गेल्या वर्षी उत्तरप्रदेश राजस्थानात झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणूका, त्यानंतर कर्नाटक विधानसभेची निवडणूक आणि डिसेंबर महिन्यातील विधानसभेच्या निवडणूका, इथून खरे तर २०१९ च्या लोकसभा निवडणूकांचा मोसम सुरू झालेला होता. त्यात भाजपाला बसलेला दणका आणि त्यातूनच आकाराला येणारी विविध गठबंधने, विरोधी पक्षांच्या आघाड्या किंवा डरकाळ्या, लोकसभेचे वेध लागल्याची लक्षणे होती. तिथून मग २३ मे रोजी लोकसभेचे निकाल लागण्यापर्यंतचा कालखंड, राजकीय विश्लेषक व अभ्यासक पत्रकारांसाठी पर्वणीच होती. प्रत्येकाला या कथानकाचा शेवट कसा असेल, ते सांगण्याच्या उतावळेपणाने ग्रासलेले होते. पण कथानक कुठे व कसे उलगडत चालले होते, ते समजून घेण्य़ाचीही कोणाला गरज वाटत नव्हती. प्रत्येकाला आपल्या पद्धतीने आवडता शेवट करायचा होता आणि म्हणूनच राजकीय पक्षांपासून विविध माध्यमे व अभ्यासकांपर्यंत सर्वांचीच अपेक्षित निकालासाठी जणु शर्यत लागलेली होती. त्यापासून अलिप्त राहून लोकसभा निवडणूकीकडे बघणारा एकच माणूस असावा. कदाचित दोघे असावेत. त्यापैकी एकाचे नाव नरेंद्र मोदी होते आणि असलाच तर दुसर्याचे नाव अमित शहा असावे. म्हणूनच उलगडत चाललेल्या या राजकीय कथेचे सुत्र पकडण्यासाठी मीही खुप प्रयत्न करीत होतो. निकाल लागले, तेव्हाही मला त्याची संगतवार मांडणी करताना अनेक शंका प्रश्न होते. पण मोजक्या शब्दात या घटना व कथानकाचे वर्णन कसे करावे? २३ मे २०१९ च्या रात्री सगळे निकाल स्पष्ट झाले आणि समोरचे राजकरण दुर होऊन मला एकदम एका खुप जुन्या गाजलेल्या हॉलिवुड चित्रपटाचे स्मरण झाले. १९६० च्या दशकातला तो चित्रपट होता. ओमर शेरीफ़ व ग्रेगरी पेक यांचा ‘मकेनाज गोल्ड’! २०१९ ची लोकसभा निवडणूकीची मोहिम आणि मकेनाज गोल्ड हे जवळपास तितकेच उत्कंठावर्धक व गुंतागुंतीचे कथानक नाही काय?
अमेरिकन वेस्ट म्हणजे पश्चीमेकडली अमेरिका हळुहळू आजच्या अमेरिकेत सहभागी झाली. तो भूभाग नव्या संघराज्याशी जोडून घेताना मोठा रक्तपात व लढाया झाल्या. तिथल्या मुळच्या रहिवाशांना नवागत गोर्यांनी दिलेली वागणूक, किंवा त्यांच्या पुरातन आख्यायिका, हा एक मोठा उत्कंठा निर्माण करणारा इतिहास व कथांचा खजिना आहे. अशाच एका आख्यायिकेवर आधारलेली ह्या चित्रपटाची कथा आहे. अपाची इंडियन वंशाच्या कुणा वृद्धाने बघितलेले व शुद्ध सोन्याची खाण असलेले खोरे व त्या सोन्याचा हव्यास धरून तिच्या शोधात मोकाट झालेल्या टोळ्या; असे हे कथानक आहे. त्या सोन्याच्या खोर्याचा पत्ता नेमका ठाऊक असलेल्या मुलनिवासी म्हातार्याचा शोध घेत ओमर शेरीफ़ उजाड वाळवंटातून फ़िरत असतो आणि त्याला तिथे त्याच म्हातार्याची कबर खोदताना ग्रेगरी पेक सापडतो. त्याने म्हातार्याकडे असलेला नकाशा जाळून टाकलेला असतो. पण पेकने तो स्मरणात पक्का नोंदविलेला असणार, म्हणून शेरीफ़ त्याला ओलिस ठेवतो. तिथून ही सोन्याच्या शोधाची शर्यत सुरू होते. अशा अनेक टोळ्या असतात आणि त्यांना आपल्यात कोणी ब भागिदारही नको असतो. त्यातून त्यांच्यात हाणामार्या चालतात आणि एकमेकांना ठार मारण्यापेक्षा इतरांना भागिदारी देण्याच्या बोलीवर ते एकत्र येत संख्या वाढत चाललेली असते. त्या जागेचा नेमका पत्ता असलेल्या ग्रेगरी पेकला मात्र ही सर्व अंधश्रद्धा वाटत असते. पण ओलिस म्हणून तो त्यात ओढला गेलेला असतो. अखेरीस एकेदिवशी हा जमाव त्या खोर्यापाशी पोहोचतो आणि त्या डोंगर कपारीतून आत शिरताच खाली खोर्यातले सोन्याचे दगड बघून प्रत्येकाची बुद्धी फ़िरते. आपल्याखेरीज दुसर्याला ते सोने मिळू नये, म्हणून रक्तपात सुरू होतो. त्यानंतर भूकंप उदभवतो आणि त्यातून कसेबसे पेक, त्याची प्रेयसी व शेरौफ़ जिवानिशी सुखरूप बाहेर येतात. सोने मात्र त्या भूकंपात भूगर्भात गाडले जाते.
