अक्षयकुमार या लोकप्रिय अभिनेत्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुलाखत दिली आणि ती सर्वच वाहिन्यांवर आलटून पालटून दाखवली गेली. सहाजिकच राहुलभक्त व राहुल भगिनीला ती झोंबली असेल, तर नवल नाही. कारण राहुल गांधींचीही अशीच मुलाखत कॉलेज विद्यार्थ्यांच्या समुहात घेतली गेली होती. पण त्यातल्या काही वक्तव्याची टवाळी झाली. किंवा माध्यमांनी त्या मुलाखतीला वारेमाप प्रसिद्धी दिलेली नव्हती. अखेरीस वाहिन्या किंवा माध्यमांनाही आपला वाचक व श्रोता जपावाच लागतो. त्यांना कंटाळवाणे असेल ते दाखवून किंवा छापून चालत नाही. सहाजिकच राहुलचे राफ़ायल कागदी विमान उडवून धंदा होत नसेल आणि मोदींच्या मनसोक्त गप्पा आवडणार असतील, तर तोच माल सादर करावा लागत असतो. पण हे राहुलभक्तांना कसे रुचावे? त्यांनी अक्षयच्या मुलाखतीवर झोड उठवलीच. पण त्यातूनही पुन्हा चुकल्यामाकल्या लोकांचे लक्ष, त्याच मोदी मुलाखतीकडे वेधण्यापलिकडे काहीच साध्य झाले नाही. त्यात पुन्हा कोणीतरी राहुलभगिनी प्रियंकाला मोदी मुलाखतीवर प्रश्न विचारला आणि त्यांना मिरच्याच झोंबल्या. तात्काळ राहुल भगिनी उद्गारल्या, यापेक्षा मोदींनी चार शेतकर्यांशी संवाद करयला हवा होता. आव असा होता, की राहुल सकळी उठल्यापासून बांधावर शेतकरी कष्टकर्यांशीच संवाद साधत असावेत. म्हणून मग मी शोध घेतला तर तसे दोन शेतकरी आपल्या महाराष्ट्रातच मिळाले. त्यापैकी एक होती रेडिओवर शेती करणारी मलिष्का आणि दुसरा बायो‘पिक’ नावाचा शेतमाल उत्पादन करणारा सुबोध भावे. यांना शेतकरी म्हणतात, अशी प्रियंकामुळे माझ्या ज्ञानात भर पडली. कारण पंतप्रधान वा त्या शर्यतीत असलेल्याने शेतकर्यांशी संवाद करायचा असेल, तर राहुलनी संवाद साधलेले शेतकरीच असणार ना? सहाजिकच प्रियंकाच्या खानदानात आजपर्यंत किती पंतप्रधान झाले आणि त्यांनी कोणत्या शेतकर्यांशी संवाद केला; त्याच शोध घेण्याची अपरंपार इच्छा झाली.
