धमक्या धाकावरती चाले
सत्तेचे सरकार
जनता लोकशाही बेजार
गुन्ह्यागुन्ह्याचे रुप आगळे
शिक्षेचेही नियम वेगळे
पोलिस वकीलांनाही नकळे
न्याय मागता मिळते लाठी, गुंडाला अधिकार
जनता लोकशाही बेजार
तपास खटले चौकशी अटका
जुना कायदा तुटका फ़ुटका
जामीन मिळता होई सुटका
अन्यायाच्या अत्याचारा, नसे अंत ना पार
जनता लोकशाही बेजार
म्हणे कायदा धट्टाकट्टा
त्याच्या नावावरती बट्टा
कुत्रा ज्याच्या गळ्य़ात पट्टा
शेपूट त्याची त्याला ओढी, तो नुसता भुंकणार
जनता लोकशाही बेजार
No comments:
Post a Comment