Monday, December 29, 2014

चॅनेलवाले बहुतही कमात है, आमिरखान खाये जात है



आचार्य अत्रे यांच्या नावावर अनेक विनोद बिनधास्त खपवले जात असतात. त्यांच्या हयातीतही हे चालू होते. आज तर त्याला कोणी आळा घालू शकत नाही. तर त्यातला एक विनोद सध्या गाजत असलेल्या वादग्रस्त चित्रपटामुळे आठवला. तो चित्रपट आहे आमिरखानचा ‘PK’. आचार्य अत्रे यांचे पुर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे असे होते आणि प्र. के. अत्रे असेही म्हटले जायचे. सहाजिकच इंग्रजीत पी. के. असा उल्लेख व्हायचा. शिवाय आपल्या मद्यपानाविषयी सुद्धा अत्रे प्रसिद्ध होते. त्याचाच फ़ायदा घेऊन एक किस्सा ऐकवला जायचा. एका हिंदी कार्यक्रमाला अत्रे हजर झाले आणि आयोजकांनी जाहिर केले, पीके आये पीके आये. तर म्हणे अत्र्यांनी तिथल्या तिथे हजरजबाबी दाखवत म्हटले ‘नही, अभी पीके नही आये’. सध्या गाजत असलेल्या आमिरखानच्या चित्रपटाने नेमके तेच नाव आहे. त्यात काय आहे आणि किती कलात्मक आहे ते ठाऊक नाही, कारण आम्ही तरी तो चित्रपट बघितलेला नाही. पण परग्रहावरून आलेल्या प्राण्याची कहाणी सांगताना धार्मिक टिप्पण्या त्यात झाल्या असल्याने त्याचा अधिक गाजावाजा होत आहे. असे विषय आले, मग त्यावर नेहमीच गदारोळ होतो आणि अशी प्रसिद्धी संपादन करण्यात अनेक पुरोगामी कमालीचे ख्यातनाम आहेत. अधिक त्यांच्या अशा नगण्य निरूपयोगी कृत्याला महान समाजप्रबोधन ठरवणारेही आपल्याकडे कमी नाहीत. कैलास सत्यार्थी नावाचा माणूस आपल्याच देशात आहे आणि त्याने नोबल पारितोषिक संपादन करण्याइतके महान कार्य केले असल्याचे, आपल्याला त्याच्या जागतिक मान्यतेनंतर उमगते. पण कुठलेही तसे योगदान नसताना आमिरखान मागल्या काही वर्षात थोर समाजसुधारक असल्याचे आपले गृहीत आहे. यातून आपल्या माध्यमांची व पत्रकार विचारवंतांची एकूण लायकी आपल्या लक्षात यायला हरकत नाही.

तर PK हा चित्रपट सध्या खुप गाजतो आहे. यात PK या इंग्रजी अक्षरातून कोणता बोध होतो, ते आमिरखानच्या समर्थकांनाच माहित. पण त्याचा पहिला गाजावाजा झाला, तो त्याच्या नग्न चित्रामुळे हे आठवते. येऊ घातलेल्या निर्माणाधीन चित्रपटाची जाहिरात पुर्वीच्या काळात पोस्टरपासून व्हायची. हल्ली तो जमाना मागे पडला होता. आता येणार्‍या वा निर्माणाधीन चित्रपटांचा गवगवा थेट चित्रणातील गडबडी वाहिन्यांवर दाखवून होत असतो. पण त्याऐवजी अशी काही चमत्कारिक पोस्टर्स प्रसिद्ध करून आमिरखानने जाहिरात सुरू केली होती. विपरित मार्गाने प्रसिद्धी मिळवण्यातला त्याचा हातखंडा मानावाच लागेल. अब्रु झाकण्याच्या जागी ट्रांन्झीस्टर ठेवून असलेले त्याचे संपुर्ण नग्न वाटणारे पोस्टर आले आणि तिथून PK चित्रपटाचा गदारोळ सुरू झाला होता. त्याचीच फ़ळे सध्या आपण चाखत आहोत. आपल्यावर बंदी घालण्याची मागणी हा हल्ली लोकप्रियतेचा फ़ंडा झालेला आहे. त्याप्रमाणे मग PK चित्रपटावर बंदीची मागणी झाली. असे काही झाले, म्हणजे तात्काळ त्यामागे संघ वा हिंदूत्ववादी मंडळी असतात, असाही एक अत्यंत लोकप्रिय पुर्वग्रह आपल्याकडे प्रचलित आहे. त्यामुळेच अशी मागणी येताच त्याचे खापर हिंदुत्वावर फ़ोडायला अनेकजण पुढे सरसावले तर नवल नाही. थोडक्यात त्यातून आमिरखानने गल्ला जमा करून घेतला. आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय अशा ‘कौन बनेगा करोडपती’ नामक टिव्ही मालिकेची जाहिरात सुद्धा दिर्घकाळ करावी लागली होती. पण आमिरखान मात्र फ़ुकटात प्रसिद्धी पदरी पाडून घेण्यातला खरा कलावंत आहे. कुठल्या तरी वादात शिरायचे आणि यातून विनाखर्च बेफ़ाट प्रसिद्धी मिळवायची, असा त्याचा खाक्या राहिला आहे. PK चित्रपटाच्या पोस्टरपासून त्याने त्याचा छान वापर करून घेतला. मात्र त्याच्या मागे धावत सुटलेल्यांना आपण कुठे भरकटलो, त्याचा अंदाज येऊ शकलेला नाही.

