Thursday, January 31, 2019

शेफ़ारलेले कारटे

 rahul winking के लिए इमेज परिणाम

साडेसहा वर्षापुर्वीची गोष्ट आहे. नेमका दिवस सांगायचा तर २७ ऑगस्ट २०१३ ची रात्र होती. लोकसभेत अन्नसुरक्षा कायद्याची चर्चा लांबलेली होती. तिथे आपल्या भाषणातून युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी या कायद्याला सर्वांनी पाठींबा द्यावा, म्हणून आग्रही आवाहन केलेले होते. नरम प्रकृती असलेल्या सोनियांना त्या लांबलेल्या बैठकीचा इतका शिणवटा आलेला होता, की अकस्मात त्यांची तब्येत सभागृहातच खालावली. धावपळ करून त्यांना एम्स या मोठ्या इस्पितळात उपचारासाठी तात्काळ हलवावे लागलेले होते. इतक्या गंभीर अवस्थेतही त्यांना चालत संसद भवनातून बाहेर यावे लागले आणि कुठलीही वैद्यकीय व्यवस्था त्या परिसरात सज्ज नव्हती. सगळ्यांचीच तारांबळ उडाली. या विषयात प्रतिक्रीया देताना गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींनी तेव्हा सोनियांना लौकरच आराम पडण्याची इच्छा व्यक्त केली आणि संसद भवनातील अपुर्‍या वैद्यकीय सज्जतेवर बोट ठेवलेले होते. आज इतक्या वर्षांनी त्याचे स्मरण इतक्यासाठी झाले, की कुणाही मित्रशत्रूच्या आजाराविषयी किती संवेदनशील असावे, त्याचा तो दाखला आहे आणि त्याच सोनियांच्या सुपुत्राला त्याचे किंचीतही भान नसल्याचा प्रकार समोर आला आहे. गेले वर्षभर तरी मनोहर पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री मृत्यूशी झुंज देत आपले काम करीत आहेत. वैद्यकीय सहाय्य घेऊनच त्यांना एक एक दिवस कंठावा लागतो आहे. अशावेळी त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला गेलेल्या कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी नंतर व्यक्त केलेली प्रतिक्रीया, नुसती संतापजनकच नाही तर अतयंत अमानुष आहे. पण त्यासाठी त्यांना दोष देता येणार नाही. शेफ़ारलेल्या पोराचा कधीच दोष नसतो. त्याच्या खुळचट वेडाचाराचे कौतुक करणारे जाणते व वडीलधारेच खरे गुन्हेगार असतात. पर्रीकरांच्या भेटीनंतरची राहुलची मुक्ताफ़ळे म्हणूनच भारतीय माध्यमांच्या दिवाळखोरीचा दाखला आहे.

गेले कित्येक महिने पर्रीकर असाध्य आजाराचे शिकार होऊन साक्षात मृत्यूशी झुंजत आहेत आणि ती बाब जगाला माहिती आहे. अनेकदा इस्पितळात राहून आणि कधी वैद्यकीय सुविधा वापरून पर्रीकर राजकीय कर्तव्य पार पाडत आहेत. अवघा गोवा त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करीत असतो. गोव्यात गेलेले कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सदिच्छा म्हणून पर्रीकरांना भेटायला गेले. आधी कुठलीही भेट ठरलेली नसताना पर्रीकरांनी राहुलला परवानगी दिली. अवघी पाच मिनीटे ती भेट झाल्यानंतर तिचा राजकीय हेतू साधण्यासाठी गैरवापर करणे लज्जास्पदच नाही, तर अमानुष आहे. कारण त्या भेटीनंतर राहुलनी जे निवेदन केले, ते पर्रीकरांना अधिक कष्टप्रद व त्रासदायक ठरलेले आहे. कुठल्याही आजारी माणसाला भेटायला जाण्यातल्या सदिच्छा त्याला आराम मिळावा किंवा मानसिक शांतता मिळावी; यासाठी असतात. पण राहुल गांधी यांनी पर्रिकरांना तोंडी बोलताना सदिच्छा दिल्या आणि बाहेर पडल्यावर असे काही कृत्य केले, की आपल्या प्रकृतीला पडणारा ताण बाजूला ठेवून पर्रीकर यांना प्रदिर्घ खुलासा करण्याचे कष्ट घ्यावे लागले. राहुल गांधी धडधडीत खोटे बोलत आहेत आणि त्यांच्याशी झालेल्या पाच मिनीटच्या भेटीत राफ़ायल विषयी क्टुठलीही चर्चा झालेली नव्हती, असे पत्र लिहून पर्रीकरांना याही अवस्थेत स्पष्ट करावे लागले. ह्याला बेशरमपणाची परमावधी म्हणावे लागेल. कारण असा खुलासा करणारे पर्रीकर हे पहिलेच व्यक्ती वा राजकीय नेते नाहीत. यापुर्वी फ़्रान्सचे आजी माजी राष्ट्राध्यक्षही राहुलच्या अशाच खोटेपणाविषयी खुलासे करून मोकळे झालेले आहेत. किंबहूना राहुलशी कोणी भेटणे बोलणे आता घातक झालेले आहे. बाहेर जाऊन हा इसम वाटेल ते आरोप वा गवगवा करू शकतो, इतकाच त्याचा अर्थ झाला आहे. पण त्याचे खापर माध्यमातील दिवाळखोरांवर फ़ोडावे लागेल. कारण त्यांच्या प्रसिद्धीमुळे राहुल नावाचे हे पन्नाशीतले पोर कमालीचे शेफ़ारलेले आहे.

