Saturday, August 25, 2018

तुम्ही झालात करोडपती



पाच वर्षापुर्वी फ़ेसबुक ब्लॉग या सोशल मीडियात, मी काही तरूण मित्रांच्या आग्रहामुळे आलो. तेव्हा हे माध्यम इतके प्रभावी आहे असे वाटलेले नव्हते. नव्या पिढीच्या गंमती म्हणूनच मी याकडे त्रयस्थपणे बघत होतो. चार दशकाहून अधिक काळ पत्रकारिता करताना बहुतांश मुख्य प्रवाहातील वर्तमानपत्रे व नंतरच्या उपग्रहवाहिन्या यांच्यातून तसा बहिष्कृत असलेला मी एक पत्रकार. तथाकथित पुरोगामीत्व किंवा त्यातली टोळीबाजी यामुळे बहिष्कृत राहिलो. कारण त्यांच्या अजेंडानुसार चालणार्‍या पत्रकारितेच्या पठडीत मी बसू शकत नव्हतो. पण ज्याची चार दशकाहून अधिक काळ पर्वा केली नाही, त्याविषयी आता दु:ख करण्याचे काही कारण नव्हते. अशा वेळी मुरलीधर शिंगोटे यांच्या आग्रहाखातर ‘पुण्यनगरी’ दैनिकात दैनंदिन स्तंभलेखन सुरू केले आणि प्रथमच मुंबईबाहेर दुरच्या ग्रामीण जिल्हा पातळीवर माझे लिखाण पोहोचू लागले. त्यातून माझी ओळख नव्याने आकार घेऊ लागली. पण ‘पुण्यनगरी’ तथाकथित उच्चभ्रू पत्रकारितेच्या बाहेरचे दैनिक होते आणि त्याचा कोणी उच्चभ्रू वाचक असेल, असे मलाही माहिती नव्हते. पण तसे वाचक होते आणि त्यापैकीच तिघा तरूणांनी मला सतत पाठपुरावा करून सोशल मीडियात आणले. आयुष्यभर शाईच्या लेखणीने लिहीण्याचा हट्ट केलेल्या मला बॉलपेनही आवडत नव्हते, तर संगणकावर टाईप करण्याची गोष्ट सोडूनच द्या. ईमेलपुरता मी लॅपटॉप वापरत होतो. इंजिनीयरींगच्या या मुलांनी चिकाटीने मला मराठी टायपिंगमध्ये ओढले आणि माझ्या नकळत मला त्यातून सोशल मीडियात आणले. त्यांनीच फ़ेसबुक व ब्लॉग सुरू करून दिला आणि काही महिन्यात मी स्वतंत्रपणे नियमित ब्लॉग लिहू लागलो. आधी इतरत्रचे लेख टाईप करू लागलो आणि तेच ‘उलटतपासणी’ या ब्लॉगवर टाकत होतो. पण ऑगस्ट २०१३ नंतर ‘जागता पहारा’ हा ब्लॉग नित्यनेमाने लिहीणे सुरू केले. आता त्याला पाच वर्ष झाली आहेत. कुठवर आलो तिथून? एक कोटी हिटस?

