Thursday, April 9, 2020

कोरोनानंतरचे जग

 “The battlefield is a scene of constant chaos. The winner will be the one who controls that chaos, both his own and the enemies.”  - Napoleon Bonaparte

G20 video conference gathered world leaders coping with ...

आज अवघ्या जगाला कोरोना व्हायरसने भेडसावलेले आहे आणि म्हणूनच त्या विरोधात चाललेल्या उपचारांना व उपाययोजनांना कोरोना विरोधातले युद्ध मानले जात आहे. अशावेळी जे कोणी आपापल्या देशाचे व समाजाचे नेतृत्व त्यात करत आहेत, त्यांना सेनापती मानणे भाग आहे. अशा युद्धात सेनापती जसा वागतो आणि जसे निर्णय घेतो, तसेच प्रत्येक देशाच्या नेत्याला वागणे भाग आहे. जे जगाचे नेतृत्व करण्याचा टेंभा मिरवतात, त्यांनाही तसेच संयमाने वागले पाहिजे व निर्णय घेतले पाहिजेत. दुर्दैव असे आहे, की यातला शत्रू अदृष्य आहे आणि त्याची सेनाही नजरेत चटकन येणारी नाही. त्यामुळे माणसाच्या बाजूने ती लढाई लढणारे सैनिक व सेनापती यांनाही स्वत:पुरता विचार न करता सार्वत्रिक हिताचा विचार करूनच पुढे येणे भाग आहे. जगासाठी म्हणून उपकारक निर्णय घेणे भाग आहे. पण तिथेही दुर्दैव आहे. बहुतांश देशाचे नेते आपापल्या देशापुरते निर्णय घेत आहेत आणि प्रसंगी आपापसात भांडतही आहेत. त्यामुळेच अल्पावधीतच कोरोनाचा व्हायरस सोकावत गेला आणि बघता बघता त्याने अवघ्या जगाला विळखा घातला आहे. अशा वेळी सेनापतीने कसे नेतृत्व दिले पाहिजे आणि युद्धामध्ये कसे जिंकता येते, त्याचे मार्गदर्शन शेकडो वर्षापुर्वी ख्यातनाम सेनापती नेपोलियन बोनापार्ट याने करून ठेवलेले आहे. त्याचे तेच विधान म्हणून सर्वात आधी उधृत केलेले आहे. काय म्हणतो नेपोलियन?

कुठलेही युद्धक्षेत्र हे व्यवहारी पातळीवर सलग चाललेले अराजक असते. त्यात आपल्या बाजूचे वा समोरच्या बाजूचे अराजक असो, दोन्हीवर नियंत्रण मिळवू शकतो, तोच ते युद्ध जिंकत असतो. आपल्याला त्या पद्धतीने कोरोनाच्या संकटाला सामोरा जाणारा कोणी जागतिक नेता आज दिसतो आहे काय? दुसरे महायुद्ध संपल्यावर अस्तित्वात आलेला अमेरिका हा महाशक्ती देश आहे आणि मागल्या आठ दशकात त्याने जगाला नेतृत्वही दिलेले आहे. कुठल्या देशातली समस्या असो किंवा दोनतीन देशातले वार्दविवाद असोत, अमेरिकेने त्यात हस्तक्षेप केला आहे किंवा त्यांना मदतही केलेली आहे. आरंभी सोवियत युनियनशी अमेरिकेची स्पर्धा चालायची. पुढल्या काळात मुक्त अर्थव्यवस्था आली आणि जागतिकीकरणाने जग एकत्र आणले गेले. त्यानंतर सोवियत साम्राज्य ढासळले आणि अमेरिका एकमुखी जागतिक नेता ठरला. चीन त्याला आव्हान देण्याइतका संपन्न देश झालेला आहे आणि अजून त्याला जगाला नेतृत्व देण्याची दृष्टीही लाभलेली नाही. अशा काळात कोरोनाने घातलेला घाव मानव जातीच्या जिव्हारी बसला आहे. त्यातून सावरायचे कसे ही मोठी चिंता होऊन बसली आहे. पुढारलेले श्रीमंत पाश्चात्य देश अगतिक झालेत, रुग्णशय्येवर पडलेले आहेत. पण कोणीही जागतिक चिंतन करणारा नेता जबाबदारी घेऊन संयुक्त प्रयत्नांसाठी पुढाकार घेताना दिसलेला नाही. अशावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची जागतिक प्रतिमा नवा चेहरा समोर आणते आहे.

