Monday, May 6, 2019

उलटा अंबानी राहुल को डांटे?

Related image

रबर ताणले जाते हे खरेच, पण इतकेही ताणू नये, की तुटण्याची वेळ यावी. ही गोष्ट आपल्या पुर्वजांनी सांगून ठेवलेली आहे. पण राहुल गांधी यांचे पुर्वज बहूधा भारतीय नसावेत. अन्यथा त्यांनी राफ़ायलचा घोळ इतका तुटेपर्यंत ताणला नसता आणि आज त्यांच्या तोंडावर त्यांचेच पाप फ़ेकण्यापर्यंत अनील अंबानी यांच्यावर वेळ आणली नसती. राफ़ायलच्या करारात अनेक कंपन्यांना भागिदार करून घेण्यात आलेले आहे आणि त्यातला एक भारतीय उद्योगपती अनील अंबानी आहे. पण तितकेच टुमणे लावून राहूल यांनी असा गहजब माजवला, की जणू पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनील अंबानी यांच्या गाळात रुतलेल्या कंपनीला त्यातून बाहेर काढण्यासाठीच राफ़ायलचा खरेदी करार केला असावा. हे करताना मोदींना लक्ष्य करणेही समजू शकते. कारण ते राजकारण होते. पण इतकी शुद्ध राहुल गांधींना असते कधी? समोरच्यांनी टाळ्या वाजवल्या, किंवा झिंदाबादच्या घोषणा दिल्या; की राहुल भरकटत जातात. त्यामुळेच पुढे पुढे मोदी बाजूला पडले आणि अंबानी हेच लक्ष्य होऊन गेले. सहाजिकच या बेताल व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी अनील अंबानी यांना राहुलच्या खानदानासह पक्षाची पापे जगासमोर आणण्याला भाग पाडण्यात आले. राहूल अजून राफ़ायल भ्रष्टाचाराचा कुठलाही पुरावा देऊ शकलेले नाहीत. पण अंबानी यांनी मात्र राहुलसह सोनिया व मनमोहन सिंग यांच्या पापाचा घडा उपडा केला आहे. युपीए व कॉग्रेसचे सरकार असताना आपल्याला एक लाख कोटी रुपयाची कंत्राटे देण्यात आली; तेव्हा आपण भ्रष्ट व बदमाश नव्हतो काय? असा सवाल विचारत अंबानींनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधींसह कॉग्रेसच्या पापावर बोट ठेवले आहे. आपण भ्रष्ट बदमाश होतो, तर आपल्याला राहुलच्या पक्ष सरकारने कोट्यवधीची कंत्राटे कशाला दिली? असा अंबानी यांचा सवाल आहे आणि त्यातच सत्य दडलेले आहे. ते सत्य कोणते आहे?

अंबानी यांचा उद्योग समूह कर्जबाजारी झाला होता आणि दिवाळखोरीत गेला होता. त्याला दिवाळ्यातून वाचवण्यासाठी मोदींनी त्यांना राफ़ायलच्या निमीत्ताने ३० हजार कोटी रुपयांचे कंत्राट मिळवून दिले; असा राहुलचा मूळ आरोप आहे. पुरावा कुठलाही नसला तरी नुसता आरोप आहे. पण तोच आरोप करण्याच्या नादात राहुलनी एक पुस्ती जोडली होती. ४५ हजार कोटी कर्जाच्या थकबाकीखाली दबलेल्या अंबानींच्या कंपनीला कंत्राट कशाला दिले? ते दिले म्हणजेच भ्रष्टाचार झाला, असा राहुलचा दावा आहे. हेच तर्कशास्त्र मानायचे, तर २००४ ते २०१४ या कालखंडात अनील अंबानी यांना मनमोहन सोनियांच्या सरकारने कंत्राटे कशाला दिलेली होती? तेव्हा त्या कंपनीला कर्ज नसेल, तर अकस्मात मोदी सरकार आल्यानंतरच ती कंपनी दिवाळखोरीत कशाला गेली? की लाख रुपयांची कंत्राटे कॉग्रेस सरकारने दिली, पण त्यातले ४५ हजार कोटी रुपये कमिशन म्हणून खाल्ले आणि म्हणून अंबानी यांची कंपनी दिवाळखोरीत गेली? दरम्यान देशात सतांतर झाले आणि राहुल सोनिया सत्तेत नसल्याने अनील अंबानी वार्‍यावर पडले. त्यांच्या कंपन्या दिवाळखोरीत गेल्या? अनील अंबानी यांनी उपस्थित केलेला मुद्दा साफ़ आहे. आपण जर इतके बदमाश होतो, तर आपल्याला राहुलच्या कॉग्रेस पक्षाने महत्वाच्या प्रकल्पाची कामे कशाला सोपवली होती? विमान बनवण्याचा अनुभव नसल्याने अंबानी यांचा राफ़ायलमधला सहभाग गैरलागू असेल, तर मेट्रो किंवा तत्सम बाबतीत अंबानी यांचा अनुभव काय होता? मुंबईत मेट्रो उभारण्याच्या आधी अनील अंबानी यांनी जगात कुठे मेट्रोची उभारणी वा बांधकाम केलेले होते? की जगातले नियम राहुल गांधी यांच्या इच्छेनुसार बदलत असतात? मुद्दा इतकाच आहे, की लाखभर कोटींची कामे अंबानी यांना देताना अंबानी शुद्ध चारित्र्याचे होते आणि ३० हजाराचे काम देताना ते भामटे झाले. तर कसे व कोणत्या निकषावर?

