"A lie gets halfway around the world before the truth has a chance to get its pants on." - Winston Churchill
सत्याला आपले कपडे अंगावर चढवून घराबाहेर पडायला वेळ मिळेपर्यंत असत्य अर्धे जग पालथे घालते, असे विन्स्टन चर्चिल यांचे एक विधान आहे. बर्याच काळापासून ते विधान ऐकलेले होते. पण सध्या जो राफ़ायल लढावू विमानाच्या खरेदीचा गदारोळ चालला आहे, त्यामुळे त्यातला आशय लक्षात आला. गेल्या जुन महिन्यात तेलगू देसम पक्षाने लोकसभेत मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला, त्यावर प्रदिर्घ भाषण करताना राहुल गांधी यांनी हा विषय पहिल्यांदा उकरून काढला होता. त्याच खरेदीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोटाळा करून आपल्या लाडक्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला तीस हजार कोटी रुपये मिळवून दिले आणि त्यासाठी त्या विमानांची किंमतही वाढवून देण्यात आल्याचा धडधडीत खोटा आरोप त्यांनी केला. असे काही आरोप करण्यासाठी त्यांनी कुठला पुरावा किंवा कागदपत्र समोर आण्ले नाही. किंवा साक्षिदारही समोर आणलेला नाही. त्यासाठी त्यांनी फ़्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष ऑलंदे यांच्या कुठल्या मुलाखतीत उच्चारलेल्या शब्दांचा आधार घेतला होता. खुद्द ऑलंदे यांनी ते शब्द मागे घेतले आहेत आणि आपल्याला तसे काही म्हणायचे नव्हते, असा खुलासा करून झाला आहे. त्यानंतर राहुलनी विद्यमान फ़्रेन्च राष्ट्राध्यक्ष मायक्रोन यांनी आपल्याला तसे सांगितल्याचा दावा केला होता. त्यांनीही आपले असे कुठले बोलणे राहुलशी झाले नसल्याचा खुलासा करून झाला आहे. मग सदरहू विमानाचे उत्पादन करणार्या कंपनीनेही खुलासा देऊन झाला आहे. पण इतके खुलासे राहुलच्या मेंदूत शिरणार नसतील, तर समजू शकते. पण त्याच्या आधाराने जो धुरळा माध्यमातून व विविध विरोधी पक्षांकडून उडवला जात आहे, त्यांच्या मेंदूचे काय झाले; असा प्रश्न नक्की पडतो. बोफ़ोर्सप्रमाणे या आरोपांची चिखलफ़ेक करून मोदींना आगामी लोकसभा निवडणूकीत हरवता येईल, ही त्यामागची अपेक्षा असावी. अन्यथा हा खोटेपणा इतकी मजल मारू शकला नसता.
आरंभी मोदींनी व भाजपानेही त्याकडे काणाडोळा केला. नंतर माध्यमांनी व अन्य पक्षांनी त्यावर धुळवड आरंभल्यामुळे खुलासे व उत्तरेही देऊन झालेली आहेत. पण उत्तरे कोणाला हवी आहेत? सुप्रिम कोर्टातही हा मामला गेला आणि तो घेऊन जाणार्यांनी आपापली नाके कापून घेतली. भाजपाचेच माजी मंत्री अरूण शौरी व यशवंत सिन्हा यांनी प्रशांत भूषण यांच्या माध्यमातून हा विषय सुप्रिम कोर्टात नेलेला होता. त्याच्या चौकशीचीही मागणी केली होती. वास्तविक त्यांनी हा उद्योग करण्यापेक्षा राहुल गांधींनी ते करायला हवे होते. पण राहुल वा त्यांचे एकाहून एक कायदेपंडीत सहकारी शेपूट घालून बाजूला बसले असताना, शौरी व सिन्हा यांनी मोदीद्वेषाच्या आहारी जाऊन कोर्टात धाव घेतली. त्यातून आपल्या दिर्घकालीन प्रतिष्ठा व विश्वासार्हतेची माती करून घेतली. कारण त्यांच्या याचिकेला प्रतिसाद देऊन