Saturday, June 22, 2019

वैचारिक अश्लिलता

Image result for सावरकर एबीपी माझा

अखेरीस एबीपी माझा वाहिनीने जाहिरपणे सावरकर विषयात माफ़ी मागितल्याने बहुतांश सावरकरप्रेमी खुश आहेत. तर काहीजण प्रसन्ना जोशीला वाहिनीने सेवत ठेवू नये, अशा मताचे आहेत. गंमतीची गोष्ट म्हणजे इतके नाटक रंगलेले असतानाही तथाकथित अविष्कार स्वातंत्र्याचे लढवय्ये मैदानात उतरलेले नाहीत. मात्र घडले त्याला सावरकरप्रेमी जनतेच्या एकजुटीपेक्षाही व्यापारी कारण आहे. मात्र त्याचीच चर्चा फ़ारशी झालेली नाही. ती जशी सावरकरप्रेमी लोकांसाठी आवश्यक आह, तशीच पोकळ स्वातंत्र्यवीरांसाठीही अगत्याची आहे. सावरकर हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक मोठा अध्याय आहे आणि त्याविषयी चर्चा करताना ज्या मर्यादा पाळायला हव्यात; त्याचे भान या वाहिनीने राखले नाही असे म्हणता येत नाही. कारण ही वाहिनी म्हणजे विचारांनी प्रवृत्त झालेल्या कोणा संपादक विचारवंताने चालवलेली माध्यम संस्था नाही. तसे बघायला गेल्यास आजकाल सोशल मीडिया खरेखुरे अविष्कार स्वातंत्र्य अनुभवत किंवा उपभोगत असते. बाकी वर्तमानपत्रे किंवा वाहिन्यांवर नोकरी करणारे उगाच आपल्यालाही स्वातंत्र्य असल्याचे भासवित असतात. त्यांना भरपूर वेतनाच्या बदल्यात आपापल्या मालकाचा अजेंडा पुढे रेटण्यासाठी नेमलेले असते. मग तो अजेंडा मालकाचा की नोकराचा; असा प्रश्न महत्वाचा आहे. अजेंडा मालकाचा असेल तर त्यानेही नेमलेले नोकर त्याच पात्रतेचे असतात. म्हणूनच नोकरावर दोषारोप करून भागत नाही. जेव्हा चटके मालकाला किंवा वाहिनीला बसतात, तेव्हा माफ़ीनाम्यासाठी नोकरांना पुढे केले जाते. मग अग्रलेख मागे घेणारे गिरीश कुबेर असोत वा एबीपीचे प्रसन्ना जोशी असोत. त्यांची चुक इतकीच असते, की पोटार्थी पत्रकार म्हणून नोकरी करताना त्यांनी आपणच मालक विचारवंत असल्याच्या थाटात थोडाफ़ार आगावूपणा केलेला असतो. मात्र असे इथेच घडत नाही. जगभर आज पत्रकारांची तशीच् दयनीय अवस्था झालेली आहे. त्यात आनंदोत्सव करण्यासारखे काहीच नाही. कारण प्रसन्ना असो किंवा एबीपी असो, त्यांना आपल्या कृतीचा कुठलाही खेद झालेला नसेल, तर त्या माफ़ीला अर्थ काय?

