्या रोज संघ वा भाजपाच्या विरोधात गरळ ओकल्याखेरीज त्यांना अन्न पचत नाही. शिवाय अवेळी कुमारावस्थेत गेल्यावर अवघे जग वृद्धाश्रमात भरती झालेले वाटल्यासही नवल नाही. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील घटनात्मक पेचप्रसंग समजून घेता आला नाही. किंवा त्यातली राजकीय गुंतागुंत समजणे शक्यच नव्हते. इथेच तर या असंतांच्या संताचे दोहे सुरू होतात. आपल्याला ज्याचा गंध नाही वा आकलनाच्या पलिकडली गोष्ट आहे म्हटल्यावर कुबेरांना शांत बसवत नाही. ते हिरीरीने आपली नसलेली अक्कल पाजळायला पुढे सरसावतात. यापुर्वी नियुक्त आमदाराने मुख्यमंत्री होण्याचा एकच दाखला ‘मटा’ने सादर केला. तोही कुबेरांच्या गावी नाही आणि त्यात सहभागी असल्याने खुद्द पहिले पंतप्रधान नेहरू कशाला प्रक्षुब्ध झाले तेही ठाऊक असण्याचा संबंधच येत नाही. अशा रितीने राजाजी सत्तेला चिकटून बसले म्हणजे चुकीचा संदेश जातो, असे म्हणत नेहरूंनी विरोध केला होता. म्हणजेच नेहरूंनाही लज्जास्पद गोष्ट वाटली व त्यांनी राज्यपालांची हजामत केली होती. ते कुबेरांना अभिमानास्पद वाटते. त्यावरूनच वृद्धाश्रमात जाण्याची पातळी कोणी गाठली, हे लक्षात येऊ शकते. पण घटनाक्रम बघितला तर पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहांनी मध्यममार्ग शोधलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी मोदींना साकडे घातल्यावरच तो तोडगा निघू शकला आहे. गेले दोनतीन आठवडे अर्धवट संपादक व सल्लागारांच्या नादी लागून मुख्यमंत्रीच गोत्यात आलेले होते. पण तोडगा काय आणि तोच कसा प्रतिष्ठीत आहे, ते समजायला आपली बुद्धी शाबुत असायला हवी ना?

आजवरचे वा आजचे राज्यपाल किती नालायक वा टाकावू आहेत, असे पोटतिडकीने लिहीताना आपणही संपादक म्हणून कसे कणाहीन आहोत, त्याचे भान कसे उरत नाही? राजभवनातून राजकारण खुप पुर्वी अगदी नेहरूंच्याच काळापासून सुरू झालेले होते आणि आता ती संसदीय लोकशाहीची परंपरा झालेली आहे. राज्यात महायुतीतून निवडून येऊन विरोधात लढलेल्या दोन्ही कॉग्रेस सोबत सत्तेची भागिदारी करण्यातली सभ्यता ज्यांना भावलेली आहे, त्यांच्या सभ्यतेचा दाखला वेगळा देण्याची गरज नाही. गेल्या दहाबारा वर्षातले आपलेच अग्रलेख वा लेख काढून कुबेर वा अन्य संपादक विश्लेषकांनी नव्याने वाचावेत. दोन महिन्यांवर पावसाळा आलेला आहे. प्रत्येक पावसाळ्यात मुंबई ठाण्यातली दुर्दशा अगत्याने खरडून लिहीताना शिवसेनेने पंचवीस वर्षात दोन्ही महानगरांचा कसा सत्यानाश करून टाकला, ते मिटक्या मारीत सांगणारे हेच संपादक आहेत ना? आताही कोरोनाच्या काळात सर्वाधिक बाधा व मृत्यूचे आकडे महाराष्ट्रातील असताना त्याच पत्रकार संपादकांना उद्धवरावांचे ‘उत्तम प्रशासन’ नजरेत भरू लागलेले आहे. त्यांच्या अकलेची बरोबरी इतर कोणाला करता येईल? छान आहे. आहे चालू राहूदे. पावसाळा पन्नास दिवसांवर आहे आणि मुंबईचे हॉटस्पॉट पाण्यात बुडतील, तेव्हा बघता येईल. कारण कोरोनाचा विळखा मुंबईला जितका बसलेला आहे, तो नजिकच्या काळात सैल होण्याची बिलकुल शक्यता नाही आणि त्याचे सत्य अग्रलेख वा बातम्यातून झाकले म्हणून संपणारे नाही. भरती होणारे रुग्ण, मृतांची संख्या व हळुहळू वाढत्या संख्येने सापडणारे कोरोनाबाधीत अग्रलेखातून थोपवता येणारे नाहीत. आज कितीही इच्छा असून आघाडीतील मित्र पक्षांच्या उचापतखोरांमुळे उद्धवराव त्याला पायबंद घालू शकलेले नाहीत. ते सत्य नाकारले म्हणून परिणाम संपत नसतात. ते जुन जुलैमध्ये समोर येणार आहेत. त्याचा ‘सामना’ कोण करणार आहे?

