Sunday, December 30, 2012

डोंबिवलीची विद्या पाटिल आठवत सुद्धा नाही ना?

डोंबिवलीची विद्या पाटिल आठवत सुद्धा नाही ना?

खुप जुनी? होय म्हटले तर खुप जुनीच गोष्ट आहे. कारण हल्ली संपादक पत्रकारांसह राजकारणी व अभ्यासकांनाही आठवड्यापुर्वीच्या गोष्टी आठवत नाहीत मग सतरा वर्षापुर्वीच्या घटनेला जुनीच म्हणायला नको का? जेव्हा ही दिल्लीची निर्भया किंवा दामिनी बहुधा सहा वर्षाची फ़्रॉक घालणारी बाहुलीशी खेळणारी बालिका असेल तेव्हाची गोष्ट आहे. आज जी मुले मुली रस्त्यावर उतरलीत, त्यांचे नुकतेच जन्म झाले असतील किंवा पाळण्य़ात हसत रडत असतील तेव्हाची. १९९५ सालातली. मी ‘आपला वार्ताहर’ दैनिकाचा संपादक होतो आणि तेव्हा अशाच नरकवासातून डोंबिवलीची विद्या नावाची मुलगी गेली होती आणि तेव्हाही मी असाच आक्रोश केला होता. ती अनेक जाणत्यांनाही भावनाविवश प्रतिक्रिया वाटली होती. आज सतरा वर्षानंतर तोच आक्रोश सर्व महानगरात, रस्त्यावर, देशभर आणि समाजाच्या सर्व थरात होताना दिसल्यावर माझा दावा खरा असल्याचा आनंद मानावा की किती उशीर केलात, म्हणून सर्वांना शिव्याशाप द्यावेत, तेच कळेनासे झाले आहे. ‘लोकसत्ता’ दैनिकात (३१/१२/२०१२) आज ‘पोरी, तुझं चुकलंच..!’ या शिर्षकाचा अग्रलेख छापून आलाय. म्हणून त्या जुन्या आठवणी चाळवल्या. डोंबीवलीच्या विद्या पाटिलची रडवी मुद्रा माझ्यासमोर उभी राहिली आणि तो खुप खुप जुना अंक शोधून काढला. त्या जुन्या अग्रलेखाचे कात्रण इथे छायाचित्र रुपाने देतो आहे. वाचायला थोडे त्रासदायकच आहे. पण आपल्याला तेवढेही कष्ट करायचे नसतील तर..................







No comments:

Post a Comment