Friday, April 10, 2020

गुडघाभर झब्बा, तोकडा लेंगा

Tablighi Jamaat members hiding travel history could incur murder ...

समोरच्याला पटवता येत नसेल तर त्याच्या मनाचा गोंधळ उडवून द्या; अशी इंग्रजीत एक उक्ती आहे आणि तिचा आशय सातत्याने पुरोगामी म्हणवणार्‍या लोकांत बघायला मिळत असतो. सध्या तर अशा धुळफ़ेकीने कहर केला आहे. दिल्लीच्या निझामुद्दीन संकुलात तबलिगी जमातचा जो मेळावा भरवला गेला होता, त्याला दिल्लीच्या पोलिसांनी परवानगीच कशाला दिली; असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. पण त्यासाठी मुळात परवानगी मागण्यात आली होती काय? किंवा देण्यात आली होती काय; त्याविषयी कुठलेही स्पष्टीकरण मिळत नाही. कारण हा मेळावा जाहिर समारंभ नव्हता. जिथे वर्षभर सातत्याने हजारोच्या संख्येने मुस्लिम मौलवी कायम येजा करीत असतात. तिथे एकत्र जमण्याविषयीच्या वेगळ्या परवानगीची गरजच नसते. उदाहरणार्थ कुठल्याही विवाह किंवा तत्सम सोहळ्याच्या जागा असतात, तिथे होणार्‍या समारंभासाठी कधी पोलिसांची परवानगी घेतली जात नाही किंवा मागितलीही जात नाही. असे सोहळे राजकीय स्वरूपाचे नसतात वा त्यातून कुठली गडबड होण्याची शक्यता नसल्याने त्यासाठी पोलिसांकडे जावे लागत नाही. निजामुद्दीन मर्कजच्या म्होरक्यांनी त्याचा खुलासा मागल्या आठदहा दिवसात अनेकदा केलेला आहे. तिथे वर्षभर देशी परदेशी मौलवींची येजा असल्याचे त्यांनीच कथन केले आहे. मग पोलिसांनी परवानगी देण्याचा विषय आला कुठून? शाहीनबागला तशी परवानगी आवश्यक होती, कारण ते धरणे सार्वजनिक जागी रस्ता वाहतुकीला व्यत्यय आणणारे होते. त्यालाही दिल्ली पोलिस रोखू शकले नाहीत आणि आज सवाल करणारे सर्व पुरोगामी पक्ष तर शाहीनबागचा तो कायदाभंग घटनेने दिलेला मूलभूत हक्क ठरवित होते. मग तबलिगला पोलिसांनी परवानगी देण्याविषयीचे प्रश्न म्हणजे निव्वळ दिशाभूल नाही काय? अगदी पवारांसारखे नेतेहि तो प्रश्न विचारतात. कारण त्यांना सामान्य जनतेची दिशाभूल करायची असते. लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करून तबलिगच्या पापावर पांघरूण घालायचे असते.

दुसरा मुद्दा असा, की मुस्लिमांच्या बाबतीत असे वारंवार होत राहिले आहे. त्यांच्या संस्था संघटनांनी नेहमी विविध कायदे व त्यानुसार निघालेले आदेश धाब्यावर बसवलेले आहेत. पण त्यावर बडगा उगारला, मग कोर्टाकडे जाऊन अल्पसंख्य म्हणून टाहो फ़ोडलेला आहे. अन्यथा आताही तबलिगी जमात किंवा त्यांच्या सदस्यांचे मुस्लिम वेशातले चित्रण दाखवण्याला पवारांसह पुरोगाम्यांनी आक्षेप कशाला घेतला होता? संघाच्या हिंदूत्वाची टवाळी करताना अर्धी चड्डी असा हेटाळणीयुक्त शब्द योजला जात असतो. थेट हिंदू म्हणायचे नाही, म्हणून काढलेली ती पळवाट आहे. हरकत नाही. मग हेच लोक बाकीच्या मुस्लिमांपेक्षा तबलिगी वेगळे दाखवण्यासाठी त्यांचेही गणवेशानुसार वर्णन कशाला करीत नाहीत? म्हणजे संघवाल्यांना अर्धी चड्डी संबोधता, तसेच तबलिगींना गुडघाभर झब्बा आणि तोकडा लेंगा, असे का म्हटले जात नाही? कारण जगभर पसरलेल्या तबलिगी सदस्यांचा तो गणवेश आहे. सामान्य मुस्लिमांपेक्षा तबलिगींचे हेच वेगळेपण नजरेत भरणारे आहे. पण तसे कधी होणार नाही. त्यांची पापेही लपवायला शद्बांची व युक्तीवादाची कसरत चालत असते. दिल्ली पोलिसांनी परवनागी कशाला दिली, हा तसाच फ़सवणुक करणारा युक्तीवाद आहे. मुद्दा परवानगीचा कधीच नव्हता. कोरोनाच्या फ़ैलावानंतर आणि भारतात त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता दिसल्यावर गर्दी जमा करणार्‍या घटना समारंभांना प्रतिबंध घालण्याची कारवाई सुरू झाली. दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आधी पन्नासहून अधिक लोकांची गर्दी होईल असे समारंभ टाळावेत असे आवाहन केलेले होते. त्यानुसार शाहीनबागचेही धरणे उठवता आले असते. कायद्याचा बडगा हाती घेऊन ते कशाला उठवले नाही, असा प्रश्न यातला कोणी विचारणार नाही. कारण त्या गर्दीचे हेच तर समर्थक होते. म्हणून तर तबलिगच्या परवानगीचे थोतांड माजवणारे शाहीनबागला परवानगी कशाला दिली; असे म्हणणार नाहीत की विचारणार नाहीत. त्यातूनच त्यांची बदमाशी साफ़ होते.

अल्पसंख्यांक आयोगानेही बातम्यांमध्ये तबलिगी जमातचा उल्लेख नको, अशी मागणी केली आहे. देशात कुठेही जाऊन पोहोचलेल्या तबलिगी जमातच्या सदस्यांनीच वणव्यासारखा कोरोना पोहोचवला असेल, तर त्यापासून सामान्य जनतेला अंधारात ठेवणे किती योग्य आहे? कारण ते निखळ सत्य असून, आपल्याला कोणापासून धोका आहे, याविषयी नागरिकांना काही वैचारिक भूमिका म्हणून अंधारात ठेवणे प्रत्यक्षात रोगप्रसारालाच हातभार लावणे ठरत नाही काय? अशा मागण्या करणारे विचारवंत वा राजकीय नेते असोत किंवा अगदी अल्पसंख्यांचा आयोग असो, त्याला आजच्या अपवादात्मक परिस्थितीचे भान आहे काय? आपण नेहमीच्या सर्वसाधारण स्थितीत आज जगत नाही. सामान्यत: ज्याला गुन्हा मानले जात नाही, अशा अनेक कृती वा वागणे आज गुन्हा घोषित केलेले आहे. उदाहरणार्थ तोंडावर मास्क लावणे वा आवरण राखणे सक्तीचे झाले आहे. कारण तसे केले नाही तर तुम्ही कोरोनाच्या प्रसाराला हातभार लावणारे म्हणून गुन्हेगार ठरवले जाता. मग ज्यांच्यापासून सर्वात आधी व वेगवान रोगप्रसार होऊ शकतो, असे झटकन ओळखता येणारे लोक लपवणे; म्हणजे नागरिकांना कोरोनाचे बळी व्हायला मदत करणे़च नाही काय? अन्य प्रसंगी जातीपाती वा वंश धर्मावरून भेदभाव करणे अयोग्य जरूर आहे. पण ज्या लोकांनी हा आजार देशभर फ़ैलावण्याला हातभार लावलेला आहे, ती संघटना वा तिचे नाव लपवण्यातून काय साध्य होणार आहे? आयोग वा अशा बुद्धीमंतांना त्याचे तरी भान उरले आहे काय? अशा खुळचटपणाने इटाली या प्रगत देशामध्ये किडामुंगीसारखी माणसे कोरोनाचे बळी ठरल्याचे तरी त्यांना ठाऊक आहे काय? इटालीत असेच तिथल्या राज्यकर्ता पक्षाने चिनी पर्यटकांना मिठ्या मारण्याचे आवाहन केले. त्यांच्यापासून दुर रहाण्याला वांशिक भेदभाव ठरवण्याचे पाप केले आणि १७ हजाराहून अधिक लोकांना कोरोनाच्या जबड्यात ढकलून दिले आहे.

नेहमीच्या कालखंडात आपण जे नियम कायदे वापरत असतो किंवा त्यातले अधिकार वापरत असतो, ते आजकाल घातक ठरणारे आहेत. कारण त्यातून मिळणार्‍या सवलतीचा आडोसा घेऊनच कोरोना जगभर पसरला आहे. आपण नेहमी मोकळ्या हवेत श्वास घेतो. ती मोकळी हवा घेण्यालाही आज प्रतिबंध घातला गेलेला असेल, तर अन्य बाबतीत खुळेपणा काय कामाचा? गेल्या आठदहा दिवसात तबलिगी जमातीच्या सदस्यांनी देशात सर्वदुर कोरोना पोहोचवला, त्यात सर्वाधिक बाधा मुस्लिमांनाच केलेली आहे. कारण हे तबलिगी मशिदीत आश्रय घेतात, मुस्लिम वस्तीतच जाऊन मुक्काम करतात. सहाजिकच निश्चींत मनाने त्यांच्या सहवासात येणारे बहुतांश लोक मुस्लिमच आहेत. म्हणजेच तबलिगी हे नाव लपवून आपण निरपराध मुस्लिमांना कोरोनाच्या सापळ्यात ढकलून देतोय, इतकेही अशा आयोगाला भान उरलेले नाही. तबलिगी लोकांचा एक गणवेश ठरलेला आहे आणि इतरांना त्याचा पत्ता नसला तरी मौलवी, काजी वा मुस्लिमांना नुसत्या गणवेशावरूनही तबलिगी ओळखता येतात. त्यामुळे त्यांचा संसर्ग टाळा हा संदेश त्वरेने कोट्यवधी मुस्लिमांमध्ये पोहोचण्याचा सोपा मार्ग म्हणजे प्रत्येक बातमीत तवलिगी शब्दाचा अगत्याने वापर करणे आहे. बाधा झाल्यानंतर त्यांना शोधण्यापासून उपचार करण्यापर्यंतचा उपदव्याप टाळण्याची तीच उत्तम सोय आहे. त्यात कुठलेही स्वातंत्र्य वा मानवी अधिकार आडवे येणार असतील, तर गुंडाळून ठेवण्याखेरीज गत्यंतर नाही. कारण माणूस जगवण्यापेक्षा मानवी अधिकार नावाचे शब्द वा तरतुदी महत्वाच्या नाहीत. माणुस जगला तरच त्याला अधिकार असतात. मेल्यावर कुठलाच अधिकार शिल्लक उरत नाही. पण आज मुस्लिमांचे हितसंबंध जपण्याचा आव आणणारेच मुस्लिमांच्या जीवावर उठलेले आहेत. मशिदीत मरण्यातले पुण्य सांगणारा मौलवी साद आणि तबलिग शब्द बातम्यातून टाळायला सांगणारे; एकाच माळेचे मणी आहेत. ते सर्व समाजाच्या कोट्यवधी लोकसंख्येचा जीव धोक्यात घालत आहेत.

