Tuesday, May 28, 2019

कॉग्रेस हा ‘पक्ष’ नाही

Image result for rahul JNU

यावेळी लोकसभा प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कॉग्रेसमुक्त भारत’ असा शब्दही उच्चारला नाही. कारण आता हळुहळू लोकांनाही कॉग्रेस म्हणजे एक पक्ष नसून ती एक विकृत मानसिकता असल्याचे लक्षात आलेले आहे. म्हणून तर मतदाराने ज्या पद्धतीने मतदान केले त्यातून नुसती कॉग्रेस नाही, तर तिच्या पुनरुद्धाराला पुढे सरसावणार्‍या विविध पक्षांनाही धुळ चारलेली आहे. मागल्या वेळी मोदींनी बहूमत संपादन केले, तेव्हा अनेकांना तो अपवाद वाटला होता आणि त्या धक्क्यातून सावरताना अनेकांनी वस्तुनिष्ठ परिक्षण करण्याचाही प्रयास केला होता. त्यामध्ये शिव विश्वनाथन नावाच्या प्राध्यापक बुद्धीमंताचा समावेश होता. ‘द हिंदू’ या दैनिकात खास लेख लिहून त्यांनी आपल्या पराभवाची कबुली दिलेली होती. वास्तविक हे गृहस्थ कुठल्याही पक्षातर्फ़े निवडणूकीच्या मैदानात उतरलेले नव्हते. मग त्यांनी आपला पराभव मोदींनी केला असे कशाला म्हणावे? तर त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा वैयक्तिक पराभव झाला नव्हता. त्यांच्यासारख्या उदारमतवादी लोकांचा मोदींनी त्या निवडणूकीत पराभव केलेला होता. त्याला मोदी जबाबदार नसून खुद्द विश्वनाथन यांच्यासारख्या उदारमतवादी मुर्खांचे वागणेच कसे जबाबदार आहे, त्याचाच पाढा त्यांनी वाचला होता. सामान्य लोक धार्मिक असले तरी धर्मांध नसतात आणि त्यांच्या जीवनशैलीची सतत टवाळी केल्याने असा मोठा समाज पुरोगाम्यांपासून दुरावत गेला. त्याचेच प्रतिबिंब निवडणूक निकालात पडले असे त्यांनी म्हटलेले होते. पण निदान नंतरच्या काळात त्यांच्यात सुधारणा झाली का? अजिबात नाही. आधी केलेल्या चुकांची हे गृहस्थ पुनरावॄती करीत राहिले आणि त्यांच्या विचारांच्या बुद्धीमंतांनी नेमके त्यांचे अनुकरण केले. त्याचे परिणाम आता २०१९ च्या निकालातून समोर आलेले आहेत. त्यांचा पराभव मोदींनी केला नाही, तर कॉग्रेस नावाच्या मनोवृत्ती व प्रवृत्तीने केलेला आहे. कारण तो एक पक्ष नाही, तर ती प्रवृती आहे.

