Tuesday, May 26, 2020

राष्ट्रपती राजवट कशला हवी?

क्या महाराष्ट्र सरकार पर है खतरा ...

गेल्या काही दिवसात राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनू नये म्हणून गदारोळ करण्यात आला आणि हळुहळू करीत सगळेच राजभवनात फ़ेर्‍या मारू लागलेले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस अनेकदा राज्यपालांना भेटायला गेले आणि त्यांनी आपल्या अनेक मागण्या व तक्रारी तिथे मांडल्या. खरे तर त्याची गरज नव्हती. उद्धव ठाकरे जुने सहकारी मित्र असल्याने नुसता फ़ोन लावूनही आपल्या अपेक्षा वा मागण्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणे फ़डणवीसांना शक्य होते. मग त्यांनी त्यासाठी राजभवनात धाव कशाला घ्यावी? हा मला पडलेला प्रश्न नाही, तर जलसंपदा मंत्री जयंत पाटिल यांना सतावणारा सवाल आहे. कोणालाही तो सवाल रास्त वाटणाराच आहे. पण अनेकदा आपली स्मृती दुबळी असते, त्यामुळे दुसरा कोणी अनुभवातून शिकतो हे आपण विसरून जातो ना? बहुधा पाटलांची तीच कथा असावी. अन्यथा त्यांना आपले महाविकास आघाडीचे सरकार फ़ोन घेतला न जाण्यामुळे सत्तेत येऊ शकले; या घटनेचा कशाला विसर पडला असता? मुख्यमंत्री होण्यासाठी किंवा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी वापरलेली एक महत्वाची युक्ती म्हणजे त्यांनी त्या काळात फ़डणवीसांचा फ़ोनच उचलायचा नाही; असा केलेला निर्धार होता. अर्थात हे उद्धवरावांनीच मोठ्या अभिमानाने पत्रकारांना सांगितले होते. जयंत पाटलांना ते ठाऊकच नाही काय? उद्धवरावांनी देवेंद्रचा फ़ोन उचलला असता, तर कदाचित महाविकास आघाडीचा जन्म झाला नसता आणि पाटिल जलसंपदा मंत्रीच होऊ शकले नसते. जी व्यक्ती देवेंद्रचा आहे, म्हणून त्या अटीतटीच्या कालखंडात फ़ोनच घेत नाही, ती व्यक्ती आज कोरोनाच्या आणिबाणीत त्याच देवेंद्र फ़डणवीसांनी फ़ोन केला, म्हणून तो उचलून त्यांच्या मागण्या ऐकून घेईल काय? म्हणून मुख्यमंत्र्यांपर्यंत आपल्या मागण्य़ा पोहोचवण्यासाठी फ़डणवीसांना राजभवनाचे खेटे घालावे लागत आहेत.