34 comments:

  1. भाऊ उत्तम लेख या विषयावर प्रति पक्षांमध्ये व्हिडिओ काढा अजून लोकांपर्यंत पोहोचेल आणि महाराष्ट्र टाईम्स आणि लोकसत्ता'च्या संपादकांची नक्की विद्वत्ता काय आहे हे जनतेपर्यंत अजून पोहोचवता येईल

    ReplyDelete
  2. कमाल वाटते मला भाऊ तुमच्या अभ्यासाची आणि लेखनाची... एक नंबर..

    ReplyDelete
  3. Parkhad vishleshan, nehamipramane, mast lekh, great 👍🙏🌹☑️✍️🙏

    ReplyDelete
  4. Atishay sundar lekh. Torsejar kaka tumhi asech nirbhid aani satya lihit raha. Tatakhalchya maanjaraanna izzat naste, he saglyaanna maahit aahech. Patrakarachya navala daag aahet he asle kaahi bogas patrakar.

    ReplyDelete
  5. महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक घेत आहेत हे ठिक आहे. इतर कोणत्या राज्यात विधानपरिषदेची निवडणूक होणार होती पण कोरोनामुळे होऊ शकलेली नाही ते पण बघायला हवे. त्या राज्यातही विधानपरिषदेची निवडणुक होणार आहे का? प्रत्येक सम वर्षात मार्च ते मे या काळात राज्यसभेसाठी द्वैवार्षिक निवडणुक होत असते. ती निवडणुक आयोगाने पुढे ढकलली आहे. ती निवडणुक होणार आहे का? या प्रश्नांची उत्तरे नाही अशी असतील तर केवळ उध्दव ठाकरे या एका व्यक्तीला मुख्यमंत्रीपदावर कायम राहता यावे म्हणून नियम वाकवून हा निर्णय निवडणुक आयोगाने घेतला आहे असे म्हणायला हवे. वास्तविकपणे ठाकरे मुख्यमंत्रीपदावर राहू शकले नसते तर काही आभाळ कोसळणार नव्हते. एक माणूस पदावर राहिला नाही तर राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यात कसलाही अडसर आला नसता. ठाकरेंच्या जागी दुसऱ्या कोणाला मुख्यमंत्रीपदाची शपथ देता आली असती. अशाप्रकारे एका माणसासाठी असे नियम वाकविणे अयोग्य आहे.

