Wednesday, January 15, 2020

‘माफ़ीचा साक्षीदार’

Image result for rajdeep sardesai

भारतात टेलिव्हीजन बातम्यांचे सत्र सुरू झाल्यापासून गेली दोन दशके वाहिन्यांवर सतत झळकलेला एक चेहरा म्हणून तुम्ही राजदीप सरदेसाई यांना ओळखत असाल. पण हा सभ्य चेहरा नसून निव्वळ मुखवटा आहे आणि त्यामागे एक हिडीस पातळयंत्री चेहरा लपलेला आहे. त्यातून जागोजागी आग लावणे व पत्रकार म्हणून प्रत्येक बाबतीत खोटेपणा करून देशविघातक प्रवृत्तीला खतपाणी घालणे; हा त्याचा मुख्य उद्योग आहे. कधीकधी असे सराईत चोर पकडलेही जातात. अलिकडेच त्याचा हा सभ्य मुखवटा तेलंगणाच्या एका न्यायालयात टरटरा फ़ाटला आणि त्याला निर्लज्जपणे माफ़ीनामा लिहून द्यावा लागलेला आहे. आपण धडधडीत खोटी बातमी दिली आणि तिला दुजोरा देणारा कुठलाही पुरावा आपल्यापाशी नाही, अशी कबुलीच त्याने त्यातून दिलेली आहे. आता मुद्दा इतकाच, की त्याची किंमत कोणी मोजायची? कारण एक माफ़ीनामा लिहीण्यातून राजदीपला कुठलीही तोषिश पडलेली नाही. पण ज्यांनी हा खटला भरला त्यांचे काय? ते कोणी ऐरेगैरे भामटे पत्रकार संपादक नसून सनदी अधिकारी व वरीष्ठ पोलिस अधिकारी आहेत. ‘अंदरकी बात: ३० मिनीटे, सोहराबुद्दीन शेख’ अशी रसभरीत बातमी राजदीपने २००७ सालात आयबीएन वाहिनीवर प्रक्षेपित केली होती आणि त्यात जाणिवपुर्वक खोटेपणा केलेला होता. तेव्हा ती बातमी अंदरकी बात म्हणून प्रक्षेपित करताना आत्मविश्वासाने राजदीप ओसंडून वहात होता. मात्र त्याने बोललेला प्रत्येक शब्द व तपशील धडधडीत खोटा होता. मध्यंतरी तेरा वर्षे निघून गेली आहेत. मात्र त्यामध्ये गोवलेले राजीव त्रिवेदी आजपर्यंत आपल्या चारित्र्यावरचा तो कलंक धुण्यासाठी न्यायालयाच्या पायर्‍या झिजवित राहिलेले आहेत. ज्या प्रकरणाचा इथे उल्लेख झाला, ते तेवढ्यापुरते मर्यादित नाही. तेलंगणाचे त्रिवेदी त्यात गुंतवले गेले, तसेच राजस्थान व गुजरातचेही डझनभर ज्येष्ठ अधिकारी त्यात आरोपी म्हणून गोवले गेले. त्यांना त्यात गोवण्याचा गुन्हा राजदीप व अन्य पत्रकार संपादकांसह अनेक स्वयंसेवी संस्थांनी केलेला होता. ज्यांना राजदीप प्रतिष्ठीत म्हणून आपल्या कार्यक्रमात खोटेनाटे आरोप करायला अगत्याने आमंत्रित करीत होता.

