Sunday, October 27, 2019

एकाच वर्गात ४० वर्षे

Image result for bal thackeray cartoon on sharad pawar

जशी दृष्टी तशी सृष्टी म्हणतात. हे सामान्य लोकांच्या बाबतीत किती खरे आहे ठाऊक नाही. पण राजकीय नेते व विश्लेषकांच्या बाबतीत नक्कीच खरे आहे. कारण दिसणारी घटना वा घटनाक्रम एकच असला, तरी त्याचे प्रत्येक पक्ष व अभ्यासकाकडून होणारे वर्णन भिन्न असते. तसे नसते तर दोन विधानसभांच्या निकालानंतर वेगवेगळ्या टोकाच्या प्रतिक्रीया आपल्याला बघायला व ऐकायला मिळाल्या नसत्या. अर्थातच या प्रतिक्रीया प्रामुख्याने विविध पक्षांनी निवडणूकपुर्व असे दावे केले, त्याच्या संदर्भाने दिल्या जातात. किंवा त्यांच्या आजवरच्या कारवाया कारभाराचा आधार घेऊन व्यक्त केल्या जातात. त्याखेरीज ज्या जागा जिंकल्या वा गमावल्या, त्यापुरत्या प्रतिक्रीया वा विश्लेषण मर्यादित रहाते. त्यामुळे नंतरच्या काळात होणार्‍या निवडणुका किंवा वाटचाल, यांच्या बाबतीत अशा प्रतिक्रीयांचा काहीही उपयोग होत नाही. त्या तात्कालीन ठरतात आणि पुढल्या काळातले राजकारण भलत्याच दिशेने सरकताना दिसते. आताही दोन दिवसात ज्या प्रतिक्रीया आलेल्या आहेत, त्यापैकी किती वास्तववादी आहेत, त्याची भिंगातून तपासणी करावी लागेल. कारण एकूण सुर असा आहे, की भाजपाला हरयाणा व महाराष्ट्र अशा दोन्ही राज्यातल्या जनतेने नाकारलेले असावे. पण वस्तुस्थिती भिन्न असते. आपल्या निवडणूक पद्धतीमध्ये सर्वाधिक मते मिळवणारा जिंकत असला, म्हणून त्याला अर्ध्याहून अधिक मतदाराने स्विकारले असे गृहीत असते. वास्तवात त्याला अर्ध्याहून अधिक मतदारांनी नाकारलेले असते. पण तोही दावा सोयीस्करपणे केला जातो. अन्यथा आधीची पाच वर्षे मोदींना ३१ टक्के मतांचा पंतप्रधान म्हणून कशाला हिणवले गेले असते? कारण तोच निकष लावायचा तर मनमोहनसिंग २५ किंवा २७ टक्क्यांचे पंतप्रधान होते आणि मायावती किंवा अखिलेशही ३० टक्क्याहून कमी मतांचेच मुख्यमंत्री होते. पण युक्तीवाद हे सत्य नसते, ती सोय असते.

गेल्या दोन दिवसांपासून सगळ्या निकालांचे श्रेय शरद पवार यांच्या ‘इडीला वा पावसात भिजण्याला’ दिले जात आहे. पण व्यवहारात राष्ट्रवादीची मते किती वाढली वा घटली; याची चर्चा होणार नाही. कारण ते आकडे सोयीचे नसतात. सोय असते जागांच्या संख्येची. मोदींच्या जागा मोजायच्या नसतात आणि पवारांचे टक्के मोजायचे नसतात. उदाहरणार्थ भाजपाच्या १२२ जागा होत्या आणि यावेळी अवघ्या १०५ जागाच टिकवता आल्या. तर राष्ट्रवादीच्या ४१ जागा होत्या आणि यावेळी ५४ जागा आल्या. पण त्या दोन्ही पक्षांना मिळालेली मतांचे प्रमाण किती आहे? शरद पवारांच्या त्या पावसात भिजण्याने लोक इतके गहिवरले असते, तर निदान एक तरी टक्का मतांमध्ये वाढ व्हायला हवी होती ना? तसेच भाजपाला लोक नाकारत असतील, तर त्यांच्या पुर्वीच्या मतांमध्ये लक्षणिय घट दिसायला हवी होती ना? वास्तवात जे प्रारंभिक आकडे समोर आलेले आहेत, त्याकडे बघता सर्व चार प्रमुख पक्षांच्या मतांमध्ये घट झालेली आहे. सर्वात मोठा भाजपा नुसता जागांमुळे झालेला नाही, त्याला २५.७ टक्के मते मिळालेली आहेत आणि २०१४ च्या तुलनेत त्याचा मतांमध्ये २.१ टक्का घट झालेली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जागा १३ वाढल्या, पण २०१४ च्या तुलनेत त्याला अर्धा टक्का मते गमवावी लागलेली आहेत. २०१४ मध्ये १७.२४ टक्के असलेली राष्ट्रवादीची मते यंदा १६.७ टक्के इतकी झालेली आहेत. तेच शिवसेनेच्याही बाबतीत झालेले आहे. तेव्हा सेनेला १९.३५ टक्के मते होती आणि आज १६.४१ टक्के मते मिळालेली आहेत. म्हणजेच सेनेची तीन टक्के मते घटलेली आहेत. कॉग्रेसला २०१४ मध्ये १७.९५ टक्के मते होती आणि आता १५.९० मते मिळालेली आहेत. म्हणजेच कॉग्रेसचीही दोन टक्के मते घटलेलीच आहेत. ही सगळी मते गेली कुठे? किंबहूना त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे कुठल्याही पक्षाला मतदाराने सोडलेले नाही. तर प्रत्येकाला धडा शिकवलेला आहे. पण तो सांगायचा, तर आपल्या लाडक्याचे अपयश कुठे लपवायचे? म्हणून मग सगळी चर्चा जिंकलेल्या हरलेल्या जागांभोवती केंद्रीत करायची असते.