योगायोगाने विषय सावरकरांचा आहे आणि त्यांची हेटाळणी करण्यात धन्यता मानणार्‍या प्रसन्नासारख्या अनेक बुद्धीमान लोकांना तात्यांच्या माफ़ीनाम्याचे फ़ार मोठे कौतुक आहे. आपल्या तुरूंगावासाच्या कालखंडात तात्यारावांनी कितीदा ब्रिटीश सरकारची माफ़ी मागितली; ते चघळून सांगणार्‍यांची वानवा नाही. पण माफ़ीनामा म्हणजे नेमके काय, त्याची चव अशा लोकांना प्रथमच कळते आहे. मनात नसताना, अडकलेल्या सापळ्यातून सहीसलामत निसटण्यासाठी तोंडदेखली माफ़ी मागणे, खरे नसते. जसे आज् प्रसन्ना किंवा एबीपी वाहिनीला केलेल्या कृत्याचा मनापासून वगैरे खेद झालेला नाही, तसाच त्या काळात ब्रिटीश सरकारला माफ़ीनामे लिहून देणार्‍या तात्या सावरकरांनाही कृतीविषयी कुठलाही खेद झालेला नव्हता. पण तुरूंगात सडत पडण्यापेक्षा मोकळ्या जगात जाऊन यापेक्षा अधिक काही चांगले करण्यासाठी वेळ काढता येऊ शकेल, असाच त्यामागचा तेव्हा हेतू होता. त्यामुळे मनात नसतानाही माफ़ी मागण्याचा ‘शुद्ध हेतू’ आता प्रसन्नाला उमजलेला असेल. आज त्याच्या माफ़ी मागची भावना जितकी प्रामाणिक आहे, तितकाच तेव्हा तात्यांनी माफ़ीची तडजोड मन्य करण्यामागे प्रामाणिकपणा होता. मात्र दोन्ही माफ़ीनाम्यांमध्ये जमिन अस्मानाचा फ़रक आहे. इथे प्रसन्ना किंवा एबीपीचे संपादक मंडळ आपल्या मासिक उत्पन्नावर वेतनावर गदा येईल, म्हणून नतमस्तक होऊन माफ़ी मागत आहेत. तात्यांनी प्राणघातक वेदना सोसणे अशक्य होऊनही निष्पन्न काहीही होत नसल्याने माफ़ीचा मार्ग पत्करला होता. आपल्या सुखवस्तू जीवनावर गदा आली म्हणून माफ़ीचा मार्ग स्विकारणे आणि अनन्वीत छळ सोसण्यातून मार्ग काढणे; यातला फ़रक कुणाच्या लक्षात येतो आहे का? मासिक उत्पन्नाच्या हमीला हक्का लागला म्हणून माफ़ीनामा लिही,णे ह्याला अविष्कार स्वातंत्र्य म्हणतात आणि शारिरीक छळातून दिलासा मिळण्यासाठी पर्याय शोधण्याला पळपुटेपणा म्हणतात?

सावरकर किंवा त्यांच्या कर्तृत्वाची खिल्ली उडवणे, हा पुरोगामीत्वातला एक थिल्लर प्रकार आहे. त्यामुळेच मग असे विषय चर्चेला आणले जातात. प्रसन्ना किंवा तत्सम लोक पुरोगामी विचारांनी भारावलेले असले, तरी त्यांनी त्याही विचारसरणीचा पुरेसा अभ्यास केलेला नसतो. किंवा ज्यांच्यावर टिकेचे आसूड ओढण्याची हौस असते, त्या हिंदूत्व किंवा उजव्या विचारसरणीलाही समजून घेण्याचे कष्ट उपसलेले नसतात. कुठलेही निमीत्त् शोधून एकमेकांवर दुगाण्या झाडण्यात असे उथळ लोक बुद्धीचातुर्य शोधत असतात्. म्हणूनच अकस्मात सावरकर हा विषय कशाला आला, तेही तपासून बघितले पाहिजे. लोकसभा निवडणूक नुकतीच संपलेली आहे आणि त्यात भोपाळ येथून साध्वी प्रज्ञासिंग यांना भाजपाने उमेदवार म्हणून उभे केलेले होते. त्याच दरम्यान तामिळनाडूतला एक उथळ पुरोगामी चेहरा असलेल्या अभिनेता कमला हासन याने गोडसे याचा संदर्भ घेऊन एक वादग्रस्त विधान केलेले होते. त्यावर भोपाळमध्ये कुठल्या पत्रकाराने साध्वीला प्रश्न विचारला असता, तिने गोडसे राष्ट्रभक्त होता असे विधान केले. मग त्यावरून काहूर माजवण्यात आले आणि भाजपाला त्यावर माफ़ी मागण्यासाठी दबाव आणला गेला. अखेरीस निवडणूकीचा मोसम बघून मतांसाठी उभ्या असलेल्या साध्वीनेही शब्द मागे घेतले. त्यातून स्फ़ुरण चढल्याने प्रसन्ना किंवा तत्सम इथल्या पुरोगाम्यांना चेव आला आणि त्यांनी सावरकरांनाही खलनायक ठरवण्याचा आगावूपणा आरंभला. तेव्हा अर्थातच त्यांना आपल्या पोटावर पाय येईल, अशी आशंकाही नव्हती. अन्यथा त्यांनी अशा विषयाला हात घातला नसता. कारण अशा पुरोगामी विचारवंतांना तत्वापेक्षाही सुखवस्तु जीवनाची चटक लागलेली आहे. बाकी विचारनिष्ठा वगैरे निव्वळ ढोंगबाजी असते. त्यामुळे त्यांनी हिंदूत्ववादी लोकांना विचलीत करायला वा डिवचायला हा विषय उकरून काढला होता. यालाच मी बौद्धिक पोर्नोग्राफ़ी असे नाव दिले आहे.