कोर्टाने मोदी सरकारकडे जाब मागितला आणि सरकारनेही सर्व संबंधित कागदपत्रे कोर्टाला सादर केली. ती बारकाईने तपासून कोर्टाने त्यात कुठला घोटाळा नसल्याची ग्वाही देऊन टाकली. राहुलच्या नादी लागलेल्या अतिशहाण्या शौरी-सिन्हांचे नाक कापले गेले आणि त्यांची बोलती बंद होऊन गेली. जे त्यांचे कोर्टात झाले तेच अन्य विरोधी पक्षांचे आगामी लोकसभा निवडणूकीत व्हायचे आहे. राहुल आजही जितक्या आवेशात बोलत आहेत, त्यांना आपल्या आरोपाची खात्री असती, तर त्यांनी हा मामला स्वत:च कोर्टामध्ये नेला असता. त्याचे श्रेय शौरी-सिन्हांना नक्कीच मिळू दिले नसते. पण आपल्या खोटेपणाची खात्री असल्याने त्यांनी गप्प राहून त्या अतिशहाण्यांना बळी व्हायला पुढे केले. शहाण्यांची हीच शोकांतिका असते. ते सर्वात आधी आणि झटकन भामट्यांचे बळी होतात. हा विषय इथेच संपत नाही. राहुलला आपल्या खोटेपणाची कितपत खात्री आहे, त्याची साक्ष गुरूवारी लोकसभेत सभापती सुमित्रा महाजन यांनी राहुलकडूनच वदवून घेतली.
राफ़ायल विषयातला आणखी एक खोटा पुरावा राहुलनी लोकसभेत आणलेला होता. त्यात म्हणे मनोहर पर्रीकर व गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे राफ़ायल फ़ायली आपल्या घरात असल्याचे बोलत असल्याचे ध्वनीमुद्रण होते. त्याविषयी राहुल ग्वाही देत असतील, तरच ती वाजवायला देऊ; असे बजावल्यावर या कॉग्रेस अध्यक्षाने शेपूट घातली. कारण त्याला आपल्याच खोटेपणाची खात्री होती. टेपच्या खरेपणाची खात्री लोकसभेत दिली आणि तपासणीनंतर ती खोटी पडली; तर फ़ोर्जरीचा गुन्हा होऊ शकतो. इतकी अक्कल पप्पूला नक्कीच आहे. विषय सुप्रिम कोर्टापासून लोकसभेपर्यंत कुठलाही कसोटी वा तपासणीवर टिकेल, असा पुरावा राहुल गांधी देऊ शकलेले नाहीत. पण पाच महिने उलटून गेल्यावरही भारतीय माध्यमात राफ़ायलचा घोटाळा चर्चेत गाजतो आहे. आता यातली गंमतही तपासून बघायला हरकत नाही. एका काल्पनिक आरोपाचा कुठलाही पुरावा साक्षिदार नसताना गदारोळ चालू आहे. पण गेला महिनाभर युपीएकालीन ऑगस्टा वेस्टलॅन्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातला दलाल भारताच्या हाती आलेला आहे. त्याला युपीए सरकारच्या घोटाळ्यात काही कोटी रुपये मिळाले व त्याने ते राहुल व सोनियांसहीत अनेक कॉग्रेस नेत्यांना भागिदारी दिल्याचा काही पुरावा इटालियन व दुबाईच्या कोर्टात मान्यही झाला आहे. म्हणून तर त्याचा भारतात तपास सुरू झाला आणि दुबई कोर्टाने त्याला भारताच्या हवाली केलेला आहे. त्याच्या जबानीतून थेट राहुल व सोनियांचे उल्लेख समोर आलेले आहेत. त्याविषयी माहितीही उपलब्ध आहे. पण त्यावर माध्यमात स्मशानशांतता पसरलेली आहे. राहुलचे बिनबुडाचे आरोप गाजवणारे व पत्रकार परिषदेत हजेरी लावणारे संपादक यापैकी कोणी राहुलना त्याच हेलिकॉप्टर खरेदीतल्या पैसे, दलाली वा व्यवहाराविषयी चकार शब्द विचारायलेला नाही. राफ़ायलचे असत्य अर्ध्या माध्यम जगताला पालथे घालून बसले आहे, पण ख्रिश्चन मिशेलने कथन केलेल्या राहुल व सोनियांच्या पैशाचे सत्य बोलायला कोणी धजावत नाही ना?
