Thursday, May 16, 2019

फ़ॉलोऑनची तयारी सुरू

Image result for ghulam nabi azad rahul

लोकसभा निवडणूकीची सातवी अंतिम फ़ेरी शिल्लक असताना आणि अजून ५९ जागांचे मतदान व्हायचे असताना, कॉग्रेसचे ज्येष्ठ नेता गुलाम नबी आझाद यांनी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केलेले मत, धक्कादायक आहे. कुठल्याही बाजूचा नेता किंवा सेनानी प्रत्यक्ष लढत नसले, तरी त्यांनी आपल्या सामान्य सैनिकांची हिंमत वाढवावी अशीच अपेक्षा असते. निदान त्यांनी ऐन लढाई चालली असताना अवसान गळाल्यासारखी भाषा बोलायची नसते. किंवा पराभवाची शक्यता व्यक्त करायची नसते. आझाद यांची भाषा तशीच असल्याने कुठल्याही राजकीय विश्लेषकाला थक्क करून सोडणारी आहे. ते कॉग्रेसचे राज्यसभेतील नेता आहेत आणि दिर्घकाळ राजकारणात वावरलेले आहेत. ४८४ जागांचे मतदान संपले असताना त्यांनी असली अवसानघातकी भाषा कशाला वापरली आहे? योगायोग असा, की ज्या दिवशी आझाद असे वक्तव्य करीत होते, त्याच्या आदल्या दिव़शी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य भिन्न होते. झालेल्या सहा फ़ेर्‍यांच्या मतदानात एनडीएने तिनशेपेक्षा अधिक जागांवर बाजी मारल्याचे व एकट्या भाजपाने बहूमताचा पल्ला पार केल्याचा आत्मविश्वास मोदींनी व्यक्त केलेला होता. त्यानंतर आझाद यांची अशी भाषा आपल्याच कार्यकर्त्यांना व विरोधकांना निराश करणारी आहे. कारण अजून ५९ जागांचे मतदान व्हायचे असताना कॉग्रेसला कुठल्याही पक्षाचा पंतप्रधान मान्य असेल. त्रिशंकू लोकसभा झाल्यास मोदी सोडून कोणालाही नेता मानायला आपण तयार असल्याचे विधान कशासाठी करायचे? आझाद यांच्या अशा वक्तव्यामुळे १९७०-८० च्या जमान्यातले क्रिकेट कसोटी सामने आठवले. तेव्हा अशा मानसिकतेला फ़ॉलोऑनची पराभूत मानसिकता मानले जायचे. पण हटकून भारतातले क्रिकेट लेखक तेच बोलायचे आणि नेमकी तशीच भाषा मोदी आणि आझाद बोलत असतील, तर तो जमाना आठवणे अपरिहार्यच नाही काय?

तो जमाना गावस्करचा होता आणि त्या काळात वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड असे मातब्बर क्रिकेटसंघ होते. त्यांच्यासमोर भारताने कसोटी सामना जिंकणे म्हणजे लॉटरी लागल्यासारखा भारतीय क्रिकेटशौकीनांना आनंद व्हायचा. अशा काळात आधी फ़लंदाजी करताना परक्या संघाने तिनशे धावांचा पल्ला ओलांडला किंवा चारशे वगैरे धावा केल्या; तर आपल्याकडले पत्रकार ताबडतोबीने फ़ॉलोऑनची चर्चा सुरू करायचे. कसोटी सामन्यात फ़ॉलोऑन टाळण्यालाही महत्व असायचे. पहिल्या संघाने आरंभ करताना जितकी धावसंख्या उभारलेली असेल, त्यापेक्षा दोनशेहून कमी धावात नंतरच्या संघाचा डाव कोसळला, तर त्यालाच पुन्हा फ़लंदाजी करण्याची नामुष्की प्रतिस्पर्धी कर्णधार लादू शकायचा. त्यामुळे अशी स्थिती बलाढ्य संघाच्या बाबतीत आली, मग आपली फ़लंदाजी ती धावसंख्या पार करील, असा आत्मविश्वास कोणी पत्रकार व्यक्त करायचा नाही. परक्या संघाने साडेतीनशे केलेले असतील, तर आपले समालोचक वा पत्रकार तात्काळ किमान दिडशेचा पल्ला भारताने ओलांडावा, म्हणून देवाचा धावा सुरू करायचे. थोडक्यात आपल्या अशा समालोचकांना भारतीय संघाची फ़लंदाजी गडगडण्याचा आत्मविश्वास असायचा. म्हणजे पहिला फ़लंदाजही बाद झालेला नाही किंवा अर्धा संघही खेळलेला नाही, त्याच्या आधीच नामुष्कीची कबुली देण्याच उतावळेपणा चालायचा. गुलाम नबी आझाद यांचे ताजे वक्तव्य नेमके तसे व त्याच पठडीतले आहे. ते अगत्याने सांगण्याचे कारण म्हणजे अजून सर्व फ़ेर्‍या पुर्ण झालेल्या नाहीत, की एक्झीट पोलही आलेले नाहीत. पण अर्थातच एक्झीट पोल लपून राहिलेले नाहीत आणि सर्वच प्रमुख पक्षांना त्याची कुणकुण लागलेली आहे. जसे मोदींच्या मुलाखतीतून व्यक्त झाले आहे, त्यालाच एकप्रकारे आझादांनी दुजोरा दिलेला आहे. कारण दोन्हीकडे एकाच आधारावर प्रतिक्रीया आलेल्या आहेत.