पोर्नोग्राफ़ी म्हणजे लैंगिक अश्लिलता चित्रित करणारे लिखाण किंवा चित्रण होय. असे चित्रण ज्यांना शरीरसुख घेण्याची क्षमता नसते, किंवा त्यातल्या आनंदापेक्षाही फ़क्त उत्तेजित होण्यापुरती झिंग हवी असते; असेच लोक त्याकडे आकर्षित होतात. त्यात वय झालेले असतात, तसेच त्या शरीर व्यवहाराशी अजून तोंडओळखही नसलेली कोवळ्या वयातील मुले असतात. त्यांना उत्तेजित करणे व साध्य काहीच नसणे; हा त्यातला हेतू असतो. एबीपी वाहिनी किंवा तत्सम पत्रकारिता करणार्‍यांनाही असे विषय घेऊन आणखी काही साध्य करायचे नसते. सुंदर मुलीला छेडण्यातून भित्र्या मुलांना जे सुख मिळते, त्यापेक्षा हा प्रकार् वेगळा नाही. त्यातून सावरकरप्रेमी वा हिंदूत्ववादी म्हणवून घेणार्‍या वर्गाला डिवचणे छेडणे किंवा उत्तेजित करणे; यापेक्षा काही करायचे नसते. म्हणून मग ज्यातून सावरकरप्रेमी चिडतील अशी भाषा किंवा शब्द योजले जात असतात. त्याच त्या कालबाह्य निरर्थक शिळ्या कढीला त्यातून ऊत आणला जात असतो. मात्र त्यामुळे इतकी तीव्र प्रतिक्रीया उमटेल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. असती, तर नक्कीच त्यांनी असला उद्योग केला नसता. थेट माध्यमाच्या मालकालाच आर्थिक चटके बसणार नाहीत, इथपर्यंत अशा संपादक पत्रकारांच्या स्वातंत्र्याची लक्ष्मणरेषा आखलेली असते. ती संभाळून कोणावरही भुंकायची मोकळीक म्हणजे आजच्या पत्रकारांचे अविष्कार स्वातंत्र्य झालेले आहे. लोकसत्ताचे संपादकीय लिहीताना टेरेसा विषयात गिरीश कुबेरांना त्याचे भान राहिलेले नव्हते. तर सावरकर विषय घेताना येणार्‍या प्रतिक्रीयेचे भान एबीपीच्या संपादकांनी राखलेले नव्हते. जाहिरातदारांकडून आर्थिक नाड्या आखडल्या गेल्यास आपल्याही कंबरेत मालक लाथ घालू शकतो, ह्याचे भान आवश्यक होते. मग हा घटनाक्रम चुकवता आला असता आणि झाकली मूठ सव्वा लाखाची राहू शकली असती. पण आवेशात असल्यावर् कुणाला होश असतो? राहुलना नसतो की प्रसन्नाला रहात नाही.