२०१४ सालात युती तुटल्यावर अर्ध्या तासात आघाडीही मोडण्यात आलेली होती. त्याचा फ़टका दोन्ही कॉग्रेसला बसला. असे होणार हे न कळायला शरद पवार हा दुधखुळा माणूस नाही. कारण आघाडी मोडण्यात त्यांनीच पुढाकार घेतला होता आणि भाजपाने शिवसेनेशी युती मोडावी, या सौद्यानुसारच नंतर आघाडी मोडली गेलेली होती. इतके करूनही भाजपा बहूमतापर्यंत पोहोचला नाही, तेव्हा निकाल पुर्णपणे हाती येण्याआधीच पवारच भाजपाला सरकार बनवण्यासाठी बाहेरून पाठींबा द्यायला पुढे सरसावले होते. मग आजचा त्यांचा भाजपा विरोध किती खरा मानायचा? तेव्हा आघाडी मोडली नसती, तर दोन्ही कॉग्रेसच्या एकत्रित मतांच्या बेरजेने आघाडीच सत्तेत येऊ शकली असती. पण पवारांना आघाडी सत्तेत नको आणि भाजपाच सत्तेत हवी होती. म्हणून त्यांनी आघाडीत मोडता घातला आणि कॉग्रेसलाही तोंडघशी पाडले. अन्यथा दोन्ही कॉग्रेसच्या बेरजेसमोर भाजपाला १२२ चा पल्ला एकट्याच्या बळावर गाठता आलाच नसता. कारण तेव्हा दोन्ही कॉग्रेसच्या मतांची बेरीज  ३५ टक्के मतांच्याही पुढे होती आणि भाजपाला स्वबळावर मिळालेल्या मतांची टक्केवारी २७.८१ टक्के होती. मोडलेल्या युतीसमोर लढताना कॉग्रेस आघाडी आरामात बहूमत घेऊन चौथ्यांदा सत्तेत आली असती आणि फ़डणवीस मुख्यमंत्रीही होऊ शकले नसते. पण उचापत आपण करायची आणि नंतर ती उचापत निस्तरण्याचे श्रेयही आपणच घ्यायचे; असे एकूण शरदीय राजकारण असते. आज पवार पावसात भिजून भाषणे करतात, त्याचे श्वास रोधून कौतुक करणार्‍यांनी, तेव्हा पाच वर्षापुर्वी आघाडी मोडून पवारांनी भाजपा कशाला वाढवला होता, हा प्रश्न कशाला विचारला नाही. जर तेव्हा ती चुक केली नसती, तर आज पावसात भिजण्याची वेळ कशाला आली असती? आधी भाजपाला शिरजोर करायचे, त्यालाच खतपाणी घालायचे आणि परत आपणच त्याचे निर्दालन करू शकतो; म्हणूनही पाठ थोपटून घ्यायची. अशी पाठ थोपटणार्‍या बुद्धीमंताच्या अकलेचेही कौतुक करावे तितके थोडेच आहे. मात्र ज्याला भाजपा म्हणतात, तो आता पवारांच्या आवाक्यात राहिलेला नाही, हे निखळ सत्य आहे.

कारण तेव्हा संपादन केलेले राजकीय यश भाजपाने जोपासले आहे आणि टिकवूनही ठेवलेले आहे. त्याच्या जवळपास जाण्याइतकी मते पवारांना मिळवता आलेली नाहीत, की जागाही गाठता आलेल्या नाहीत. दोन्ही कॉग्रेसच्या एकत्रित जागा १०४ होतात आणि एकटा भाजपा १०५ जागांपर्यंत आजही पोहोचला आहे. आणि ऐंशी वर्षाचे पवार कुठे आहेत? कधीपासून पवार स्वबळावर शंभरी गाठायला धडपडत आहेत? युती करूनही आज भाजपाने शंभरी पार केली आहे. पवारांना अर्धशतकाचे राजकारण करताना आपल्याच राज्यात कधी प्रमुख पक्ष होण्यापर्यंत मजल मारता आली आहे काय? योगायोगाने भाजपाने आपल्या स्थापनेनंतर लढवलेली पहिली निवडणूक १९८० सालची होती. कारण जनता पक्षातून पुर्वाश्रमीच्या जनसंघीयांनी बाजूला होऊन या पक्षाची १९८० च्या आरंभी स्थापना केली. तेव्हाही पवार कॉग्रेसपासून बाजूला होऊन समाजवादी कॉग्रेस नावाचा पक्ष राज्यात चालवित होते. इंदिराजींनी १९८० सालात जनता पक्षाचा बोजवारा उडवून पुन्हा देशाची सत्ता काबीज केली; तेव्हा पवार जनता पक्षासह पुलोद नावाची आघाडी चालवित होते. कॉग्रेसच्या हाती सत्ता नसलेल्या राज्यातल्या विधानसभा इंदिराजींनी एक वटहुकूम काढून थेट बरखास्त करून टाकल्या. त्यामुळे महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागल्या आणि तेव्हा पवार पुलोद नावाचा खेळ रंगवित होते. त्यांना आघाडी करून त्या विधानसभेत किती जागा जिंकता आल्या होत्या? त्यावेळी समाजवादी कॉग्रेस म्हणून पवारांनी ५५ च्या आसपास आमदार निवडून आणलेले होते आणि आता ३९ वर्षानंतर पुन्हा उतारवयात तशीच झुंज देऊन ५६ आमदार निवडून आणलेले आहेत. एकूण राजकारण अभ्यासले, तर आज पवार कुठे पोहोचले आहेत? ५५ पासून ५६ पर्यंत किती जबरदस्त भरारी आहे ना? कौतुक अशा भरारीचे करावे. भाजपाचे काय? त्याच चार दशकात १५ पासून १०५ वर गाडी अडली म्हटल्यावर पराभवच ना?

तपशील सोडला तर कुठलाही भुलभुलैया उभा करता येत असतो. फ़रक इतकाच, की तेव्हा म्हणजे १९८० सालात जुन्या जनसंघाचे भाजपात रुपांतर झालेले होते आणि त्यातला त्यांचा जवळपास कोणीही नेता आज राजकारणात उरलेला नाही. पण स्थापनेपासून अवघ्या काही महिन्यातच ती विधानसभेची निवडणूक लढवताना भाजपाला १५-१६ जागा कशाबशा मिळालेल्या होत्या. पवारांच्या समाजवादी कॉग्रेसला ५५ आमदार मिळालेले होते. तेच पवार आज राष्ट्रवादी म्हणून ५६ आमदारांवर आहेत आणि तोच भाजपा आज १०५ आमदारांपर्यत पोहोचला आहे. कौतुक कसले व कोणाचे करायचे? ज्या वयात किती पावसाळे बघितले, म्हणून नवोदितांना अनुभव सांगायचे. तेव्हा पवार पावसात भिजून भाषण करतात आणि ५६ आमदार निवडून आणतात. किती मोठा पराक्रम आहे ना? तेव्हा तर बंगालच्या ममता बानर्जी राजकारणात आल्या नव्हत्या, किंवा चंद्राबाबूंचा तेलगू देसम पक्ष स्थापनही झालेला नव्हता. आणखी मजेची गोष्ट म्हणजे शिवसेना हा पक्ष मुंबई ठाण्यापलिकडे फ़ारसा पसरला नव्हता आणि पुणे नाशिकातही त्याचे नगण्य अस्तित्व होते. मुंबई महापालिकाही एकट्याने  जिंकण्याचा मनसुबा सेनेने कधी बाळगलेला नव्हता. तिथून आज सेना कुठवर पोहोचली आहे? आज बाळासाहेब हयात नाहीत आणि त्यांच्या अनुपस्थितीत उद्धव ठाकरे सात वर्षे सेनेची सुत्रे हलवित आहेत. त्यातूनही राज ठाकरे बाजूला झाले व त्यांनी वेगळी चुल मांडलेली आहे. अशा सेनेलाही आज ५७ आमदार निवडून आणणे शक्य झाले आहे आणि पवार कुठे आहेत? ३९ वर्षानंतरही पवार पन्नाशीत अडकून बसले आहेत. त्यासाठीही कॉग्रेस किंवा अन्य पुरोगामी पक्षांच्या कुबड्या घ्याव्या लागत आहेत. कौतुक अशा दिग्गजांचे करावे. जग इथले तिथे होऊन गेले आणि पवार मात्र पन्नाशीत अडकून पडले आहेत. गेल्या खेपेस एकट्या बळावर उद्धव ठाकरे यांनीही ६३ आमदारांचा पल्ला गाठून दाखवला. पवारांना तितके स्वबळ कधी सिद्ध करता आले आहे काय? मोजपट्टी कुठली असते? पावसात भिजण्याची की आमदार खासदार निवडून आणण्याची?

