Friday, November 30, 2018

सन्मान की अपमान

muttemwar rahul के लिए इमेज परिणाम

महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ कॉग्रेसनेते विलास मुत्तेमवार यांनी आपल्या पक्षाध्यक्षांना खुश करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निंदा करणे स्वाभाविक आहे. अन्यथा त्यांनी मोदी त्यांच्या जन्मदात्यांचा उद्धार करण्याचा आततायीपणा केला नसता. कुठल्या तरी एका सभेत त्यांनी मोदींना २०१४ पुर्वी कोण ओळखत होते? असा सवाल करून राहुल गांधींना कसे व कोणत्या कारणासाठी जग ओळखते, त्याची जंत्रीच सादर केली. आजही मोदी पंतप्रधान झालेले असले तरी त्यांच्या पित्याला कोणी ओळखत नाही, असा मुत्तेमवार यांचा दावा खराच आहे. फ़ार कशाला मोदींच्या अगदी जवळच्या नातलगांनाही कोणी फ़ारसे ओळखत नाही. त्यांची नावे काय व मोदींशी नाते कोणते, त्याचाही खुलासा शंभर भारतीयांना करता येणार नाही. कारण मोदींनी कधी आपल्या सार्वजनिक जीवनात कुटुंबियांना लुडबुडू दिलेले नाही. फ़ार दुरची गोष्ट सोडून द्या. देशात सत्तांतर घडवून मोदी भारताचे पंतप्रधान झाले, त्याचे श्रेय अवघ्या जगाने त्यांनाच दिले आहे. पण त्यात सहभागी व्हायलाही मोदींनी घरच्यांना साधे आमंत्रण दिले नाही. त्यांचा शपथविधी त्यांच्या आप्तस्वकीयांनी जगाप्रमाणेच दुरदर्शनच्या प्रसारणातूनच बघितला होता. अशा व्यक्तीच्या पित्याला जगाने ओळखण्याचे काहीही कारण उरत नाही. तशी त्याची इच्छाही नाही. एक सामान्य भारतीय नागरिक म्हणून मोदींनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला आणि आपल्या कुटुंबाला त्यापासून अलिप्त ठेवलेले आहे. पण ही गोष्ट भारतीय राजकारणात दुर्मिळ आहे. साध्या नगरसेवकापासून थेट पंतप्रधान पदापर्यंत एका व्यक्तीला सत्तापद मिळाले, की ती आयुष्याभर कुटुंबाची जागिर म्हणून जगण्याची या देशात पद्धतच आहे. पण तो मोदींचा दोष आहे की त्रुटी आहे? दोष असला तर नेहरूंनी घालून दिलेल आदर्श मोदी पाळत नाहीत हा म्हणावा लागेल.

सार्वजनिक जीवनात आल्यावर एकाने कर्तृत्व गाजवावे आणि त्याच्या कुटुंब आप्तस्वकीयांनी समाजाची संपत्ती आपली घरगुती मालमत्ता असल्याच्या मस्तीत जगावे, हा आदर्श भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंनीच घालून दिलेला नाही काय? त्या आदर्शाचे पालन नंतर त्यांच्या पक्षातल्या लहानमोठ्या नेत्यांनी व अन्य पक्षातूनही झालेले आहे. नरेंद्र मोदी त्याला अपवाद असतील, तर गोष्ट खटकणारीच आहे ना? कारण आजकाल आपला पिता आई वा पुर्वज कोण, यानुसार राजकीय पात्रता ठरत असते आणि मोदी त्यात बसणारे नाहीत. महाभारतातला कर्ण कोणा खास पुर्वजाचा वारस नव्हता, म्हणून हेटाळला जात होता. तशीच मोदींची परिस्थिती आहे. नाहीतर नेहरू गांधी खानदानाची कहाणी बघा. केवळ त्या घराण्यातल्या म्हणून विजयालक्ष्मी पंडित राज्यपालही होऊ शकल्या आणि चार पिढ्या पक्षाचे अध्यक्षपद जन्मसिद्ध असल्यासारखे पुढल्या वारसांना मिळत राहिलेले आहे. तसे नसते तर रॉबर्ट वाड्रा हे नाव कोणाला कशाला लक्षात राहिले असते? पण आज त्याही नावाचा बोलबाला आहे. विलास मुत्तेमवार एकवेळ आपल्या जन्मदात्याचे नाव विसरू शकतात, पण वाड्रा हे कोण त्यांना पक्के माहिती असावे लागते. नाहीतर त्यांना कॉग्रेसमध्ये स्थान असू शकत नाही. घराण्याची ही किमया असते. मात्र मुत्तेमवार यांना फ़िरोज गांधी हे नाव आठवणार नाही. त्यांनाच कशाला सोनियांनाही ते नाव किंवा त्याच्याशी असलेले नाते आठवत नाही. मध्यंतरी नॅशनल हेराल्ड दैनिकाच्या पैसा-मालमत्तेच्या हेराफ़ेरीचा खटला समोर आला, तेव्हा सोनियांनी चवताळून एक विधान केलेले होते. आपण कोणाला घाबरत नाही. कारण आपण इंदिराजींची सुन असल्याचे अभिमानाने सोनियाच म्हणाल्या होत्या. ते सत्यही आहे. पण सासू आठवणार्‍या सोनियांना सासरा मात्र आठवत नाही, की त्याचे स्मरणही करावे असे वाटत नाही.