या चित्रपटाचा शेवट होतो, तेव्हा ग्रेगरी पेकला इशारा देऊन शेरीफ़ निघून जातो आणि पेक व त्याची प्रेयसी उरलेला घोडा घेऊन आपल्या मार्गाने जायला मोकळे होतात. पण योगायोग असा, की इतक्या रक्तपात, लढाया करून हाती लागलेले सोने त्याच घोड्याच्या पखालीत भरलेले असते. तो घोडा पेकच्या वाट्याला येतो. ज्याला त्या सोन्याचा काडीमात्र मोह नसतो, त्यालाच सोने मिळून जाते. बाकी हव्यास करणारे एक तर मरले जातात, किंवा शेरीफ़सारखे रिकाम्या हातानी निघून जातात. त्यातला घटनाक्रम आणि नुकत्याच संपलेल्या २०१९ च्या लोकसभेसाठी मागले वर्षभर चाललेला राजकीय संघर्ष; यातले साम्य थक्क करून सोडणारे आहे. ज्यांनी तो चित्रपट बघितलेला असेल, त्यांना त्यातले साधर्म्य व आशय लगेच लक्षात येऊ शकतो. या लोकसभा निवडणूकीत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा पुन्हा प्रचंड बहूमत मिळवणार असे भाकित मी वर्षभर आधीच केलेले होते. त्यावर पुस्तकही लिहीलेले होते. पण वर्षभरातला घटनाक्रम मलाही चकीत करून सोडणारा होता. त्यात उडी घेतलेल्या प्रत्येक पक्षाला वा नेत्याला सत्ता व सत्तापदाचा झालेला मोह नेमका त्या चित्रपटासारखा. सोन्याचा हव्यास धरून आपल्यातच हेवेदावे, कटकारस्थाने व दगाफ़टका करणार्या पात्रांसारखाच होता. त्यात तसूभर फ़रक करता येत नाही. पण नरेंद्र मोदी मात्र त्यापासून कटाक्षाने दुर होते आणि सत्ता जाईल किंवा राहिल, अशा कसल्याही शंकेपासून दुर असलेला तोच एकमेव नेता होता, अगदी ग्रेगरी पेकसारखा. सत्ता किंवा अधिकारपद क्षणभंगूर असल्याप्रमाणे निरीच्छ भावनेने लोकशाहीच्या त्या उत्सवाकडे बघणारा दुसरा कोणी नेता दिसला आहे काय? त्यांच्या विरोधातले नेते वा पक्ष, किंवा त्यांचे डावपेच कारस्थाने अगदी त्या चित्रपटातल्या सोनेवेड्यांपेक्षा वेगळी नव्हती. त्यांचे भवितव्यही त्या कथानकापेक्षा वेगळे घडताना दिसले नाही. सोन्याकडे वा सत्तेकडे बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा असतो. इतकाच त्यातला आशय आहे.
