चोराच्या उलट्या बोंबा असे आपल्या पुर्वजांनी म्हणून ठेवलेले आहे. त्यामुळे कोणीही किती जोरात बोंबा मारू लागला, मग त्यातल्या सुलट्या किती आणि उलट्या किती, याचीही छननी आवश्यक होऊन जाते. अर्थात ते तारतम्य सहसा राखले जात नाही. लोकप्रवाद असेल तिकडेच लोकांचा सहसा ओढा असतो. त्यामुळे साबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशाचा विषय असो, किंवा नाना-तनुश्रॊ निमीत्ताने उफ़ाळलेले लैंगिक संबंधातले वादळ असो, त्यातल्या अनेक गफ़लती चटकन समोर येत नाहीत. त्यापेक्षा गदारोळ जास्त उडवला जातो आणि धुरळा बसल्यानंतर हाती काय लागले, त्याचीही कोणाला फ़िकीर नसते. पाच वर्षापुर्वी याच कालखंडात अशा गोष्टी उफ़ाळलेल्या होत्या. त्यापैकी एक होती ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांच्या संस्थेतील महिलांच्या लैंगिक शोषणाची आणि दुसरी होती विद्यमान पंतप्रधान व तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पाळतीची. त्यातून हाती काय लागले आहे? कुठले सत्य समोर आले वा कुठला सामाजिक लाभ होऊ शकला? आज त्याची कोणाला तरी आठवण आहे काय? त्याच दरम्यान चित्रपट क्षेत्रातील एका दिग्दर्शक व अभिनेत्री गायिकेच्या लैंगिक संबंधांचाही उहापोह माध्यमातून झालेला होता. आज तनुश्रीने जो मुद्दा उपस्थित केला आहे आणि त्यातून अनेक मुली महिला पुढे येत आहेत, त्यातल्या संशयास्पद व्यक्तींना बदनाम वा आरोपीत करण्याची स्पर्धा जोरात चालली आहे. पण त्यातली जी दुष्प्रवृती आहे, तिच्याविषयी कोणी अवाक्षर बोलताना दिसलेला नाही. त्याच मानसिकतेचा उल्लेख रामगोपाल वर्मा व सुचित्रा कृष्णमुर्तिच्या वादातून आलेला होता. आज जो गदारोळ चाललेला आहे. त्यामागची मानासिकता रामू वर्माने स्पष्टपणे मांडलेली असून सुचित्राने आपल्या पुस्तकातून त्याचाच उहापोह केलेला होता. अशा गोष्टी होतातच कशाला?
आज ज्यांच्यावर चिखलफ़ेक चालू आहे किंवा राळ उडवली जात आहे, ते सगळे नामांकित चेहरे व नावे आहेत. कालपरवापर्यत कठुआ किवा उन्नाव येथील बलात्काराचे प्रसंग होते, त्यातली नावे तितकी नामांकित नव्हती. त्यातले बळी अनाम होते आणि बलात्कारीही अमानच होते. आज कोणाच्या लक्षातही त्या घटना राहिलेल्या नाहीत. पण दोन्हीतली प्रवृत्ती किंचीतही वेगळी नाही. त्यांनी अजाण बालिका वा असहाय महिलांना गाठून त्यांना एखाद्या चैनीच्या वस्तुप्रमाणे उपभोगण्यात पुरूषार्थ शोधला आहे. त्यात त्या बलात्कार्यांना आपली मर्दुमकी दिसलेली आहे. पण जी नावे आज उफ़ाळलेली आहेत, त्यांची मानसिकता तरी किती वेगळी आहे? आणि त्यांच्याकडे बोट दखवणार्या किती पुरूषांची आपली मानसिकता त्यापेक्षा वेगळी असते? रामगोपाल वर्माने सुचित्रा कृष्णमुर्तीचा लग्नाचा प्रस्ताव फ़ेटाळून लावताना दिलेले स्पष्टीकरण निंदनीय ठरवले गेले होते. तेव्हा निषेधाचे काही सूर उमटलेही होते. पण ती एक पुरूषी अहंकाराची मनोमन ठसलेली मानसिकता आहे. स्त्रीकडे बघण्याची एक कलुषित दृष्टी त्यात सामावलेली आहे. ती उघडपणे कोणी बोलून दाखवत नाही, पण हाडीमाशी खिळलेली आहे. ‘माझा विवाह संस्थेवर विश्वास नाही. मी स्त्रिया फ़क्त लैंगिक सुखासाठी वापरतो. मला स्त्रिया त्यांच्या देहामुळे आवडतात, त्यांच्या मेंदू(बुद्धी)साठी नाही’. असे रामू वर्माने सुचित्राला सांगितले होते. तेच तिने पुस्तकात मांडलेले आहे आणि त्यापेक्षा आजच्या नावाजलेल्या व्यक्ती वा कठुआ उन्नावच्या सामान्य गुन्हेगारांची भूमिका किंचीत वेगळी नाही. खरी समस्या तीच नाही काय? आपल्या तावडीत सापडलेल्या त्या मुली स्त्रियांविषयीची उपजत वृत्ती संधी मिळताच उफ़ाळून बाहेर येत असते. व्यवहारात वा प्रसंगात पुरूष जितका सामर्थ्यवान असतो, तितका तो शिरजोर ठरतो आणि नसेल तेव्हा अगतिक दयनीय होऊन जातो. जसे आज आपण बघत आहोत.
