Friday, April 24, 2020

ह्याला म्हणतात कर्मदरिद्रीपणा

CARTOON: Rahul Gandhi's earthquake a fiasco - UP Election 2017 ...

माझा एक समाजवादी मित्र आहे आणि अर्थातच तो पुरोगामी व कट्टर मोदी विरोधक आहे. हे वेगळे सांगायला नको. तर मार्च महिन्यात कोरोनाच्या बंदोबस्ताच्या हालचाली सुरू झाल्या, तेव्हा त्याची आरंभीची प्रतिक्रीया योग्य होती. जनता कर्फ़्युसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला आवाहन केल्याचे आपल्याला स्मरत असेल. त्याला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर संध्याकाळी देशाच्या कानाकोपर्‍यातून लोकांनी टाळ्या व थाळ्यांच्या गजरात आपल्या आरोग्य सेवक व सार्वजनिक कर्मचार्‍यांना अभिवादन केले. तेव्हा त्याने दिलेली प्रतिक्रीया बोलकी व उत्स्फ़ुर्त होती. बाकी सगळे पुरोगामी विश्लेषक पत्रकार टाळ्या व थाळ्यांची टिंगलटवाळी करण्यात मशगुल असताना या समाजवादी पत्रकार मित्राची प्रतिक्रीया नेमके भाष्य करणारी होती. २०२४ सालच्या लोकसभेनंतर मोदींच पुन्हा पंतप्रधान होणार, अशी त्याची प्रतिक्रीया होती. कारण त्याला जनमानस कळते आणि जो प्रतिसाद टाळ्या व थाळ्यांनी दिला, ती कोट्यवधी मते असल्याचे त्याला पुर्णपणे भान होते. त्या निव्वळ टाळ्या नव्हत्या, तर कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतरच्या भारताने व्यक्त केलेले ते मत होते, हे त्याला समजलेले होते. भले तो मोदी विरोधक वा मोदी द्वेष्टा असेल, पण त्याला मतांची जाण आहे आणि लोकशाहीत विचारधारेपेक्षा जनमताला मोल असते. त्यावर लोकशाहीचा डामडौल चालतो, इतकी जाणिव त्याला आहे. म्हणूनच त्याने तेव्हा देशभर वाजलेल्या टाळ्या व थाळ्यांचा नेमका अर्थ लावला होता. हीच जनता व तिचे इतके अफ़ाट समर्थन देशाला कुठल्याही संकटातून बाहेर काढू शकणार आहे. मात्र त्याचे एकहाती श्रेय मोदी घेऊन जाणार, हेच त्या मित्राचे खरे दुखणे होते. कारण त्या टाळ्या नव्हत्या तर कोरोनाच्या संकटकाळातला आपला प्रेषित उद्धारक तारणहार मोदीच असल्याच्या भूमिकेवर कोट्यवधी जनतेने केलेले ते शिक्कामोर्तब होते. मग मोदीभक्त वा समर्थक नसूनही त्याने अशी प्रतिक्रीया कशाला दिलेली असावी?