आपल्या आसपास वा घरातच एखादे लाडावलेले पोर असते अणि कायम उचापती करीत असते, त्यापेक्षा पन्नाशी गाठलेल्या राहुल गांधींची आजकालची स्थिती किंचीतही वेगळी नाही. मनात येईल ते बरळावे किंवा कुठलीही सभ्यता झुगारून मनमानी करावी; हा त्यांचा स्वभाव बनून गेला आहे. गेल्या पावसाळी अधिवेशना्त अविश्वास प्रस्तावाच्या वेळी त्यांनी लोकसभेत भाषण झाल्यावर उठून जबरदस्तीने पंतप्रधानांशी गळाभेट करण्याचे नाटक केलेले होते. तेव्हा सभापती सुमित्रा महाजन यांच्यावर या कॉग्रेस अध्यक्षाला समज देण्याची वेळ आलेली होती. एका शतायुषी पक्षाचा अध्यक्ष वा नेहरू खानदानातील कुणाही सदस्याला सभापतींचे असे खडेबोल यापुर्वी कधी ऐकायची नामुष्की आलेली नव्हती. इथेच हा पोरकटपणा संपत नाही. ती गळाभेट उरकल्यावर आपल्या जागी परतलेल्या राहुलनी खोडकर मुलाने आपल्या सवंगड्यांना डोळा मारून इशारे करावेत, तसाही बालीशपणा केला होता आणि तो कॅमेराने टिपलेला होता. हा विषय देशातल्या जुन्या राजघराण्यातील लाडावलेल्या मुलाच्या कौतुकाचा नव्हता; तर लोकसभा व संसदीय सभ्यतेचा मामला आहे. याचेही भान माध्यमातील अतिशहाण्यांना राहिले नाही. कोणी पुढाकार घेऊन राहुलचे कान उपटले नाहीत, की संपादकीय टिप्पणी करून कॉग्रेस पक्षाला त्याचा जाबही विचारला नाही. असे झाल्यावर हे पन्नाशीतले अल्लड बालक अधिकच शेफ़ारत गेल्यास आश्चर्य कुठले ना? घरातले लाडावलेले पोर कौतुकाचे असते आणि त्याच्या उचापतींचा कितीही त्रास होत असला, तरी गुणगानच होत असते. पण त्याही घरात जेव्हा उचापतींचा अतिरेक होतो, तेव्हा पाठीत धपाटे घातले जातात. सार्वजनिक जीवनात माध्यमातील पत्रकार संपादकांची तीच जबाबदारी असते. ती किती पाळली जाते? नसेल तर त्या शेफ़ारलेल्या पोराला आपल्या उचापती म्हणजे कर्तृत्व वाटू लागल्यास नवल नाही. राहुल गांधींची तीच अवस्था झालेली आहे.

