Monday, March 26, 2018

अण्णांचा नवा एल्गार

anna mamta posters at ramaleela के लिए इमेज परिणाम

पाचसहा वर्षापुर्वी देशात धमाल उडवून देणार्‍या अण्णा हजारे यांनी आता पुन्हा रामलिला मैदानात ठाण मांडले आहे. तेव्हा त्यांच्या पाठीशी असलेल्या अनेकांनी आता अण्णांची साथ सोडलेली असून, अशापैकीच अनेकांनी मिळून स्थापन केलेल्या आम आदमी पक्षाचा अनुभव लोकांनी आधीच घेतलेला आहे. त्यामुळे एक गोष्ट नक्कीच सांगता येईल, की अण्णांच्या आंदोलनाने देशाला लोकपाल दिलेला नसला तरी केजरीवाल मात्र मिळाला आहे. तो केजरीवाल लोकपालपेक्षाही भयंकर असल्याने अण्णांनी आधी त्याविषयी काही करण्याची गरज होती. तशी अपेक्षा बाकीच्या भारतीयांची नसली तरी दिल्लीकरांची नक्कीच असेल. कारण बाकीच्या भारताची गोष्ट सोडून द्या. दिल्लीकरांनी तेव्हा अण्णांना जबरदस्त साथ दिलेली होती आणि त्यातूनच अण्णांना देशव्यापी व्यक्तीमत्व प्राप्त झालेले होते. पण त्याच अण्णांच्या उपोषणाने सत्तेपर्यंत पोहोचलेल्या केजरीवाल व त्यांच्या टोळक्याने दिल्लीकरांचे जगणे हराम करून टाकले. तेव्हा अण्णा गायब होते. त्या केजरीवाल किंवा त्यांच्या साथीदारांना जाब विचारायला अण्णा एकदाही पुढे सरसावले नाहीत. मात्र तेच अण्णा आता मोदी सरकारला जाब विचारयला उपोषणाला बसलेले असतील, तर लोकांना भेडसावणार्‍या कुठल्याही समस्येपेक्षा अण्णांचे उपोषण अधिक भितीदायक वाटू शकेल. कारण अशा उपोषणातून केजरीवाल उदयास येत असतात, हे दिल्लीकर जाणून बसला आहे. मग तो अण्णांच्या नव्या उपोषणाकडे कुठल्या भावनेतून बघत असेल? आधी अण्णांनी त्याचा शांतचित्ताने विचार करावा, मगच आज रामलिला मैदानावर गर्दी कशाला लोटलेली नाही, त्याचे उत्तर मिळू शकेल. खरेतर अण्णांसाठी वा त्यांच्या उपोषणासाठी सहा वर्षापुर्वी रामलिला मैदानावर गर्दी कशी व कोणामुळे जमली, तेच अण्णांना अजून उलगडले नसावे. अन्यथा त्यांनी या नव्या उपोषणाचा उद्योग केला नसता.