यात गुंतलेले नाना पाटेकर, अभिजीत, कैलास खेर, असे कलाकार दिग्दर्शक वा राजकीय नेत्यांपासून पत्रकार संपादकांपर्यंतचे बहुतांश लोक रामू वर्मापेक्षा कुठल्याही वेगळ्या मानसिकतेचे नाहीत. त्यांच्या हाती सत्ता वा अधिकार असताना त्यांनी त्या महिलेच्या गुणवत्ता, बुद्धी वा पात्रतेला किंमत दिलेली नाही. केवळ तिचे उपभोग्य शरीर, यापेक्षा तिची कुठलीही लायकी त्यांच्या डोक्यात जाऊ शकलेली नाही. डिस्कव्हरी वा नॅट जिओ अशा वाहिन्यांवर जे पशूजीवन दाखवतात, तिथेही शिरजोर समर्थ नर सगळ्या माद्यांवर राज्य करताना दिसतो. आपल्याखेरीज अन्य कुठल्याही नराला तो जननप्रक्रीयेत सहभागी करून घेत नाही. तसा कोणी प्रयत्न जरी केला तरी त्याच्याशी प्राणघातक लढाईच होत असते. समूह जीवनातील ही वंशवृद्धीची उपजत पाशवीवृत्ती, आजच्या मानव समाजापासून तथाकथित नागर समाजपर्यंत जशीच्या तशी कायम असल्याची साक्ष मग अशा गदारोळातून दिसते. कायदे व महिला सशक्तीकरणाच्या योजना त्यात कितीसा बदल करू शकल्या आहेत? कारण प्रश्न सामजिक वा कायदेशीर नसून पाशवी वृत्तीचा आहे. ज्या पशूवृत्तीतून माणसाला वेगळे काढून सुसंस्कृत करायचे असते, त्याचे पहिले पाऊल त्यातल्या पाशवीवृत्तीला लगाम वेसण घालण्यापासून सुरू होते. ते काम बुद्धीचे नसून धाक वचकाचे असते. युक्तीवादाने त्याला वेसण घालता येत नसते, तर कठोर शिक्षेचा धाक परिणामकारक असतो. इतर कुठल्याही नराला जननक्रियेपासून परावृत्त करणारा हुप्प्या बळाचा वापर करतो, धाकात ठेवतो. मग मानवातला हा पशू त्यापेक्षा वेगळ्या मार्गाने कसा रोखता येऊ शकेल? वरकरणी सभ्य सुसंकृत मुखवटे लावून फ़िरणार्या प्रतिष्ठीत समाजात असे पशू अधिक दबा धरून बसलेले असतात. ते प्रमाण आदिवासी मागास समाजांमध्ये नगण्य आढळून येईल. कारण इथले छुपे रामू वर्माच तोंडाने तावातावाने स्त्रीदाक्षिण्या्चे तमाशे मांडत असतात.