हल्ली सभेपुर्वी कुठल्या तरी वाहिनीच्या पत्रकाराला राहुल वा मोदी धावत्या मुलाखती देत असतात. अशाच एका मुलाखतीमध्ये बुधवारी मोदींनी सहा फ़ेर्‍यातील मतदान व एक्झीट पोलचा हवाला देऊन एनडीएला तिनशेहून अधिक जागा मिळत असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. नेमक्या त्याच्या उलटी स्थिती आझाद यांची दिसते आहे. म्हणजे दोघांना मिळालेला पोल एकाच संस्थेचा आहे, की सगळ्याच पोलकर्त्या संस्थांचे आकडे समान आहेत? जेव्हा आझाद असली माघारीची भाषा बोलत होते, तेव्हाच त्यांचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी मात्र उरलेल्या प्रचारसभेत कॉग्रेस आपले सरकार स्थापन करणार असल्याचा श्रोत्यांना हवाला देत होते. तितकेच नाही, तर सरकार स्थापन झाल्यवर विनाविलंब प्रत्येक गरीबच्या खात्यात थेट ७२ हजार रुपये भरण्याचीही हमी देत होते. जर कॉग्रेसचा पंतप्रधान होणारच नसेल किंवा पंतप्रधान पदाचा दावाच कॉग्रेसने सोडलेला असेल, तर राहुल गांधी कुठून लोकांच्या खात्यात हजरो रुपये भरणार आहेत? इतर पक्षांनी वा जो कोणी पंतप्रधान होईल, त्याने राहुल गांधींची न्याय योजना मान्य करायला हवी. त्यासाठी आर्थिक तरतुद करायला हवी. त्याशिवाय इतके पैसे कोणाच्याही खात्यात जातील कसे? थोडक्यात राहूल काहीही बरळू शकतात असेच अझाद यांना वाटू लागलेले आहे आणि त्रिशंकू लोकसभा झाली तर, असेही ते़च म्हणतात. म्हणजे त्यांना कॉग्रेसला सरकार बनवता येईल अशीही खात्री नाही किंवा मोदींचे बहूमत जाण्याविषयी सुद्धा आत्मविश्वास उरलेला नाही. दुसरीकडे मोदी मात्र तिनशेचा पल्ला पार झाल्याचे आत्मविश्वासाने बोलत आहेत. मग २३ मे रोजीचा निकाल कसा असेल? गेल्या दोन महिन्यात राहुलपासून ममतापर्यंत तमाम पक्ष मोदींची ‘एक्सपायरी डेट’ जवळ आल्याचा हवाला देत राहिले आणि तीच तारीख जवळ येत असताना प्रत्येकाचे पाय लटपटू लागलेले दिसतात.