कॉग्रेस सोडून आपली वेगळी चुल मांडणारे पवार एकटेच नेता नाहीत. ममता बानर्जी. जगनमोहन रेड्डी असे अनेक आहेत. त्यानी आपापल्या राज्यात किती मोठा पल्ला गाठला आहे? त्याचे भान तरी पवार प्रशंसकांना आहे काय? बंगालमध्ये डाव्यांशी कॉग्रेस समर्थपणे लढत नाही, म्हणून तृणमूल या नव्या पक्षाची स्थापना ममता बानर्जींनी केली. त्यांच्याशी तरी शरद पवार यांची तुलना होऊ शकते काय? त्यांनी १९९८ सालात प्रथमच वेगळा पक्ष स्थापला आणि पवारांप्रमाणेच त्यांच्याभोवती कॉग्रेसचे कंटाळलेले कार्यकर्ते दुय्यम नेते एकत्र येत गेले. २००६ सालात त्यांनी बंगालमध्ये विरोधी पक्ष होण्यापर्यंत मजल मारली आणि २०११ सालात त्या थेट बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. त्यांची किमया छोटी नव्हती. सलग ६ विधानसभा जिंकणार्‍या डाव्या आघाडीला कोणी पाडू शकत नसल्याचा सिद्धांत ममतांनी मोडीत काढला. एकहाती विधानसभेत बहूमत संपादन केले. २०१६ मध्ये तर त्यांनी अधिक बहूमताने विधानसभा जिंकली आणि आज बंगालमधून डावी आघाडी नामशेष होऊन गेली आहे. २००४ सालामध्ये आंध्रप्रदेशात राजशेखर रेड्डी या कॉग्रेस नेत्याने पवारांप्रमाणेच विविध पक्षांची आघाडी करून चंद्राबाबूंच्या तेलगू देसमकडून सत्ता हिसकावून घेतली आणि २००९ सालातही एकट्या कॉग्रेसच्या बळावर पुन्हा बहूमत संपादन केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचाच सुपुत्र मुख्यमंत्रीपद मिळाले नाही म्हणून कॉग्रेसमधून बाजूला झाला आणि २०१९ पर्यंत संघर्ष करत राहिला. त्यालाही दहा वर्षात आपल्या एकट्याच्या बळावर आज आंध्रामध्ये बहूमत संपादन करता आलेले आहे. पवारांच्या तुलनेत ममता किंवा जगनमोहन ही कालची पोरे आहेत. पण त्यांच्यात जितका संयम व मुरब्बीपणा आहे, तितके पवार कायम उतावळे राहिले आहेत. त्यांना राज्यातही आपला ठसा उठवता आला नाही आणि नुसत्या कसरती व कोला<ट्या उड्या मारण्यात पन्नास वर्षाचा कालावधी उलटून गेला. आज पुन्हा त्यांचे पावसात भिजणे ज्यांना कौतुकाचे वाटते, त्यांच्या बुद्धीची कींव करावी तितकी थोडी आहे.

१९८० साली ५५ आमदार आणि २०१९ साली पुन्हा ५६ आमदार निवडून आणण्याचा अर्थ काय? एकाच वर्गात मुलगा चाळिस वर्षे बसला आणि अन्य शेजारपाजारची मुले मात्र शाळा कॉलेज करून परदेशात पोहोचली. तरी मातापित्यांना आपल्या पोराचे गुणगान करण्याखेरीज पर्याय सुचत नाही. पवारांच्या गुणवत्ता व मुरब्बीपणाचे कायम गुणगान करणार्‍या आणि त्याच पावसात कायम चिंब भिजलेल्यांना यापेक्षा अधिक काय सुचणार आहे? चाळीस वर्षांनी एक विद्यार्थी कुठे पोहोचला, त्याची कसोटी कशी लावायची असते? २००२ सालात निवडणूकीच्या राजकारणात उतरून बारा वर्षे गुजरातचा मुख्यमंत्री व गेली साडेपाच वर्षे देशाचा पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदींची निंदानालस्ती करण्यात आपली बुद्धी खर्ची घालणारे, म्हणून धन्य आहेत. दुर्दैव इतकेच आहे, की असल्या भुलभुलैया उभा करणार्‍यांच्या गोतावळ्यात पवारही आपली गुणवत्ता वा क्षमता विसरून गेले आहेत. त्यांनाही अशा कौतुकाची आता चटक लागली आहे आणि त्यातून सुटकेचीही भिती वाटू लागलेली असावी. अन्यथा त्यांनी पावसात भिजून दिलेल्या भाषणाचे इतके कौतुक करणार्‍यांचा कान पकडला असता आणि आपल्या अपुर्‍या यशाची प्रामाणिक कबुली दिली असती. पण असल्या यशातच मशगुल रहाणार्‍याला कधी वास्तव बघता येत नाही, किंवा स्विकारता येत नाही. त्याला भुलभुलैयाच पसंत असतो आणि त्यातच त्याचे भवितव्य झाकोळून जाते. मग अशा खुशमस्कर्‍यांना आनंदी ठेवण्यासाठी तो गुणी माणुसही विदुषक होऊन बागडू लागतो, हातवारे व हावभावांनी त्यांच्या टाळ्या मिळण्यात धन्यता मानू लागतो. कालपरवाच्या विधानसभा निवडणूकीतले हे वास्तव सर्वात भीषण आहे. करुणास्पद आहे. एका क्षमता असलेल्या राजकारण्याचा भाट खुशमस्करे कसा विदूषक करून टाकतात, त्याची ही शोकांतिका मनाला अस्वस्थ करून टाकणारीच आहे. कारण त्यातून भाजपाचे यश संपत नाही, की पवारांचे यश व्यवहारी जगात उपकारक ठरू शकत नाही. बुद्धीमंतांच्या अब्रुचे धिंडवडे मात्र त्यातून नक्कीच निघतात.

61 comments:

  1. Good study studious mind of author reflects here

    ReplyDelete
  2. The best analysis! If BJP had not adapted the outsiders number would have gone up to 144!