लोकपाल आंदोलन चालू असताना तसाच प्रयोग अण्णांनी मुंबईतही करून पाहिला होता. तेव्हाही त्यांना दक्षिण मुंबईत कुठल्या मैदानात उपोषणाला जागा मिळाली नाही आणि अण्णा संतापलेले होते. अखेरीस उपनगरात बीकेसी या भव्य मैदनावर त्यांच्या उपोषण सोहळ्याला संमती मिळाली व ते नाट्य दिल्लीप्रमाणे सुरू झाले, तरीही रंगले नव्हते. पहिले दोन दिवस कसेबसे उरकल्यावर अण्णांनी गाशा गुंडाळला होता आणि ते आमरण उपोषण मध्येच सोडून राळेगण सिद्धीला निघून गेलेले होते. तेव्हा सरकारने आंदोलनासाठी येणार्‍या लोकांची कोंडी केल्याचा आरोप अण्णांचे तात्कालीन प्रवक्ते व आजचे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केला होता. पण त्यात तथ्य नव्हते, केजरीवाल यांच्या दिल्लीतील संघटनेच्या बळावर अण्णांचे रामलिला नाट्य खुप रंगलेले होते आणि दिल्लीकर माध्यमांच्या आशीर्वाद व आश्रयामुळे त्याला वारेमाप प्रसिद्धी मिळालेली होती. नंतर त्या आंदोलनात जमा झालेल्या पैशाचे काय झाले, असाही सवाल अण्णांनी उपस्थित केला होता. तर केजरीवालांनी दिलेल्या हिशोबात माध्यमांवर चाळीस लाख खर्च झाल्याचेही म्हटलेले आठवते. आज तितका खर्च माध्यमांवर केलेला नसेल आणि केजरीवालांची भक्कम संघटना पाठीशी उभी नसेल, तर रामलिला मैदान भरायचे कसे? खरेतर हाही अनुभव अण्णांसाठी नवा नाही. चार वर्षापुर्वी मार्च महिन्यातच अण्णांनी ममतांच्या सहाय्याने रामलिला मैदान बुक केले होते आणि तृणमूलच्या माध्यमातून अण्णा दिल्लीकरांना आकर्षित करायला आलेले होते. पण मैदानात अण्णा व ममताचे भव्यदिव्य पोस्टर्स गर्दी करून उभे असताना लोकांनी मात्र तिकडे पाठ फ़िरवली होती. मग अण्णाही तिकडे फ़िरकले नव्हते. बिचार्‍या ममतांना एकाट्य़ाने रामलिला सादर करावी लागलेली होती. त्यामुळे आज गर्दी का होत नाही, हे अण्णांना कोणी नव्याने समजावण्याची गरज नाही.

आपल्या मंचावर कुणा राजकीय नेत्याला स्थान नसेल अशी घोषणा अण्णांनी केलेली आहे. पण त्यांच्या मंचावर यायला कोणी उत्सुक आहे काय? मुळात आंदोलनाला कुठल्या तरी राजकीय पक्षाचा आश्रय व हातभार असल्याशिवाय असे भव्य आंदोलन उभे राहू शकत नाही. तेव्हा भाजपा वा अन्य काही राजकीय पक्षांच्या आशीर्वादाने लोकपाल आंदोलन रंगलेले होते आणि त्यासाठी केजरीवाल यांची वानरसेना अहोरात्र राबत होती. आज तीच वानरसेना बेपत्ता आहे आणि अण्णांनी तिसर्‍या आघाडीसारखे काही समिकरण जुळवून उपोषण आरंभलेले आहे. त्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी वा भाजपाचे सरकार शरण यावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. तर तसे काही होण्याची बिलकुल शक्यता नाही. कारण युपीए काळात जितका भ्रष्टाचाराचा उच्छाद चालला होता, तितका धुमाकुळ आज चाललेला नाही. लहानमोठ्या तक्रारी जरूर असतील. पण कुठलेही भ्रष्टाचाराचे वा गैरकारभाराचे आरोप मोदी सरकारच्या विरोधात झालेले नाहीत. शिवाय रामलिला व अन्य कुठल्या मैदानावरच्या उपोषण वा आंदोलनाने विचलीत होईल असा पंतप्रधान आज सत्तेत नाही. प्रत्येक घटक आंदोलनाला पोषक नसताना कितीही आव आणला वा शक्ती लावली, म्हणून त्याला जनतेकडून प्रतिसाद मिळत नसतो. सहा वर्षापुर्वी अण्णांच्या आदोलनाला विरोधी पक्षांची फ़ुस असेलही. पण त्यापेक्षा सरकार विरोधातील भावना उफ़ाळलेली होती आणि राहुल सोनियांच्या बेपर्वाईने त्याच आगीत तेल ओतण्याचे काम केलेले होते. आज त्याचा मागमूस नसेल, तर अण्णांनी व्यक्तीमहात्म्य म्हणून रामलिला मैदानावर गर्दी जमण्याची अपेक्षा करू नये. कारण त्यांना वा मूठभर लोकांना जितके लोकपालचे कौतुक आहे, त्यापेक्षा अधिक स्वच्छ कारभार वा पारदर्शक सरकार चालले आहे. जनभावना तेव्हाइतकी प्रक्षुब्ध नाही. म्हणूनच व्यक्तीमहात्म्य उपयोगाचे नाही. पण हे अण्णांना कोणी सांगायचे?