नव्या युगातील माध्यमाची ही खासियत आहे, इथे आपल्याला जे मांडायचे आहे, त्यासाठी कुठले बंधन नाही. कुठल्या भांडवलाची वा यंत्रणेची गरज नाही. मालकाची गुलामगिरी नाही, की वितरण मार्केटींगची अगतिकता नाही. फ़ेसबुक व ब्लॉग या माध्यमातून तुम्ही प्रस्थापित भांडवली गुंतवणूकीच्या मक्तेदार माध्यमांना खुले आव्हान देऊ शकता. त्यांना पर्याय देऊ शकता. पत्रकारितेची वा अभिव्यक्तीची गळचेपी असल्या कांगाव्याची गरज नाही. भारतात आता कोट्यवधी स्मार्टफ़ोन आणि त्याहून अधिक संगणक व इंटरनेट उपभोक्ता झालेले आहेत. त्यांना आवडणारे वा पटणारे किंवा त्यांच्या बुद्धीला पचणारे, चालना देणारे लिहू शकत असाल, तर त्यात कोणीही अडथळा आणू शकत नाही. वाचक आणि लेखक यांच्यात कोणी भिंत उभी करू शकत नाही. ‘जागता पहारा’ने मला हा साक्षात्कार घडवला आहे. कारण या पाच वर्षात या ब्लॉगने तब्बल एक कोटी हिटसचा पल्ला पार केला आहे. याचा आरंभ किरकोळच होता. त्याची जाहिरात करून घ्यायला पैसे नव्हते की लेखकांचा ताफ़ाही जमवण्याची माझी कुवत नव्हती. त्यामुळेच एकहाती ब्लॉग चालवणे अपरिहार्य होते. आपल्यापाशी प्रयत्न, लेखणी व बुद्धी यापलिकडे कसलेली भांडवल वा साधने नाहीत, याचे भान ठेवून मी कामाला लागलेलो होतो. आज पाच वर्षांनी त्याचे समाधान वाटते. कारण नुसत्या ब्लॉगवर दिसणार्‍या हिटसचा आकडा महत्वाचा नाही, तर त्याच ब्लॉगला शेअर करणारे, कॉपीपेस्ट करून माझे लिखाण लाखो लोकांपर्यंत पोहोचवणारे हजारो चहाते वाचक तयार झाले आहेत. त्यासमोर ब्लॉगवर दाखवला जाणारा हिट्सचा आकडा खुपच नगण्य आहे. हिमनगाचे टोक असा तो आकडा आहे. जेव्हा कुठेही जाहिर कार्यक्रमाला किंवा व्याख्यानाच्या निमीत्ताने जातो, तिथे ब्लॉग वाचणार्‍यांची होणारी गर्दी वा मिळणारे प्रेम, या आकड्यापेक्षाही मोठी गोष्ट आहे.

या माध्यमात वा तांत्रिक क्षेत्रात काम करणार्‍यांच्या मते किमान तीनचार हजार व्हाट्सअप ग्रुपवर माझे लेख प्रतिदिन कॉपीपेस्ट होतात. काही तालुका जिल्हापत्रे माझे लेख परस्पर छापून टाकतात. फ़क्त महाराष्ट्रात भारतातच नव्हेतर जगभर माझा ब्लॉग वाचला जातो. त्यांच्याही प्रतिक्रीया ईमेल वा अन्य मार्गाने येत असतात. खेरीज समाजातील अनेक मान्यवर नामांकित लोकांच्या प्रतिक्रीया हिंमत वाढवणार्‍या असतात. त्यांची नावे इथे देणे मला योग्य वाटत नाही. कारण त्यांनी व्यक्तीगत रुपाने पाठ थोपटली आहे किंवा प्रोत्साहन दिलेले आहे. ते जाहिरात करण्यासाठी नाही. तर त्यांनाही माझ्या ब्लॉगवरील लेखातून काहीतरी उपयुक्त मिळाले असेल. त्यांचे कौतुक अभिमानास्पद आहे. या ब्लॉगची वाटचालही सांगण्यासारखी आहे. एक कोटी हा आकडा नजरेत भरणारा आहे. पण तिथेपर्यंत पोहोचताना पाच वर्षे लागलेली आहेत. त्यापैकी ६० लाख हिटस अवघ्या शेवटच्या सोळा महिन्यातल्या आहेत. म्हणजेच ४० लाखाचा आकडा आधीच्या ४४ महिन्यातला आहे. सरासरी एक लाख दर महिना असा तो आकडा पडतो. पण तोही फ़सवा आहे. पहिल्या वर्षभरात दरमहा वीसतीस हजारही हिटस मिळत नव्हत्या किंवा रोजचा आकडाही हजाराच्या मागेपुढे असायचा. एका महिन्यात एक लाख हिट्स मिळवण्यातच दोन वर्षे निघून गेली होती आणि पुढे हळुहळू त्याला वेग येत गेला. दरमहा दोन लाखाचा पल्ला गाठण्यासाठीही आणखी दिड वर्षाचा कालावधी लोटला. पावणे चार वर्षे होत असताना अचानक एका लेखाने थेट तीन लाखाचा पल्ला गाठून देण्याइतकी झेप घेतली, त्यातून मला व्हायरल होणे म्हणजे काय, त्याचा साक्षात्कार घडला. ‘मच्छीका पानी’ अशा शीर्षकाचा तो लेख होता आणि तिथून ब्लॉगला जी चालना व गती मिळाली, ती थांबायला वा घटायला तयार नाही. तो महिना होता मे २०१७.