प्रचंड लोकसंख्येचा देश असूनही भारतात अजून कोरोनाला बेताल मुसंडी मारता आलेली नाही आणि मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याही नगण्य आहे. साधनांचा तुटवडा किंवा सुविधांची मारामार असतानाही मोदींनी भारताला त्या संकटातून सावरून धरलेले आहे. कारण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन केलेली कारवाई भारताच्या पथ्यावर पडली आहे आणि त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेही मोदींचे गुणगान केलेले आहे. योग्यवेळीच नव्हेतर नेमक्या वेळी लॉकडाऊनचा निर्णय अंमलात आणण्याचा धोका पुढारलेल्या देशांना घेता आला नाही. पण लोकसंख्येचा प्रचंड पसारा असूनही मोदींनी भारतात लॉकडाऊन हाच आजच्या काळातला निर्णायक उपाय असल्याचेच सिद्ध केलेले आहे. त्याचे कौतुक व अनुकरण सुरू झाले आहेच. अमेरिकेसारखा महाशक्ती देश भारताने उपयोगी औषधे पाठवण्यास मान्यता दिली म्हणून जाहिरपणे आभार मानतो आहे. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी तर रामायणाचा हवाला देऊन मोदींना संजिवनी बुट्टी देणारा संकटमोचन हनुमान ठरवलेले आहे. त्यातले व्यक्तीगत गुणगान बाजूला ठेवून राजकीय पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. कुठलाच देश आपला गेलेला तोल संभाळू शकत नाही अशा काळात मोदींनी भारताच्या आरोग्याचा तोल संभाळलाच आहे. पण इतर गडबडून गेलेल्या देशांना मदतीचा हात पुढे केला आहे. त्याला नेतृत्वाची कसोटी म्हणतात. जगभर मोदींचे कौतुक त्या नेतृत्व गुणांसाठी चालू आहे.

जेव्हा कोरोनाचा उदभव जागतिक होण्याची शक्यता दिसली, त्याची चाहुल सर्वात आधी भारताला लागली म्हणावे लागेल. कारण त्याचा जागतिक परिणाम ओळखून भारताने मोठ्या हालचाली सुरू केल्या. जागतिक आरोग्य संघटनेने त्याला महामारी जाहिर करण्यापुर्वीच मोदींनी सार्क देशांच्या व्हिडीओ कॉन्फ़रन्सचा प्रस्ताव पुढे केलेला होता आणि त्यानंतर लगेच जी-२० देशांच्या नेत्यांना तशाच पद्धतीने विचार करायला प्रवृत्त केलेले होते. म्हणजेच जगाने एकत्रितपणे कोरोनाच्या बंदोबस्ताला सामोरे गेले पाहिजे; ही भूमिका भारताकडून मांडली गेली. मोदींच्या दुरदृष्टीने या संकाटाचा पल्ला प्रथम ओळखला आणि देशाच्या सीमांपलिकडे या युद्धाची व्याप्ती जगाला समजून घ्यायला भाग पाडले. प्रत्येक देशाला आपल्यापुरती लढाई लढून कोरोनाला हरवता येणार नाही, हे समजावणारा  दुसरा कोणी नेता जगात आहे काय? एका बाजूला मोदी आपल्या देशांतर्गत कठोर उपाय योजत होते व त्यासाठी सामान्य जनतेलाही विश्वासात घेऊन पावले टाकत होते. दुसरीकडे त्यांनी आशिया व संपुर्ण जगाला त्यापासून वाचवण्यासाठी काय करायला हवे, त्याची भूमिका मांडायला सुरूवात महिनाभर आधीच सुरू केली होती. प्रत्येक देशात त्याविषयी अराजकच होते आणि भारतातही त्याचे नको तितके हिडीस राजकारण चालूच होते. पण सगळ्या अराजकाला नियंत्रणाखाली राखण्याची क्षमता दाखवणारा नेता फ़क्त भारतात होता आणि हळुहळू त्याला आता जगाची मान्यताही मिळू लागलेली आहे.