Thursday, April 9, 2020

कोरोनानंतरचे जग

 “The battlefield is a scene of constant chaos. The winner will be the one who controls that chaos, both his own and the enemies.”  - Napoleon Bonaparte

G20 video conference gathered world leaders coping with ...

आज अवघ्या जगाला कोरोना व्हायरसने भेडसावलेले आहे आणि म्हणूनच त्या विरोधात चाललेल्या उपचारांना व उपाययोजनांना कोरोना विरोधातले युद्ध मानले जात आहे. अशावेळी जे कोणी आपापल्या देशाचे व समाजाचे नेतृत्व त्यात करत आहेत, त्यांना सेनापती मानणे भाग आहे. अशा युद्धात सेनापती जसा वागतो आणि जसे निर्णय घेतो, तसेच प्रत्येक देशाच्या नेत्याला वागणे भाग आहे. जे जगाचे नेतृत्व करण्याचा टेंभा मिरवतात, त्यांनाही तसेच संयमाने वागले पाहिजे व निर्णय घेतले पाहिजेत. दुर्दैव असे आहे, की यातला शत्रू अदृष्य आहे आणि त्याची सेनाही नजरेत चटकन येणारी नाही. त्यामुळे माणसाच्या बाजूने ती लढाई लढणारे सैनिक व सेनापती यांनाही स्वत:पुरता विचार न करता सार्वत्रिक हिताचा विचार करूनच पुढे येणे भाग आहे. जगासाठी म्हणून उपकारक निर्णय घेणे भाग आहे. पण तिथेही दुर्दैव आहे. बहुतांश देशाचे नेते आपापल्या देशापुरते निर्णय घेत आहेत आणि प्रसंगी आपापसात भांडतही आहेत. त्यामुळेच अल्पावधीतच कोरोनाचा व्हायरस सोकावत गेला आणि बघता बघता त्याने अवघ्या जगाला विळखा घातला आहे. अशा वेळी सेनापतीने कसे नेतृत्व दिले पाहिजे आणि युद्धामध्ये कसे जिंकता येते, त्याचे मार्गदर्शन शेकडो वर्षापुर्वी ख्यातनाम सेनापती नेपोलियन बोनापार्ट याने करून ठेवलेले आहे. त्याचे तेच विधान म्हणून सर्वात आधी उधृत केलेले आहे. काय म्हणतो नेपोलियन?

कुठलेही युद्धक्षेत्र हे व्यवहारी पातळीवर सलग चाललेले अराजक असते. त्यात आपल्या बाजूचे वा समोरच्या बाजूचे अराजक असो, दोन्हीवर नियंत्रण मिळवू शकतो, तोच ते युद्ध जिंकत असतो. आपल्याला त्या पद्धतीने कोरोनाच्या संकटाला सामोरा जाणारा कोणी जागतिक नेता आज दिसतो आहे काय? दुसरे महायुद्ध संपल्यावर अस्तित्वात आलेला अमेरिका हा महाशक्ती देश आहे आणि मागल्या आठ दशकात त्याने जगाला नेतृत्वही दिलेले आहे. कुठल्या देशातली समस्या असो किंवा दोनतीन देशातले वार्दविवाद असोत, अमेरिकेने त्यात हस्तक्षेप केला आहे किंवा त्यांना मदतही केलेली आहे. आरंभी सोवियत युनियनशी अमेरिकेची स्पर्धा चालायची. पुढल्या काळात मुक्त अर्थव्यवस्था आली आणि जागतिकीकरणाने जग एकत्र आणले गेले. त्यानंतर सोवियत साम्राज्य ढासळले आणि अमेरिका एकमुखी जागतिक नेता ठरला. चीन त्याला आव्हान देण्याइतका संपन्न देश झालेला आहे आणि अजून त्याला जगाला नेतृत्व देण्याची दृष्टीही लाभलेली नाही. अशा काळात कोरोनाने घातलेला घाव मानव जातीच्या जिव्हारी बसला आहे. त्यातून सावरायचे कसे ही मोठी चिंता होऊन बसली आहे. पुढारलेले श्रीमंत पाश्चात्य देश अगतिक झालेत, रुग्णशय्येवर पडलेले आहेत. पण कोणीही जागतिक चिंतन करणारा नेता जबाबदारी घेऊन संयुक्त प्रयत्नांसाठी पुढाकार घेताना दिसलेला नाही. अशावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची जागतिक प्रतिमा नवा चेहरा समोर आणते आहे.

प्रचंड लोकसंख्येचा देश असूनही भारतात अजून कोरोनाला बेताल मुसंडी मारता आलेली नाही आणि मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याही नगण्य आहे. साधनांचा तुटवडा किंवा सुविधांची मारामार असतानाही मोदींनी भारताला त्या संकटातून सावरून धरलेले आहे. कारण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन केलेली कारवाई भारताच्या पथ्यावर पडली आहे आणि त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेही मोदींचे गुणगान केलेले आहे. योग्यवेळीच नव्हेतर नेमक्या वेळी लॉकडाऊनचा निर्णय अंमलात आणण्याचा धोका पुढारलेल्या देशांना घेता आला नाही. पण लोकसंख्येचा प्रचंड पसारा असूनही मोदींनी भारतात लॉकडाऊन हाच आजच्या काळातला निर्णायक उपाय असल्याचेच सिद्ध केलेले आहे. त्याचे कौतुक व अनुकरण सुरू झाले आहेच. अमेरिकेसारखा महाशक्ती देश भारताने उपयोगी औषधे पाठवण्यास मान्यता दिली म्हणून जाहिरपणे आभार मानतो आहे. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी तर रामायणाचा हवाला देऊन मोदींना संजिवनी बुट्टी देणारा संकटमोचन हनुमान ठरवलेले आहे. त्यातले व्यक्तीगत गुणगान बाजूला ठेवून राजकीय पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. कुठलाच देश आपला गेलेला तोल संभाळू शकत नाही अशा काळात मोदींनी भारताच्या आरोग्याचा तोल संभाळलाच आहे. पण इतर गडबडून गेलेल्या देशांना मदतीचा हात पुढे केला आहे. त्याला नेतृत्वाची कसोटी म्हणतात. जगभर मोदींचे कौतुक त्या नेतृत्व गुणांसाठी चालू आहे.

जेव्हा कोरोनाचा उदभव जागतिक होण्याची शक्यता दिसली, त्याची चाहुल सर्वात आधी भारताला लागली म्हणावे लागेल. कारण त्याचा जागतिक परिणाम ओळखून भारताने मोठ्या हालचाली सुरू केल्या. जागतिक आरोग्य संघटनेने त्याला महामारी जाहिर करण्यापुर्वीच मोदींनी सार्क देशांच्या व्हिडीओ कॉन्फ़रन्सचा प्रस्ताव पुढे केलेला होता आणि त्यानंतर लगेच जी-२० देशांच्या नेत्यांना तशाच पद्धतीने विचार करायला प्रवृत्त केलेले होते. म्हणजेच जगाने एकत्रितपणे कोरोनाच्या बंदोबस्ताला सामोरे गेले पाहिजे; ही भूमिका भारताकडून मांडली गेली. मोदींच्या दुरदृष्टीने या संकाटाचा पल्ला प्रथम ओळखला आणि देशाच्या सीमांपलिकडे या युद्धाची व्याप्ती जगाला समजून घ्यायला भाग पाडले. प्रत्येक देशाला आपल्यापुरती लढाई लढून कोरोनाला हरवता येणार नाही, हे समजावणारा  दुसरा कोणी नेता जगात आहे काय? एका बाजूला मोदी आपल्या देशांतर्गत कठोर उपाय योजत होते व त्यासाठी सामान्य जनतेलाही विश्वासात घेऊन पावले टाकत होते. दुसरीकडे त्यांनी आशिया व संपुर्ण जगाला त्यापासून वाचवण्यासाठी काय करायला हवे, त्याची भूमिका मांडायला सुरूवात महिनाभर आधीच सुरू केली होती. प्रत्येक देशात त्याविषयी अराजकच होते आणि भारतातही त्याचे नको तितके हिडीस राजकारण चालूच होते. पण सगळ्या अराजकाला नियंत्रणाखाली राखण्याची क्षमता दाखवणारा नेता फ़क्त भारतात होता आणि हळुहळू त्याला आता जगाची मान्यताही मिळू लागलेली आहे.

थोडक्यात कोरोनाचा पुढल्या काळात पराभव होऊन मानवजात त्यातून सावरून उभी राहिल यात शंकाच नाही. पण तेव्हाचे जग कालच्या जगासारखेच तंतोतंत असणार नाही. त्याचा चेहरामोहरा आमुलाग्र बदललेला असेल. त्याचे नेतृत्व करणारे चेहरे साफ़ बदलून गेलेले असतील. त्या नेतृत्वाचे स्वरूपही आजच्यापेक्षा बदललेले असेल. श्रीमंत वा शस्त्रसज्ज असलेले देश वा त्यांचे बळाचा वापर करून पुढाकार घेणारे नेतृत्व मागे पडलेले असेल. मानवी जगाला संकटातून वाचवणारा व मदतीचा हात निर्भेळ मनाने देणारा समाज वा नेता, जगाचे नेतृत्व करायला पुढे आलेला असेल. जगाचे नेतृत्व कसे हवे त्याची आज कठोर परिक्षा चालू आहे आणि त्यात ब्राझील अमेरिकेने मत दिलेले आहे. जपान इस्रायल आधीच भारताचे समर्थक झालेले आहेत. पण कोरोना विरुद्धच्या युद्धात जगभरच्या देशांना भारताने योग्य उदाहरण घालून दिलेले आहे. अर्थव्यवस्था, उद्योग वा व्यापारापेक्षाही माणूस आधी जगवला पाहिजे आणि तो जगवला तर नवी अर्थव्यवस्था उभारता येईल, हा नव्या जगासाठीचा साक्षात्कार आहे. चीन असो वा अमेरिका व पाश्चात्य देश असोत; त्यांना माणूस व अर्थकारण यातून योग्य निर्णय घेता आले नाहीत किंवा समतोल राखता आलेला नाही. त्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागत असताना कोट्यवधी लोकांना जगवण्याचा मोदींनी घेतलेला वसा, कोरोना नंतरच्या जगासाठी उद्धाराचा नवा मार्ग असणार आहे. तो जगाची राजकीय भौगोलिक आर्थिक रचना बदलून टाकणार आहे. जनतेचा नेता कसा असावा आणि संकटकाळात सेनापती कसा असावा, त्याचा वस्तुपाठच भारताकडून जगाला दिला जातो आहे. २०२१ सालातले जग कसे असेल? प्रत्येकाने आपापल्या प्रतिमा रंगवाव्या, लॉकडाऊनमुळे भरपूर वेळ आहे ना आपल्याला?

Tuesday, April 7, 2020

कठीण समय येता, कोण कामास येतो?

Coronavirus Outbreak: Amitabh Bachchan, Rajinikanth, Mohanlal ...