या पाच वर्षात ब्लॉगवर आता चोविसशे लेख लिहून झाले आहेत आणि त्याचे श्रेय त्याचे अगत्याने वाचन करणार्‍यांना आहे. पण ब्लॉगची गंमतही इथे सांगायला हवी. वर्तमानपत्रासाठी लिहीलेला लेख त्या दिवसापुरता असतो आणि साठवणार्‍यांच्या पलिकडे बाकीच्या लोकांसाठी तो रद्दी होऊन जाते. पण ब्लॉगवरला लेख दिर्घकालीन असतो. कारण तो तिथेच रहातो आणि चिकित्सक शोध घेणार्‍या वाचकांच्या प्रतिक्रीया नंतर कधीही येऊ शकतात. आणखी एक गंमत अशी, की ‘जागता पहारा’वरला सर्वाधिक वाचला गेलेला लेख मुळातच सोळा महिने शिळा होता. म्हणजे त्याचे असे झाले, की मालेगाव स्फ़ोटातील आरोपी कर्नल पुरोहित यांना जामिन मिळाल्याची बातमी आली आणि विवेक साप्ताहिकासाठी लिहीलेला सोळा महिने जुना लेख आठवला. अश्विनी मयेकरने मला त्या़चे स्मरण करून दिले आणि तो ब्लॉगवर प्रकाशित न केलेला लेख मी त्याच दिवशी संध्याकाळी टाकला. पण त्याची खासियत अशी होती, की सोळा महिन्यापुर्वीच मी लिहीलेले मुद्दे मान्य करून पुरोहितांना जामिन मिळाला होता. आजही तोच सर्वाधिक वाचला गेलेला लेख आहे. पत्रकारितेत विषय शिळा जुना होतो. पण त्यात मांडलेले मुद्दे अभेद्य व नेमके असतील, तर विषय शिळा होण्याचा संबंध येत नाही. याची ही नवी जाणिव ब्लॉग लेखनातून मिळाली. तुमच्या लिखाणात आशय व विषय असेल, तर आजच्या युगात अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुणाचे लाचार राहू शकत नाही. त्या़ची कोणी गळचेपी करू शकत नाही, याचा हा जीताजागता पुरावा आहे. अर्थात ज्यांना स्वातंत्र्य व अधिकार हक्क कुबड्या वाटतात, त्यांना स्वातंत्र्याचे पाय किती भक्कम व मजबूत असतात, त्याची जाणिव कधीच होऊ शकत नाही. या यशाचे खरे मानकरी तुम्ही सगळे माझे मित्र चहाते व जीवलग वाचक आहात. मी फ़क्त लिहीले. ते वाचण्यासाठी ब्लॉगवर येऊन आकडा तुम्हीच फ़ुगवत नेला आहे. अन्य माध्यमातून व्हायरल कॉपीपेस्ट शेअर करून इतका पल्ला तुम्हीच तर गाठला आहे. अभिनंदन मित्रांनो!

87 comments:

  1. भाऊ तुम्ही यूट्यूब चॅनेल सुरू करा

    ReplyDelete
    Replies
    1. हो भाऊ, नक्की चालू करा. आज समाजाला , म्हणजे आम्हाला तुमच्या अनुभवाची गरज आहे. Youtube च्या चॅनेल च्या माध्यमातून आपण लोकांचे प्रबोधन करावे ही नम्र विनंती...

      Delete
  2. भाऊ
    अभिनंदन
    तुम्ही करोडपती झालात

    ReplyDelete
  3. मनोगत अतिशय सुंदरपणे व्यक्त केलेत ... 🙏

    ReplyDelete
  4. करोडपती भाऊ मनःपूर्वक अभिनंदन

    ReplyDelete
  5. बाबासाहेब सुतार, नवी मुंबई.August 25, 2018 at 11:07 AM

    करोडपती भाऊ, मनापासून अभिनंदन

    ReplyDelete
  6. abhinandan sir, yapudhehi aamhala sarvshreaht ase vachnyachi sandhi milel hich apeksha.

    ReplyDelete
  7. आदरणीय भाऊ, सर्वात प्रथम आपले अभिनंदन! सन 2014 पासून मी आपल्या ब्लॉगचा नियमित वाचक आहे. आपली बहुतांशी मतं पटतात, क्वचित काही मतं पटत नाही. पण तरीही आपल्या लिहिण्यातला प्रामाणिकपणा हा मोठा गुण आहे. आपल्याकडे माहितीचा मोठा खजिना आहे. जो आपण वाचकांसाठी सदैव खुला करत असता. एक कोटीहून जास्त हिट्स हे आपल्यासाठी नगण्य आहे. आपले लिखाण आम्हाला यापुढेही मार्गदर्शन करत राहो हीच अपेक्षा.

