Tuesday, August 6, 2019

सुरूवात कुठून झाली?

३७० च्या निमीत्ताने   (२)

doval shah के लिए इमेज परिणाम

सामान्य माणसाची स्मरणशक्ती दुबळी असते. किंबहूना म्हणून तर पत्रकारिता आवश्यक असते. जेव्हा एखादी घटना घडते किंवा समोर येते, तेव्हा त्याविषयीचे इतर तपशील लोकांसमोर आणून त्यांना ती घटना समजावण्यालाच तर पत्रकारिता किंवा विश्लेषण म्हटलेले आहे. पण आजकाल सामान्य माणसापेक्षाही पत्रकार व विश्लेषक यांची स्मरणशक्ती कमालीची दुबळी झाली आहे. नुसती स्मरणशक्तीच नव्हेतर आकलन शक्तीही निकामी होऊन गेलेली आहे. त्यामुळे बातमी कशाला म्हणतात आणि विश्लेषण म्हणजे काय, त्याची गंधवार्ता ह्या पत्रकारांना राहिलेली नाही. सत्ताधारी पक्ष वा प्रामुख्याने भाजपा-मोदींना शिव्याशाप देण्याला आजकाल पत्रकारिता समजले जाण्यातून ती बाधा पत्रकारितेला झालेली आहे. अन्यथा ३७० कलम वा अन्य बाबतीतले तपशील लोकांना आजच नव्हेतर याहीपुर्वी मिळत राहिले असते आणि त्यावर इतका असमंजस राहिला नसता. साधारण वर्षभरापुर्वी किंवा अगदी नेमका दिवस सांगायचा, तर १८ जुन २०१८ रोजी एक अशी घटना घडलेली होती, की त्याकडे एका हुशार राजकारण्याने लक्ष वेधलेले होते. त्याचे नाव असाउद्दीन ओवायसी. त्याने भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी भाजपाध्यक्ष अमित शहांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याबद्दल आक्षेप नोंदवला होता. डोवाल सरकारचे अधिकारी असून त्यांनी एका पक्षाध्यक्षाला घरी जाऊन कशाला भेटावे? ते इतर पक्षीयांना सुद्धा भेटतात काय? असाही प्रश्न ओवायसी यांनी उपस्थित केला होता. पण कुठल्या वाहिनी वा माध्यमाने त्याची गंभीर दखल घेतली नाही. पण तिथेच तर सर्वात मोठी बातमी होती, किंवा मोठ्या घटनाक्रमाला आरंभ झालेला होता. आज ३७० कलम रद्द होण्याची प्रक्रीया तिथूनच सुरू झालेली होती. पण ओवायसी यांच्या इतकी चिकित्सकवृत्ती कुठल्या पत्रकाराला दाखवता आलेली नव्हती. मग अशा दिवाळखोरांकडून आजच्या घटनाक्रमाचे योग्य विश्लेषण कसे होऊ शकेल?