त्या समाजवादी मित्राची ती नुसती प्रतिक्रीया नव्हती, किंवा त्याने केलेले ते मोदींचे अभिनंदन नव्हते. त्याने वेगळ्या शब्दात मोदी विरोधकांची केलेली ती हजामत होती. त्याला मोदींच्या यशाचा आनंद झाला नव्हता, तर देशभरचा सामान्य नागरिक पुन्हा एकदा मोदींच्या आहारी जात असल्याची ती वेदना होती. त्यापेक्षाही मोठी बाब म्हणजे त्याच्या विचारांचे कडवे मोदी विरोधक आत्महत्या करीत असल्याचे बघून त्याचा जीव व्याकुळला होता. अठरावी लोकसभाही हातून निसटल्याचे ते दु:ख होते. कारण मोदींनी अशा आवाहन व कृतीतून काय साध्य केले; त्याचा नेमका अंदाज त्याला आलेला आहे. जेव्हा अशा कुठल्या मोठ्या संकटातून देश बाहेर पडतो व त्यासाठी सर्वस्वाने झटतो, तेव्हा खराखुरा त्याग सामान्य जनताच करीत असते. बांगला युद्ध व पाकिस्तानचा १९७१ सालचा दणदणित पराभव करायला इंदिराजी स्वत: रणभूमीवर लढायला गेलेल्या नव्हत्या. पण त्यांनी देशाच्या जनतेला आवाहन केले व सैन्याच्या पाठीशी आणून उभे केलेले होते. त्या युद्धाची किंमत व झळ सामान्य जनतेनेच सोसली होती. हौतात्म्य सामान्य सैनिकानेच पत्करले होते. पण त्या विजयाचा तुरा इंदिराजींच्या मुकूटात झळकला होता. कारण त्या युद्ध वा संकटात इंदिराजी देशाचे व पर्यायाने सैन्याचेही नेतृत्व करीत होत्या. अशा कालखंडात यश मिळवणार्‍या नेत्याकडे सामान्य जनता प्रेषित वा देवदुत म्हणून बघू लागते, हा मानवी स्वभाव आहे. आज अवघ्या जगाला कोरोना नामक महामारीच्या जबड्यातून बाहेर काढण्यासाठी जे प्रयास चालू आहेत. त्यात हाल, त्रास व अडचणीचा मोठा सामना सामान्य नागरिकांना करावा लागतो आहे. पोलिस वा डॉक्टर्स व नर्सेस वगैरे जीव धोक्यात घालून राबत आहेत. मग मोदी काय करीत आहेत? तर त्यांना धीर वा हिंमत देऊन लढायला झुंजायला प्रवृत्त करीत आहेत. पर्यायाने सगळ्यांचे लक्ष देशाच्या पंतप्रधानाकडे आहे आणि सगळ्या आशा त्याच एका माणसाकडून बाळगल्या जात आहेत. त्यात आणखी कोणाला भागिदार होता आलेच नसते का?

साधी सरळ गोष्ट आहे. शरद पवार किंवा त्यांच्यासारखे विविध पक्षातले अनेक ज्येष्ठ अनुभवी नेते आहेत. त्यांच्या गाठीशी प्रशासनापासून आपत्ती निवारणाचा प्रचंड अनुभव आहे. प्रशासनातल्या बारीससारीक गोष्टी व निर्णयाची प्रक्रीया सोपी करण्याच्या कल्पना त्यांच्यापाशी आहेत. त्यांनी अशा वेळी पुढाकार घेऊन पंतप्रधानांच्या मदतीला धावून गेल्यास ही लढाई अधिक सोपी झाली असती. जबाबदार्‍या वाटल्या गेल्याचे चित्र उभे राहिले असते. सगळेच निर्णय एकटे मोदी घेत नाहीत वा अनेक कल्पना व निर्णयामागे भिन्न पक्षीय पुढारी असल्याचे दिसून आले असते. जनतेला अशा संयुक्त कामातून उर्वरीत पक्ष व नेत्यांचे योगदान नजरेत भरले असते. त्याचा परिणाम असा झाला असता, की एकट्या मोदींना हे सर्व पेलवले नसते. विरोधकांनी तक्रारी सोडून कामात व निर्णयात हातभार लावल्यामुळेच देश इतक्या मोठ्या समस्येला सामोरा जाऊ शकला असेच आपोआप लोकांना वाटू शकले असते. अगदी संकट काळात गप्प राहूनही विरोधकांना त्याचे श्रेय घेता आले असते. पण दुर्दैव असे, की हे कर्मदरिद्री लोक सरकारच्या प्रयत्न व प्रयासांमध्ये सहभागी होण्यापेक्षा त्यात व्यत्यय वा अडथळे आणताना लोक बघत आहेत. त्याचा परिणाम जनमानसावर कसा होतो? सी व्होटर नावाच्या संस्थेने त्यासाठी लोकमताचा आढावा घेतला आहे आणि त्यात ९३ टक्के लोकांनी मोदींना जबरदस्त पसंती दिल्याचे आढळून आलेले आहे. थोडक्यात सगळेच श्रेय एकट्या मोदींच्या खात्यात जमा होत चालले आहे. किंबहूना कोरोनाशी एकटे मोदी व त्यांचे सहकारी झुंजत आहेत आणि विरोधक मात्र त्यात अडथळे वा व्यत्यय आणत आहेत, असेच चित्र तयार झालेले आहे. त्याचेच प्रतिबिंब चाचणीत पडलेले दिसते. लॉकडाऊनचा महिना उलटून गेल्यावरही कंटाळलेले वा अडचणींनी ग्रासलेले बहुतांश नागरिकही, अजून महिनाभर घरात कोंडून रहायला सज्ज होतात, ते मोदींच्या नावावरचे शिक्कामोर्तब आहे.

