Saturday, August 26, 2017

पुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’?

who killed karkare के लिए चित्र परिणाम

सोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगावच्या बॉम्बस्फ़ोटाची आठवण झाली. कारण मागली नऊ वर्षे हे प्रकरण गाजते आहे. तसे बघितले तर स्फ़ोट होऊन त्यापेक्षा अधिक काळ गेलेला आहे. त्यात आधी इथल्या दहशतवाद विरोधी पथकाने अनेक मुस्लिम तरूणांची धरपकड केली होती आणि पुरावेही गोळा केलेले होते. पण जानेवारी २००८ मध्ये त्या पथकाच्या प्रमुखांची मुळात बदली करण्यात आली. रघुवंशी नावाचे अधिकारी जाऊन तिथे हेमंत करकरे यांना नेमण्यात आले. तोपर्यंत कोणी या विषयात मुस्लिम आरोपींच्या अटकेविषयी बोलत नव्हता. रितसर काम चालू होते आणि महाराष्ट्रातही राष्ट्रवादी-कॉग्रेसचे सरकार सत्तेत होते. त्यामुळे धरपकड झाली ती मुस्लिमांवर अन्यायकारक असल्याचा आरोप निदान या दोन्ही पक्षांना करता येणार नाही. पण दिड वर्ष उलटल्यावर अकस्मात जाणता नेता शरद पवार यांना त्यात अन्याय होत असल्याची चिंता वाटली आणि त्यांनी आपली चिंता पक्षाच्या एका चिंतन बैठकीत व्यक्त केली. तिथून मालेगाव स्फ़ोटाने भलतेच वळण घेतले. दरवेळी घातपात झाल्यावर एकाच धर्माचे लोक कशाला पकडले जातात? असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला आणि त्यातून करकरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाला या प्रकरणाचे नवे धागेदोरे सापडू लागले. काही महिन्यात करकरे यांनी एकूण तपासाची दिशाच बदलून टाकली आणि मालेगाव स्फ़ोटात हिंदू दहशतवादी लोकांचा हात असल्याचा शोध लावला गेला. आता आरोप केला म्हटल्यावर आरोपीही शोधणे भाग होते. त्यातून मग धरपकड सुरू झाली आणि त्यात भारतीय सेनादलातील अधिकार्‍यापासून हिंदूत्ववादी संघटनांच्या नेते कार्यकर्त्यांना करकरे ताब्यात घेत गेले. ही सगळी कार्यशैलीच शंकास्पद होती. किंबहूना तो एका मोठ्या कारस्थानाचा एक घटक होता.

करकरे यांनी कर्नल पुरोहित व साध्वी प्रज्ञासिंग अशा दोघांसह अनेकांना अटक केली आणि कुठल्याही पुराव्याशिवाय बेताल विधाने माध्यमांसमोर सुरू केली. मालेगाव येथील स्फ़ोट याच हिंदूत्ववादी लोकांनी घडवल्याचा आरोप चुकीचा असणे वा मोठे कारस्थान काय कुठले? तर याच दरम्यान देशभर कुठल्याही राष्ट्रप्रेमी, राष्ट्रभक्त किंवा शत्रू विरोधात खंबीरपणे उभ्या ठाकणार्‍या लोकांच्या विरोधातली एक मोहिम सुरू झाली होती. पुरोहित यांची अटक हा त्यातला एक छोटाचा भाग आहे. कुठलेही राष्ट्र ज्या तत्वावर किंवा श्रद्धेवर उभे रहाते, तोच पाया खणून काढला वा पोखरला तर त्याला जमिनदोस्त करायला फ़ारसे कष्ट पडत नाहीत. भारत नावाचा खंडप्राय देश आणि त्याच्या कोट्यवधी जनतेला कुठल्याही हत्याराशिवाय संपवायचे असेल, तर त्याचा पायाच उखडून टाकायचा, हे शत्रूचे कारस्थान असू शकते. युपीए नावावर कॉग्रेस किंवा सोनिया गांधींच्या हाती देशाची सत्ता केंद्रित झाल्यापासूनच्या शेकडो घटना, निर्णय वा कारवाया बघितल्या; तर तशी शंका घेण्यास वाव आहे. आपण जेव्हा पुरोहितांची अटक वा त्यांचा झालेला छळ बघतो, तेव्हा गुजरातमध्ये मारल्या गेलेल्या इशरत जहानच्या चकमकीसाठी तिथल्या अर्धा डझन ज्येष्ठ पोलिस अधिकार्‍यांना नेस्तनाबूत करण्याच्या मोहिमेला विसरून चालणार नाही. इशरत सोबत सोहराबुद्दीन ह्या माफ़िया गुन्हेगाराच्या चकमकीसाठी गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आणले गेलेले बालंट विसरून भागणार नाही. अगदी केंद्रीय गुप्तचर अधिकारी राजेंद्रकुमार व गृहखात्यातील अधिकार्‍याचा झालेला छळ नजरेआड करून चालणार नाही. यातली प्रत्येक कृती पाकिस्तानला वा देशाच्या शत्रूंना पुरक व देशहिताला बाधक ठरत गेली, हा निव्वळ योगायोग नसतो. त्यामागे काही कारस्थान असते. ज्यांनी कोणी पीटर राईटचे ‘स्पायकॅचर’ (Spycatcher) पुस्तक वाचलेले असेल, त्यांनाच मी काय म्हणतोय त्याचा अंदाज येऊ शकेल.