यापुर्वी म्हणजे अण्णांच्या उपोषणाने विचलीत होणारे राज्यकर्ते भ्रष्ट होते, किंवा त्यांच्यात आपल्याच कामाविषयी आत्मविश्वास नव्हता. सहाजिकच ते नुसत्या आरोपाने गडबडून जायचे. आंदोलनकर्त्याला लोकभावनेवर फ़क्त स्वार होण्याची हिंमत पुरेशी होती. जेव्हा तितके पोषक वातावरण नसते व लोकमत प्रक्षुब्ध नसते, तेव्हा कारणे उकरून काढावी लागतात. अण्णांनी जी कारणे उपोषणाच्या निमीत्ताने दिलेली आहेत, ती चुकीची नसली तरी जनतेला प्रक्षुब्ध करण्याइतकी ज्वलंत नाहीत. म्हणून तर अशा आंदोलने वा उपोषणाला व्यापक राष्ट्रीय अवतार घेणे अवघड आहे. केवळ अण्णांनी पुढाकार घेतला म्हणून सरकारला नाकी दम आणला जाईल, अशी अपेक्षाही गैरलागू आहे. सरकार व राज्यकर्त्यांना शक्य असलेल्या गोष्टीही ते करत नाहीत, तेव्हा लोकांचा असंतोष वाढत जातो. उलट आपल्या मर्यादित शक्तीच्या बळावर कोणी राज्यकर्ता शक्य तितके चांगले काम करीत असेल, तर सामान्य जनतेला त्याची पुर्ण जाणिव असते. म्हणूनच ती जनता नुसत्या आक्रमक आंदोलनने रस्त्यावर येत नाही, की आंदोलचा भडका उडत नाही. लोकपाल व शेतकर्‍यांचे प्रश्न घेऊन अण्णा उपोषणाला बसले आहेत आणि ते आमरण आहे. काही दिवस गेल्यावर अण्णांच्या प्रकृतीच्या घसरण्याने त्याची तीव्रता वाढूही शकते. पण त्याचा तितका गवगवा करणारी यंत्रणाही आंदोलनकर्त्यांच्या हाताशी असावी लागते. यावेळी अण्णांच्या तयारीत तिथेच गफ़लत झालेली आहे. वातावरण पोषक नाही आणि पाठीशी प्रचाराची सज्ज यंत्रणा नाही. सहाजिकच हे आंदोलन किती यशस्वी होईल, ते काळच ठरवणार आहे. मनमोहन यांच्यासारखे हे सरकार गोंधळलेले नाही आणि पंतप्रधानही अतिशय धुर्त चतुर आहेत. ह्या सगळ्या गोष्टी अण्णांनी उपोषणाला आरंभ करण्यापुर्वी विचारात घेतलेल्या दिसत नाहीत. नुसताच एल्गार पुकारून चालत नाही. त्यात हादरा देण्याची सज्जताही राखावी लागत असते.

11 comments:

  1. तारतम्य कमी वाटते आणि लोकपाल अमलात कसा आणावा ह्याच उत्तर दिले तर बरं कारण अण्णांना अभिप्रेत असलेला लोकपाल आणायचा म्हणजे घटना दुरुस्ती आली आणि तेवढी राज्यसभेत या सरकारला मत नाहीत.

    ReplyDelete
    Replies
    1. गुजरातेत १२ वर्षात का लोकपाल नियुक्त केला नाही? की तिथेही पुरेसं संख्याबळ नव्हते??