मागल्या सत्तर वर्षात नेहरूवाद किंवा कॉग्रेसची विचारधारा म्हणून खुप काही लिहीले बोलले गेले आहे. पण ती विचारधारा नेमकी कोणती, त्याचा गोषवारा सापडणार नाही. नेहरू, गांधी किंवा आणखी कोणी वेळोवेळी व्यक्त केलेल्या मतांची गोळाबेरीज, म्हणजे ती विचारधारा असे मानायची पद्धत आहे. पण व्यवहारात बघायचे तर कॉग्रेस म्हणजे सत्तर वर्षातल्या कारभाराचा जनतेला आलेला अनुभव, भोगावे लागलेले परिणाम किंवा दुष्परिणाम, म्हणजे कॉग्रेस होय. या प्रदीर्घ कालावधीत देशामध्ये जी एक भ्रष्ट, सडलेली वा निरूपयोगी व्यवस्था उभी राहिली, ती म्हणजे कॉग्रेस होय. पण ही व्यवस्था एकट्या नेहरूंनी किंवा कॉग्रेस पक्षाने उभारलेली नाही, किंवा फ़क्त कॉग्रेस म्हणजे ती व्यवस्था नव्हे. एकूण सामाजिक आर्थिक शोषणावर पोसली जाणारी व त्यालाच न्याय ठरवणारी व्यवस्था, म्हणजे कॉग्रेस प्रणाली असे सरूप येत गेले. ज्याने कोणी बंडाचा झेंडा उभारण्याचा प्रयत्न केला, त्याला साम दाम दंड भेद अशा मार्गाने संपवण्यात आले. त्यामुळे ही व्यवस्था कॉग्रेस नावाने कार्यरत व अबाधित राहू शकली चालू शकली. ज्यांच्यामुळे तिला खरेखुरे आव्हान उभे राहिले, त्यांना बदनाम बहिष्कृत करण्यात आले किंवा गुन्हेगार घोषित करायचेही डाव यशस्वी करण्यात आले. त्यासाठी आवश्यक असलेल्या संस्था, संघटना, विभाग यांची पक्की रचना करण्यात आली आणि त्यामध्ये प्रत्येकाची सोय लावण्यात आली. विश्वनाथन यांच्यासारख्या बुद्धीमान प्राध्यापकापासून कलावंत साहित्यिक अशा सर्व क्षेत्रातील लोकांची तिथे सोय होती. त्यांनी शोषणाचे लाभ उठवावेत आणि बंडाची शक्यता दिसली तरी, तिच्या नरडीला नख लावून धोका संपवायचा. इतकीच अशा लोकांची जबाबदारी होती. तेही अपुरे ठरले तर त्यापैकीच कोणी तरी बंडाचे नाटक रंगवून खर्‍याखुर्‍या बंडाची उर्मी खच्ची करायची. इतकी ही परिपुर्ण व्यवस्था होती. जिला कॉग्रेस म्हणतात.

मोदींनी सत्ता हाती आल्यावर किंवा त्याच्याही आधीपासून त्या व्यवस्थेलाच सुरूंग लावण्याचा चंग बांधला होता. म्हणून तर भाजपा किंवा संघापेक्षाही अशा नेहरूवादाला वा प्रस्थापिताला मोदी हा कायम मोठा शत्रू वाटत आला. कारण मोदींनी पहिल्यापासून या नेहरूवादी कॉग्रेसी व्यवस्थेच्या मुळाला हात घातला होता. मागल्या खेपेस त्यांनी कॉग्रेस नावाच्या पक्षाचा राजकीय पराभव केला होता आणि तेवढ्यावर हा विषय संपणार नाही, याचेही भान त्यांना होते. कारण सत्तर वर्षे कॉग्रेसने देशावर राज्य केले, ती लोकमताच्या बळावर वा लोकांचा विश्वास संपादन करून मिळवलेली सत्ता नव्हती. जनमत आपल्या मुठीत राखणार्‍या विविध क्षेत्रातील मठाधीशांचा आशीर्वाद ही कॉग्रेसची खरी ताकद होती आणि बदल्यात कॉग्रेसच्या नेतृत्वाने अशा मठाधीशांना अनुदाने द्यावी, त्यांचे पोषण करावे, अशी एकूण तडजोड होती. सहाजिकच त्या व्यवस्थेच्या मुळाला हात घातला गेल्यावर त्यावर पोसलेल्या बांडगुळांना बिळातून बाहेर पड्णे अपरिहार्य होते. मागल्या पाच वर्षात म्हणूनच अशा सर्वांनाच आपल्या सुरक्षित बिळातून मुखवट्यातून बाहेर यावे लागले, कलाकारांपासून विविध क्षेत्रातून मोदी विरोधात उमटलेला आवाज, त्यांचे प्रतिनिधीत्व करणारा होता. तिथे कॉग्रेसने स्थापन केलेला तो गुळाचा गणपती होता, त्याचा आवाज होता. अशा हजारो लहानमोठ्या गणपतींच्या विसर्जनाचा चंग बांधलेला माणूस फ़क्त कॉग्रेसला हरवून थांबणार नाही, याची प्रत्येकाला शंका होती. पाच वर्षे कारभार चालवताना मोदींनी ती शंका खरी ठरवली. कारण हळुहळू मोदींनी आपल्या कामातून भ्रष्ट कॉग्रेस व्यवस्थेला नेस्तनाबुत करण्याची पावले उचलली होती. देशातला भ्रष्टाचार फ़क्त कायदे करून वा नुसते सरकार बदलून नष्ट होऊ शकत नाही. ज्या व्यवस्थेने त्याला सुरक्षा बहाल केलेली आहे. ती व्यवस्थाही उध्वस्त करणे भाग होते. ती व्यवस्था म्हणजे खरी कॉग्रेस आहे. तो पक्ष नाही, ती भ्रष्ट सडलेली व्यवस्था आहे.