कर्नल, मेजर किंवा ब्रिगेडीयर, जनरल असे शब्द आपण नेहमी ऐकत असतो. त्यातला सैनिक वा अधिकारी आपल्या डोळ्यासमोर येतो. पण कर्नल पुरोहित हा हातात बंदुक घेऊन वा आणखी कुठले भेदक हत्यार घेऊन लढणारा सैनिक नव्हता, हे त्यामुळे लक्षात येत नाही. हा लष्करातला अधिकारी असला, तरी तो कुठल्या सीमेवर किंवा युद्धात लढणार्‍या सैनिकी तुकडीतला सेनानी नव्हता. पुरोहितांचे काम हे गुप्तचर विभागातले होते. अशी माणसे अतिशय जिवावर बेतणारी जबाबदारी उचलत असतात आणि चेहरे वेश बदलून वावरत असतात. त्यांची कमालीची राष्ट्रनिष्ठा व कुशलता तपासूनच त्यांना या विभागात आणले जात असते. त्यामुळे कर्नल हा शब्द आल्यावर या माणसाची नेमकी गुणवत्ता किंवा महत्ता लक्षात येऊ शकत नाही. त्यासाठी पीटर राईट समजून घ्यावा लागतो. पहिल्या महायुद्धानंतर राईटला ब्रिटीश सेनादलाच्या गुप्तचर विभागात समावून घेण्यात आलेले होते. ब्रिटीश गुप्तचर खात्यात एमआय ५ व ६ असे दोन विभाग आहेत. त्यांची कामे भिन्न आहेत. यातला एक विभाग आपल्या देशासाठी हेरगिरी करीत असतो आणि दुसरा विभाग त्या हेरांमध्ये कोणी परदेशी दलाल किंवा गद्दार असेल, तर त्यांना शोधून काढण्याचे काम करीत असतो. पीटर राईट एमआय ५ मध्ये कार्यरत होता आणि आपल्याच देशाच्या हेर व हस्तकांवर पाळत ठेवण्याचे काम करीत होता. तिथे अनेक अधिकारी व हेरांची प्रकरणे त्याच्याकडे यायची आणि तेव्हा सोवियत रशिया व पाश्चात्य देश यांच्यात राजकीय स्पर्धा होती. त्यामुळेच ब्रिटीश सत्तेला सोवियत धोका होता आणि रशियाला कोण फ़ुटलेला आहे, त्याचा शोध घेणे हे राईटचे मुख्य काम होते. त्याचा शोध घेताना त्याच्या हाती इतके मोठे घबाड लागले, की देशप्रेमाला जपण्यासाठी या व्यक्तीला आपलाच देश सोडून पळ काढावा लागला होता.

ब्रिटनसाठी हेरगिरी वा काम करणार्‍या अनेक अधिकार्‍यांमध्ये रशियाची दलाली करणारे सहभागी होते. अशापैकी कोणाविषयी संशय आला, मग त्याच्यावर पाळत ठेवायचे काम राईट करत होता. अशा संशयिताची माहिती जमा करत आणली, मग अकस्मात त्याच्याकडून हा विषय काढून घेतला गेला आणि दुसर्‍याच अधिकार्‍याची चौकशी करण्याचे काम त्याच्यावर सोपवले गेले. ते काम करत असताना अचानक बातमी आली, की अगोदर तपास केलेला गद्दार पळून रशियाला गेला. नंतर तसेच तीनचार बाबतीत झाले. त्यांच्या गद्दारीचा तपास राईट नेमका करीत होता आणि त्याचा तपास काही निष्कर्ष काढण्यापर्यंत आला, मग त्या व्यक्तीचे प्रकरण राईट याच्याकडून काढून घेतले जायचे. एकेदिवशी संबंधित व्यक्ती ब्रिटनहून पळून रशियात गेलेला असायचा. तेव्हा राईटला वेगळाच संशय आला आणि त्याने परस्पर एक शोध घेण्याचे काम सुरू्केले. कुणालाही कसला संशय येणार नाही, अशारितीने राई्ट एका बड्या व्यक्तीचा तपास करू लागला आणि माहिती गोळा करू लागला. जसजशी माहिती जमत गेली तसतशी राईटला खात्री पटली की ब्रिटिश गुप्तचर खातेच रशियामधून चालविले जात आहे. सुरक्षेच्या या सर्वात महत्वाच्या यंत्रणेलाच रशियन हस्तकांनी गिळंकृत केलेले आहे. त्याविषयी खात्री पटण्यासारखे पुरावे जमल्यावर राईट थेट पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांना गुपचूप जाऊन भेटला आणि त्यांच्या समोर सर्व पुरावे ठेवले. ते अभ्यासले तर सहज लक्षात येते की एमआय ६ या ब्रिटीश हेरखात्याचा प्रमुखच सोवियत हस्तक असतो. त्या माहितीने विल्सनही गडबडून गेले आणि राईटला ते रहस्य गोपनीय ठेवायचा सल्ला त्यांनी दिला. राईट इतक्या कनिष्ठ पातळीवरचा अधिकारी होता की त्याविषयी गवगवा करण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. तो निमूट असे पुरावे आणि तपशील कुणाच्याही नकळत गोळा करून घरी नेवून लपवून ठेवत राहिला.

