दिल्लीचे नवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आगामी लोकसभा निवडणूकीत मोदींना भारी पडतील का? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पुढल्या मे महिन्यातच मिळू शकेल. पण आज तरी प्रसार माध्यमात केजरीवाल यांनी भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना मागे टाकले, हे मान्य करायलाच हवे. कारण मागल्या वर्षअखेरीस गुजरात विधानसभेच्या निवडणूका तिसर्यांदा लागोपाठ जिंकल्यापासून याच माध्यमांनी मोदींना भाजपाचा पंतप्रधान पदाचा भाजपासाठी उमेदवार म्हणून निश्चित करून टाकले होते. पुढे त्यावर संघपरिवार आणि भाजपाने शिक्कामोर्तब केले. माध्यमांच्या इतक्या मेहनतीने मोदींना मिळालेली उमेदवारी आता केजरीवाल यांनी हिसकावून घेतली आहे. चार विधानसभांचे निकाल लागल्यापासून आता राहुल गांधींचे नाव मागे पडले, असून माध्यमांनी केजरीवाल यांना मोदींचे खरे आव्हानवीर असे घोषित केले आहे. देशातल्या बाकीच्या पक्षांनी त्यावर शिक्कामोर्तब करायचे तेवढेच बाकी आहे. त्याची सुरूवात लौकरच होईल यात शंका नाही. पण ज्याप्रकारे केजरीवाल यांना महिनाभर कौतुकाच्या वर्षावातून शिंका येऊ लागल्या आहेत, त्याकडे बघता आता केवळ १०१४ सालचे सार्वत्रिक निवडणूकीतले मतदानच बाकी आहे. त्याबद्दल मोदीही अवाक्षर बोलत नाहीत व भाजपाचे सत्ता हुकलेले दिल्लीतील नेते तक्रारीचा सुर लावतात, त्याच अर्थ भाजपानेही केजरीवाल यांचा विजय मान्य केलेला दिसतो. मोदी यामुळे हिरमुसले आहेत काय? तसे त्यांच्या वागण्यातून दिसत नाही. त्यांनी त्यानंतरही आपली प्रचार मोहिम चालूच ठेवली आहे. म्हणजेच लढाईतून मोदींनी पळ काढलेला नाही. मग मोदी केजरीवाल यांच्याविषयी प्रतिक्रिया कशाला देत नाहीत?
पहिली गोष्ट म्हणजे त्यातून पुन्हा केजरीवाल हा नवा आव्हानवीर मोदींच्या विरोधातला असल्याचाच प्रचार चालू आहे. मग त्याचा अर्थ राहुल हे मोदींच्या समोरचे आव्हान नव्हते काय? की केजरीवाल यांनी दिल्ली जिंकण्यापुर्वी मोदींनी लोकसभा जिंकलेलीच होती? मोदीसमोर हे नवे आव्हान उभे ठाकलेले असेल मानायचे, तर त्याच्याआधी मोदींसमोर कुठलेच आव्हान नव्हते असेही मानायला हवे. पण तसे तर कुणा पत्रकार विश्लेषकाने कधीच म्हटले नव्हते. उलट लोकसभा जिंकणे वा बहूमतापर्यंत मजल मारणे मोदींना कसे अवघड आहे, त्याचाच गाजावाजा चालू होता. मग ज्याच्यासमोर इतके अशक्य कोटीतले आव्हान उभे होते, तोच कोणी अजिंक्यवीर असल्याच्या थाटात आज त्याच्यापुढे केजरीवाल नावाचे नवे आव्हान कसे उभे केले जाते? शिवाय केजरीवाल हे खरेच इतके मोठे देशव्यापी आव्हान असेल, तर मग त्याचा सुगावा यापैकी कुणाच जाणकारांना विधानसभांचे निकाल लागण्याच्या आधी कसा लागलेला नव्हता? कारण यापैकी प्रत्येकजण तेव्हा केजरीवाल हे शीला दिक्षीत यांच्यासमोरचे आव्हान आल्याचीच भाषा बोलत होता. त्याच्या देशव्यापी परिणामांबद्दल कोणी अवाक्षर उच्चारले नव्हते. दिल्लीत केजरीवाल इतके यश मिळवू शकले नसते, तर यापैकी कोणी ते मोदींसमोरचे आहान असल्याची भाषा केली असती काय? त्यामुळेच हा सगळा प्रकार बघितला, मग दिल्लीत कुठल्याही वराती वा मिरवणूकीत अथवा कुठलाही पक्ष जिंकल्यावर भांगडा नाचणारे तेच तेच चेहरे दिसतात, त्याचे स्मरण होते. त्या नाचणार्यांना कोण जिंकला वा कोण नवरामुलगा आहे, त्याबद्दल कर्तव्य नसते. सुपारी व मोबदला देईल त्याच्या वरातीत नाचणे, हेच त्यांचे काम असते. त्यापेक्षा माध्यमे, पत्रकार वा विश्लेषकांची लायकी वेगळी उरली आहे काय?