सरकार स्थापन करून ५ कोटी लोकांना प्रत्येकी ७२ हजार रुपये देण्याच्या नित्यनेमाने गर्जना करणार्‍या पक्षाध्यक्षाच्या ज्येष्ठ नेत्यामध्ये तितकाच आत्मविश्वास नको काय? तो आत्मविश्वास असता, तर शेवटची फ़ेरी बाकी असताना आझाद यांनी अशी भाषा वापरली नसती. ती भाषाच त्यांच्या पराभूत मानसिकतेचा पुरावा आहे, असे माणूस केव्हा बोलतो? त्रिशंकू लोकसभा झाली तर. भाजपाने बहूमत गमावले तर. स्वपक्षाला बहूमत वा सत्ता मिळण्याचा कुठेही उल्लेख नाहीच? फ़ॉलोऑनची भाषा नेमकी तशीच असायची. योगायोग असा, की मोदींनीही आपल्या त्याच मुलाखतीत अशा मानसिकतेचा उल्लेख केलेला होता. विरोधक आणि राजकीय विश्लेषक अजून १९८० च्या मानसिकतेमध्ये अडकले आहेत, असे मोदींनी त्या मुलाखतकाराला सांगितले. ती मानसिकता त्या कालखंडातील क्रिकेट शौकीनांची व समालोचकांची असायची. आता तसे कोणी बोलू लागला, तरी त्याला हल्लीचे क्रिकेटशौकीन व समालोचक खुळ्यात काढतील. कारण जमाना बदलला आहे आणि आजचा भारतीय क्रिकेटसंघ तितका विस्काळीत वा दुबळा राहिलेला नाही. तो विजयाच्या जिद्दीने लढतो. मग आधीच्या प्रतिस्पर्धी संघाने चारशे पाचशे धावांचा डोंगर का उभा केलेला असेना? त्याचे प्रतिबिंब नरेंद्र मोदींच्या भाजपा व कार्यकर्ते पाठीराख्यांमध्ये पडलेले दिसते. उलट जे खात्रीपुर्वक पराभूत होऊ शकतात, त्यांच्या भाषेत १९८० च्या काळात आढळून येणारी पराभूत मानसिकता जाणवते. तसे नसते, तर आझाद यांनी पंतप्रधान पदावरचा दावा सोडण्याचा उतावळेपणा नक्कीच केला नसता. लढाई ऐन भरात आलेली असताना कोणी तहाच्या अटींची चर्चा वा विश्लेषण करीत नसतो. ज्याला कोणाला तहाच्या तडजोडीचे डोहाळे लागलेले असतात, त्याला आपल्याच पराभवाची खात्री वाटत असते. तमाम विरोधक तिथेच येऊन फ़सले आहेत. त्यांना मोदी नावाची गुगली अजून उलगडलेलीच नाही.

25 comments:

  1. तोरसेकर साहेब मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. दिल्ली मध्ये जी मागील लोकसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये अण्णा हजारे यांनी ममता बॅनर्जी यांच्या साठी प्रचार केला होता.त्या काळात ममता या आज इतक्या अराजक नव्हत्या पण त्यांच्या पक्ष वर शारदा चिटफंड घोटाळ्याचे आरोप होते तरी सूद्धा अण्णा हजारे यांनी त्यांचा प्रचार केला याचे कारण मला आज वर कळाले नाही . तुमचं मत जाणू इच्छितो.

    ReplyDelete
  2. भाऊ तुमच्या लेखांची आणि यूट्यूब वरील भाष्याची आम्ही आतुरतेने वाट पाहतो .तुमची पुस्तकं कुठं मिळतील?

    ReplyDelete
  3. कदाचित गुलाम नबी आझाद यांची अशी अटकळ असेल की काँग्रेसने पंतप्रधान पदावरचा हक्क आधीच सोडला आणि खरेच त्रिशंकू अवस्था आली तर बाकीच्या छोट्या छोट्या पक्षात नेते पदाच्या आशा पल्लवित होतील आणि त्या मुळे निदान मोदींना रोखण्यासाठी तरी निवडणुकी नंतर चे गाठबांधन तयार होईल कारण निवडणुकीच्या आधीच्या गाठबन्धन प्रयत्नांवर तर स्वतः कॉंग्रेसनेच खोडा घातला होता. तसेही त्रिशंकू स्थिती येण्याची शक्यता अगदीच धुसूर आहे पण त्यांनी एक खडा टाकला असावा

    ReplyDelete
  4. उत्तम विश्लेषण भाऊ

    ReplyDelete
  5. या लेखाचे " शीर्षक " खूपच बोलके आहे. जास्त विवरणाची आवश्यकताच नाही.

    ReplyDelete
  6. परत आज ते म्हनतायत काॅंगरेस नसलेल तिसर्या आघाडी सरकार १-२ वर्ष पण टिकनार नाही,मग काल तस का बोलले? डॅमेज कंट्रोल असेल.