गेल्या वर्षीच्या आक्टोबर महिन्यात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका झालेल्या होत्या. त्यात सत्तारूढ भाजपा शिवसेना महायुतीला स्पष्ट बहूमत मिळालेले होते. पण त्यातल्या दोन पक्षांपैकी कोणाला मुख्यमंत्रीपद मिळावे, असा वाद सुरू झाला आणि जनतेने दिलेल्या बहूमताचा फ़ज्जा उडवला गेला होता. आपल्याला सत्तेत अर्धी भागिदारी हवी आणि त्यात मुख्यमंत्रीपदाचाही समावेश होतो; असा हट्ट उद्धवराव धरून बसलेले होते. त्याच फ़ज्जाकडे सज्जातून बघत बसलेल्या राष्ट्रवादी व कॉग्रेसला त्यामुळेच सत्तेची लॉटरी लागलेली होती. कारण खर्‍या मतदाराने त्या दोन्ही पक्षांना विरोधात बसण्य़ाचा आदेश मतदानातून दिलेला होता. हे अर्थात मतदाराने कुठल्या पत्रकार परिषदेत येऊन सांगितलेले नाही. तर त्या काळात जयंत पाटलांपासून शरद पवारांपर्यंत दोन्ही कॉग्रेसचा प्रत्येक नेता पत्रकारांना हेच सांगत होता. जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे आणि महायुतीला सरकार बनवण्यास बहूमत दिलेले आहे. त्यामुळे सरकार कसे व कधी बनणार, ते त्यांनाच विचारा असा बहूमोल सल्ला हीच मंडळी पत्रकारांना देत होती. पण सरकार बनवण्यासाठी युती म्हणून निवडून आलेल्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये संवाद होण्याची गरज होती. त्याच्या दोन शक्यता होत्या, फ़डणवीस यांनी वा उद्धव ठाकरे यांनी बोलणे आवश्यक होते. त्यापैकी एकाने दुसर्‍याला फ़ोन करून सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करायला हवे होते. त्यापैकी उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी कधीच फ़डणवीसांना फ़ोन केला नाही. तसे त्यांनीच सांगितलेले आहे. पण देवेंद्रनी मात्र अनेकदा मातोश्रीवर फ़ोन केलेले होते. मात्र आपला फ़ोन उद्धवराव घेत नाहीत, अशी त्यांची तक्रार होती. नंतरच्या कालखंडात त्याची ठाकरे यांनीही कबुली दिलेली आहे. फ़डणवीसांचे फ़ोन आले, पण आपणच घेतलेले नाहीत असे छाती फ़ुगवून उद्धवरावच पत्रकारांना म्हणल्याचे कोणालाच आता आठवत नाही काय?

त्यामुळे आता तेच फ़डणवीस कुठल्या अनुभवाने मातोश्रीवर फ़ोन करतील? विरोधी नेता म्हणूनही त्यांनी मातोश्री येथे फ़ोन लावला तर उद्धवराव उचलणार आहेत काय? जयंत पाटलांनी त्याचाही खुलासा करून टाकला असता, तर काम सोपे होऊन गेले असते. पण तसे होणार नाही. कारण जयंत पाटिलही आपण दिशाभूल करणारे बोलत आहोत हे जाणुन आहेत. शिवाय आताच त्यांना कोरोनाच्या संकट काळात असे राजभवनावर जाणे घाणेरडे राजकारण वाटते आहे. बहुधा सरकार बनवण्याच्या वा महायुतीला फ़ोडण्याच्या काळात महाराष्ट्रात स्थिती एकूण सुखरूप व आनंददायी असल्याचे वाटत असावे. की त्याही बाबतीत त्यांच्यासह शिवसेना प्रवक्त्यांना स्मृतीभ्रंश झालेला आहे. फ़डणवीस सोडून द्या आपले शतजन्मातही कधी न समजणारे जाणता नेता शरद पवार शेतकर्‍यांना भेटायला बांधावर कशाला जात होते? ते यांना आठवतच नसतील काय? जेव्हा बहूमताची मोडतोड करून सत्ता बळकावण्याचे खेळ दोन्ही कॉग्रेस व शिवसेनेचे चाणक्य करीत होते. तेव्हा अवकाळी पाऊस व अतिवृष्टीने अवघा महाराष्ट्र बेजार झालेला होता. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चीम महाराष्ट्र किंवा कोकणाला पावसाने झोडपले होते, पुराने थैमान घातलेले होते. कोल्हापुर सांगलीच्या भागात तर हायवेही बुडालेले होते. गावात शहरात घराघरात पाणी शिरलेले होते आणि गुरेढोरेही वाहून गेलेली होती. नदीलगतच्या अनेक गावात छपरावर मगरी बागडत होत्या. त्यातले काहीही जयंत पाटलांना अजिबात आठवत नाही काय? त्या काळात महाराष्ट्रात निवडणूका संपून निकाल लागलेले होते आणि एका राजकीय आघाडीला मतदाराने बहूमत बहाल केलेले असतानाही पुरोगामी महाराष्ट्र सरकारविना राष्ट्रपती राजवटीत खितपत पडलेला होता. त्यातून त्याला दिलासा देण्यापेक्षा जयंत पाटिल वा सेनेचे प्रवक्ते कोणते उदात्त कार्य करण्यात रमलेले होते?