    ReplyDelete
  3. दिसतेय पण बघायचेच नाहीये
    कारण विकाऊ पत्रकार वाहिन्या वृत्तपत्रे (ज्यांचे मालक कॉमन असतात )
    पवारांना कळत नाही असे नाही पण माझ्या मते ते स्वतःची कुवत ओळखून आहेत आणि म्हणूनच ते "मर्कटलीला" करूवून टाईमपास करताहेत बाकी डमरूवर उड्या मारायला पेड आर्टिस्ट आहेतच

    ReplyDelete
  4. सुंदर विश्लेषण सर...

    ReplyDelete
  5. खूप छान लिहिलंय, पवारांना ८० वर्षांचा तरुण वगैरे वगैरे म्हणणाऱ्यांना चांगलीच चपराक लगावली भाऊ तुम्ही.भाऊ तुम्हाला एक विनंती आहे माझी पवार काका पुतण्यांनी शेतकऱ्यांच्या मालकिचे सहकारी साखर कारखाने कसे विकले व भ्रष्टाचार कसा केला आणि शेतकऱ्यांना पिक कर्ज देणाऱ्या जिल्हा बँकाची दुरावस्था कशी केली याबद्दल youtube वर विश्लेषण करा.
    शेतकऱ्यांचं पोरगं या नात्याने तुम्हाला हात जोडून विनंती करतोय मी.

    ReplyDelete
    Replies
    1. भाऊंनी ह्या विनंतीचा जरूर विचार करावा ..

      Delete
    2. Please provide details of real owners of place called Lavasa near Pune

      Delete
  6. अतिशय माहितीपूर्ण, पण तरीही, हे सगळं social media वर आहे, इतकं तपशीलवार नाही तरीही, एकूण सूर असाच आहे.
    प्रश्न इथे पवार अपयशी, की यशस्वी असा नसून
    122 वरून 105 का? 220 ची अपेक्षा असतांना 160 का? युती झाली म्हणून सेने 57वर अडली का? इतर पक्षांमधला कचरा गोळा केल्यामुळे जनता नाराज झाली का? कमीतकमी मी तरी नाराज आहेच. 122 ही मोदींची पुण्याई, 105 ही फडणवीसांची अकार्यक्षमता का? काय असा मोठा तीर मारलाय फडणवीसांनी (लोकांसाठी, त्यांची कामे अडलेलीच आहेत) जलयुक्त शिवार आणि लंगड्या गाईत शहाणे वासरू होण्यापालिकडे? की जनतेनी म्हणावे हाच माणूस पुन्हा हवाय. बहुमत मिळालंय, खरं आहे. पण मेगाभरतमेगाभरती मुळे अब्रू गेली त्याचं काय? फडणवीसांनी पक्षांतर्गत वट राहणार नाही, त्याचे काय?
    या विषयावर व्हिडिओ टाकणार आहे? भाऊ, तुमचा उल्लेख असेल, चांगल्या अर्थाने, कुजका नाही.

    ReplyDelete
  7. श्री भाऊ पवार हे कधीच महाराष्ट्र चे नव्हते त्याना जयललिता, लालू, चंद्राबाबू सारखे होता आला नाही,

    ReplyDelete
  8. Reasons for bjp failure
    1. No maratha votes to bjp despite reservation bill
    2. Caste politcs by NCP
    3. Farmer destress
    4. Incapable bjp leaders who did nothing like khadse chainsukh sancheti pls invistigate and express u r opinion

    ReplyDelete
  9. खूप छान विश्लेषण केलं भाऊ. अर्ध्या हळकुंडात पिवळं होणं. ही अवस्था आहे राष्ट्रवादी ची.

    ReplyDelete
  10. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदी आदित्य ठाकरे यांना केव्हा एकदा बसवतो असे होऊन गेले आहे. त्यांचे ते स्वप्नरंजन सुरू ठेवायला हातभार लावत असतानाच अचानकच एकेदिवशी काँग्रेसलाही अंधारात ठेवून भाजपशी तिसरी आघाडी निर्माण करून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत सहभागी व्हायचे ठरवले तर त्याचे आश्चर्य वाटणार नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. कदाचित तीच खेळी असेल पवारांच्या मनात. त्यामुळे ED ची सुरु होणारी चौकशी सुद्धा (निदान तात्पुरती) रद्द होईल. कदाचित भाऊ म्हणाले तसे काका-पुतण्याचे "बिनसले" नव्हते तर दोघांनी मिळून केलेला डाव असू शकतो तो....

      Delete
  11. आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील नेत्यांशी तुलना करताना पवार साहेब एकाच इयत्तेत ४० वर्षे आहेत हा निष्कर्ष वरवर पाहता योग्य वाटतो. परंतु या ४० वर्षांमध्ये पवार साहेबांनी केंद्रामध्ये महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत ह्याकडे दुर्लक्ष होत आहे. राजीव गांधी यांच्या निधनानंतर पवारसाहेब पंतप्रधान बनण्याच्या जवळ पोहोचले होते. कृषिमंत्री, संरक्षण मंत्री, लोकसभा विरोधी पक्षनेता अशा विविध भूमिका पवार साहेबांनी राष्ट्रीय राजकारणात यशस्वीपणे निभावल्या. पवारांच्या तुलनेत ममता आणि जगमोहन राष्ट्रीय स्तरावर कुठंच दिसत नाहीत.

    ReplyDelete
    Replies
    1. ममता रेल्वेमंत्री होत्या, अर्थात त्यांचाही कारभार माजी कृषीमंत्र्यांप्रमाणेच होता हा भाग अलाहिदा.

      Delete
    2. Mamata also had been central ministry.Pawars power was in his politics of substraction.That is probabily the reason NCP could never cross the 100 count in Maharashtra.

      Delete
  12. सध्याच्या महाराष्ट्राच्या स्थितीचा विचार करता एकाच वेळी शिवसेनेला गाफील ठेवून आणि काँग्रेसला अंधारात ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या नेतृत्वाखालील सत्तेत सहभागी झाली, तर आश्चर्य वाटू नये. कारण आपली मजल मुख्यमंत्रिपदापर्यंत नव्हे तर उपमुख्यमंत्रिपदापर्यंतच आहे याची राष्ट्रवादी काँग्रेसला जाणीव आहे.

    ReplyDelete
  13. भाऊ जी, आपला लेख पवारांचे अपयश दाखवणारा , चांगला आहे. पण त्यातच पवारांचे मर्यादित यश, व भाजपचे या निवडणुकीतील अपयशही दिसते. भाजप ने युती केली म्हणून त्यांना बहूमत मिळत आहे. पण चूका केल्या म्हणून जागा वाढल्या नाहीत.४+३इ. पक्ष असल्याने मते विभागली हेसुद्धा खरे आहे.