थोडक्यात कोरोनाचा पुढल्या काळात पराभव होऊन मानवजात त्यातून सावरून उभी राहिल यात शंकाच नाही. पण तेव्हाचे जग कालच्या जगासारखेच तंतोतंत असणार नाही. त्याचा चेहरामोहरा आमुलाग्र बदललेला असेल. त्याचे नेतृत्व करणारे चेहरे साफ़ बदलून गेलेले असतील. त्या नेतृत्वाचे स्वरूपही आजच्यापेक्षा बदललेले असेल. श्रीमंत वा शस्त्रसज्ज असलेले देश वा त्यांचे बळाचा वापर करून पुढाकार घेणारे नेतृत्व मागे पडलेले असेल. मानवी जगाला संकटातून वाचवणारा व मदतीचा हात निर्भेळ मनाने देणारा समाज वा नेता, जगाचे नेतृत्व करायला पुढे आलेला असेल. जगाचे नेतृत्व कसे हवे त्याची आज कठोर परिक्षा चालू आहे आणि त्यात ब्राझील अमेरिकेने मत दिलेले आहे. जपान इस्रायल आधीच भारताचे समर्थक झालेले आहेत. पण कोरोना विरुद्धच्या युद्धात जगभरच्या देशांना भारताने योग्य उदाहरण घालून दिलेले आहे. अर्थव्यवस्था, उद्योग वा व्यापारापेक्षाही माणूस आधी जगवला पाहिजे आणि तो जगवला तर नवी अर्थव्यवस्था उभारता येईल, हा नव्या जगासाठीचा साक्षात्कार आहे. चीन असो वा अमेरिका व पाश्चात्य देश असोत; त्यांना माणूस व अर्थकारण यातून योग्य निर्णय घेता आले नाहीत किंवा समतोल राखता आलेला नाही. त्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागत असताना कोट्यवधी लोकांना जगवण्याचा मोदींनी घेतलेला वसा, कोरोना नंतरच्या जगासाठी उद्धाराचा नवा मार्ग असणार आहे. तो जगाची राजकीय भौगोलिक आर्थिक रचना बदलून टाकणार आहे. जनतेचा नेता कसा असावा आणि संकटकाळात सेनापती कसा असावा, त्याचा वस्तुपाठच भारताकडून जगाला दिला जातो आहे. २०२१ सालातले जग कसे असेल? प्रत्येकाने आपापल्या प्रतिमा रंगवाव्या, लॉकडाऊनमुळे भरपूर वेळ आहे ना आपल्याला?

23 comments:

  1. एक दिवस भारत विश्वगुरू बनेल आणि विश्वनायक असतील भारत भाग्यविधाते, आपला अभिमान पंतप्रधान नरेंद्र मोदी.

    ReplyDelete
  2. भाऊ .................लेख नेहमीप्रमाणे अप्रतिम. तुमचे ' ब्लॉग ' लेखन म्हणजे जुने संदर्भ आणि त्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळाबद्दल कल्पनाशक्तीचा सुंदर अविष्कार असतो...!! धन्यवाद

    ReplyDelete
  3. भाऊ कोरोना तिसरे महायुद्ध मानले जाते आणि तिसऱ्या महायुद्धानंतर भारत जगाचे नेतृत्व करील अशी नोस्रोदेमस ची भविष्यवाणी आहे याची तर्कसंगती आपल्या लेखात दिसते आहे

    ReplyDelete
  4. सुंदर लेख... मोदींनी खरंच असें काम केले आहे की त्यांना नको म्हणणारे बाकीचे देश सुद्धा त्यांच्या बरोबर जातील

    ReplyDelete
  5. भाऊ..
    खूप छान.
    आपले लेख विचाराला चालना देणारे असतात. राजकारण आणि त्याबाबत समाजावर होणारे परिणाम याचा उलगडा होतो. परिणाम जागतिक स्तरावर अथवा देश पातळीवर असोत.

