Friday, April 10, 2020

गुडघाभर झब्बा, तोकडा लेंगा

Tablighi Jamaat members hiding travel history could incur murder ...

समोरच्याला पटवता येत नसेल तर त्याच्या मनाचा गोंधळ उडवून द्या; अशी इंग्रजीत एक उक्ती आहे आणि तिचा आशय सातत्याने पुरोगामी म्हणवणार्‍या लोकांत बघायला मिळत असतो. सध्या तर अशा धुळफ़ेकीने कहर केला आहे. दिल्लीच्या निझामुद्दीन संकुलात तबलिगी जमातचा जो मेळावा भरवला गेला होता, त्याला दिल्लीच्या पोलिसांनी परवानगीच कशाला दिली; असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. पण त्यासाठी मुळात परवानगी मागण्यात आली होती काय? किंवा देण्यात आली होती काय; त्याविषयी कुठलेही स्पष्टीकरण मिळत नाही. कारण हा मेळावा जाहिर समारंभ नव्हता. जिथे वर्षभर सातत्याने हजारोच्या संख्येने मुस्लिम मौलवी कायम येजा करीत असतात. तिथे एकत्र जमण्याविषयीच्या वेगळ्या परवानगीची गरजच नसते. उदाहरणार्थ कुठल्याही विवाह किंवा तत्सम सोहळ्याच्या जागा असतात, तिथे होणार्‍या समारंभासाठी कधी पोलिसांची परवानगी घेतली जात नाही किंवा मागितलीही जात नाही. असे सोहळे राजकीय स्वरूपाचे नसतात वा त्यातून कुठली गडबड होण्याची शक्यता नसल्याने त्यासाठी पोलिसांकडे जावे लागत नाही. निजामुद्दीन मर्कजच्या म्होरक्यांनी त्याचा खुलासा मागल्या आठदहा दिवसात अनेकदा केलेला आहे. तिथे वर्षभर देशी परदेशी मौलवींची येजा असल्याचे त्यांनीच कथन केले आहे. मग पोलिसांनी परवानगी देण्याचा विषय आला कुठून? शाहीनबागला तशी परवानगी आवश्यक होती, कारण ते धरणे सार्वजनिक जागी रस्ता वाहतुकीला व्यत्यय आणणारे होते. त्यालाही दिल्ली पोलिस रोखू शकले नाहीत आणि आज सवाल करणारे सर्व पुरोगामी पक्ष तर शाहीनबागचा तो कायदाभंग घटनेने दिलेला मूलभूत हक्क ठरवित होते. मग तबलिगला पोलिसांनी परवानगी देण्याविषयीचे प्रश्न म्हणजे निव्वळ दिशाभूल नाही काय? अगदी पवारांसारखे नेतेहि तो प्रश्न विचारतात. कारण त्यांना सामान्य जनतेची दिशाभूल करायची असते. लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करून तबलिगच्या पापावर पांघरूण घालायचे असते.

दुसरा मुद्दा असा, की मुस्लिमांच्या बाबतीत असे वारंवार होत राहिले आहे. त्यांच्या संस्था संघटनांनी नेहमी विविध कायदे व त्यानुसार निघालेले आदेश धाब्यावर बसवलेले आहेत. पण त्यावर बडगा उगारला, मग कोर्टाकडे जाऊन अल्पसंख्य म्हणून टाहो फ़ोडलेला आहे. अन्यथा आताही तबलिगी जमात किंवा त्यांच्या सदस्यांचे मुस्लिम वेशातले चित्रण दाखवण्याला पवारांसह पुरोगाम्यांनी आक्षेप कशाला घेतला होता? संघाच्या हिंदूत्वाची टवाळी करताना अर्धी चड्डी असा हेटाळणीयुक्त शब्द योजला जात असतो. थेट हिंदू म्हणायचे नाही, म्हणून काढलेली ती पळवाट आहे. हरकत नाही. मग हेच लोक बाकीच्या मुस्लिमांपेक्षा तबलिगी वेगळे दाखवण्यासाठी त्यांचेही गणवेशानुसार वर्णन कशाला करीत नाहीत? म्हणजे संघवाल्यांना अर्धी चड्डी संबोधता, तसेच तबलिगींना गुडघाभर झब्बा आणि तोकडा लेंगा, असे का म्हटले जात नाही? कारण जगभर पसरलेल्या तबलिगी सदस्यांचा तो गणवेश आहे. सामान्य मुस्लिमांपेक्षा तबलिगींचे हेच वेगळेपण नजरेत भरणारे आहे. पण तसे कधी होणार नाही. त्यांची पापेही लपवायला शद्बांची व युक्तीवादाची कसरत चालत असते. दिल्ली पोलिसांनी परवनागी कशाला दिली, हा तसाच फ़सवणुक करणारा युक्तीवाद आहे. मुद्दा परवानगीचा कधीच नव्हता. कोरोनाच्या फ़ैलावानंतर आणि भारतात त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता दिसल्यावर गर्दी जमा करणार्‍या घटना समारंभांना प्रतिबंध घालण्याची कारवाई सुरू झाली. दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आधी पन्नासहून अधिक लोकांची गर्दी होईल असे समारंभ टाळावेत असे आवाहन केलेले होते. त्यानुसार शाहीनबागचेही धरणे उठवता आले असते. कायद्याचा बडगा हाती घेऊन ते कशाला उठवले नाही, असा प्रश्न यातला कोणी विचारणार नाही. कारण त्या गर्दीचे हेच तर समर्थक होते. म्हणून तर तबलिगच्या परवानगीचे थोतांड माजवणारे शाहीनबागला परवानगी कशाला दिली; असे म्हणणार नाहीत की विचारणार नाहीत. त्यातूनच त्यांची बदमाशी साफ़ होते.