आमिरखानने अशा भंपक विचारवंत आणि व्यापारी माध्यमांविषयी आपले भाष्य यापुर्वीच केलेले आहे. असे लोक कधी समाजाच्या कल्याणाचा किंवा सुधारणांचे पूजक नसतात, तर कुठल्याही मार्गाने गल्ला गोळा करणारे बाजारू बुद्धीमंत असतात. असा सिद्धांत मांडणारा ‘पिपली लाईव्ह’ नावाचा चित्रपटही आमिरनेच काढला होता. कर्जबाजारीपणाला कंटाळून होणार्‍या आत्महत्या आणि त्यामागचे माध्यमांचे मार्केटींग. यावर तो चित्रपट आधारलेला होता. गिधाडाप्रमाणे बाजारू माध्यमे लोकांच्या जीवनाशी व भावनांशी कशी खेळतात, त्याचे अत्यंत विदारक चित्रण त्यामध्ये होते. वैषम्य याचेच वाटते, की आज तोच आमिरखान तशाच माध्यमांचा तितकाच बाजारू वापर आपला गल्ला भरण्यासाठी करून घेतो आहे. माध्यमांना हिंदू संघटना व हिंदूत्ववाद यांना लक्ष्य करण्यात धन्यता वाटत असते आणि तितकेच बाजारू विचारवंत त्यात उत्साहाने सहभागी होतात, याचे पुर्ण भान असलेल्या लोकांनी PK चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यातून मग गल्ला जमा व्हायला खिशातली दमडी खर्चायला नको, याचेही त्यांना पुर्ण भान होते. जाहिरातीपेक्षा बातमी अधिक परिणामकारक असते याची जाणिव झाल्यापासून माध्यमात पेडन्युज नावाचा प्रकार खुपच बोकाळला. राजकारणात त्याचा उपयोग होत असला, तरी चित्रपटाच्या क्षेत्रात आमिरखान त्याचा मस्त उपयोग करून घेताना दिसतो. अन्य चित्रपटाच्या जशा खर्चिक जाहिराती असतात, तसा कुठलाही खर्च केल्याशिवाय PK ने केलेला धंदा म्हणूनच लक्षणिय आहे. त्यासाठी राबलेल्या माध्यमांना पेडन्युज म्हणून किती पैसे मिळाले, त्याचा कुणीतरी शोध घेतला पाहिजे. अन्यथा अशा फ़डतुस चित्रपटासाठी इतका गाजावाजा व्हायचे काही कारण नव्हते. गल्लाभरू चित्रपट आणि त्यात समाज सुधारणा शोधणारे दिवटे बघितले, मग इतक्या शतकानंतरही भारतीय बुद्धीवाद असा दिवाळखोर कशाला राहिला, त्याचा अंदाज येऊ शकतो.