अकस्मात कुठल्याही वाहिनीवर तुम्ही कुठला कार्यक्रम बघत आहात. त्यात कथामालिका चालत असते किंवा प्रायोजकाची जाहिरात लागलेली असते. रंगीत टिव्हीच्या जमान्यात एकदम पडदा कृष्णधवल होतो आणि सोफ़ावर बसलेला अमिताभ बच्चन कुठल्या तरी हिंदी चित्रपटातल्या वृद्ध गृहस्थाच्या रुपात दिसतो. बोलतो ते वाक्यही तसेच तद्दन फ़िल्मी. ‘अरी ओ सुनती हो? मेरा काला चष्मा कहा है?’ तेच दोनदा बोलल्यावर वैतागून नरम आवाजात म्हणतो, घरात माझे कोणी ऐकत नाही. मग एकामागून एक वेगवेगळ्या फ़िल्मी कलावंतांचे दर्शन आपल्याला होऊ लागते. एक शीख फ़ेट्यातला गायक नट आहे, तो झोपलेल्या कोणाला तरी उठवून अंकलचा चष्मा कुठे म्हणून विचारणा करतो. पुढल्या फ़्रेममध्ये डोळ्यावर पट्टी बांधून झोपलेला रणवीर कपूर वैतागून त्याला दुरूत्तर देतो आणि नंतर मराठी अभिनेत्री चक्क मराठीत अंकलचा चष्मा दोघांनी शोधून काढा, म्हणून त्यांना दटावते. पुढे ही साखळी वाढतच जाते. त्यात बंगाली, मल्याळी, तामिळी, तेलगु अभिनेतेही दिसत जातात आणि आपापल्या भाषेत चष्मा विषयक काही बोलतात. काही मिनीटात फ़िरत फ़िरत कथानक पुन्हा अमिताभपर्यंत येऊन पोहोचते आणि विषय संपतो. शेवटी त्या इवल्या चित्रपटाची सांगता करताना त्याच्या निर्मितीची कथाही अमिताभ सांगतो. ह्या सगळ्या कलावंतांनी मिळून पुर्ण केलेला तो छोटासा चित्रपट, एकमेकांना भेटल्याशिवाय आणि एकत्र आल्याशिवाय चित्रित केला आहे. ते सगळे आपापल्या घरातच आहेत आणि आपल्याला जमेल तसे तितके चित्रण करून त्यातून त्यांनी हे कथानक बनवले आहे.

ज्याची कोणाची ही कल्पना पटकथा असेल त्याला साष्टांग दंडवत घातला पाहिजे. इतक्या मोठ्या जागतिक संकटात कलाकाराने वा प्रतिभावंताने कसे वागावे किंवा कसे व्यक्त व्हावे; त्याचा यापेक्षा उत्तम वस्तुपाठ दुसरा असू शकत नाही. आज देशातल्या कोट्यवधी लोकांना आपापल्या घरात बंदीस्त होऊन पडावे लागलेले आहे. जगण्यासाठी व कोरोनापासून सुरक्षित रहाण्यासाठी हा दुरावा आवश्यक आहे. तर त्यात सामान्य जनतेला प्रेरीत करण्यासाठी त्यांनी केलेला हा प्रयास आहे. अशा प्रकारे एक छोटाचा आटोपशीर चित्रपट बनवून लोकशिक्षण व प्रबोधन करता येईल, हे ज्याला सुचले त्याचे कौतुक आहे. त्याला प्रामाणिकपणे प्रतिसाद देऊन प्रत्येक भाषेतल्या कलावंताने आपल्याच घरात बसून उपलब्ध असलेल्या साधनांनिशी ते चित्रण पुर्ण करून पाठवले. कोणीतरी त्याचे कलात्मक संकलन करून चित्रपट म्हणून पेश केलेले आहे. ह्या सगळ्यांची सामुहिक इच्छा व कल्पकता त्यातून साकार झालेली आहे. समाजाला कोणत्या व कशा प्रतिभावंतांची गरज आहे, त्याचा हा सर्वोत्तम दाखला आहे. म्हटले तर प्रकार गंमतीशीर आहे. पण प्रसंग व प्रयास यांची घातलेली सांगड, हा खराखुर्‍या प्रतिभेचा अविष्कार आहे. त्यामध्ये कोणी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला नाही, किंवा राजकीय मान्यतेने प्रतिभावंत म्हणून मिरवणाराही नाही. सगळे व्यवहारी जगातले् व्यवसायिक कलाकार आहेत. अमिताभ ते रजनीकांत.

आता आपण त्या प्रतिभेचा शोध घेऊ. चार वर्षापुर्वी दिल्लीनजिक दादरी नामे गावात गोमांस खाल्ल्याचा आरोप होऊन अखलाख नावाच्या एका गरीब मुस्लिमाची हत्या झाली होती. त्याला एका जमावाने मारले होते आणि त्याचा गवगवा झाल्यानंतर अकस्मात देशातल्या कांगावखोर प्रतिभावंतांना काही साक्षात्कार झाले होते. मानवतेला काळीमा फ़ासला गेला म्हणून त्यांनी धडाधड लाईन लावून आपल्याला मिळालेले सरकारी पुरकार परत करण्याची मोहिम सुरू केली होती. त्यांना प्रतिभावंत कोणी ठरवले? माध्यमातल्या त्यांच्याच साथीदारांनी आपल्या राजकीय विचारांच्या अशा भणंगांना प्रतिभावंत म्हणून पेश केले होते. त्यांच्या पुरस्कार वापसीचा तमाशा खुप रंगवला होता. त्यांची प्रतिभा किती व सृजनशीलता किती, हा भाग संशयास्पदच होता व आहे. देशाच्या कुठेही कोपर्‍यात काही विचित्र घडले म्हणून त्या बाजारू प्रतिभावंतांना मरणयातनांनी ग्रासले होते. पण त्यापैकी आज कुणाचाही मागमूस अवघा देश संकटात सापडलेला असताना लागलेला नाही. कोरोनाने अवघ्या जगाला व कोट्यवधी भारतीयांना भेडसावून सोडलेले आहे. आपापल्या घरातच बंदिस्त करून टाकलेले आहे. अविष्कार सोडूनच द्या, साधे संचार स्वातंत्र्यही अवघा देश कोरोनामुळे गमावून बसला आहे. महाल मनोर्‍यापासून साध्या झोपडीपर्यंत प्रत्येक भारतीय कोंडवाड्यात पडला व घुसमटला आहे. तर त्याला दिलासा द्यायला त्या पुरस्कारी प्रतिभावंतांनी काही केले आहे काय? आज देश कोट्यवधी लोकांच्या असह्य जगण्याला सुसह्य करण्यासाठी त्यांच्या प्रतिभेला कुठलाही अंकुर फ़ुटलेला नाही. अशा पार्श्वभूमीवर उपरोक्त इवल्या चित्रपटाचे कथानक म्हणजे जणू महाकाव्यच आहे.

गेल्या सहा वर्षापासून आपण आपल्या देशाच्या विविध प्रांतातल्या व भाषेतल्या ढोंगी प्रतिभावंतांची नौटंकी बघत आलेलो आहोत. कुठलेही फ़ुटकळ कारण वा निमीत्त शोधून हे लोक नरेंद्र मोदींना हुकूमशहा फ़ॅसिस्ट ठरवायला उतावळे झालेले आपण बघितलेले आहेत. कॉग्रेसचे राज्य व सत्ता असलेल्या कर्नाटकात कलबुर्गी हे साहित्यिक व गौरी लंकेश या महिला पत्रकाराची हत्या झाली. तिथे पोलिसांचे म्होरके कॉग्रेसचे आणि त्याचेही खापर मोदींवरच फ़ोडायला हिरीरीने पुढे आलेला प्रत्येकजण स्वत:ला पुरोगामी वा प्रतिभावंत म्हणवून घेणाराच होता ना? प्रतिभा ही नव्या कलेचा वा जनहिताला प्रेरणा देणारा अविष्कार असतो. पण त्यापैकी कितीजण वास्तविक जीवनात तशा प्रतिभेचा साक्षात्कार घडवू शकलेले आहेत? त्यांना आपल्या राजकीय मतलबासाठी प्रतिभेचा मुखवटा लावलेलेच आपण बघितले आहे. मागल्या लोकसभा निवडणूकीपुर्वी सहाशेहून अधिक अशा तोतयांनी एकत्रित सह्यांचे पत्रक काढलेले होते आणि देशात बुद्धीजिवी व प्रतिभावंतांची गळचेपी होत असल्याचा कांगावा केलेला होता. नागरी स्वातंत्र्ये धोक्यात आली आणि अघोषित आणिबाणीच मोदींनी लावली; म्हणून सामुदायिक गळा काढलेला होता ना? मग आज काय परिस्थिती आहे? त्यांनी गळा काढला व टाहो फ़ोडला, तेव्हा सगळीकडे मुक्त संचार करायची मुभा होती. पण आज अवघा देश तुरूंग असल्यासारखी परिस्थिती आहे आणि त्यासाठीचा लॉकडाऊन मोदींनीच घोषित केला आहे. पण त्याविषयी त्यापैकी एका तोतया प्रतिभावंताने तोंडही उघडलेले नाही. अचानक त्यांची प्रतिभा म्हशीसारखी आटून गेली काय?

अर्थात नामवंत वा ख्यातनाम मंडळी बिळात लपून बसली आहेत आणि त्यांची बाजारू पिलावळ मात्र आपल्या प्रतिभेचे शक्य तितके हिडीस प्रदर्शन आजही करते आहे, जागतिक आरोग्य संघटनेपासून प्रगत देशांचे पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष मोदींनी उचललेल्या कोरोना विरोधी पावलांचे गुणगान करीत आहेत. त्यामुळे भारतात कोरोनाचा प्रभाव रोखला गेला, म्हणून जगाला कौतुक वाटते आहे. पण तोतया प्रतिभावंतांची तोंडे बंद आहेत आणि त्यांची अनौरस पिलावळ मात्र आजही तितक्याच उत्साहाने मोदींची खिल्ली उडवण्यासाठी आपल्या बुद्धीचे शेण सारवत बसलेली आहे. अशा भंपक पुरस्कृत वापसीखोर कवी साहित्यिकांची भाषा व शब्द, आता किळसवाणे वाटायला लागलेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अमिताभ व अन्य कलावंतांनी केलेला हा अल्पकालीन अजब कलाविष्कार कंटाळलेल्या नागरीकांना मोठाच दिलासा देणारा आहे. म्हणूनच काळाच्या कसोटीवर उतरलेली प्रतिभा म्हणून त्याकडे बघण्याची गरज आहे. त्याकडे लक्ष वेधण्याची आवश्यकता आहे. किंबहूना प्रतिभावंत कसे नसावेत आणि असावे, याची जाण सामान्य माणसात रुजावी, म्हणून या कलाकृतीविषयी लिहीणे मला अगत्याचे वाटले. खरे सोने अग्नीत झळाळून निघते म्हणतात, त्याचाच हा पुरावा नाही काय? कोंडवाड्यात पडलेल्या या सर्व सुखवस्तु कलाकारांनी याही कसोटीच्या सत्वपरिक्षेच्या कालखंडात आपल्या मनस्तापाला बाजूला ठेवून समूह दुरावा हेच जगण्यातले खरे सुत्र असल्याचे साध्या सोप्या स्वरूपात जनतेला समजावण्याचा केलेला हा प्रयास म्हणूनच कौतुकास्पद आहे. तेच कोरोनाच्या अंधार युगातले इवलेसे महाकाव्य म्हणणे भाग आहे. अर्थात त्यातले काव्य पुरस्कृत वा प्रमाणपत्र, पदके मिरवणार्‍या प्रतिभावंतांना कधीही समजू उमजू शकणार नाही, हा भाग वेगळा.