मुद्दा इतकाच, की आपल्या सुखवस्तु जीवनाची चटक लागलेल्यांनी उगाच क्रांतीकारकाचा आवेश आणण्याचे कारण् नसते. तो तुमच्या नोकरी व्यवसायाचा भाग नसतो. पोटार्थी सरकारी कारकून वा दुकानदार आणि आजचा पत्रकार; यात फ़ारसा फ़रक उरलेला नाही. क्रांतीकारक होण्यासाठी सुखवस्तु जीवनाचा हव्यास सोडता आला पाहिजे आणि परिस्थितीचे चटके सोसण्याची क्षमता असली पाहिजे. ती नुसती पुस्तकांची पारायणे करून वा रट्टा मारलेल्या पोपटपंचीतून येत नाही. आजवर अशा सावरकरी विचारांची हेटाळणी करण्याला राजाश्रय होता आणि आता तो संपला आहे. सहाजिकच त्याचा एकूण जनजीवनावर प्रभावही पडलेला आहे. कालपर्यंत माध्यमातील मक्तेदारीला आव्हान देणारी अन्य व्यवस्था उपलब्ध नव्हती. आता सोशल मीडिया नावाचे हत्यार सामान्य माणसाच्याही हाती आलेले आहे. तेव्हा मालकांनी उभारलेल्या सोन्याच्या पिंजर्‍यात बसून स्वातंत्र्याच्या गर्जना करणार्‍यांनी सावध व्हायला हवे आहे. कारण आताची माध्यमे हा शक्तीशाली राक्षस राहिलेली नाहीत. त्यांचा जीव गुंतवणूक आणि जाहिरातदार नामे पिंजर्‍यातल्या पक्ष्यात दडवून ठेवलेला असतो. कोणी त्या पक्षाची मुंडी पिरगाळली, की मीडिया नावाचा राक्षस घुसमटू लागतो. कासावीस होऊ लागतो. एबीपीने माफ़ी मागून त्याची साक्ष दिलेली आहे. एक बाजूला त्यांची टिआरपी घसरली आणि दुसरीकडे त्यांना जाहिरात देणार्‍यांचाही बहिष्कार गळ्याशी आला. अन्यथा माफ़ी मागण्याची शरणागती कशाला पत्करली गेली असती? जी कथा या एका वाहिनीची आहे, तीच बहुतांश मुख्यप्रवाहातील माध्यमांची आहे. जे कोणी एकाहून एक नामवंत चेहरे आपण पत्रकार् संपादक म्हणून बघत असतो, ते गुंतवणूक करणार्‍यांनी पाळलेले समर्थाघरीचे श्वान असतात. त्यांच्या जोश वा रोषाला अर्थ नसतो, तसेच त्यांनी केलेले कोडकौतुक वा गुणगानही निरर्थकच असते. त्यामुळे सावरकरांचे कर्तृत्व संपणार नसते किंवा डागाळणारही नसते.

41 comments:

  1. एकदम सुपर भाउ.

    ReplyDelete
  2. आ.भाऊ,

    चातकासारखी या विषयावर आपले विचार व्यक्त होण्याची वाट पहात होतो. मी हा विषय आपण योग्य प्रकारे विश्लेषण करावा असं सुचवलं होतं.

    शतश: आभार.

    ReplyDelete
  3. आता प्रसन्नला माफीचा अर्थ कळला असेल.

    ReplyDelete
  4. भाउ काय लेख लिहीलाय मस्तच दोनदा वाचला.

    ReplyDelete
  5. आजवरचा सगळ्यात आवडलेला लेख... म्हणजे अप्रतिम..एकच नंबर

    ReplyDelete
  6. भाऊ ABP माझा ची बाजू घ्यायला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बोंब ठोकायला पुरोगामी गॅंग चे सदस्य चाचा चौधरी ह्यांनी पोस्ट टाकली होती

    ReplyDelete
  7. सुनील कुलकर्णीJune 22, 2019 at 5:27 AM

    भाऊ मी नियमित तुमचे लेख वाचतो पण आजचा लेख हा आजच्या पत्रकारांनी वाचलेच पाहिजे आणि तुम्ही सध्याच्या माध्यमातील पुरोगामी क्रांतीकारकाना अक्षरशः नागडे केलेय।
    लेखाचे शीर्षक तर अफलातून।
    प्रणाम आपल्या लेखनशैली ला आणि तार्किक मांडणीला।

    ReplyDelete
  8. भाऊ, या विषयावर आम्ही आपली वाट पहातच होतो. आर्थिक नाड्या आवळत आल्यानंतर लगेच माफी आठवली. हे मात्र खरे की, सोशल मिडियामुळेच हे शक्य झाले आणि लोकांनी दाखवलेल्या एकीने धक्का बसलाच. गंमत म्हणजे स्वतःला पुरोगामी म्हणवणारे या विषयावर चिडीचूप होते.

    ReplyDelete
  9. Getting error and big comment lost

    ReplyDelete
  10. भाऊ साक्षात सूर्याच्या अंगावर थुंकून सूर्याला काहीही फरक पडत नसतो

    ReplyDelete
  11. निव्वळ अप्रतिम! प्रसन्न जोशीची 'जागा' दाखवून दिलीत हे छान वाटले.