यथावकाश म्हणजे १९७०-८० च्या दशकात आपली सरकारी सेवा संपवून राईट निवृत्त झाला. त्यानंतर त्याने देश सोडून ऑस्ट्रेलियात आश्रत घेतला. तिथे बसून त्याने आपण जमवलेल्या सर्व माहितीची संगतवार मांडणी करून ते पुस्तकरुपाने ग्रथित केले. तेच ‘स्पायकॅचर’ म्हणून जगभर गाजलेले पुस्तक आहे. त्याचा आशय इतकाच आहे, की अवघा ब्रिटन त्या काळात सोवियत हेरांच्या इशार्‍यावर चालविला जात होता. त्यात ब्रिटिश हितसंबंधांपेक्षा सोवियत हित जपले जात होते आणि संपुर्ण ब्रिटीश सत्ता सोवियत हेरांच्या तालावर नाचवली जात होती. देशाचा घात करणारे उजळमाथ्याने मिरवत होते आणि देशप्रेमी असलेल्यांची रितसर गळचेपी चाललेली होती. खुद्द राईट त्यापैकी एक देशप्रेमी होता आणि हाती असलेली माहिती उघड केल्यास आपला जीवही धोक्यात असल्याची त्याला खात्री होती. म्हणूनच पंतप्रधान विल्सन यांच्या सल्ल्यानुसार त्याने तेव्हा गप्प बसणे पसंत केले. अन्यथा त्याचाही परस्पर कोणी काटा काढला असता, ते त्यालाही उमजले नसते. कर्नल हा देखील असा भारतीय सेनादल व सरकारच्या रचनेतील एक किरकोळ अधिकारी असतो. पुरोहित कर्नल पदावर होते, म्हणजेच भारतीय सेनादलातील त्यांचा अधिकार किती मर्यादित आहे त्याची आपल्याला कल्पना यावी. पण या माणसाने आपल्या लष्करी गुप्तचर विभागातील कामगिरीत मिळवलेली माहिती भयंकर आहे. किंबहूना असणार आहे. त्याने गोळा केलेली माहिती दाऊद, नक्षलवादी, जिहादी, दहशतवादी, त्यांचे भारतातील विविध उच्चपदस्थ व राजकारण्यांशी असलेले संबंध, खोट्या नोटा व चलन अशा संबंधातली असून; असा माणूस युपीएच्या काळात अनेक बड्या लोकांना धोका वाटला असेल, तर नवल नाही. पुरोहित हे अशाच कामगिरीवर होते आणि त्यांनी समाजात उजळमाथ्याने वावरणार्‍या अनेकांचे मुखवटे बुरखे फ़ाडणारी माहिती गोळा केलेली होती.

पुरोहित यांच्या प्रकरणकडे वळण्यापुर्वी ह्या राईटचे पुढे काय झाले, ते आपण समजून घेतले पाहिजे. राईटचे पुस्तक पुर्ण झाले व त्याचे प्रकाशन होत असल्याची वार्ता आल्यावर ब्रिटीश सरकार भेदरून गेलेले होते. अर्थात ते त्याला हात लावू शकत नव्हते. कारण तो दूर ऑस्ट्रेलियात जाऊन स्थायिक झाला होता. पण तात्काळ ब्रिटीश सरकारने त्याच्या पुस्तकावर बंदी घातली. तितकेच नाही तर त्या पुस्तकाविषयी बीबीसी या माध्यमसमुहाने कार्यक्रम सादर केला, तर मार्गारेट थॅचर या पंतप्रधानांच्या आदेशावरून त्या माध्यमाच्या कार्यालयावर धाडी व छापे घालण्यात आले होते. सत्तेतले लोक आपल्या मुखवट्यांना जपण्यासाठी किती टोकाला जाऊ शकतात, त्याचे हे उदाहरण आहे. ही फ़ार जुनी नव्हेतर १९८५ सालातली गोष्ट आहे. एकदा राईटची अवस्था समजून घेतली, तर युपीए सरकारला पुरोहित हा धोका कशाला वाटला व त्याला गोत्यात घालण्याचे भयंकर कारस्थान कशाला शिजले असेल, त्याचा अंदाज येऊ शकतो. पुरोहितना जामिन मिळाल्यानंतर त्यांच्याशी थेट संवाद न्युज एक्स या वाहिनीने साधला होता. त्यात पुरोहितांनी आपण कोणकोणती माहिती गोळा केली? आपण कुठल्या कोणत्या घातपाती संघटनेत घुसखोरी केली होती? आपण जमवलेली माहिती व त्याचे अनेक तपशील वेळोवेळी कसे वरिष्ठांना पाठवत होतो, त्याची त्रोटक माहिती दिली आहे. ज्यांना हिंमत असेल त्यांनी कागदोपत्री असलेले हे तपशील तपासून घ्यावे किंवा जाहिर करावे, असेही पुरोहित यांनी त्या संवादात आव्हान दिलेले आहे. पण त्या सूचक मुलाखतीतून एक गोष्ट साफ़ होते, की पुरोहित हा युपीए कालखंडातील अनेक वजनदार अधिकारी व राज्यकर्त्यांसाठी गळफ़ास झालेला होता. सहाजिकच त्यांचे मुखवटे व प्रतिष्ठा पुरोहितांच्या बोलण्याने पुरती उध्वस्त होण्याचा धोका निर्माण झालेला होता. तो कसा संपवायचा?  