मागल्या वर्षभरात ह्या शेफ़रलेल्या कॉग्रेस अध्यक्षाने त्या शतायुषी राजकीय पक्षाची सगळी प्रतिष्ठा व अब्रु धुळीस मिळवली आहे. पण मोदीद्वेषाने भारावलेल्या काही संपादक विश्लेषकांना आपली जबाबदारी पार पाडता आलेली नाही. बेछूट खोटे बोलणे वा बिनबुडाचे आरोप करण्याला आक्रमक राजकारणाची बिरुदावली लावून राहुलच्या बालीश उचापतींचे उदात्तीकरण झाले आहे. परिणामी हे पन्नाशीतले उचापतखोर कारटे, अधिकाधिक वाह्यातपणा करू लागलेले आहे. अर्थात अशा उचापती घरातल्या घरी होतात तिथपर्यंत सर्वकाही ठिक असते. पण जेव्हा त्याचे सार्वजनिक प्रताप लोकांच्या वाट्याला येतात, तेव्हा समाजाला त्याचा बंदोबस्त करावा लागत असतो. लौकरच लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे, तेव्हा भारतीय मतदाराला अशा बुद्धीमंतांचा व माध्यमांच्या लाडक्याला धडा शिकवणे म्हणूनच भाग ठरणार आहे. पर्रीकरांच्या बाबतीत ह्या कारट्याने केलेला प्रकार अमानुष व सर्व सभ्यता गुंडाळून ठेवणारा आहे. पण भाजपाच्या कुणा नगण्य खासदाराच्या वक्तव्यावरून गदारोळ करणार्‍यांना पर्रीकर प्रकरणी राहुलचा कान धरावा वाटलेले नाही. पर्यायाने ती जबाबदारी जनतेलाच उचलावी लागणार आहे. मात्र तो एकट्या राहुलचा पराभव नसेल, तर एकूणच भारतीय माध्यमे आणि पुरोगामी विचारवंत जाणकारांना मतदाराने फ़टकारलेले असेल. रुग्णाला भेटून येणार्‍याने अशा रितीने त्याला मनस्ताप देणे किंवा त्याच्या नावाने खोटी विधाने करण्याला आक्रमक राजकारण मानायचे असेल, तर विचारांच्या दिवाळखोरीची प्रक्रिया पुर्ण झाली म्हणायची. विविध वाहिन्यांवर बुद्धीमंत म्हणून हजेरी लावणार्‍यांनी केलेला राहुलचा बचाव केविलवाणाच नाही, तर त्यांच्या पागलपणाचा नमूना आहे. ज्यांनी बचाव केला नसेल, पण कान उपटण्याचे कर्तव्य पार पाडले नाही, त्यांचीही यातून सुटका नाही. कारण त्यांनीच हे कारटे शेफ़ारून ठेवलेले आहे.

49 comments:

  1. भाऊ आज मस्त धोपटलत सगळ्या अति शहाण्याना. 👊🏿👊🏿👊🏿

    ReplyDelete
    Replies
    1. चवथा स्तंभ पोकळच आहे आजतरी

      Delete
    2. जबरदस्त लेख एदम परखड,कुणाचीही भीडभाड न ठेवता केलेले लिखाण. भाऊ आचार्य अत्रे यांची आठवण आली. आज ते असतेतर असेंच सडेतोड लिहिले असते.आपण हाडाचे पत्रकार आहात
      धन्यवाद

      Delete
  2. अतिशय सात्विक संताप लेखात स्पष्ट जाणवतो 😡

    ReplyDelete
  3. भाऊ तुम्ही म्हणता तसे एकाला ही ही गोष्ट खटकली नाही कमाल आहे

    ReplyDelete
  4. सर्व पत्रकारांना त्याचेच सरकार हवे आहे जेणेकरून त्यांचा फायदा होईल

    ReplyDelete
  5. Indian Electronic and Print media both are a failure to pinpoint INC Chief current & previous one both for their mistakes.

    ReplyDelete
  6. अश्या मस्तवाल शेफारलेल्या कारट्याचे कान उपटून त्याला त्याचे घरीच जेरबंद करण्याचे काम आता मतदारांनाच पार पाडावे लागेल असे दिसतंय !

    ReplyDelete
  7. मूर्खाला काय समजवायचं.याचा जनतेवर कीती फरक पडतो ते महत्वाचे.
    जय हिंद जय मोदी.

    ReplyDelete
  8. Faltu mansawar unnecessary lekh

    Bhau its seems you made yourself limited to such non sense only.

