Monday, February 12, 2018

‘इस्त्रायली’ शस्त्रक्रीयेची तयारी?

israeli airstrike के लिए इमेज परिणाम

गेल्या काही दिवसात व महिन्यात काश्मिरी नियंत्रण रेषेवर अखंड धुमश्चक्री चालू आहे. एक बाजूला सीमेपलिकडून तुफ़ान हल्ले सुरू आहेत आणि त्या़चवेळी भारतॊय काश्मिरात घातपाती कारवाया वाढलेल्या आहेत. त्यामध्ये एक युद्धनिती असल्याचे सहज लक्षात येऊ शकते. काही घडामोडी प्रत्यक्ष रणभूमीवरच्या आहेत. त्याचवेळी भारतीय सेनादलाला व सरकारी काश्मिरी नितीला खच्ची करण्याचेही युक्तीवाद तावातावाने सुरू झालेले असतील, तर त्याला राजकारण नव्हे, शत्रूची युद्धनितीच समजणे भाग आहे. कॉग्रेसच्या काही नेत्यांनी भारताच्या सरसेनापतीला गल्लीतला गुंडा संबोधणे वा भारतीय सेनेच्या कारवाईलाच अतिरेकी ठरवण्याचे मतप्रदर्शन त्यात येते. अशा पार्श्वभूमीवर काश्मिर विधानसभेत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा होतात आणि मेजर आदित्य या सेनाधिकार्‍याच्या विरोधात मुफ़्ती सरकार हत्याकांडाचा गुन्हा दाखल करते, ही गंभीर व चिंतनीय बाब आहे. यामागे काही भीषण कारस्थान शिजलेले जाणवते आणि त्याचा बंदोबस्त नुसती चाणक्यनिती करू शकणार नाही. त्याचा बंदोबस्त शस्त्राच्या मदतीनेच करावा लागणार आहे. थोडक्यात सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानला नुसता आजारातून बरा करू शकलेला नसेल, तर शस्त्रक्रीयाच उरकावी लागणार आहे. आठवडाभर काश्मिरात हा धुमाकुळ चालू असताना दिल्लीतली शांतता खटकणारी आहे. तितकीच मनात शंकाही निर्माण करणारी आहे. दिल्लीत काहीतरी शिजते आहे, अशी म्हणूनच शंका येते. आतापर्यंत अनेकदा नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय सैनिक व कमांडोंनी कठोर कारवाई केलेली आहे. ती पुरेशी नसेल तर इस्त्रायल पद्धतीने शस्त्रक्रीया करण्याला पर्याय नाही. इस्त्रायली सर्जरी म्हणजे शत्रूला निदान पुढले वर्ष दोन वर्षे डोके वर काढता येऊ नये, असा बंदोबस्त असतो. कालपरवाच सिरीयामध्ये इस्त्रायलने अशीच शस्त्रक्रीया उरकलेली आहे. पाकव्याप्त काश्मिरात तशा शस्त्रक्रीयेसाठी दिल्लीत तयारी चालली आहे काय?

मागल्या दोन महिन्यात काही मोठ्या घटना घडलेल्या आहेत. पण आपल्या देशातील शहाण्यांना, न्या. लोयांचा मृत्यू किंवा गुजरातच्या निवडणूकांत व्यस्त असल्याने अशा घटना बघता आलेल्या नाहीत. काही महिन्यांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायलला भेट देऊन आले. त्याची परतफ़ेड म्हणून इस्त्रायली पंतप्रधान बेन्जामीन नेतान्याहू सात दिवसाचा भारत दौरा नुकताच उरकून गेले. अशा भेटीनंतर कालपरवा पॅलेटाईनला मोदींनी भेट दिली व आखाती देशांचाही दौरा केलेला आहे. आखाती अरबी देश आणि इस्त्रायलचे शत्रूत्व आजकाल मंदावले आहे आणि अनेक बाबतीत त्यांच्यात संगनमताने कारवाया होत असतात. त्यात कुठे पाकिस्तानला स्थान राहिले नाही. म्हणूनच उद्या भारताने पाक विरोधात शस्त्र उपसले, तर कुठलाही मोठा मुस्लिम देश पाकिस्तानच्या समर्थनाला उभा रहाणार नाही. म्हणूनच नेतान्याहू यांच्या भारतभेटीने पाकिस्तानला पोटदुखी जडलेली होती. भारतीय वाहिन्यांइतकाच पाक वाहिन्या व माध्यमात या भारतभेटीचा उहापोह चालू होता. भारताला इस्त्रायल गनिमी युद्धाची रणनिती शिकवणार काय आणि त्यासाठी आवश्यक साहित्य पुरवणार काय, ही पाकिस्तानची चिंता होती. आज नेमकी तशीच वेळ आलेली आहे आणि त्याच मुहूर्तावर इस्त्रायलने त्याचे ताजे प्रात्यक्षिक सिरीयावर हल्ला करून दिलेले आहे. सिरियातून इस्रायलची खोड काढली गेल्यावर त्या इवल्या देशाने असा मोठा धमाका करून टाकला, की उध्वस्त सिरीयाला आणखीच बेजार करून टाकलेले आहे. रशिया व इराणच्या पाठबळावर सिरीयातील काही गटांनी इस्त्रायलवर क्षेपणास्त्राचा हल्ला करण्याचा पोरखेळ केला. द्रोण उपकरणाचा उपयोग होत असल्याचे दिसताच इस्त्रायली विमानांनी पाठलाग केला आणि त्यात विमानावर प्रतिहल्ला झाला. त्याचे उत्तर देताना इस्त्रायली सेनादलाने सिरीयाला आणखी जायबंदी करून टाकलेले आहे.