नाना पाटेकरच्या अभिनयाला पहिली मान्यता जयवंत दळवींच्या ‘पुरूष’ या नाटकाने दिली. त्यातल्या रिमा लागूवर नानाचे पात्र बलात्कार करते आणि त्याविषयी ती आपल्या मैत्रीणीला काय सांगते? बलात्काराने माझ्या मनाचे काय होईल? तर तो उत्तरतो. मनाशी आपल्याला काय करायचे आहे? मला फ़क्त तुझे शरीर उपभोगायचे आहे. त्यावर मैत्रीणही म्हणते, नवरे करतात, तोही बलात्कारच असतो ग. कोणाला मनाची पर्वा असते? वगैरे. तीनचार दशकापुर्वीचे ते नाटक आज कोणाच्याही स्मरणात नसावे. पण तीच प्रवृत्ती सतत उफ़ाळून येत असते आणि त्याचा एक नवा वादळी प्रयोग करून ‘पुरूष’चे प्रयोग काही काळासाठी थांबल्याचा देखावा उभा केला जातो. मात्र त्या खर्याखुर्या पाशवी प्रवृत्तीला लगाम लावण्याचा मूलभूत विचार अजिबात सुरू होत नाही. तळागाळातल्या बलात्कार लैंगिक शोषणाचा गदारोळ खुपच माजवला जातो. तो माजवणार्या उच्चभ्रू समाजातील नागर समाजातील लक्तरे क्वचितच वेशीवर टांगली जात असतात आणि तेव्हा अशा स्त्रीदाक्षिण्यवादी लोकांचीच खरी तारांबळ उडून जात असते. ज्या माध्यमात ही चिखलफ़ेक चालते, तेही त्यापासून मुक्त नसल्याचेही चव्हाट्यावर आलेले आहे. पण उपायाविषयी कोणी बोलायला तयार नाही. जे पकडले जातील वा उजेडात आणले जातील, त्यांना शिक्षा मिळावी म्हणून टाहो फ़ोडला जातो नेहमी. पण त्या मानसिकतेला वा प्रवृत्तीला खच्ची करावे, असे कुठले उपाय सांगितले जात नाहीत की मागणीही केली जात नाही. आपण त्या आजाराच्या सोबत जगायला तयार असल्याचेच हे लक्षण आहे. महिलेने मार खावा, लाजेकाजेस्तव अन्याय अत्याचार सोसावा, ह्या मानसिकेतून आपले सुधारणावादीच बाहेर पडलेले नसतील, तर पोपटपंची कुठले नागर संस्कार करायला उपयोगी पडेल? पण यावेळी अनेक पिडिता उजळमाथ्याने बोलायला धजावल्या, हे त्यातले पुढे पडलेले पाऊल नक्की मानता येईल.
भाउ तुम्ही कठुआ उन्नाववेळी ह्या मेणबत्ती मोर्चेवाल्या बाॅलीवुडला हेच म्हनाला होतात की ही वृत्ती बाॅलीवुड मधेपन आहे कदाचित जास्त.आता तेच बाहेर पडतय ट्विटरवर प्लकार्ड दाखवना्या नट्या आज बळी ठरलेल्यांना सबुरीचे सल्ले देतायत याप्क्षा दुटपीपना काय असतो?
ReplyDeleteBhau,
ReplyDeleteYa prasangi Modi ji ek ashach purvichya prasangabaddal bolalele athavate ki kiti Aaee Vadil aaplya Mulanna mulinshi vagnyache neet sanskar detat. Ulat mulinvarach jaast bandhane ghatli jatat.
मला या प्रकरणातील सत्य असत्य माहिती नाही पण १० वर्षांनी पिडीतेने तक्रार करणे म्हणजे झोल वाटतो.
ReplyDeleteBhau
ReplyDeleteI see another angle to it. Why its for the Names you mentioned only ? (Nana / Abhijit / Kailash Kher)
Why not any Khan ? Is it like they always treat women as Devi? When Aasaram Bapu was targeted for such case, facts are very different than what has shown & discussed on News Channels . Dr swami was & still in strong support of Bapu b coz the medical report nowhere shows that he did that thing for which he is arrested now. Actual reason was Bapu has brought many converted vanwasi people back to hinduism which was against the agenda of changing this nations demography. So he was targeted by all Supari channels & print media. People started believing that he must have dome something wrong.