पुरोहित हे लष्करी गुप्तचर विभागात काम करत होते. त्यात काश्मिरी घातपाती, मुजाहिदीन, तोयबा, पाकिस्तानी हस्तक, त्यांच्याकडून लाभ उठवणारे नेते राज्यकर्ते, त्यांना पाठीशी घालणारे लब्धप्रतिष्ठीत भारतीय, त्यांच्या हालचाली व कृत्ये यांची माहिती गोळा करण्याचे काम पुरोहित यांच्याकडे होते. त्यांचे वरिष्ठ म्हणून दहा वर्षे काम केलेले हसमुख पटेल यांनी पुरोहितांच्या देशनिष्ठेची ग्वाही दिलेली आहे. पण देशनिष्ठा आणि सत्तानिष्ठा यात फ़रक असतो. सत्तेत आज कोणी नेता किंवा पक्ष असेल आणि उद्या दुसरा नेता पक्ष असेल. देश ही कायमची स्थायी बाब असते. म्हणूनच पुरोहित कुठल्या राजकीय निष्ठेने काम करत नव्हते वा माहिती गोळा करत नव्हते. ती कॉग्रेस वा भाजपाला हानीकारक वा काभदायक ठरण्याशी त्यांना कर्तव्य नव्हते. तर देशहिताला उपयुक्त ठरेल अशी माहिती जमा करून वरीष्ठ असतील, त्यांना पोहोचती करण्याचे त्यांनी सातत्य दाखवले होते. म्हणून तर मालेगावचा आरोप झाल्यावर पुरोहित यांना हेमंत करकरे यांनी अटक केली. त्यानंतर त्याविषयी सेनादलाने चौकशी नेमली होती आणि त्यात बहुतांश सहकारी व वरीष्ठांनी पुरोहितांच्या कामाविषयी निर्विवाद चांगले मत व्यक्त केलेले आहे. जवळपास सर्व साक्षीदारांनी त्यांचे कौतुक केलेले आहे. पण हे चौकशीचे कागदपत्र कोर्टापर्यंत पोहोचण्यात सात वर्षे गेलेली आहेत. २००९ सालातल्या या चौकशीचा अहवाल आपल्याला मिळावा, म्हणून पुरोहितांची पत्नी जंग जंग पछाडत होती. पण ते तिला मिळू देण्यात आले नाहीत. युपीए तब्बल पाच वर्षे सत्तेत असताना अपर्णा पुरोहित यांच्या तशा अर्जाला धुळ खात पडावे लागले. अखेरीस देशात सत्तांतर झाले आणि काही महिन्यात तात्कालीन संरक्षणमंत्री पर्रीकर यांच्या आदेशानुसार या अहवालाची प्रत अपर्णाच्या हाती पडली. त्याच आधारे आता पुरोहित यांना जामिन मिळू शकला आहे.

या देशात कसाबला नरसंहार करताना जगाने बघितले आहे. तरी त्यालाही न्याय मिळवण्यासाठी भारत सरकारने सर्वप्रकारची मदत केलेली होती. पण तेच भारत सरकार आपल्याच एका अधिकार्‍याला न्याय नाकारण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावताना दिसलेले आहे. पुरोहितना सेनादलाच्या चौकशीचा अहवाल नाकारण्यात आला. कारण ते बाहेर आल्यास अनेकांच्या भानगडी चव्हाट्यावर येण्याची भिती होती. ज्यांनी त्यांना विनाकारण देशाप्रेमाची व कर्तव्यनिष्ठेसाठी गजाआड टाकलेले होते, त्यांना हा माणूस धोका वाटत असल्याचा आणखी काय पुरावा पाहिजे? जी कागदपत्रे पर्रीकर देऊ शकले, ती आधीच्या युपीए संरक्षणमंत्र्यांनी कशाला रोखून धरली होती? त्याचे कारण उघड आहे, सत्य दडपायचे होते आणि सत्तेत बसलेलेच देशबुडवे होते. पुरोहित बोलू लागले व स्वत:च्या बचावासाठी सत्यकथन कोर्टातच करू लागले, तर अनेकांचे मुखवटे फ़ाटणार होते. मुद्दा असा, की राईटला त्याची कल्पना आलेली होती. पुरोहित यांना आपल्याच वरीष्ठांकडून दगाफ़टका होईल याची सुतराम कपना नव्हती. जे अहवाल व माहिती पुरोहित वरीष्ठांना पाठवर होते, ती माहिती राज्यकर्ते व संबंधितांना मिळाली आणि त्यांनीच या माणसाचा आवाज कायमच्या दडपून टाकण्याचा निर्णय घेतला असणार. त्यातून मग पुढल्या घडामोडी घडत गेलेल्या आहेत. त्यात कारस्थान आहे, तसेच राजकारण आहे. एका बाजूला इस्लामी दहशतीला आश्रय द्यायचा आणि दुसरीकडे त्याचे खापर हिंदू संघटनांवर फ़ोडायचे. जिहादी हिंसेला खतपाणी घालून भारतीय लष्कर व गुप्तचर खात्याचे खच्चीकरण करायचे, असा डाव कोणीही शत्रूचा हस्तकच करू शकतो. भारत सरकार या दहा वर्षात जणू पाकिस्तानसाठी निर्णय घेत होते आणि शत्रूच्या हाती कोलित देत भारताला खच्ची करत होते. त्याचा बोभाटा करू शकणारा पुरोहित नावाचा माणूस म्हणूनच युपीएला भयंकर दहशतवादी वाटल्यास नवल नाही.

