या आठवड्याच्या आरंभी दिल्लीच्या निजामूद्दीन मर्कझ येथे जमलेल्या हजारो तबलिगी जमात सदस्यांच्या मार्फ़त देशाच्या कानाकोपर्यात कोरोना व्हायरसची बाधा पोहोचल्यावर ह्या संघटनेचे नाव गाजू लागले. पण म्हणून अशी संघटना अकस्मात उगवलेली नाही. आताही त्याविषयी चर्चा सुरू झाल्यावर त्या संघटनेने माजवलेला हाहा:कार ही मानवी चुक असल्याचे सिद्ध करण्याचा आटापिटा पुरोगामी वा सेक्युकर म्हणवणारे करीत आहेत. तितकेच नाही, तर त्यावरून लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी दिवे लावून कोरोना कसा पळून जाईल, असली दिशाभूल करून तबलिगी चर्चेला फ़ाटा देण्याचा आटापिटा चालू आहे. कारण अशा कडव्या धर्मांध मुस्लिमांना किंवा जमाते पुरोगामींना सत्य झाकून ठेवायचे आहे. अन्यथा तबलिगी कारवायांमागील ओसामा बिन लादेनची प्रेरणा किंवा विचारधारा जगासमोर येण्याच्या भितीने या भामट्यांना पछाडलेले आहे. वरकरणी तबलिगी सदस्यांचे वागणे चुक वा खुळेपणाचे अंधश्रद्धेचे वाटले, तर ती तशी चुक करायचे कारण नाही. डोळसपणे त्यातला जिहाद ओळखता व समजून घेता आला पाहिजे. ओसामाच्या प्रेरणेने फ़िदायीन झालेले व आत्मसमर्पण करून आपली धर्मश्रद्धा अधिक कडवी असल्याचे सिद्ध करायला निघालेले जिहादी आणि आज बाधा पसरवणारे तबलिगी; यांचा अजेंडा एकच आहे आणि त्यामागची रणनिती जशीच्या तशी समान आहे. अफ़गाण जिहादमधून सोवियत फ़ौजांना पाणी पाजल्यावर लादेन किंवा त्यातले अनेक मुल्ला मौलवी यांनी काय निष्कर्ष काढला होता? त्याची आठवण तरी आहे कोणाला? ती मंडळी म्हणत होती, नुसत्या अफ़गाणी जिहादने महाशक्ती असलेले सोवियत साम्राज्य जमिनदोस्त केलेले आहे आणि त्याच मार्गाने अमेरिका व अन्य पुढारलेल्या देशांना इस्लामसमोर शरणागत करणे सहज शक्य आहे. त्याची रणनिती काय होती? अमेरिकेतील जुळे मनोरे पाडल्यावर ओसामाचे एक वक्तव्य आलेले होते. पाश्चात्य लोकशाही सत्तांना व अर्थव्यवस्थांना त्यांच्याच बोजाखाली जमिनदोस्त करायचे.
ह्या एका वाक्यातील आधुनिक जिहादची व्याप्ती कधी समजून घेतली गेली नाही आणि त्यानुसार त्याला रोखण्यास योग्य पावले उचलली गेली नाहीत. त्याचा परिणाम गेल्या काही वर्षात मध्यपुर्वेतील अरब देशांनी अनुभवला आहे आणि त्याचे दुष्परिणाम युरोपियन देशांना भोगावे लागलेले आहेत. त्याचाच पुढला टप्पा म्हणजे तबलिगने टाकलेले पाऊल आहे. लोकशाही सत्ता व अर्थव्यवस्थांना त्यांच्याच बोजाखाली जमिनदोस्त करायचे म्हणजे काय? यापैकी बहुतांश देशांनी आपल्याच कायदे व नियमांसह विविध भ्रामक संकल्पनांनी स्वत:ला जायबंदी वा जखडून ठेवले आहे. त्यांना त्याच्याच जखडणार्या नियम संकल्पनांनी घुसमटून टाकायचे आणि त्यात त्यांचाच गुदमरून मृत्यू सहज होऊ शकतो. तो कसा? तर जिहादला सज्ज झालेल्यांनी अशा तमाम लोकशाही उदारमतवादी व्यवस्था किंवा त्यांचे कायदे झुगारून वागायचे आणि त्यात गुन्हेगार ठरले, तरी आपल्याला न्याय देण्याची जबाबदारी मात्र त्याच व्यवस्थांवर टाकायची. कारण त्यांनी मुर्ख न्यायाच्या संकल्पनेचा फ़ास आपल्याच गळ्याभोवती आवळलेला आहे. आपल्याच पायात उदारमतवादी बेड्या ठोकून घेतलेल्या आहेत. अमेरिकेने सेना पाठवून अफ़गाणिस्तानाची तालिबानी सत्ता उध्वस्त केली. पण तिथे लोकशाही पद्धतीनेच अमेरिकन सैन्याचे हातपाय बांधून ठेवलेले होते. सहाजिकच कोणी अमेरिकन सैनिक नागरिक तालिबानांच्या हाती लागला, तर त्याला हालहाल करून मारायची मुभा जिहादी तालिबानांना उपलब्ध होती आणि त्यांच्यापैकी कोणा तालिबानाला दिसताच गोळ्या घालण्याची वा छळवाद करून सूडाने वागण्याची मोकळीक अमेरिकन सैनिकांना नव्हती. जीवंत पकडला तर खटल्याचा पोरखेळ चाले आणि तालिबान मात्र अमेरिकनांना दयामाया दाखवीत नव्हते. गळा चिरून वा कुठेही गाफ़ील पकडून ठार मारत होते. पण तसेच कुणा अमेरिकनाने केले तर मात्र त्याच पाश्चात्य कायद्याकडे दादही मागत होते. यातला बोजा लक्षात येतो का?