    काही न्यूज चॅनेल्सवर काही पंडित लोक 'contingency' म्हणून घटनेतील १६० व्या कलमाचा हवाला देत होते. पण contingency म्हणजे नक्की काय? एक माणूस मुख्यमंत्रीपदावर राहू शकला नाही ही contingency कशी काय? contingency म्हणजे काय याचे एक उदाहरण द्यायचे झाले तर एप्रिल १९९९ मध्ये वाजपेयी सरकार पडल्यावर १२वी लोकसभा बरखास्त झाली. १३व्या लोकसभेसाठी मतदान सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झाले आणि १३व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २० ऑक्टोबरच्या सुमारास सुरू झाले. राज्यघटनेप्रमाणे लोकसभेच्या एका अधिवेशनाचा शेवट आणि पुढच्या अधिवेशनाची सुरवात यात जास्तीतजास्त सहा महिने इतके अंतर असू शकते. समजा कोरोना १९९९ मध्ये आला असता आणि त्यामुळे निवडणुक पुढे गेली असती तर हा सहा महिन्यांचा कालावधी उलटला असता. त्या परिस्थितीत राज्यघटनेतील तरतुदींची अंमलबजावणी करणे शक्य झाले नसते आणि ती contingency झाली असती. पण उध्दव ठाकरे किंवा अमुक एक कोणीही मुख्यमंत्रीपदावर कायम राहू शकत नाही ही contingency कशी काय?

    ReplyDelete
  6. whatever. sewak fooled (again) by kaka and mamu

    ReplyDelete
  7. अप्रतीम भाऊ

    ReplyDelete
  8. भाऊ,
    कुबेर ची अक्कल काढली ते फार बरे केलेत. फार दिवसांपासून इच्छा होती. 😆😆

    तुम्ही म्हणालात त्या प्रमाणे लाज लज्जा शरम ही सभ्य लोकांसाठी असते. अश्या लोकांसाठी नव्हे. मुळात सद्सद्विवेक बुद्धी हा मनुष्याचा स्वभाव आहे. केवळ बाह्याकर मनुष्या प्रमाणे आणि वृत्तीने अजून पशुत्वा मधेच पाय अडकलेली अशी लोकं सद्सद्विवेक बुद्धी पासून वंचित आहेत. त्यांनी बाह्य आकाराने मनुष्यत्व मिळवलेले असले तरी आंतरिक उत्क्रांतीत ते अजून पशुत्वा मधेच रुतलेले असल्या मुळे त्यांच्या कडून ही अपेक्षाच ठेवणे अप्रस्तुत आहे खरे म्हणजे. तेव्हा नीतिमत्ता यांच्यात कुठून दिसणार? स्वतः शिवाय आणिक कोणाचे हित करणे म्हणजेच महापाप असे जीवन विषयक धोरण ठेवून वर्तन करणारी ही मंडळी आहेत. यांच्याकडून समाजाशी एकनिष्ठ, सत्यनिष्ठ जीवन कसे घडणार? हे लक्षात ठेवून यांच्या पुण्य कर्मांकडे पाहिले म्हणजे अंगाचा तिळपापड होत नाही.

    असो. परंतु आपण सर्वच ज्याचे घटक आहोत अश्या ज्या व्यापक समाजातून अशी लोकं निर्माण झाली आहेत आणि होत आहेत त्या समाजाने अंतर्मुख होऊन काय चुकते आहे हे पाहायला हवे. ही जबाबदारी प्रत्येकाचीच आहे.

    - पुष्कराज पोफळीकर








    ReplyDelete
  9. paper vachaycha ka nhi hach prashn padla ahe. Bhau tumhich ekhada paper kadha he sarv niptlyavr.

    ReplyDelete
  10. भाऊ,उत्तम लेख.
    मटा/लोकसत्ता/लोकमत.... पत्रकारिता विसरलेत. सामना चा अग्रलेखात काय लिहिलं आहे, हे आपल्या मुखपृष्ठावर छापतात आणि ईतर काही मीठ मसाला बातम्या. कोणत्याही गोष्टीची नीट शहानिशा न करता.
    ह्यांचे ऑनलाईन इ पेपर म्हणजे मॉडेल्स आणि हेरॉईनेच्या बोल्ड फोटो ने भरलेले. सामना बद्दल बोलायचे तर तो एका राजकीय पक्षाचा मुखपत्र आहे. संजय राव बोलतील तेच खरं. ज्या राजभवनला राजकीय पत्ते पिसायचा अड्डा बोलणारे, सकाळ संध्याकाळ प्रस्ताव घेऊन राजभवनावर वाऱ्या करत आहेत.