    या भारत भूमीतून काँग्रेस सारखा करोना निघून जाणे आवश्यक आहे. आजही येणाऱ्या त्यांच्या प्रतिक्रिया सडक्या मनोवृत्तीचे दर्शन घडवितात. मग तो सिब्बल असो किंवा शरद पवार. असे नेते समाजाचे भविष्यकालिन मोठं नुकसान करीत आहेत. समाजाचे नेतृत्व सर्वांना पुढे घेऊन जाणारे असावे हे या लोकांना कळत नाही याचे आश्चर्य वाटते. शेवटी त्यांची मनोवृत्ती त्याना लखलाभ. मतदार राजा देखील आता शहाणा झाला आहे. यांची पोथी ओळखून आहे.

    धन्यवाद
    विनोद शेट्टी

    ReplyDelete
  6. Namaskar Bhau, Wah! kai yogya va Uddatta vichar mandale aahet. Dhanyawad. Tumhi mage Gujrat sandarbhat mhanala hotat ki disaster management madhe Shri. Modijinini khup changale kam kele aahe. Pan hi far motthi ladhai aahe pan tyat suddha te tasubhar kami padale nahit.

    ReplyDelete
  7. छान लेख. मुक्तता बर्वे यांच्या व्हीडिओ वरचा लेख विचार करावा असा, मनाला भावणारा आहे. धन्यवाद

    ReplyDelete
  8. खरंच 2021 पर्यंत आपल्या भारत देशांबरोबरच जगालाही एक चांगलं नेतृत्व मिळेल. माणुसकी ला महत्व येईल आणि आपल्या देशाला खुप वर्षांनी चांगले दिवस येतील नक्कीच.

    ReplyDelete
  9. भाऊ अगदी बरोबर सर्व जगात खुजे नेतृत्व आहे. जो तो देश फक्त आणि फक्त स्वताचाच विचार करतोय.भारतवर्षाचे पर्यायाने जगाचं नशिब चांगले आहे मोदी सारख नेता जगात आहे.पुरातनकाळापासून भारतीय संस्कृतीने नेहमीच संपूर्ण मानवजातीला विचार केला आहे. मा.मोदी असा संस्कार झालेलं आहेत. भारताचे भविषेश मोदींच्या हाती सुरक्षित आहे फक्त आपण सर्वानी त्यांना साथ देऊ या.

    ReplyDelete
  10. भाऊ, तुमचे परिस्थितीचे विश्लेषण करण्याची क्षमता अफाट आहे, म्हणूनच आपले अंदाज सहसा चुकत नाहीत.
    पण मोदी यांच्या नावाची कावीळ झालेल्यांना हे कधीच कळणार नाही. सध्या चाणक्य म्हणून मिडायाने प्रसिद्ध केलेले पवार या परिस्थितीत सुद्धा अजूनही मुस्लिमप्रेमातच मग्न आहेत कारण त्यांना प्रथम मतदार हवेत देशाचे काहीही होवो. तब्लिगीनी देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढवण्यासाठी चांगलाच हातभार लावला त्याच्या बातम्या सहाजिकच चांगल्याच ब्रेकिंग झाल्या लगेच पवारांचे पित्त खवळले. यांच्याकडे देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता नक्की आहे का?

    ReplyDelete
  11. आदरणीय भाऊ मी आपला ऑडिओ आणि व्हिडिओ युट्युब वर फॉलो करत असतो आणि त्यात व्यक्त केलेले विचार मला योग्य वाटतात.. गेल्या दोन व्हिडिओ बरे आपण पण माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या अवघड वेळेत पाठिंबा देण्याविषयी मत व्यक्त केलेत आणि ही राजकारणाची वेळ नाही हेही सांगितले ..मुद्दा मान्य आहे फक्त आपले लक्ष ह्या गोष्टीकडे वेगळी इच्छितो ही स्वतः उद्धव ठाकरे कोणतेही राजकीय भाष्य करत नाहीयेत परंतु सामनाच्या अग्रलेखातून जे अकलेचे तारे तोडले जात आहेत त्याला त्यांची मूकसंमती असल्यासारखेच आहे आणि त्यामुळे हा शिवसेनेचा दुतोंडीपणा आहे.. मोदींवर टीका करण्याची आणि कुठल्याही क्षुल्लक मुद्द्याचा बागुलबुवा करून सावना मध्ये वार्तांकन केले जाते विशेषता अग्रलेखात.. आणि दुसरे काही छापायला नसल्यासारखे महाराष्ट्र टाइम्स त्यांच्या ॲपमध्ये ते अग्रलेख तसेच्या तसे परत प्रकाशित करतात .. मी आपले लक्ष या सत्य ते कडे वेधू इच्छितो..