    ReplyDelete
  8. भाऊ, पत्रकारिता ही समाजाचा आरसा आहे.हे काम आपण करतात, चार दशकाहून अधिक काळ पत्रकारिता करताना बहुतांश मुख्य प्रवाहातील वर्तमानपत्रे व नंतरच्या उपग्रहवाहिन्या यांच्यातून तसा बहिष्कृत असलेला मी एक पत्रकार. तथाकथित पुरोगामीत्व किंवा त्यातली टोळीबाजी यामुळे बहिष्कृत राहिलो. कारण त्यांच्या अजेंडानुसार चालणार्‍या पत्रकारितेच्या पठडीत मी बसू शकला नाहीत हे आमच्या सारख्या सरळसोट मत कुवतीनुसार ,आपल्या लेखातून व्यक्त होतात,धन्यवाद.

    ReplyDelete
  9. भाउ तुम्ही अभिनंदन खास आहे कारन सोशल साइटवर जे लिहितात त्यांना त्या साइटचा ग्राहक फुकट मिळतो पन स्वताच्या साइटवर लोकांना खेचुन आणण्यासाठी तेवढी प्रतिभापन लागते ती देखील मुख्यप्रवाहाच्या विरुद्ध वाट धरुन.लोकांच्या मनातील तुम्ही जाणताच पन विविध मते अचुक ठरतात तुमचा ब्लाॅग असाच उठुन दिसत राहो

    ReplyDelete
  10. अभिनंदन भाऊ आणि पुढील १ कोटी साठी शुभेच्छा
    आम्हा वाचकांना तुमचे लिखाण कायम वाचायला मिळो हि ईश्वर चरणी प्रार्थना

    ReplyDelete
  11. भाऊ भारतासह जगात जिथे कुठे नव्या जुन्या चे मंथन चालू असेल तिथे तिथे तुमच्या सारख्या जुन्या जाणत्या समतोल लेखणी चे अमृत निघालेच पाहिजे. अभिनंदन आणि शुभेच्छा 😍

    ReplyDelete
  12. Congrats Bhau as u say 1 carod is tip of ice. ppl share some paras,whole blog on diff platform with ur name or without or their name too.and that no is much bigger.now 2019 election coming so political activities will grow we want to read on that in coming days from you.hope we will get ur fine opinions

    ReplyDelete
  13. We are really fortunate to read your thoughts.. tumcha ek pAn blog asa nahie ki jo mi vachala nahie.. roj ekda tari mi jagta pahara var chakkar marto.. ikde UK madhe asun pAn mi roj tumchya blog chi vat pahto.. asach tumhi 10 koti cha ani tyachya padhche pAn sagale tappe par karave yaa shubheccha!!

    ReplyDelete
  14. प्रिय भाऊ,तुम्ही खरच धन्य आहात ! करियरमधे येवढी प्रचंड उंची गाठल्यावरही येवढा कार्यमग्न रहाणारा पत्रकार महाराष्ट्रात तरी सापडणार नाही

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी मनातले बोललात कर्वेसाहेब, भाऊंच्या एका लेखासाठी लेखाबरोबर पेपर बदलणारा माणूस आहे मी, अगदी पुण्यनगरी मग महानगर. भाऊंचा लेख वाचला नाही तर दिवसभर अस्वस्थ वाटते काही तरी चूक-चुकल्यासारखे वाटते, आज फार दिवसाने ब्लॉगवर आलो एका बैठकीत १०-१२ लेख वाचून काढले...

      Delete
  15. आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि आपणास भविष्यासाठी अनेक शुभेच्छा !!

    ReplyDelete
  16. अभिनंदन भाऊ

    ReplyDelete
  17. अभीनंदन भाऊ साहेब! आधी मी सामना च्या अग्रलेखांची वाट बघायचो. बाळासाहेब गेल्या नंतर ती जागा आपल्या लेखांनी घेतली. महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी लोकांना तुमच्या लेखांनी नक्कीच मार्गदर्शन मिळते.

    ReplyDelete
  18. भाऊ आपल्या लिखाणात​ तो प्रामाणिकपणा​असतो. सखोल विश्लेषण, अभ्यासपूर्ण​ विषयाची मांडणी असल्याने सहज लोकांपर्यंत पोहोचतो. आपले मनापासून खूप-खूप अभिनंदन...

    ReplyDelete
  19. मच्छीका पानी हा लेख मी पुर्ण मे १७पाहीला,तेथे दिसला नाही,कृपया त्याची तारीख कळवा ही विनंती

    ReplyDelete
  20. I use your blog. Copy paste and publish it's contents (which I like) on my Facebook.
    Thanks to you.