फ़िरोज गांधी हे इंदिराजींचे पति होते आणि सोनियांच्या पतीचे पिताही होते. पण त्यांचे नाव कॉग्रेस पक्षात कोणी घेत नाही. मुत्तेमवारही ते नाव घेणार नाहीत. तरीही त्या खटल्याच्या वेळी ते नाव सोनियांना आठवायला हरकत नव्हती. कारण ज्या दैनिकाच्या मालमत्तेचा तो खटला आहे, त्या कंपनीचे पहिले कार्यकारी संचालक फ़िरोज गांधीच होते. पण सोनियांना आपला सासरा वा त्याचे नावही आठवत नाही. कारण सासरा असला म्हणून त्याने त्याच्या सासर्‍यालाही सोडलेले नव्हते. कुठल्या तरी भ्रष्टाचार मामल्यात फ़िरोज गांधी यांनी आपले सासरे व तात्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नाकी दम आणलेला होता. कुटुंबाची महत्ता सांगून सार्वजनिक पैशाचे अपहरण करण्याला आपल्या कुटुंबातही विरोध करणारा त्यांना कसा मानवणार ना? म्हणून सोनियांना सासरा आठवत नाही, की त्याचे नावही घ्यायची इच्छा नाही. मग मुत्तेमवारना तरी राजीव गांधींचे पिता कशाला आठवणार ना? राहुल गांधींचे पिता राजीव गांधी अशी आठवण मुत्तेमवार ठणकावून सांगतात आणि राहुलच्या आजीचेही नाव सांगतात. पण राहुलच्या पित्याच्या पित्याचे नाव मुत्तेमवारांनाही आठवत नाही. कशी गंमत आहे ना? एखादे कुटुंब प्रसिद्ध वा ख्यातकिर्त असले म्हणून त्यातील सगळ्याच कुटुंबियांची नावे जगाला माहिती असतात. तरी संबंधितांना सगळीच नावे आठवत नाहीत, की आठवूनही उच्चारता येत नसतात. अन्यथा मुत्तेमवारांनी जी वंशावळ त्या भाषणात वाचून दाखवली, त्यात फ़िरोज गांधी या नावाचा उल्लेख टाळला नसता. न जाणो ते नाव घेतले आणि सुनबाईंचा रोष झाला तर पडायच्या निवडणूकीचेही तिकीट नाकारले जायचे ना? त्यापेक्षा मुत्तेमवारांनी जीभ चावली आणि मनातल्या मनात फ़िरोज गांधी हे नाव यादीतून डिलीट करून टाकले. मात्र असे करताना त्यांनी खरेच राहुल गांधींचा गुणगौरव केला आहे, की या पक्षाध्यक्षाची निंदानालस्ती केली आहे?