राहुलच्या आरोपात एकही पुरावा नाही आणि गाजावाजा आहे. उलट ऑगस्टा वेस्टलॅन्ड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यातल्या पैशाची देवाणघेवाण कोर्टात सिद्ध झाली असून त्याचे उत्पादन करणार्या व विक्री दलाली खाणार्यांना दोषीही ठरवण्यात आलेले आहे. त्यातला एक आरोपी भारतीय तपास यंत्रणांसमोर सत्य ओकतो आहे. पण त्यात लक्ष घालायलाही कुणा संपादक, पत्रकाराला सवड मिळालेली नाही. त्यावर बोलायची कोणालाही कशाला भिती वाटते आहे? कारण त्यात युपीएचे मंत्री वा अधिकार्यांनाच लाच देण्यात आलेली नाही. काही संपादक पत्रकारांनाही हिस्सा मिळाल्याचा आरोप आहे. तपशील उपलब्ध आहे. पण ते सत्य बोलायचे कोणी? शौरी किंवा सिन्हा कुठे गुडूप झाले आहेत? राफ़ायलच्या डंका पिटणार्या पत्रकारांना हेलिकॉप्टर विषयी बोलायची इतकी भिती कशाला वाटते आहे? नसलेल्या पुराव्यांचे फ़ुगे उडवण्याचा खेळ करणार्यांना सत्य समोर असून त्याला सामोरे जाण्याची भिती कशाला सतावते आहे? कुणालाही कुठलेही प्रश्न बेधडक विचारण्याची हिंमत बाळगणार्यांना राहुलनी योजलेल्या पत्रकार परिषदेत, त्याच सत्याविषयी एक साधा प्रश्न विचारायचे धाडस का होत नाही? कारण ते सत्य आहे. ते सत्य दडपायचे तर राफ़ायलच्या धुमधडाका लावलाच पाहिजे ना? जगजीत सिंगची गजल आहे, तुम इतका क्यु मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो. त्याचीच प्रचिती येते. राफ़ायलचा बागुलबुवा केला नाही तर सगळे लक्ष हेलिकॉप्टर घोटाळ्याकडे वळणार आहे. तिथे इटालीयन आईचा भावी पंतप्रधान पुत्र गटांगळ्या खाणार आहे. त्याला फ़ार वेळ लागणार नाही. कारण ख्रिश्चन मिशेल सत्य ओकायला लागला असून, त्यातला थेट गांधी खानदानाला भिडणारा महत्वाचा तपशील उघड होत जाईल, तसतशा राफ़ायलच्या रुदाल्या ओक्साबोक्शी आकांत करणार आहेत. दया येते ती त्यात बळी पडलेल्या शौरी-सिन्हांची आणि त्याच वाटेवर बळी व्हायला धावत सुटलेल्या अन्य पक्षातल्या बकर्यांची. कारण उद्या त्यांचा बळी जाईल, तेव्हा राहुल वा सोनियाही त्यांच्यासाठी दोन अश्रू ढाळणार नाहीत, हे नक्की.
काल परवा पर्यंत च्या अरुण जेटली आणि निर्मला सीतारामन यांच्या भाषणाने कॉंग्रेसच्या विशेषता रागांच्या सर्व आरोपांची चिरफाड करून झालेली आहे तरीही राहुल गांधी हेच म्हणतात की माझ्या दोन प्रश्नांची उत्तरे दिलेली नाही पण प्रश्न असा आहे की अरुण जेटली आणि निर्मला सीतारामन यांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाला राहुल गांधी किंवा तत्कालीन सरकारच्या प्रतिनिधीने काही उत्तर दिले नाही यावर राहुल गांधी शब्द बोलत नाही दाखवायला तर मीडिया भाजपाच्या बाजूने दिसते परंतु प्रत्यक्षात वेळ आली की काँग्रेसला सपोर्ट भूमिका घेते. अरुण जेटली यांनी लोकसभेत अगदी स्पष्ट केले की आम्ही विमान आणि त्यावरील लढाऊ हत्यारे यांची वेगवेगळी किंमत न्यायालयात सीलबंद कोट्यात दिलेली आहे न्यायालयाने ती तपासली निव्वळ विमानाचे किंमत ९ टक्के कमी आहे. आणि शस्त्रास्त्र लावलेल्या विमानाची किंमत वीस टक्के कमी आहे हे न्यायालयाने मान्य केले आहे तरी लोकसभेत वेगळे आणि बाहेर वेगळे आरोप करणे सुरूच आहे.