Monday, April 6, 2020

डोळ्यापेक्षा डोळसपणा महत्वाचा

Image may contain: 3 people, people standing

सत्तर वर्षापुर्वी आजचा इस्रायल अस्तित्वात आला. त्याला तेव्हापासून आजपर्यंत कायम युद्धाच्या छायेतच जगावे लागलेले आहे आणि नजिकच्या काळात तरी त्यापासून त्या देशाची मुक्तता होईल, अशी अपेक्षा बाळगता येणार नाही. कारण आपल्याला मित्र निवडता येतात, पण शेजारी वा शत्रू निवडणे आपल्या हाती नसते. तो त्यांचा विशेष अधिकार असतो. त्याला थोपवणे किंवा त्याच्याही दोन हात करणे वा दिर्घकाळासाठी निकामी करून सोडणे मात्र आपल्या हाती असते. त्यात आपण किती हलगर्जीपणा करतो, त्यावर भोगायचे परिणाम अवलंबून असतात. त्यामुळे आता तबलिगी जमातमुळे काय झाले, किंवा त्यांचा वेळीच बंदोबस्त दिल्ली पोलिसांनी कशाला केला नाही? त्यांना परदेशातून इथे कशाला येऊ दिले, असले प्रश्न विचारण्यात अर्थ नसतो. असलीच तर बदमाशी असू शकते. असो, तो वेगळा विषय आहे. मुद्दा इतकाच आहे, की दोन आठवडे होत आलेल्या लॉकडाऊन वा सार्वत्रिक कर्फ़्युचे काय आणि ती आणखी किती लांबणार? त्यात कधी सुट मिळणार किंवा त्यात कसे जगावे, हा तातडीचा प्रश्न आहे. ही परिस्थिती येईल असे कॅलेंडरमध्ये कोणा भविष्यवेत्त्याने सांगून ठेवलेले नव्हते्, किंवा त्यासाठी तयारी करायला कोणाला मुदत दिलेली नव्हती. सहाजिकच अशा परिस्थितीत जसजशी कथा उलगडत जाते, तसे त्याचे उपाय शोधणे व उत्तरे शोधण्याला पर्याय नसतो. ते करण्याची क्षमता व हिंमत ज्यांच्यापाशी असते, असेच देश समाज कुठल्याही संकटावर मात करून जगू शकतात. त्याचाच अविष्कार रविवारी आपण सर्वांनी घडवला आहे आणि त्याचीच साक्ष दिलेली आहे. ह्यातली प्रतिकात्मकता अनेक शहाण्यांना उमजली नाही. पण त्याचे ज्वलंत उदाहरण इस्रायल हेच आहे.

साधारण दोन हजार वर्षापुर्वी तो देश पृथ्वीच्या पाठीवरून पुसला गेला असे म्हणतात. त्यानंतर जगभर पांगलेल्या ज्यु टोळ्यांनी मिळेल तिथे आश्रय घेतला आणि प्रतिवर्षी ते उत्सवानिमित्त एकत्र यायचे, त्यावेळी म्हणायचे पुढल्या वर्षी जेरूसेलमला भेटू. ते पुढले वर्ष उजाडायला तब्बल वीस शतकांचा काळ उलटावा लागला आणि १९४९ सालात इस्रायल खरोखरच जगाच्या नकाशात दिसू लागला. पण दोन हजार वर्षे ते स्वप्न उराशी बाळगलेले होते आणि एकदोन नव्हेतर लाखो ज्यू धर्मियांनी ते स्वप्न विझू दिले नाही. मरू दिले नाही. अखेरीस ते साकार होतानाही मोठी कुर्बानी त्या वंशाच्या व धर्माच्या लोकांना द्यावी लागलेली आहे. पॅलेस्टाईन हा देश तेव्हा ब्रिटीशांच्या ताब्यात होता आणि दुसर्‍या महायुद्धानंतर त्याचा ताबा सोडण्याची वेळ आली, तेव्हा ताबा कोणाकडे द्यायचा असा सवाल उभा राहिला. कारण तोपर्यंत जगातले ज्यु मोठ्या सख्येने तिथे वास्तव्याला आलेले होते. हिटलरच्या कत्तलीने सैरावैरा झालेल्या हजारो ज्युधर्मियांना तिथे आश्रय घ्यावा लागलेला होता. पण त्या काळात तरी तिथे अरबांची संख्या मोठी होती. त्यांचा ज्युवंशियांना स्वतंत्र देश वा भूमी देण्याला साफ़ विरोध होता. त्यामुळे हा विषय नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाकडे गेला. त्या जागतिक संघटनेने पॅलेस्टाईनचे तीन भाग पाडायचा निर्णय घेतला. त्यातला एक ज्युंसाठीचा देश, दुसरा अरबांचा देश आणि जेरूसेलम हे तीन धर्मांचे जन्मस्थान म्हणून त्याचा ताबा वा कारभार राष्ट्रसंघाच्या हाती असावा; असे ठरलेले होते. पण तो प्रस्ताव ज्युधर्मियानी मानला तरी अरबांनी साफ़ फ़ेटाळून लावला. जो जिंकेल वा काबीज करील, त्याची तितकी भूमी असा आडमुठेपणा अरबांनी केला. त्याचे काही कारण होते. सभोवती पाच अरबी देश होते आणि त्यांच्या आपापल्या अरबी फ़ौजा होत्या. उलट पॅलेस्टाईन देशात आश्रयाला आलेल्या ज्युंची संख्या मोठी असली, तरी त्यांची फ़ौज नव्हती. कारण तिथे ब्रिटीशांची सत्ता होती.

थोडक्यात समान संख्येने ज्यु व अरब असल्याने आतले अरब आणि शेजारी अरब फ़ौजा मिळून ज्युधर्मियांना सहज पराभूत करू वा कत्तल करून संपवू; असा अरबांना आत्मविश्वास होता. तर इथून अन्यत्र जायचे कुठे व कसे; ही ज्युंसाठी जीवनमरणाची समस्या होती. म्हणून त्यांनी राष्ट्रसंघाचा प्रस्ताव निमूट मान्य केला होता. पण अरबांनी तो फ़ेटाळल्यावर लढाईला पर्याय उरला नाही आणि अखेर ती स्थिती उदभवली. तेव्हा हातात कुठले भेदक शस्त्र नव्हते की दारुगोळा नव्हता. प्रशिक्षीत सेनाही नव्हती. इतक्या प्रतिकुल स्थितीत ज्युधर्मियांना इस्रायलची नव्याने स्थापना करायची होती. मग रक्त सांडून भूमी संपादन करायची नाही तर मरायचे; इतकाच पर्याय होता. ज्युधर्मिय त्यासाठी कटीबद्ध झाले आणि त्यांनी शेजारच्या पाचही अरबी देशांना व त्यांच्या फ़ौजांना पाणी पाजले. त्यामध्ये तेव्हा राष्ट्रसंघाने हस्तक्षेप केला नसता, तर सगळा पॅलेस्टाईन ज्युधर्मियांनी काबीज केला असता. गाझा पट्टी वा वेस्ट बॅन्क असले विषय उरले नसते्. आज सतत धुमाकुळ घालणारा पॅलेस्टाईन विषय भेडसावू शकला नसता. असो, तो इतिहास इथे सांगण्याची गरज नाही. त्या युद्धात लढूनच भूमी मिळवायची तर जेरूसेलमही हाती राहिले पाहिजे, असे तात्कालीन इस्रायली नेतृत्वाने ठरवले आणि चहूकडून अरबी फ़ौजांनी वेढलेल्या अवस्थेतही बाजी मारली. उंचवट्यावरच्या जेरूसेलमला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन अरबी फ़ौजांनी तोडून टाकलेली होती. सहाजिकच दोन आठवडे युद्ध आटोपण्यापर्यंत जितके पाणी व खाद्यपदार्थ उरले होते, त्या शिध्यावर लढणे अपरिहार्य होते. त्यातले अनेक प्रसंग मोलाचे आहेत. शॅटनेल नावाचा इस्रायली अधिकारी त्या शहराचे प्रशासन संभाळत होता. असलेल्या लोकसंख्येला त्यातून जगवता येईल, इतकीच काळजी घेत होता. प्रत्येक दिवशी एका माणसाला किती पाणी पुरेल व किती किमान अन्नावर जगवता येईल; त्याची गणिते मांडून समिकरणे सोडवून ती बाजी मारली गेली. पण जेरूसेलमवर इस्रायलचा ताबा कायम राहिला व आजही कायम आहे.

आज एकशेतीस कोटी लोकसंख्येला काटेकोर कर्फ़्युमधून जगवणे व आवश्यकतेनुसार साधनांचा पुरवठा करणे किती अशक्य कोटीतले काम आहे त्याचा अंदाज जेरूसेलमच्या इतिहासावरून लक्षात येऊ शकते. तिथे काही हजार लोकसंख्या होती आणि इथे अखंड भारताचा लॉकडाऊन म्हणजे त्याच्या लाखोपटीने अधिक लोकसंख्येला जगवायचे व धीर धरायलाही समजवायचे आहे. तिथे गणिते, विज्ञान वा बुद्धीवाद कामाचा नसतो. कालचे नियोजन आज निरूपयोगी ठरत असते. कालचा किमान पुरवठाही आज चैनीचा वाटावा इतकी हलाखीची परिस्थिती ठरू शकत असते. त्यामुळे क्षणाक्षणाला उपलब्ध साहित्य व त्याचा अधिक गरज असलेल्यांपर्यंत वेळेतला पुरवठा, निर्णायक महत्वाच असतो. आज भारतातला प्रत्येक मुख्यमंत्री, अधिकारी, सामान्य डॉक्टर वा अन्य धोरणकर्ते अंमलदार कुठल्या चक्रव्युहातून देशाला बाहेर काढू बघत आहेत; त्याचे हे जगडव्याळ वर्णन आहे. कुठे काय किती पोहोचले, त्यापेक्षा कसे पोहोचले त्याची नवलाई अधिक आहे. तिथे प्रत्येक नागरिकाने कुठलेही शब्द बोलल्याखेरीज दुसर्‍याची कृती व भावना समजून घेण्याला प्राधान्य आहे. जेरूसेलमच्या त्या युद्धात ज्युधर्मियांकडे पुरेशी हत्यारे बंदुकाही नव्हत्या. अशा वेळी सहासात लढू बघणार्‍यांना एकच बंदुक आळीपाळीने वापरावी लागत होती आणि एका चर्चचा आडोसा घेऊन लढणार्‍या एका सैनिकाला गोळी लागली. तो कलंडला तर दुसर्‍याने तीच बंदुक घेऊन खिंड लढवायला सुरूवात केली. तो जखमी ज्यु सैनिक कुशीवर वळला विव्हळत होता. त्याला वेदना असह्य झालेला होता. त्याच्या जवळच एक लढवय्या तरूणी त्याला दिलासा देत होती. त्याने तिच्या शर्टमध्ये हात घालून काही क्षण तिचे स्तन कुरवाळत प्राण सोडला. बघणार्‍यांना दिसणारे दृष्य विचित्र होते. पण तो मरणारा सैनिक काय करतोय व का करतोय, हे त्या मुलीला कळत होते का? या विषयातले तिचे उत्तर वा खुलासा चक्रावून सोडणारा आहे. ते कुठल्या शाळा कॉलेजात वा अभ्यासवर्गात शिकवले जात नाही. परिस्थिती व अनुभवातून त्याचे धडे मिळतात व गिरवले जातात.