याच दरम्यान इशरत प्रकरणात गुजरातचे चकमक स्पेशालिस्ट तुरूंगात धाडले गेले. मुंबई महाराष्ट्रातले सचिन वाजे, दया नायक अशा लोकांना निलंबित करण्यात आले. गुप्तचर खात्याचे वरीष्ठ अधिकारी राजेंद्रकुमार यांच्यामागे ससेमिरा लावण्यात आला. सोहराबुद्धीन या माफ़ियाचे उदात्तीकरण करण्यात आले. इशरताला बिहारकी बेटी म्हणून गौरवण्यात आले. काश्मिरात अशाच पद्धतीने पाक हस्तकांची माहिती काढून त्यांचा बिमोड करणारी टीएसडी नामक खास यंत्रणा उभारली, म्हणून तेव्हाचे लष्करप्रमुख व्ही. के सिंग यांना बदनाम करण्याच्या मोहिमा उघडण्यात आल्या. सिंग यांनी तर मीरत येथील छावणीतून फ़ौजेला राजधानी दिल्लीत कुच करण्याचे आदेश दिल्याच्या अफ़वाही पसरवल्या गेल्या. इशान्येकडे वा काश्मिरात शांतता प्रस्थापित करण्यात गुंतलेल्या भारतीय सैनिकांवर बेछूट बलात्काराचे आरोप करण्याचे जोरदार सत्र सुरू झालेले होते. अशाच पार्श्वभूमीवर मुंबईत थेट येऊन पोहोचलेल्या कसाब टोळीने नरसंहार घडवला. त्यांच्या नियोजनात मारेकरी हिंदू दिसावेत अशी पुर्ण सज्जता केल्याची साक्ष डेव्हीड हेडली यानेही दिलेली आहे. म्हणजेच पुरोहितना अटक करून सुरू झालेल्या हिंदू दहशतवाचा क्लायमेक्स मुंबई हल्ल हिंदू अतिरेक्यांचा ठरवण्याची पुर्ण तयारी झालेली होती. ती तयारी कुठपर्यंत बारकाव्यानिशी सज्ज असेल? हा मुंबई हल्ला झाल्यावर त्याचे खापर हिंदू दहशतवादावर ठेवणारे पुस्तकही जणू लिहून तयार होते. कसाबचा खटलाही संपला नाही, की त्या हत्याकांडाची चौकशीही पुर्ण झालेली नव्हती, इतक्यात काही महिन्यांनी मुश्रिफ़ या माजी पोलिस अधिकार्‍याने ‘हु किल्ड करकरे’ नावाचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. त्यात त्यांनी करकरे यांच्या हत्येचा आरोप भारतीय गुप्तचर खात्यावर करताना, ते खातेही हिंदूत्ववादी असल्याचा आरोप केलेला आहे. हे सर्व कसे पटकथा लिहील्यासारखे पार पडत गेलेले नाही काय?

भारतीय समाजाच्या अभिमानाची प्रतिके, भारतीय सुरक्षा व्यवस्था, भारतीय गुप्तचर यंत्रणा, पोलिस यंत्रणा, भारतीय राष्ट्रवाद अशा प्रत्येक पायाला खणून काढण्याचे भयंकर षडयंत्रच या युपीएच्या कालखंडात राबवले जात होते. त्यासाठी इशरतचे उदात्तीकरण करून वविष्ठ पोलिस अधिकार्‍यांना गुप्तचरांना त्या खोट्या गुन्ह्यात गोवणे आणि त्यासाठी थेट गृहमंत्री व अन्य राज्यकर्त्यांनी कागदपत्रात खडाखोड करणे, असा सपाटा लावलेला होता. २०१४ च्या जानेवारी महिन्यात तात्कालीन गृहमंत्री सुशीलकुमर शिंदे यांनी रा. स्व. संघाच्या शाखेवर दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जात असल्याचा बेताल आरोप कॉग्रेस अधिवेशनात केलेला आठवतो? तात्काळ पाकच्या तोयबा संघटनेचा प्रमुख हफ़ीज सईद याने शिंदे यांचे अभिनदन ट्वीटरवर केलेले होते. या सगळ्या गोष्टी सहजासहजी घडल्या असे कोणाला म्हणायचे आहे काय? यात सर्वात महत्वाचा दुवा होते कर्नल पुरोहित! कारण या माणसाने गुप्तचर म्हणून काम करताना अनेक बड्याबड्या लोकांचे खरे चेहरे हुडकून काढलेले होते. त्यांचे देशाच्या शत्रूशी असलेले धागेदोरे शोधलेले होते. देशाचा विध्वंस करण्याच्या कारस्थानाचीच माहिती ज्याच्यापाशी आहे, तो तशा हितशत्रू गद्दारांना संकट वाटला, तर नवल नाही. अकस्मात पुरोहित यांना हिंदू दहशतवादी ठरवून करकरे यांनी अटक केलेली नव्हती. त्यांना तसे करण्यास भाग पाडलेले होते. ज्या दिवशी कसाबची टोळी मुंबईत आली, त्याचपुर्वी काही तास करकरे महाराष्ट्राचे तेव्हाचे गृहमंत्री आबा पाटील यांना भेटायला गेलेले होते. ते दोघेही आज हयात नसल्याने त्यांच्यात झालेला संवाद रहस्य आहे. पण करकरे आपली जबाबदारी संपवावी, असा आग्रह धरायला गेलेले असाही प्रवाद आहे. आपल्यावर नको तितका दबाव आणून पापकर्म करून घेतले जात असल्याचा पश्चात्ताप त्याचे कारण असेल काय?

करकरे त्या कसाब टोळीच्या हल्ल्यात मारले गेले. एकटेच नाही तर दोन अन्य वरीष्ठ अधिकारी सोबत असताना आझाद मैदानानजिक करकरे यांची हत्या झाली. पण त्यांच्या एकटयाच्याच हत्येविषयी माजी पोलिस अधिकारी मुश्रिफ़ शंका घेतात व विचारतात, हु किल्ड करकरे? त्या शीर्षकाचे पुस्तकही लिहीतात. पण अशोक कामटे वा विजय साळसकर या दोन अधिकार्‍यांच्या तिथेच झालेल्या हत्येविषयी मुश्रिफ़ मौन धारण करतात. कसाबचा आडोसा घेऊन भारतीय गुप्तचर खात्यानेच करकरेंचा खुन पाडला, असा त्या पुस्तकातला मुश्रिफ़ांचा आरोप आहे. पण सगळ्या गोष्टी वा कोड्याचे तुकडे एकत्र मांडले, तर करकरे यांनाही ठार मारण्याचे कारस्थान पुरोहितना गोत्यात घालणार्‍यांचेच असण्याची दाट शक्यता दिसते. एका बाजूला करकरे यांना हुत्तात्मा म्हणून उदात्तीकरण करायचे. पण एकूण कारस्थानाचा करकरे उद्या बोभाटा करतील, म्हणून त्यांचा आवाज कायमचा बंद करण्याचाच त्यात हेतू नाकारता येतो काय? गुप्तचर म्हणून पुरोहितांना भारतीय सेनादल, म्हणजे पर्यायाने भारत सरकार सर्व उद्योग करायला सांगत होते आणि त्यातून माहिती हाती आली ती राज्यकर्त्यांवर उलटणार असल्यानेच पुरोहित यांचा बळी घेण्य़ाचा प्रयास झालेला आहे. तशीच करकरे यांची कहाणी असू शकते. ते बोलले तर हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा करणार्‍या अनेकांच्या भानगडी चव्हट्यावर येण्याचा धोका होता. म्हणून करकरेंच्या नावाने सतत गळा काढणार्‍यांनीच त्यांना मारलेले असू शकते. अन्यथा हे इतके तीन चतूर कुशल कर्तव्यदक्ष अधिकारी बळीचा बकरा झाल्यासारखे २६/११ हल्ल्यामध्ये हकनाक मारले गेलेच नसते. म्हणून पुरोहित सुटल्यावर आता एक प्रश्न गंभीरपणे विचारणे भाग आहे. करकरेंना कोणी मारले? सत्य मारणारे कोण आहेत? दडपणारे कोण आहेत? हे किती देशव्यापी भयंकर कारस्थान आहे? हु किल्ड खरेखुरे?