मागल्या दहा वर्षात मोदी बाकी कुठले राजकारण शिकले किंवा नाही, ते माहित नाही. पण जेव्हा माध्यमे व पत्रकार विश्लेषक शिव्याशाप देऊ लागतात, तेव्हा निश्चिंत व्हावे आणि माध्यमे कौतुक करू लागले की धोका समजावा, इतका धडा मोदींनी नक्कीच शिकलेला आहे. म्हणूनच जेव्हा कधी माध्यमातून वा पत्रकारांकडून मोदींना आव्हान वा धोक्याचे इशारे दिले जातात; तेव्हा मोदी सर्वाधिक खुशीत दिसतात, निर्धास्त वावरताना दिसतात. मात्र जेव्हा माध्यमातून मोदींचे कौतुक होते; तेव्हा त्यांचा चेहरा स्पष्टपणे चिंतातूर झालेला दिसतो. आता महिना होत आला आणि अखंड केजरीवाल व त्यांच्या आम आदमी पक्षाचे कौतुक चालू आहे. पण त्याची काडीमात्र दखल न घेता मोदी आपल्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार कामात गर्क आहेत. कदाचित आपल्यामागचा पत्रकारांचा ससेमिरा संपला आणि केजरीवालांना माध्यमांनी घेरल्याने मोदी आनंदितही झालेले असावेत. मागल्या दोन निवडणूकांत गुजरातमध्ये त्यांच्याच पक्षात फ़ूट पडली होती आणि त्यांना असेच ‘जबरदस्त’ आव्हान उभे राहिल्याच्या धोक्याच्या सूचना माध्यमांनी दिल्या होत्या. त्याबद्दल अवाक्षरही बोलायचे मोदींनी कटाक्षाने टाळले होते. प्रथम झडापिया यांचा गट आणि नंतर केशूभाई पटेलांचा गट दंड थोपटून मोदींच्या विरोधात उभा ठाकलेले होते. मोदींनी केशूभाईंना आपल्या यशाचा पहिला पेढा खिलवून त्यांचेच आशीर्वाद घेतले होते. मोदींची बारा वर्षातली वाटचाल बघितली तर त्यांना अशी आव्हाने शुभसंकेत वाटतात. मग त्यांनी केजरीवाल यांच्या देशव्यापी आव्हानाने विचलीत होण्य़ाचे काही कारण आहे काय? उलट तेच मोदी आम आदमी पार्टी व केजरीवालांना शुभेच्छा देत असतील. कारण आठवडाभराच्या अल्पावधीत सर्वच आश्वासनांची पुर्ती करायला निघलेल्या केजरीवालांचे राजकारण किती दिर्घकाळ चालणार आहे?

Bhau,tyach keshubhai patelanchya samarthakana khechnyasathi sardar patelancha putala ubharnyacha modini sandhisadhu ghat ghatlela aahe he matra tumchya jaad bhingachya bhagvya chashmyatun disat naselach nahi ka?mag bhale garib shetkaryana tya putalyachya lokhandasathi aaplya nangarache faal modave lagle ani upashi marave lagle tari chalel.bhau ghabarta ka?ekada hounach jau de aamna samana..mazi friend request sweekara ani tumache patrakaritetil 40 varshache panditya panala lava.kharyala konachi dar?lokanchi dishabhul karnyacha deshdroh kashala karta?
ReplyDeleteनमो नमो
ReplyDeleteबुद्धीवंताच्या देशात मेंदूचा गटार फार झाला,
शेतकऱ्यांच्या देशात आत्महत्येचा प्रकार फार झाला,
पत्रकारांच्या देशात ढोंग्यांच्या प्रचार फार झाला,
धर्मनिरपेक्षांच्या देशात धार्मिकांचा धिक्कार फार झाला,
न्यायदेवतेच्या देशात अन्याय फार झाला,
श्रद्धाळूंच्या देशात भोन्दुंचा चमत्कार फार झाला,
इमानदारांच्या देशात भ्रष्टाचार फार झाला,
सोन्यामोत्यांच्या देशात अन्नाचा दुष्काळ फार झाला,
ज्ञान्यांच्या देशात अज्ञानाचा अंधकार फार झाला,
पहिलवानांच्या देशात रोगांचा सुकाळ फार झाला,
महाराजांच्या देशात जातीयवादाचा विकार फार झाला,
अहिंसकांच्या देशात दहशतवाद फार झाला,
विद्वानांच्या देशात अपशब्दांचा उच्चार फार झाला,
साधू-ब्रह्मचार्यांच्या देशात बलात्कार फार झाला,
युवकांच्या देशात युवक भरकटून गुन्हेगार फार झाला,
विश्वगुरु देशात संकुचितपणा फार झाला,
शालिनांच्या देशात व्यभिचार फार झाला,
आज देशाभिमानी लाचार फार झाला,
साऱ्या शोषकांचा कर्दनकाळ आज आला,
सशक्त भारताचा संकल्प आज झाला,
अखंड एकतेचा जयघोष आज झाला,
तुमची माझी नव्हे हि भल्या बुऱ्याची लढाई,
आज नव्हे, महाभारत पिढ्यानपिढ्या घडत राही
कवी विद्यानुज
Like page to read future poems https://www.facebook.com/KaviVidyanuj