वरकरणी बघितले तर मुत्तेमवार यांनी राहुलचे कौतुक करताना मोदींची टवाळी केली असे़च वाटेल. पण बारकाईने त्यांचे विधान लक्षात घेतले, तर त्यांनी नरेंद्र मोदींच्या कौतुकासाठी राहुल गांधींची नको तितकी बदनामी करून टाकलेली आहे. राहुलची ओळख त्यांनी काय करून दिली? तर त्यांचे पिता व पुर्वज ख्यातनाम होते, म्हणूनच आज राहुल गांधींना काही किंमत आहे. लोक राहुलना ओळखतात कारण त्यांच्यापाशी काही कर्तृत्व नसून पुर्वजांची पुण्याई एवढेच राहुलचे भांडवल आहे. नाहीतर नरेंद्र मोदींकडे बघा, हा माणूस शून्यातून स्वकर्तृत्वाने इतक्या उच्चपदावर पोहोचला आहे. असाच मुत्तेमवार यांच्या विधानाचा खरा अर्थ नाही काय? थोडक्यात पुर्वजांची अशी पुण्याई पाठीशी नसती वा राजीवचे पुत्र व इंदिराजींचे नातू नसते, तर राहुलना कोणा कुत्र्याही विचारले नसते. असाच त्या वक्तव्याचा अर्थ होत नाही काय? मग त्याला मोदींची निंदा म्हणायचे, की राहुलचे गुणगान म्हणायचे? ज्याला हवा तसा प्रत्येकाने अर्थ काढावा. पण तटस्थपणे बघितले तर तो मोदींचा गौरव आहे. ज्याच्या पित्याला कोणी ओळखत नाही असा सामान्य घरातला मुलगा, आपल्या मेहनत व कर्तृत्वाने पंतप्रधान पदापर्यंत पोहोचला, हा त्यातला आशय आहे. तो नक्कीच अपमानास्पद नाही. पण राहुल गांधींचे कौतुक मात्र प्रत्यक्षात त्यांची नालायकी सांगणारे आहे. पुर्वजांच्या पुण्याईने हा पोरगा इथपर्यंत पोहोचू शकला. मात्र वारशात मिळालेल्या मोठ्या अधिकार व पक्षाचे त्या दिवट्याने पुरते वाटोळे करून टाकले, असाच त्याचा दुसरा आशय नाही काय? नेहरूंपासून राजीवपर्यंत कर्तबगार पुर्वज नसते तर राहुल गांधींना कोणी ओळखले नसते. इतके महत्व मिळाले नस[ते, असेच मुत्तेमवार सहजगत्या म्हणून गेलेत आणि समोर बसलेल्या कोणा कॉग्रेसी गणंगांनी त्या शब्दांना आक्षेपही घेतलेला नाही. उलट पक्षाध्यक्षाच्या त्या हेटाळणीला टाळ्या वाजवून दाद मात्र दिली, आता बोला!

11 comments:

  1. नक्कीच भाऊ आपले म्हणणे अगदी तंतोतंत खरे आहे की ही राहुल गांधी ची निंदा च आहे पण हे लक्षात येण्याइतकी अक्कल जर त्याला असती तर नक्कीच जनते ने त्याचा PM पदासाठी नाही तरी एखाद्या खात्याचा मंत्री म्हणुन तरी स्वीकार केला असता .

    ReplyDelete
  2. भाउ ब्रेकिंग न्युज आता राहुल बोलत आहेत म्हनाले की आम्ही पण सर्जिकल स्ट्रािक केले पण पब्लिक केले नाहीत कारण सेनेच्या कक्षेत हस्तक्षेप करत नाहीत.मोदी इतके आगाउ की ते युपीमधे हरततायत बघुन ते पब्लिक केले.ठिकय.पुढच वाक्य मोदींना कळत नाही की सेनेची अधिकारकक्षा काय आहे सरकारची काय आहे.ते कनफ्युज झाले होते अशी एकामागुनएक परस्परविरोधी विधाने राहुलच करु जाणे

    ReplyDelete
  3. आता राजकारण हे गलिच्छ कारण झाले आहे.अत्यंत सवंग लोकप्रियता मिळाली कि धन्य वाटते.यात दुर्दैव असे आहे की समाज अशा घाणेरड्या राजकरणात बरबटून गेला आहे.समाजाची शाळा घेणे आवश्यक आहे.समंजस, सुसंस्कृत समाज होत नाही तो पर्यंत
    हे किडे वळवळत रहाणार.

    ReplyDelete
  4. Congress च्या कुठल्याही प्रकारच्या aggressive statements येत नाहीयेत अजून । Elections मध्ये पूर्ण सफाई झाल्याचं लक्षण तर नाही हे ? दिग्विजय सिंग नी already रडका सूर काढणं सुरू केलंय । Interesting !
    निकाल जाहीर व्हायच्या आधी तुमचं मत समजल्यास नक्कीच काही प्रबोधन होईल । 🙏

    ReplyDelete
  5. आजीच्या माहेरचं गोत्र स्वतःचं म्हणून सांगायचं पण जगातलं एकमेव उदाहरण असावं

    ReplyDelete
  6. नेहमी प्रमाणे निरपेक्ष, संयमित लिखाण!

    ReplyDelete
  7. अफलाााातून पोस्ट

    ReplyDelete
  8. Vvv good.and expressed in balanced words

    ReplyDelete