महायुतीला मतदाराने बहूमत दिलेले होते आणि त्याला लाथाडून सत्ता बळकावण्याचा क्रुर राजकीय खेळ चालला होता. तेव्हा बुडालेल्या, उध्वस्त होऊन गेलेल्या शेतकरी गावकर्‍याला तातडीची मदत देणे आवश्यक होते. म्हणूनच पंचनामे केल्याशिवायच मदत माफ़ी वा अनुदान देण्याच्या मागण्या शरद पवारच करीत होते. पण सरकार स्थापन होऊन त्याने ठामपणे निर्णय घ्यावेत, यात टांग अडवण्याचेही कर्तव्य मोठा शक्तीने पार पाडत होते. अतिवृष्टीने शेतकरी गावकरी बेजार झाला होता, ती स्थिती कोरोनाच्या संकटापेक्षा किती वेगळी होती? लाखो लोक उध्वस्त झालेले होते ना? तेव्हा केलेल्या घातक राजकारणाला कुठले नाव किंवा विशेषण द्यायचे जयंतराव? ते मदतकार्यात वा शासकीय कामातले अडथळे व्यत्यय नव्हते का? की अशा उचापती कोण करतो, त्यानुसार त्यातले पाप वा पुण्य शोधायचे असते? सामान्य माणूस वा नागरिक बेअक्कल असतो. त्याची स्मृती दुबळी असते. त्याला कालचे किंवा सहा महिन्यापुर्वीचे राजकारण आठवतच नाही. सहाजिकच आजचे राजकारण घाणेरडे म्हटल्यावर डोळे मिटून त्याचा विश्वास बसतो, असे या महाभागांना वाटते काय? नसेल तर आज फ़डणवीसांनी राजभवनात जाण्याबाबत जाब विचारण्यापेक्षा त्यांनीच सहासात महिन्यापुर्वी आपण केलेल्या उदात्त राजकीय खेळी-मेळीच्या आठवणी जागवाव्यात ना? आपण कसे शेतकरी बुडालेला असताना गावे उध्वस्त झालेली असतानाही सत्तेची साठमारी खेळत बसलेलो होतो, त्याचे प्रवचन करावे. लोक त्यालाही टाळ्याच वाजवतील जयंतराव. एक मात्र खरे. त्यावेळी निदान ‘हंगामी’ मुख्यमंत्र्यापासून शरद पवार व उद्धवरावांपर्यंत सगळेच बांधावर जाऊन गावकर्‍यांना दिलासा देत होते. आज त्याचाही थांगपत्ता नाही. अवघा महाराष्ट्र आजाराने भयभीत सैरभैर झालेला असताना, मंत्री नेतेमंडळी आपापल्या सुरक्षा कवचात अंग चोरून बसलेली आहेत.

ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेतली किंवा समजून घेतली, तर नारायण राणे यांची चमत्कारीक वाटणारी मागणी समजू शकते. जर अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व ग्रामिण जनजीवन उध्वस्त असतानाही राज्यातले सर्व राजकीय पक्ष व नेते सरकार स्थापनेपेक्षाही राजकीय साठमारी करण्यात सहासात महिन्यापुर्वी रमलेले होते आणि राज्याचा एकूण कारभार उत्तम चालला होता. कोणालाही कसली फ़िकीर नव्हती तर आज त्यापेक्षाही मोठे संकट म्हणून कोरोना समोर उभा ठाकलेला आहे. अशा वेळी त्यालाही राष्ट्रपती राजवटच परिस्थिती योग्य हाताळू शकते, असे कोणालाही वाटणारच ना? कारण दोन्ही काळातली स्थिती जवळपास सारखीच आहे. लोकनियुक्त सरकारची निदान महाराष्ट्राला गरजच नाही, असे सर्व राजकीय पक्षांनी आपल्या तेव्हा सिद्ध करून दाखवले आहे. मग राणे यांची मागणी कशी अयोग्य मानता येईल? तेव्हा शेतकरी गावकरी तडफ़डत ठेवून सत्तेचे वाटप करण्यामध्ये तिन्ही पक्ष रममाण झालेले होते आणि बांधावर जाऊन नुसते कोरडे दिलासेच वाटले जात होते ना? आजही खुद्द मुख्यमंत्री लाईव्ह संबोधनातून वेगळे काय करीत असतात? पवारांनाही आजकाल शेताचा बांध आठवेनासा झाला आहे. अशा काळात महाराष्ट्राचा कारभार राज्यपाल उत्तम करू शकतील, यात शंका नाही. कारण निवडणूका होऊनही आणि मतदाराने स्पष्ट कौल देऊनही दोन महिने इथे राष्ट्रपती राजवट राहिल; याची सर्वच पक्षांनी काळजी घेतली होती. याचा अर्थच आपल्यापेक्षा राष्ट्रपती राजवटीत राज्यपाल उत्तम कारभार करतात, अशी महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांची व नेत्यांची खात्री आहे. नारायण राणे यांनी ती शब्दात व्यक्त केली इतकेच. किंबहूना लोकांचे प्रतिनिधी सरकार स्थापन करतात तेव्हाच घाणेरडे राजकारण होते; असाच सर्वांचा दावा ऐकू येत असतो. नारायण राणे यांचे आकलन म्हणून मोलाचे नाही काय?