    ReplyDelete
  11. लोकसत्ता लोकसत्ता राहिली नाही, याला कारण कुके की गिकु की एक्स्प्रेस समुहातील काही बदल?

    ReplyDelete
  12. वरील उल्लेखलेले संपादकीय पाहिले अक्षरशः कीव आली आपले लेख वाचून तरी ज्ञानात भर पडून घ्यायला पाहिजे होते

    ReplyDelete
  13. Girish Kuber is anti BJP, RSS, Hindu and ancient Bharat
    But that time he is
    Pro khangress, western colonialist

    ReplyDelete
  14. भाऊ, तुम्ही ज्यांच्या बद्दल लिहले आहे ते त्यांनी वाचून वर्तनात सुधारणा केली तरी देव पावला असे म्हणावे लागेल. गेंड्याचे कातडे पांघरले आहे यांनी.

    ReplyDelete
  15. ekadam kadak..... laato ke bhoot, baato se nahi manate... jabardast ulat-tapasani..... sanakun chaparak.....tumchyamule ya goshti samor yetat bhau.. laakh laaakh dhanyuawad...

    ReplyDelete
  16. भाऊ साष्टांग नमस्कार, दुर्दैवानं महाराष्ट्राला बुद्धिवादी नको आहेत धनवान आणि दांडगे यांची गरज आहे

    ReplyDelete
  17. मननीय संपादकांना आतापर्यंतच्या मोदी व्देषातून बाहेर पडता येईल अशी आशा करण्यापेक्षा माझ्या प्रमाणे सामान्य माणसे फार मोठी अपेक्षा ठेवू शकत नाही. कारण ह्या अति(रेकी)विद्वान संपादकांच्या प्रत्येक वेळी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या फूट पट्या आमच्या चांगल्याच परिचयाच्या आहेत

    ReplyDelete
    Replies
    1. Shebati Modinich vachavla kaka madatila alech nahit va putanya che dekhil favale nahi.utkrushth lekh bhau atishaya abbhyas purn.

      Delete
  18. भाऊ ते IFSC वरुन जे आरोप चालले त्या वर प्रकाश तका plz

    ReplyDelete
  19. भाऊ, अतिशय छान लेख..!
    हल्ली पत्रकारिता खूपच स्वस्त झालेली दिसतेय. उचलली जीभ लावली टाळ्याला...उचल लेखणी लाग लिहायला.. घे माईक लाग बोंबलायला.. कशाचेही तारतम्य नाही... फक्त आणि फक्त आपली प्रतिष्ठा (लाल करून) वाढवायची, घटना घडायच्या आधीच आपल्या अल्पबुद्धीच्या आकलनाने, तर्काने वाट्टेल ते बडबडत "राजकीय विश्लेषकाची" माळ आपली आपणच घालायची आणि वास्तव समोर आल्यावर आपली प्रतिष्ठा (पिवळी पडल्याने) झाकायला धावाधाव करायची.. खरंच निर्लज्जपणाचा कळस..!
    भाऊ, पत्रकारांना सुद्धा कायद्याची काही विशिष्ट चौकट नाही का..? "सशक्त लोकशाहीचा चौथा का पाचवा स्तंभ" अशा गोड कौतुकाखाली किती दिवस सामान्य माणसांनी ह्यांची मनमानी, दडपशाही ऐकून घ्यायची..? वाईट ह्याचेच वाटते की आपल्या पगार वाढीसाठी, प्रमोशनसाठी धडपडणाऱ्या ह्या पत्रकारांपुढे जर का वर सांगितल्याप्रमाणे निर्लज्ज सिनियर पत्रकारांचा, संपादकांचा आदर्श असेल तर मग ही पत्रकारिता कधीच सुधारणार नाही ज्या "नि:पक्ष" पातीपणाची जनतेला पत्रकारांकडून अपेक्षा असते तो कधीच दिसणार नाही..!!