अनील अंबानी यांचा साधासरळ प्रश्न आहे. पण राहुल कधी साध्या सोप्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. अशा प्रश्नांची उत्तरे चिदंबरम, कपील सिब्बल वा पित्रोडा यांच्याकडे ढकलून राहुल पळ काढतात. त्यामुळे अनील अंबानी यांनी प्रश्न विचारला, किंवा खुलासा मागितला म्हणून त्याचे उत्तर मिळण्याची अपेक्षा कोणी करू नये. त्यापेक्षा जे मुद्दे समोर आलेले आहेत, त्यातून आपापले निष्कर्ष काढायचे असतात. त्यामुळे राहुलचे आरोप आणि अंबानी यांनी दिलेला तपशील, लक्षात घेतल्यावर राहुल गांधींचा आटापिटा लक्षात येऊ शकतो. त्यांच्या सरकारने लाखभर कोटीची कामे अंबानी कंपनीला दिली आणि त्यातले ४५ हजार कोटी रुपये हडपले असतील, तर राफ़ायलमध्ये मोदींनीही काही कोटी हडपले असणार, हे राहुल आपल्या खानदानी अनुभवातून सांगू शकतात. कारण त्यांच्या पणजोबांच्या हाती सत्ता असल्यापासून संरक्षण साहित्य खरेदीत घोटाळे झालेले आहेत आणि त्यातच त्यांच्या पिताश्रींच्या राजकीय कारकिर्दीची इतिश्रीही झालेली आहे. नरेंद्र मोदी यांनी कालपरवा त्याचाच उल्लेख साफ़ भाषेत केला. तेव्हा मात्र राहुलची बोलती बंद झाली. त्यांनी शस्त्र ठेवल्याचा आव आणून ‘लढाई संपली’ असल्याचे सोशल माध्यमातून जाहिर करून टाकले. यातले राहुलपिता राजीव गांधी यांचा ‘भ्रष्टाचारी नंबर एक’ असा उल्लेख मोदींनी केला म्हणून हलकल्लोळ चालला आहे. मुद्दा राजीव हयात नसल्याचा नसून, त्यांच्यावर कुठले गंभीर आरोप झाले, त्याचा मुद्दा आहे. त्याला बगल देऊन मृतावर आरोप म्हणून पळ काढता येणार नाही. कारण आपल्या पित्याच्या प्रतिष्ठेची इतकी कदर आज राहुलसह प्रियंकाला वाटू लागली असेल, तर त्यांच्याच मारेकर्‍यांना तुरूंगात जाऊन भेटण्याची नाटके कशाला केलेली होती? शहीद पित्याच्या हत्येच्या एका आरोपीला युपीएच्या मंत्रीमंडळात घेण्यापर्यंत सत्ते़ची लाचारी पत्करणार्‍यांना प्रतिष्ठेच्या गोष्टी शोभत नसतात.