हा गाजावाजा होऊन PK चित्रपटावर हिंदूत्ववादी संघटनांनी बंदीची मागणी केली, यात नवे काहीच नाही. यापुर्वी अशा अनेक बाबतीत अनेक धर्माच्या संघटनांनी काही चित्रपट-पुस्तके यावर बंदीची मागणी केलेलीच आहे. भावना दुखावणे किंवा श्रद्धेची हेटाळणी अशा विषयावर अशी वादळे उठतच राहिली आहेत. पण PK प्रकरणात आता एका मुस्लिम धार्मिक नेत्यानेही बंदीची मागणी केल्याने बुद्धीवादी कलावादी किती बेफ़ाम झालेत, त्याचा अंदाज येऊ शकतो. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना खालिद रशिद फरांगी महाली यांनीही PK वर बंदीची मागणी केली आहे आणि त्यासाठी त्यांनी दिलेले कारण मोलाचे व वास्तववादी म्हणावे लागेल. सध्याचे वातावरण धर्मांतरण, लव्हजिहाद किंवा तत्सम कारणांनी विस्कटलेले असताना, अशा चित्रपटांनी त्या आगीत तेल ओतले जाऊ शकते. म्हणून PK वर बंदी घालावी असे मौलाना म्हणतात. त्यांनी धार्मिक श्रद्धा व भावना म्हणून नव्हेतर त्यातून होणार्‍या भीषण परिणामांना प्रतिरोध होण्यासाठी बंदीची मागणी केली आहे. ती रास्त एवढ्यासाठी आहे, की परिणामांना महत्व असते. ज्यातून सामाजिक सौहार्दाला बाधा येऊ शकते आणि सामाजिक वितुष्ट निर्माण होऊ शकते, अशा गोष्टींना रोखायला हवे. कला व साहित्य बुद्धीला चालना देणारे असले, तरी त्यातून सामाजिक वितुष्टाचा भडका उडण्याची शक्यता असल्यास त्यावर प्रतिबंध असावा. तस्लिमा नसरीन या लेखिकेने तर वर्मावरच बोट ठेवले आहे. पाकिस्तान बांगला देशात असा चित्रपट काढणार्‍याची एव्हाना हत्याच झाली असती, असे तस्लिमा म्हणते, त्यातून हा हिंदूत्वाचा विषय नसून हिंदूंच्या सोशिकतेचा निकष असल्याचेच प्रमाण मिळते. पण PK ची छडी बनवून हिंदूत्व आणि हिंदूत्ववादी संघटनांना झोडपणार्‍यांना सत्याचा सूर्य कोणी दाखवायचा? एकूणच घटनाक्रम बघून आमिरच्याच ‘पिपली लाईव्ह’मधले गाणे आठवले. शब्द बदलून असे म्हणूया,

चॅनेलवाले बहुतही कमात है
आमिरखान खाये जात है


4 comments:

  1. We question everyone but beware, our faith is too sacred to be questioned.
    Now I will answer few of the questions in this post as I understood them
    1. Amir is gathering publicity by hosting shows like "Satyamev jayte" and making films like "Peepli live" or "PK"
    We are fine with actors living their personal life as it is but we start questioning everything once celebrities come out and open their mind like we do(out of jealosy? why do they get so much publicity). We don't care even if those issues are reaching PMO directly because of his celebrity status he should be normal.
    2. Nude posters?!! Pure publicity stunt no meaning.
    I feel there is symbolic meaning to it if you watch movie. He is free of all prejudices(think of them as clothes) and will believe in your faith once he finds out it is plausible. Now if you don't think it hold true here please refrain yourself from visiting Khajuraho! (Please search for images. Yes it is Hindu temple(Mahadev), sacred again! Please try not demolish it Mughals tried it once.)
    3. PK is making money and we got problem with it.
    We don't have problem with "Happy new year" "Ek tha tiger" making money but a movies like "Oh my god" "PK" should not make any profits, so no one in future will dare to make movies like this. And morons like me(this is what we are being called "Divate") try and get some social message out of it #banishThem. (No profit no movies. Simple isn't it?) And we live happily(praying) ever after.
    4. Why hinduism being questioned?!
    It is like asking why "Da vinci code" by Dan Brown questions christ and bible in its current form, they could have criticised Muslim, Jews or Hindus. If you don't know book claims bloodline of christ do exists and still it was not banned how weak is vatican? #sarcasm
    5. If we were in Pakistan or any muslim country we would have killed you by now!
    Please see with what you are comparing yourself to... (No offence but you need to be more tolerant and leave your prejudices)
    6. Common we were doing all this for fun! we all like debates don't we?
    Yes I do. But look where you are doing all this and to whom you are broadcasting this message to. Broadcast vs Multicast please know the difference.
    Now you are free to curse me or call me divta again. This is last time I am debating on this topic, I am not Amir Khan and I am giving up on you!

    ReplyDelete
  2. Hi gokul, please read it again.. it may be beacause ur limited knowledge about marathi... and don't try to mix other things and movies like OMG with this article... by the way am atheist with open eye... its (article) all about how the promotion of the things are going now a days without thinking the outcome of it among the morons like us...thats all!!! Its my last reply to you as well.

    ReplyDelete
  3. आजकालचे सिनेमे शाळकरी आहेत काही अपवाद वगळता. हे सर्व बंद करून लोकांना जुने क्लासिक्स पहा म्हणावं. सिनेमा बनवायला आणि पाहायला हि डोकं लागतं. आजचे हिंदी सिनेमे (आणि त्यातली टीन एजर अति-सुगम गाणी) हे आपल्या गेल्या दोन दशकातल्या "इन्स्पेक्टर महेश" वाल्या सिनेमांच्या लायकीचे हि नाहीत. डोकं वापरायची तयारी नाही कुणाची.

    ReplyDelete