Saturday, July 7, 2018

पसंतांचे संत

gopal shetty के लिए इमेज परिणाम

भाजपाचे वायव्य मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी एका कार्यक्रमात काही वादग्रस्त विधान केले, म्हणून कल्लोळ माजवला गेला. स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिम व हिंदू खांद्याला खांदा लावून लढले आणि ब्रिटीशांची सत्ता असल्याने ख्रिश्चन मात्र स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नव्हते, असे काहीसे विधान असल्याच्या बातम्या झळकल्या. या देशाचे टुकडे टुकडे व्हावे अशा घोषणा देण्याला अविष्कर स्वातंत्र्य मानले जाते आणि त्यासाठी आपली सर्व बुद्धी पणाला लावण्याला बुद्धीवाद मानले जाते. पण तसेच काहीसे बोलायचा अधिकार भाजपाच्या आमदार खासदार वा समर्थकाला असू शकत नाही. शेट्टी यांचे विधान योग्य की अयोग्य हा विषय तात्पुरता बाजूला ठेवू. मुद्दा अविष्कार स्वातंत्र्याचा असेल, तर कोणालाही बेताल बोलण्याचा अधिकार राज्यघटना देते, असा एकूण बुद्धीवादी पुरोगामी सुर असतो. मग त्यातून गोपाळ शेट्टी यांना कसे वगळता येईल? जो अधिकार नेहरू विद्यापीठातील कन्हैया वा उमर खालीदला असतो, तोच गोपाळ शेट्टींना कसा नाकारता येईल? थोडक्यात ज्यांनी कोणी अवसान आणून कन्हैय्या वा उमरचे समर्थन केले असेल, त्यांनी तितक्याच उत्साहात शेट्टी यांच्याही समर्थनाला बाहेर आले पाहिजे. पण तसे सहसा होत नाही. कारण गोपाळ शेट्टी भारताचे नागरीक असले तरी दुय्यम नागरिक असतात. कारण प्रथम ते हिंदू असतात आणि दुसरे कारण ते हिंदूत्ववादी असतात. सहाजिकच राज्यघटनेने दिलेले कुठलेही अधिकार त्यांच्यासाठी लागू होत नाहीत. संधी मिळेल तिथे त्यांना गुन्हेगार ठरवण्याला पुरोगामीत्व मानले जात असते. तीच कहाणी आसाराम बापू वा अन्य हिंदू संतमहंत वा बुवामहाराजांची असते. त्यांना भोंदूगिरी करण्याची मुभा नसते आणि अन्य धर्माचे कोणी मुल्लामौलवी किंवा फ़ादर बिशप वगैरे असतील, तर त्यांना मुले पळव्ण्यापासून बलात्कार करण्यापर्यंत ‘अविष्कार स्वातंत्र्य’ मिळालेले असते.

गोपाळ शेट्टी यांचे विधान एका कार्यक्रमातले आहे. पण त्याच दरम्यान केरळच्या चर्चमध्ये अगतिक महिला मुलींचे लैंगीक शोषण व बलात्कार ख्रिश्चन धर्मगुरूंनी केल्याच्या किरकोळ बातम्या आलेल्या आहेत. आम्ही ती बातमी लपवलेली नाही, अशी शपथ घेण्याची मोकळीक असावी, म्हणून त्या बातम्या छापण्यात आल्या. किवा देण्यात आल्या. पण त्यावर कोणी चर्चा केल्या नाहीत वा अग्रलेख लिहीले नाहीत. पण अशा वेळी मूग गिळून गप्प बसणार्‍यांची रसवंती रामरहीम नावाच्या हरयाणाच्या कुणा बुवा महाराजाच्यावेळी दुथडी भरून वहात होती. आसाराम बापूने किती मुली महिलांचे लैंगिक शोषण केले, त्याचा शोध दुर्बिणी व भिंगे लावून घेतला जात होता आणि एकामागून एक अध्याय रंगवून मांडले जात होते. तसे काही केरळचे ख्रिश्चन पादरी वा धर्मगुरू करून बसले, मग त्याविषयी कोणाला चार शब्द सविस्तर कथन करायची हिंमत होत नाही. कशी गंमत आहे ना? देशाचे संविधान एकच आहे, पण त्याची धर्मनिहाय वा पक्षनिहाय अंमलबजावणी भिन्न होत असते. म्हणजे असलाच प्रकार कुठल्या मुल्लामौलवीने केल्याच चार ओळीची बातमी पुरेशी असते, ख्रिश्चन धर्मगुरूने केल्यास त्याचा गवगवा होऊ द्यायचा नसतो. मग आपण पुरोगामी आहोत, याचे समाधान मिळत असते. ना पत्रकार बोलणार ना त्यांचे एकाहून एक मठाधीश विचारवंत तोंड उघडणार. मदर तेरेसा किंवा तत्सम संत लोकांच्या गोष्टी तर खुपच प्रतिबंधित असतात. कोणा बुद्धीमंत संपादकाने त्यावर आघात केला, तरी त्याला थेट संपादकीय लेख मागे घेण्यापर्यंत आपलीच थुंकी गिळावी लागत असते. कारण मदर तेरेसा ह्या ‘पसंतांच्या संत’ असतात आणि बापू आचार्य वगैरे ‘असंतांचे संत’ असतात. सहाजिकच चुकून कुठे पसंतांच्या संताला धक्का लागला, तर थेट लोटांगण घालून पुरोगामी चरणावर शरणागती पत्करावी लागत असते.