ReplyDeleteगाजराची पुंगी वाजवण्याचा प्रकार दिसतोय । वाजली तर वाजली नाहीतर 😝...
Deleteभाउ
ReplyDeleteते बावचळलेत हाच याचा अर्थ. MP / Rajastan मधे होति नव्हति ति सगळि शक्ति लावलि, पैसा ओतला, देश /धर्म बुडवुन झाला तरि शेवटि पप्प्याला बहुमताचा आकडा दिसला नाहि, तेच कर्नाटकात झाले.
हा कितिहि खेळला तरि हारणारच, आणि हे त्यानाहि माहित आहे. खरा मुद्दा आहे कि हा यावेळि अमेठितपण हरणार आहे. बाकि गोष्टि सोडा.
Dear Bhau your artical is good all thinkers are corrupted all papers editors are corrupted .They will cry more loudly on rafayal .All people such as farmers laboures are very simple they could think deeply on such subjects .Write more on this
Deleteराहुल गांधी यांचे जवळ राफेल संबन्धित एवढी माहिती व पुरावे आहेत तर ते त्यांनी लोकांसमोर मांडायला हवेत वा कोर्टात जायला हवे ।नुसताच धुराळा उडवायचा व पुरावे द्या म्हटले की विदेशात पळायचे,त्यांचे लोकसभेतील भाषणे रोडशो सारखी असतात ।
DeleteExcellent
ReplyDeleteउत्तम
Deleteएकदम सत्य परीस्थिती
ReplyDeleteNowadays credibility of well known journalists is deminished. Congress supported & Modi Shah hated journalists always writes useless articles.
ReplyDelete1. Vijay chormare, sunil chavke (MaTa)
2. Girish kuber, Mahesh Sarlashkar (loksatta)
3. Punya prasun vajpayee
4. Ravish Kumar
5. Rajdeep Sardesai
6. Yogendra yadav
7. Vishwambhar choudhari
8. Many marathi journalusts who comes in debate for marathi news channels
Kamal ahe Bhau ya media chi. Kalcha mata vachla ka? Tyamdhe Congress chya hati koni bibhishan lagat nahi yachi Khant vyakta karnyat Ali Hoti. Jase Rajiv Gandhi babat VP Singh Bibhishan zale hote.vait vattay ASE leading vartamanpatre Sudha Congress la Bibhishan shodhayla sangtayt pan tyana mahit nahi ithe Ramasarkha swach karbhar ahe. Leading vartamanpatre janteche mat parivartan Karu ichitata.pan Shakya nahi. Amhi bhaunche lekh Sudha vachto
ReplyDeleteAApli vyavstha yana corruption cases mdhe gaja aad ghalte ki nehmi pramane he ujal mathyane phirtat itkech pahayche ahe? atleast madam na tari shiksha vhavi ani ti ashi vhyayla havi ki punha kuni gair bhartiya bhartachya gadich swapn zopetpn pahnar nahi
ReplyDeleteAAj devendra phadnvis bolle ki PM nakkich marathi manus hoil tyawr pn liha bhau. tyat kahi tathya ahe ka?
ReplyDeleteछान😊😊
ReplyDelete# पप्पू कोण? - तो की आपण सगळे?
ReplyDeleteकांग्रेस अध्यक्ष गेल्या सहा-सात महिन्यांपासून राफेल विमानखरेदी व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याची बोंब मारत आहेत. देशाच्या संरक्षणासारख्या अत्यंत महत्वाच्या विषयात संसदेत चर्चा चालू असताना डोळा मारणे, कागदी विमाने उडविणे, वारंवार खोटेनाटे आरोप करणे, देशाच्या पंतप्रधानांना चोर म्हणणे असे कोणत्याही देशप्रेमी नागरिकाला सात्विक संताप येईल असले वावदुक चाळे बिनदिक्कत करत आहेत.