विरोधक रोजच्या रोज लॉकडाऊनमुळे लोक थकले, ग्रासले वा पिडल्याच्या तक्रारी करीत असतानाच फ़ोनवर लोकांच्या प्रतिक्रीया घेऊन ही चाचणी झालेली आहे. त्यात ७३ टक्के लोक निर्धारपुर्वक तर आणखी १९ टक्के लोक ठामपणे मोदींचे समर्थन करताना आढळले आहेत. यात मोदींची लोकप्रियता जितकी दिसत नाही, तितका विरोधकांवरचा लोकांचा राग प्रतित होतो आहे. संकटात सरकारशी सहकार्य करून लोकांना दिलासा मिळण्याला विरोधकांनीही हातभार लावला पाहिजे. ही विरोधाची वा राजकारण खेळण्याची वेळ नाही, असे त्याच पिडलेल्या जनतेला वाटत असते. पण तिला दिलासा देण्याच्या बाबतीत एकटे मोदी अगत्याने बोलताना निर्णय घेताना दिसतात. उलट त्यांचे विरोधक होत असलेले काम व कारभार यात सातत्याने काहीतरी उणिवा काढून व्यत्यय आणतात. अशी जी धारणा तयार होते, ती मोदींच्या प्रतिमेला उजाळा देत असते. तसे नसते तर अशाही काळात मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख उतका उंचावलेला दिसायचे काही कारण नव्हते. कारण मोदी कुठली धर्मदाय संस्था चालवित नसून त्यांचे काम ही त्यांची जबाबदारीच आहे. ते सरकारचे कामच आहे. पण तेही लोकांना उपकारक वा दिलासा देणारे वाटते, कारण विरोधक त्यात सहभागी होण्यापेक्षाही नुसते तोंडाची वाफ़ दवडून व्यत्यय आणत आहेत. अर्थात त्याविषयी मोदींनी जाहिर तक्रार केलेली नाही. त्यापेक्षा त्यांनी आपल्याच बडबडीने जनमानसातून विरोधकांची प्रतिमा मलिन करून घेण्याची पुर्ण मोकळीक दिलेली आहे. ह्यालाच राजकीय आत्महत्या म्हणतात. सरकारची जबाबदारी पुर्ण करण्यातून व त्यातल्या त्रुटी वा उणिवांसाठी नित्यनेमाने माफ़ी मागून मोदी पुढे चालले आहेत. जे काही होते, त्याचे श्रेय सामान्य कर्मचारी अधिकारी इत्यादिकांना देतात आणि सहकार्यासाठी जनतेचेच मुक्तपणे आभार मानतात. पण ते आभार विरोधकांना मिळून श्रेयही विरोधकांनी मिळवण्याची संधी गमावली आहे. म्हणून त्याला कर्मदरिद्रीपणा म्हणावे लागते.