39 comments:

 1. khar kay aahe te baher aale pahije.. Dusarya bajune vichar karayala lavnara lekh lihilat , dhanyawad !!!

  ReplyDelete
 2. भाऊ आपण टाकलेला प्रकाश आणि वास्तव परिस्थिती यात तथ्य आहेच. शिवाय आपण व्यक्त केलेली चिंता आणि शंका हीसुद्धा रास्तच आहे.

  ReplyDelete
 3. Bhau ekdam chhan lekh...!!
  Satya baher yeil ka??aalech tar kiti diwas waat pahavi lagel

  ReplyDelete
 4. एक प्रश्न असा की जर त्या देशद्रोह्यांना कर्नल पुरोहितांची भिती वाटली असेल किंवा त्यांच्यापासून धोका जाणवला असेल तर त्यांनी पुरोहितांना जिवंतच का ठेवले असावे? हे लोक जर मोठ-मोठ्या सत्ता-स्थानांवर होते तर त्यांना एका अधिकाऱ्याला जीवानिशी संपवून त्याचा काटा काढणे फार अवघड नसावे...

  कृपया विवेचन करावे...

  ReplyDelete
  Replies
  1. मग 'हिंदू दहशतवादाचा' बागुलबुवा पण मेला असता ना !

   Delete
  2. Kasab jivant hati laglyamule sagla plan fail jhala.

   Delete
  3. Nice Point. Completely agree.

   Delete
  4. पुराेहितांजवळ असलेले पुरावे मिळाले नसते...

   Delete
 5. भाऊ, मला देखील हिच शंका आली होती आणि हे मी जानेवारी २०११ च्या माझ्या ब्लॉग पोस्टमधे लिहीलेलं होतं. पुरोहित आणि साध्वीच्या सुटकेने त्याची सत्यताच प्रत्ययास आली. जानेवारी २०११ मधे "टु द लास्ट बुलेट" हे श्रीमती कामटे यांनी लिहीलेलं पुस्तक माझ्या वाचनात आलं होतं. त्यात श्रीमती कामटे यांनी तत्कालिन पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी कंत्रोल रूममधे बसून करकरे, कामटे आणि साळस्कर यांना दहशतवादी नेमके कुठे लपले आहेत याची कशी चुकीची माहिती वायरलेस वरून पुरवली हे त्यावेळच्या वायरलेस संभाषणाच्या आधारे (हे संभाषण माहिती अधिकारा अंतर्गत मिळवले होते) सिद्ध करून दाखवले आहे त्याचप्रमाणे हे तिघेही अधिकारी जखमी अवस्थेत पोलीसांच्याच जीप मधे असताना त्यांना ओलांडून पोलीसांची पेट्रोलींग व्हॅन कशी गेली हे देखील सांगीतले. त्यामुळे हे एक कारस्थानच होते हे सत्य आहेच. आता फक्त हे सगळे कधी बाहेर येईल त्याची वाट पहावी लागेल.

  ReplyDelete
 6. भाऊ, ह्या लेखातील शेवटची ओळ वाचतांना अक्षरशः दोन्ही डोळे अश्रूंनी भरले आहेत...!
  खरच जर हे असं झालं असेल तर हे फार भयानक आहे...फार भयानक!
  सुचत नाहीये काही...मन सुन्न झालंय

  ReplyDelete
 7. 2008 मध्ये मालेगाव बॉम्बब्लास्ट झालेत...आणि 2009 मध्ये UPA 2 पुन्हा सत्तेत आली... हा निव्वळ योगायोग आहे का?
  2009 मध्ये भाजपाने हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवण्याची तयारी केली होती...
  आणि अचानक एक नवीन मुद्दा देशासमोर येतो "भगवा दहशतवाद"
  हा नक्कीच योगायोग आहे नाही का??

  ReplyDelete
 8. हे UPA वाले किती नालायक होते
  हि लिंक खरंच वाचा सर्वांनी

  http://www.manushi.in/articles.php?articleId=1803#.WaHJpKlX7qD

  सगळे डिटेल्स मिळतील केस बद्दल
  करकरे ला खरंच शाहिद म्हणावा का???

  ReplyDelete
  Replies
  1. What a revelation. An eye opener.

   Delete
  2. वीर म्हणता येईल शहीद म्हणण्याचे काही कारण नाही
   शहीद तुकराम ओबळे आहेत.