राजरोसपणे हा हलकटपणा करताना त्यांच्या मनात स्वतःची किंवा पक्षाची प्रतिमा खराब होईल, उरलीसुरली विश्वासार्हता नष्ट होईल ह्याची यत्किंचितही भीती का बरे नाही?
खोटे बोला पण रेटुन बोला ह्या धोरणाला अनुसरुन खोट्या आरोपांची राळ उठविताना 'दोन सार्वभौम राष्ट्रांच्या सरकारांनी केलेल्या कराराच्या मूळ रकमेपेक्षा दुप्पट रकमेचा (?) घोटाळा झाला' अशी मांडणी तद्दन मुर्खपणाची आहे हे काय त्याना कळत नसेल?
देशाच्या संसदेत खोटी ध्वनिफीत सादर करायची परवानगी मागण्याची हिम्मत कांग्रेस अध्यक्षांना कशी काय होऊ शकते?
चर्चा चालू असताना मख्ख चेहरा करुन बसणारा, वेडगळ चाळे करणारा हा माणूस पप्पू म्हणून दुर्लक्ष करण्यासारखा नाही. अतिशय पाताळयंत्री, भारत देशाप्रती ज्याची निष्ठा संशयास्पद आहे आणि स्वतःच्या घराण्याची-पक्षाची सत्ता परत यावी ह्यासाठी कोणत्याही थराला जाईल असा हा धूर्त व कपटी माणूस आहे.
* चीन-पाकिस्तान ह्या भारताच्या शत्रुराष्ट्रांच्या नेत्यांबरोबर व अधिकाऱ्यांबरोबर गुप्त खलबते करणे,
* राफेल विमानांची तांत्रिक वैशिष्ट्ये उघड करण्याची (जेणेकरून शत्रुराष्ट्राना मदत होईल) वारंवार मागणी करणे,
* सर्वोच्च न्यायालयाने निर्वाळा देउनही जेपीसीचा हट्ट करून विमानखरेदी टाळण्याचा वा लांबविण्याचा प्रयत्न करणे,
* सर्व प्रसारमाध्यमांना हाताशी धरून देशासमोर धादांत खोटे, भंपक चित्र उभे करणे,
* निवडणुकीपुरते जानवे घालून देवदर्शन करून सामान्य जनतेची दिशाभूल करणे,
* नक्षलवादी, काश्मीरी फुटीरतावादी, खालिस्तान चळवळीचे म्होरके अशा सर्व देशद्रोही घटकांशी साटेलोटे असणे,
* जातिपातींत भांडणे लावून देशात दंगली, समाजात गृहकलह माजविणे
ह्या अणि अशा अनेक देशघातक कृत्त्यांतुन कांग्रेस पक्ष व पक्षाचे अध्यक्ष ह्यांचा खुनशी, कपटी चेहरा उघडा पडला आहे. भले विदेशी सल्लागारांच्या सुचनेबरहुकुम काँग्रेस अध्यक्ष वागत असतील, पण ज्या सहजतेने हे कारस्थान ते अंमलात आणत आहेत ते पाहता त्याना पप्पू म्हणणे धारिष्टयाचे ठरेल. स्वतः आई सह नेशनल हेराल्ड ह्या आर्थिक अफरातफरीच्या खटल्यात जामीनावर बाहेर असूनही अणि ऑगस्टा वेस्टलैंड हेलीकॉप्टर खरेदी लाच प्रकरणात संशयित असूनही निलाजरेेपणाने हे मायलेक जगभर फिरताहेत अणि देशविरोधी कारवायाना खतपाणी घालताहेत.
हे सर्व दिसत अणि समजत असूनही जर त्याना कोणी 'पप्पू' म्हणून हलक्यात घेत असेल तर
'कान खोलकर सुन लो, पप्पू वो नहीं तुम हो..हम सब है।'.
बरोबर आहे
Deleteचुकीच्या आरोपांची राळ उडवून द्यायची नि त्याचाच फायदा घेऊन मतपेट्या फुगवायचा हा धंदा आहे. त्याचा उपयोग कर्नाटक, पंजाब, राजस्थान आणि मध्यप्रदेश मध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी झालाच आहे. बहुमत कमी वा काहिही म्हणा पण भाजप सत्तेतून पायउतार झाला हे दुख:दायक नाही का.