33 comments:

  1. भाऊ अतिशय उत्तम आणि नेहमी प्रमाणेच परखड, इतिहास लोक विसरतात आणि नेते तो विसरायला भाग पाडतात, इतिहासाची आठवण काही जणांना करून देणं गरजेचं आहे पण त्याचा बोध किती जण घेतील? हा ही प्रश्न आहेच.

    ReplyDelete
  2. Bhau, BJP tar kuthe serious aahe... Maharashtra Bachao cha porkhel ka kela

    ReplyDelete
  3. राणेंचे आकलन योग्यच आहे भाऊ. पण त्यांचा जास्त भरवसा धरता येत नाही. उद्धवनी जर राणेंना थोडी मंत्रिपदाची लालूच जरी दाखवली की हेच राणे मी बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून धावत येईल.

    ReplyDelete
  4. आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खाताय असं चाललं आहे

    ReplyDelete
  5. उपरोक्त विवेचन अभ्यास पूर्ण आणि अक्षरशः सत्य आहे

    ReplyDelete
  6. महाराष्ट्राला सरकारची गरज नाही हे आता खरंच पटायला लागले आहे

    ReplyDelete
  7. मविआ म्हणजे जबाबदारी व कृती यांचे विसंगत समीकरण दिसते

    ReplyDelete
  8. महाराष्ट्रीयन जनतेला त्रासदायक ठरेल सर्वाधिक भ्रष्टाचार राजनीति करत आहेत बीजेपी-कांग्रेस शिवसेना रांकपा हयांना काहीचं फरक पडत नाही भामटेगीरी करतं आहेत समाजसेवा का करत नाही सर्वाधिक मलाईदार खाते साठी मुख्यमंत्रीनां पैसे देतात मग आता का बरं तोड़ लपवतात नालायक फडफडावनीश घाणेरडं राजकरण करून जनतेची मारत फीरतो आहे सरवाचें पगार बंद करा भत्ते बंद करा जनतेचां पैसा आहे

    ReplyDelete
  9. हे आत्ताचं राजकारण विधान परिषदेच्या बारा जागांसाठी चालू असावं असं वाटतं. तुमचं मत काय आहे?

    ReplyDelete
  10. भाऊ
    परिस्थिती निश्चितच खराब आहे.कारभारात समन्वय नाही हे पण दिसत आहे.पण बहुमत असलेलं सरकार बरखास्त करता येणार नाही हे वास्तव आहे.फडणवीसांबद्दलचा तुमचा मुद्दा याेग्य आहे.पण मुख्यमंत्र्याशीच पहिल्यांदा संवाद साधायला हवा प्रतिसाद नाही दिला तर राज्यपाल हा क्रम ठेवला असता तर आज जी टीका होतेय ती झाली नसती अजुनही वेळ गेलेली नाही.दोघेही चुक दुरूस्त करू शकतात जो स्वतःमध्ये बदल घडवेल तो जिंकेल. शेवटी कॅान्ग्रेसच पाठींबा काढून घेणार असे वाटते.