एक फ़िदायीन वा जिहादी जीवंत मिळाला तरी त्याच्यावर खटला चालवून फ़ाशी देण्यासाठी भारताने कसाबवर किती खर्च केला? त्याच्या खटल्यासह सुरक्षेसाठी किती कोटी रुपये खर्च झाले? पण कसाब व त्याच्या साथीदारांनी पावणे दोनशे मुंबईकरांची कत्तल केली; त्यावर काही लाखच रुपये तोयबा जैश मंडळींना खर्चावे लागले ना? म्हणजेच दोन्हीकडून नुकसान तुमचेच. कसाबला उपचार व न्याय देण्याचा बोजा सुद्धा तुमच्यावर त्याच कायद्यामुळे आणला जात असतो. यालाच ओसामा बोजाखाली चिरडून मारणे म्हणतो. ओसामाला शोधण्यापासून कमांडो पाठवून ठार मारण्यापर्यंत अमेरिकेला किती कोटी डॉलर्सचा खर्च करावा लागला होता? त्याची पाठराखण करून अमेरिकेशी दगाफ़टका पाकिस्तानच करीत होता ना? मग आज तबलिगी फ़रारी कोरोनाबाधितांचा शोध घेण्यावर होणारा खर्च वा शासकीय यंत्रणेवर पडणारा बोजा कोणाला उचलावा लागतो आहे? त्या तबलिगींना लपायला सहाय्य करून सरकारी यंत्रणेची तारांबळ कोण उडवित आहे? अशा बाधितांना शोधून त्यांच्यावर उपचार करायचे, अधिक त्यांनी कोरोनाची लागण केलेल्यांना शोधून त्यांच्यावरही खर्च कोणी करायचा? त्या खर्चाचा बोजा कोणी उचलायचा आहे? तो खर्च तबलिगीचे समर्थन करणारे पुरोगामी शहाणे किंवा ओवायसीसारखे नाकर्ते उचलणार नाहीत. म्हणजेच सगळीकडून आपल्या लोकशाही उदारमतवादी पुरोगामी राज्यपद्धतीने आपल्यालाच गोत्यात आणलेले आहेत. त्यात कायदा मोडणारे व धाब्यावर बसवणार्यांना कायद्याची पर्वा नाही आणि त्याच लोकांच्या जगण्याची काळजी मात्र आपण घ्यायची आहे. आपल्या सरकारने घ्यायची आहे आणि त्याचा बोजा सामान्य कायदेभिरू भारतीयांच्या डोक्यावर पडतो आहे. अर्थव्यवस्था ढासळतेय म्हणून रोज घसा कोरडा करणार्या चिदंबरम वा राहुल गांधींना अशा बोजाचा थांगपत्ता तरी आहे काय? मेणबत्ती दिवे लावण्याच्या आवाहनावर टिकेचे प्रवचन देण्यार्यांना याची जाणिव तरी आहे काय?