पुढे युद्ध संपल्यावर अनेकांनी त्या मुलीला त्याविषयी विचारले. तो मरताना तिच्या स्तनाशी खेळलेला सैनिक तिचा प्रियकर वा नवरा नव्हता. पण त्याने मृत्यूच्या अंतिम टप्प्यात तिच्याशी असे लैंगिक चाळे कशाला करावेत? तिने असा चावटपणा सहन तरी कशाला करावा? असे वागणे त्या युद्धस्थितीत किती योग्य होते? समोर मृत्यु दिसत असताना तो ज्यु सैनिक असा कशाला वागला? आपल्याही मनात असे कितीतरी प्रश्न येऊ शकतात. कारण आज आपण त्या परिस्थितीत नाही किंवा तेव्हाही त्या घटनेचे साक्षिदार नव्हतो. असतो तर आपल्या मनात असा प्रश्न आला असता काय? त्या मुलीला वा तिच्या अन्य सोबती साथीदारांना त्या मृताच वागणे खटकले कशाला नाही? या सगळ्या प्रश्नांनी उत्तरे त्या मुलीने त्याबाबत दिलेल्या एका वाक्याच्या मोजक्या शब्दात सामावलेली आहेत. ती त्यावर बोलताना उत्तरली, ‘त्या क्षणी माझ्या देशासाठी शहीद होणार्‍या सैनिकाच्या मरणयातना हलक्या करायला अन्य कुठले वेदनाशामक उपलब्ध नव्हते.’ लैंगिक वागण्यातून वा तशा स्त्री देहाच्या स्पर्शातून मृत्यूच्या वेदना कमी होऊ शकतात काय? त्याचे उत्तर शरीरशास्त्राचे अभ्यासक देऊ शकतील वा स्पष्टीकरणही मिळू शकेल. पण मुद्दा वेगळाच आहे. तसे वागल्याने आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत वेदनांवर मात करता येईल, हे त्या सैनिकाला सुचले कसे? त्याला सुचले असेल तरी त्याचा हेतू त्या मुलीला कसा उमजला असेल? त्याचे उत्तर कधीच मिळू शकणार नाही. कारण आपण त्या परिस्थितीत नसतो आणि जे त्यातून जात असतात, त्यांनाच तिथली उत्तरे व उपाय शोधावे लागत असतात. अंमलात आणावे लागत असतात. आपल्या दिवाणखान्यात सुरक्षित जागी बसून त्यावर चर्चा करणे सोपे असते, तितके त्या अनुभवातून जाणे अशक्य असते. ज्यांना ते कळू शकते वागताही येते, त्यांना कोरोना वा कुठलाही महाशक्तीशाली देश शत्रू पराभूत करू शकत नाही.

जेरूसेलम म्हणून ज्युधर्मिय काबीज करू शकले व आजपर्यंत आपला कब्जा राखू शकले आहेत. त्यांना त्याचे कोणी प्रशिक्षण दिलेले नव्हते. असे कुठले प्रशिक्षण नसतेच. परिस्थिती उदभवली की उपजत भावनाच तुमच्याकडून अशी कामे करून घेतात. सचिन किंवा विराट कुठल्या चेंडूवर कसे बाद झाले, त्याचे विश्लेषण करू शकणारे त्या चेंडूचा सामनाही करण्याच्या कुवतीचे नसतात. विश्लेषण, चिकित्सा, टिका वा भाष्य जितके सहज सोपे असते, तितके परिस्थितीला सामोरे जाणे सोपे नसते. प्रयोगशाळेतली गणिते समिकरणे मांडणार्‍यांना कधी म्हणूनच चंद्रावर पाऊल टाकता आले नाही. पण त्यांनी तितका आगावूपणा कधीच केला नाही. त्या मर्यादा संभाळू शकतो, त्याला विचारवंत, विज्ञानवादी, बुद्धीमान म्हणतात. बाकीचे नुसते तोंडाची वाफ़ दवडणारे वाचाळवीरच असतात. त्यांच्यापाशी आपल्या बुद्धीपुरताही आत्मविश्वास नसतो आणि कशावरचा उपायही नसतो. असे शहाणे परोपजिवी बांडगुळे असतात. खायला फ़ार आणि धरणीला भार असे त्यांच्याविषयी आपल्या पुर्वजांनी सांगून ठेवलेले आहे. त्यांना रविवारी रात्री नऊ वाजता नऊ मिनीटे लाईट घालवून दिवे पेटवण्यातून काय साधले ते कधीच कळणार नाही. पण ते भारतातल्या उपाशी पोटी झोपणार्‍या् करोडोंना कळते म्हणून त्यांनी डोक्यावर धड छप्पर नसलेल्या झोपडीच्या दारातही पणती मेणबत्ती पेटवली. दुसरीकडे देशातला सर्वात श्रीमंत म्हटले जाणारे मुकेश अंबानी किंवा उद्योगपती रतन टाटांनीही आरतीचे तबक घेऊन त्या झोपडीवासी उध्वस्त भारतीयाची बरोबरी केली. मात्र सदोदीत समतेच्या गप्पा छाटताना आपल्या तोंडाची वाफ़ दवडणार्‍यांना त्यातला समतेचा संदेशही समजून घेता आलेला नाही. येणारही नाही. दिवे पेटवून किंवा सूर्योदय होऊन काही उपयोग नसतो. त्या किरणांचा प्रकाश वा सिग्नल मेंदूपर्यंत घेऊन जाणारी डोळ्यांची यंत्रणा कार्यरत असावी लागते. निर्बुद्धतेने तीच निकामी करून टाकली असेल तर बिचारा सूर्य काय करणार? सुर्य बघता येत नसतो, अशा शहाण्यांना मेणबत्ती कशी दिसावी. त्यामागचे उद्दीष्ट कसे उमजावे ना?

Saturday, April 4, 2020

ओसामा आणि तबलिग

Tablighi Jamaat's long history of ties with Pak-based terror outfits

या आठवड्याच्या आरंभी दिल्लीच्या निजामूद्दीन मर्कझ येथे जमलेल्या हजारो तबलिगी जमात सदस्यांच्या मार्फ़त देशाच्या कानाकोपर्‍यात कोरोना व्हायरसची बाधा पोहोचल्यावर ह्या संघटनेचे नाव गाजू लागले. पण म्हणून अशी संघटना अकस्मात उगवलेली नाही. आताही त्याविषयी चर्चा सुरू झाल्यावर त्या संघटनेने माजवलेला हाहा:कार ही मानवी चुक असल्याचे सिद्ध करण्याचा आटापिटा पुरोगामी वा सेक्युकर म्हणवणारे करीत आहेत. तितकेच नाही, तर त्यावरून लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी दिवे लावून कोरोना कसा पळून जाईल, असली दिशाभूल करून तबलिगी चर्चेला फ़ाटा देण्याचा आटापिटा चालू आहे. कारण अशा कडव्या धर्मांध मुस्लिमांना किंवा जमाते पुरोगामींना सत्य झाकून ठेवायचे आहे. अन्यथा तबलिगी कारवायांमागील ओसामा बिन लादेनची प्रेरणा किंवा विचारधारा जगासमोर येण्याच्या भितीने या भामट्यांना पछाडलेले आहे. वरकरणी तबलिगी सदस्यांचे वागणे चुक वा खुळेपणाचे अंधश्रद्धेचे वाटले, तर ती तशी चुक करायचे कारण नाही. डोळसपणे त्यातला जिहाद ओळखता व समजून घेता आला पाहिजे. ओसामाच्या प्रेरणेने फ़िदायीन झालेले व आत्मसमर्पण करून आपली धर्मश्रद्धा अधिक कडवी असल्याचे सिद्ध करायला निघालेले जिहादी आणि आज बाधा पसरवणारे तबलिगी; यांचा अजेंडा एकच आहे आणि त्यामागची रणनिती जशीच्या तशी समान आहे. अफ़गाण जिहादमधून सोवियत फ़ौजांना पाणी पाजल्यावर लादेन किंवा त्यातले अनेक मुल्ला मौलवी यांनी काय निष्कर्ष काढला होता? त्याची आठवण तरी आहे कोणाला? ती मंडळी म्हणत होती, नुसत्या अफ़गाणी जिहादने महाशक्ती असलेले सोवियत साम्राज्य जमिनदोस्त केलेले आहे आणि त्याच मार्गाने अमेरिका व अन्य पुढारलेल्या देशांना इस्लामसमोर शरणागत करणे सहज शक्य आहे. त्याची रणनिती काय होती? अमेरिकेतील जुळे मनोरे पाडल्यावर ओसामाचे एक वक्तव्य आलेले होते. पाश्चात्य लोकशाही सत्तांना व अर्थव्यवस्थांना त्यांच्याच बोजाखाली जमिनदोस्त करायचे.

ह्या एका वाक्यातील आधुनिक जिहादची व्याप्ती कधी समजून घेतली गेली नाही आणि त्यानुसार त्याला रोखण्यास योग्य पावले उचलली गेली नाहीत. त्याचा परिणाम गेल्या काही वर्षात मध्यपुर्वेतील अरब देशांनी अनुभवला आहे आणि त्याचे दुष्परिणाम युरोपियन देशांना भोगावे लागलेले आहेत. त्याचाच पुढला टप्पा म्हणजे तबलिगने टाकलेले पाऊल आहे. लोकशाही सत्ता व अर्थव्यवस्थांना त्यांच्याच बोजाखाली जमिनदोस्त करायचे म्हणजे काय? यापैकी बहुतांश देशांनी आपल्याच कायदे व नियमांसह विविध भ्रामक संकल्पनांनी स्वत:ला जायबंदी वा जखडून ठेवले आहे. त्यांना त्याच्याच जखडणार्‍या नियम संकल्पनांनी घुसमटून टाकायचे आणि त्यात त्यांचाच गुदमरून मृत्यू सहज होऊ शकतो. तो कसा? तर जिहादला सज्ज झालेल्यांनी अशा तमाम लोकशाही उदारमतवादी व्यवस्था किंवा त्यांचे कायदे झुगारून वागायचे आणि त्यात गुन्हेगार ठरले, तरी आपल्याला न्याय देण्याची जबाबदारी मात्र त्याच व्यवस्थांवर टाकायची. कारण त्यांनी मुर्ख न्यायाच्या संकल्पनेचा फ़ास आपल्याच गळ्याभोवती आवळलेला आहे. आपल्याच पायात उदारमतवादी बेड्या ठोकून घेतलेल्या आहेत. अमेरिकेने सेना पाठवून अफ़गाणिस्तानाची तालिबानी सत्ता उध्वस्त केली. पण तिथे लोकशाही पद्धतीनेच अमेरिकन सैन्याचे हातपाय बांधून ठेवलेले होते. सहाजिकच कोणी अमेरिकन सैनिक नागरिक तालिबानांच्या हाती लागला, तर त्याला हालहाल करून मारायची मुभा जिहादी तालिबानांना उपलब्ध होती आणि त्यांच्यापैकी कोणा तालिबानाला दिसताच गोळ्या घालण्याची वा छळवाद करून सूडाने वागण्याची मोकळीक अमेरिकन सैनिकांना नव्हती. जीवंत पकडला तर खटल्याचा पोरखेळ चाले आणि तालिबान मात्र अमेरिकनांना दयामाया दाखवीत नव्हते. गळा चिरून वा कुठेही गाफ़ील पकडून ठार मारत होते. पण तसेच कुणा अमेरिकनाने केले तर मात्र त्याच पाश्चात्य कायद्याकडे दादही मागत होते. यातला बोजा लक्षात येतो का?

