२०१९ म्ह्णजे सतराव्या सार्वत्रिक किंवा लोकसभेच्या निवडणूकांना आता फ़क्त काही महिन्यांचा कालावधी शिल्ल्क राहिला आहे आणि त्यात पुन्हा भाजपा बहूमत मिळवील का? नरेंद्र मोदींनी सोळाव्या लोकसभेत आपल्या पक्षाला किंवा पहिल्यावहिल्या संपुर्ण बिगरकॉग्रेस पक्षाला बहूमत मिळवून दिले. तसा चमत्कार पुन्हा घडेल का? भाजपा याच एका पक्षाला बहूमत मिळेल, की त्याच्या नेतॄत्वाखालच्या एनडीए आघाडीला बहूमत मिळेल? तसे झाल्यास मित्रपक्षांच्या मेहरबानीवर मोदी पंतप्रधान होऊन सरकार चालवू शकतील काय? बहुतांश पुरोगामी वा प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन त्यांनी महागठबंधन तयार केल्यास, मोदींची काय अवस्था होईल? यासारखे शेकडो प्रश्न आज राजकीय अभ्यासक, विश्लेषक वा सामान्य कार्यकर्त्यांनाही सतावत आहेत. त्याची उत्तरे शोधण्यासाठी वेगवेगळ्या निकषावर मतचाचण्याही चालल्या आहेत. त्याचे उलटसुलट निष्कर्ष काढून प्रत्येकजण आपला मुद्दा पुढे रेटतोही आहे. जनतेमध्येही काहीशी चलबिचल आहे. त्यामुळेच इथे जो आगामी निवडणूकांचा उहापोह करायचा आहे, त्याचे अंतिम उत्तर काय असेल, याविषयी वाचकाच्या मनात कमालीची उत्सुकता असल्यास नवल नाही. प्रामुख्याने पाच वर्षापुर्वी कोणीही अभ्यासक चाचणीकर्ता वा संपादक पत्रकार भाजपाला किंवा एनडीएला मोदींच्या नेतॄत्वाखाली बहूमत मिळण्याचा संकेतही देत नव्हता. तेव्हा माझ्या ‘मोदीच का? या’ पुस्तकात मोदीच बहूमत मिळवतील, अशी ग्वाही देण्यात आलेली होती. त्यामुळेच आज मला काय वाटते आणि याविषयी माझे काय आकलन आहे, त्याबद्दल अनेकांना उत्सुकता असली तर नवल नाही. त्यांना बाकीचे विश्लेषण जाणून घेण्य़ाच्या आधी ‘होय किंवा नाही’ असे उत्तर अपेक्षित आहे. मी त्यांची उत्सुकता फ़ार ताणून धरणार नाही. होऊ घातलेल्या सतराव्या लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम वा वेळापत्रकही आयोगाने अजून जाहिर केलेले नाही. तरीही त्यातल्या निकालाविषयी माझे आकलन आजही तयार आहे. ते होकारार्थी आहे. होकार आहे तो मोदींना पुन्हा बहूमताने सरकार मिळणार, अशा अर्थी आहे. कुठलीही समिकरणे तयार केली वा जुळवली वा महागठबंधनातून विरोधी मतांची विभागणी टाळण्याची कितीही कसरत केली; तरी आता मोदींना कोणी बहूमतापासून वंचित ठेवू शकणार नाही, हा माझा ठाम निष्कर्ष आहे. तो कसा निघाला व कशाप्रकारे हे मतदान पुढे जाईल, त्याचाच उहापोह पुस्तकाच्या या दुसर्या भागातून मी करणार आहे.
यातली पहिली गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे, की हा निष्कर्ष मी काढलेला नाही, की कुठल्या मतचाचणीने काढलेला नाही. तो मोदींना पराभूत करण्यासाठी एकत्र येऊ बघणार्या त्यांच्या तमाम विरोधकांचा, पक्षांचा, नेत्यांचा वा वैचारिक विरोधकांचा निष्कर्ष आहे. आज आहे त्याच स्थितीत सगळे पक्ष विस्कळीतपणे मोदींना सामोरे गेल्यास मोदींचा विजय नव्हेतर त्यांच्यामुळे भाजपाला बहूमत पक्के मिळणार, अशी प्रत्येक विरोधकाला खात्री आहे. जिंकणार्या नेत्यापेक्षा त्याच्या विरोधकांना त्याच्या विजयाची खात्री असते, त्याच्या यशाचा आपण इथे उहापोह करणार आहोत. सगळे विरोधक आपापल्या प्रभावक्षेत्राला वाचवण्यासाठी इतके धडपडत आहेत. कारण त्यांना आपले पाठीराखे किंवा समर्थक मतदारांविषयी खात्री राहिलेली नाही. इतका न्युनगंड विरोधकांमध्ये यापुर्वी एकदाच दिसलेला आ्हे. १९८४ सालात इंदिरा हत्येनंतर नवख्या राजीव गांधींना लोकसभेत ४१५ जागा मिळाल्या होत्या आणि विविध लहानमोठे पक्ष पुरते भूईसपाट होऊन गेलेले होते. त्यानंतर कुठल्याही पक्षाला स्वबळावर निवडणूक जिंकणे अशक्य वाटू लागलेले होते. काहीशी