इस्त्रायलची ही युद्धनिती नवी नाही. लेबॅनॉन वा अन्य शेजारी देशांच्या विरोधात इस्त्रायलने तिचा अनेकदा उपयोग केलेला आहे. आपली कुरापत काढली गेल्यावर या देशाने तशा शेजारी देशाला इतके हल्ले करून उध्वस्त केले, की तिथल्या अशा घातपाती वा गनिमी कावा करणार्‍यांना पुन्हा डोके वर काढण्यालाही दिडदोन वर्षे लागली पाहिजेत. किरकोळ हल्ला झाला तरी अक्षरश: युद्ध पुकारल्यासारखी इस्त्रायली सेना चौफ़ेर हल्ला चढवते. या भागातील उच्चप्रतीचे हवाईदल इस्त्रायलपाशी असल्याने, ते इतके भेदक हवाई हल्ले करतात, की त्यात शत्रू देशाच्या पायाभूत सुविधाच उध्वस्त झाल्या पाहिजेत. त्यात मग नागरी वस्त्या वा लष्करी तळ यात भेदभाव केला जात नाही. सहाजिकच शत्रू देशाची लष्करी ताकद खच्ची होतेच. पण तिथे नागरी अराजक निर्माण होते. त्यातून सावरण्याचे काम पुन्हा लष्करालाच उरकावे लागणार असते आणि शत्रू देशाची खुद्द लष्करी यंत्रणाच उध्वस्त होऊन गेलेली असते. परिणामी अशा संकटातून पुन्हा उभारी घेण्याला दिर्घकाळ खर्ची घालावा लागतो आणि तितका काळ या शेजारी देशाला इस्त्रायलची कुरापत काढण्याचे बळच शिल्लक रहात नाही. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा युद्ध थांबवण्यासाठी जगातले अन्य मोठे देश हस्तक्षेप सुरू करतात आणि त्यामुळेच शत्रू देशाला फ़ारसे नुकसान झाल्याशिवाय अशा कुरापती पचून जातात. हे लक्षात आल्यावर इस्त्रायलने ही नवी युद्धनिती योजलेली आहे. त्यात सेनादलाने प्रतिहल्ला युद्धपातळीवर करायचा आणि त्याचवेळी मोठ्या देशांनी हस्तक्षेप केल्यावर वाटाघाटी व चर्चांमध्ये पररष्ट्रमंत्री विलंब करीत बसतात. त्यातून चारपाच दिवसात शत्रूचे कंबरडे मोडण्याइतके खोलवर हल्ले व विध्वंस उरकून घेतला जातो. पाकिस्तानच्या मस्तवालपणाला आवाक्यात आणण्यासाठी अशाच ‘इस्त्रायली शस्त्रक्रीये’ची आता गरज आहे.