आजही राजीव गांधींच्या मारेकर्‍यांना शिक्षा माफ़ करावी, म्हणून द्रमुक हट्ट धरून बसलेली आहे आणि त्यांच्याशी मतांसाठी आघाडी करताना राहुलना शरम वाटली नाही. त्याबद्दल राहुलना जाब विचारणाची हिंमत नसलेल्या पत्रकारांना आज राजीव गांधींचे हौतात्म्य आठवले आहे. हे सगळे पुरोगामी हुतात्मे किंवा महापुरूष मोदी नावाच्या ‘श्रीरामचा पदस्पर्श’ होण्याच्या प्रतिक्षेत कुठेतरी अडगळीत शिळा होऊन पडलेले असतात काय? कारण नेहमीच्या राजकारणात त्यांचे हौतात्म्य, प्रतिष्ठा वा त्याग वगैरे राहुल सोनिया प्रियंकाच पायदळी तुडवित असतात. फ़क्त त्याला मोदींचा खास स्पर्श झाला, मगच त्यांच्यातले पावित्र्य तात्काळ प्रकट होत असते काय? जे काही मोदी बोलले ते व्यक्तीविषयक अपमानास्पद नसून, वास्तविक सत्य आहे. राजीव गांधी थेट देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांची प्रतिमा ‘स्वच्छ सभ्यगृहस्थ’ अशी होती. पण विश्वनाथ प्रतापसिंग या त्यांच्याच सहकारी मंत्र्याने बोफ़ोर्स खरेदीतला गैरव्यवहार चव्हाट्यावर आणून ती स्वच्छ प्रतिमा धुळीस मिळवली होती. त्यानंतर राजीव़च काय? कॉग्रेस किंवा गांधी कुटुंबियांनाही आपली मलीन प्रतिमा पुसून काढता आलेली नाही. पुढल्या काळात सोनिया व जावई वाड्रा यांनी त्या मलिनतेमध्ये आणखीन भरच घातलेली आहे. सभ्यता म्हणून नरेंद्र मोदींनी दिर्घकाळ हे सत्य बोलायचे टाळले. पण ‘उलटा चोर कोतवालको डांटे’ अशी स्थिती येते तेव्हा सभ्यतेला बाजूला ठेवून जगासमोर सत्य आणावेच लागते. मोदी असोत की अनील अंबानी असोत, त्यांच्या सभ्यतेचा कडेलोट राहुल वा कॉग्रेससहीत माध्यमांनी केलाच नसता, तर राजीव गांधींचा कळाकुट्ट इतिहास सांगण्याची वेळ आली नसती. आज राजीव गांधींसाठी अश्रू ढाळणार्‍या सर्वांनी राफ़ायलच्या अतिरेक करण्यापासून राहूल गांधीना वेळीच रोखले असते, तर झाकली मूठ सव्वाच कशाला दिड लाखाची राहिली असती. पण ना राहूल शुद्धीत आहेत, ना विरोधक भानावर आहेत. असते तर मुळात जुलै २०१८ मध्ये गांधी कुटुंबाच्या मालकीच्याच ‘नॅशनल हेराल्ड’ दैनिकात राफ़ायल हे मोदींचे बोफ़ोर्स असल्याची हेडलाईन कशाला झाली असती? मोदींनी दहा महिन्यांनी राजीव गांधींवर शिंतोडे उडवले असतील. पण सर्वात आधी राहुल-सोनियांची मालकी असलेल्या ‘नॅशनल हेराल्ड’नेच राजीव गांधींना भ्रष्टाचारी संबोधले, तेव्हा हे तमा दिवटे कुठल्या बिळात दडी मारून बसले होते?


15 comments:

  1. उघडंनागडं पाडलात सो काॅल्ड पुरोगामी लोकांना . बर मोदी विरोधातले काही मुद्दे असतील तर मुद्द्यांवर भर न देता, मोदी आणि मोदी द्वेषावर जास्त भर देतात, त्यामुळे फायदा मोदींनाच होतो, वर हेच बोंब मारतात सरकार केंद्र सरकार न राहता मोदी सरकार झाले. प्रत्यक्षात इतर मंत्रालयांचेही कामे होतात, त्या त्या कार्यक्रमात संबंधित मंत्री उपस्थित असतात, त्याची एकदोनदा बातमी ही येते,तसं नसतं तर डोळस जनतेला ते कळलंही नसतं. पण TRP मोदींमागे जाण्यातच आहे , त्यामुळे भांडणांचा शो उर्फ चर्चासत्र मोदीभोवतीच फिरतात .
    आणि भ्रष्टाचार तर स्वातंत्र्यानंरही होता, आणि आज जे डावे नेहरूंची पोथी गात आहेत, त्यावेळी आरोप करत होते. जनतेतही भावना होती, स्वातंत्र्यसेनानी पडले बाजूला आणि भलतेच सत्ता भोगताहेत. भ्रष्टाचार एवढा वाढला की शास्रीजींना गृहमंत्री असताना संथानाम समिती नेमावी लागली, हे आपल्या पिढीला माहिती आहे, नव्या पिढीला तितकसं नसावं. भाऊ आपण यावर लिहावं असं वाटतं.