एक फ़िदायीन वा जिहादी जीवंत मिळाला तरी त्याच्यावर खटला चालवून फ़ाशी देण्यासाठी भारताने कसाबवर किती खर्च केला? त्याच्या खटल्यासह सुरक्षेसाठी किती कोटी रुपये खर्च झाले? पण कसाब व त्याच्या साथीदारांनी पावणे दोनशे मुंबईकरांची कत्तल केली; त्यावर काही लाखच रुपये तोयबा जैश मंडळींना खर्चावे लागले ना? म्हणजेच दोन्हीकडून नुकसान तुमचेच. कसाबला उपचार व न्याय देण्याचा बोजा सुद्धा तुमच्यावर त्याच कायद्यामुळे आणला जात असतो. यालाच ओसामा बोजाखाली चिरडून मारणे म्हणतो. ओसामाला शोधण्यापासून कमांडो पाठवून ठार मारण्यापर्यंत अमेरिकेला किती कोटी डॉलर्सचा खर्च करावा लागला होता? त्याची पाठराखण करून अमेरिकेशी दगाफ़टका पाकिस्तानच करीत होता ना? मग आज तबलिगी फ़रारी कोरोनाबाधितांचा शोध घेण्यावर होणारा खर्च वा शासकीय यंत्रणेवर पडणारा बोजा कोणाला उचलावा लागतो आहे? त्या तबलिगींना लपायला सहाय्य करून सरकारी यंत्रणेची तारांबळ कोण उडवित आहे? अशा बाधितांना शोधून त्यांच्यावर उपचार करायचे, अधिक त्यांनी कोरोनाची लागण केलेल्यांना शोधून त्यांच्यावरही खर्च कोणी करायचा? त्या खर्चाचा बोजा कोणी उचलायचा आहे? तो खर्च तबलिगीचे समर्थन करणारे पुरोगामी शहाणे किंवा ओवायसीसारखे नाकर्ते उचलणार नाहीत. म्हणजेच सगळीकडून आपल्या लोकशाही उदारमतवादी पुरोगामी राज्यपद्धतीने आपल्यालाच गोत्यात आणलेले आहेत. त्यात कायदा मोडणारे व धाब्यावर बसवणार्‍यांना कायद्याची पर्वा नाही आणि त्याच लोकांच्या जगण्याची काळजी मात्र आपण घ्यायची आहे. आपल्या सरकारने घ्यायची आहे आणि त्याचा बोजा सामान्य कायदेभिरू भारतीयांच्या डोक्यावर पडतो आहे. अर्थव्यवस्था ढासळतेय म्हणून रोज घसा कोरडा करणार्‍या चिदंबरम वा राहुल गांधींना अशा बोजाचा थांगपत्ता तरी आहे काय? मेणबत्ती दिवे लावण्याच्या आवाहनावर टिकेचे प्रवचन देण्यार्‍यांना याची जाणिव तरी आहे काय?

ओसामा किंवा तबलिगचा म्होरक्या मौलवी साद कांधालवी, यांच्या विचारसरणीतले साम्य साधर्म्य लक्षात येते आहे काय? नावाने संघटना वेगवेगळ्या आहेत आणि पण त्यांचे विचारसुत्र एकच आहे. त्यांचे ध्येय अजेंडा समान आहे. ओसामाने किंवा त्याच्या पिलावळीने आधी सोवियत व नंतर अमेरिकन व्यवस्थेला पर्यायाने साम्राज्याला त्यांच्याच नियम कायदे आणि संभ्रमाच्या बोजाखाली भरडून काढले. सोवियत व्यवस्था त्यात तीन दशकापुर्वी उध्वस़्त होऊन गेली आणि आज अमेरिकन साम्राज्य डबघाईला आलेले आहे. एकट्या चीनने पोलादी पंजाने त्या देशातल्या अशा धार्मिक मुस्लिम अरेरावीला दडपून टाकल्याने त्याचा टिकाव लागला आहे. तो विषय नंतर तपासता येईल. आज फ़क्त तबलिग आणि ओसामा बिन लादेन यांच्या अजेंडा व डावपेचातील साम्य व परिणाम यांची तुलना करण्याला महत्व आहे. ओसामाने अंगाला बॉम्ब बांधून आत्मसमर्पण करणारे घडवून शेकड्यांनी निरपराधांना ठार मारण्याचा खेळ केला होता. त्यांना आता जग फ़िदायीन म्हणते. मग बॉम्बशिवाय कोरोनाचा व्हायरस दुरदुरच्या देश प्रदेशात नेवून लाखो निरपराधांचे जीव धोक्यात आणणार्‍यांना वेगळे कुठले नाव देता येईल? ओसामाचे सहकारी उमर खालीद शेख किंवा जवाहिरी यांनी केलेल्या कारवाया जगाला कुठे घेऊन गेल्या आहेत? त्यासाठी त्यांना कुठली मोठी किंमत मोजावी लागली आहे? आपल्या चिमूटभर कारवायांतून त्यांनी जगभरच्या विमानप्रवास, विमानतळ किंवा तशा व्यवस्थांना सुरक्षा उपायांच्या बोजाखाली भरडून टाकलेले आहे. तबलिगी लोकांनी कोरोनाचा फ़ैलाव सहज सोपा करून भारतीयच नव्हेतर इंडोनेशिया, मलेशिया इत्यादी अनेक देशांच्या शासकीय वैद्यकीय यंत्रणांना घुसमटून टाकलेले आहे. ओसामाच्या अल कायदाचा गवगवा जगभर चालू होता आणि तबलिग बाबतीत कोणी चकार शब्द बोलत नव्हता. पुरोगाम्यांनी पत्रकारांनी बुद्धीवादी शहाण्यांनी जगाला किती गाफ़ील ठेवले आणि गोत्यात आणले आहे, त्याचे वेगळे पुरावे देण्याची गरज आहे काय?

Friday, April 3, 2020

तमसो मा ज्योतिर्गमय

पणती वंशाची - मराठी कविता

लॉकडाऊनला नऊ दिवस पुर्ण झाले असताना आणि त्यातून कोट्यवधी लोक जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला एका व्हिडीओच्या माध्यमातून एक नवे आवाहन केले. येत्या रविवारी या कर्फ़्युला बारा दिवस पुर्ण होताना पुन्हा एकदा नव्याने हुरूप यावा, म्हणून नऊ मिनीटे काही करायला सांगितले आहे. रात्री नऊ वाजल्यानंतर घरातले दिवे मालवावे आणि मेणबत्ती, कंदिल वा कुठलाही दिवा लावावा. बॅटरीचा झोत टाकावा असे आवाहन आहे. त्यातून काय होणार? अशा प्रश्नाने अनेक शंकासुरांना भेडसावून टाकलेले आहे. त्यांच्या लेखी हा कोरोनावरचा उपाय नाही आणि त्यापेक्षा आज गरीब संकटात आहेत, त्यांच्यासाठी काही करणे आवश्यक आहे. त्याकडे पंतप्रधानाने दुर्लक्ष केल्याचा मुख्य आक्षेप आहे. अर्थात मोदींनी अशा विविध गरजा अडचणी यावर मात करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारे कामाला लावलेली आहेत. त्यामुळे आपल्या संदेशातून त्याचे विवरण देण्याची त्यांना काहीही गरज नाही. कारण जनतेला विविध लाभ आधीच मिळू लागले असून, विविध यंत्रणा त्यासाठी आपल्या विभागात कार्यरत झाल्या आहेत. मग त्याचा डंका पिटण्याचे काय गरज आहे? पण पुरोगामी शहाण्यांना मात्र फ़क्त अशाच गोष्टींचे पंतप्रधानाने राजकीय भाषण वा विविध लाभांच्या घोषणा करावे असे वाटते. त्यांचा अपेक्षाभंग मोदींनी केला तर नवल नाही.

या संदेशातून मोदींना थकलेल्या कंटाळलेल्या जनतेला हुरूप आणायचा होता किंवा आहे. सहाजिकच पुरोगामी शहाण्यांना काय वाटते त्याला मोदींच्या लेखी महत्व नाही. बाकी मोदींना पंतप्रधान असूनही काहीही आवडनिवड असू शकत नाही, ह्याविषयी असे लोक ठाम असतात. त्यामुळे त्यांच्या इच्छा मोदींनी पुर्ण केल्या नाहीत, मग त्यांना जनतेचा अपेक्षाभंग झाला असे वाटणे स्वाभाविक आहे. म्हणून सामान्य जनता निराश होते असे अजिबात नाही. कारण हे शहाणे सामान्य जनता व तिच्या भावनेपासून मैलोगणती दुर असतात. सहाजिकच आपला अपेक्षाभंग म्हणजे़च जनतेचा अपेक्षाभंग अशी त्यांची कायमची समजूत होऊन बसलेली आहे. परिणामी मोदींनी रविवारी मेणबत्ती वा दिवे लावण्याचे आवाहन केले; तर असे लोक निराश होऊन बरळण्याला पर्याय नव्हता. अर्थात हा खुळेपणा नवा आहे असे मानायचे कारण नाही. त्यालाही एक मोठी परंपरा असून त्याचा गोषवारा प्रसिद्ध साहित्यिक नाटककार जयवंत दळवी यांनी दिवाळी अंकातल्या एका लेखातून मांडलेला होता. हा लेख किंवा त्यातला एक किस्सा अगत्याने सांगणे आवश्यक आहे. तो लेख १९८६-८७ साली केव्हा तरी प्रकाशित झाला होता. तो वाचला किंवा ऐकला तर आजच्या पुरोगामी शहाण्यांना अशा दिवे लावण्यात मुर्खपणा कशाला दिसतोय, त्याचा यथास्थित खुलासा होऊ शकेल. कारण तो किस्सा दळवी यांनी तरूण वयात राष्ट्र सेवा दलाची साथ का सोडली त्या संबधातला आहे.

मागल्या चारपाच वर्षापासून नरेंद्र मोदी महात्मा गांधींच्या स्वच्छता विचारांचा प्रचार प्रसार करीत आहेत. गांधीवादी म्हणून मिरवणार्‍यांनी त्या विचाराचा कधीही पाठपुरावा अलिकडल्या काळात केला नाही. कारण त्यांचा महात्मा केवळ नथुरामपुरता मर्यादित आहे. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात काही वर्षे तात्कालीन गांधी समर्थक आग्रहाने स्वच्छतेची मोहिम किंवा विचार पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत होते. त्याचाच अनुभव दळवींना किळसवाणा वाटला होता. त्यात दळवी म्हणतात, आम्ही तरूण मुले दर रविवारी सेनापती बापटांच्या नेतृत्वाखाली गरीबांच्या वस्ती व चाळींमध्ये जाऊन साफ़सफ़ाईची मोहिम चालवायचो. तिथे माजलेला कचरा घाण साफ़ करायचो. अगदी कोणी कुठे विष्ठा वा शौच केलेले असले तरी साफ़ करायचो. सेनापती तर कुठेही विष्ठेचा मोठा गोळा दिसला मग धावतच जायचे आणि उचलायचे. त्यांचे ते कृत्य बघून किळस यायची. पण आदर्श असल्याने त्याबद्दल बोलायची हिंमत नव्हती. एका रविवारी सेवा दलाचा अन्य कार्यक्रम असल्याने आम्ही त्या ठरलेल्या वस्तीत जाऊ शकलेलो नव्हतो. पण पुढल्या रविवारी आम्ही तिथे पोहोचलो. तर तिथल्या रहिवाश्यांनी आम्हाला फ़ैलावर घेतले. मागल्या रविवारी कशाला आला नाहीत, म्हणून जाबही विचारला. आम्ही थक्क झालो. तर त्या रहिवाश्यांनी आम्हाला दम भरला. तुमची मुन्शिपाल्टीत जाऊन तक्रार करावी लागेल, अशी ताकीदही दिली. हा सगळा प्रकारच किळसवाणा झाला म्हणून दळवी त्यापासून दुर झाले.