    ReplyDelete
  11. अप्रतिम विवेचन

    ReplyDelete
  12. he Fadnavis too much aggressive at this time? relasing FB posts every hour. Highlighting the issues is required and should be done by the opposition, but how many BJP MPs, MLAs, Corporators are on the road to help people? Why can't BJP make arrangement for at least ambulance drivers? Why can't BJP help people to get train forms, get fitness certificate? Why can't BJP in rest of the Maharashtra help farmers to distribute their produce directly to the people? In my area BJP MLA - Jagtap gave one whatsapp number for ordering vegetables, when ordered for it, he said that the fruit-vegetable distribution is stopped due to lockout. Same is the case with some other BJP corporators, they gave the numbers and rates and never responded to the message.
    Today RSS is active but BJP is not. But if BJP thinks that they will get benefit of the service by RSS, it won't happen now. Because BJP has too many outsiders now and RSS does not mean BJP.
    Fadnavis should show his leadership in directly approaching people for their help than shouting on videos everyday.
    1-2 posts daily is more than enough to be active, he does not need to be so much aggressive at this time.

    ReplyDelete
  13. फडणविसांनी वर्षा बंगल्यावर जायला हवं, मातोश्रीवर नाही, जर वर्षा बंगल्यातन प्रतिसाद मिळत नाही तर राजभवनच वाली आहे.

    ReplyDelete
  14. चालू प्रोजेक्ट बंद केले या सरकारने. बुलेट ट्रेनमधे फक्त 10% पैसा जाणार होता महाराष्ट्र सरकारचा, पण फायदा किती मोठा होता. मूर्ख लोक.

    ReplyDelete
  15. ढोंगी राजकारणाचा कळस आहेत सरकरमधले लोक

    ReplyDelete
  16. "शिवसेना" हे, (इंग्रजीत ज्याला outsourcing केलेले किंवा subcontract दिलेले म्हणतात तसे) कॉंग्रेसचेच पिल्लु आहे. इंदिरा गांधींनी आपल्या विरुध मुंबई मधे सशक्त होत चाललेले ड़ावे ट्रेड युनियन आणि लाटणे वाल्या बाईंची दिवसेंदिवस सशक्त होत चाललेली मुंबईकरांची अदृश्य सेना, या दोघांना शह देण्यासाठी शिवसेनेला तयार केले. वरकरणी भगवा रंग आणि बोलण्यात भाषेला दिलेला भगवा रंग हा झाला शिवसेनेचा camouflage चा भाग, पण शिवसेना निर्मितीचा खरा उद्देश कॉंग्रेस विरोधात असलेले मुंबईतील मतदार फोडणे हाच होता. राष्ट्रीय पक्ष असल्याने उघड-उघड प्रादेशिक किंवा भाषेच्या राजकारणात उतरणे कॉंग्रेसला शक्य नव्हते. ती कामगिरी कॉंग्रेससाठी मुंबईत शिवसेनेनी केली. आळीपाळीने कधी दक्षिण भारतीय, कधी उत्तर भारतीयांना डिवचायचे तर कधी गुजरात/कर्णटक विरोधात खुस्पट काढायचे आणि कॉंग्रेस विरोधात असलेल्या मुंबईतील मराठी माणसाला एकत्र आणायचे काम शिवसेनेने इतके वर्ष केले. त्यामुळेच चौपन्ं वर्षांपासून कॉंग्रेसचीच 'B- team' असलेल्या शिवसेनेला, 2019 मधे कॉंग्रेस चा आधार मिळाला आणि महाआघाडीचा मार्ग प्रशस्त झाला. शिवसेना चालेल पण भाजप नको. आता कॉंग्रेसच्या ऐतिहासिक नितीनुसार 'गरज सरो अन वैद्य मरो' न्यायाने,कॉंग्रेसची गरज आज संपली आहे. मुंबई मधे कोरोनाच्या होवू घातलेल्या बदनामीची कॉंग्रेसला चाहुल लागली आहे. त्या जबाबदारीत आपले नाव गुन्तू नये किंबहुना तसे व्हायच्या आत त्या निमित्ताने कॉंग्रेस महाआघाडी सरकार पाडेल, असेच स्पष्ट संकेत काल राहूल गांधींनी दिले आहेत .