    ReplyDelete
  14. भाऊ आपण जे विश्लेषण केले आहे ते अतिशय मार्मिक आहे, पण पवार आणि काँगेसला जे यश मिळाले आहे त्याचे अजून एक कारण म्हणजे सत्ता उपभोगत विरोधी पक्षाची भूमिका करण्याचे सोंग शिवसेना करत गेली, ऐन निवडणुकीच्या मध्यावर आरे वरून सेनेने तमाशा केला,सामनातून रोजच्या रोज सरकारवर दुगाण्या झाडणे आजही चालूच आहे,या प्रकाराला कंटाळूनच जनतेने या बेगडी विरोधी पक्षाला लाथ घातली आणि काँग्रेस राष्ट्रवादीला विरोधी पक्ष म्हणून सक्षम केले, अन्यथा बंडखोरांनी पाडलेल्या दहा बारा जागा सोडल्या तरी सेनेला 124 पैकी 70 ते 75 जागा निवडून आणणे अवघड नव्हते, 1990 पासून सेना देखील कमीतकमी 44 ते जास्तीत जास्त 70 याच रेंज मधे आहे, या खेपेला कोकणात सेनेची ताकद कमी झाली आहे आणि कणकवली येथून उद्धव ठाकरे यांनी विरोधात सभा घेऊन देखील नितेश राणे त्यांच्या नाकावर टिच्चून निवडून आला आहे, सामना मधील शिव्यागाळी थांबवा आणि सत्ताधारी भूमिकेत या अन्यथा भविष्यात याही पेक्षा मोठा तडाखा बसेल असाच इशारा मतदाराने सेनेला दिला आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. हे खरं आहे..काही ठिकाणी भाजप चे उमेदवार चुकले आणि काही ठिकाणी युती नसती तर जास्त उमेदवार आले असते..

      Delete
  15. कसं काय दिसतं हाे भाऊ तुम्हाला जे इतरांना बघायचं नाही ते? कि त्यांना दिसतच नाहीं? सुंदर विश्लेषण.

    ReplyDelete
  16. जबरदस्त �� ��

    ReplyDelete
  17. उथळ बातम्यांच्या गर्दीतलं परखड विश्लेषण.. ओढून ताणून भाजपाचा पराभव सिद्ध करायचा, पण स्वपक्षाच्या अधःपतनाकडे सोईस्कर दुर्लक्ष.. आणि मग गेल्या वेळेस भाजपला न मागता दिला तसाच शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी.. तंतोतंत कर्नाटकमधल्या काॅंग्रेसच्या निर्लज्जपणासारखीच.. शिवसेना नेतृृृत्त्वाने वैयक्तिक महत्त्वाकांक्षांकरता चुकीचा निर्णय घेतलाच तर त्यांची अवस्था कुमारस्वामींसारखी झाल्याशिवाय राहणार नाही.. बाकी सलग १० वर्षे आघाडीला सत्तेबाहेर ठेवण्यात युतीनं, किंबहुना भाजपनं मिळवलेलं यश कौतुकास्पद आहे.. मात्र आयारामांबाबत जनतेनं दिलेला कौल निर्णायक आहे..

    ReplyDelete
  18. एक वेगळाच दृष्टिकोन ठेवलाय भाऊ काका. वास्तविक शरद पवाांनीही खूपच साचेबंद राजकारण केले त्यामुळेच त्यांच्या यशाला मर्यादा आहेत. पण त्यांच्या समर्थकांना हे मान्य नाही, एबीपी माझा सारखी वृत्तवाहिनी तर फारच मजेशीर बातम्या देत आहे

    ReplyDelete
  19. भाऊ, अत्यंत परखड विश्लेषण. नाहीतर निकाल लागल्यापासून टिव्हीवर पवाराची विनाकारण भलावण पाहून डोके भणभणले होते. पवारसाहेबांनी जर आघाडीची सत्ता मिळवली असती तर ही स्तुती बरोबरच होती पण दोन्ही कॉंग्रेस मिळून एका भाजपाच्या बरोबरीने जागा मिळवतात यात कसलं आहे मोठेपण. हे म्हणजे नापास विद्यार्थ्याला तो कसा गुणवत्ता यादीत आला आहे आणि गुणवत्ता यादीतला विद्यार्थी कसा नापास आहे हे दाखवण्याची केविलवाणी धडपड होती, पाहून राग नाही पण कीव येत होती.
    शरद पवार साहेब अत्यंत गुणी माणूस, मुत्सद्दी, जनमानासाची नाळ जाणणारा पण फसवाफसवीतून प्रथम यश मिळवले म्हणजे सत्ता मिळवली व ते यश डोक्यात भिनले. मग मी जे बोलतो ते कधीच करत नाही आणि जे बोलत नाही ते नक्कीच करतो ही व्रुत्ती अंगी बाणवली. फसवणूकीच्या राजकारणात यश मिळत गेले मग ते यातच गुरफटून गेले, अगदी जवळच्या माणसाला फसवणे, नंतर त्याची खिल्ली उडवणे, स्वतःला पुरोगामी म्हणवून सतत जातीचा उल्लेख करणे, यालाच यश मानत गेले त्यामुळे आपण मोठे नेते म्हणवून घेतो पण स्वबळावर राज्य का जिंकू शकत नाही याचा विचार कधी केलाच नाही. या निवडणुकीत त्यांच्या भाषणाची पातळी, उपटण्याचे आणि त्रुतियपंथीयांचे हातवारे खरंच कीव आली.

    ReplyDelete
  20. भाऊ तुमचे विश्लेषण समर्पक आहे.
    पण त्यात मला काही उणीवा आढळल्या. शरद पवारांची तुलना ममता बॅनर्जी आणि जगन मोहन रेड्डींशी केली. ती चूकीची किंवा अपूर्ण वाटते. ही दोघे शरदरावांपेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान आहेत. पण काँग्रेस सोडल्यावर त्यांनी काँग्रेसशी युती/आघाडी न करता नेहमीच निवडणूका विरोधी लढवल्या आणि काँग्रेसला नामोहरम केले. याउलट शरदरावांनी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून राजकारण केले. अशी भित्री व्यक्ती महाराष्ट्राचे प्रगल्भ राजकारणी किंवा जाणता राजा होऊ शकतात का?
    भाऊ, तुम्ही मतांच्या बाबतीत जी काही गणिते केली आहेत. ती अजून अपूरी आहेत. कारण संपूर्ण मतांची संख्या उपलब्ध नाही. २०१४ मध्ये भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी स्वतंत्रपणे आणि जवळजवळ सर्व जागी निवडणूका लढवल्या. आता २०१९ ला त्यांनी लढवलेल्या जागांची संख्या युती/आघाडी झाल्यामूळे कमी आहे. त्यामूळे मिळालेली मते कमीच होणार.