एका कार्यक्रमाच्या निमीत्ताने गोरेगावला गेलो होतो. तर पश्चीम जलदगती मार्गावर जागोजागी कॉग्रेस उमेदवारांचे भव्यदिव्य प्रचारफ़लक बघायला मिळाले. वेगाने पळणार्या गाडीमुळे सर्व मजकूर वाचता आला नाही. पण त्यातला ठळक मजकूर इतकाच होता की ‘लाज कशी वाटत नाही?’ ही ठळक शब्दातली घोषणा कोणासाठी असावी, असा विचार करीत होतो आणि प्रियंकाच्या उपरोक्त प्रतिक्रियेमुळे त्या घोषणेचा अर्थ उलगडला. कारण प्रियंका जिथे कुठे प्रचाराला गेलेल्या होत्या, तिथे गरीब जनतेला अजून पिण्याचे पाणीही मिळत नसल्याचा त्यांचा दावा होता. त्यामुळेच त्या भागातील शेतकर्यांशी मोदींनी बोलायला हवे, असा त्यांचा आक्षेप होता. मग लाज कोणाला वाटायला हवी? सत्तर वर्षे स्वातंत्र्याला होत आली आणि दरम्यान पन्नास वर्षे त्यांचेच खानदान देशाचे पंतप्रधानपद वा सत्ता उपभोगत होते. तरी देशाच्या सर्व भागातल्या ग्रामिण वर्गाला साधे पिण्याचे पाणी मिळत नसेल, तर पन्नास वर्षे सत्ता भोगणार्यांना लाज वाटायला हवी ना? की अवघी पाच वर्षे सत्तेत बसलेल्यांना लाज वाटायला हवी? अर्थातच आपण अशा खानदानात जन्माला आलो, त्याची प्रियंकांनाच लाज वाटायला हवी ना? बहुधा त्यांच्याच स्वागतासाठी कॉग्रेसने असे भलेथोरले फ़लक हायवेवर लावलेले असावेत. या पन्नास वर्षात त्यांचे पुर्वज मलिष्का किंवा सुबोध भावे सारख्या शेतकर्यांशीच बोलत बसले आणि खेड्यापाड्यातला खराखुरा शेतकरी पाण्यालाही वंचित राहिला. त्याची आता कॉग्रेसजनांनाही शरम वाटू लागलेली असावी. पण प्रियंकापर्यंत पोहोचण्याची कोणाची बिशाद नसल्याने त्यांनी अशा फ़लकाद्वारे आपल्या भावना पक्षाध्यक्षाच्या भगिनीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला असावा. अन्यथा इतर कोणाला अशा विषयात लाज वाटण्याचे काही कारण नाही. अर्थात प्रियंका गांधी आपल्या भावाप्रमाणे अजून बेछूट खोटे बोलत नाहीत, म्हणूनच त्यांच्या विधानातही सत्यता तपासून बघायचे मनात आले.
पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी व नंतर राजीव गांधी असे तीन पंतप्रधान त्यांच्या खानदानात झाले आणि तरीही देशाची इतकी दुरावस्था कशाला असावी? अजून कोट्यवधी लोकांच्या जीवनावश्यक गरजा पुर्ण होत नसतील, तर त्याला असेच जुने पंतप्रधान व सत्तधारी जबाबदार असतात ना? मग त्यांनी कुठली कामे केली? काय दिवे लावले? त्यांनी देशाच्या प्रगतीचा पाया घातलेला असेल, तर त्यातून असे अधिकाधिक दारिद्र्य कशाला पिकून आलेले आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायला लागणार ना? उरलेल्या देशाचे सोडून द्या. तीन पिढ्या ज्या रायबरेली अमेठी मतदारसंघातून निवडून येत राहिल्या, तिथे तरी या खानदानाने विकासाची कोणती गंगा पोहोचवली आहे? तिथल्या शेतकर्याला पिण्याचे पाणी वा रोजगार मिळत नसेल; तर शरम कोणाला वाटायला हवी? कधी प्रियंका गांधीनी लाजेकाजेस्तव अशा गावांकडे बघितले तरी आहे काय? मते मागायला निवडणूकीच्या मोसमात फ़िरकणार्या प्रियंका गांधींनी, कधी त्या बालेकिल्ल्यातील लोकाचे हाल अन्यवेळी बघण्याचे कष्ट घेतले आहेत काय? मोदींनी कुठे फ़िरावे आणि कोणाशी बोलावे त्याची यादी अशा भुरट्यांकडे तयार असते. पण आपल्याच पक्षातले अनेक प्रवक्ते नेते वा कार्यकर्ते यांनाही जे महात्मे भेटत नाहीत, ते मोदींनी कोणाला भेटावे त्यांची यादी देत असतात, शरम त्याची वाटायला हवी. ती कोळून प्यायल्याशिवाय राहुलभक्ती सुचतच नसते ना? मग प्रियंकाला असल्या गमजा करता येणारच. पण नुसते आरोप करण्यापेक्षा प्रियंकाच्या विधानातले तथ्यही शोधले पाहिजे. त्यांच्या पुर्वजांकडून सत्ता उपभोगताना अशा गोष्टी वा महत्वाची कामे करणे कसे राहून गेले? त्याचेही उत्तर सापडले. पंतप्रधानाने प्रशासन व अधिकार्यांचे कान पकडून त्यांच्याकडून कामे करून घ्यायची असतात. यांचे पुर्वज बहूधा खेडोपाडी मलिष्का-भावे असल्या शेतकर्यांशी चकाट्या पिटत बसले आणि बाकीची कामे राहून गेली असावीत.