Image may contain: text

याचेही मोठे कारण आहे. जगभरच्या चर्च वा इस्लामी संघटना ह्या धार्मिक निधी गोळा करून गुंतवणूकीच्या माध्यमातून प्रसार साधनांना मुठीत ठेवत असतात. २००१ सालात न्युयॉर्कच्या जुळ्या मनोर्‍यावर विमाने आदळून घातपात करण्यात आला. तेव्हा आरंभी त्यात सौदी अरेबियाचे जिहादी असल्याचा दावा केला जात होता आणि तेच सत्य होते. पण दोन तासानंतर सगळ्यांनी सौदी हा शब्द वगळून निमूट इस्लामिस्ट हा शब्द वापरायला सुरूवात केली. पुढे कुठल्याही पाश्चात्य वाहिनी वा माध्यमात सौदी हा शब्द येऊ शकला नाही. कारण अशा बहुतांश माध्यम समुहांच्या कंपन्यांमध्ये सौदी राजपुत्राची प्रचंड गुंतवणूक होती आणि त्याने ती गुंतवणूक काढून घेण्याची धमकी देताच जगभरच्या माध्यम समूहांचे अवसान गळाले. अविष्कार स्वातंत्र्य गुंडाळून त्यांनी सौदी घातपाती हा शब्द काढून टाकला. हे जगभरच्या एकाहून एक मोठ्या माध्यम कंपन्यांसाठी घडत असेल, तर भारतातल्या नव्याने रांगणार्‍या माध्यम समूह कंपन्यांची काय कथा? त्यांना विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणूकीवरच रुबाब मारता येत असतो. त्यांचे परस्पर नियंत्रण अशा बहुराष्ट्रीय कंपन्या करीत असतील, तर मालकाच्या पसंतीचे संत गुणाचे पुतळे ठरवण्याला पर्याय नसतो. मग घरात उगाच शिरजोरी करावी लागत असते. जगभर थपडा व खेटरे खाऊन दारूच्या धुंदीत घरी परतणार्‍या पराभूत बेवड्या नवर्‍याने घर संभाळणार्‍या बायकोच्या कंबरेत लाथ घालण्याची मर्दुमकी गाजवावी, तसा हा एकूण पुरोगामी पुरूषार्थ असतो. आसारामला लाथा घातल्याने त्यांना आपल्या अविष्कार स्वातंत्र्याच्या बेडकुळ्या फ़ुगवल्याचा टेंभा मिरवता येतो. ख्रिश्चन धर्मगुरू वा मौलवींच्या पापावर पांघरूण घातल्याच्या नामुष्कीची बेअब्रू झाकताही येत असते. म्हणूनच मदर टेरेसा यांच्या निर्मल हृदय नावाच्या संस्थेतून मुले पळवून विकली जातात, त्यावर छातीठोकपणे बोलायची हिंमत नसते. त्यापेक्षा शेट्टीला झोडणे सोपे असते ना?