    ReplyDelete
  21. गुणवत्ता यादीत पहिला येणार असा दावा करून नाचणारा विद्यार्थी ग्रेस मार्क मिळवून काठावर उत्तीर्ण झाल्यानंतर त्याची टिंगल उडवायची का त्याचा सत्कार करायचा?

    २५० निवडून आणणार होते म्हणे.

    विरोधक शिल्लकच नव्हते म्हणे.

    निवडणुक पूर्ण एकतर्फी आहे म्हणे.

    एवढं असून सुद्धा मोदी व शहा महाराष्ट्रात ठाण मांडून होते आणि इतरांनी ओवाळून टाकलेल्या अत्यंत भ्रष्ट गुन्हेगारांना भाजपने सन्मानाने पायघड्या घातल्या. खडसेंसारख्या निष्ठावंताला घरी बसवले आणि टपोरी गुंड पक्षात घेतले.

    अनेक आमदार पक्ष सोडून गेले, सहकारी कॉंग्रेसने निवडणुकीपूर्वीच पराभव मान्य केलेला, युती किमान २२० जागा जिंकणार असा जवळपास सर्व वाहिन्यांनी अंदाज दिलेला . . . इतक्या वाईट परिस्थितीत ४१ वरून ५४ वर जा नक्कीच कौतुकास्पद आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर.. कौतुक तेवढ्यापुरतंच,४१ ते ५४ पुरतं असू दे.. उगाच निवडणूक जिंकल्याचा आविर्भाव आणून मुख्य अपयश लपवण्याचा प्रयत्न थांबायला हवा..

      Delete
    2. वाहिन्यांनी मुद्दाम अंदाज जास्तीचे व्यक्त केले ...म्हणजे आले तेवढे तर स्वतः ची पाठ थोपटून घ्यायची ...कमी आले तर आधीच तयार केलेल्या वातावरण चा फायदा घेऊन सर्वात मोठ्या पक्षाला झोडपून काढायचे ....आणी विजेत्यांना पराभूत आणी परभूताना ..विजयी असे वातावरण तयार करायच

      Delete
  22. फडणवीसांना हटवले नाही तर भाजपची पुढे घसरणच होणार.

    फडणवीसांनी ५ वर्षे फारसे काही न करता सेनेला खुश ठेवून, मराठ्यांना राखीव जागा देऊन स्वतःची खुर्ची टिकवली. हे करताना प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढला. राखीव जागा देऊनही मराठ्यांची फार थोडी मते भाजपला मिळाली, पण बरीच सवर्ण मते घालविली. ओबीसी नेत्यांचा काटा काढल्याने ओबीसी मते दूर जायला सुरूवात झाली आहे. राणे, उदयन भोसले, गणेश नाईक असे अनेक जण भाजपत आणल्याने भाजपचे कट्टर समर्थक सुद्धा नाराज आहेत. त्या नाराजीचे प्रतिबिंब काही प्रमाणात मतदानात पडले. माझ्या ओळखीच्या काही जणांनी मत दिले नाही किंवा नोटा निवडला. आगामी काळात असेच सुरू राहिले तर पुढील निवडणुकीत भाजपचा दणकून पराभव होईल.

    ReplyDelete
  23. लोकसत्ता e paper "शिवसेनेने मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षांसाठी दावा सांगण्यात काहीच गैर नाही: शरद पवार."". उगाच काहीतरी काडी टाकायची. म्हणे काहीच गैर नाही. काँग्रेस राष्ट्रवादीची युती होती तेंव्हा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला होता काय ? १५ वर्षे काँग्रेसचाच मुख्यमंत्री होता.

    ReplyDelete
  24. सुंदर विश्लेषण केले आहे सर

    ReplyDelete
  25. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीसांना किमया का जमली नाही. आता शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर ते डार्क हॉर्स नाहीत की लांब रेसचा घोडा राहिले नाहीत.

    ReplyDelete
  26. जिवात जीव आला हे वाचून... मला वाटलं की काका उडायला लागले की काय... पण नाही.. फक्त हे सेनेच नस्त झेंगट अडकायला नको होत पायात आता तो राऊत परत गाढवपणा करत राहणार याचा काहीतरी बंदोबस्त व्हायला हवा होता

    ReplyDelete
  27. भाऊराव,

    पवारांनी अनपेक्षित उसळी मारलीये हे नक्की. मात्र ती व्यवहारात निरुपयोगी आहे हे तुमचं म्हणणं तितकंच खरंय. आता असं बघा की काँग्रेसचे जे ४४ आमदार निवडून आलेत त्यांना पक्षाकडून अजिबात पाठिंबा नव्हता. ते स्वपुण्याईवर वा पवारांच्या पुण्याईवरच निवडून आलेत. स्वपुण्याईचे १५ एक आमदार वगळता उरलेले ३० एक पवारांची किमया आहे. राष्ट्रवादीचे ५६ अधिक काँग्रेसचे ३० मिळवू जाता सुमारे ८५ आमदार निव्वळ पवारांच्या प्रभावामुळे निवडवून आलेत.

    मात्र हे सगळं १० वर्षांपूर्वी व्हायला हवं होतं. राजू परुळेकर यांचा एक लेख वाचनात आला : https://chincholikate.wordpress.com/2009/09/07/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%82-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE/ ते म्हणतात की पवार एखाद्याचा दालमिया ज्या पद्धतीने करतात ते खरोखरंच प्रशंसनीय आहे. पवारांनी गांधी-नेहरू घराण्याचा दालमिया केलेला परुळेकरांना आवडला असता. खरंतर प्रत्येक मराठी माणसालाही आवडलं असतं, पण तसं होणं नशिबी नव्हतं. २००० साली विधानसभा जिंकल्यावर त्यांनी पुढील १० वर्षांत महाराष्ट्रातनं काँग्रेस का संपवली नाही हे एक कोडंच आहे. ती जर संपवली असती तर पवार आज कुठल्या कुठे असते. मोदींनी पवारांना काँग्रेस संपवायची सुपारी तर दिली नाही, अशी शंका येते.

    कारण की भाजपच्याही भरपूर चुका झाल्या आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांचं तिकीट कापल्याने अतिशय चुकीचा संदेश जनतेकडे गेला आहे. प्रचंड कष्ट उपसणाऱ्याला तिकीट न मिळता त्याचवेळी आयारामांना मिळणार असेल, तर भाजप आणि काँग्रेस यांच्यात फरक तो काय उरला? भाजपच्या पक्षश्रेष्ठींना हे कळंत असणारंच. त्यामुळेच हे सगळं पद्धतशीर रीत्या घडवून आणलेलं वाटतं.

    अशा अनेक संकटांचा सामना करीत फडणविसांनी एकहाती १००+ जागा खेचल्या आहेत. गेल्या खेपेस जशी मोदीलाट होती तशी या खेपेस नव्हती. शिवाय मोदींनी फारशा सभाही घेतल्या नाहीत. त्यातंच जिथे घेतला तिथे भाजपचा यशदर अपेक्षेइतका नाही. पवार व मोदींनी गुपचूप संधान बांधून फडणविसांना खच्ची तर केलं नाहीये? आज सर्वात यशस्वी फडणवीस आहेत, मात्र तरीही सर्वात दोलायमान त्यांचीच अवस्था आहे. याला म्हणतात पवारांचं राजकारण!