या कथेत सोन्याचे खोरे कुठे ते फ़क्त ग्रेगरी पेकला ठाऊक असते आणि त्याला त्याचा मोह नसतो. पण ज्यांना त्याचा थांगपत्ता नसतो, ते आपापल्या हव्यास मोहामागे बेभान दौडत सुटलेले असतात. त्यांना वास्तवाचे भान नसते, की आपल्या भवितव्याचीही फ़िकीर नसते. जणू त्या सोन्यापलिकडे आणखी आयुष्यात काही उरलेले नाही, इतक्या टोकाला जाऊन ते धावत सुटलेले असतात. मागले वर्षभर बहुतांश विरोधी पक्ष व त्यांचे नेतेही तशाच नशेत गुंग होऊन धावत सुटलेले होते. एकमेकांशी सहकार्य करण्याचा देखावा उभा करतानाच त्यातला प्रत्येकजण दुसर्याला खड्ड्यात घालायला, संपवायला मनातल्या मनात वेगळा डाव खेळत होता. उलट त्यापासून अलिप्त राहून फ़क्त आपल्या सुरक्षित निसटण्याचा विचार मोदी व ग्रेगरी पेक करतात ना? आताही निकाल लागल्यनंतर अखिलेश, मायावती, आंबेडकर, ओवायसी वा कॉग्रेसमधले विविध गटतट वा मित्रपक्ष म्हणून काही महिने गळ्यात गळे घालणारे एकमेकांचा उरावर बसलेले नाहीत काय? कुठल्याही राजकारणाची गुंतागुंत उलगडून दाखवताना राजकीय परिभाषेत खुप अडचणी येतात. कारण राजकीय परिभाषा व्याख्यांमध्ये रुतून बसलेली असते. कथानक वा रुपके त्याच्यावर मात करून जातात, ती कथा समजली, की कुठल्याही मोठया राजकीय घटनाक्रमाचे विश्लेषण एकदम सोपे होऊन जाते. वर्षभर लोकसभेच्या निवडणूकीसाठी कुठला पक्ष वा कोण नेता कसा वागला वा चुकला; त्याचे आलेख मांडण्यापेक्षा शांत चित्ताने ‘मकेनाज गोल्ड’ सिनेमा बघावा. त्यात २०१९ च्या लोकसभा निवडणूकीची पात्रे शोधावित, आपोआप २०१९ लोकसभेचे निकाल आपल्याला उमजू लागतात. त्यात प्रत्येक पक्षाचे वा नेत्याच्या वागण्याचे आशय समजू लागतात. ठाशीव राजकीय भाषा व यातले ठोकताळे बाजूला ठेवून चित्रपट व लोकसभा २०१९ यांची तुलना करत जावी. वेगळ्या कुठल्या विश्लेषणाची गरज उरणार नाही.
मस्त भाउ.खरच मोदीच अलिप्त होते सर्वातुन त्यांच्या देहबोलीवरुन ते दिसतच होत.उदा.शपथ घेताना तर इतके सहज होते कपडेपण साधेच होते.याउलट चंद्राबाबु आदल्या दिवशीपर्यंत किती नाचत होते.
ReplyDeleteवा भाऊ, साधं सोपं सरळ आणि थेट ही.
ReplyDeleteवा काय समर्पक विश्लेषण ! अर्थात ज्यांनी हा चित्रपट बघितला असेल त्यांना हा उलगडा पटकन होईल.असो. पण भाऊ आपण कुठुन कुठुन हे संदर्भ वेचून आणता, त्याबद्दल आपणास त्रिवार वंदन.
ReplyDeleteअतिशय सुंदर आणि समर्पक. ..
ReplyDeleteएकदम पर्फेक्ट विश्लेषण, भाऊ.
ReplyDeleteसुंदर वर्णन
ReplyDeleteबहुतेक मोदींनीही तो चित्रपट पाहिला असावा
ReplyDeleteBhau,
ReplyDeleteAs per your opinion, who is today's Omer Sharrif?
उमर झालेला जाणता राजा...!
Deleteसटिक तुलना भाऊ...
ReplyDeleteआता आपल्या विघानसभेच्या निवडणूक बद्दल लिहा
ReplyDeleteएक no
ReplyDelete😂😂 झक्कास उदाहरण
ReplyDeleteवा, क्या बात है... बहोत खुबसुरत
ReplyDeleteतसं म्हणलं तर निवडणुका व पिक्चर दोन्ही आज कळाले. तुमची दोनही पुस्तके चपराक कडून मिळाली
वा , अतिशय समर्पक विश्लेषण । मकेनाज गोल्ड आणि ह्या वेळची निवडणूक यांची तुम्ही घातलेली सांगड अप्रतिम । मजा आली ।।
ReplyDeleteआदरणीय भाऊ
ReplyDeleteअप्रतिम.....
खरंच दोन्हीत समानता आहे.
तुमचे 23 मे नंतरचे सगळेच लेख अप्रतिम आहेत, संग्रहित करण्या करिता. Very informative.
पण ह्या सगळ्या धामधुमीत तुम्ही एका " मित्राला " विसरलात.
मी. कु. केxxx.... ज्यांनी एक गूढ theory मांडली होती, ती म्हणजे मोदी पंतप्रधान होणं हा एक आंतरराष्ट्रीय व्यापक कट होता..... वगैरे वगैरे......
मोदी हरातील पण सत्ता सोडणार नाहीत...... blah blah........