१८ जुन २०१८ रोजी घाइगर्दीत अमित शहा बंगालचा दौरा सोडून दिल्लीत परतले होते आणि अकस्मात त्यांच्या घरी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दाखल झाले. शहा सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष असले तरी कुठलेही सरकारी पद त्यांच्यापाशी नव्हते आणि देशाच्या सुरक्षेशी संबंधित कुठलीही सरकारी जबाबदारी शहा पार पाडत नव्हते. मग डोवाल यांनी त्यांच्याशी तासभर घरी जाऊन कसली चर्चा केली? कशाला केली? दोघांच्या भेटीमागे काहीच नसेल, तर नंतर एक घटनाक्रम कशाला सुरू झालेला होता? त्यांच्या त्या भेटीनंतर अल्पावधीतच शहांच्या निवासस्थानी काश्मिरातील मुफ़्ती सरकारमध्ये सहभागी असलेल्या भाजपाच्या मंत्र्यांचा ताफ़ा येऊन दाखल झाला. म्हणजेच बंगाल दौरा अर्धवट सोडून शहा दिल्लीला परतले, तेव्हाच त्यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांनाही श्रीनगर येथून दिल्लीत पाचारण केलेले होते. मग त्या मंत्र्यांशी शहांनी चर्चा केली आणि वेगाने तिकडे जम्मू काश्मिरात घटनांची चक्रे फ़िरू झाली. भाजपाच्या या सर्व मंत्र्यांनी माघारी श्रीनगरला जाऊन राज्यपालांना आपल्या पदांचे राजिनामे सादर केले. भाजपानेही पीडीपी सोबत केलेल्या आघाडीला मोडीत काढत, पाठींबा मागे घेतल्याची घोषणा करून टाकली. थोडक्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या तासाभराच्या चर्चेनंतर वेगाने चक्रे फ़िरू लागली. त्याच्या परिणामी काश्मिरातील भाजपा पीडीपी सरकार गोत्यात आलेले होते. मुख्यमंत्री महबुबा मुफ़्ती आपले बहूमत गमावून बसल्या होत्या आणि काश्मिरातील सरकार संपुष्टात आल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. आता महबुबा यांच्यासमोर कुठले पर्याय शिल्लक उरले होते? एक म्हणजे बहूमत गमावल्याने त्यांनी राजिनामा द्यावा, किंवा अन्य पक्षांचा पाठींबा मिळवून विधानसभेतले आपले बहूमत कायम असल्याचे सिद्ध करावे, हा दुसरा पर्याय होता. त्यांनी काय केले?

इथे एक गोष्ट साफ़ लक्षात घेतली पाहिजे. जेव्हा अशी संयुक्त किंवा कुठलीही सरकारे बनतात, तेव्हा त्यांच्या संख्येवर विसंबून राज्यपाल त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देऊ शकतात. पण त्याच्या पाठीशी बहूमत आहे किंवा नाही, याचा निर्णय राज्यपाल करू शकत नाहीत. सुप्रिम कोर्टाच्या बोम्मई निवाड्यानुसार कुठल्याही मुख्यमंत्र्याचे बहूमत सिद्ध करायची जागा राजभवन नसून विधानसभा आहे. सहाजिकच भाजपाने पाठींबा काढून घेतल्याने मुफ़्तींचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आलेले असले, तरी संपले नव्हते. त्यांना अन्य पक्षांची म्हणजे ओमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फ़रन्सचा पाठींबा मिळवून बहूमत सिद्ध करण्याची सुविधा उपलब्ध होती. किंबहूना त्यांनी भाजपाचा पाठींबा घेण्यापुर्वीही अब्दुल्लांनी त्यांना एकतर्फ़ी पाठींबा देऊ केलेला होता. म्हणूनच सरकार टिकवण्यासाठी महबुबा भाजपाने साथ सोडल्यावर अब्दुल्लांची मदत मागू शकत होत्या. त्यामुळे नुसते सरकार टिकले असते असेच नाही, तर विधानसभाही अबाधित राहू शकली असती. पण अब्दुल्लांना ती नव्याने निवडणूका जिंकायची संधी वाटली आणि मुफ़्तींना प्रतिस्पर्ध्यासमोर नतमस्तक व्हायला लाज वाटली. म्हणून त्यांनी दोन तासही प्रतिक्षा केली नाही आणि सरळ मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा देऊन टाकला. थोडक्यात त्यांनी राज्याचा कारभार व सगळे अधिकारच राज्यपालांना सोपवून टाकले. राज्यपाल म्हणजे पर्यायाने राष्ट्रपती किंवा केंद्र सरकार होय. ह्याचा विचारही त्यांच्या डोक्यात शिरला नाही. मग केंद्र सरकार म्हणजेच मोदी किंवा भाजपा व पर्यायाने अमित शहांच्या हाती काश्मिरची सुत्रे जातात, याचाही विचार कोणाच्या मनात आला नाही. काश्मिरला असलेला विशेष दर्जा संपवण्याचा मनसुबा घेऊन सात दशके दबा धरून बसलेल्या भाजपासाठी ही सुवर्णसंधीच असल्याचे त्यापैकी कोणाच्या लक्षात आली नाही. अब्दुल्ला वा मुफ़्ती सोडून द्या, विश्लेषकांच्याही ही बाब लक्षात आली नाही?