    ReplyDelete
  17. भाऊ, आपण आमच्या मनातले अगदी सडेतोडपणे लिहिता आणि आपल्या चँनेलवर मांडता. अभिनंदन. काल शिवसेनेचा गावठी चाणक्य राऊत पत्रकारांना सांगत होता कोरोनाबाबत महाराष्ट्राकडे बोट काय दाखवता? तिकडे गुजरातला कोर्टाने झापले आहे ते बघा. काय माणूस(?)आहे? महाराष्ट्रातील विरोधी पक्ष महाराष्ट्रावर बोलेल की गुजरातचे अश्रू पुसायला जाईल? देशातील कोरोनाबाधीतांच्या संखेच्या १/३ संख्या महाराष्ट्रात आहे व त्यातील निम्मी मुंबईत आहे, याची लाज नाही पण गुजरात सरकारला कोर्टाने झापले त्याचा आनंद. निर्लज्जपणाचा कहर आहे.

    ReplyDelete
  18. भाऊ ज्यावेळी शरद पवार हे सरकार स्थिर आहे, आसे म्हणतात यांचा अर्थ सरकारचे दिवस भरले आहे. शरद पवार व संजय राऊत नी शिवसेना सपुंन टाकली. आता त्यांना शिवसेना ची गरज नाही

    ReplyDelete
  19. Excellent review of situation bhau. We all know how he could solve all problems of troubled farmers at that time and gave ouths at early morning. He was so efficient. He just forgot he was better person to do job than mr fadnvis.

    ReplyDelete
  20. भाऊ उत्तर प्रदेश मधील ज्या काँग्रेस आमदार आदितसिंग यांनी प्रियंका गांधी विरोध केला. त्या बद्दल थोडे लेखन करा.जसे अमेठी गेले तसेच रायबरेली जाईल का

    ReplyDelete
  21. एकदम सही भाऊ

    ReplyDelete
  22. भाऊ, आज व्हाट्सअपवर भा.उ.तोसरेकर (तोरसेकर नव्हे) या नावाने R S S ला बदनाम करणारी एक पोस्ट आली. कोणीतरी तुमच्या नावाशी साधर्म्य असणारे नाव वापरून R S S आणि तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे.

    ReplyDelete
  23. नमस्कार भाऊ,
    'दरोडेखोर' कुबेर वर तोंड करून त्यांच्या वृत्तपत्रातून वाड़्गमयचौर्याचा खुलासा देत आहेत. यावर आपलं मत. एैकायला आवडेल. प्रतिपक्ष वर प्रतिक्रिया देता येत नाही म्हणून येथे देत आहे. धन्यवाद...

    ReplyDelete
  24. Please write or do a video about after cm life of Uddhav Thackrey as it seems he is going to resign by himself.

    ReplyDelete
  25. भाऊ साहेब
    आपला ई-मेल आयडी मिळेल का?

    ReplyDelete
  26. एकदम छान विश्लेषण केलं आज हा विचार पोहचला पाहिजे तथाकथित पुरोगामी माध्यम वातावरण बिघडवतात

    ReplyDelete
  27. Written communication things are too good but think from both ends.
    1. During MAHAYUTI declaration Amit Bhai Shah was personally visited to MATOSHREE, then why after elections they didn't contact MATOSHREE in any ways??
    2.Devendraji said they called Uddhavji then during the time each and every leader from BJP is giving statement or press conference, then why Devendraji was out of focus???
    3. After MAHAVIKAS AGHADI foundation media targeting Shivsena but why BJP forgot that they made an alliance with NCP and took oath early in the morning... Was it fair???
    And many more...so while writing being a writer you should have skills to think from both sides..
    I'm not the right person to suggest you this but being a common man we also have thinking power about the reality.

    ReplyDelete
    Replies
    1. Uddhavaji himself said that he did not lift the fone calls by Devendraji.