सोहराबुद्दीन शेख नावाच्या कुख्यात गुन्हेगाराचे गुजरातमध्ये एनकाऊंटर करण्यात आले. त्यावरून हा गदारोळ माजवण्यात आला होता. सोहराबुद्दीन व त्याची पत्नी कौसर बेगम यांचा त्या चकमकीत मृत्यू झाला होता. त्यासाठी त्यांना हैद्राबाद येथून गुजरातला नेण्यात आले आणि नि:शस्त्र असताना मारण्यात आले, हा मुळातला आरोप आहे. त्यात मग चकमकीत सहभागी असलेले गुजरात वा राजस्थानचे वरीष्ठ पोलिस अधिकारी गोवण्यात आले. तसेच हैद्राबादचे ज्येष्ठ अधिकारी त्रिवेदी यांनी त्यात कामगिरी बजावल्याचाही आरोप झालेला होता. त्यांनी बिन नंबराची गाडी या अपहरणासाठी गुजरात पोलिसांना पुरवली व चकमकीला मदत केली, असा त्यातला भाग आहे. त्यातला खोटेपणा कोर्टात सिद्ध व्हायला तेरा वर्षे गेलेली आहेत. त्याच्या तपशीलात जाण्याची गरज नाही. मुद्दा इतकाच, की गुन्हेगारांना सोडून पोलिसांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचे कारण काय होते? तर त्यातून तेव्हाचे गुजरातचे गृहमंत्री अमित शहांना गुन्हेगार ठरवायचे होते. म्हणून देशात हजारभर चकमकी झालेल्या असताना फ़क्त दोन चकमकीवरून देशव्यापी हलकल्लोळ माजवण्यात आला. त्यासाठी सुप्रिम कोर्टापासून खालच्या कोर्टापर्यंत आकांडतांडव करण्यात आले. तीन एसआयटी नेमल्या गेल्या आणि अखेरीस अमित शहांनाही तुरुंगात डांबण्यात आलेले होते. इतक्या वर्षांनी ते निर्दोष सिद्ध झालेले आहेत आणि अन्य काही अधिकार्‍यांना तुरूंगवास भोगावा लागला आहे त्यांच्यावरचा कुठलाही आरोप सिद्ध होऊ शकला नाही. हा सगळा द्राविडी प्राणायाम फ़क्त नरेंद्र मोदींना गोत्यात घालण्यासाठी अखंड बारा वर्षे चालला होता. इशरत जहान आणि सोहराबुद्दीन यांची हत्या हा त्याच व्यापक कटाचा भाग होता. राजदीप त्यातला ‘माफ़ीचा साक्षीदार’ आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. माफ़ीचा साक्षीदार हा निर्दोष नसतो, तर गुन्ह्यातला भागिदार असतो आणि आपली कातडी बचावण्यासाठी माफ़ीचा साक्षीदार व्हायला सज्ज झालेला असतो. म्हणूनच ही नुसती माफ़ी नसून व्यवहारत: गुन्ह्याची कबुली आहे.

काही दिवसांपुर्वी भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय यांनी सोशल मीडियातून राजदीप याच्यावर एकतर्फ़ी असल्याचा आरोप करीत बहिष्काराची भूमिका मांडली. तर एडीटर्स गिल्ड नावाच्या संपादक संघटनेने निषेधाचा सुर लावला होता. आता खुद्द राजदीपच आपल्या खोटेपणाची कबुली देतो आहे. तर त्याची संपादक संघटनेतून हाकालपट्टी करण्याची हिंमत ही संघटना दाखवणार आहे काय? कारण ही कबुली वा माफ़ीनामा कोर्टाला सादर करण्यात आलेला आहे. म्हणजेच तो जबरदस्तीने घेतलेला दस्तावेज नाही, तर गुन्ह्याची कबुली आहे. आपल्यातला असा एक अस्सल भामटा खोटारडा माणूस संपादक म्हणून वावरतो आणि काही काळ आपल्या संघटनेचा अध्यक्षही बनतो, याची सा़धी लाज ह्या संघटनेला आहे काय? असेल, तर त्यांनी त्यासाठी नेमकी काय पावले उचलली आहेत? अर्थात तसे काहीही झालेले नसेल, कारण ह्या संघटना व संस्थाही राजकीय भूमिकांचे अड्डे बनलेल्या आहेत. त्यांचेही राजकीय अजेंडे सज्ज असतात. त्यामुळेच राजदीपवर आरोप भाजपाने केला असेल, तर त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली जाते. पण डाव्या पक्षांनी जोड्याने मारले, तरी हे लाचार तिथे जाऊन अगतिकता करताना दिसतील. कारण अशा लोकांनी पत्रकारितेला मीडिया हाऊसच्या जनानखान्यात नेऊन बांधली आहे. त्यांना व्यवसायाचे पावित्र्य उरलेले नाही किंवा व्यक्तीगत प्रामाणिकपणाशी कर्तव्य उरलेले नाही. पॅकेजेस हे उद्दीष्ट आणि साध्य झालेले आहे. त्यामुळे एकूण पत्रकारितेलाच सुपारीबाजीची बाधा झालेली आहे. राजदीप अशा सुपारीबाजीचा मेरूमणी झालेला असेल, तर तो संपादकपदी बसला काय आणि संपादक संस्थेचा अध्यक्ष झाला काय? परिणाम एकच असतो. जागा मिळेल व संधी असेल, तिथे खोटेपणा व सुपारी घेतल्यासारखे कृत्य करण्याला पर्याय उरत नसतो. आज चकमकीचा विषय आला असेल. पण गुजरात दंगल अतिशयोक्तीतून पसरवली गेल्याची कबुलीही राजदीपने एका लेखातून दिलेली आहेच. निर्लज्जम सदासुखी म्हणतात त्यातला मामला आहे.