अल्पसंख्यांक आयोगानेही बातम्यांमध्ये तबलिगी जमातचा उल्लेख नको, अशी मागणी केली आहे. देशात कुठेही जाऊन पोहोचलेल्या तबलिगी जमातच्या सदस्यांनीच वणव्यासारखा कोरोना पोहोचवला असेल, तर त्यापासून सामान्य जनतेला अंधारात ठेवणे किती योग्य आहे? कारण ते निखळ सत्य असून, आपल्याला कोणापासून धोका आहे, याविषयी नागरिकांना काही वैचारिक भूमिका म्हणून अंधारात ठेवणे प्रत्यक्षात रोगप्रसारालाच हातभार लावणे ठरत नाही काय? अशा मागण्या करणारे विचारवंत वा राजकीय नेते असोत किंवा अगदी अल्पसंख्यांचा आयोग असो, त्याला आजच्या अपवादात्मक परिस्थितीचे भान आहे काय? आपण नेहमीच्या सर्वसाधारण स्थितीत आज जगत नाही. सामान्यत: ज्याला गुन्हा मानले जात नाही, अशा अनेक कृती वा वागणे आज गुन्हा घोषित केलेले आहे. उदाहरणार्थ तोंडावर मास्क लावणे वा आवरण राखणे सक्तीचे झाले आहे. कारण तसे केले नाही तर तुम्ही कोरोनाच्या प्रसाराला हातभार लावणारे म्हणून गुन्हेगार ठरवले जाता. मग ज्यांच्यापासून सर्वात आधी व वेगवान रोगप्रसार होऊ शकतो, असे झटकन ओळखता येणारे लोक लपवणे; म्हणजे नागरिकांना कोरोनाचे बळी व्हायला मदत करणे़च नाही काय? अन्य प्रसंगी जातीपाती वा वंश धर्मावरून भेदभाव करणे अयोग्य जरूर आहे. पण ज्या लोकांनी हा आजार देशभर फ़ैलावण्याला हातभार लावलेला आहे, ती संघटना वा तिचे नाव लपवण्यातून काय साध्य होणार आहे? आयोग वा अशा बुद्धीमंतांना त्याचे तरी भान उरले आहे काय? अशा खुळचटपणाने इटाली या प्रगत देशामध्ये किडामुंगीसारखी माणसे कोरोनाचे बळी ठरल्याचे तरी त्यांना ठाऊक आहे काय? इटालीत असेच तिथल्या राज्यकर्ता पक्षाने चिनी पर्यटकांना मिठ्या मारण्याचे आवाहन केले. त्यांच्यापासून दुर रहाण्याला वांशिक भेदभाव ठरवण्याचे पाप केले आणि १७ हजाराहून अधिक लोकांना कोरोनाच्या जबड्यात ढकलून दिले आहे.