48 comments:

  1. शेवटचा परिच्छेद सध्याच्या महाराष्ट्र सरकारच्या बाबतीतही लागू होतो का? यावरही एक लेख अपेक्षित आहे

    ReplyDelete
    Replies
    1. हो, हा कर्मदरीद्रीपणाच, महाराष्ट्रामध्ये विरोधकांना फक्त "मम" म्हणायचे आहे.काहिही न करता आयते श्रेय घ्यायला काय हरकत आहे.दैव देते कर्म नेते.

      Delete
  2. खरे आहे तुमचे विश्लेषण. विरोधकांना अद्याप मोदी-विरोध कुठे सुरु करावा आणि कुठे थांबवावा ह्याचे भान आलेले नाही म्हणूनच त्यांचे कोतेपणा वारंवार उघडे पडत आहे.

    ReplyDelete
  3. भाऊ तुम्ही म्हणता ते खरं आहे.पण ते राष्ट्रीय पातळीवर.राज्य पातळीवर ज्या मुख्यमंत्र्रयानी जबाबदारीने व संयमाने काम केलं आहे त्यांचीसुद्धा जनता प्रशंसा करत आहे. उद्धव ठाकरेंची प्रतिमा निश्चितच सुधारत आहे. फडणवीस विरोधासाठी विरोध करत आहेत अशी प्रतिमा बनत आहे. तेव्हा राज्यपातळीवर फडणवीसांची प्रतिमा मलिन होत आहे.यावरही भाऊ आपले भाष्य अपेक्षित आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. Khare ahe kendrat modiji ani Maharashtra udhavji

      Delete
    2. I am Shiv sainik and now I stay at Hyderabad from last two years. If you compare with other states situation of Maharashtra is worst and Udav Thkare doesn't have any control on administration and no coordination with corporates. I am comparing with Telegana Government.

      Delete
    3. देवेंद्र फडणवीस ..विरोधी पक्षाला जे सत्ताधाऱ्यांच्या त्रुटी दाखवणं आवश्यक आहे तेच करत आहेत..कारण त्यांना 5 वर्षाचा प्रशासनाचा आणि 25 वर्ष आमदारकीचा अनुभव आहे..राज्यावर कठीण परिस्थिती असताना, श्रीमंतांना महाबळेश्वर दौरा करायला परवानगी देणे, राज्यपालांवर असभ्य टीका करणे, बांद्रात काही कारण नसताना गर्दी जमवण्यासाठी अफवा पसरवणे ह्याला विरोधाला विरोध म्हणतात

      Delete
  4. हीच गोष्ट इथल्या सत्ताधारी व विरोधकांनी लक्षात घेतली पाहिजे

    ReplyDelete
  5. मुळात टाळ्या थाळ्या वाजवल्या ते आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणार्या लोकांचे आभार मानण्यासाठी.. त्याला प्रतिसाद म्हणजे २०२४ ला मोदी पंतप्रधान होणार हे काय लॉजिक आहे. उद्या सार्वजनिक टॉयलेट बांधले आणि दुसर्या दिवशी सकाळी तिथे रांग लागली तरी मोदीच येतील असा तर्क लावल्यासारख आहे ते ����

    ReplyDelete
    Replies
    1. नुसत्या २०२४ च्या कलपनेनेच हरणाची " पिवळी" झाली ?

      Delete
    2. He logic tumhala 2024 la kalel toparyant vat bagha, ghai karu naka

      Delete
    3. अजूनही तुमची झापड उघडली नाही असंच काहीसं म्हणावं लागेल.. त्या "टॉयलेट" नेच 2019 जिंकून दिलंय, हे अजून तुम्हांला समजलं नाही यातच सगळं आलं की....😊

      Delete
    4. जाऊ दे.... एवढ्या विवेचानंतरही हा प्रश्न पडत असेल तर लॉजिक या विषयाचा थोडासा अभ्यास करायला हवा असं नाही वाटत?. आणि दिलेल्या उदाहरणावरून हे स्पष्टच होतं की.