    ReplyDelete
  20. भाऊ, अभ्यास आणि सध्याचे पत्रकार यांचा काही संबंध आहे का? ज्याची ज्या पक्षाशी निष्ठा तो पत्रकार त्या पक्षाचेच बरोबर म्हणणार. सगळेच चोर.
    परखडपणे केलेले दरिद्री कुबेराचे व म्हातारचळ लागलेल्या कुमाराचे वस्त्रहरण छानच.

    ReplyDelete
  21. लोकसत्तेतील हे असे लेख हा व्यापक कटाचा भाग आहे...सुमार केतकर राज्य सभेतून निवृत्त झाले की तिथे वर्णी लावून घेण्यासाठी असे लिखाण फायदेशीर ठरेल ना!भले स्वतः निवृत्त न्यायाधीशांनी निकाल देताना सरकारी धोरणाला झुकते माप दिल्याची चिखल फेक करून बोंब मारायची पण स्वतः विरोधी गोटाच्या दारात शेपुट हलवत भाकर तुकड्यासाठी आशाळभूतपणे नजर लावून बसायचे असा हा व्यापक कट!😂

    ReplyDelete
  22. गिरीश कुबेरांनी आपले पद सोडून घरी बसावे नाहीतर त्यांना राजीनामा द्यायला लावावा.
    आता खूप झाले.

    ReplyDelete
  23. मोदींच्याबाबत नौटंकी फेकू जुमलेबाज वगैरे शब्द प्रयोग ज्यांना आवडतात त्यांनाच उपरोक्त वृत्तपत्रे, कुबेर वागळे इत्यादी पग़ारी लेखक्स संपादक्स आणि विचारवंत वगैरे वाटतात

    ReplyDelete
  24. अप्रतिम लेख भाऊ. अतिशय समर्पक.आपल्या अभ्यासाला नमन.अत्यंत मोजक्या शब्दात आपण लोकसत्ता,महाराष्ट्र टाइम्स,लोकमत आदी वर्तमानपत्रांच्या प्रभारी पक्षपाताला उघडे केले आहे. भाऊ मी तुमचा प्रत्येक लेख वाचतच असतो.आपल्या विशाल व सर्व स्पर्शी दृष्टीचे अप्रूप वाटते.

    ReplyDelete
  25. वागळेंच वस्त्रहरण केलं ते बरंच झालं, आमच्यासारख्या सामान्य लोकांना बऱ्याच गोष्टी समजल्या. नाहीतर आम्ही वागळे सांगतोय तेच खरं मान्य करत बसलो असतो.

    एक विनंती -- याप्रमाणे कुबेराचे पण वाभाडे काढावेत. कालच्या साठीचा गझल कार्यक्रमात त्यांनी पवारांना 'या सरकारला आर्थिक धोरण आहे का ?' हा कार्यक्रमाला अनुसरून नसलेला प्रश्न विचारला होता..

    ReplyDelete
  26. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  27. https://marathiroaster.blogspot.com/2020/04/blog-post_29.html?m=1

    ReplyDelete
  28. Bhau , agadi khara. Loksatta tar aajkaal maha vikas aghadicha mukhpatrach vatato.

    ReplyDelete
  29. झणझणीत अंजन घातलेत भाऊ,

    ReplyDelete
  30. Khupach Sunder lekh aahe, na vichar krun lihnarya patrakarana tyanchi jaga dakhavali aahe Bhauni.

    ReplyDelete
  31. हा comrat गिरीश एक नंबर हरामखोर माणूस आहे,
    भाऊ आणि मित्रांनो, अजून चांगले हिंदू ब्लॉग follow करा
    http://www.mediacrooks.com

    ReplyDelete