    ReplyDelete
  21. Congratulation Bhau,
    I am working Saudi Arabia and reading your blogs since last 6 years.

    ReplyDelete
  22. प्रिय भाऊ,कोटीवरच का थांबायचे ? आता तुम्ही अब्जाधीश होणार ! येत्या सहा सात महिन्यात रद्दड अग्रलेख आणि वाहिन्यावरील भुक्कड चर्चा ह्या पेक्षा तुमच्या व्यासंगी विवेचनाची जरूर आहे. एकतरी असा पत्रकार आहे का ज्याला गेल्या सुमारे चाळीस पंचेचाळीस वर्षातील राजकीय घडमोडीचा आवाका आहे ? आणि त्यातून योग्य अर्थ काढू शकेल ? लिहीत रहा !!!!

    ReplyDelete
  23. अभिनंदन भाऊ

    ReplyDelete
  24. अहो भाऊ खरंय तुमच मी पण गेल्या दीड वर्षात तुमचे लेख वाचायला लागलो पण आता वेड लागलाय सगळे जुने लेख सुद्धा वाचून झाले आणि आता रोज नवीन लेखाची वाट बघत असतो मुख्य कारण तुमचे विचार अतिशय सुस्पष्ट आहेत आणि आम्हाला प्रत्येक गोष्टी ची खरी बाजू कळते जी आज पर्यन्त कळताच नव्हती

    ReplyDelete
  25. भाऊ,मी गेल्या 4 वर्षांपासून तुमचा निस्सीम चाहता आहे.तुमचे अनेक लेख मी कॉपी पेस्ट करून माझ्याकडे सर्व व्हाट्सअप ग्रुपवर टाकलेले आहेत.
    तुमच्या चिंतनामध्ये स्वयंप्रज्ञता आहे, ती अखंड प्रज्वलित राहो!

    ReplyDelete
  26. भाऊ आपले हार्दिक अभिनंदन! मी अगदी सुरुवातीपासून आपल्या ब्लॉगचा नित्य वाचक असून काही अपवाद वगळले तर अक्षरशः प्रत्येक लेख मी वाचून काढलेला आहे! खरे सांगायचे तर मी स्मार्ट फोन घेण्याचे कारण आपला ब्लॉग सहजतेने वाचता यावा हे एक होते. आपली उलट तपासणी देखील मिनी ते वाचायचं इतकेच नव्हे तर स्वाती ताईंचे देखील सर्व लेख मी आवर्जून वाचून काढलेले आहेत. आपले भावलेले प्रत्येक लेख व्हाटसप वरून प्रसृत करताना विशेष अभिमान वाटतो. आपल्याला एका नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून द्यावीशी वाटते गुगलने सध्या वाईस टू टेक्स्ट इंजिन नावाचा प्रकार आणलेला आहे ज्याद्वारे आपण आपल्या मोबाईलवरच केवळ बोलू शकता व आपण बोललेले सर्व गुगल छापून देते. याने आपली लिखाणाची गती किमान पाच पटीने वाढेल व आपण दोन चार लेख अधिक लिहू शकाल असे वाटते. ही प्रतिक्रिया सदर तंत्रज्ञानाचा वापर करून मी केवळ चाळीस सेकंदांमध्ये छापलेली आहे

    ReplyDelete
  27. असेच लिहीत रहा ....
    आपणास दीर्घायुष्य लाभो व लेखणी अशीच परजत राहो हीच सदिच्छा.
    परखड विवेचन करायला तुमच्यासारखी व्यक्ती असावीच लागते.

    ReplyDelete
  28. भाऊ तुमचे लेख खूप वास्तववादी असतात. एवढ्या वर्षात खरं खरं लिहणारा कधी वाचनात आला नाही, तुमचे शतशः आभार, भाऊ तुमचे लेख जशेच्या तशे दैनिक पुढारी मध्ये संपादकीय सदराखाली येतात, त्याचे क्रेडिट तुम्हाला मिळावे असे वाटते.

    ReplyDelete
  29. Bhau khare tr tumhi aamchya aajobanchya vayache ..tumchyakadun Jo anubhav je shikayla milte,jya ghatana tumhi sangtaat tyala tod nahi ,tumchya pratek lekhachi vaat aaturtene pahat asti aamhi vachak.tumche lekh aamhi na sangta copy paste karto tya baddal mafi asavi.....asech margdarsha karat ja...