तशी़च अवस्था आज आलेली आहे. त्यातून मग महागठबंधन वा मतविभागणी टाळण्य़ाचे सिद्धांत पुढे आणले जाऊ लागले आहेत. मात्र विरोधकांची स्थिती १९८४ सालात होती तितकी आज दुबळी वा निराशाजनक नक्की नाही. कारण तेव्हा राजीवना ४१५ जागा मिळाल्या तितकीच मतांची मोठी टक्केवारी त्यांच्या पाठीशी उभी राहिली होती. मोदींना २०१४ जिंकताना तितक्या जागा मिळाल्या नाहीत, की तितकी टक्केवारीही गाठता आलेली नव्हती. आजही ३१ टक्के मतांचा पंतप्रधान म्हणून मोदींना हिणवले जाते. त्यात तथ्य असेल तर इतका भयगंड कशाला? २०१४ मध्ये मोदींना पंतप्रधान होण्यासाठी भाजपाला ३१ टक्के मते मिळाली होती आणि एनडीएला ४३ टक्के मते मिळालेली होती. म्हणजेच राजीव गांधींप्रमाणे ४९ टक्के मते मिळाली नव्हती. विरोधातली ५७ टक्के मते एकत्र केल्यामुळे मोदी पराभूत होऊ शकतील, असे यापैकी एकाही नेत्याला वा पक्षाला वाटत नाही. कारण त्यांच्यापाशी मोदींना पराभूत करणारे मुद्देच नाहीत. त्यामुळे आधीच्या मतांची बेरीज होण्याची त्यांना खात्री वाटत नाही. किंबहूना यापैकी कोणालाही भारतीय मतदाराचे मानस व मतविभागणीची गुंतागुंत समजून घेण्याची इच्छाच नाही. त्यातूनच हा भयगंड आलेला आहे. म्हणूनच निवडणूकीचे वेध लागण्यापुर्वी सर्व विरोधी पक्ष आपापला आत्मविश्वास गमावून बसलेले आहेत. एकमेकांच्या आधाराने नरेंद्र मोदींना रोखण्याची स्वप्ने रंगवली जात आहेत. हा आपल्याच नाकर्तेपणाविषयी विरोधकांमधला आत्मविश्वास मोदींची खरी ताकद आहे आणि मतदाराला त्यांच्याकडे आकर्षित व्हायला भाग पाडणारा सर्वात प्रभावी मुद्दा आहे. मग हे मतदान कुठल्या दिशेने जाईल? कोणाला किती जागा मिळतील आणि कसकशा आघाड्या होण्याने मतदानावर काय परिणाम होऊ शकतील? बहूमत वा त्यापेक्षा अधिक जागा मोदी कुठून व कशा मिळवू शकतील? यातील पहिला मुद्दा म्हणजे मतदार कोण आणि तो मत कसे बनवतो? कशासाठी मतदान करतो? लोकशाहीवर कोणाची गाढ श्रद्धा आहे? तात्पर्य खरेच महागठबंधन झाले नाही तर मोदी ३००+जागा जिंकतील आणि एकजिनसी महागठबंधन झाले तर मोदी एकट्या भाजपासाठी ३५०+ जागा जिंकतील.
पुन्हा मोदीच का? पुस्तकातून
Wa Bhau
ReplyDeleteManatle bolalat.
Agreed, Modi (BJP) Will gain more seats than 2014 in this 2019 Lok sabha. Last time it was 282, so anything but greater than 282 will be BJP's gain.
Am more interested to watch the drama of sickular's & All Modi haters after 2019 results. We can expect to see a drama like USA "Not my PM" immediately after the lok sabha results.
And again what these people will do in next 5 yrs. as they have almost played all dirty tricks / politics in Modi's first term when he was settling in Delhi & as PM . Now in second term Modi will Play like a settled batsman who is there on pitch since long & heating like anything.
But on the serious note, We expect real turn around from Modi in his second term. Plenty of evidences are in Public domain on so many politicians & since they are out of reach of our Law. This needs to be changed. we need to get rid of collegium system. Article 371, Common Civil code. These has to be taken to conclusion on positive side. We already wasted 70 yrs. & its already too late. We need a upside down change in the Education system & syllabus which is more of pro Left & anti India.
Lets hope Modi will be the Person to do this.
Jai Hind.
Agree with the 'serious note ' part...