      Delete
  6. भाऊ, जेथे पवारांसारखा चाणाक्ष समजला जाणारा माणूस पण मोदी विरोधात घसरतोय तेथे इतरांची काय कथा?
    या कोरोनाने एक झालेयं, भल्याभल्यांच्या लंगोट्या सुटल्यात आणि मोदी मात्र ही परिस्थिती अतिशय शांतपणे हाताळताहेत. काल त्यांनी अगदी सरपंच लेव्हलवर जाऊन व्हिडीओ कॉन्फरन्स केली, मला वाटते भारतातील पहिलेच पंतप्रधान असतील की सरपंचाच्या अडचणी समजून घेऊन त्यांची पाठ थोपटली, अर्थात व्हिडीओ कॉन्फरन्सचा हा फायदा आहे पण आजवर कोणत्याही पंतप्रधानांनी सरपंचाची साधी सभासुद्धा घेतलेली नाही, घेतली असली तरी फक्त भाषण देवून जाण्यापुरती, संवाद नाही.

    ReplyDelete
  7. होय भाऊ ,हे काँग्रेस वाले सतत मोदिवर टिका करत असतात, पण मोदिकडे एक हत्यार आहे, ते म्हणजे अनुल्लेखाने मारणे आणी मोदी याचा सतत वापर करुन, काहीही न करता विरोधकाना घायाळ करीत आसतात. आणी विरोधक त्यांचे बोथट शस्र म्हणजे बुध्दीजिवी/ पुरोगामी हे ठेवणीतले बाण काढत आसतात आता या शस्त्राने कुणी घायाळ पण होत नाही. आता नुकतेच एकशे एक पुरोगामी टोळधाडीने मुख्यमंत्राला पत्र दिले . भाऊसाहेब आफ्रीका खंडात टोळधाड नेहमी आणी खुप हाहाकार माजवते आता या सततच्या टोळधाडीला कंटाळुन त्यांनी एक नवा उपाय शोधला तो म्हणजे या टोळांना खाणे...मला वाटते आता उजव्यानी या डाव्या टोळांना खायला पाहिजे...म्हणजे साम/ दाम/ भेद वापरुन त्यांना विरोध करायला पाहीजे...

    ReplyDelete
  8. बरोबर आहे भाऊ पटल तुमच. हे विरोधक मोदींना विरोध करण्यासाठी देशाला सुद्धा खड्ड्यात घालतील.

    ReplyDelete
  9. Udya arthavyawastha kosalali, taar hech virodhak Modiji na shahanpana shikawtil. Dosh detil, credit denar nahit. Baki aapka lekh nehamipramane atishay barobar, correct, amhi samanya lok deshasathi, ajunhi lockdown madhe rahayla tayaar aahot. Karan aamcha Modijinwar vishwas aahe.🌹🙏👍✔️💯😔🙂☑️

    ReplyDelete
  10. Agadi achook ani samarpak.Bhau tumchya lekhani la hazar hattinche bal labho.

    ReplyDelete
  11. श्री भाऊ आजमितीला इथे काँग्रेस च राज्य असत तर काय कहर झाला असता कल्पना करवत नाही,

    ReplyDelete
  12. ' तंतोतंत खरे आहे.नतद्रष्टांचा कर्मदरीद्रीपणा पुन्हा एकदा दिसून आला.बुडत्याचा पाय खोलात या म्हणीप्रमाणे पुरोगाम्यांची ही एकप्रकारे राजकीय आत्महत्याच म्हणावी लागेल. सुधाकर गुंजाळ. पुणे

    ReplyDelete
  13. Bhau tumhi blog MONETIZE ka karat nahi....2012 pasun blog lihita, 2 kotichya jawalpaas views ahet....Tumhi lakho rupaye kamau shakta...