    पवारांच्या आजच्या उसळीत एक पराभव दडलेला आहे हे तुमचं निरीक्षण अगदी समर्पक आहे. एखाद्या ९०% वाल्या हुशार पण उनाड विद्यार्थ्याने फक्त शेवटच्या १५ दिवसांत अभ्यास करून ६०% मिळवावेत असं काहीसं झालंय. एकंदरीत महाराष्ट्र काँगेसचा ऱ्हास चालू राहीलसं वाटतंय.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  28. आमच्या महाराष्ट्रातून हा नेता देशाच राजकारण केलं आहे त्यामुळे विकासाची रोलमॉडेल बोलून उभे केले आहे पण त्या रोलमॉडेल लोक वेगवेगळ्या चव देऊन बोलतील पण तथ्य हेच आहे त्यांनी ते उभारली आहे हे सत्यवचन आहे पवारांचा जिल्हा त्यांनी विकसित केला आहे अजून पर्यंत त्या तुलनेत एकही नेता तेवढा विकासाची उंची गाठू शकला नाही त्यामुळे पवार हे महाराष्ट्राचे नेते म्हणावं लागेल

    ReplyDelete
    Replies
    1. पवार साहेब एका जिल्ह्याचे नेते आहेत काय

      Delete
    2. एखाद्या तालुकाचा विकास म्हणजे महाराष्ट्रा चा विकास नव्हे. सहकार उभा करून स्वाहाकार साधलं याचं काय. सत्ता हेच या माणसाचं उद्देश. आपलं नशिब याना आधुनिक सरंजाम शाही म्हटलं जातं. पैसे घेऊन मत द्या याची सवय कोणी लावली.

      Delete
    3. श्री पवार ह्यांना कधीही संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व करता आला नाही आणि स्वीकारले गेले नाहीत, आणि विकासच म्हणाल तर खुद्द त्यांच्याच मतदार संघात अर्धी शेती अजून पावसावर अवलंबून आहे

      Delete
  29. छान! पण काही प्रश्न:
    1. लेखात उदाहरण दिलेल्या नेत्यांपैकी किती जण राषत्रीयं राजकारणात देखील एक्टिव आहेत किंवा आहेत?
    2. उदाहरण दिलेल्या राज्यात CPM आणि काँग्रेस यांची सत्ता किमान १५ वर्षे तरी होती, त्यामुळे एटी Incumbancy हाही factor होताच कि, ज्यामुळे सत्ता परिवर्तन करने जगमोहन आणि ममता ला easy झाल
    खरतर भाजपला आलेल्या अपयशाची कारणे:
    1.सत्तेची Maghroori जी प्रत्येक सभेत, दिलेल्या प्रवेशांत दिसत होती
    2.vividha प्रश्न सोडवण्यात आलेले अपयश
    3.ekmekaana किंबहुना सेनेला पाडण्यास khanlelyaa खड्ययात स्वताच पडलe

    ReplyDelete
  30. पवारांच्या राष्ट्रवादी 121जागा लढवून फक्त 54 विजय मिलाले, शिवसेनेला125 जागा लढवून फक्त 56विजय मिलाले तर भाजपा 150जागा लढवून105 विजयी झाले.पवारांना कांग्रेसने सत्तेत भागीदार असताना मुख्यमंत्रीपद कधी दिले नाही,तरी साहेबांना 50%ची सेनेची मागणी स्वतःला जमले नाही ते योग्य वाटते.रोहित पवार आता विखें बरोबरचे वैमनस्य संपवून घराणेशाही टिकवण्यासाठी त्यांच्याकडे मदत मागत आहेत तर प्रफुल्ल पटेल शिवसेनेनी न मागता बाहेरुन पाठिंबा द्यायला तयार झाले आहेत.पार्थ अजित पवारांचा लोकसभा निवणूकीत पराभव झाला.हे सर्व शरद पवारांच्या घराणेशाहीच्या अतिरेकामुले मतदार राष्ट्रवादीकडे पाठ फिरवत आहेत असे दिसते. हा तर त्यांचा नैतिक पराभव आहे

    ReplyDelete
  31. Kiti खटाटोप.प्रश्न पवार वाढल्याचा नाही. सरकारची बडमाशी लोकांनी ओळखली.

    ReplyDelete
  32. लेख लिहून एखाद्याच मूल्यमापन करन सोपं असतं एखादा आमदार निवडून आणण्यापेक्षा

    ReplyDelete

  33. 1) 2014 साली जे 122 आमदारांचे यश भाजपला मिळाले होते ते *मुळात फडनवीसांचे यश नव्हतेच.* भाजप शिवसेना वेगळे लढूनही ��स्व.गोपीनाथ मुंडे, ��जेष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, मुनगंटीवार, महादेव जानकर, राजू शेट्टी, स्व.फुंडकर *अश्या सर्वांनी मिळवलेले ते यश होते हे लक्षात घ्या.* ����

    2) यावेळी फडणवीसांच्या पाठीशी संपूर्ण दिल्लीची ताकत होती, मोदींचा करिश्मा होता, सगळी मीडिया ताब्यात होती, शिवसेनेसोबत युती होती, 5 वर्ष केलेली जाहिरातबाजी होती, प्रचंड पैसा होता, समोर पवार सोडता कोणताही विरोधक शिल्लक राहिलेला नव्हता, सगळ्या यंत्रणा (ED, पोलीस, प्रशासन) ताब्यात होत्या, स्वपक्षातील स्पर्धक संपवले गेले होते आणि एवढं पण कमी की काय म्हणून कमीत कमी पाच पन्नास विरोधी नेते फोडून भाजप मध्ये घेतले होते, *तरीही 100 गाठायला सुद्धा फडणवीस यांची दमछाक झाली. मग कसले आले कर्तृत्व ?*

    3) *बरं आता जे 105 आलेत त्यातले निम्मे तर मूळचे काँग्रेस-राष्ट्रवादी वालेच आहेत,* मग यांचा "स्ट्राईक रेट" सुद्धा नवीन गाजर आणि फेकफेकी म्हणायचं का ? *तुम्हाला तुमच्या नागपूर जिल्हातील आमदार सुद्धा राखता आले नाही

    4) मुळात फडणवीसांना महाराष्ट्राने नाकारलं आहे, स्वतःला सुद्धा महाराष्ट्रातील पहिल्या 10 सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आलेल्या नेत्यांमध्ये स्थान का मिळवता आले नाही ?