’पहिल्या पाच वर्षाच्या कारभारातून सामान्य जनतेला मोदींनी खुप दिलासा दिला. म्हणून तर त्यांना यावेळी भरघोस मते मिळू शकली. पण मोदींनी कोणता दिलासा गांजलेल्या जनतेला दिला, कुठे जनतेचे जीवन सुसह्य सुखकर झाले, त्याचा थांगपत्ता बुद्धीमंत, कलावंताना अजून लागलेला नाही. कारण सत्तर वर्षे फ़क्त शोषणावर पोसले गेलेल्या ह्या लोकांनी शोषण वा अन्याय म्हणजेच न्याय, अशा प्रचाराचा घोषा लावलेला होता. त्याच नशेत चुर असलेल्या जनतेला प्रथमच सुसह्य जीवन आणि न्यायाची चव चाखता आल्यावर समाजातले भोंदू विचारवंत, कलावंत किंवा भाष्यकार यांचा खोटेपणा लक्षात आला. तिथून मग अशा बदमाशांची खरी घुसमट सुरू झाली. त्यांनी अधिक आक्रमकपणे न्यायालाच अन्याय व शोषणालाच पोषण ठरवण्यासाठी मागल्या दोन वर्षात नको इतका धिंगाणा घातला होता. कारण त्यांनी उभारलेली कॉग्रेस नावाची भ्रष्ट शोषण व्यवस्था हळुहळू जमिनदोस्त होऊ लागलेली होती. मोदींना आणखी पा़च वर्षे मिळाली तर श्वास घ्यायलाही आपल्यात त्राण शिल्लक उरणार नसल्याच्या खात्रीने त्यांना भयभीत करून टाकलेले होते. त्यातून मग अविष्क्मार स्वातंत्र्य किंवा नानाविध तमाशे सुरू झाले. ते प्रत्यक्षात कॉग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी होते. तितकेच कॉग्रेस नावाच्या शोषण व्यवस्थेला टिकवून ठेवण्यासाठीची केविलवाणी धडपड होती. आता आपली खरी लढाई कॉग्रेस पक्षाशी उरलेली नसून, कॉग्रेस नावाच्या शोषण व्यवस्थेशी अटीतटीची लढाई असल्याचे ओळखूनच मोदी २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत उतरलेले होते. त्यांना नुसते बहूमत मिळवायचे नव्हते, तर राज्यसभेतील अडवणूकही संपवायची होती आणि त्याचाही पाया याच निवडणूकीने घातला गेला आहे. थोडक्यात यंदाच्या निवडणूक निकालांनी कॉग्रेस नावाच्या सत्तर वर्षे जुन्या दुष्ट विकृत प्रवृत्तीला शेवटची घरघर लागलेली आहे. २०२० सालात राज्यसभा पादाक्रांत झाल्यावर कॉग्रेस प्रवृत्ती मरून पडलेली असेल. पक्ष असेल, पण प्रवृत्ती निपचित पडलेला.