    ReplyDelete
  7. परंतू राहुल गांधींच्या बोलण्यात अथवा देहबोलीत एवढा फरक पडलेला नाही. हे काय रहस्य असावे?
    पराभवाचे राहुलना आकलनच नाही किंवा
    त्यांचा आत्मविश्वास प्रचंड असावा अथवा
    राहूल या निवडणूकी साठी प्रयत्नच करत नाहीयेत?

    ReplyDelete
  8. भाउ

    6 ठे चरन तक भा.ज.पा. जितेगी 289-308 सीट ——
    बुथ मँनेजमेंट कि अंदरुनि रिपोर्ट ----- ------------ --------------
    विश्र्वसनिय सुत्रोंसे :
    ईस बार मोदिजी कि लहर नहि, त्सुनामी आ रहि है जिसमे विपक्ष तिनका तिनका हो जाएगा।

    अमित शाह का मंत्र है 'मेरा बुथ सबसे मजबुत'. ईसिके तहत BJP का अब तक हुंए चुनाव के नतिजोंका आकलन जमिनीस्तर पर किये गये बुथ मँनेजमेंट रिपोर्ट के आधार पर निचे दिया है!

    छटे चरण तक BJP 289 से 308 के बिच सिट ला रहि है. यह आंकडा सिर्फ BJP का है, NDA का नहि!
    और अभि 7वे चरणके 59 सिटपर चुनाव होने बाकी है!

    BJP अभि पुर्ण बहुमत अपने अकेले के बलपे ला चुकि है! इसके पहले कि कांगेस अपना झुठा सर्वे मिडियाके द्वारा फैलाये जिसमे BJP सिर्फ 160 सिट जितेगी ऐसा बताया है! आप इस अस्ली सर्वे को फैलाये। Viral करे!

    ईसि फर्जी सर्वे के आधार पर कांग्रेस EVM कि गडबडि का रोना फिर एक बार रोनेवालि है और मामलै को सुप्रिम कोर्टमे ले जाने कि तैयारी मे है! कुछभी करके मोदिजि को फिरसे P.M. बनने से रोकना, यहि विपक्ष कि रणनिती है और आप आनेवाले दिनोंमे देखेंगे कि ईसलिये वो किसि भि स्तरपर जायेंगे!

    Goa 02
    Kerla 01
    Aandhra 02
    Delhi 07
    Himachal 04
    Zarkhand 16
    Bihar 17
    U.P. 61-75
    J&K 02
    Punjab 03
    Haryana 09
    Gujraat 24
    Rajstan 24
    Chattisgad 06
    M.P. 24
    Maharashtra 22
    Bangal 13-23
    Uttarakhand 05
    Orisa 8-13
    North East 17
    Karnataka 20
    Tamilnadu 2

    इसिलिये आप देखेंगे कि मोदिजि, अमित शाह और सभि भा ज पा नेता आश्र्वस्त है! विश्र्वास से भरे है! वहि विपक्ष कि बौखलाट अपने चरमपे है!

    अब आप इसमे NDA के घटक दलोंका जोडे तो वह अभि 350 को छुता है!

    बंगाल का आंकडा 30 तक जानेकि भि संभावना है और इसिलिये ममता कि घबराहट है!

    ReplyDelete
  9. आपली हार एक प्रकारे मान्य केली आहे
    मला आठवताय पुर्वी हेच गुलाम महाराष्ट्र तून निवडून जायचे
    इतकी लाचारी हया महाराष्ट्रातील नेत्यांची होती
    ती तसू भर ही कमी झाली नाही

    ReplyDelete
  10. भाऊ पराभुतांचे उत्तम मानसिक विश्लेषण आपण केले आहे.पण ज्यांना सत्तेत रहायची सवय आहे व चटक लागले ते सत्ते शिवाय जगूच शकतश नाही. पाण्या बाहेरील माशा प्रमाणे त्यांची अवस्था आसते.काल गुलाब नबी आझाद जे बोलले आपल्या या लेखात म्हटल्या प्रमाणे त्याच्या विरुद्ध आज बोलले , जर संधीमिळाली तर राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतील कारण काँग्रेस पक्षाला देश चालवायचा अनुभव आहे. आजच सोनिया गांधीनी "समविचारी'व मोदी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.आपण म्हटल्याप्रमाणे विरोधक नेते अजुनही जुन्या पद्धतीने निवडणुकांकडे व मतदारांकडे बघतात व हवेत ईमले बांधायला सुरुवात केली.तरुण पिढी व प्रथम मतदान करणाऱ्या मतदाराला जाती पाती व विवेकशुन्य युती बद्दल जराही देणेघेणे नाही.त्याला विकास करणारा ,निश्चित ध्येय असणारा व थेट संवाद साधणारा नेता भावतो .मोदींनी आज ५वर्षा नंतर प्रथमच वार्ताहर परीषद घेतली व त्यांचा सतृतेवर परत येण्तयाचा आत्मविश्वास पाहुन विरोधक आता पिसाळल्या सारखे मोदींना शिव्या शाप व बेछुट आरैप करु लागले आहेत .आता तेवढेच त्यांच्या हातात आहे.आता खरी उत्सुकता रविवार संध्याकाळच्या विविध वाहिन्यांवरील Exit poll वरील चर्चा व विश्लेषण ऐकायला येईल.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी मनातले बोललात तुम्ही