मुद्दा सुरू कुठून झाला? डोवाल व शहांच्या चर्चेतून याची सुरूवात झाली. म्हणजेच हे सरकार कोसळणे वा तिथला राजकीय बेबनाव केवळ राजकारणाचा भाग नव्हता. तर त्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा हात असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नसल्यानेच सगळे अंधारात ढकलले गेले होते. जी स्थिती त्या राजिनाम्याने किंवा विधानसभा बरखास्त केल्याने निर्माण होते, त्याचा राजकीय डावपेचासाठी किती मोठा उपयोग होऊ शकतो, असा विचारही कोणाच्या मनाला शिवला नाही. त्यांच्यामुळेच त्यातून येऊ घातलेला धोका त्यांना ओळखता आला नाही. त्यांनी गाफ़ील राहुन सगळी सुत्रेच डोवाल आणि अमित शहांच्या हाती सोपवली. कारण नंतर कुठलेही सरकार बनू शकले नाही आणि पर्यायाने विधानसभा बरखास्तीचा मार्ग खुला झाला. एकदा तशी स्थिती आली, मग त्यावर मुफ़्ती वा अब्दुल्ला किंवा कुठला राजकीय पक्ष निर्णय घेऊ शकत नाही. ते सर्व अधिकार राष्ट्रपती व पर्यायाने केंद्रातील सत्ताधारी पक्षाकडे जातात. म्हणजेच भाजपाकडे जातात, हे कोणाला ओळखता आले नाही. अमित शहा वा डोवाल अशा संधीचा कुठल्या टोकाला जाऊन वापर करतील हा विचार कोणाच्या डोक्यातही आला नाही. थोडा चिकित्सक मेंदू विरोधकांपाशी असता, तरी त्यांना यातला धोका ओळखता आला असता. यातून डोवाल वा शहा कुटीलपणे कोणते डाव खेळू शकतील, याचाही विचार होऊ शकला असता. मग मुफ़्ती अब्दुल्ला एकत्र येऊ शकले असते आणि विधानसभा बरखास्तीपर्यंत स्थिती आली नसती, की राष्ट्रपतींना विधानसभेची संमती देण्याचा विशेष अधिकार आपोआप प्राप्त झाला नसता. पण असे बारकाईने काही बघण्याची बुद्धी आज कोणापाशी उरली आहे? शहा डोवाल यांना हवे तसेच मग मुफ़्ती, अब्दुल्ला वगैरे वागत गेले आणि ३७० ची कबर खोदण्याच्या कामाला वेग आला. मध्यंतरी वर्षाचा कालावधी उलटला असेल. पण यातले भाजपा विरोधकांचे योगदान अतिशय मोलाचे नाही काय? पुढे काय कसे घडत गेले?  (अपुर्ण)

41 comments:

  1. खरय भाउ. मधे मुफ्ती उमर काॅंगरेस असे सरकार बनविण्याच्या हालचाली सुरु झाल्या खर पण शहांनी फोडाफोडी सुरु करुन लोनला मुख्यंमंत्री करण्याचा घाट घातला आता कळतय ती पण एक चालच होती.शहा खरच आधुनिक चाणक्य आहेत किंवा मोदी पण असतील कारण मोदी समोर येवुन असे काही करु शकत नाहीत.

    ReplyDelete
  2. भाउ तुमच्या विश्लेषक बुद्धीला सलाम.हीच खरी पत्रकारीता.कुठलाही आव न आणता मोदी शहांचे राजकारण समजुन सांगता.

    ReplyDelete
  3. Manla bhau tumhala 🙏🙏

    Uttam aklan

    ReplyDelete
  4. Amazing analysis of indian politics
    .cunning modi shah duo vs brainless opposition.

    ReplyDelete
  5. भाऊ, आता लक्षात येतयं विरोधक तेंव्हा भाजपाची खिल्ली उडवण्यात मग्न होते, नंतर राफेल आलं.

    ReplyDelete
  6. हे सगळं तुम्ही किती बारकाईने लिहिता, त्यामुळेच तुमचं जास्त पटतं.अस वाटत होत की काश्मीर चा मुद्दा काही सुटणार नाही, पण या नेत्यांच्या दूरदृष्टी ला सलाम.
    तुमचं अचूक विश्लेषणची खूप उस्तुकाता होती.
    पुढचा लेख लवकर पाठवा.