    ReplyDelete
  12. ज्या लोकांकड़े गमावण्यासारखे काही नाही ते आत्ता हाल सहन करत आहेत. कोरोना नंतरच्या काळात कशाचे मुल्य वाढेल व कशाचे कमी होईल सांगता येत नाही. अनेक श्रीमंत कंगाल होतील.

    ReplyDelete
  13. After korona,Bhartiya ,tarunanna jagatun khup naukarya uplabhda hotil. Bharat No. 1 economy banel. Rajkiya drushtya stable government pahije. 👍🙏🙂✅🙏

    ReplyDelete
  14. Protagoras paradox.
    (2000 year old Greek story)
    थोडक्यात ही गोष्ट खालीलप्रमाणे आहे.
    1. प्रोटागोरास हा एक नामांकीत वकील होता.
    2. एक गरीब परिक्षा पास केलेला विद्यार्थी अनुभवा साठी त्याच्याकडे काम करायला येतो.
    3. विद्यार्थी म्हणतो, "आज माझ्याजवळ पैसे नाहीत. मी जेंव्हा वकीली सुरु करीन आणि माझी पहिली केस जिंकीन, तेंव्हा त्या पैशातून मी आपली फ़ी (गुरुदक्षिणा) देईन."
    4. कालांतराने विद्यार्थी गुरुजवळ अनुभव घेउन प्राक्टीस सुरु करतो पण काही काम, न मिळाल्याने प्रोटागोरास ला फ़ी देत नाही.
    5. त्यामुळे प्रोटागोरास 'शिष्या कडून आपल्याला फ़ी मिळावी' अशी, आपल्या शिष्यावरच केस करतो.
    6. प्रोटागोरास विचार करतो,
    (i) मी केस जिंकल्यास मला फ़ी मिळेल.
    (ii) मी हारल्यास, शिष्य त्याची पहिली केस जिंकलेला राहील आणि म्हणून तो आपल्याला फ़ी देइल.
    6. शिष्य विचार करतो,
    (i) केस मी जिंकलो म्हणजेच - प्रोटागोरास हारेल आणि त्यामुळे फ़ी द्यायचा प्रश्नच नाही.
    (ii) केस मी हरलो, तरी फ़ी द्यायचा प्रश्नच नाही, कारण ठरल्या प्रमाणे मी जिंकलेल्या पहिल्या केस च्या कमाईतून मला फी द्यायची आहे.

    कोरोना विरुद्ध लढा काहीसा असाच आहे. कहीही केले तरी मानवजातीचे अभूतपुर्व नुकसान होणे निश्चित आहे. आता काय आणि कसे होते हे बघणे फक्त मानवाच्या हातात आहे.
    (i) Lockdown करुन लोकांचे जीव आधी वाचवावे तर; हा लढा लांबणार आणि परिणामी जगाची अपरीमित आर्थिक हानी होईल.
    (ii) Lockdown न करता साथ अमर्याद वाढू दिली तर; आर्थिक हानी फारच कमी होऊन जग लवकर आप-आपल्या कामाला लागेल - परंतू न भूतो न भविष्यती जीवहानी होईल हे निश्चित आहे.

    ReplyDelete
  15. भाऊ सुंदर.
    पण नेतॄत्व करण्यासाठी आर्थिक व सामरिक दॄष्टीनेही समर्थ असणे गरजेचे आहे.दिशा आपण बरोबर पकडली आहे.