    ReplyDelete
  30. Trivaar abhinandan Bhau. Mi 2013 pasun tumchya blog cha nitya vachak aahe. Tumchya atishay tark shudhha likhana mule itki follower ship aahe tumchi. Kotyadhish zala aahatch.... Abjadheesh lavkarach honyasathi khup khup shubhechha. Abhay Agnihotri

    ReplyDelete
  31. Congratulations Bhau. I live in Belgium and your big fan. Keep writing and make us educated. Way to go.

    ReplyDelete
  32. Bhausaheb congrats! It is an honor to know you personally!! I am lucky indeed! Keep it up.

    ReplyDelete
  33. अभिनंदन भाऊ.. मी आपल्या ब्लॉगचा आरंभापासून वाचक आहे... खरे तर पुण्यनगरी उलटतपासणी पासून...आजकाल बोकाळलेल्या पुरोगामी पत्रकारितेची आपण यथेच्छ हजेरी घेतातच.. ट्युशन्स पण घ्या त्यांच्या म्हणजे सुधरले तर बरं.. कायम शुभेच्छा..

    ReplyDelete
  34. Replies
    1. अभिनंदन भाऊ अधूनमधून अर्थक्रांती वर पण लिहा. किंवा दरमहा प्रकाशित होणा-या अर्थपूर्णचे परिक्षण आपल्या ब्लॉग वरून करा ---तुळपुळे मिरज

      Delete
  35. मनपूर्वक हार्दिक अभिनंदन

    ReplyDelete
  36. भाऊ , तुमचे लिखाण म्हणजे केवळ एक लेख नसतो तर ती एक विचीरधारा असते . तुमचे विचार हे केवळ मनालाच भिडत नाहीत तर प्रत्येकालाच विचारप्रवण असतात व ते त्रयस्थ नजरेतून विद्यमान वस्तुथितीवरचेअत्यंत मार्मिक विवेचन असते परिस्थितीनुरूप आसुड ओढणारे असते . एवढेच नव्हेतर ते आमच्याच मनातील भावना व्यक्त करणारे वाटतात व त्या मुळेच मनाला भिडणारे असतात. भाऊ उत्तरोत्तर आपली वाचकसंख्या अशीच वाढत जावो व तिने एका चळवळीचे रूप धारण करो हिच सदिच्छा !
    सुरेन्द्र जोशी.

    ReplyDelete
  37. Abhinandan bhau
    Tumchya 4 hi blog varil sarv lekh mi anek da vachale aahet. Bhiwandi madhil 2 police jalane ghatana ani nantarche bomb sphotache lekh mi majhya police dept chya mitrana pathavale hote...tenva pasun te pan tumchya blog che followers jhale.UPSC mains exam marathi medium madhun lihitana tumchya lekhanshailicha changala positive parinam majhyahi lekhanavar jhala aani mala 2015 chya mains madhe essay ya vishayat 163 ase sarvadhik gunanapaiki ek asalele gun milale hote.....Thank you Sir.

    ReplyDelete
  38. अभिनंदन सर. आणखी शिखरें सर करत रहाल याची खात्री आहे. शुभेच्छा.

    ReplyDelete
  39. भाऊ तुमचे आणि तुमच्या स्मरणशक्तीचे हार्दिक अभिनंदन.

    ReplyDelete
  40. Bhau, फक्त एक कोटी? तुमचा ब्लॉग शंभर कोटी हिट्सचा आहे.या मूर्खांच्या जगात तुम्ही दीपस्तंभ आहात.आपण जे प्रबोधन करत आहात,ती खरी देशभक्ती आहे.सुमारांच्या भिकारी अग्रलेखांच्या मांदियाळीत तुमचं लेखन कोहिनूर हि-यासारखं वाटतं.असंच लिहित रहा.तुमच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना.

    ReplyDelete
  41. Hearist Congratulations Bhau sir.

    ReplyDelete
  42. भाऊ खरं सांगतो एखादे दिवशी तुमचा लेख पडला नाही किंवा लेख यायला उशीर झाला तर आम्ही अक्षरशः अस्वस्थ होतो कारण तुमचा लेख वाचल्या शिवाय दिवसाचे वाचन पूर्ण झाल्यासारखेच वाटत नाही

    ReplyDelete
  43. भाऊ तुमचे ब्लॉग म्हणजे ज्ञानाचा खजिना आहे.
    प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकवता तुम्ही.
    अभिनंदन एक कोटीसाठी.

