Friday, May 10, 2019

सवयीच्या गुन्हेगारांची ‘आतिशी’योक्ती

Image result for atishi marlena

सहासात वर्षापुर्वी भारताच्या सार्वजनिक जीवनात एक नव्या गुन्हेगारांची टोळी पांढरपेशा मुखवटे लावून अवतरली. आजकाल त्यांना लोक आम आदमी पक्ष म्हणून ओळखतात. कुठल्याही बदमाशांना आपला हिडीस चेहरा लपवून समाजात प्रतिष्ठीत व्हायचे असले, मग आधी कुठल्या तरी साधू महात्म्याच्या आश्रयाला जावे लागते. केजरीवाल आणि त्यांच्या टोळीने तशीच चतुराई केलेली होती. त्यांनी समाजात विविध क्षेत्रात काम करणार्‍यांना समाजसेवींना म्हणून एकत्र करून लोकपाल नावे आंदोलन उभे केले. त्यातून आपला मुखवटा लोकांसमोर उद्धारक म्हणून पेश करून घेतला आणि नंतर एक एक करून अशा सज्जन साधूंना बाहेरचा रस्ता दाखवला. आपला धंदा प्रस्थापित केल्यावर त्यांचे खरे गुन्हेगार मुखवट्यात समोर येऊ लागले. हे लोक कसे सवयीचे व स्वभावानेच गुन्हेगार आहेत, त्याचे ट्रकभर पुरावे आपल्यासमोर आजपर्यंत आलेले आहेत. आपले पावित्र्य सिद्ध करून साधूसंतांनाही गुन्हेगार म्हणून बालंट आणण्यात या टोळीचा हात खरेखुरे माफ़ीयाही धरू शकणार नाहीता. तसे नसते तर कालपरवा मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या थोबाडीत मारण्याचे नाटक रंगले नसते आणि ऐन मतदानाचा दिवस जवळ आल्यावर आतिशी नावाच्या आप उमेदवाराने आपले चारित्र्यहनन गौतम गंभीर याने केल्याचा तमाशा मांडला नसता. खळबळजनक बातम्या किंवा ब्रेकिंग न्युजसाठी हपापलेल्या वाहिन्यांच्या उतावळेपणाचा गैरफ़ायदा घेत भल्याभल्यांना बदनाम करण्याचा ब्लॅकमेलिंगचा धंदा या टोळीने प्रतिष्ठीत केला आहे. आतिशी हे त्यातले नवे पात्र आहे. बाकी खेळ व नाटक जुनेच आहे. आज या महिलेला महिलांची सुरक्षा व प्रतिष्ठा आठवली आहे. मग त्यांच्याच पक्षाचा संदीपकुमार नावाचा मंत्री महिलेना केवळ रेशनकार्ड देण्यासाठी तिचे लैंगिक शोषण करीत होता, तेव्हा हीच आतिशी कुणाच्या चादरी धुत बसली होती?

Image result for aap minister in sex scandal

दोन वर्षापुर्वी संदीपकुमार नावाचा दिल्लीच्या केजरीवाल सरकारचा एक मंत्री महिलांचे विविध सरकारी लाभ देण्यासाठी लैंगिक शोषण करतो, अशी चर्चा होती. त्यावर कुठलीच कारवाई केजरीवाल किंवा आतिशीचे आज अश्रू पुसणारे शिसोदिया काहीही कारवाई करीनात, तेव्हा कुणा पिडीताने त्याच लैंगिक शोषणाचे चित्रण करून सिडीच केजरीवालना पाठवली. ते चित्रण तब्बल पंधरा दिवस आपच्या नेतृत्वापाशी पडलेले होते आणि संदीपकुमार आणखीन महिलांचे शोषण करीत होता. अखेरीस तेच चित्रण वाहिन्यांच्या हाती लागले आणि त्याचे प्रक्षेपण सुरू झाले; तेव्हा घाईगर्दीने केजरीवालनी संदीपची पक्षातून हाकालपट्टी केली. त्याला मंत्रीपदावरून दुर केले. त्यावेळीही आतिशी नावाची विदूषी आम आदमी पक्षाची नेता आणि प्रवक्ता होती. तिने असा कुठला निषेध संदीपकुमार याचा केला होता काय? त्याला पाठीशी घालण्यापासून मंत्रीपदापर्यंत आणून सन्मानित करणार्‍या केजरीवाल शिसोदियांचा कान या विदुषीने पकडला होता काय? की याच तथाकथित शुद्ध चारित्र्याच्या महिलेला आपकडून चाललेले लैंगिक शोषण म्हणजे स्त्रियांचा उद्धार वाटला होता? की अन्य कोणी महिलांविषयी गैर शब्द बोलल्यास पाप होते आणि आपच्या लोकांनी लंगिक शोषण केल्यास महिलांचा उद्धार होतो, असे आतिशीला म्हणायचे आहे? सध्या त्या पुर्व दिल्लीतून आपच्या लोकसभा उमेदवार आहेत आणि अचानक त्यांच्यावर गलिच्छ आरोप करणारे एक पत्रक काही वस्त्यांमध्ये वाटले गेले. तेव्हा या विदुषीला अकस्मात महिलांची प्रतिष्ठा आठवली आहे. पण जेव्हा संदीपकुमार अनेक महिलांचे शोषण आपचा मंत्री म्हणून करीत होता, तेव्हा आतिशीच्या सर्व संवेदना बोथट होऊन गेल्या होत्या. बदमाशी किती प्रतिष्ठीत झाली आहे आणि माध्यमांसह वाहिन्यांवरच्या पत्रकारांची स्मरणशक्ती किती दुबळी झाली आहे, त्याचा ही ‘आतिशी’योक्तीपुर्ण म्हणजे जिताजागता पुरावाच नाही काय?