    ReplyDelete
  16. धरल तर चावत,सोडल तर पळत अशी स्थिती करोना ने आणली आहे मोदी सरकारला या परिस्थितीत सर्व देशवासीयांनी साथ द्यावी ही कळकळीची विनंती
    भाऊ तुमचे आभार

    ReplyDelete
  17. कोरोनाचे आव्हान संपल्यावर आपली अर्थव्यवस्था सावरायला या सर्व देशांची काही मदत होईल का? शेतातली पिके कापणीला आलेली असताना, आंबा, कलिंगडे, द्राक्षे, खरबूज सारखी उन्हाळी फळे विकायला आलेली असताना लॉक-आउट करून आपण आर्थिक आणि कृषी दृष्ट्या खूप मोठी रिस्क घेतली आहे. त्याचा अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर खूप विपरीत परिणाम होईल असे वाटते. आजचे कोरोना बळी वाचवून उद्या लोक भूक बळी पडले तर आजचं मरण उद्यावर ढकलल्या सारखं व्हायला नको. जग खूप स्वार्थी आहे. सगळ्या देशांची अवस्था खराब आहे. मग कोणी आपल्या मदतीला येईल का?

    ReplyDelete
  18. आवडले. खूप छान लेख!!

    ReplyDelete
  19. घरातील कर्त्या माणसाचा अकाली मृत्यू एक पूर्ण कुटुंब दीर्घ काळ, फार मोठया संकटात टाकतो. म्हणून मनुष्य जगविणे सर्वप्रथम. शीर सलामत तो पगडी पचास. आर्थिक नुकसान २-३ वर्षात भरून काढता येईल. मोदिजींचे धोरणच बरोबर आहे. संकटात सर्व बरोबर आहोत.

    ReplyDelete
  20. भाऊ,करोना मुळे आज जगभर हैदोस माजवला आहे.ज्या चीन मुळे तो फैलावला आहे तेथे तो त्यांच्या एका प्रांत पुरता मर्यादित राहिला असे म्हणतात आणि आता तेथे त्याचा प्रसार कमी होऊन तो आटोक्यात ही आला आहे,अश्या बातम्या येत आहेत.
    चीन मध्ये लोकसंख्या अफाट असल्याने थोडीफार लोकसंख्या कमी झाली तरी त्यांना फरक पडत नाही. अमेरिका फ्रांस ब्रिटन सारख्या बहुसंख्य देशांची अर्थ व्यवस्था धोक्यात आली.बड्या कंपन्यांचे शेअर्सची खरेदी चीन करणारअसे बोलले जाते. हे जर खरेच घडले तर याला,'तिसरं महायुद्ध म्हणावे लागेल.या विषयी आपलं काय मत आहे.
    काही लोक याला नोस्त्रदेमस च्या भविष्यवाणीचा आधार देतात.कोरोनाच्या संदर्भात अश्या प्रतिक्रिया ऐकल्या, वाचल्या की मला एक जुना प्रसंग-भाषण आठवते..
    ‌अंदाजे १९६७-६८चे काळात पुण्यातील प्रसिद्ध वकील मा.ब.ना.तथा बाबा भिडे यांचे एक भाषण,भाषणाचा विषयआठवत नाही पण त्यात त्यांनी केलेले एक विधान पक्के स्मरणात आहे ते म्हणाले होते की, "भविष्यात जर तिसरे महायुद्ध झाले तर ते रणांगणावर, सैनिकांमध्ये होणार नाही तर ते राष्ट्रप्रमुख-सेनापती बसल्या जागेवर बटण दाबून हव्या असलेल्या देश्यावर सोडतील.त्यामळे तेथील केवळ जीवित हानी,मनुष्यप्राणी नष्ट होऊन त्या देशाची सर्व साधन संपत्ती सुस्थितीत आक्रमकांच्या ताब्यात जाईल."
    ‌आता चीन या पद्ध्तीने तर जगावर कब्जा करेल की काय असे वाटू लागले आहे.
    ‌दुसरी आपल्याला आनंद व समाधान देणारी बाब म्हणजे,'पंतप्रधान मोदींना जगाचे नेतृत्व करणारा नेता' अशी मान्यता हळू हळू मिळू लागल्याचे दिसूं लागली आहे.-येथे नोस्त्रदेमसचे भविष्य खरे होताना दिसते आहे असे काही जण म्हणताना दिसतात.
    ‌भाऊ आपण या सर्व गोष्टींकडे कसे पाहता. आपणाला काय वाटते

    ReplyDelete
  21. Bhau,Vadhawan cha case mole purna deshat Maharashtra chi badnami hot aahe. Tya baddal khi lihal ka? CM/HM ya donhi lokan na kalpana aselach na?

    ReplyDelete