    ReplyDelete
  44. अभिनंदन भाऊ मला वाटते जो कोणी आपल्या ब्लॉग ला एकदा भेट देतो तो कायमचा वाचक होऊन जातो मी हि त्यातलाच एक. ज्यांनी मला हा ब्लॉग सुचवला त्यांचेही आभार

    ReplyDelete
  45. अभिनंदन आदरणीय भाऊ,मी आपल्या ब्लॉग चा नित्य वाचक आहे. एक विनंती करू इच्छितो की राष्ट्रीय मुद्द्यां संदर्भातील ब्लॉग इंग्रजी भाषेमधेही प्रसारीत करावेत,म्हणजे अमराठी वाचकांना ही त्याचा लाभ होईल.

    ReplyDelete
  46. भाऊ आपले लिखाण प्रामुख्याने मराठी वाचकां पर्यंत पोहचते व त्यात एक कोटी पेक्षा निश्चितच जास्त लोकांपर्यंत पोहचलात आता अमराठी वाचकांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी हिंदी व इंग्रजी मध्ये भाषांतर व्हावे व सर्वांपर्यंत पोहोचले तर चांगले होईल.

    ReplyDelete
  47. भाऊ... माझ्यासारख्या अनेकांची प्रेरक शक्ती आहात आपण. आपणास उदंड आयुष्य लाभो ही देवा चरणी प्रार्थना.

    ReplyDelete
  48. अभिनंदन भाऊ आणि आभारही

    ReplyDelete
  49. अभिनंंदन भाऊ!
    फिटे अंंधाराचे जाळे
    झाले स्वच्छ अवकाश.

    ReplyDelete
  50. अभिनंदन भाऊ!एक विनंती अधूनमधून अर्थक्रांती वर पण लिहा किंवा दरमहा प्रकाशित होणा-या अर्थपूर्णचे परिक्षण आपल्या ब्लॉग वर करा आपल्या पुण्याच्या पत्त्यावर अंक पाठवण्याची व्यवस्था करतो- -तुळपुळे

    ReplyDelete
  51. जागता पहाराचे लेख ऑडियो वीडियो स्वरुपात यूट्यूब वर यायला हवेत. काही लोक मोठे लेख वाचण्याची तसदी घेत नाहीत. तिथे यूट्यूब चैनल खुप प्रभावी ठरू शकते.

    ReplyDelete
  52. अभिनंदन भाऊ

    ReplyDelete
  53. आदरणीय भाऊ,

    अभिनंदन.. मी आपल्या ब्लॉगचा आरंभापासून वाचक आहे.आजकालच्या विकाऊ पत्रकारीतेच्या युगात आपल्या सारखा नीरक्षीर विवेक बुद्धी वापरून लिहिणारा पत्रकार विरळाच..
    एक विनन्ती, आपण या लेखान्च पुस्तक काढावा, कारण अजूनही एक वर्ग आहे जो आपले लेखन वाचण्याच्या दूर आहे.

    परमेश्वर आपल्याला दीर्घायुष्य देवो. पुढील वाटचालीला शुभेच्छा ..

    ReplyDelete
  54. भाऊ तुमच्या लेखणीतून पुढील अनेक वर्षे आमच्यासारख्या तरुण पिढीला सत्य-असत्याची परखड मांडणी वाचायला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

    ReplyDelete
  55. श्री भाऊ आज तुमच्या वर " मटा" मध्ये comment आली आहे

    ReplyDelete
  56. आदरणीय भाऊ,
    गेल्या ४ वर्षांपासून मी आपले लेख नियमित वाचत आलो आहे आणि खरोखर आपले लेख हे खरं वास्तव आणि खरी बातमी सांगत आले आहेत... एखाद्या भपकेबाज बातमीकडे वेगळ्या अर्थाने बघायचा दृष्टिकोन आपण शिकवलात. आपले लेख हे आम्हा वाचकांसाठी मार्गदर्शक आहेत...
    आपणस खूप खूप शुभेच्छा आणि आम्हा वाचकास आपले लेख वाचण्याचे सौभाग्य लाभो हीच प्रार्थना

    धन्यवाद

    ReplyDelete
  57. श्री. भाऊ तोरसेकर यांचे अभिनंदन.
    गेले काही महिने या ब्लॉगचा मी नियमित वाचक आहे. न्युज वाहिन्यांवरील कर्णकर्कश्श
    चर्चा मधून डोकेदुखी शिवाय काहीच हाती लागत नाही. तसेच वर्तमानपत्रातील लेख हे एकांगी आणि बऱ्याचदा नकारात्मक असतात.
    अशा वेळेस घटनांचे अर्थ समजावून सांगणारे, त्यातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे, त्याचा ऐतिहासिक संदर्भ देणारे अभ्यासू लेख वाचकांना हवे असतात. अशा लेखांची गरज ह्या ब्लॉगमुळे पूर्ण होते.
    ह्या ब्लॉगला खूप शुभेच्छा!!