कु. के. सद्या गायब झालेत, बहुतेक केदारनाथ ला गेले असावेत. पंतप्रधान गेले होते त्या गुफेमधे..... आणि परत आल्यावर नवीन theory मांडतील बहुतेक की CONgress पक्ष हरणं हे सुद्धा त्या व्यापक कटाचाच भाग आहे व RaGa हरून देखील कसे जिंकले, he विस्तृत पणे मांडतील बहुदा ������
पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी बऱ्याच जणांना कामाला लावलाय..... विश्लेषण करण्यासाठी ����
असो, मनापासून नमस्कार आणि आभार..... 2019 च्या निवडणुकांचे भाकीत अचूक केल्याबद्दल
����������
छान विश्लेषण
ReplyDeleteभाऊ कोठून एवढे संदर्भ आणता,, ग्रेट विश्लेषण
ReplyDeleteमोदींनी " सबका साथ ... सबका विकास "ला आता " सबका विश्वास " जोड़ले आहे मोदींनी ईदच्या दिवशी मुस्लिम विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहिरही केली. सवर्ण हिंदूंनी भाजपाला मते दिली नाहीत का ? हे तुष्टीकरण नाही का ?
ReplyDeleteजबरदस्त तुलना . खूपच भारी
ReplyDeleteअचूक वर्णन
ReplyDeleteभाऊ तुमचे विश्लेषण खूप समर्पक आणि तार्किक आहे. कॉग्रेसचा ऱ्हास होणे हे देशाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे कारण त्यामुळे पोलिटिकल स्पेस तयार होऊन तिथे काही पक्ष, विचारांना संधी मिळेल. कालबाह्य विचारसरणी आणो राजकीय कार्यक्रम नसलेल्या काँग्रेसपेक्षा नवीन विचार घेऊन पुढे येणारे छोटे पक्षही अधिक फलदायी ठरू शकतात. जात आणि अस्मिता ह्यांच्या जोरावर यापुढील राजकारण चालू शकत नाही हे अखिलेश, मायावतो पासून संभाजी ब्रिगेडचे झालेल्या पानिपताने दाखवून दिले आहे. येणाऱ्या काळात राष्ट्रवाद जोपासून विकासाचे राजकारण करणारेच टिकतील. खोट्या धर्मनिरपेक्षतेची चलती बंद होईल. डावा विचारही मोडीत निघाला आहे. येणाऱ्या दशकात भारतीय होच आपली ओळख व्हावी आणि त्यासाठी जो पक्ष प्रयत्न करेल त्यालाच मोठी संधी आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधीजींनी काँग्रेस विसर्जित करा असे म्हंटले होते . नेहरूंनी ते ऐकले नाही. आज नेहरूंचाच पणतू ते काम करीत आहे. त्याबद्दल खरे तर राहुल गांधींचे आभारच मानायला हवे.नवभारत उभारणीतील त्यांचे हे मोठे योगदान ठरेल. Thank you RaGa
ReplyDeleteभाऊ कदाचित याच चित्रपटाचा रिमेक मी Pirates of Carebian नावाने बघितला आहे.
ReplyDeleteI have been following your articles and blogs from last six months. And yes, the claim that you had made about Modi's big win through all your analysis during the pre-election and election season was absolutely correct. In the opinion poll, before the election, many had been predicting NDA would just touch the majority mark or even fall short by few seats only you were confidently claiming that BJP would cross the majority mark on its own. The claim was not just a guess or a random prediction but a profound study, analysis, contemporary political scenario, knowledge of Modiji's clout and political/electoral strength. Fantastic!
ReplyDeleteBhau Bhau Bhau Bhau I am your Die Hard Fan. What a analogy Bhau.
ReplyDeleteहा चित्रपट मी पाहिला आहे . सगळं अगदी मुद्देसूद भाऊ एकदम मस्त.
ReplyDeleteवा भाऊ ! मानले तुम्हाला. काय समर्पक तुलना / वर्णन दोन्ही गोष्टीत !👍👍👍👍👍👍
ReplyDeleteखर सांगायचं म्हणजे भाऊ , आता मोदी लाट संपली असंच मला वाटायचं बीजेपी ला 220 ते230 एवढ्याच जागा मिळतील इतकी पक्की खात्री होती.पण लोकांची मॅन की बात मात्र वेगळीच होती.
ReplyDeleteतुम्हाला पुरोगामीया झाला होता म्हणून असे वाटले असेल.
DeleteAprateem .
ReplyDeleteभाऊ,
ReplyDeleteहॅरी पॉटरच्या शेवटच्या भागात प्रोफेसर डंबलडोर हॅरीला सांगतात, 'सत्ता त्यालाच शोभते ज्याला त्याची आस नसते'! परत सिद्ध केलं मोदींनी...
राजकीय घटनाक्रमाचे विश्लेषण अप्रतिम
ReplyDeleteभाऊ या भाट मध्ये एक भाट देशांचे अर्थमंत्री चे स्वप्न पाहत होते. ते रघुराम राजन कोठे गायब झाले आहे. निवडणूक पहीली मोठ्या बातम्या देत होते
ReplyDeleteआणि ती पोहणारी पण मरते बघा ....ती ओ...ममता
ReplyDeleteअफलातुन विश्लेषण सर
ReplyDelete