    ReplyDelete
  12. काहीही झाले तरीही ABP माझा बंदच...अप्रसन्न जाईपर्यंत

    ReplyDelete
  13. आपण लेख सुंदर लिहिला आहे,अनेक लोकांना इतकी सखोल माहिती नाहीये आणि एबीपी माझा ने केलेल्या निर्लज्ज पणाची दिलगीरी हे त्या पेक्षाही जास्त निर्लज्ज पणा आहे. सावरकर म्हणजे जाज्वल्य राष्ट्रप्रेम!पण हे समजायला तेवढीही बौध्दिक प्रगल्भता नाही काही लोकांना.

    ReplyDelete
  14. भाऊ,

    बौद्धिक दहशतवाद हा शब्द मी बऱ्याच वेळेस वापरीत असे..तोच तुम्ही खूप स्पष्ट करून सांगता !

    या गॅंग चे वस्त्रहरण करीत राहणे फार गरजेचे आहे,म्हणूनच तुमचा खूप अभिमान वाटतो...

    ReplyDelete
  15. भाउ हा तुमचा लेख viral होनारेय.

    ReplyDelete
  16. शेवटचा para एकदम जळजळीत 🔥

    ReplyDelete
  17. या निर्लज्ज आणि निगरगट्ट लोकांना काही बोध होईल असे काही वाटत नाही.

    ReplyDelete
  18. भाऊ स्वातंत्र्यवीरांबाबत आगाऊगिरी करणाऱ्या एबीपी माझा या वृत्तवाहिनीला त्यांची जागा दाखवून दिलीत हे बरेच झाले. पत्रकारांच्याही डोळ्यात अंजन घातलेत.

    ReplyDelete
  19. भाऊ आर्थिक नाड्या प्रयोजकांनी आवळल्या खऱ्या, पण त्या प्रायोजकांच्या मला बहिष्कार घालायची भाषा सोशल मीडियावर सुरू झाली तेव्हाच.
    त्यामुळे सोशल मिडियानेच या प्रकरणात एबीपी ल धडा शिकवला आहे.

    ReplyDelete
  20. नामवंत पत्रकार म्हणजे समर्थाघरचे पाळलेले श्वान... अतिशय समर्पक उपमा.. छान लेख

    ReplyDelete
  21. वाह भाऊ.. अतिउत्तम.
    वैचारिक अश्लीलता उघड केल्याबद्दल मनापासून आभार भाऊ!
    असेच सुंदर विश्लेषण वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही करावं अशी विनंती तुम्हाला करावीशी वाटते.
    एकच नंबर !

    ReplyDelete
  22. मुळात स्वातंत्र्यवीर तात्यारावांनी माफी मागितालेलीच नाही, असे माझे म्हणणे आहे. कारण त्या सुटकेदरम्यान तात्यारावांनी इंग्रज सरकारला जे काही लिहून दिले, त्यात कोठेही 'मला माझ्या गतकृत्त्यांचा पश्चाताप होतो आहे, त्यास्तव मला माफ करावे' असे म्हणलेले नाही. केवळ अंदमानच्या तुरुंगातून भारतातील तुरुंगात येण्यासाठी, राष्ट्रहित व राष्ट्रभक्ती याच एकमेव ध्येयापोटी केलेली ती एक लेखी तडजोड होती इतकेच. हल्लीच्या तथाकथित पुरोगामी बुद्धीवादी व काँग्रेसी मंदबुद्धी 'विचारवंतांच्या' मतानुसार इंग्रज सरकारने जर तात्यारावांना खरोखरच माफी दिली असती तर उर्वरित शिक्षा रद्द करून त्यांना बिनशर्त मोकळे सोडले असते. तसे न करता त्यांना पुनश्च रत्नागिरी येथील तुरुंगात डांबण्यात आले होते. याला 'माफी' म्हणता येईल का ?

    ReplyDelete
  23. भाऊ, प्रसन्न काही वेळेस निखिल वागळे बनू पाहतो.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रसन्ना आनी वाघले हयानी मोदीविरोही मोहिम चालवलेली आहे. आनी आशा बेककालाना बली पाडू नुई

      Delete
  24. भाऊ तुम्ही ग्रेटच.ABP माफीनामा प्रसंगाची VODEO लिंक मिळाली तर मस्तच.viral करू.