32 comments:

  1. उत्तम ! संग्रही ठेवावा असा लेख ! अगदी वर्मावर अचूक बोट ठेवलंय भाऊ ,👏👏👏

    ReplyDelete
    Replies
    1. खरयं सदानंदभाऊ.संग्रही ठेवण्या सारखा लेख आहे आजचा

      Delete
  2. भाऊ आता काँगेसला कुणीही सावरू शकणार नाही. राहुल गांधीसह सर्वच मोठ्या नेत्यांचा पराभव झाला. भविष्यात काँग्रेसचं अस्तित्व खूप कठीण दिसतंय.

    ReplyDelete
    Replies
    1. भाऊ म्हणतात त्या प्रमाणे, काॅंग्रेसी प्रवृत्ती गेली पाहीजे. त्या प्रवृत्तीचा शिरकाव खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा गेल्या २५ वर्षा पासुन झालेला दिसतो

      Delete
  3. Perfect....manala Bhau tumhala.

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. कुठे आहेत ते केतकर ..म्हणे मोदी लोकसभेच्या निवडणूक होउ देणार नाहीत.! केवळ निवडणुकाच झाल्या नाहीत तर आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान झाले. सातफेर्यात मतदान अगदी शांततेत पार पडले, बंगालचा अपवाद सोडला तर !पुरोगामी किती दुतोंडी गांडुळ आसतात हे बंगाल प्रकरणात सर्व देशाला कळाले. सात फेरे - हम तेरे म्हणत मोदी सर्व देशाचे झाले...

    ReplyDelete
    Replies
    1. ते म्हणतील की मला खोटं ठरवण्यासाठी मोदींनी ही चाल खेळली.

      Delete
  6. आता बंगालमधील आमदारांची दल बदल करून भाजपच्या गंगेत पवित्र व्हायला सुरुवात झाली आहे... जुन्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना न्याय मिळावा ही अपेक्षा. नाही तर आगामी दहावीस वर्षात भाजपचा काँग्रेस होणे निश्चित..

    आयात झालेले सर्वच भ्रष्ट वा संधीसाधू असतील असे नाही परंतु ज्यांना आपल्या पूर्वीच्या पक्षात कधी कंठ फुटला नव्हता त्यांना नंतर कंठ फुटेल अशी शक्यता कमीच. तसेच भ्रष्ट व्यक्ती कुठेही गेली तरी आपली प्रवृत्ती सोडत नाही. त्यामुळे अशांची संख्या जास्त असेल तर गंगेची गटारगंगा व्हायला वेळ लागणार नाही.

    ReplyDelete
  7. मल पण नेहमी प्रश्न पडायचा काँग्रेस संस्कृति म्हणजे काय मला वाटायच एका गालावर वाजवल्यावर दुसरा पुढे करायचा म्हणजे काॅग्रेस संस्कृति. पण भाऊंच्या विश्लेषणाने उमजले.

    ReplyDelete
    Replies
    1. काॅंग्रेसी प्रवृत्ती फक्त पक्षा मध्ये अथवा भंपंक पुरोगाम्यांपुरती मर्यादीत नव्हती तर खाजगी संस्था, सरकारी व निम-सरकारी कार्यालये, विद्यापीठे इत्यादी ठिकाणी सुद्धा बोकाळलेली होती. या वर अंंकुश यायला १० वर्षाचा काळ जाइल व तरूंण पिढी हे करण्यास समर्थ आहे

      Delete
  8. उत्तम व परखड विश्लेषण...

    ReplyDelete
  9. खरंय भाऊ.

    येत्या पाच वर्षांत ही भ्रष्ट व्यवस्था पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही मोदी करतील असा विश्वास वाटतो.