मागल्या दोन वर्षातले काश्मिर वा भारतीय लष्करी तळावरील जिहादी हल्ले पाकिस्तानकडून झालेले आहेत. त्याबद्दल आता जगात कोणाला शंका राहिलेली नाही. त्या हल्ले व कुरापतीचा बंदोबस्त भारताने लष्करी मार्गाने करायचा म्हटला, तर त्यात कोणी हस्तक्षेप करू शकणार नाही. अगदी चीनही काही करू शकत नाही. इस्त्रायलवर सिरीयातून झालेल्या ताज्या हल्ल्यामागे रशिया व इराण होते. पण इस्त्रायलने प्रतिहल्ला केल्यावर परिणाम एकट्या सिरीयालाच भोगावे लागलेले आहेत. त्यात इराण वा रशियाने कुठे भाग घेतला नाही. निव्वळ प्रतिक्रीया दिल्या आहेत. पाकिस्तानचा दोस्त चीनही वेळ आल्यास शुभेच्छा देण्यापलिकडे पाकिस्तानला कुठली मदत करू शकणार नाही. करतही नाही. त्यामुळे भारताने उद्या पाकव्याप्त काश्मिरात ‘इस्त्रायली शस्त्रक्रीया’ सुरू केली; तर पाकिस्तान दिर्घकाळासाठी बेजार होऊन रुग्णशय्येवर पडलेला दिसेल. जिहादी घुसवणे सोडा, त्याला आपल्याच सामान्य जनतेला नित्यजीवनातील गरजा भागवताना जीव मेटाकुटीस येईल. मोजक्या  दिवसात व ठरलेल्या अल्पावधीत ‘शस्त्रक्रीया’ ही इस्त्रायली युद्धनितीची खासियत आहे. गेल्या दोन आठवड्यातील लागोपाठचे हल्ले व त्यानंतर भारत सरकारचे त्याविषयीचे मौन, वादळापुर्वी शांतता असावी तसे भासते आहे. आखाती दौरा करून मोदी मायदेशी परतल्यावर त्याचा मुहूर्त शोधला जाऊ शकेल. आता सर्जिकल स्ट्राईक हा विषय उपयोगी राहिलेला नाही. शस्त्रक्रीया हेच उत्तर आहे आणि अशा खर्‍याखुर्‍या अल्पकालीन युद्धाला सामोरे जाण्याइतकी हिंमत व तयारीही पाक सेनेकडे आज उरलेली नाही. त्याचा फ़ायदा उठवून पाकला दिर्घकाळासाठी जायबंदी करून टाकणे योग्य आहे आणि आवश्यकही आहे. हा मुहूर्त उद्यापरवाचा असेल वा काही आठवड्यानंतरचा असेल. पण युद्धाला आता पर्याय राहिलेला नाही, असेच एकूण घटनाक्रम सांगतो आहे.


15 comments:

  1. भाऊ पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना घाबरून अशी कारवाई करण्याचे धाडस आपले राजकारणी दाखवतील का? अर्थात मोदी आणि डोवल हि जोडगोळी आधीच्या लोकांपेक्षा वेगळी आहे. ९९ च्या युद्धात सुद्धा आण्विक अस्त्र वापरले जाऊ शकत होते. आणि पाकिस्तान चा डाव तोच होता कि nuclear umbrella असल्यामुळे भारत कारगिल मध्ये युद्ध करणार नाही आणि वाटाघाटी करेल. पण तो त्यांचा प्रयत्न फोल ठरला.

    त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं व्हावं अशी सगळ्यांची इच्छा आहे. अर्थात युद्ध म्हणजे आपल्या जवानांचे जीव जाणार च. पण तसे जीव तर युद्ध न करता सुद्धा आपण गमावत आहोत (परवाच्या हल्ल्यात ४ अतिरेकी ठार मारताना आपले ५ जवान शहीद झाले).

    ReplyDelete
  2. भाऊ सूक्ष्म निरीक्षण👌

    ReplyDelete
  3. SHastrakriya PoK varch ka? sampoorna Pak la ch shalyakriyechi garaj aahe

    ReplyDelete
  4. You didnt consider the main difference bhau..in Israel, every citizen will support the govt action whereas in India, the media, politicians and few communal groups will cry out loud for any such action against Pak even before Pak reaction.

    ReplyDelete
  5. युद्ध होणे गरजेचे आहे पण आज किती भारतीय नागरिक युद्धासाठी तयार आहेत..युद्धामुळे जर दोन दिवस अन्न टंचाई निर्माण झाली तर लगेच युद्धबंदीची मागणी करतील..फुरोगामी अवॉर्ड वापसी आणि अतिशिक्षित फांडू पाहिले गळे काढतील आणि बहुसंख्य जनतेला नादी लावतील

    ReplyDelete
    Replies
    1. तेच तर काल परवा सरसंघचालक म्हणले कि लष्कराला काही लागले तर संघ 3-4 दिवसात लष्कराला मदत करेल...पण मंदबुद्धी लोकांनी वेगळा अर्थ घेतला

      Delete
  6. ते सध्या आवश्यक आहे

    ReplyDelete
  7. Yesterday Maharashtra Times indicated the option of war but that will be for ambition of Mr Modi and Shaha 's ambition to win election of 2019 so if war happens I doubt whether political parties will take it as national incidence of Modi's political move.In last war all were as one nation now it seems there will be war on border and on political ground also. Because Modo Dwesh.

    ReplyDelete
  8. भाऊ, प्रतिक्रिया देणे अवघड आहे कारण काय चालले आहे समजत नाही. आज सकाळी एक बातमी ऐकली की मसूद अझरला पाकिस्तान ने दहशदवादी म्हणून घोषित केले आहे. हा दिखावा का सत्य हे लवकरच समजेल व सूर्यप्रकाश पडेल.

    ReplyDelete
  9. भाऊ,
    परत एकदा थोर संत मणिशंकर अय्यर काल पाकिस्तानात आपले अकलेचे(?) तारे तोडून आलेत. काय म्हणावं यांना??

    ReplyDelete
  10. भाऊ, तुमचा आशावाद लवकरच खरा ठरो!

    ReplyDelete
  11. Bhau, what about the Muslim vote bank? Vote bank is more important that country's defence.

    ReplyDelete