तेरा वर्षे आपण खोटे असल्याचे कळायला लागत नसतात. कोर्टाकडून फ़टकारे बसल्यावर सुचलेले शहाणपण आहे. सावरकरांच्या माफ़ीवर बोलताना रसवंती मोकाट होणार्‍या या संपादकांना, आपल्या शब्दाशी प्रामाणिकपणे जगता येत नसेल, तर त्यांची लायकी ती काय? अग्रलेख मागे घेणार्‍यांपासून अविष्कार स्वातंत्र्याचे नामर्द लढवय्ये ज्यात भरलेले आहेत, त्यांनीच दोन वर्षापुर्वी तेच सोहराबुद्दीन प्रकरण वेगळ्या तपशीलाने उकरण्याचा प्रयास केला होताच. त्या चकमकीविषयी मुंबईत खटला चालला, त्याच कोर्टाचे न्यायमुर्ति लोया, यांचे आकस्मिक निधन झाले, तर त्याला खुन ठरवण्याची कसरत टकले नावाच्या पत्रकाराने केलेली होती आणि तोही आधार घेऊन राजदीपने ‘इंडियाटुडे’ वाहिनीवरच त्याही संबंधाने चर्चा रंगवल्या होत्या ना? मग त्यातला खोटेपणा तेव्हा राजदीपला ठाऊक नव्हता का? ठाऊक असूनही त्याने पुन्हा तोच मुद्दा उकरून खोटेपणालाच फ़ोडणी दिलेली नव्हती का? त्यातून अमित शहांना आणखी गुंतवण्याचाच खेळ राजदीप व तत्सम लोकांनी चालविला नव्हता काय? मुद्दा त्यांच्या खोटेपणाचा नसून, त्यातून ज्यांच्या सामान्य जीवनात बाधा आणली जाते, त्यांच्या जगण्यातील स्वातंत्र्याचा आहे. अशा संपादकांचे स्वातंत्र्य अन्य निर्दोष लोकांच्या जगण्यात बाधा आणत असेल, तर त्यांच्या स्वातंत्र्याला लगाम वा पायबंद घालणे अगत्याचे आहे. कारण त्यामुळे अनेक निरपराधांना अकारण शिक्षा भोगावी लागत असते. राजदीपने आज कबुली दिली वा माफ़ी मागितल्याने अमित शहा वा अन्य वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांना काही महिने वा वर्षे तुरूंगवासाच्या यातना सहन कराव्या लागल्या; त्याची भरपाई कोणी करायची? राजदीपसारख्यांच्या अविष्कार स्वातंत्र्याची चैन चालावी, म्हणून निरपराधांनी यातना सहन करायच्या काय? यांनी आपल्या राजकीय अजेंडासाठी खोटेपणा करायला अविष्कार स्वातंत्र्य वापरणे; हा म्हणूनच गुन्हा आहे आणि त्यांना त्यापासून परावृत्त वा पत्रकारितेतून तडीपार करणे आवश्यक आहे. अमित शहांना गुजरातमधून हद्दपार कशाला केलेले होते? राजदीपकडून नेमका तसाच धोका समाजाला नाही काय? शहांनी तरी गुन्हा कबुल केला नव्हता, की सिद्ध झाला नाही. राजदीपने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याचे काय करायचे?

22 comments:

  1. ह्या सर्व न्यायालयीन चौकशीचा खर्च राजदीप सरदेसाई यांच्याकडून काढला पाहिजे. आणि समाजाची दिशाभूल केली म्हणून ही दंड ठोठावला पाहिजे.

    ReplyDelete
  2. लोयांच्या नांवाने आजही सोशल मिडीयात मुस्लीम गळे काढताना दिसतात.

    ReplyDelete
  3. मध्यंतरी नागपूर मध्ये कांहीं गुन्हेगारांस भर रस्त्यात, कोर्टाचे आवारात, लोकांनी-जनतेने ठेचून मारले तसे तमाम जनतेने राजदीपला भर चौकात उभे करून दगडाने ठेचले पाहिजे.त्याशिवाय या अश्या प्रवृत्तीस आळा बसणार नाही

    ReplyDelete
  4. लोया बाबत हेच होणार आपले शासक ममताळु आहेत.या पत्रकारांना ईस्लामिक कायद्याप्रमाणे शिक्षा व्हायला पाहिजे!

    ReplyDelete
  5. आपल्याकड़ची न्यायपालिका लकव्याने ग्रस्त झाली आहे. शिक्षा कड़क दिली पाहिजे. त्या धाकाने पुढील गन्हे घड़णार नाहीत.