आपला हा अनुभव त्यांनी सांगताना एक नव्हे असे खुळेपणाचे अर्धाडझन तरी किस्से सांगितले होते. त्यांना हा सगळा प्रकार नुसता खुळेपणाचा वाटला नाही तर किळसवाणा वाटलेला होता. त्याला विरोध करता येत नसेल तर त्यापासून दुर होण्यात त्यांना शहाणपणा वाटला. मुद्दा इतकाच, की सफ़ाईला येणारे कर्मचारी व सेवाभावी वृत्तीने सफ़ाईची आयुष्यातील महत्ता तुम्हाला शिकवायला येणारे सेवाव्रती; यातला फ़रकही तिथल्या रहिवाश्यांना असे प्रयोग शिकवू शकलेले नव्हते. पण त्यातला उदात्तपणा आजही कौतुकाने सांगणार्‍यांना रविवारी पंतप्रधान जी सोपी कृती सांगतात, ती हास्यास्पद वाटते आहे. आपली कृती फ़डतूस वा निरर्थक असली तरी चालेल, निरुपयोगी असायलाही हरकत नाही. ती आपल्या पूज्य व्यक्तीकडून आलेली असायला हवी, अशी या दिडशहाण्यांची अपेक्षा असते. उलट व्यवहारी शहाणपणाचेच धडे गिरवलेल्या मोदींना त्यांच्या अपेक्षा पुर्ण करणे केवळ अशक्य आहे. त्या अनुभवातून जयवंत दळवी काय शिकले? ज्या लोकांना आपल्या सेवेसाठी आलेल्या लोकांचे आभार मानण्याचीही लायकी नाही वा अक्कल नाही, त्यांना तसेच सडू द्यावे. आपल्या उदात्त कृतीची पावती मिळत नसेल तर त्याकडे पाठ फ़िरवावी. सेनापती बापट वा तात्कालीन सेवादल म्होरक्यांनी ज्या रहिवाश्यांची सेवा केली, त्यांना उपकार करणार्‍याचे आभार मानावेत इतकेही शहाणपण शिकवले नव्हते आणि नरेंद्र मोदी नेमकी तीच भावना समाजमनात रुजवित आहेत. त्यामुळे असे खुळे लोक दु:खीच होतील ना?

मुठभर लोकांनी मुंबईत गेटवे किंवा दिल्लीच्या इंडिया गेटपाशी मेणबत्त्या लावून मांडलेले प्रदर्शन त्यांना महान वाटते. पण त्याचाच देशव्यापी साक्षात्कार त्यांना हास्यास्पद वाटणे स्वाभाविक आहे. कारण मेणबत्त्या वा तत्सम खुळेपणा त्यांचा विशेष अधिकार असतो ना? त्यांनाच अतिशय प्यारे असलेले दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोळकरांनीही अशीच अत्यंत हास्यास्पद मोहिम काही वर्षापुर्वी हाती घेतलेली होती. महाराष्ट्र सरकार अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करीत नाही, म्हणून दाभोळकरांनी लहानमोठ्या शहरात वेगळी निदर्शने योजलेली होती. तिथे चौका चौकात जमून आपल्याच थोबाडीत मारून घ्यावे, असे त्या आंदोलनाचे स्वरूप होते. त्याला असे लोक महान शहाणपणा किंवा क्रांतीकारी चळवळ समजतात. इतक्या बौद्धिक अजीर्ण झालेल्या लोकांना नऊ मिनीटे कोट्यवधी लोकांनी निराशाग्रस्त कालखंडात आशेचा किरण ठरावा, अशा प्रतिकात्मक दिवे लावण्याच्या उपक्रमाची टिंगल टवाळी करण्यातच त्या उपक्रमाची महत्ता लपलेली आहे. कारण आता देशातली कोट्यवधी जनता अशा दिवाळखोर बुद्धीमंतांना घाबरू लागलेली आहे. त्यांच्या बुद्धीवर जमलेली काजळी दुर करण्यासाठीच तर मोदींनी नऊ मिनीटे मेणबत्ती वा कुठलाही दिवा पेटवण्याचे आवाहन केलेले आहे. ते नुसते परस्परांना हिंमत देण्यासाठीचे आवाहन नाही. देशात बुद्धीमान म्हणून मिरवणार्‍या शहाण्यांनी माजवलेला मुर्खपणाचा गडद अंधार दुर करण्यासाठीचा तेवढाच आशेचा किरण असल्याचे मोदींनाही जाणवलेले असावे. त्याचे अनुकरण नंतरच्या आठवड्याभरात जगातल्या अनेक देशात झाले, तर कोणी नवल मानण्याचे कारण नाही. कारण त्याची प्रेरणा सोपी सरळ आहे.

Thursday, April 2, 2020

रोग खुप जुना आहे

Mayank Burmee on Twitter: "Double standards. Not happy with a ...

तबलिगी जमात हे भारतीय पुरोगामी बुद्धीजिवी व माध्यमांनी लपवलेले सत्य होते. किंवा त्यांचेच पोसलेले अनौरस पोर आहे. आता तेच पाप चव्हाट्यावर येताच, त्यांची तारांबळ उडालेली आहे. आपला खोटेपणा लपवण्यासाठी मग असे बदमाश लोक सरकार व पोलिस काय करत होते, असा प्रश्न विचारत आहेत. मुद्दा असा आहे, की गोमुत्र वा आणखी काही आयुर्वेदिक उपचारांवर तोंडसुख घेत बसलेल्यांना खरा कोरोना मर्कजमधून पसरवला जात असल्याची भिती कशाला सतावत नव्हती? त्यांच्यापैकी कोणी तबलिगी जमातच्या या उद्योगावर प्रकाश कशाला टाकला नव्हता असा प्रश्न आहे? सर्वसाधारणपणे हे पुरोगामी सेक्युलर लोक मुस्लिमधार्जिणे असल्याचा सरसकट समज वा पुर्वग्रह आहे. पण वस्तुस्थिती बिलकुल तशी नाही. जितके हिंदूंना हे लोक आपले शत्रू वाटतात, त्यापेक्षा असे लोक मुस्लिमांचे अधिक मोठे शत्रू आहेत. अन्यथा त्यांनी मुस्लिमांच्या जीवावर उठलेल्या मौलवी साद कांधालवी याच्या पापाचा पाढा आधी वाचला असता. कारण या मौलवीच्या मुर्खपणामुळे मरणार्‍यांमध्ये प्रामुख्याने बहुतांश मुस्लिमच असणार आहेत. त्याने योजलेल्या मर्कजमध्ये हजेरी लावून परतलेले बहुतांश कोरोनाबाधित मौलवी उलेमा विविध मशिदीत व पर्यायाने मुस्लिम बहुल वस्तीत पोहोचले आहेत आणि सहाजिकच ती रोगवाधा त्यांनी अधिकाधिक मुस्लिमांपर्यंत पोहोचवली आहे. त्यांच्या सान्निध्यात आल्यास़च अन्य धर्मियांना त्याची बाधा होऊ शकेल. पण सध्याच्या लॉकडाऊन स्थितीत तशी शक्यता फ़ार कमी आहे. म्हणजेच मौलवी साद याने जे मृत्यूला कवटाळण्याचे आवाहन केलेल् त्याचा वेळीच बोभाटा करून लाखो हजारो मुस्लिमांना वाचवण्याची गरज होती. पण तेव्हा तमाम पुरोगामी पत्रकार गोमुत्र व आयुर्वेदिक उपचारांवर झोड उठवित राहिले होते. त्यातून आपण कसे मुस्लिमांचे हितकर्ते आहोत, असे नाटक रंगवित होते आणि प्रत्यक्षात मौलवी साद याने निर्माण केलेल्या प्राणघातक धोक्याविषयी मुस्लिमांना अंधारात ठेवण्याचे पाप करीत होते. किंबहूना साद सारखा मुस्लिम धर्मगुरूही अशा पुरोगाम्यांचाच बळी नाही काय?

मोदी सरकार सत्तेत आले म्हणजे मुस्लिमांवर अन्यायच होणार आणि भाजपा सरकारचा प्रत्येक निर्णय व आदेश म्हणजे इस्लामविरोधी असल्याची समजूत साद किंवा सामान्य मुस्लिमांच्या मनात कोणी निर्माण केली आहे? दोन महिन्यापुर्वी शाहीनबाग येथे धरण्यात बसलेल्या नाझिया नावाच्या तरूण मातेचे अर्भक थंडी व तापामुळे दगावले. तिला त्याचे दु:ख होणे स्वाभाविक आहे. पण तिला त्या दु:खातून काढून आपले बाळ दगावणे, म्हणजे काही महान उदात्त कार्य असल्याचा मुर्खपणा कोणी शिकवला? त्या दुर्घटनेनंतर एनडीटिव्हीच्या एका बातमीत तिचे वक्तव्य आले होते. आणखी दोन मुले आपल्याला आहेत आणि त्यांनाही आपण शाहीनबाग आंदोलनासाठी शहीद करायला सज्ज असल्याचे नाझिया म्हणाली. त्यापेक्षा मौलवी साद याचे वक्तव्य कितीसे वेगळे आहे? साद म्हणतो सरकारचा आदेश मुस्लिमांना नमाजापासून रोखण्यासाठी आहे, तो झुगारला पाहिजे आणि मशिदीमध्ये मृत्यू आला तर पुण्याचे काम आहे. नाझिया नागरिकत्व कायद्याच्या विरोधासाठी आपल्या मुलांना शहीद करायला सज्ज झाली. कारण तिला ते धर्माचे मोठे उदात्त कार्य वाटते. ही भयंकर समजूत मुस्लिमांच्या मनात जोपासण्याला कोणी हातभार लावला आहे? त्यात मुस्लिम मुर्ख मौलवी असतील आणि काही मुस्लिम राजकारणी नक्की आहेत. पण त्याला बौद्धिक फ़ोडण्या देण्याचे पाप बाजारात मिरवणार्‍या सेक्युलर शहाण्यांचेच नाही काय? त्या नाझियाला तिच्या वक्तव्यातला खुळेपणा समजावण्यापेक्षा त्याचे उदात्तीकरण करून आणखी अनेकांना तशाच हौतात्म्याला प्रवृत्त केले जात नसते काय? त्यातून मग मुस्लिमांना सुरक्षित राखण्यासाठी मोदी सरकारने योजलेले उपाय पांगळे केले जात असतात आणि ते पाप करणारेच बिचार्‍या मुस्लिमांना आपले पाठीराखे वाटत असतात. मग त्या नाझिया वा मौलवी सादला गुन्हेगार म्हणायचे की बळीचा बकरा म्हणायचे?