As we know in this nation Sadhwi Pradnya & colnel Purohit was jailed for 9 yrs. just because of nothing. it was a political game only.
So I believe there are much different angles to what happening with Nana as mentioned above. Nana's Naam is doing splendid Job & few ppl cant digest it.
So can you please write on same topic by considering all such angles.
Thanks
Pratyek purush ashach mansiktecha asto as nahi. Ani aaj je aarop hot ahet te kiti khare ani kiti khote?
ReplyDeletehttps://www.bbc.com/news/magazine-38796457
ReplyDeleteपण भाऊ नाना-तनुश्रॊ निमीत्ताने उफ़ाळलेला गदारोळ जरा जास्तच उडवला जातोय असे नाही वाटत ? मला तर ह्यामागे काही तरी षडयंत्र असावे असे वाटू लागले आहे, तेही आताच्या निवडणूकांच्या तोंडावर !
ReplyDelete"चोराच्या उलट्या बोंबा असे आपल्या पुर्वजांनी म्हणून ठेवलेले आहे. त्यामुळे कोणीही किती जोरात बोंबा मारू लागला, मग त्यातल्या सुलट्या किती आणि उलट्या किती, याचीही छननी आवश्यक होऊन जाते. अर्थात ते तारतम्य सहसा राखले जात नाही. लोकप्रवाद असेल तिकडेच लोकांचा सहसा ओढा असतो."
ReplyDeleteदुर्दैवाने आपल्या लेखाची सुरुवातच आपल्या लेखाला लागू होत नाही का? अधिकाराच्या ठिकाणच्या (काही) पुरुषांची स्त्रियांप्रती (वाईट) मानसिकता हे जितके वास्तव आहे तितकेच (काही) स्त्रिया आपल्या बाजूच्या कायद्यांचा गैरवापर पुरुषांवर सूड उगवण्यासाठी करत आहेत हेही वास्तव आहे. केले गेलेले सर्व आरोप हे खरेच असून नाना पाटेकरसह इतरही पुरुष हे विकृत (वा तत्सम हीन) मानसिकतेचे आहेत ह्याची आपल्याला खात्री पटलेली दिसते. किती एककल्ली लेख असावा !
एरवी कशाचीही - अगदी स्वतःच्या अब्रुचीही - तमा ना बाळगणारे, कशाचाही व कोणाचाही मुलाहिजा न ठेवणारे लोक इतकी वर्षे घाबरून (आणि तेही अशा लोकांना कि जे प्रत्यक्षात त्यांच्या करिअरच काही वाकडं करू शकणार नाहीत) गप्प बसलेत हेच अनाकलनीय आहे आणि लोक त्यावर लगेच विश्वासही ठेवतात.
हा लेख खूपच politically correct अंगानं गेला असं वाटलं । नेहमी प्रमाणे परखड व सत्याला भिडू पाहणारा नव्हता । 😄
Deleteभाऊ, कपड्यांच्या आत सगळेच नागडे असतात. एका संशोधनानुसार, प्रत्येक पुरुष कधीना कधीतरी मोहात पडलेलाच असतो. प्रत्येक पुरुष.... प्रामाणिक पणे विचार केला तर ते पटेल. आपण सगळेच बाहेर एक आणि आत एक असे वेगवेगळे असतो. फरक इतकाच, काही मोहात पडून नको ते करतात, काही स्वतः वर नियंत्रण ठेवतात. सगळ्या बायका हे आताच का बोलू लागल्या? ज्यावेळी त्यांना हा अनुभव आला, त्याचवेळी त्यांनी बोंब का नाही ठोकली? कारण त्या नवीन होत्या, काम हवं होतं. त्यावेळी बोंब मारली असती तर career लगेच संपलं असतं. म्हणजेच अन्यायाला वाचा सुद्धा सोयीस्करपणे फोडली जाते. आता तनुश्री कडे काम नाही. मग ठोका बोंब. फुकट प्रसिद्धी, सहानुभूती आणि पुढच्या २-३ वर्षांसाठी काम. तिच्यावर अन्याय झाला असेल तर तिला न्याय मिळायलाच हवा. पण जिथे ती १० वर्षे थांबली, तिथे तिला न्याय आत्ताच लगेच का हवा? सगळ्या गोष्टी ती कायदेशीर का करत नाही? Media कडे जाण्यापेक्षा पोलिसांना का नाही सांगत? कारण तिला माहीत आहे, ती जे बोलते आहे ते सिध्द करणे अतिशय कठीण आहे. असल्या मूर्ख आणि नालायक बायका आणि राहुल गांधी यांच्यात काहीच फरक नाही. दोघांना ते काय बोलतात ते सिध्द करता येत नसल्यामुळे, नुसता धुरळा उडवून देण्यात ते धन्यता मानतात. Justice लोयासह अनेक प्रकरणत हेच चालू नाहीये का? तेव्हा कोण खरा आणि कोण खोटा हे त्यांच्या मनात आहे. त्यांना स्वतः लाच माहीत आहे. आपल्याला नाही.