ReplyDeleteकर नाही तर डर कशाला हे निवडणुकीच्या खेळात नाही ना चालत, आपली तथाकथित सुजाण जनता, कर्मदरिद्री शेतकरी, भंपक विकारवंत हे जेव्हा मतदार होतात ना तेव्हा यद्वातद्वा भविष्यति अशीच परिस्थिती होत नाही काय?
२०१४ च्या आधी भाजप जसा आक्रमक होता त्याच पद्धतीने भाजपने पप्पूवर कोर्ट केसेस ठोकल्याशिवाय तो गप्प बसणार नाही, संघाने जे केले तेच भाजपने पप्पूवर केसेस टाकल्यास पप्पूला पळता भुई थोडी होईल.
शांत बसणे अध्यात्मात ठीक, पण निवडणुकीच्या रणधुमाळीत स्वहितास घातक नक्कीच आहे.
अजूनही वेळ गेलेली नाही भाजपने हिम्मत हारू नये हेच खरे.
भाऊ आपण म्हटले आहे तसे पत्रकार मग मीडिया चॅनेल्सचे असोत वा वृत्तपत्रांचे असोत यांनी मोदींविरोधाची जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली आहे म्हणजेच त्या अर्थाने हे पत्रकार एका अर्थाने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते झाले आहेत इतकी वर्षे हे लोक काँग्रेस विरोधात कोणतीही भूमिका प्रकाशात येऊ देत नव्हते पण social media चा उदय झाला आणि लोक मोठ्या प्रमाणात व्यक्त होऊ लागले आणि कॉंग्रेसच्या या माध्यमातील कार्यकर्त्यांचे दुकान बंद झाले आजच्या घडीला या मंडळींची विश्वासार्हता पूर्णपणे रसातळाला गेली आहे 2019 नंतर ही मंडळी जनतेच्या मनातून पूर्णपणे उतरलेली असतील हे मात्र निश्चित आहे.या देशात social मीडियाचा उदय झाला आणि पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने काँग्रेस विरोधात पूर्ण बहुमताचे सरकार सत्तेवर आले हा योगायोग नक्कीच नव्हता.
ReplyDeleteकोण म्हणतो माध्यमांत मेंदू आहे.तो असता तर त्यांनी हा विषय सोडून दिला असता.आपल्या मिडिया च्या बातम्या ज्या पद्धतीने हा विषय चघळुन चघळून चिकट चिगदा चिखल केला आहे,त्या वरुन असे म्हणायला हरकत नाही.बुद्धिवादी सामान्य जनतेला जे समजते ते जर मिडिया च्या संपादकाला उमगत नसेल तर असे संपादक पगारी कां ठेवून घेतला असे आम्हा सामान्य जनतेला नक्की वाटते.
ReplyDeleteखुमासदार लेख पण गुप्तचर विभागाने दुध का दुध और पानी का पानी निवडणूक पुर्वी करायला हवे
ReplyDeleteराजकीय विश्वासार्हतेचा बळी देऊन राफेल ची पोळी शेकत आहे त राहूलजी .. त्यांना शुभेच्छा 😄😄😄
ReplyDeleteपुन: पुन्हा तेच! शंभर वेळा खोटे बोलला कीं, फार विचार न करणार्याला ते असत्य सत्यच वाटूं लागते.तसेच झाले आहे सामान्य जनते साठी लावलेला हा सापळा आहे.सामान्य माणूस यांत फसूं नये असे वाटते.पाहू 'आगे आगे होता है क्या!'
ReplyDeleteभाऊ, एकही मिडिया हाऊस, काँग्रेसला ऑगस्टा वेस्टलँड बाबत विचारायला तयार नाही, त्याचा अर्थ, ह्या मिडियाच्या खिश्यात कोट्यावधी रुपये कोंबण्यात आलेले आहेत आणि विरुद्ध बाजूने बोलल्यास जिवाला धोकासुद्धा आहे, असा घ्यायचा का? तुम्हाला काय वाटते?