    ReplyDelete
  9. त्याच्यावर केस का नाही करत कोणी? अरविंद केजरीवाल यांच्यावर जेव्हा अनेक जणांनी केस घातल्या तेव्हा त्यांनी बेछूट आरोप करणे बँड केले आणि नंतर अनेक माफी नामे त्यांना सादर करावे लागले...

    ReplyDelete
  10. मुले वाया गेली / गेला म्हणजे काय याचे मुर्तिमंत उदाहरण
    आहे.भरकटलेली बुद्धिमान पिढी चे प्रतिनिधी

    ReplyDelete
  11. भाऊ, काँग्रेसला (राहुल) सत्ता देणे म्हणजे माकडाच्या हाती राजपद देण्यासारखे आहे .

    ReplyDelete
    Replies
    1. राजपद नव्हे तर काकडा देणे आहे. त्यामुळे देशाचे अतोनात नुकसान होईल.

      Delete
  12. आश्चर्य वाटेल पण चक्क राजदीप सरदेसाई ने "ह्ये वागनं बरं नव्हं" चा सूर लावला आहे.

    ReplyDelete
  13. खरय भाउ फार संतापजनकच आहे पण अगदी भाजपची म्हनवली जाणारी चॅनल पण चुप आहेत.आजपण पत्रकार परीषदेत बजेटवर प्रतिक्रिया विचारली तर तेच राफेलच टुमण वाजवल कोणताही प्रश्न विचारा उत्तर तेच असत.

    ReplyDelete
  14. १२५ कोटी लोकसंख्येच्या या लोकशाही देशाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न हा अर्धवट गृहस्थ करू पाहतोय आणि या अर्धवटाला नाचविण्यासाठी त्याच्या पक्षातले मदारी टपून बसले आहेत.आजूबाजूचे शत्रू असा नेता येण्याची वाटच पाहत आहेत.त्यांना याला इथल्या हस्तका मार्फत ते सोपे जाणार आहे.

    ReplyDelete
  15. भाऊराव,

    पप्पूचा बाप राजीव गांधी सुद्धा अशीच घमेंडखोर वक्तव्यं करायचा. शेवटी १९९१ साली तो मेल्याच्या सहानुभूतीपायी काँग्रेस सत्तेत आली. असाच प्रकार पप्पूच्या बाबतीत संभवतो का? मोदींना पप्पूचं रक्षण करायलाच पाहिजे.

    माझ्या मते एखादा बनावट हिंदुत्ववादी सोनियांना ठार मारेल आणि त्यांच्या हत्येची सहानुभूती पप्पूस मिळून जाईल. जशी मोहनदास गांधीहत्येची पावती ब्राह्मणांवर फाडली गेली तसंच काहीतरी घडेल.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  16. bhau, asha mastwal kartyache murh bol ya preshyasathi amruttuly astat . ata wel ali ahe yanna tyanci jaga dakhwaychi.kiti lalghotepana ahe ha? ya saglyanna modi sarkarne ugach mokat sodley. yanchyawar kathor karwaichi garaj ahe.matswatantryacha evdha durupyog poorvi pahyla milala nahi. kashala modi shaha yanna swatantry detat kunas thauk.

    ReplyDelete
  17. भाऊ या पोराचा बंदोबस्त 2019 च्या निवडणुकीत जनताच करणार ही काळ्या दगडावरची रेघ...कारण एवढी असंस्कृत नीच कृती आपल्या संस्कृतीत बसतच नाही...

    ReplyDelete
  18. भाऊ या माणसासोबत जो कोणी जातो तो खड्ड्यात जातो 2014 मध्ये याला उपाध्यक्ष केले आणि काँग्रेस 50 जागांच्या खाली गेली,2017 मधे उत्तर प्रदेशात अखिलेश यादवने याला सोबत घेतले आणि भाजपला 325 जागा मिळून अभूतपूर्व असे यश मिळाले आणि अखिलेश अक्षरशः गाळात गेला, फार मागचे कशाला हरियाणात मागच्या आठवड्यात जिंद या विधानसभा मतदारसंघात राहुलचा प्रवक्ता रणदीप सुरजेवाला उभा होता तिथे भाजपचा विजय झाला आणि हा सुरजेवाला तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे,आजच अमित शहा यांनी अबकी बार 400 पार अशी घोषणा दिली आहे, आता समोर राहुल गांधी असेल तर हेही अशक्य नाही असे आजचे चित्र आहे