    ReplyDelete
  6. सुंदर लेख ज्याच्यावर हा आरोप राजदिप सरदेसाई या नालयक भामटया संपादका विरुद्ध मानहानी चा खटला चालवून न्यायालया कडुन कठोर शिक्षा मिळवुन चांगली अद्दल घडविल्या शिवाय हा ठिकाणावर येणार नाही

    ReplyDelete
  7. श्री भाऊ राजदीप हे एक उदाहरण झालं जे 13 वर्षांनी का होईना निदान सिद्ध तरी झालं, पण आपण रोज बातम्यांचे रतीब बघतो तद्दन खोट्या बातम्या दाखवतात आणि आपल्याला नको असलेल्या लोकांना गोत्यात आणतत् तुम्हाला एक वेगळा चॅनेल चालवावा लागेल

    ReplyDelete
  8. हा अत्यंत निलाजरा माणूस आहे., मोदी टाईम स्क्वेअर ला पहिल्यांदा गेले होते तेंंव्हाही हा तिथे उपद्व्याप करायला पोहोचला होता

    ReplyDelete
    Replies
    1. तिथे लोकांनीच बडविले होते आणि तरीसुद्धा हा नालायक हसत होता.

      Delete
  9. भाऊ... करायचं काय असल्या पत्रकार संपादकांचे.
    देश हिताला आणि समाज हीताल बादा आणणाऱ्या राजदीप सारख्या पत्रकार प्रवृत्तीला टोकाला पाहिजे. अगदी योग्य लिहिलं आहात की पत्रकारिता जनानखाना स बंधिली आहे. लोकसत्ता पेपर मध्ये येणारे अग्र लेख देखील त्याच वळचणीला बांधले गेले आहेत. सत्य काय आहे हे लोकं का लिहित नाहीत. सर्वात मोठा धोका लोकशाहीस यांच्या कडून आहे. भाऊ आपण एक मासिक का नाही चालू करीत यांना झोडपून काढण्यासाठी. समाजाला योग्य दिशा देण्यासाठी आम्ही सर्व ताकद लावू.

    ReplyDelete
  10. भाऊ,
    या नीच लोकांना खरे म्हणजे जी शिक्षा होणे योग्य आहे ती भारतीय दंड विधानातच अस्तित्वात नाही. अश्या तऱ्हेने या नीचांनी अगणित जीवने उद्ध्वस्त केलेली आहेत आणि त्यांना मृत्यू येई पर्यंत ते तसे करित राहणार आहेत. दंड विधानातील सर्वात कठोर शिक्षा ही यांच्या पापांसाठी सर्वात सौम्य शिक्षा असेल.

    अमेरिका इराण विषयावर केलेल्या यू ट्यूब वरील भाष्या प्रित्यर्थ धन्यवाद, भाऊ! तुम्ही आंतरराष्ट्रीय विषयांवर सहसा भाष्य करीत नाही. तरीही तसे केल्या प्रित्यर्थ आभारी आहे. 🙏

    - पुष्कराज पोफळीकर

    ReplyDelete
  11. ह्या विषयावर सगळ्या पुरोगामी समजल्या जाणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि पत्रकार गप्प बसले आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे । 'तेरी चूप मेरी भी चूप ' असाच हा प्रकार आहे । तरीसुद्धा ह्या ढोंगी लोकांचे बुरखे ह्या माफीनाम्याने फाटलेले आहेत हे महत्वाचे आहे ।

    ReplyDelete
  12. Can we as citizens file case against Rajdeep Sardesai for Criminal Breach of trust and also against the Press council .Will any one join me

    ReplyDelete
  13. उत्कृष्ट , निर्भिड विवेचन.
    विनम्रपणे नमन!!

    ReplyDelete
  14. या राजदीप सरदेसाईला आता न्यायालयानेच शिक्षा म्हणून गजाआड डांबले पाहिजे. त्याशिवाय अशा पत्रकारांची अशी घाणेरडी पत्रकारिता थांबणार नाही.

    ReplyDelete
  15. The real gunhegar are so called educated people in India. They think as fluent English and breeching Hindu and hindu belief is great journalism.
    Who are the viewers of Rajdeep and such kind of journalism? Who give them popularity? It's we indian and educated people. Who watch times and aaj tak and all such propoganda channels? It's we indian only. Boycott English and Hindi as well propoganda media.

    ReplyDelete
  16. दिल्ली सारख्या ठिकाणी एक बंगला असे सत्याचे विपर्यास करून मिळतो का हे पण बघावयास हवे. खोटी बातमी हा विश्वासघात आहे व त्याला शिक्षा झालीच पाहिजे !

    ReplyDelete
  17. याला कमीत कमी 1 महिना तरी जेल मध्ये पाठवायला पाहिजे होते। म्हणजे परत अस खोट करायला तो धजावला नसता व बाकीच्या पत्रकारांना जरब बसली असती

    ReplyDelete
  18. आपले तथाकथित शिकलेल्या बुद्धी गहाण ठेवून पश्चिमी थूंक चाटणाऱ्या लोकांमुळे या असल्या भामट्यांचे फावते

    ReplyDelete
  19. BHAU,excellent pardafash of such deceptive but ugly and shameless approvers turned criminals. They should be punished severely.

    ReplyDelete
  20. हा माणूस दिलीप सरदेसाई चा मुलगा शोभत नाही.

    ReplyDelete