    ReplyDelete
    Replies
    1. Yavr thodi ajun mahiti deu shakal ka? Anubhav share kelat tar bara hoil👍

      Delete
  14. खरं तर सशक्त लोकशाही साठी विरोधी पक्ष तगडा असणे आवश्यक असते,पण सर्वात जुन्या पक्षाचे कणा हीन नेतृत्व, इतर पक्ष्यांच्या कोलांट्या आणि विरोध म्हणून विरोध यात ते उरली सुरली पत गमावून बसलेत

    त्याच वेळी मोदींचे आश्वासक व्यक्तिमत्त्व, तळमळ, कष्ट हे सगळे उठून दिसतेय, त्यामुळं 2024 चा निकाल लागल्यात जमा आहे

    ReplyDelete
  15. अचूक विश्लेषण, भाऊ

    ReplyDelete
  16. भाउ आपण जनतेची नाडी परिक्षा बरोबर करत असतां . विरोधी पक्षाची त्यांनी स्वता च वाटलावून घेतली आहे . आता लाॅकडाउन उठल्या नंतर आर्थिक संकटाचे निवारणही मोदीजी योग्य प्रकारे करतील अशी आपेक्षा

    ReplyDelete
  17. माैत का सीैदागर, निच,चाैकिदार चाेर है, वगैरे भलतेच विशेषण लावुन माेदी त्याचेच भांडवल करून जनतेच्या दरबारात नविन ऊत्साहाने परत येतात व यशस्वी पण हाेतात. पण हे विराेधकांना का समजत नसावे...???

    ReplyDelete
  18. Support modi for safety of our country from all dangers

    ReplyDelete
  19. व्यक्त होण्याच्या अनेक गोष्टी असतात. भटपूर्व पंतप्रधान यांना कधीही हसताना तर सोडाच पण स्मित करताना सुध्या पाहिल्याचे आठवत नाही उलट मोदी किंवा अब्दुल कलाम यांच्या सारखे नेतृत्व एक शब्द न बोलता फक्त स्मित, खळखळून हास्य व संताप यातून सामान्य जनतेला कठीण काळात हुरूप देऊ शकतात.

    ReplyDelete
  20. 2019 मे महिन्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला तेंव्हा भारतातील सर्वच विरोधी पक्षांची स्थिती अर्धांगवायू झाल्यागत झाली होती. खरे तर आत्मचिंन्तनाची ती वेळ होती, पण वैचारिक दिवाळखोरीने ग्रस्त विरोधी पक्षांनी ती संधी आणि वेळ वाया घालवली. नंतर मोदी सरकारच्या निर्णय घ्यायच्या सपाट्याने,आणि वाढत्या लोकप्रियतेने त्यांचे धाबे दणालले. काय करावे, कसे करावे, केंव्हा करावे याबद्दल कहिही विचार ना करता सरकारच्या प्रत्येक निर्णयाचा फक्त विरोध करायचा प्रकार त्यांनी चालवला. तो अजूनही सुरुच आहे. जबाबदार विरोधी पक्ष आज देशासाठी अत्यंत आवश्यक आहे पण , अस्तित्वात नही हे आपल्या देशाचे दुर्दैव होय.

    ReplyDelete
  21. यंदा आपण सर्व IPL ला मुकलो, स्कोर पाहत आहोत कोरोनाचा, दुर्दैवाने यातही आपली मुंबई ईंडीयन्स पहिल्या क्रमांकावर आहे आणि पहिल्या च क्रमांक कायम ठेवून I NDIAN CORONA LIGUE ट्राफी मिळवेल.. यात शंका नाही..

    ReplyDelete
  22. नेहमी प्रमाणे विरोधकांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न !👌👍😊

    ReplyDelete
  23. Very good analysis Bhau. I am Shiv sainik and now I stay at Hyderabad from last two years. If you compare with other states situation of Maharashtra is worst and Udav Thkare doesn't have any control on administration and no coordination with corporates. I am comparing with Telegana Government.

    ReplyDelete
  24. Modi virodh haach virodhakanchya mukticha (namshesh) marg aahe.