    ReplyDelete
  7. अचूक विश्लेषण. एवढी बारकाई कुठल्याही न्यूज चॅनेल वर दाखवली नाही.

    ReplyDelete
  8. You are great sir...
    Hats off ��

    ReplyDelete
  9. नेमके विष्लेषण. गेली २-३ वर्षे सातत्याने जागता पहारा वाचत आहे. असेच लिहित रहा. शुभेच्छा.

    ReplyDelete
  10. योग्य, साध्या भाषेत विवेचन. धन्यवाद

    ReplyDelete
  11. It is a Masterstroke by BJP, Modi-Shah.

    ReplyDelete
  12. खुप अभ्यासपुर्ण व अत्यंत उपयुक्त विश्लेषण

    ReplyDelete
  13. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  14. भाऊ शाह मोदी दोभाल ह्यांची हुशारी हुशारी आणि बाकी लोकांचा निष्क्रीयता सांगायची इतकी घाई का? अभी तो पिक्चर शुरू हुई है. हीच लोकं पुढच्या वेळी पण हवी आहेत. कृपया ५ वर्षांनी अशी परखड मतं मांडावीत.

    ReplyDelete
  15. मला आठवतंय भाऊ तुम्ही मुफ्तीने राजीनामा फेकला फेकल्या वरील शक्यता त्याच वेळी बोलून दाखवली होती

    ReplyDelete
  16. Bhau, ur simply gr888888888888888888888888888888888888888888!
    BTW, please publish jagata pahara on FB so that we can share it.

    ReplyDelete
  17. सविनय प्रणाम भाऊ.
    माझ्या सर्व मित्रांना मी तुमचा ब्लॉग वाचण्यासाठी उद्युक्त केले आहे आणि ते सर्वजण आपले मार्मिक विश्लेषण अत्यंत समरसतेने ग्रहण करत आहेत. अत्यंत आभारी आहोत आम्ही सगळे तुमचे.

    ReplyDelete
  18. ते सगळे गाफिल राहिले हे पथ्यावरच पडले भाजपाच्या. साध्या सोप्या भाषेत सामान्यांना समजेल असे विश्लेषण करता तुम्ही त्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏🙏

    ReplyDelete
  19. या खेळीला काय म्हणावे कृष्णनीती कि चाणक्यानिती कि मोदी-शहा नीती ??

    ReplyDelete
  20. Simply brilliant! Modi-Shah's political acumen and your analysis of it is a treat for us to read. Bravo Sir!

    ReplyDelete
  21. Bhau PL explain how Modi and Shah got confidence to win 2019 elections in 2018 before starting this conspiracy. That also with thumping mejority in LS and RS.

    ReplyDelete
  22. Bhau correct description and that real journalism

    ReplyDelete
  23. I was also the one to criticed the BJP when it allied with PDP. But now came to know the Boss move of MODI-SHAHA

    ReplyDelete
  24. Bhanu tumche lekh Sakhol ani abhyaspurna astat.
    1. Ladhak J&K pasun wegale ka keele?
    2. Swatantra rajyacha darja na deta U.T. Ka keele?
    3. Swami mhantat tase P.O.K. tabyat ghenya sathi, kanhi suruvat zali aahe Kay?

    ReplyDelete
    Replies
    1. भाऊ तोरसेकर यांस.... भाऊ, कृपया याबाबतचा आपला दृष्टीकोन आत्ताच मांडू नका... पहिले हे सगळे प्रश्न मार्गी लागू देत मग भाऊ तुमची पत्रकारिता नेहमीप्रमाणे जगा समोर येऊ देत...

      Delete
  25. तिसरा लेख आतुरतेने वाट बघत आहे

    ReplyDelete
  26. भाऊ तुमच्यामार्फत मांडलं गेललं विश्लेषण मी मागील बरेच वर्षे ऐकत आहे... एकदम अचुक पध्दतीने तुम्ही तुमचा अनुभव आणि राजकारणाला पहाण्याचा दृष्टीकोन पणाला लावता... एक हाडामासाचा पत्रकार ज्याने पत्रकारितेचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही आणि केवळ स्वतःच्या आजपर्यतच्या अनुभवातून आणि अंडर द लाईन वाचण्याच्या सवयीतून तुम्ही पत्रकारितेत चार चाँद लावलेत...