    विदेशी पैशावर चालणाऱ्या नकली स्वयंसेवी संस्था आता मोठ्या प्रमाणात बंद झाल्यात पण या बांडगुळांना देशांतर्गत होणारा अनुदानित अर्थपुरवठा तोडून त्यांचं खरं रूप लोकांसमोर आणले पाहिजे. प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून त्यांनी माध्यमातील काही घराण्यांशी / गटांशी मिलीभगत करून बळकावलेल्या जागांवरच त्यांनी अंगावर चढविलेले साळसूद सोंगांचे कपडे उतरवले पाहिजेत. बाकी हे लोक पराकोटीचे निर्लज्ज आहेत पण त्यांची सोंगं गळून पडल्यावर निदान त्या सोंगांना बळी पडणाऱ्या लोकांचे प्रमाण तरी कमी होईल.

    ReplyDelete
  10. प्रामाणिकपणे जीवन जगणे म्हणजे बावळटपणा असे मिथक या सत्तर वर्षांच्या राजवटीने पसरवले आहे. लांडीलबाडी करणे म्हणजे हुशारी, विश्वासघात म्हणजे चातुर्य, खोटेपणा म्हणजे धूर्तपणा आदि व्यवस्था या लोकांनी प्रस्थापित केली होती. रांग मोडून वशिल्याने एखादी गोष्ट मिळवणे कौतुकास्पद ठरवले गेले. हीच कोंग्रेसी व्यवस्था होती

    ReplyDelete
  11. Best analysis of 2019 election results. Excellent !!!

    ReplyDelete
  12. काॅग्रेस मरणे हे भाजपच्या हिताचे नाही हे काॅग्रेस देखील जाणते हीच खरी मेख आहे ती जीवंत ठेवली जाईल पण सुंदर सुस्थावस्थेत.... आणि हाच धोका मोठा आहे. ...

    ReplyDelete
  13. पक्ष हा मरत नसतो. फक्त माणूस बदला पक्ष परत जिंवत होईल

    ReplyDelete
  14. भाऊ, अप्रतीम व रोखठोक

    ReplyDelete
  15. केतरांच्या व्यापक कटावर काहितरी सांगा
    समजतच नही ते काय सांगतात

    ReplyDelete
  16. येत्या 5 वर्षात मोदी हिंदूंच्या मनातून उतरतील. " सबका साथ सबका विकास " पर्यंत ठिक होते. पण " सबका विश्वास " संपादन करण्यासाठी हिंदूहीताचा बळी द्यावा लागेल. दाढ्या कुरवाळ्याव्या लागतील. सुरुवात झाली आहे. " सबका विश्वास " चा उद्घोष करून.

    ReplyDelete
  17. वरती कोणीतरी काँग्रेस च्या भ्रष्ट नेत्यांना भाजपमध्ये घेऊन पवित्र करण्याची गोष्ट केली आहे. भ्रष्टयाचार हा कधीही नष्ट होऊ शकत नाही. आणि समाजसेवा करायला कोणी राजकारणात येत नाही, हे आजच्या काळातले सत्य आहे.
    गरज असते ती अश्या लोकांना वठणीवर आणणाऱ्या सक्षम केंद्रीय नेतृत्वाची. जर ते सक्षम नसेल, तर स्थानिक नेते केंद्रीय नेतृत्वाला आपल्या तालावर नाचावतात. पण तसे ते असेल तर मग असे सुभेदार एक विशिष्ट मर्यादेपलीकडे काहीही करू शकत नाहीत. त्यामुळे एक प्रकारे या लोकांना भाजपात घेऊन त्यांचे दात काढलेत या लोकांनी. कारण त्यांचं उपद्रवमूल्य खूप कमी झाल आहे आधीच्या तुलनेत..

    ReplyDelete
  18. अतिशय वास्तव आणि मुद्देसूद विवरण !
    राहुल गांधीच काॅंग्रेसचे अध्यक्ष राहिले तर मोदींची वाट आणखीन सुकर होईल.

    ReplyDelete
  19. Kharay bhau aata rajya sabhet bahumat milale pahije

    ReplyDelete