   Delete
 9. Satya kharach kadhi baher yeil ka ?
  Modi Sarkar aaj teen varsh sattet aahe pan sarv prashn ji aadhi hoti ti tashich aahet. Aamhala khup Aasha hoti aani aahe hya Sarkarkadhun pan action hotana far kami disnyat yet aahe. Sarv Badi Dhenda tashich mokali firat aahe. Sarv brasht rajkarani taschich mokali firat aahet

  ReplyDelete
 10. मुश्रीफ हे मुंबई हल्ल्याच्या व मालेगाव बॉम्ब स्फोटाच्या तपासात सहभागी होते काय ??

  ReplyDelete
 11. http://m.hindustantimes.com/mumbai/raghuvanshi-had-a-rocky-ride-as-ats-chief/story-0JNiAuvpLfHfZvJSWUkFEP.html

  ReplyDelete
 12. काटा आला अंगावर वाचताना . आम्ही सामान्य माणसं अगदीच अनभिज्ञ असतो या सर्व बद्दल . खूप डिटेलिंग केलात सर . धन्यवाद

  ReplyDelete
 13. खूप छान सर्व लिंक एकदम चपळख बसतात भाऊ

  ReplyDelete
 14. हे सर्व फार भयानक आहे. सर्व गोष्टी सत्याच वाटतं आहेत. 2 मिनिट विचार केला की यातील 25 टक्के गोष्टीच खऱ्या आहेत आणि तया याआपण सिद्ध करु शकलो तरी किती भयानक ववास्तव सामोरे यईल.
  शरम वाटली पपाहिजे अश्या लोकांना, बाकी भाऊ तुमचा लेख अप्रतिम

  ReplyDelete
 15. भाऊ, सर्व कारस्थानाचा सर्वोच्च बिंदू - जे २६/११ ला घडले - त्यात तुकाराम ओम्बलेंकडून कसाब जिवंत पकडला गेला नसता तर ... कारण सर्व दहशतवादी लाल गंडा बांधून आले होते व खोटी ओळखपत्रे जी हिंदू व्यक्ती असल्याचा निर्वाळा देत होती... तर (तथाकथित) हिंदू दहशतवाद भारतीय जनमानसात इतका ठसला असता व जगभर हिंदूंना नाहक बदनाम केले गेले असते! असो.
  खरंच या भारत भूमीवर ईश्वराची इतकी कृपादृष्टी आहे की, भारतीयांचा पूर्ण कणा मोडू शकला नाही. व साध्वी, कर्नल पुरोहित यासारख्या व्यक्ती अनन्वित छळाला तोंड देऊन पुरून उरल्या - सत्य बाहेर आणण्यासाठी.

  सत्य काय हे खरेच बाहेर यायला हवे. पण करकरे हे राजकीय दबावाला बळी पडले व हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा रचण्यात त्यांचा हातभार लागला हे तरी नाकारता येणार नाही. फक्त ते खरेच त्या रौरव पापातून बाहेर येण्याची धडपड करत होते का हे येणाऱ्या काळातच समजू शकेल.

  हसन मुश्रीफ व पोलीस वरिष्ठ अधिकारी कृष्णप्रकाश (सांगलीत यांनी संभाजी भिडे या पूजनीय अशा वयोवृद्धावर अमानुष लाठीमार केला, अफझलखानाचा वध देखावा निमित्ताने धर्मांधांनी केलेल्या दंगलीत हिंदूंवरच जास्त अत्त्याचार केले व केसीस टाकल्या) हे दोघेही रझा अकादमीच्या मुंबईतील आझाद मैदानावरील रॅलीला उपस्थित होते - ज्यात अमर सैनिक ज्योतीची व महिला पोलिसांची विटंबना केली गेली व इतर हिंसाचार झाला होता. यातच त्यांची लायकी कळून येते.
  अजूनही त्या दंगलीची नुकसान भरपाई रझा अकादमीने केलेली नाहीय.

  आपल्याकडे विशेषतः ज्याची सत्याची बाजू असते त्याला न्याय मिळता मिळत नाही व मिळालाच तर अत्यंत विलंबाने. बारा भानगडी असलेल्या गावचे थोर(?)असे की ज्यांचे पंतप्रधान मोदीही 'कवतुक' करतात त्यांचा तरी न्याय याच जन्मी नियती होऊ देईल का व मुखवटा पूर्णपणे टराटरा फाटला जाईल का?

  ReplyDelete
 16. हे खूप भयानक सत्य आहे खरच मनापासुन आभार भाऊ अशी माहिती आमच्या पर्यंत पोहोचवली त्याबद्दल.

  ReplyDelete
 17. ईशरतजहाँ प्रकरणात 10-12 कर्तव्यदक्ष अधिका-यांना कित्येक वर्षे अडकविले.प्रज्ञा साध्वीला ही अडकविले...आता ती बोलयला लागली तर आपलेच गळा काढीत आहेत

  ReplyDelete
 18. मानल बुवा सर तुम्हाला....पण मला एक समजत नाही प्रत्येकवेळी जेव्हा जेव्हा खास करून रेल्वेमध्ये बॉम्बब्लास्ट झालेत सामन्य वृत्तपत्रांमध्ये मुस्लीम नावच का आलीत ?? म्हणजे मला म्हणायचंय इतकच कि त्यातले आरोपी पण पळून गेलेलेच होते ना मग त्याचवेळी हिंदू नावे का जाहीर झाली नाहीत?? म्हणजे हिंदू दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न या तुमच्या म्हणण्याला जरा अजून जास्त ताकत मिळाली असती. सर माझ वय कमी आहे पण आंबेडकरांनी एकच सांगितली 'शिका , संघर्ष करा संघटीत व्हा.'