ओसामा किंवा तबलिगचा म्होरक्या मौलवी साद कांधालवी, यांच्या विचारसरणीतले साम्य साधर्म्य लक्षात येते आहे काय? नावाने संघटना वेगवेगळ्या आहेत आणि पण त्यांचे विचारसुत्र एकच आहे. त्यांचे ध्येय अजेंडा समान आहे. ओसामाने किंवा त्याच्या पिलावळीने आधी सोवियत व नंतर अमेरिकन व्यवस्थेला पर्यायाने साम्राज्याला त्यांच्याच नियम कायदे आणि संभ्रमाच्या बोजाखाली भरडून काढले. सोवियत व्यवस्था त्यात तीन दशकापुर्वी उध्वस़्त होऊन गेली आणि आज अमेरिकन साम्राज्य डबघाईला आलेले आहे. एकट्या चीनने पोलादी पंजाने त्या देशातल्या अशा धार्मिक मुस्लिम अरेरावीला दडपून टाकल्याने त्याचा टिकाव लागला आहे. तो विषय नंतर तपासता येईल. आज फ़क्त तबलिग आणि ओसामा बिन लादेन यांच्या अजेंडा व डावपेचातील साम्य व परिणाम यांची तुलना करण्याला महत्व आहे. ओसामाने अंगाला बॉम्ब बांधून आत्मसमर्पण करणारे घडवून शेकड्यांनी निरपराधांना ठार मारण्याचा खेळ केला होता. त्यांना आता जग फ़िदायीन म्हणते. मग बॉम्बशिवाय कोरोनाचा व्हायरस दुरदुरच्या देश प्रदेशात नेवून लाखो निरपराधांचे जीव धोक्यात आणणार्यांना वेगळे कुठले नाव देता येईल? ओसामाचे सहकारी उमर खालीद शेख किंवा जवाहिरी यांनी केलेल्या कारवाया जगाला कुठे घेऊन गेल्या आहेत? त्यासाठी त्यांना कुठली मोठी किंमत मोजावी लागली आहे? आपल्या चिमूटभर कारवायांतून त्यांनी जगभरच्या विमानप्रवास, विमानतळ किंवा तशा व्यवस्थांना सुरक्षा उपायांच्या बोजाखाली भरडून टाकलेले आहे. तबलिगी लोकांनी कोरोनाचा फ़ैलाव सहज सोपा करून भारतीयच नव्हेतर इंडोनेशिया, मलेशिया इत्यादी अनेक देशांच्या शासकीय वैद्यकीय यंत्रणांना घुसमटून टाकलेले आहे. ओसामाच्या अल कायदाचा गवगवा जगभर चालू होता आणि तबलिग बाबतीत कोणी चकार शब्द बोलत नव्हता. पुरोगाम्यांनी पत्रकारांनी बुद्धीवादी शहाण्यांनी जगाला किती गाफ़ील ठेवले आणि गोत्यात आणले आहे, त्याचे वेगळे पुरावे देण्याची गरज आहे काय?
श्री भाऊ काल ABP माझा वर मुद्दाम मुंब्रा येथील बातमी सविस्तर दाखवली, आणि हेही आवर्जुन सांगितले की पहा तेथील मशिदी कशा बंद आहेत व सर्व मुस्लिम समाज कसे कायद्याचे पालन करतोय त्याचबरोबर 3 video दाखवल्या आणि त्या कशा खोट्या आहेत ह्याचे पुरावे दाखव ले पण जे तब्लिगी हॉस्पिटलमध्ये आहेत व तेथील स्टाफ शी कस वर्तन करत आहेत है विषयी चकार शब्द सुध्दा उच्चरला नाही हयला पुरोगामी म्हणतात आणि हायची दुसरी बाजू काही दिवसांपूर्वी हयच भागात para मिलिटरी आणून ठेवली आहे
ReplyDeleteBoycotting such channels is the only solution.
Deletewhy are you still watching these channels? Unsubscribe them.
DeleteAbp, aajtak, ndtv he peesasathi kam karatat yana hinduthan shi kahi dene ghene nahi, yache hiro osam beenladen, daud,
DeleteChannels earn through advertisers apart from foreign patrons. Hence we must boycott the products advertised on these channels. Two laws need to be enacted by parliament- No foreign investment allowed in all media. Owwnership must be 100% Indian only.
DeleteAgree. That's the solution which has been proved during Swa. Savarkar debate
Deleteजळजळीत वास्तव
ReplyDeleteपण समजून कोण घेतो?
येथे सगळे डावे,मधले,नक्षली,चळवळे मोदींना ठोकण्यात मग्न आहेत. शहामृग डोके खुपसून बसलाय.प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया टीआरपी आणि मालकांच्या हितासाठी देशहित लिलावात काढतोय. तुमच्यासारखा दीपस्तंभ हीच एकमेव उजवी बाजू..
Khup chhan lekh !
ReplyDeleteभयंकर आहे
ReplyDeleteSecular, liberals या शब्दां ऐवजी जिहादी व जिहाद समर्थक हे शब्द वापरणेच योग्य ठरेल
ReplyDeleteमा. भाऊ. तुम्हाला धन्यवाद.