कारण असे मुस्लिम या पुरोगामी पोरखेळातले बळी झाले आहेत आणि होत असतात. मर्कजचा बोभाटा झाल्यावर ओवायसी बंधू गायब आहेत आणि महान पुरोगामी विचारवंत लेखक जावेद अख्तर काय मुक्ताफ़ळे उधळीत आहेत? नागरिकत्व कायदा न वाचताही आणि एन आर सी आलेला नसतानाही त्यांना त्यातले धोके ओळखता आले होते. आता कोरोना साक्षात धुमाकुळ घालत असताना या महान पुरोगाम्याला कुठला उपाय सुचला आहे? मर्कज वा तबलिगी जमातचा उद्योग कर्फ़्यु लागली असताना घडत होता आणि तोपर्यंत मशिदीत येण्यावर प्रतिबंध लावण्याची मागणीही अशा मुस्लिम पुरोगाम्याने केलेली नव्हती. आता म्हणजे कर्फ़्युला आठवडा उलटून गेल्यावर हे महोदय काबा व मदिना बंद असताना भारतातल्याही मशिदी बंद कराव्यात, म्हणून आवाहन करीत आहेत. मागणी नाही तर आवाहन आहे. तेही त्यांनी सरकारवर सोपवलेले नाही. दारूल उलूम म्हणजे इस्लामचे भारतातील मोठे पीठ मानल्या जाणार्‍या देवबंदने मशिदी बंद करण्याचा फ़तवा काढावा; असे अख्तर यांचे आवाहन आहे. याला अस्सल सेक्युलर म्हणतात. इतके होऊनही त्यांना भारतीय संविधान व कायद्यापेक्षाही धार्मिक नेता वा धर्मगुरूंचा फ़तवा मोलाचा वाटतो. देवबंदने फ़तवा काढावा म्हणजे काय? सरकारने कर्फ़्यु जाहिर केल्यानंतर तो आदेश भारतातल्या तमाम नागरिक व संस्था संघटनांना लागू होत नाही का? निदान मुस्लिम नागरिक व संघटनांसाठी बांधिल नाही, असेच अख्तर त्यातून सुचवित नाहीत काय? सीएए विरोधाच्या वेळी हातात संविधान घेऊन बोंबा ठोकणार्‍या जावेदभाईंना मशिदी बंद करायचे आदेश मात्र संविधानातून आलेले नकोत. तिथे संविधानापेक्षाही देवबंद पीठाचा दारूल उलूम अंतिम अधिकारी असतो. संविधान बाकी सगळ्यांना लागू आहे, मुस्लिमांना नाही. त्यातून मिळालेल्या अधिकाराने सरकार मुस्लिमांवर राज्य करू शकत नाही, असे स्पष्टपणे मांडणार्‍या अख्तर महाशयांना पुरोगामी जगात मोठी मान्यता आहे. म्हणून याची सुरूवात कुठून झाली ते बघायला हवे.

ओवायसीपासून अख्तर यांच्यापर्यंत सर्व मुस्लिम नेते किंवा पुरोगामी, कायम संविधानाच्या नावाची जपमाळ ओढत असतात. पण तेच संविधान वा त्यातून आलेले कायदे मुस्लिम धार्मिक कालबाह्य परंपरांना लगाम लावू बघतात, तेव्हा संविधान झुगारायला ते एका पायावर सज्ज असतात. त्याची सुरूवात साडेतीन दशकापुर्वी झाली. शहाबानू या तलाकपिडीत महिलेला कित्येक वर्षे कायदेशीर संघर्ष करून पोटगीचा न्याय मिळाला होता. त्याला झुगारून लावत ह्या समस्येची सुरूवात झालेली आहे. त्या वृद्धेला पोटगी म्हणून काही रुपयांची रक्कम देण्याच्या विरोधात तमाम मौलवी मुस्लिम नेते उभे ठाकले आणि त्याला अर्थातच तमाम पुरोगामी पक्ष राजकारण्यांनी समर्थन दिले. त्यांच्या मतावरच सत्ता मिळवण्यासाठी लाचार असल्यासारखे पंतप्रधान राजीव गांधी यांनी मागणी मान्य केली आणि शहाबानूला सुप्रिम कोर्टाने दिलेला न्यायनिवाडा निकामी करून टाकणारा कायदा संसदेत संमत करून घेतला. त्यांच्यामागे प्रचंड बहूमत होते आणि त्यांना मतांसाठी लाचार होण्याची अजिबात गरज नव्हती. पण नेता लेचापेचा असला तर त्याला उंदिरही भयभीत करू शकतो. तेच झाले आणि त्यामुळे संतापलेला खराखुरा पुरोगामी मुस्लिम नेता आरीफ़ महंमद खान यांनी राजीव सरकारच्या मंत्रीपदावर लाथ मारून राजिनामा दिला. त्यांना कॉग्रेसही सोडायची पाळी आली. अखेरीस हा खंदा सच्चा पुरोगामी दोन दशकांच्या अनुभवानंतर भाजपात दाखल झाला आणि आज मोदी सरकारने त्याला केरळचा राज्यपाल नेमले आहे. मुद्दा इतकाच, की आज शाहीनबाग किंवा तबलिगी मंडळींकडून कायद्याची पायमल्ली होते किंवा कुठल्याही सरकारी आदेशाला धाब्यावर बसवले जाते; त्याचा आरंभ तिथून झालेला आहे. संविधानाची जपमाळ ओढून तेच संविधान व त्यातून आलेले कायदे पायदळी तुडवणे; म्हणजेच इस्लाम अशी एक समजूत गेल्या साडेतीन दशकात पुरोगाम्यांनी मुस्लिमांच्या मनात रुजवली आहे. त्याचा दृष्य भयंकर परिणाम म्हणून मर्कजच्या परिणामांकडे बघायला हवे आहे.

प्रचंड बहूमत पाठीशी असलेल्या राजीव सरकारला आपण नुसत्या धार्मिक धमक्यांनी वा मतांच्या गठ्ठ्याने नमवू शकतो, हे लक्षात आले; तेव्हापासून मुस्लिम मौलवी व धर्मगुरूंनी भारतीय राजकारणात नको तितकी लुडबुड सुरू केली. सेक्युलर या शब्दाचा आडोसा घेऊन त्यांनी क्रमाक्रमाने भारतातल्या बहुतांश मध्यममार्गी पुरोगामी पक्षांना जणू ओलिस ठेवले. हळुहळू त्यांना मुस्लिम राजकारणासाठी आपल्या वेगळ्या राजकीय पक्षाचीही गरज उरली नाही. मुस्लिम लीग वा जमाते इस्लामी असे काही राजकीय प्रवाह हळुहळू भारतीय राजकारणातून लुप्त होऊन गेले आणि मुल्लामौलवींना हाताशी धरून पुरोगामी म्हणवणारे पक्ष मुस्लिम पक्ष होऊन गेले. त्यातूनच मग जी उलट प्रतिक्रीया उमटली, ती भाजपाच्या पथ्यावर पडली. गुजरात दंगलीचा बागुलबुवा केल्यानंतर नरेंद्र मोदी अस्वस्थ हिंदू मतदारांचा हिरो होऊन गेले. उलट मतांच्या गठ्ठ्यासाठी पुरोगामी पक्ष व बुद्धीवादी अधिकाधिक लाचार होऊन इस्लामिस्ट व जमाते पुरोगामी होत गेले. काश्मिरात सेनादलावर दगडफ़ेक वा अफ़जल गुरूचे उदात्तीकरण हा पुरोगामी अजेंडा होऊन गेला. त्याचा पुरोगामी पक्षांना राजकीय लाभ होऊ शकला नाही, पण मुस्लिम समाज व राजकारण मौलवींकडे गहाण पडत गेले. प्रशासनाला हे धर्मगुरू वा मुस्लिम धर्मांधता डोकेदुखी बनत गेली. तसे नसते तर शाहीनबागचा तमाशा दिर्घकाळ लांबला नसता किंवा तबलिगी मर्कजला इतका भयंकर कोरोना उच्छाद माजवायची हिंमत झाली नसती. शाहीनबाग वा मर्कजकडे तात्कालीन घटना म्हणून बघितले तर ते भयंकर वाटेल. पण मागल्या साडेतीन दशकाल्या राजकारणाने पोसलेला तो रोग आहे आणि जितका चुचकारला जाईल तितका तो भेडसावतच जाणार. मात्र बडगा उगारला तर वठणीवरही येऊ शकतो. तेच ३७० हटवल्यानंतर काश्मिरातील अनुभव सांगतो आणि त्याचीच पुनरावृत्ती मौलवी साद याच्यावर गुन्हा दाखल केल्यावर झालेली आहे. तात्काळ या फ़रारी मौलवीने सरकारशी सहकार्य करा, असा फ़तवा जारी केला आहे. म्हणतात ना? लातोके भूत बातोसे नही मानते.

आता उरलेला मुद्दा इतकाच, की हेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी वा गृहमंत्री अमित शहांनी आधीच कशाला केलेले नाही? इतके हाताबाहेर जाण्याची प्रतिक्षा कशाला करायची? तर भिती त्या मौलवीची नाही किंवा मुस्लिमातील आडमुठेपणाचीही चिंता करण्याचे काहीही कारण नव्हते. त्यांच्यापेक्षा मोठे संकट पुरोगामी माध्यमे, विचारवंतांची सरकारला काळजी करावी लागते. अशा घातपातामागचे खरे सुत्रधार सेक्युलर मंडळी आहेत. त्यांच्यासाठी या बिचार्‍या दिशाभूल झालेल्या मुस्लिमांना किती भरडावे? त्यांचा बंदोबस्त झटपट होऊ शकतो, हे ३७० कलमातून सिद्ध झालेले आहेच. पण तशी कुठलीही कृती करण्यापुर्वी बहुसंख्य हिंदूंच्या मानवतेला पान्हा फ़ुटू नये आणि पुरोगाम्यांनी हिंदूंच्या सहानुभूतीचे भांडवल करू नये; याची मांडणी करून घेणे भाग असते. आठवते? जमिया मिलीया विद्यापीठातला हिंसाचार थांबवायला गेलेल्या पोलिसांच्या कारवाईने हिंदूत्वाचा वसा घेतलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही जालियनवाला बाग आठवली होती? मग अन्य सामान्य हिंदूंची कथा काय असेल? अशा हिंदू व त्यांच्यातल्या पुरोगामी वेडगळपणाला जपून हाताळावे लागत असते. अशा कारवाया करताना आधी हिंदूंना वा बहुसंख्यांकानां भुतदयेची बाधा होणार नाही, इतके भेडसावले जाण्याला महत्व येते. शाहीनबाग आणि मर्कजच्या उपदव्यापानंतर ती मनस्थिती तयार झाली आणि मगच सरकारला बडगा उचलणे शक्य झाले. अर्थात त्याची मोठी किंमत बहुसंख्यांक हिंदूंनाही मोजावी लागणारच आहे. पण त्याला मोदी सरकार जबाबदार नसेल, तर आपल्यातील भंपक भूतदयेचा तो दुष्परिणाम आहे. जितके सहन कराल व समजून घ्याल तितके तुम्हाला झुगारत जायचे ही रणनिती आहे. उलट तुम्ही कारवाईचा बडगा ठामपणे उगारलात, तर तात्काळ शरणागतीही मिळत असते. ही स्थिती जितकी प्रभावी व कायमस्वरूपी येत जाईल, तितकी ही समस्या कायमची निकालात निघणार आहे. जितका आजार जुना तितके उपाय उपचार वेदनामय असतातच ना?