नेहमीच्या कालखंडात आपण जे नियम कायदे वापरत असतो किंवा त्यातले अधिकार वापरत असतो, ते आजकाल घातक ठरणारे आहेत. कारण त्यातून मिळणार्‍या सवलतीचा आडोसा घेऊनच कोरोना जगभर पसरला आहे. आपण नेहमी मोकळ्या हवेत श्वास घेतो. ती मोकळी हवा घेण्यालाही आज प्रतिबंध घातला गेलेला असेल, तर अन्य बाबतीत खुळेपणा काय कामाचा? गेल्या आठदहा दिवसात तबलिगी जमातीच्या सदस्यांनी देशात सर्वदुर कोरोना पोहोचवला, त्यात सर्वाधिक बाधा मुस्लिमांनाच केलेली आहे. कारण हे तबलिगी मशिदीत आश्रय घेतात, मुस्लिम वस्तीतच जाऊन मुक्काम करतात. सहाजिकच निश्चींत मनाने त्यांच्या सहवासात येणारे बहुतांश लोक मुस्लिमच आहेत. म्हणजेच तबलिगी हे नाव लपवून आपण निरपराध मुस्लिमांना कोरोनाच्या सापळ्यात ढकलून देतोय, इतकेही अशा आयोगाला भान उरलेले नाही. तबलिगी लोकांचा एक गणवेश ठरलेला आहे आणि इतरांना त्याचा पत्ता नसला तरी मौलवी, काजी वा मुस्लिमांना नुसत्या गणवेशावरूनही तबलिगी ओळखता येतात. त्यामुळे त्यांचा संसर्ग टाळा हा संदेश त्वरेने कोट्यवधी मुस्लिमांमध्ये पोहोचण्याचा सोपा मार्ग म्हणजे प्रत्येक बातमीत तवलिगी शब्दाचा अगत्याने वापर करणे आहे. बाधा झाल्यानंतर त्यांना शोधण्यापासून उपचार करण्यापर्यंतचा उपदव्याप टाळण्याची तीच उत्तम सोय आहे. त्यात कुठलेही स्वातंत्र्य वा मानवी अधिकार आडवे येणार असतील, तर गुंडाळून ठेवण्याखेरीज गत्यंतर नाही. कारण माणूस जगवण्यापेक्षा मानवी अधिकार नावाचे शब्द वा तरतुदी महत्वाच्या नाहीत. माणुस जगला तरच त्याला अधिकार असतात. मेल्यावर कुठलाच अधिकार शिल्लक उरत नाही. पण आज मुस्लिमांचे हितसंबंध जपण्याचा आव आणणारेच मुस्लिमांच्या जीवावर उठलेले आहेत. मशिदीत मरण्यातले पुण्य सांगणारा मौलवी साद आणि तबलिग शब्द बातम्यातून टाळायला सांगणारे; एकाच माळेचे मणी आहेत. ते सर्व समाजाच्या कोट्यवधी लोकसंख्येचा जीव धोक्यात घालत आहेत.

20 comments:

  1. सत्य कथन
    खोटारडे राजकारणी स्वार्थासाठी जनता व देशाचा बळी देण्यासाठी कटीबध्द झाले आहेत

    ReplyDelete
  2. भाऊ, अत्यंत परखड. महाराष्ट्र सरकारने यासाठीच वॉटस् अँप, फेसबूकवर बंधने घातली आहेत. पण तळागाळापर्यंत जो संदेश पोहचायचा होता तो केंव्हाच पोहचला. हे आखूड लेहंगावाल्यानी देशात गोंधळ उडवताना आपल्याच भाऊबंधाना कोरोना बाधीत केले हे सत्य आहे आणि पवारांना ते झाकून देश धोक्यात टाकायचा आहे. देश धोक्यात गेला तरीही चालेल पण मतपेटी महत्वाची.

    ReplyDelete
  3. श्री भाऊ मला गेली कित्येक वर्षे हा प्रश्न आहे की मुस्लिम म्हटलं जी कायम अल्पसंख्याक, अस का आज त्यांची लोकसंख्या चांगली 30 कोटी आहे मग ते अल्पसंख्याक कसे, २.मुस्लिम च्या मधील दोष दाखवायला लागले की लगेच भावना दुखावतात मग आम्ही बहुसंख्य हिंदू आम्हाला भावना नाहीत का, ३. हे so called पुरोगामी मुस्लिमाना एका गोष्टीचे आवाहन का करत नाहीत काशी चे श्री विश्वेश्वराचे मंदिर का restore करा

    ReplyDelete
  4. घरात खाजगि जागेत बंदिस्त खाजगि सभाग्रहात मंदिर चर्च गुरुद्वार वा मशीदत कार्यक्रमास परवानगि घ्याविच लागत नाहि!

    ReplyDelete
  5. Waa, great, mala saglyat jast awadlele wakya :- "मशिदीत मरण्यातले पुण्य सांगणारा मौलवी साद आणि तबलिग शब्द बातम्यातून टाळायला सांगणारे; एकाच माळेचे मणी आहेत. ते सर्व समाजाच्या कोट्यवधी लोकसंख्येचा जीव धोक्यात घालत आहेत.,"

    ReplyDelete
    Replies
    1. तबलीग शब्द वगळा म्हणणारे तरी कोण आहेत ,ज्यांना राजकीय मतांची गोळा बेरीज महत्वाची आहे,ते कोण सांगायची गरज नाही

      Delete
    2. सध्याच्या ़फेसबुक पोस्ट जर पाहिल्या तर दिल्ली पोलिसांनी/ गृहमंत्री अमित शाहनी या मेळाव्याला परवानगी कां दिली अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, जे गैरलागू आहेत. आणि हे प्रश्न उपस्थित करणारे विशीष्ट राजकीय पक्षाला बांधील आहेत असेच दिसते.