    ReplyDelete
  2. It's a great read bhau ! You have combined the facts , the events and psych together in such a way as there can be no parallel to it . Thanks !

    ReplyDelete
  3. आई गं .....
    लयं मारलाय....

    ReplyDelete
  4. भाऊ,
    जरा दमानं घ्या! या थोर मंडळींना अजून २३ मे चा निकाल 'याची देही याची डोळा'बघायचा आहे...

    ReplyDelete
  5. अप्रतिम विश्लेषण
    👍👍👍👍👍👍👍👍👍

    ReplyDelete
  6. लोकशाही नावाखाली यांना घरणेशही लादयची आहे राहुल नाहीतर प्रियांका मग तिची मुलं त्यांना निवडणूक प्रचारात आणून त्याचा बीज नक्कीच रोवला गेला आहे .हे सर्व करण्या साठी गांधी परिवार कुठल्याही टोकाला जाऊ शकतात

    ReplyDelete
  7. भाऊ तुम्ही यांच्यावर कितीही लिहलं तरी कमीच पडेल इतके हे भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत.

    ReplyDelete
  8. बोफोर्स प्रकरणात भाजपानेच सुप्रीम कोर्टात अपील करण्यास नकार दिला होता असे वाचनात आले , त्याबद्दलचे काही विश्लेषण करू शकाल का? आताचा लेख उत्तमच.

    ReplyDelete
    Replies
    1. कारण तेव्हा राजीव यांचे निधन झाले होते. पण स्वीडन मध्ये भारत सरकारला दलाली देणाऱ्यांना शिक्षा झाली आहे

      Delete
  9. अफलातून भाऊ, म्रुत व्यक्तिबद्दल वाईट बोलायचे नसते. मरणांती वैराणी.. वगेरे वगेरे पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर वगेरे वगेरे कारण नसताना राजकारणात ओढून बदनामी करताना हे आठवले नाही? उपटसुंभ राज ठाकरे एरव्ही मराठी मराठी करत असतो पण सावरकरांच्या बदनामी बद्दल तोंडातून एक शब्द नाही पण राजीव गांधीचे सत्य मिरची प्रमाणे झोंबले.

    ReplyDelete
  10. एवढे परखड मत प्रदर्शन पुरोगामी आणि गुलामांना झेपेल काय? तसेही आपल्या मीडियाला गांधी घराण्याचा उद्दामपणा आत्मविश्वास वाटतो आणि बाकीच्यांचा आत्मविश्वास उद्दामपणा.
    भाऊ आपण खूप छान राजकारण समजावून सांगता. धन्यवाद.

    ReplyDelete
  11. भाऊ एकदम बरोबर

    ReplyDelete
  12. भाऊराव,

    कालंच सॅम पित्रोदा म्हणाले की मोदींनी राजीव गांधींना भ्रष्टाचारी म्हंटल्याने राजीव यांचा अपमान झाला आहे. त्यामुळे एक गुजराती म्हणून पित्रोदांना शरम वाटते. ठीके, वाटूद्या शरम. मग भोपाळ वायुकांडाचा अपराधी वॉरन अँडरसन याला भारताबाहेर पळून जायला राजीव गांधींनी मदत केली होती. त्याची शरम कोणाला वाटली पाहिजे ? याचा खुलासा पित्रोदांनी करायला हवा.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  13. मृत गांधी बद्दल बोलल्यावर मोदी वर फुटणाऱ्या मराठी बाण्याला, व पमृाराला तो सावरकरांवर तो पप्पू बोलतो तेव्हा गुंगी का येते? डिएनएमे गडबड है,

    ReplyDelete