आपण देशातल्या पहिल्या व तीन पिढ्यांच्या पंतप्रधानांची चौथी पिढी आहोत; याची किमान शरम असायला हवी. इतक्या वर्षात या देशातला सामान्य माणूस किमान दैनंदिन गरजांनाही वंचित राहिला आहे. अशी कामे दोनचार वर्षात होणारी नसून आठदहा पंधरा वर्षाच्या दिर्घकालीन योजनांमधून मार्गी लागत असतात. इतकीही अक्लल नसलेल्यांनी ही विधाने करावीत ना? ‘मदर इंडिया’तल्या नर्गिसला भेटून फ़ोटो काढले, म्हणजे नेहरू शेतकर्यांशी संवाद करत होते, असे या मुलीला वाटते काय? त्यांनी वा नंतर आजीने थोडा जरी ग्रामिण शेतकरी जनतेचा विचार केला असता, तर नातीला आज असले खुळे काही बोलायची गरज भासली नसती. पण मोदी द्वेष करणार्यांना असले काही आवडत असते. तर त्यांना सुखावण्यासाठी प्रियंकाही असेच काही बोलावे लागणार ना? अक्षयकुमार याला मोदींनी दिलेली मुलाखत अशी फ़ालतू असती, तर वाहिन्यांनी तिचे वारंवार प्रसारण केले नसते. किंबहूना चतुराईने मोदी माध्यमांना कसे वापरतात, त्यातला डाव ओळखून आपले डावपेच खेळायला हवेत. पण विरोधकातल्या अर्धवटांना टिंगलटवाळी करण्यातच समाधान आहे. त्यातच ते खुश आहेत आणि मोदी त्यांना खुश करीत असतात. त्यांना नैतिक विजयात स्वारस्य आहे आणि मोदी निवडणूक विजयासाठी प्रयत्न करीत असतात. म्हणूनच एकूण निवडणूक वा संघर्ष असमतोल वाटतो. अशा विरोधकांची दया येते. राहुल वा अन्य कोणी अशी मुलाखत देऊन सगळी माध्यमातली जगा व्यापून टाकत नाही, किंवा व्यापू शकत नाही, हे पराभवाचे लक्षण आहे. तुमच्या शिव्याशापांपेक्षा मोदींचे कौतुक ऐकायला लोक उत्सुक असतील, तर ते पराभवाचे लक्षण असते. हे पाच वर्षापुर्वी सिद्ध झाले असूनही खुळेपणा संपलेला नाही. तर ‘यारो लगे रहो’. तुम्ही असे़च नैतिक विजयासाठी प्रयत्न करा, ही मोदींची इच्छा व प्रार्थना असणार ना?
This comment has been removed by the author.
ReplyDeleteIf Modi is giving a non political interview in the midst of a do or die election, it means that for him the election is over. Done and dusted...
ReplyDeleteWhat is required from our side is to go and vote. And make lazy people also go and vote...
Pune disappointed with their turnout. हे फक्त बोलण्यापूरतेच की काय असं वाटावं इतका बेकार turnout दिला । 😡
मोदींची कोणतीही #मुलाखत बघा – पुढील प्रश्न त्यात असतातच. #मुलाखत_घेणारे वेगवेगळे असतात – मात्र #प्रश्न मात्र खालीलपैकीच असतात –
ReplyDelete१)आप इतनी #मेहनत कैसे करते है ?
२)कौनसा #टॉनिक लेते हो ?
३)आपकी #एनर्जी का राज क्या है ?
४)दिन मे #अठारा_घंटे काम कैसे करते है ?
५)आपका #सेन्स_ऑफ_ह्युमर इतना अच्छा कैसे है ?