    ReplyDelete
  25. To Anyalise two words are enough. Constructive v/s destructive. U know who is who. Prakash Vankudre.

    ReplyDelete
  26. अचूक विश्लेषण..

    ReplyDelete
  27. Some opponents of Modi are clapping saying that Modi's dream of making India a 5 trillion dollar economy is now shredded. It is difficult to see how can India become a 5 trillion economy because the economy is hurt very badly due to the lock down. Lock down was a necessary strategy to control the virus. Yet in our country we have millions of people who would rejoice that their country will not reach that target soon.

    ReplyDelete
  28. बरोबर विश्लेषण

    ReplyDelete
  29. सी व्होटर्सने महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंबद्दल कौल दिलाय का? त्याबद्दलही स्वतंत्र लेख वाचायला आवडेल.

    ReplyDelete
  30. नमस्कार भाऊ,

    प्रतिपक्ष स्थापन केल्या प्रित्यर्थ अभिनंदन! तुमच्या हक्काच्या चॅनेल वर तुम्हाला पहायची आमची इच्छा होतीच. तिथे हे विचार व्यक्त करता येत नाहीत म्हणून इथे लिहीत आहे.

    या दिवसांत जवळपास रोज लेख लिहून अथवा यूट्यूब वर भाष्य करून तुम्ही काही सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात. त्या प्रित्यर्थ तुमचे खूप आभार! अशी पत्रकारिता आता केवळ अभावानेच दिसत आहे हे बोलायलाच नको. तुमचा आधार मला वाटतो तसाच तो अनेकांना वाटत असणार यात शंका नाही.

    (मोठा निखिल आणि छोटा कपिल हा शब्दप्रयोग फार भारी होता. 😆😆)

    - पुष्कराज पोफळीकर



    ReplyDelete
  31. भाऊ,
    वागळे की दुनिया फार भारी!

    राल्फ वाॅल्डो इमर्सन नावाचे एक अमेरिकन विचारवंत एकोणिसाव्या शतकात होऊन गेले. ते असे म्हणायचे की मनुष्याचे खरे व्यक्तित्व त्याच्या डोक्यावर उभे राहून ओरडून ओरडून जगाला स्वतःचे वास्तव त्याच्या नकळत सांगत असते. तस्मात् एखादा मनुष्य स्वतः विषयी कितीही असत्य बोलला तरी जगाला त्याचे खरे व्यक्तिमत्व समजल्या शिवाय रहात नाही. या सत्याला वागळे हे अपवाद कसा असतील? ते IBN लोकमत चॅनेल वर कार्यरत असतानाच ते खरे काय आहेत हे दिसत होते. इतरांना तपशील माहीत नसताना ही मनुष्याची देहबोली त्याचे अंतर्मन व्यक्त केल्या शिवाय रहात नाही. तुमच्या वागळे की दुनिया मधून आज तपशील सुद्धा कळला. तुम्ही म्हणालात त्या प्रमाणे अश्या लोकांना असे वाटत असते की आपण सोडून सगळे जग केवळ मूर्ख लोकांनी भरले आहे.

    प्रतिपक्ष वर हे विचार लिहू शकत नसल्याने इथे लिहित आहे. क्षमस्व! 🙏

    - पुष्कराज पोफळीकर







    ReplyDelete
  32. भाऊ,संत समाजाचा अंग असलेल्या उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी, पालघर घटनेबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला. एक आठवड्या नंतर बुलन्द्शहर घटनेबद्दल घराणेशाहीचे द्योतक असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लगेच उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला. कर्मरिद्रीपणा या पार्श्वभूमीवर कृपया या दोन फ़ोन बद्दल आपले विचार लिहावे ही विनंती.

    ReplyDelete
  33. मोदीजींच्या कालच्या १२ मे च्या भाषणावरून बरीच टिंगल टवाळी चालू आहे, त्याला उत्तर द्यायला हवे.

    ReplyDelete