ReplyDeleteBhau, you are great 👍🕯️🙏🙏👍
ReplyDeleteछान लेख. जिहादी, माओवादी, अतिरेकी पॅन्थरवादी यांनी हेच धोरण अवलंबिले आहे. धन्यवाद. शेअरिंग
ReplyDeleteभाऊ, तब्लिगी जिहाद करताहेत हे त्यांच्या बेपत्ता होण्यावरुन आमच्यासारख्या सामान्यांच्या लक्षात येतेच आहे पण सेक्युलर लोकांच्या लक्षात येत नसेल असे नक्कीच नाही पण यांचा सेक्युलरपणा (म्हणजे मुस्लिम प्रेम)आणि मोदी विरोध हा वेडाच्या जवळपास पोहचला आहे, त्यामुळे ते सुधारतील अशी आशाच नाही.
ReplyDeleteब्रिटिश लोकांनी आपल्याशी जे वर्तन ठेवले होते त्याचा आताआपल्या सरकारणे कित्ता गिरवािवा
ReplyDeleteक्रांतिकारक मिळाला की त्याचा निकाल फाशी हा असायचाच पण त्या आधिकायद्याचे सोपस्कार करायचे हा नियम फक्त गांधी खून खटल्यात पाळला असे वाटते
हेच खरे वास्तव आहे . नाहीतर कसाब वर एवढा मोठा वेळ खर्च सगळे कशाला केले असते . आम्ही xxx नाचणार तुम्ही काय ते कायदे कानून कोर्ट कचेऱ्या करत बसा .
ReplyDeleteअर्थात याला दुसरी बाजू आहे म्हणजे आपण एक लोकशाही प्रमाणे चालणारे राष्ट्र म्हणून जगात खूप मोठा सन्मान प्राप्त केलेला आहे . त्यामुळे आपणाला या दोन्ही बाजूंनी लक्ष ठेवावे लागते . दूसरी गोष्ट म्हणजे विरोधी पक्ष जरा खूट झालं की अगदी बेंबीच्या देठा पासून ठो ठो करतात त्यांना साथ विकाऊ मीडिया . तेव्हा हे सर्व असेच चालणं स्वाभाविक आहे .
सत्य कथन भाऊ, हा जिहादच आहे. जमाते पुरोगामी आणि लष्करे लिबरल त्यांचे पाठीराखे आहेत. लोकशाही मार्गाने यांचे पतन करणे शक्य आहे का?
ReplyDelete👍 Informative...☺️
ReplyDeleteसर आपले लेख खूप छान असता. नेहमी वाचत असतो.
ReplyDeleteभाऊ ब्लॉग ला लाईक चे बटन हवे म्हणजे कमेंट न देता फक्त लाईक करता यायला पाहिजे
ReplyDeleteभाऊनी वास्तव डोळयासमोर मांडले आहे,पण प्रत्यक्षात विचार होऊन सरकारने कारवाई करण्यात येईल व सर्व समाज पण असा विचार करेल आणि वागेल तेव्हाच ते शक्य होईल .
ReplyDeleteपालीचे शेपूट. ह्यावेळी शेपटाचे नांव तबलिगी जमात.
ReplyDeleteमोदी सरकार ला या तबलिगी देशविघातक करवायांबद्दल माहिती नाही का, असे इव्हेंट्स कसे काय भारतामध्ये होतं आहेत ..सगळेच थोडे संशयास्पद वाटत आहे
ReplyDeleteSecular-liberal- Naxals have planted their people in key positions in media,in government,in higher judiciery, in legalfieldand NGOs. Modi govt has to tackle them remaining within laws and rules. Modi or Shah alone can not attend all levels.
Deleteआपल्या कडे फक्त मतासाठी लाड केले जातात जर कोणी देशाविरुद्ध विधायक कृत्य करत असेल तर त्याला योग्य ती शिक्षा व्हायलाच पाहिजे मग तो कोणत्याही जतिध्रमाचा असो तो माझ्या माझ्या धर्माचा तो दुसऱ्या धर्माचा असा भेदभाव नको तसेच अशा विपरीत परिस्थितीत त्या त्या धर्मातील जबाबदार सुशिक्षित व्यक्तींनी ही आपली चागळी भूमिका ज्ञावी जे जे करून परिस्थतीत सुधारणा होईल
ReplyDeleteYou are right, but all over the democratic countries so called progressives groups are there. What you say is only possible in dictator manage countries. That is why in all the 56 Muslim countries there is no democracy.
ReplyDelete