मुलाखतकाराकडे #स्क्रिप्ट एकाच कार्यालयातुन जात असेल का ?
खाजू पेंटर ला कोणत्या सातबारामतीच्या कार्यालयातून स्क्रिप्ट गेली होती का??
Deleteसगळंच pre planned आणि scripted असत, एवढा वेळ त्याला देण्यापेक्षा एखाद्या पत्रकाराला दिला असता तर थोडी का होईना प्रतिमा उजळली असती
Deleteराज ठाकरे म्हणजे काय फडणवीस वाटले का? आणून बसवलेला. ज्याला स्वतःचे विचार आहेत त्याला अस (मामुसारखं)अवलंबून राहावे लागत नाही।
Deleteसुपर भाउ. मुलाखत पण सुपर होती मुद्दाम मोदी मिडीयाला खिजवतात.पत्रकारांना(?) टाळुन वेगवेगळ्या मार्गाने लोकांपर्यंत पोचतात.राहुल व प्रियंका अजुन तेच जुने फंडे वापरतात ठराविक लोक, पेपर हातासी धरुन प्रसिद्धी मिळवणे.
ReplyDeleteभाऊ खणखणीत वाजवावी ती तुम्हीच.
ReplyDeleteAtishay sunder....4 pidhya satta upbhogun ata dusryana vichartat.. laj kshi vatat nai.
ReplyDeleteभाऊ एक भन्नाट लेख, एक फडतुस चहावाला एका सामान्य उपटसुम्भ हिरोला घरगुती चारभिंतीआड़ मुलाखत देतो काय अन ती पिसाळ लागल्यागत चानेलवाले सारखी दाखवता का्य हे ह्या जन्मजात सोन्याचा चमचा तोंडात घेउन जन्मलेल्या राजे-रजवाडयाना अन लुटियंस टोळभैरव गैंगला कसे सहन होणार..
ReplyDeleteश्री भाऊ ह्यांना लाज शरम हे शब्द माहीत असायचं काही कारण नाही,निवडणुका आल्या की लोकांसमोर जायचं काहीतरी थातुरमातुर कारण सांगायची कसली तरी समिती नेमयची ( मग ५ वर्षे बघायला नको ४ पिद्य ची सोय झाली) मग ५ वर्षे नि ये रे माझ्या मागल्या
ReplyDeleteभाऊ अत्ताच काही दिवसापूर्वी tashkand फाइल्स नावाचा चित्रपट आलेला आहे तो तुम्ही बघावा आणि विवेचन कराव अशी विनंती करतो
ReplyDeleteBhau lok modila divasbhar baghtayt he ek change lakshan manayla have.pradnya Thakur prakrnamule BJP thodi Backfoot var geli Hoti. Pan punha ajun track bar Ali changla lakshan ahe
ReplyDeleteएकदम चपखल वर्णन केले आहे. जाता जाता चांगले शालजोडीतले जोडे मारले आहेत. लय भारी
ReplyDeleteभाऊ आज मोदींच गाव वडनगर पाहिल, त्या गावात आजून संडास नाहीत, महिला उघड्यावर जातात, गटारांची पण तीच दुर्दशा आहे।
ReplyDelete2014 चा वेळी राज साहेब गुजरात च कौतुक करत होते खूप मग ते काय खोटं होता का? का त्यांना कळलंच नाही पाहून पण ते सांगा आणि पुरावे द्या तुम्हाला फार आवडतात ते.