  ReplyDelete
 19. भाऊ दोनच प्रश्नांची उत्तरे द्या.जर हे तथाकथित देशद्रोही लोक कसाब ला सांगून कारकरेंचा आवाज बंद करू शकतात तर तेच पुरोहितांचा बाबतीत ही करू शकत होते.दुसर असा की जर पुरोहित बाहेर आल्यावर यांच पितळ उघडे होण्याची भीती होती म्हणता मग आता ते बाहेर आल्यावर का देशद्रोही कृत्यांची माहिती देत नाहीत.तुमचा म्हणण्यानुसार ते कट्टर राष्ट्रभक्त आहेत आणि आताच सरकार ही देशभक्त च चालवतात तर तथाकथित देशद्रोह्यांचा भांडाफोड करावा ना.भाऊ तुम्ही एके दिवशी नक्की करकरेंना देशद्रोही ठरवणार.साध्वी आता बोलल्या तुम्ही थोडा वेळ घ्याल एवढंच काय तो फरक

  ReplyDelete
 20. खरच किती भयानक गोष्ट आहे. सत्य बाहेर यायला पाहिजे.आणि या देश द्रोह्यांना फांसी ऐवजी कडेलोट करावं.कारण फांसी देताना प्राण लवकर जातो.

  ReplyDelete
 21. भाऊ या व्यापक विषयावर आपणाकडून एक पुस्तक लिहिले जाईल अशी अपेक्षा करतो, खूपच चिंतनीय विषय आहे। तेवढाच गूढ पण आहे

  ReplyDelete
 22. फार योग्य विवेचन.शरद पवार, सुशिलकुमार शिंदे, कसाबची अटक,नंतरचा वेळकाढूपणा, याकूब मेननला फाशी नको म्हणून सुप्रीम कोर्टात रात्री जाणे इ पुरावे युपीए च्या कारवाया दाखवतात

  ReplyDelete
 23. नेहरु,गांधी हे मुस्लिम धार्जिणे वा मुस्लिमच,बॅ.जिना हे कन्व्हर्टेड मुस्लिम म्हणून त्यांना पुढे न येऊ देता भारताची सत्ता नेहरूंच्या घश्यात घातली गेली.पुढे ६०-६५ वर्षे हिंदूंना झुलवत ठेवले.महाराष्ट्रातील मराठा लॉबी खुर्चीसाठी त्यांना चिकटली. नथूरामनं गांधीहत्येमागचं कारण स्पष्ट केलं आहेच.खाल्या घरचे वासे मोजण्याचं बीज यांनीच पेरलं.जनरल वैद्यांचा काटा काढणारे हेच.
  यांनातरी चांगलं मरण कुठं मिळालं? करावे तसे भरावे लागणारचं....

  ReplyDelete
 24. मलाही वाटत सत्य हेच असावं..!मात्रं जेव्हा कलबुर्गी, पानसरे,गौरी लंकेश यांच्या हत्या डोळ्यासमोर येतात. जनसामन्य नागरिकांवर सामूहिक रित्या अनन्वित अन्याय आणि अत्याचार झालेले दिसतात तेव्हा शंका तर येतेच.

  ReplyDelete
 25. या देशाचा जन्मच हिंदुस्थान म्हणुन झालेला आहे.येथे राहणाऱ्यांचा मुख्य धर्म ही हिंदुच आहे.हे काँग्रेसला रुचत नाही,म्हणुनच की काय या देशाला निधर्मि देश म्हणन्याच्या घोषना देण्याचे काम लावले,या देशातल्या सैनिकावर ही पोलासांनी देश द्रोहाचे आरोप लावले एवढेच काय घटना घडुन दीड वर्षा नंतर हे अजब शोध लावणारे कोण.
  काँग्रेशी नी मुळ अतिरेकी तर तेव्हाच पळवले..

  ReplyDelete
 26. भाऊ
  स्पायकॅचर पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे का

  ReplyDelete
 27. एक गोष्ट नक्कीच विचार करण्याजोगी आहे,ती म्हणजे इतर लोकं मेले पण चर्चा फक्त कारकरेंच्या मृत्यची होते, कामटे किंवा साळस्कर यांच्या बद्दल कुणी ब्र शब्द काढत नाही.

  ReplyDelete
 28. अतीशय नियोजन पूर्वक अशा ह्या घटनांचं आलेखन करणारे ते हरामखोर आजही आपल्या देशात अस्तित्वात असतील तर विद्यमान सरकारने ह्या प्रकरणाचा सखोल तपास करून त्यांना जनतेसमोर उघडं पाडावं. त्यांना देशद्रोह काय असतो आणि त्यासाठी किती भयंकर शिक्षा दिल्या जाऊ शकते ह्यांचं उदाहरण न्यायालयाने प्रस्थापित करावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा द्रोह्यांना काय शिक्षा करावी ह्याचा पायंडा पाडला आहे तो अनुकरणीय आहे.

  ReplyDelete
 29. अप्रतिम विश्लेषण भाऊ.सर्व जनतेपर्यंत हे पोहोचायला हवे.

  ReplyDelete
 30. भाऊ हे सारे भयंकर आहे. ह्याचा पाठपुरावा मोदी सरकार तरी करणार का? इतके दिवस गेलेत अजून कोणाला कसं चौकशीच्या जाळ्यात पकडलं नाही, का पकडू इच्छित नाही.

  ReplyDelete
 31. सगळं भयानक आहे पण आता ह्यांचं पितळ उघडं करुन भर चौकात फासावर लटकावा

  ReplyDelete
 32. सूशीलकुमार, चिदंबरम, मुश्रीफ, जाणता राजा, अय्यर इ हे सर्व सरहद्दीपलीकडे आशेने पहात होते. त्यातील राजा महाराष्ट्रात नक्षलवाद पोसत आहे

  ReplyDelete