पहिली गोष्ट म्हणजे असे काही घडले, तर आतिशी वा तिच्या पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करायला हवी होती. दुसरी गोष्ट म्हणजे थेट नजिकच्या पोलिस ठाण्यात जाऊन अशी पत्रके वाटणार्‍या विरोधात तक्रार करायला हवी होती. एखादी महिला चारित्र्यहननाने विचलीत झाल्यावर पत्रकार परिषाद घेऊन त्याचाच गवगवा करीत नाही. करणारही नाही. पण आतिशी व एकूण आम आदमी पक्ष नावाची टोळी, कंड्या पिकवण्यात कुशल आहेत. त्यांना सत्याशी कर्तव्य नसते, की सत्य सिद्ध करण्याची गरज नसते. खोटे सांगून त्याचे लाभ उठवण्यासाठी त्यांना आरोपबाजीत रस असतो. म्हणून त्यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन भाजपावर आरोप केला. भाजपाचा उमेदवार गौतम गंभीर याच्यावर आरोप केले. पण तक्रार मात्र कुठे केली नाही. हेच आजवर केजरीवाल किंवा आम आदमी पक्षाच्या अन्य नेत्याच्या बाबतीत सतत होत आलेले आहे. त्यांना कोणी थप्पड मारतो, अंगावर शाई चिखल फ़ेकतो, तोंडाला काळे फ़ासतो. मग हे लोक ते कलंक मिरवित आधी माध्यमांसमोर येतात आणि त्याचा डंका पिटुन घेतात. नंतर चौकशी होते, तेव्हा असे पाप करणारे यांचेच कोणीतरी भाऊबंद निघतात. कालपरवा केजरीवालना थप्पड मारणाराही असा त्यांच्याच पक्षाचा जुना समर्थक असल्याचे निष्पन्न झालेले आहे. ज्यांनी अशा खोट्या आरोपासाठी केजरीवाल यांना कोर्टात खेचले, त्यांच्यासमोर निमूट लोटांगण घालून नंतर केजरीवालनी माफ़ीनाम्याचा उच्चांक प्रस्थापित केला आहे. यातून एक गोष्ट साफ़ सिद्ध झालेली आहे, आपच्या कोणाही नेत्यावर हल्ला झाला, तर त्याचा बोलविता धनी त्याच पक्षात असतो. म्हणून आता आतिशी यांच्या चारित्र्यहननाची कथाही त्याला अपवाद असण्याचे काही कारण नाही. एका आप सोशल ग्रुपवर त्या़च निंदनीय पत्रकाचे चित्र टाकून आपचा हा ग्रुप ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करीत असल्याचे उघडकीस आलेले आहे.

मुद्दा इतकाच, की हे लोक किती खालच्या दर्जाचे गुन्हेगार आहेत, त्याची यातून साक्ष मिळालेली आहे. राजकीय लाभासाठी हे लोक आपल्याच एका महिलेची बेअब्रु करायलाही मागेपुढे बघत नाहीत, असा त्यातला आशय आहे. अन्यथा ज्या पत्रकाला शेंडाबुडखा नाही, त्याची छपाई वा वितरण भाजपाच्या आमदाराने केल्याचा बेछूट आरोप कशाला झाला असता? तर खुलासे तपास होईपर्यंत मतदान उरकले जाणार आणि तेवढ्यात झटपट सहानुभूती मिळवून मते पदरात पाडून घ्यायची. इतक्या खालच्या स्तराला गेलेल्यांची ही टोळी आहे. पत्रके कोणी वाटली त्याचा शोध लागायचा आहे. पण तुमच्याच ग्रुपवर ते पत्रक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे खास आवाहन आतिशीची प्रतिष्ठा जपण्यासाठी असते, की सहनुभूतीची मते मिळवण्यासाठी असते? गुन्हेगारांची एक कार्यशैली असते, तिला मोडस ओपरेन्डी म्हणतात. गेल्या पाचसहा वर्षात आम आदमी पक्ष नावाच्या गुन्हेगार टोळीने भारतीय राजकारणात एक नवी मोडस ऑपरेन्डी आणलेली आहे. ते राजकीय लाभासाठी कुठल्याही थराला जाऊन गुन्हेगारी, अश्लिल वा घृणास्पद कृत्य करू शकतात. हा आजवरचा अनुभव आहे. संदीपकुमारने गरजू महिलांचे शोषण केले होते आणि शिसोदिया वा आतिशीने सहानुभूतीच्या मतांसाठी आपलेच चारित्र्यहनन करण्यापर्यंत मजल मारलेली आहे. एकूण आपचे लोक बघितले व त्यांची वक्तव्ये कृत्ये व देहबोली अभ्यासल्यास, गुन्हेगारी मनोवृत्तीचा गहन अभ्यास होऊन जाऊ शकेल. सामान्य गुन्हेगारापेक्षा पांढरपेशा गुन्हेगार समाजाला अधिक धोकादायक असतात आणि आम आदमी पक्षाची टोळी तशीच आहे. कारण त्यांनी सामान्य बुद्धीच्या लोकांना भारावून टाकत, सुशिक्षितांची गुन्हेगारी टोळी देशाच्या राजधानीत प्रतिष्ठीत केलेली आहे. शरमेची गोष्ट इतकीच, की आतिशीसारखी सुशिक्षित महिला अशा आपल्याच चारित्र्यहननालाही प्रोत्साहन देते आहे.