Deleteउत्तम विश्लेषण.हेच विरोधक जे बोंब मारत होते कि मोदी मुलाखत देत नाही.आता ते देतात तर म्हणतात कठोर प्रश्न विचारले नाही.मुळात पंतप्रधानांनी मुलाखत देण्याची नियम नाही.तसेच कालची मुलाखतच मुळात राजकीय नव्हती.तसे अधीच सांगितले होते.पण प्रत्येक गोष्टीची टिका करायची सवय लागली आहे.अहो ती मुलाखत तुमच्यासाठी नव्हतीच.ती आमच्या सारख्या समान्य लोकांसाठी होती ज्यांना मोदींच्या जीवनाबद्दल जाणुन घ्यायचे होते.बाकी कांग्रेस अध्यक्षानी दिलेल्या मुलाखती निव्वळ मनोरंजक असतात व पुर्व कांग्रेस अध्यक्षानी एका मोठ्या टिव्ही पत्रकाराला दिलेली मुलाखत आम्ही विसरलो नाही
ReplyDeleteमोदी हे सामान्य जीवन जगून आता या अत्युच्च पदावर पोचले आहेत. त्यांचे जीवन विविध पातळीवर तसेच विविधांगी आहे. त्यांच्या अराजकीय मुलाखतीत सामान्यांना उत्कंठा वाटावी असे अनेक पैलू दिसून आले." राजकुमार किंवा राजकुमारी " यांच्या जीवनात सामान्यांना सांगण्या सारखे कांहीच नाही आणि जे आहे , ते सांगण्या सारखे नाही. अशी गोची असल्याने राजकुमारीचा तिळपापड झाला आहे. हे ज्याचे त्याचे नशीब आहे.
ReplyDeleteभाउ , तुमचे या सर्व प्रकारा वरील सविस्तर विश्लेषण एकदम " लै भारीच "
गोष्टीतल्या, सोनेआणि चांदीच्या नाण्यातील चांदी चे नाणे उचलून लोकांकडून चेष्टा करून घेणार्या मुलासारखे मोदी ,याना खेळवतायत्,,आणि आपली प्रतिमा ,लोकमत वाढवतायत्....विरोधकांना लक्षात ही येत नाही य्
ReplyDeleteआज मी ती मुलाखत बघितली, आणि खरं सांगतो, आदर वाढला
ReplyDeleteभाऊ आताच एक लेख वाचला लोकसत्ताचा, त्यात अस म्हंटलय की गुजरातचे मुख्यमंत्री मोदी पंतप्रधान मोदींना हरवणार, आणि वरणासीमधून प्रियांका गांधींची उमेदवारी गेम चेंजर ठरू शकते।
ReplyDeleteभाऊ, मोदींच्या अराजकीय मुलाखतीचा असा वेगळा अर्थ लक्षात आणून दिलात त्याबद्दल आभार, पण या मुलाखतीने बऱ्याच लोकांचा पोटशूळ उठला आहे. कोण म्हणतो राज ठाकरे बरोबर मुलाखत करायला हवी होती तर कुणाला रविशकुमार बरोबर. प्रत्येक विरोधकाला मोदींना कात्रीत पकडलेले बघायचे आहे पण हे राज आणि रविश यांची मस्ती मोदींच्या समोर येत नाहीत तो पर्यंत, ABP माझाचे काय झाले ते यांच्या लक्षात नाही असे दिसते.
ReplyDeleteमोदींचे अराजकीय मुलाखतीचे तंत्र विरोधकांसाठी bouncer होता.त्याचा सामना कसा करावा यात विरोधकांची wicket गेली..मोदीं काळाच्या नेहमी दोन पाउले पुढे असतात हे त्यांनी पुन्हा सिध्द केले.
ReplyDeleteBHau
ReplyDeleteAnother Angle to this is, As Election Commission didnt allow the release of Modi's Bio Pic, then this is an alternative to that.
Now no one can Ban this Interview. All Channels are showing it & People are watching it happily.
So there is a catch. Opponents tried their best & banned the release of Midi's Biopic but what a misfortune? Modi came out with this interview & passed all that info that is mostly being covered in the Bio pic via this interview.
So this is the real pain.
किती सकारात्मक निष्कर्ष काढता भाऊ?
ReplyDeleteYes its true that opposition party tried to stop the release of biopic and it couldn't release...so he came with a new plan of interview.....superb plan whateve he wanted to show in biopic has covered in interview....now let's wait for the results of election....who wins???
ReplyDeleteuttam lekh. saglyat murkh tar raju painter banla aahe. baramatikar swata barobar tyalahi gheun dubnaar.
ReplyDeleteमोदी जिंकणार ✌️
ReplyDelete