      Delete
    2. समजा लोकपाल केला नियुक्त आणि तोच भ्रष्ट झाला तर? त्यालाच जबरदस्त पैसे देऊन विकत घेतला तर? काय फायदा आहे त्याचा?

      म्हणजे सध्याच्या न्यायव्यवस्थेमध्ये अजून एका डोक्याची भर. इतकाच काय तो फायदा.

      Delete
  2. खरेतर अण्णांसाठी वा त्यांच्या उपोषणासाठी सहा वर्षापुर्वी रामलिला मैदानावर गर्दी कशी व कोणामुळे जमली, तेच अण्णांना अजून उलगडले नसावे. अन्यथा त्यांनी या नव्या उपोषणाचा उद्योग केला नसता.
    फार गंभीर वाक्य आहे हे भाऊ. खरोखरच अण्णांना हे समजावेच लागेल. त्यात तुम्ही म्हंटल्याप्रमाणे ह्या सरकारला अजून तोंड लपवावे लागेल असे काही झाले नाही, मग हे कश्यासाठी ? भाऊ मलातरी हे सर्व प्रायोजित केल्यासारखे वाटते आहे. फक्त शेतकरी या लोकपाल हेच कारण असेलतर, 1) लोकपालसाठी राज्यसभेत घटना दुरुस्तीसाठी आवश्यक संख्याबळ नाही व 2) शेतकरी मोर्चा महाराष्ट्रात विधानसभेवर आला होता पण अण्णा काही दिसले नाहीत किंवा त्यांची प्रतिक्रिया पण बघितली नाही.
    थोड्या दिवसातच याचे खरे काय ते कळेल असे वाटते.

    ReplyDelete
  3. Pawar n chi yantrana mage ubhi rahil tyanchya...thode divas thamba..bagha Gammat....pillu pawar gatane ch sodala asanar yat shanka nahi...PM che vedh

    ReplyDelete
  4. काही अनुत्तरीत प्रष्ण,
    १) आज मंत्री गिरीश महाजन अण्णांची मनधरणी ‌‌‌‌‌‌क्कराय का गेले?
    २) मागील आंदोलनातील, बेदी, व्हिके सिंह यांना, भाजपने का पदरात घेतले?

    ReplyDelete
  5. फक्त उपोषणां न काहीही होत नाही, शेतकऱ्यांची मदत करायचीय स्वयंसेवी संगतना बांधा सगळे तरुण उद्या येतील ते पण उड्या मारीत ,खोट्या ngo ची पण काही गरज उरत नाही


    याला फक्त प्रिसिद्धी आन् नाव पाहिजे ,पुढचा गांधी व्हायचंय याला ,ते मिळवण्यासाठी देशाचं कितीही नुंसं झालं तरी चालेल कोणीही सत्तेवर आले तर चालेल पण मला गांधी बनवा म्हणजे झालं।

    आधी वानरसेना आणि त्या वेळच्या विरोधीं पक्षाची मदत घेतली।

    नंतर बंगाल च्या खाला बाई ची मदत घेतली (तेव्हाच ह्यांच्या हेतू विषयी शँका आल्या) उपोषणच करावं ते बंगाल मध्यरे दुर्गा पूजा करणाऱ्यांच्या पाठिंब्या साठी पण करता आलं असतं कारण तिथे खाला बाई खूप लालुगूनचं करतात

    आता याला नारदा कडून पिन टोचली असेल 2019 ची चाचपणी करायला।


    ReplyDelete
  6. ह्यो फक्त चाचपणी आंदोलन हाय, या खेपेस नवीन केजरी नाय जन्मणार, जुनेच सगळे जाणते नेते अण्णांचा वापर करून नन्तर सुपारी सारखा बाजूला करतील बघा

    ReplyDelete
  7. FRAUD NO 1 MEANS Anna!

    ReplyDelete
  8. अण्णांचे योग्य मूल्यमापन .

    ReplyDelete