    ReplyDelete
  58. Congratulations Bhau . Hope your blog reaches to 100 crores . ��

    ReplyDelete
  59. भाऊ 'मच्छी का पाणी' हा लेख 09 जून 2015 चा आहे.

    ReplyDelete
  60. खूप खूप अभिनंदन भाऊ!! गेले निदान ३ वर्ष तरी मी ह्या ब्लॉग चा नियमित वाचक आहे आणि तुमचं निर्भीड आणि परखड लिखाण मनापासून भावतं. आणि तुमच्या लिखाणाविषयीची विश्वासार्हता प्रत्येक लेखगणिक वाढत जाते. पुढील सर्व लेखनासाठी शुभेच्छा!!

    ReplyDelete
  61. भाऊ तुमचे लेखन मनाला भिडते. आजकाल सगळे चॅनेलवाले आणि पेपरवाले वाट्टेल ते बोलतात आणि लिहितात. तुमचे परखड विचार असेच प्रकट होवो. तुमचे माझा वरची चर्चा पण आवर्जून बघतो.

    ReplyDelete
  62. भाऊ तुमचं लिखाण आमच्यासाठी मार्गदर्शक आहे.कोट्याधीश झाल्याबद्दल अभिनंदन!!

    ReplyDelete
  63. निरपेक्ष लेखणी!

    ReplyDelete
  64. आदरणीय भाऊंना...सादर प्रणाम...

    तुमचा "जागता पहारा" मी "पुंण्यनगरी" पासून वाचत आलो आहे...तो पेपर मी केवळ तुमच्या "जागता पहारा" साठीच हातात घेतला होता.. मी आजही पेपर वाचत नाही. केवळ तुमचा ब्लॉग वाचतो..मी तुमचा खुप आभारी आहे की तुमच्यामुळे मला राजकिय दृष्टी मिळाली.. मी तुमचे भरपूर लेख कॉपी पेस्ट करून फेसबुक, व्हाट्सएपच्या माध्यमातून अनेकांना पाठवले आहेत. तुमचे लिखाण माझ्यासारख्या लाखों लोकांना राजकीय दृष्टी देऊन गेले आहे. तुमचे शतशः आभार... तुम्ही दीर्घायुषी व्हावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना...

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी मनातले बोललात, भाऊंच्या एका लेखासाठी लेखाबरोबर पेपर बदलणारा माणूस आहे मी, अगदी पुण्यनगरी मग महानगर.

      Delete
  65. Jagata paharyane lakho lok jage pan zale ahet

    ReplyDelete
  66. नमस्कार भाऊ,
    मी आपल्या ब्लॉगचा गेल्या २ वर्षांपासून चाहता आहे. तेव्हापासुन मी प्रत्येक लेख वाचला आहे. आपल्या लेखांमुळे घटनांकडे बघायची एक वेगळी दृष्टी मिळते. जुन्या काळातील संदर्भ घेऊन त्यांचा सध्याच्या घटनांशी संबंध दाखवण्याची आपली शैली एकदम प्रभावी आहे.
    आपल्याला दीर्घायुष्य लाभो आणि आपले लेख आम्हाला असेच वाचायला मिळोत!

    ReplyDelete
  67. भाऊ तुमची लेखणी अशीच अविरल लिहिती राहो.
    म्हणजे आता लेखणीच्या जागी बोटे म्हणावे लागेल...
    तुम्हाला शतायुषी आयुष्य लाभो हीच गणराया चरणी प्रार्थना

    ReplyDelete
  68. अभिनंदन भाऊ👍💐

    ReplyDelete
  69. धन्यवाद भाऊ, मीदेखील तुमच्या विचारांना कॉपी पेस्ट करून त्यांना इंग्रजीत अनुवादित करून द्विभाषिक पोस्ट टाकत असतो. उद्देश इतकाच की माझ्या अमराठी भाषिक मित्रांपर्यंत हे विचार पोचावेत.

    ReplyDelete
  70. सगळे पत्रकार दलाली करते असताना आपले लेख
    आमच्या विचारशक्तीला नवी दिशा देतात अशावेळी
    कुसुमाग्रजांच्या ओळी आठवतात.एकच तारा समोर आणि पायतळी अंधार.

    ReplyDelete