    ReplyDelete
  19. श्री भाऊ अतिशय योग्य आणि समर्पक लेख, तुमच्या शिवाय कोणीही ह्या विषयावर लिहिलं किंवा बोललं नाही, आणि बोलणार तरी कसं, एकदा स्वतःला पुरोगामी म्हणून घेतलं की विरोधात बोलणार कसं

    ReplyDelete
  20. श्री भाऊ अतिशय योग्य आणि समर्पक लेख, तुमच्या शिवाय कोणीही ह्या विषयावर लिहिलं किंवा बोललं नाही, आणि बोलणार तरी कसं, एकदा स्वतःला पुरोगामी म्हणून घेतलं की विरोधात बोलणार कसं

    ReplyDelete
  21. Kharach itke khote ani bin budache arop karunhi sagle shantpane baghatat - he tyala indirect protsahanch zale na!

    ReplyDelete
  22. मतदारांनीच जागरुकतेने आपले कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडून उत्तर द्यावे.

    ReplyDelete
  23. भाऊ, अगदी सहज सोपं सांगितले आहे. समज हि केवळ वाढत्या वयात येते हे विधान तंतोतंत चुक ठरवतो हा युवा नेता.

    ReplyDelete
  24. ५० वर्षांचे ' नादान बालक ' आहे हे. ......................आई आणि वडिलांनी वेळीच ' थोबडवले ' नाही म्हणून हे अति शेफ़ारलेले आहे.

    ReplyDelete
  25. मुर्खाला मूर्खपणा करू देऊन आपला कार्यभाग साधून घेण्याची जबरदस्त चलाखी व हातोटी मोदींकडे आहे.

    ReplyDelete
  26. डावे पत्रकार असे वागतात जणू काय खरंच सोनिया KGB एजंट असाव्यात, कुणी सांगावं ��

    ReplyDelete
  27. भाऊ खरे तर ही आनंदाची बाब आहे की दुर्दैव आहे माहिती नाही परंतु संपूर्ण भारतवर्षांमध्ये राहुल गांधी आणि त्याच्या चेल्याचपेट्यांची इतक्या प्रखर शब्दांमध्ये कानउघडणी करणारे तुम्ही एकमेव पत्रकार उरलेले आहात

    ReplyDelete
  28. आताची कॉंग्रेस १०० वर्ष जुना पक्ष नाही आहे. ही इंदिरा कॉंग्रेस आहे.

    ReplyDelete
  29. पपू तुला कळणार कसे ते,
    बाणांवरचे प्रबुद्ध भीष्म!
    एसीमध्ये कसे कळावे,
    कसा जाळतो भयाण ग्रीष्म!

    पर्रिकराना सूर्य मानता,
    काजवाही तू नाही शोभत!
    सत्याला फसवून अवेळी,
    न्याय कधिही नाही लाभत!

    मोगऱ्याकडे जाऊन सुद्धा,
    निवडुंगाची उरी मशागत!
    सरोवराच्या काठी बसुनी,
    निखाऱ्याकडे पाणी मागत!

    भिष्म कळाया हवा पराक्रम,
    किंवा व्हावे विनम्र अर्जुन!
    तुझ्या शकुनीच्या वृत्तीला तर,
    फक्त सखा वाटे दुर्योधन!

    तेल संपल्या समईवरती,
    घातलीस तू उगाच फुंकर!
    तुझ्यासाठी ना सांब कधिही,
    तिसरा डोळा उघडील शंकर!

    निवडलास तू अयोग्य खांदा,
    ठेवायाला सडकी बंदुक!
    चाप तुझ्या हाती नव्हता नी,
    तूच शक्यता केल्या अंधुक!

    जामिनावरी सुटलेल्यानी,
    माजू नये इतके टोकाचे!
    ओढतोस तू रोज नव्याने,
    स्वतःकडे प्राक्तन शोकाचे!

    गडकरी किंवा पर्रिकरांच्या,
    नादी नको तू उगाच लागूस!
    जरा शहाणा वाटताच तू,
    मतिमंदापरी डोळा मारूस!

    तीन राज्य योगायोगाने,
    परंतू फसणे नाही देश!
    गजापलिकडे वाट पहातो,
    रेषारेषांचा गणवेश!