ReplyDelete_Beautiful comments from a writer Geetanjali Arora on *"me too"*_...
DeleteYou do me favors, I do you favors 30 years later lets call it *"me too"*...
A strong woman does not wait 30, 20, 10 years to speak up, she slaps him on the first *"bad touch"* and knocks him out...
Don't hide your weakness, the favors in returns that you enjoyed and the work you got by *"I was too scared"* cry now...
You were scared to say NO then because it was hard to stand up for what was right and you were scared to loose your status and position in the work place, so *YOU CHOSE* to accept the molestation and went back for more...
Its very easy to play the *abla nari* card later and gain sympathy...
*The Shakti does not wait for a later date to speak up, she silences the evil on the spot...*
My thoughts on this nonsense of *'me too'*...
I don't have *'me too'* stories, anyone who tried got a tight slap then and there and I was never afraid to walk out with my head held high - be it in a Job or relationship!!!
"Strong Women don't have *'me too'* sob stories, they only have - *I slapped him back* short essays"
केरळ मधील नन च्या बाबतीत मूग गिळून गप्प बसणारे , तेजपाल ला पाठिशी घालणारे, राहूल गांधी -सुकन्या देवी या बद्दल मौन बाळगणारे आज सर्वजण नाना वर तुटून पडले आहेत.
ReplyDeleteमराठी पत्रकारितेतही असेच अहंकारी डोंगरधारी,मंदपणे गोंजरणारे,दरडावून महाराष्ट्राला सवाल करणारे आपले मतच लोकमत म्हणून रेटणारे लोक आहेतच.त्यांना कोण वेसण घालणार?
ReplyDeleteतनुश्री वर खरोखरीच तसा काही प्रसंग ओढावला असेल का नाही याची कल्पना कोणालाच असण्याची शक्यता नाही परंतु तिने दहा वर्षांनी केलेल्या पुनर आरोपांनंतर तिच्या समर्थनासाठी जी जी माणसे हिरिरीने पुढे आलेली आहेत त्यांची यादी पाहता हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद मानण्यास पुरेशी जागा आहे. विशेषतः चित्रपट सृष्टी मध्ये जी काही मोजकी चांगली माणसे उरली आहेत त्यांना संपवण्याचा हा डावा डाव वाटतो आहे
ReplyDeleteIf just allegations prove that the person is guilty then why do you criticize kejriwal and co. when he alleged gadkari, jaitley and many others. As you have said many other times, cases can't be run in media courts, truth has to be come out following proper legal process, convicting anyone before that is insane, unfortunately it seems to be the trend theSe days.
ReplyDeleteहे असं कॅम्पेन चालवून अन्यायाविरुद्ध न्याय कसा काय मागितला जाऊ शकतो? गुन्हेगार सिद्ध करण्याचा अधिकार मीडियाला कुणी दिला? दोषींना शिक्षा झाली पाहिजे हे मान्य. पण जसा ४९८ कलमाचा बऱ्याच स्त्रीयांनी गैरफायदा घेतला, तसे काही इथे घडणार नाही कशावरून?
ReplyDeleteनन कडून नानाकडे लक्ष्य वळवावे म्हणून ख्रिस्ती मीडिया चा डाव वाटतो
ReplyDeleteनाना मनसे कडून निवडणूक लढायचा विचार करत होता ना?
ReplyDeleteअसा काही अँगल असेल का हे आत्ता बाहेर येण्यात?