ReplyDeleteखूप छान रीतीने मांडलंय भाऊ तुम्ही हे सारं👌
ReplyDeleteचोर मचाये शोर अगदी बरोबरच गेल्या वेळेस मोदींनी केलं आता राहुल गांधी करत आहेत इतिहास तोच आणि परिणाम पण तेच
ReplyDeleteराजेश जोशी
भाऊ छान लेख लिहिला आहे .
ReplyDeleteखोटं बोलत, पण रेटून बोल असं रागाचं धोरण आहे. टिंगलीचा विषय का असेना पण चर्चेत रहातो आहे व प्रसिद्धीचा फायदा उठवतो आहे.
ReplyDeleteरागाला अनुल्लेखाने मारले तर आरोपांची पट्टी वाढते व प्रत्यूत्तर दिले तर आरोपांना बळ मिळते.
थोडक्यात काय राजा भिकारी, माझी टोपी घेतली.. असा खेळ चालू आहे..
भाऊ, उत्तम विश्लेषण! पण सगळेच मिडियावाले शेपटी घालून बसलेत फक्त झी न्यूज आणि सुधीर चौधरी सोडून! सुधीर यानी DNA मधे रागांला सोलायचे काम केलेय असं मला तरी वाटतं! Please correct me if I am wrong!
ReplyDeleteह्या लेखांत सर्व एकसुरीपणा वाटत आहे.. राफेल मध्ये गडबड आहे हे निश्चितच नाही तर एवढ्यात कोट्यावधी रूपयांची अब्रुनुकसानीची नोटीस बजावली गेली असती.. भाऊंचा प्रश्न खरा आहे की राहुल न्यायालयात का जात नाही कींवा हाच प्रश्न प्रत्येक चर्चासत्रात काॅंग्रेसला विचारला जात आहे. भाजपाचा पहिला बचाव हा या करारातील गुप्ततेच्या अटी बद्दल आहे. त्यामुळे एकही कागद आज कोणालाही ऊपलब्ध नाही. ही कागदपत्रे फक्त सीएजी किंवा जेपीसीला ऊपलब्ध होऊ शकतात. म्हणुन आज पुराव्याच्या आधारे कोणीही न्यायालयात जाऊ शकत नाही.. त्यामुळे जेपीसीची मागणी होऊ लागली आहे. भाऊंनी म्हटल्याप्रमाणे सुप्रिम कोर्टात कोणाचेही नाक कापले नाही ऊलट दिलेली माहीती चुकिची असल्याने सरकारलाच रिव्ह्यु पिटीशन दाखल करावी लागली आहे. जर कोणी न्यायालयाच्या निर्णयाचे काळजी पुर्वक वाचन करेल त्यांनी हा विषय आपल्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगितले त्यावरच ते थांबले नाहीत तर हा आमचा प्राथमिक दृष्टीकोण असल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे न्यायालयाने हुशारीने ही केस ओपन ठेवली आहे..
ReplyDeleteभाऊ अंबानीला फायदा दिल्याचा पुरावा नाही म्हणतात मग अंबानींने त्यांच्या कंपनीच्या रिपोर्ट मध्ये दिलेली माहीती खोटी आहे काय ? राहुल गांधींनीच पत्रकार परिषदेत काॅंग्रेस कोणते विमान व कोणते तंत्रज्ञान घेणार हे स्पष्ट सांगितले. पण त्यांवर कोणताही खुलासा सरकार कडुन आला नाही. करारामध्ये २०१२ साली झालेल्या चाचण्यांच्या अनुषंगाने विमाने खरेदी करण्यात येत असल्याचे नमुद आहे असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. जर भाजपा नवीन तंत्रज्ञान असलेले विमान घेत असेल तर या विमानांची चाचणी कोणी घेतली हा प्रश्न अनुत्तरित आहे. यांत खुप काही लिहीण्यास आहे पण राहुलला कानफाट्या ठरवण्याचा चंग बुद्धिवंतानी बांधल्याचा जाणवतो...
असो आता २०१९ जवळ आहे...
Reliance got contract of around Rs 880 crore. Profit from it can be somewhere between 15 % to 30 %. Then how can Pappu say that," Reliance got Rs 30000 crore ? Any logic ?
Delete