Deleteभाऊ 1984 मधे 415 जागा जिंकलेली काँग्रेस 1989 मधे राजीव गांधींच्या नावावर निवडणुक जिंकू शकली नव्हती आणि हाच फरक 1989 आणि 2019 मधे आहे येणारी निवडणूक अध्यक्षीय पध्दतीने होणार आहे मोदींच्या विरोधात समोरच्या आघाडीत सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस असल्याने स्वाभाविक त्या पक्षाचा नेता हा गटबंधनाचा पंतप्रधान पदाचा उमेदवार असणार आहे म्हणूनच आपण म्हणता तसे महागठबन्धन झाले तर मोदी 350 जागांचा पल्ला गाठू शकतात
ReplyDeleteme order kela attach
ReplyDeletePhir ek bar modi sarkar
ReplyDeleteभाऊ आपले मोदीच का पुस्तक मी आवर्जून वाचले होते आणि त्यातली प्रत्येक ओळ तंतोतंत खरी ठरली हा इतिहास आहे. आपल्या या नवीन पुस्तकाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे
ReplyDeleteभाऊराव,
ReplyDeleteलोकसभेसाठी मोदींना महाराष्ट्रातनं मतं मिळतील. अगदी भाजप एकटे लढले तरी मिळू शकतील. मात्र मग विधानसभेच्या वेळेस गोची होईल. याउलट जर लोकसभेसाठी सेनेशी युती केली तर मग विधानसभेसाठी सेना अडून बसण्याचा धोका आहे. शहा कसा मार्ग काढतात ते बघायचं.
माझ्या मते मोदी ४००+ मारतात या वेळेस. माझा अंदाज कुठल्याही अभ्यासावर बेतलेला नाही.
आपला नम्र,
-गामा पैलवान
मोदी द्वेषाने नुकसानच होणार.
ReplyDeleteतुमचा अभ्यास व निरीक्षण करुन केलेला अंदाज भाकीत खर ठरो नेहमीप्रमाणे
ReplyDeleteMe pan order kele
ReplyDeleteWe want this to happen. But the people who are hurt in the belly are spreading bad words. Ration shop keepers always tell the poor customer that service is bad because of Modi. Similarly farm produce purchasers also tell farmers that market is down because of Modi.
ReplyDeleteमी दोन्ही पुस्तके आर्डर केली, 2014 चे पुस्तक वचायचे राहून गेले होते
ReplyDeleteभाऊ, 'पुन्हा मोदीच का ? ' या पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल तुमचे अभिनंदन ! तुमचे लेख व वेगवेगळ्या विषयावरील तटस्थ विश्लेषण मनाला भिडते. तुमचे विचार व लेख हे आम्हा वाचकांसाठी बौद्धिक गरजच बनली आहे, असेच मला माझ्यासहित तुमच्या सर्व वाचकांबाबत वाटते. तुमच्या सारखे सडेतोड मांडणी करणारे अनेक राजकीय विश्लेषक या आपल्या देशात असणे सद्यपरिस्थितीत अत्यंत गरजेचे झालेले आहे. भाऊ, खरेच त्या दृष्टीने तुम्हाला अधिक काही प्रयत्न करता येत असतील तर ती फार मोठी देशसेवा असेल. तुमची दोन्ही पुस्तके मागणी केली आहेत. या पुस्तकाच्या निमित्ताने तुमचे पुनश्च एकदा अभिनंदन. तुमच्या हातून अशीच अनेक पुस्तके व लेख लिहिले जावेत व तुमच्यासारखेच सडेतोड लेखन करणारे राजकीय विश्लेषक तुमच्याकडून तयार होवोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना ...
ReplyDeleteभाऊ ४१५ जागा जिंकताना राजीव गांधी यांच्याबद्दलची सहानुभूती,शीख अतिरेक्यांनी भारतभर घातलेला हैदोस कारणीभूत होतं... परंतु त्याला कामाने तोरण लावायची वेळ आली तेव्हा मात्र 'शाहबानो'प्रकरणात राजीवजींनी माती खाल्ली....
ReplyDeleteमोदिसुद्धा तीच चूक करत आहेत...त्यामुळे त्यांना परत पंतप्रधान होणे अशक्य आहे.
Sir, we are unable to order the book online through morayaprakashan.com.
ReplyDeleteTried all the options of payment. But it is failing.
please check
Chinar Joshi
7350948300
Ordered
ReplyDeleteआणि असं नाही झालं तर ?
ReplyDeletePhir ek bar modi sarkar
ReplyDeleteमोदी- निवडून येतील अशी आशा तर आहेच, परंतु कॉंग्रेसने घाणेरडे राजकारण खेळुन या शेतकरीवर्गाला नेहमीप्रमाणे फसवले, व शेतकरीवर्ग याला बळी पडला तर? याची भितीही वाटते, आपले बोल ( लिखाण) सत्यांत उतरो.
ReplyDeleteअगदी खरच आहे आपले बोलणे पण जरा जपून कारण आपणच येणार यामुळे कार्यकर्ता स्वस्थ बसून राहील आणि थोड्याफार फरकाने ७०-८० जागा गमवाव्या लागतील मध्यप्रदेशातील संघाचे पदाधिकारी व स्वयंसेवक नाराज होते याची दखल घेतली गेली नाही आणि आताही बीएमएस सरकारच्या धोरणास मगु गिळून चूप आहे उज्वला योजना बऱ्यापैकी असफल आहे सरकारला अजून कोण आपला कोण काँग्रेसचा अधिकारी आहेत आतशे काळत आहे अधिकारी आयएएस खोटे रिपोर्ट पाठवत आहेत. आणि कार्यकर्ते गाफील आहे जनता संभ्रमित आहे हे सर्व सावरले नाही तर घात होवू शकतो
Delete