      Delete
    2. "दोन्ही बाजूंचा विचार करा" हा तुमचा सल्लाच सिद्ध करतो की तुम्ही ह्या ब्लॉगवर नवखे आहात. तुमच्या प्रश्नांची मराठीत उत्तरे देतो म्हणजे इतर वाचकांना समजणे सोपे होईल.
      मुद्दा १: अमित शाह निवडणुकीनंतर उद्धवजींची समजूत काढायला मातोश्रीवर का गेले नाही?
      उत्तर: स्वतः देवेन्द्रजींनी अनेकवेळा ठाकरेंना फोन केला पण त्यांनी उचलला नाही. अमित शहांकडून काही संदेश घेऊनच देवेन्द्रजी फोन करत असणार हे न कळण्याइतके उद्धवजी बुद्दू होते का? अटीशर्ती मान्य झाल्यावर अमित शाह आले असते. पण त्यासाठी आधी बंद दाराआड वाटाघाटी तर व्हायला हव्यात ना. थेट अमित शहा आले असते आणि वाटाघाटी बिनसल्या असत्या तर ते त्यांनासुद्धा कमीपणाचे वाटले असते ह्याचा विचार उद्धवजींनीही करायला हवा होता. बोलणी झाल्यावर फोटो काढायला अमित शहांना बोलवायचे होते. असो. आता तुमच्यासाठी प्रश्न. काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादीचा कोणता नेता उद्धवजींना भेटायला मातोश्रीवर गेला की ज्यामुळे उद्धवजींचा अहंगंड सुखावला? आदित्य सोनियाजींना दिल्लीत भेटला. शरद पवार बाळासाहेबांच्या निधनानंतर मागील महिन्यात पहिल्यांदाच मातोश्रीवर गेले. जर सोनियाजी, शरदजी मातोश्रीवर यावे असा उद्धवजींचा अट्टाहास नाही तर अमित शहांनी यावे असा त्यांचा व तुमचा हट्ट का? उत्तर नक्की द्या. भाग १...

      Delete
    3. मुद्दा २: देवेन्द्रजी out of focus का होते?
      उत्तर: देवेन्द्रजी out of focus होते असं तुम्हाला का वाटले? हे धादांत खोटे विधान आहे. भाजपच्या इतर नेत्यांप्रमाणे देवेन्द्रजीसुद्धा माध्यमांना सामोरे जात होते, मुलाखती देत होते. उलट उद्धवजीच गायब होते आणि सगळी सूत्रे संजय राऊत हलवत होते. कदाचित तुम्ही सोयीस्कररित्या विसरू शकता किंवा त्या काळात तुम्ही TV बघणं, वर्तमानपत्रे वाचणे सोडले असावे. उद्धवजी कुठल्याही नेत्याशी गाठीभेटी घेत नव्हते, माध्यमांना सामोरे जात नव्हते, संजय राऊत ट्विट्सचा व मुलाखतींचा रतीब घालत होते, संजयजी सिल्वर ओकवर चकरा मारायचे ते का ह्याचं उत्तर नक्की द्या.

      मुद्दा ३: भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला तेव्हा टीका का केली नाही?
      उत्तर: म्हणूनच मी म्हणालो की तुम्ही ह्या ब्लॉगवर नवखे आहात. भाऊंचे ह्याच ब्लॉगवरचे ऑक्टोबर-नोव्हेम्बर २०१४ चे लेख वाचा म्हणजे कळेल. एक उदाहरण म्हणून ही लिंक बघा.
      http://jagatapahara.blogspot.com/2014/11/blog-post_59.html
      असे अनेक लेख आहेत. त्यामुळे "so while writing being a writer you should have skills to think from both sides.." हे केवळ तुमच्या अज्ञानाचे बुडबुडे आहेत.

      आणि एक महत्वाचा वैयक्तिक सल्ला - तुमच्या इंग्रजी प्रतिक्रियेत अनेक व्याकरणाच्या चुका आहेत. त्यामुळे एकतर इंग्रजी सुधारा किंवा मराठीत प्रतिक्रिया द्या म्हणजे समजायला सोपे जाईल. संपूर्ण.

      Delete
  28. एकदम सुरेख विश्लेषण केले आहेत तुम्ही

    ReplyDelete