    छपन्नाशी भांड कसाही,
    त्याचा नव्हता इतका राग!
    पर्रिकरांशी बनाव घातक,
    शंभर टक्के असे महाग!

    अता स्वतःच्या नजरेतुनही,
    उतरलास तर माफी माग!
    काटे किंवा असो पाकळ्या,
    सोडत नाही कुणास आग!

    लिहील बोटांवरची शाई,
    स्खलन तुझे वा तुझा पराभव!
    चोरून जे जे मिळते त्याला,
    कधी कुणी का म्हणते वैभव?

    कठीण आहे कळणे कविता,
    अशक्य आहे कळणे भाषा!
    नाव मनोहर, भाव मनोहर,
    तुला कळावे, अयोग्य आशा!

    प्रमोद जोशी. देवगड. 9423513604

    ReplyDelete
    Replies
    1. पप्पूला कळणार नाही.मूळात तो या मातीतला नाही की त्याला इटली संस्कृती माहित नाही पण या शेम्बड्याला कोण सांगणार कारण त्याच्या भोवती असणारी दरबारी कधीच त्याला चूक दाखवून देणार नाहीत.

      Delete
  30. Sagalikade yedepana karat he kart.... Baki kay... Fakt gandhi satta congress var thevayachi dhadpad mhnaun to adhyaksh aahe.... 50 varsh zalet... Ajunhi sahebani kuthal kartutva siddha kelay ha prashn janatela hi padu naye.... Hich mothi vyatha

    ReplyDelete
  31. कोळसा उगाळावा तेव्हढा काळाच

    ReplyDelete
  32. या माणसाला ( पप्पूला ) कोणत्याही सुरक्षेचीही काहीच गरज नाही. अतिरेकी कधीच त्याला टार्गेट करणार नाहीत.

    ReplyDelete
  33. राहुल गांधी हे एक शेफ़ारलेलं कार्ट आहे यात बिलकुल शंका नाही. पण याची एक दुसरी बाजूपण आहे. इतके आजारी असताना पर्रीकरांनी दुसऱ्या कोणावर तरी भार आता सोपविला पाहिजे असे वाटते.

    ReplyDelete
  34. या विषयात प्रतिक्रीया देताना गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींनी तेव्हा सोनियांना लौकरच आराम पडण्याची इच्छा व्यक्त केली आणि संसद भवनातील अपुर्‍या वैद्यकीय सज्जतेवर बोट ठेवलेले होते. आज इतक्या वर्षांनी त्याचे स्मरण इतक्यासाठी झाले, की कुणाही मित्रशत्रूच्या आजाराविषयी किती संवेदनशील असावे, त्याचा तो दाखला आहे आणि त्याच सोनियांच्या सुपुत्राला त्याचे किंचीतही भान नसल्याचा प्रकार समोर आला आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. Sonia baddal Modi yanna kiti adar v prem vaatate he aaj kalaale. Kahitarich ha Bhau!

      Delete
  35. सणसणीत मुस्काटात मारलीए भाऊ!

    ReplyDelete
  36. वाईट याचे वाटते की काँग्रेसच्या एकाही नेत्याला त्याच्या हाता खाली काम करायला अपमान कसा वाटत नाही? तो एक मूर्ख असेल पण बुढ्ढे काँग्रेसमधील लोक त्याला बाजूला का सारत नाहीत? असे काय गांधी यांच्या नावाला आता सोने लागले आहे की त्यामु ळे इतके लांगूल चालन करायची गरज अजून त्यांना वाटते?

    ReplyDelete
    Replies
    1. Fully Agree. When grassroot and selfless leader will take over Congress, it will have some hope!

      Delete
  37. जबरदस्त सोलटवली बिनपाण्याने पण निर्लज्ज ते निर्लज्ज

    ReplyDelete
    Replies
    1. अति शहाणा त्याचा बैल रिकामा

      Delete
  38. पागलके बारेमे क्या लिखना?

    ReplyDelete
  39. शेफ़ारलेले निगरगट्ट
    भाऊ हे सर्व बेशरमपणाने ठरवून केलेले होते कारण संदेश तसाच दिला गेला कि पर्रिकरांच्या पत्रानंतर स्पष्टीकरणाला जागा असावी
    अतिशय संतापजनक ते होते

    ReplyDelete