    5) यासर्वांच कारण तुमचं *खुनशी* राजकारण, तुमचं *वर्चस्ववादी* राजकारण, स्वकर्तुत्वाने मोठं होण्यापेक्षा *दुसऱ्याला संपवून स्वतःला मोठं करण्याचं* राजकारण, *स्वपक्षातील नेत्यांना संपवून* स्वतःला मोठं करण्याचं राजकारण.

    ReplyDelete
  34. महाराष्ट्राचा विचार केला तर भाजपा पेक्षा शिवसेना पक्षाबद्दल मा.बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आपुलकी जास्त वाटते, भाजपा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच शिवसेनेला संपवायला पूरक धोरणे राबवतो, इथून पुढे भाजपा च्या जागा कमीच होत जाणार

    ReplyDelete
  35. तमाम भक्तां साठी
    कुठल्या पेपर चा अग्रलेख नाही हा भक्ताचा आगडोम्ब आहे. अपेक्षित यश मिळालं नाही म्हणून!!! 220 च्या वल्गना करून 99 वर थांबल की होनारच आणि विषय पवार साहेब साहेबांचा ,ह्या कार्ट्या ला इतिहास माहित नाही वाटतं. 1999 पर्यंत 140 सीट्स च्या वर होत्या आणि तुमच्या पक्षाला 1951 पासून जवळपास ७०वर्ष झाली, आणि 20 वर्ष असलेल्या, राष्ट्रवादीशी बरोबरी करताय. आणि तुलना करताना दक्षिणेतल्या पक्षांशी कसली करता, तिकडे व्यक्ति केंद्रित राजकारण होत, एखादा अभीनेता ही तिकडे पक्ष काढुन यशस्वि होवू शकतो, आपल्याइकडे जेवढ काम pawar साहेब साहेबांनी केलय तेवढ जर दक्षिणेत केले असते तर आज तिकडे साहेबांची मंदिरे, उभी असती.
    तुलना बघा
    भा ज पा- 70 वर्षे-99 सीट्स (30 आयात ncp+ cong)
    शिवसेना-54 वर्षे- 54 सीट्स
    कांग्रेस- 125 वर्षे-44 सीट्स
    म न से- 13 वर्षे- 1 सीट्स
    राष्ट्रवादी- 20 वर्षे-55+6 पुरस्कृत=60

    स्ट्राइक रेट याला म्हणतात!!! 😂😂😂😂
    द्राक्ष अंबट असतात कोल्ह्याला!!!

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या म्हणण्यानुसार पवार साहेबानी पक्ष काढून २० वर्षात ६० जागा मिळवल्या. जर हे कर्तृत्व मोजायचं माप असेल, तर त्यांच्या अनेक वर्षांच्या राजकारणाचा नक्की काय फायदा पक्षाला झाला ते सांगू शकाल का? कारण त्यांनी मिळवलेल्या "यशाचा" कुठल्यातरी पक्षाशी "युती" करण्यापलीकडे काही उपयोग नाही. मग त्यानुसार मोदींनी १५ वर्ष गुजरात मध्ये "मुख्यमंत्री" म्हणून काढली, आणि ते एकदम देशाचे "पंतप्रधान" झाले, पवार साहेब गेली ५०-६० वर्ष राजकारणात असूनही थोड्या दिवसांसाठी "संरक्षण मंत्री" आणि "कृषिमंत्री" ह्यापलीकडे जाऊ शकले नाहीत. ह्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल?

      Delete
  36. पवार साहेबांना महाराष्ट्राच्या विकासाशी काही संबंध नव्हता त्यांनी फक्त स्वतःचा विकास केला...त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं...
    ते जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांनी काय बुध्दी गहाण ठेवली होती का? तेव्हा का विकास केला नाही...आता म्हणतायेत कुठं नेऊन ठेवला महारष्ट्र माझा

    ReplyDelete
  37. पवारांना कधी बहुमत आवडतच नाही.. मला वाटते कि त्यांना खरेच पंतप्रधान किंवा असा मोठा नेता व्हायचेच नाही कारण स्वतःची उपयुक्तता आणि क्षमता सिद्ध करण्यापेक्षा त्यांना स्वतःचे उपद्रवमूल्य सिद्ध करून लोकांना स्वतःच्या तालावर नाचवण्यातच जास्ती रस असतो.. आणि ते अशाच संधी शोधतात.. आणि माणूस ज्याच्या पाठी लागतो तेच त्याला मिळू शकते. त्यांना आणि बाकीच्या पत्रकारांना खरा आनंद याचा झाला कि भाजप स्वबळावर जिंकली नाही आणि त्यातून शिवसेनेसोबत जाण्याशिवाय पर्याय उरला नाही.. त्यातून आता पवारांना पुन्हा एकदा त्यांचे उपद्रवमूल्य सिद्ध करण्याची संधी मिळाली. आत्ता बहुमत मिळाले असते तर पवार महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार झाले असते. तसे घडले नाही याचाच आनंद सगळे साजरा करत आहेत.

    ReplyDelete
  38. What mesmerises me is that why this kind of analysis we never get from any other political analyst? Why Kumar Ketkar is conspicuously silent today as if he is not in existence.In fact such analysis paves the way for future sure success provided you learn the right lesson. hats off to you.

    ReplyDelete
  39. राजकीय यश अपयश भले पवार साहेबांना आले असेल तर त्याला एकटे पवार साहेब कसे, त्याला काॅग्रेस जबाबदार आहे, भ्रष्टाचार सर्व पक्षांनी केला आहे ,

    ReplyDelete
  40. पवारांची तुलना ममता बॅनर्जी आणी जगमोहन रेड्डी सोबत होऊच शकत नाही कारण तुमच्या म्हणण्याप्रमाणे पवार एकाच वर्गात 40 वर्ष राहुन राजकारणाचा अंत्यत चांगला अभ्यास केला आहे . सातत्याने ते 50-70 % घेवुन( आमदार) पास होत असले तरी बॅनर्जी आणी रेड्डी 90% घेणारे कधीही नापास होऊ शकतात ते सातत्याने 90% घेवु शकत नाहीत ज्या गोष्टीत सातत्य नसते ती गोष्ट गुणवत्ता पुर्ण नसते.. बॅनर्जी आणी रेड्डी यांनी state syllabus चाच अभ्यास केला आहे तर पवारांनी state, CBSE and ICSE बोर्डाचा अभ्यास केला आहे.....

    ReplyDelete
  41. शरद पवार हे नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात रस ठेवून राहिलेले आहेत केंद्रातील मंत्रिपदापेक्षा महाराष्ट्राचे अर्थकारण मोठे हे त्यांच्या मनात आहे त्यामुळे ते परत परत महाराष्ट्रात येत आहेत. येथे तुलना ममता किंवा जगनमोहन यांच्याशी एवढीच आहे की त्यांनी स्वबळावर आपल्या राज्यात सत्ता मिळवली जी अजूनही शरद पवारांना साधले नाही.

    ReplyDelete