      Delete
  6. तबलीगींना मुख्य बातम्यात झळकायचं नव्हतं तर कोरोना झाल्यावर स्वत:हुन दवाखान्यात भरती होऊन परीसर रिकामा केला असता, पोलीस व आरोग्य यंञणेला सहकार्य केले असते तर विषय चिघळला नसता.पण कोरोना बाॅंम्ब म्हणुन काम केलं तर त्यांची आरती करायची काय ? पवारांना महत्वाचे वेळी व गंभीर परीस्थीतीतही पचकण्याची घाणेरडी सवय आहे.त्यांना तबलीगीची एवढीच काळजी असेल तर त्यांना बारामतीत किंवा सिल्वर ओक मध्ये ठेवुन लाड करावेत. त्यांच्या असल्या कृृत्याबद्दल भारतीय त्यांना क्षमा करणार नाही.

    ReplyDelete
  7. Absolutely true Bhau.. Furogamyanna nahi karnar te.

    ReplyDelete
  8. Bhau as usual excellent article.
    One request- Prithiviraj Chavan yanche recent vaktvya regarding establishing PM Care fund when PM Relief Fund is already exists ya vishayawar Jagta Pahara madhye ek lekh lihava. Mazya mahiti pramane PM Relief Fund var Congress President ha ek trustee ahe. Independence milun 73 varshe houn dekhil eka pakshacha president Ka asava? Bharpur amount var pakshacha control asava tasech pahije tevdi amount kadhta yavi ( Karan Vajpayee tasech Modi yenyapurvi Royal Family ne appoint kelele P.M.hote) mhanun Congress party la tya funds varcha hold continue thevayacha ahe?

    ReplyDelete
  9. One Jagta Pahara article regarding appointment of Congress President as trustee on P.M. relief fund is requested.

    ReplyDelete
  10. १) खूपच मुद्देसूद विवेचन. प्रत्त्येक मुद्द्याला उत्तर दिले आहे २)तबलीक दिल्ली मध्ये परदेशीयांना प्रवेश दिला व तो २१ मार्च नंतर चालू ठेवला.३)त्यांना अंतरावर ठेवले नाही.४)देशभर पसरू दिले ५)आता ते कोठून आले हेही सांगायचे नाही हा अन्याय आहे. धन्यवाद. शेअरिंग

    ReplyDelete
  11. तोकडा लेंगा हे योग्य आहे

    ReplyDelete
  12. ह्या सगळ्या लोका़ची ओळख. नावा गावासहित जाहिर करावी मग त्यांना ओळखणारे लोक सावध होतील व प्रसार रोखता येईल. खरं तर असं शक्य आहे का

    ReplyDelete
  13. When you can't convenience,confuse him

    ReplyDelete
  14. भाऊ,तुम्ही नेहमी नेमके वर्णन करता त्यामुळे ते खूप भावते.शरद पवारांचे काय? ते नेहमीच असे पिल्लू सोडून देतात आणि मजा बघत बसतात आणि झाला तर त्यातून जो मिळेल तो राजकीय फायदा घ्यायचा फायदा घेत असतात.त्यांचे भक्त(फक्त मोदींचेच आहेत असे नव्हे) मात्र साहेबांच्या मनात काय चालले आहे हे कोणालाही कळणार नाही असे भाबडेपणाने म्हणत असतात.कुठलेही तत्व नसलेला अत्यंत स्वार्थी मनुष्य एवढेच त्यांचे सार्थ वर्णन.

    ReplyDelete
  15. धन्यवाद भाऊ, आपण ताब्लिगी आणि मरकज परवानगी या विषयावर सविस्तर खुलासा केला, म्हणजे हे राजकारणी लोक विनाकारण गैरसमज पसरवतात आणि लोकांची दिशाभूल करतात आजच्या या गंभीर वातावरणात सुद्धा राजकारण चालू आहे याचं नवल वाटत.

    ReplyDelete
  16. तोकडा लेंगा हा शब्द फारच कातडीबचाऊ आणि मचूळ वाटतो तसेच त्याच्या उच्चारणाने हवा तो परिणाम साधला जात नाही,कारण त्यात चपखलपणे नाही.

    तोकड्या लेंग्याला माननीय बाळासाहेब ठाकरे (पूर्वी) फारच योग्य शब्द वापरत असत.
    भाऊ,तो शब्द तुम्हाला माहित असून तुम्ही जाणीव पूर्वक टाळला आहे
    असो, वर्मी बाण लागणे महत्त्वाचे.

    ReplyDelete