झारखंड राज्यातील या निर्मल हृदय संस्थेतील एका अर्भकाला लाखाहून अधिक किंमतीत विकण्यात आले आणि त्याविषयी तक्रार आल्यावर मदर टेरेसांच्या संस्थेतील दोघा जोगीणींना पोलिसांनी अटकही केलेली आहे. पण हे एकमेव प्रकरण आहे वा तिथून असेच राजरोस खरेदी विक्रीचे प्रकार चालतात काय, याचा शोध छुपे कॅमेरे वा गौप्यस्फ़ोट करणार्‍यांना आवश्यक वाटलेला नाही. कुठल्याही वाहिनीला त्याविषयी सविस्तर चर्चा करण्याची गरज वाटलेली नाही. जणू कुठल्या नाक्यावर कुत्र्याचे पिलू गाडीखाली सापडून मेले असावे, इतक्या तटस्थपणे अलिप्तपणे ह्या बातम्या छापून सर्वजण मोकळे झाले. बिचार्‍यांना राज्यघटनेने खुप अधिकार दिलेले आहेत. पण ते वापरण्यासाठी जी स्वयंभूवृत्ती लागते वा स्वतंत्र बुद्धी लागते, त्याचाच दुष्काळ असल्यावर दुसरे काय व्हायचे? हाच प्रकार हिंदूंच्या बाबतीत असला, मग गळ्यातले पट्टे सैल होतात आणि शिकारी शोधक कुत्रासारखे अविष्कार स्वातंत्र्य सुसाट वास काढत गुन्हेगारांचा शोध घेऊ लागते. धार्मिक निधीच्या गुंतवणूकीवर ज्यांच्या चरितार्थाची गरज भागवली जात असते, त्यांना अशा गोष्टीतले स्वातंत्र्य गहाण टाकावेच लागणार ना? मालकाने छु केल्यावर भूंकायचे हे कर्तव्य बनलेल्यांना कुठलीही राज्यघटना वा अविष्कार स्वातंत्र्य कसली हिंमत देऊ शकते? त्यांच्याकडून कुठली अपेक्षा बाळगता येते? तात्काळ असे स्वातंत्र्यवीर पादर्‍यांच्या पायघोळ झग्याखाली दडी मारतात आणि डोळ्यावर तोच झगा ओढून शेट्टी काय म्हणाले त्याच्यावर भुंकू लागतात. कारण खर्‍या चोरांवर भूंकायला स्वयंभूता लागते आणि इथे तीच गहाण टाकलेली आहे ना? भारतीय पत्रकारिता व बुद्धीवादाची हीच तर शोकांतिका आहे. त्यांना इस्लामी व ख्रिश्चन धर्मनिधीने विकत घेतलेले असून, त्याच्या पसंतीच्या संतांच्या आरत्या आणि हिंदू संतांची निंदानालस्ती, हे कर्तव्य बनून गेलेले आहे. त्याला पुरोगामीत्व असे गोंडस नाव देण्यात आलेले आहे.

17 comments:

  1. मदर तेरेसा या संत नव्हत्या. ख्रिस्ती पंथ प्रसारासाठी त्यांनी समाजसेवेचा मार्ग वापरुन यशस्वीरीत्या धर्मांतरे घडवली. किती चक्रधरांच्या भेद झाला ? कुंडलिनी सहस्त्रार चक्रात स्थिर झाली होती का ? आणखी झाली होती तर त्यांचा देहभाव गेला असता. धर्मांतर वगैरे विचारही आला नसता. असो पत्रकार सर्वज्ञ असतात. ते या विषयावर ही आधीकाराने बोलू शकतात.

    ReplyDelete
  2. शेट्टी यांचे विधान योग्य की अयोग्य हा विषय तात्पुरता बाजूला ठेवू.
    हाच मुख्य मुद्दा असताना बाजूला ठेवून इतर सगळ्या विषयांवर लिहिले आहे तुम्ही!!!

    ReplyDelete
  3. भाउ सौदीवरुन आठवल ट्विटरवर सगळे पुरोगामी सर्वपक्षीय पडेल असतात तिथे मोठे युद्ध चालु असते ते ट्विटर पन सौदी राजपुत्र तलाल च्या कंट्रोल मध्ये आहे आणि त्याच्या भावाने भष्टाचाराच्या आरोपात बंदीस्त केल होत अमेरीकेने मध्यस्ती करुन सोडल तरी प्रिंन्सने तलाल कडुन १०० अब्ज डाॅलर वसुल केले सौदी मध्ये ट्विटर दिसत नाहीअशीआहे अविष्कार स्वातंत्र्याच्या मुख्य प्रवाह ट्विटरची अवस्था

    ReplyDelete
  4. "जगभर थपडा व खेटरे खाऊन दारूच्या धुंदीत घरी परतणार्‍या पराभूत बेवड्या नवर्‍याने घर संभाळणार्‍या बायकोच्या कंबरेत लाथ घालण्याची मर्दुमकी गाजवावी, तसा हा एकूण पुरोगामी पुरूषार्थ असतो."
    भाऊ,इतकं मार्मिक वाक्य...जबरदस्त!!!!!
    Love u !!!!