    ReplyDelete
  25. एकतर या विषयावर कोणी लिहीत नाही आणि लिहिले तर कुठे प्रसिद्ध होत नाही आपण मात्र अत्यंत यथार्थ टिपणी केली आहे

    ReplyDelete
  26. अप्रतिम लेख
    भाऊ आपण नेहमीच असे अप्रतिम लेख लिहून सर्वसामान्य वाचकांना जागृत करण्याचे मोठे काम केलेले आहे, त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत, आपले कार्य असेच अखंडित पणे चालू राहावे हिच अपेक्षा बाळगतो

    ReplyDelete
  27. Bhau tum aage badho ham tumhare sath hai. Jabardast.. tuphani phalandaji

    ReplyDelete
  28. संजय नाईकJune 23, 2019 at 3:18 AM

    एबीपी माझा ला मागावी लागलेली माफी ही ज्या कारणास्तव होती, ते कारण म्हणजे सावरकरप्रेमी व देशप्रेमी मराठी जनतेने एकजूट करून ही वाहिनी न पहाण्याचे ठरविल्याने घसरलेला त्यांचा टीआरपी व त्याला काही जाहिरातदारांनी दाखविलेली सहमती हे आहे. माझ्या मते हा सक्षम राष्ट्रीय वैचारिक प्रवाह आता येथेच थांबता कामा नये. भारताच्या विरोधात गरळ ओकणारी परकी मालकीची भारतीय वृत्तपत्रे व वाहिन्या, दहशतवादाचे उघड समर्थन करणारे त्यांचे संपादक या सर्वांच्या विरोधात आता हे जनआंदोलन म्हणून चालविले गेले पाहिजे. सुमार बुद्धीच्या संपादकांनी लिहिलेले अग्रलेख, पक्षपाती बातम्या व वृत्तवाहिन्यांवर चाललेली एकतर्फी चर्चा हे आता आम्हाला नको आहे. गेली साठ वर्षे तुमची मनमानी आम्ही सहन केली कारण आम्हाला दुसरा पर्यायच तुम्ही ठेवला नव्हता. आता समाजमाध्यमांंच्या उदयाने ही उणीव भरून निघाली आहे. आम्हाला तुमची गरज नाही. खरोखरच नाही. आम्ही तुमची वृत्तपत्रे विकत घेऊन वाचणार नाही, तुमच्या वाहिन्या पहाणार नाही व स्वतःचा बुद्धीभेद करवून घेणार नाही, तुम्हाला जाहिराती देऊन देशद्रोह करणार नाही.

    अशा अर्थाचे जनआंदोलन सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. बिलकुल रास्त विश्लेषण।

      Delete
  29. माफीवीर प्रसन्न जोशी!

    ReplyDelete
  30. असे होते तर मग त्यांनी त्यांच्या बरोबर असलेल्या इतर राजकीय बंद्यांनाही जसे कि उल्हासकर दत्ता इंदुभाषां रॉय चौधरी वा नानीगोपाल इत्यादींनाही तसेच करायला का सांगितले नाही त्यांच्यापैकी कोणीही अशी पत्रे लिहिली नाहीत ते कां?

    ReplyDelete
  31. येत्या प्रजासत्ताक दिनी सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न पदवी देण्यात यावी.

    ReplyDelete
  32. भाऊ, उत्कृष्ट लेख/ ब्लॉग! या वाहीनीवरील माफीनामा देखील केवळ दिखाऊपणाच आहे. निवेदकांनी अभ्यासपूर्ण वाचन करून त्याचे संदर्भ पडताळून सादरीकरण करायला हवे. आपला आचा ब्लॉग बराच तिखट पण छेट आहे.
    या लेखाबद्दल अभिनंदन.

    ReplyDelete
  33. भाऊ उत्तम विश्लेषण. दोन्ही माफिनाम्याची उत्तम सांगड घातलीत.

    ReplyDelete
  34. Perfect. But our fight is on till we bring Abp to level of NDTV , Roy , Wagale etc. Let us teach lessons to Amrut Bazar Patrika. They are antinational and anti Hindu. Particularly this clown Joshi

    ReplyDelete