9 comments:

  1. https://m.facebook.com/story.php?story_fbid=354285855222676&id=234508140533782 हा बघा अजून एक पुरावा त्या अतिशी चा

    ReplyDelete
  2. भाऊ, पातळी इतकी खालावली आहे की नविन कडक आचार संहीता आणि तिची कडक अंमलबजावणी आवश्यक आहे. पुराव्याशिवाय कुठलेही आरोप नकोच.निवडणूक नसताना सुध्दा एक वेगळी आचारसंहीता पाहिजे.कायदाचा धाक हा असायलाच हवा.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी कहर झाला आहे याचा. खरच काहीतरी कड़क अंमल बजावणी होणे आवश्यक आहे याबाबत. सामान्य जनतेला या सगळ्याचा उबग येतो आणि एक सुप्त तणाव जाणवत राहतो

      Delete
  3. भाऊ,आपण केजरीवाल व आम आदमी पुरते वस्त्रहरण केले आहे.केजरीवाल यांनी लोकांकडून सर्वात जास्तवेळा मार खाण्याचा विक्रम केला. सुरुवातीला लोकांचे लक्ष वेधण्यात व सहानुभूती व थोडी मते मिळवण्यात यश मिळाले पण मागाहुन नेहमी असे कृत्य करणारी व्यक्ती आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता आथवा समर्थक निघायची.केजरीवाल यांची ही सहानुभूती मिळविण्यासाठी असलेली चाल आता सगळ्यांना माहित झाली आहे.केजरीवाल आता चेष्टेचा विषय झाले आहेत व स्वतःचा व 'आप'पक्षाचा ह्रास करण्यास ते स्वतः जबाबदार आहेत.काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात केजरीवाल यांनी 'आप' ची स्थापना केली व दिल्ली मध्ये काँग्रेसने युती करावी म्हणून हेच केजरीवाल काँग्रेस पक्ष श्रेष्ठींची मनधरणी करत होते या पेक्षा दैव दुर्विलास तो काय?२३ तारखेला भाजप परत सत्तेवर येणार हे स्पष्ट होत जात आहे तसे महागठबंधन मधिल बेचैनी व अस्वस्थता त्यांच्या वागण्यातुन व बोलण्यातून दिसत आहे.जाणता राजा शरद पवार आता म्हणत आहेत की EVM मशिन मध्ये घड्याळाचे बटण दाबल्यावर कमळाला मत जाते हे मी पाहिले आहे. जर पाहिले तर त्याच वेळेला त्यांनी तक्रार का नाही केली?त्यांच्या बोलण्यावर अजूनही लोकांचा विश्वास आहे आसा त्यांचा गोड गैरसमज असावा.काँग्रेसला संपवण्यात व भाजपला विजयी करण्यात आता राहुलचे गुरु सॕम पित्रोडा पण मागे नाहीत.आज त्यांनी १९८४च्या शिखांच्या कत्तली बद्दल जे निर्लज्जपणे विधान केले त्याचे तीव्र पडसाद उमटले व आता थोड्या वेळापूर्वी सॕम पित्रोडा यांनी माफी पण मागितली. पण व्हायचे ते नुकसान झालेच.भाऊ नेहमी प्रमाणेच लेख अप्रतीम.आता मतदानाच्या २फेर्या बाकी आहेत त्याबद्दल कृपया आपले विचार लिहा.धन्यवाद.

    ReplyDelete
  4. https://youtu.be/zSEEPkESRWI

    ReplyDelete
  5. Very nice Sir, precise as usual.

    ReplyDelete
  6. Angry young man
    भाऊ
    1कच नंबर
    👍👍👍👍👍👍👍👍👍

    ReplyDelete
  7. छान ...'आतीशी' योक्ति नव्हे तर ही 'आप' ची मतांसाठी आतीशी युक्ति!

    ReplyDelete