    भाऊ तुमच्या डोळस पत्रकारितेला सलाम...

    ReplyDelete
  27. आतुरता लागून राहिली भाऊ
    खरंच सुंदर विश्लेषण

    ReplyDelete
  28. अप्रतिम विश्लैषण !! ही खरी शोध पत्रकारिता आहे कौतुकास्पद कामगिरी पुढील लेखांच्या प्रतिक्षेत आहे

    ReplyDelete
  29. भाऊ.....
    खुपच मार्मिक आणि ऊत्तम विश्लेषण...👌👌
    तुम्हाला मनापासून नमस्कार...!!🙏🙏🙏
    ....
    पण मला असं वाटतं की सध्या तरी या विषयावर इतकं खुलेपणाने लिहू नये की ज्यांना काही समजू नये त्यांच्या मेंदूपर्यंत विचार करण्यासाठी काही खुराक मिळेल......
    या सर्व कामगिरीत गोपनियता ही अत्यंत महत्वाची आहे.....
    ती कायम ठेवून या कार्याला सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे....🙏🙏
    ......
    ट्रेलर दिखा दिया...
    अभी पिक्चर बाकी है...!!😊

    ReplyDelete
  30. भाऊ तुमची लिगसी म्हणून संस्थात्मक पातळीवर पत्रकार घडवले पाहिजे तुमच्या मार्गदर्शनाखाली , हे आपण मनावर घ्यावं असं वाटतं

    ReplyDelete
  31. आदरणीय भाऊ तुम्ही उत्तम लेख लिहिता....मी तुम्हाला वाचतो ....पण कधी कधी तुम्ही कल्पनाविलास करता असे मला वाटते....थोडा चिकीत्सक पणा तुमच्याकडून आलाय तो असा की वरील सर्व विवेचन तुम्ही 370 काढण्यापूर्वी का नाही केले..???..आज असे काय तुम्हाला माहीत झाले...???? की लगेच तुम्ही सगळा विस्तार केला.....कमाल आहे बुवा. काही मित्रांनी याला शोध पत्रकारिता म्हटले....हे कसे.... झाल्यावर तर असे झाले असे अंदाज कोणी ही काढू शकतो.मग भाऊ असो वा काका.. #@#@

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्ही भाऊंना वाचता असे म्हणालात...
      तुमच्याकडून हा लेख वाचायचा राहिला असेल म्हणून 🙏🙏

      http://jagatapahara.blogspot.com/2018/07/blog-post_18.html?m=0

      Delete
  32. आतुरता लागून राहिली भाऊ
    खरंच सुंदर विश्लेषण

    ReplyDelete
  33. भाऊ, तुमचं विश्लेषण सखोल असतं. जागता पहारा कायम वाचतो.


    ReplyDelete
  34. Ghatna ghadlyawarch vishleshan ahe
    He Adhi kase karnar ani Adhi vishleshan Karun mag tya pramane action ghyayla kunihi patrakar kiw a Bhau Kahi Modi kiwa shaha nahit.
    Ghatna ghadlyawar vishleshan ani karanmimamsa yala shodpateakarita mhantat bahudha

    ReplyDelete
  35. Bhau khup sakhol vishleshan Karun maat mandtay , punnha ghotalebaj Sarkar hava aahe ka. Asa asel tar mag Kanhaiyala deshache tukade kashe karta yetil yach hi magdarshan Kara mhanje bharatmatela sonyacha divas disel nahi ka

    ReplyDelete
  36. भाऊ ,
    सुरेख विश्लेषण !
    आपल्या भाषा शैलीला सलाम .
    क्लिष्ट विषयही आपण माझ्यासारख्या सामान्यांना समजेल अशा शब्दात मांडता त्यामुळेच आपल्या लेखाची सर्वच आतुरतेने वाट पहातात .

    ReplyDelete