    ReplyDelete
  5. भाऊ यापेक्षा समर्पक शब्दात वरील विषय मांडता येणार नाही कुणालाच

    ReplyDelete
  6. नुसते किरकोळ गुन्हेच तर हिंदुच्या किरकोळ निरुपद्रवी प्रथावर पन तुटुन पडतात परवाच असा पुनेरी डाॅ कम पुरोगामी वड पुजेवर तुटुन पडला म्हने दोरे बांधले तर वडाला त्रास होतो आणि इतके असहिष्नुकी की टोळीबाहेरच्या लोकांना काॅमेट करायची सोय नाही.हे लोक काही नोकरी धंदा करताना दिसत नाहीत fb वर RTI कार्यकर्ता अस लिहीलय तोच धंदा असेल.

    ReplyDelete
  7. खर्‍या चोरांवर भूंकायला स्वयंभूता लागते आणि इथे तीच गहाण टाकलेली आहे ना? भारतीय पत्रकारिता व बुद्धीवादाची हीच तर शोकांतिका आहे. त्यांना इस्लामी व ख्रिश्चन धर्मनिधीने विकत घेतलेले असून, त्याच्या पसंतीच्या संतांच्या आरत्या आणि हिंदू संतांची निंदानालस्ती, हे कर्तव्य बनून गेलेले आहे. त्याला पुरोगामीत्व असे गोंडस नाव देण्यात आलेले आहे.

    अप्रतिम विश्लेषण

    ReplyDelete
  8. भाउ तुम्ही ही कांमेट approve कराल माहित नाही पन निरीक्षन म्हनुन सांगत आहे हल्ली यु ट्युबवर अनेक मोदीविरोधी चॅनेल आहेत त्यात ndtv abp newsसह विडिओ असतात त्यांचा सर्व कंटेट मोदीविरोधी असतो त्यात हिंदु मुस्लिम विशय नसतात नेहमी पन ज्या काॅंमेट असतात त्यात हिंदु सोडुन इतर लोक असतात आनि विडीओला ते लाइक करत असतात हीगोष्टच खुप काही सांगुन जाते ज्यांना नाव दाखवायच नाही ते विचीत्र अमानवी नाव लावतात

    ReplyDelete
  9. Shri Bhau what you have written above is 100 % correct and naked truth of our life, and we are all victims of this

    ReplyDelete
  10. नमस्कार भाऊ,
    हा लेख म्हणजे परखड लिखाणाचा विरळाच आणि उत्तम नमुना आहे.

    ReplyDelete
  11. सडेतोड विवेचन!

    ReplyDelete
  12. भाऊ सत्य परिस्थिती मांडलेत

    ReplyDelete
  13. मुळात राजकारण आणि अध्यात्म हे अगदी मुच्युअली एक्सक्ल्युझिव्ह विषय झाले आहेत सध्या. पण एक गोष्ट आपण हिंदू म्हणून अगदी निर्भीडपणाने करतो ते म्हणजे आत्मपरीक्षण. आणि ह्याच आत्मपरीक्षणातून चांगल्या , उत्तम गोष्टी टिकल्या व पाखंडी विचारधारा बाजूला पडल्या.

    जे काही हिंदू गॉडमेन बद्दल झालं ते योग्य आणि उत्तमच झालं. कदाचित आत्ता ते थोडं हिंदुविरोधी वाटेल पण अश्याच चाळणीतून (प्रत्येक वेळी चाळण वेगळी आहे )
    हिंदुधर्म टिकून आहे , प्रवाही आहे निर्मळ आहे.

    लोक भोंदूंच्या मागे लागतातच मग ते स्वामी असोत , लीडर असोत की पुरोगामी. भोंदूपणा सगळ्यांमध्ये असतोच. माणसे भोंदू असतात आणि त्यांच्या मागे लागणारे निर्बुद्ध , स्वार्थी आणि कमकुवत.

    म्हणून आपल्यातील भोंदूंना जो चोप मिळतोय आणि मिळणार आहे त्याचं आपण हिंदू म्हणून स्वागतच केलं पाहिजे.

    इतर धर्मियांनी त्यांचं त्यांनी पाहावं. त्या धर्माला असा भोंदूपणा चालत असेल तर त्यांची इच्छा.

    त्यांना जर बदल घडवायचा असेल तर निर्भीड त्यांनाच बनाव लागेल.

    आम्ही हिंदू मुळातच निर्भीड आहोत खास करून अध्यात्माच्या आणि यथार्थ धर्माच्या बाबतीत. त्यासाठी ना आम्हाला पुरोगाम्यांची गरज आहे ना हिंदुत्ववाद्यांची.

    ReplyDelete