      Delete
  11. Apla blog vachlya Shivay ratri jhopahi yet Nahi. Khullar Chhan.

    ReplyDelete
  12. 👍👍👌👌💐💐👌👌👍👍💐💐

    ReplyDelete
  13. भाऊसाहेब, साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच थोडं विश्लेषण आपल्याकडून वाचायला मिळेल काय?

    ReplyDelete
  14. कॉंग्रेसचा एकछत्री अंमल पुढच्या काही वर्षात संपुष्टात येण्याची चिन्हे दिसायला लागली आहेत. फक्त काही प्रादेशिक पक्ष भारतात राहून बराच काळ भाजपा सत्तेत रहाण्यासाठी पूरक परिस्थिती तयार व्हायला लागली आहे.

    ReplyDelete
  15. भाऊ, ही बुध्दी त्यांना आधी झाली असती तर बराच फरक जाणवला असता. आता ही सगळी सारवासारव आहे.

    ReplyDelete
  16. अकलेचे तारे तोडणारे 'जमीपर आ गये'!!! ��

    ReplyDelete
  17. पण, राम माधव यांनी देखिल मधेच NDA बहुमत मिळवेल याबद्दल शंका बोलून दाखवली .

    ReplyDelete
  18. मोदी-शहाच्या 2019 च्या गणिताची माझी समज अशी आहे: एकूण मतदार 90 करोड, सरासरी मतदान टक्का 60% म्हणजे 54 करोड actual मतदार

    मोदींच्या विविध योजनांचे (किसान सम्मान, आवास, उज्वला, मुद्रा, आयुषमान वगैरे) प्रत्यक्ष व distinct (non-overlapping) लाभार्थी जवळपास 36 करोड. ह्या 36 करोड पैकी असे समजुयात की 20% (जवळपास 7 करोड) जाति-पातीवर आधारीत म्हणजेच 'सेक्युलर वोटींग' करतील. या 7 करोड मधील किती लोक बालाकोट मुळे जातीऐवजी national security issues वर वोट करतील हे मतमोजणीनंतरच कळेल पण सध्या असे गृहित धरू की हे अख्खे 7 करोड मोदींच्या विरोधातच मत टाकतील. म्हणजे मोदींना मत देणारे एकूण 29 करोड भारतीय....म्हणजेच एकंदर मतदारांच्या @53 टक्के..आता दुसरं महत्वाच म्हणजे 542 lok sabha मतदारसंघात ह्या लाभार्थींचं distribution कसं आहे व सोबतच index of opposition unity कसा आहे, हे देखील आहे. अमित शहानी बूथ प्रमुखांना त्या त्या मतदारसंघातील लाभार्थी ची सूची देऊन mobilise करायला लावण्या बद्दलच्या बातम्या काही मिडीयानी प्रसारीत केल्या आहेत... राजीव गांधीना 1984 मधे 425 जागा मिळाल्या होत्या त्यावेळी 41% मतं मिळाली होती. तेव्हा index of opposition unity आजच्या 2019 च्या तुलनेत बराच low होता, तसल्याच आणी comparable low level of index of opposition unity वर 2014 मधे मोदींनी फक्त 18 करोड (@32%) मतांच्या बळावर 282 जागा मिळवल्या होत्या...ह्या वेळी with much higher index of opposition unity मुळे 50% अधिक मतं मिळवूनही ते 400 पार करणार नाही पण 300 सहज पार करतील...हे समजणं अवघड नाही, जर गणित समजून घ्यायची तयारी असेल तर.

    ReplyDelete
  19. खूप छान आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण ,भाऊसाहेब आपला राजकीय अंदाज अचूक आहे !

    ReplyDelete