वयात आलेल्या मुलीचा घोर घरच्यांना असतोच. पण मुलगी मतिमंद किंवा थोडी वेडपट असेल, तर तो घोर झोप उडवून देणारा असतो. तिला कुठे ‘खपवायची’ अशी ती चिंता असते. अशाच एका मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीला खपवायची छान योजना आखली होती. बघण्याचा कार्यक्रम सुरळीत पाडायची मस्त योजना (नेपथ्यरचना) तयार केली होती. बघायला येणार्यांना मुलीची अक्कल कळू नये, याची पुर्ण सज्जता केलेली होती. त्यानुसार सर्व बोलणी झाल्यावर मुलीने फ़क्त चहा व बिस्किटाचा ट्रे घेऊन पाहुण्यांसमोर यायचे अशी व्यवस्था होती. नमस्कार करायचा की संपले. त्यासाठी तिला पढवून ठेवलेले असते. कित्येक दिवस आधीपासून सरावही करून घेतलेला असतो. आणि तो दिवस उजाडतो. सर्वकाही ठरल्याप्रमाणे पार पडत असते. बोलणी संपली आणि आता बघण्याचा शेवटच्या अंकातला शेवटचा प्रवेश असतो. माऊली बाहेरूनच हाक मारते, ‘सुजया, बेटा चहा घेऊन ये पाहुण्यांसाठी.’ छान सजलेली नटलेली मुलगी पडदा बाजूला करून चहाचा ट्रे घेऊन बैठकीच्या खोलीत येते. पाहुण्यांना हसून दाखवते आणि समोरच्या टेबलावर हातातला ट्रे ठेवून सर्वांना नमस्कारही करते. आईचा जीव भांड्यात पडतो. पण पिता मात्र अस्वस्थ असतो. कारण सुजयाने आणलेल्या ट्रेमधून बिस्किटे गायब असतात. तेव्हा कौतुकाच्या स्वरात पिता विचारतो, ‘बेटा सुजया चहा आणलास, बिस्किटेही आणायची होती ना सोबत?’ खरे तर इथे पित्याने नियम मोडलेला असतो. मुलीला पाहुण्यांसमोर बोलू द्यायचे नाही, असे आधीच ठरलेले असते आणि पिताच तिला प्रश्न विचारतो सर्वांच्या देखत. मग काय मजा? सुजया मस्त मुरका मारते आणि आपल्या नसलेल्या अकलेचे झकास प्रदर्शन पाहुण्य़ांसमोर मांडत म्हणते, ‘पप्पा, मी ना बिस्किटे चहात बुडवूनच आणली. नाहीतरी पाहुणे बुडवूनच खाणार ना? त्यांना कशाला तेवढा त्रास?’
पुढे काय झाले ते सांगण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. ज्याक्षणी सुजयाने हे अकलेचे तारे तोडले, त्याक्षणी तिच्या मातापित्यांना परिणामांची कल्पना आलेली होती. पण बिचार्या सुजयाला त्याचा थांगपत्ता नव्हता. आपण काही भलताच मोठा शहाणपणा केला आहे. अशा थाटात ती तिथेच मिरवत उभी होती आणि पालकांना मात्र कपाळावर हात मारून घ्यायची वेळ आली होती. पाहुणे संतप्त होऊन व फ़सवणूकीचे आरोप करून निघून गेले होते, आणि लाडकी सुजया आपल्या पित्याला आश्चर्याने विचारत होती, ‘पप्पा पाहुणे चहा न घेताच का निघून गेले हो?’
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्समध्ये आले असून त्याच्या भ्रष्टाचाराची साधी चौकशीही झालेली नाही. भाजपाची सरकारे आकंठ भ्रष्टाचारात बुडालेली आहेत, वगैरे आपल्या नेहमीच्या बेताल आरोपांनी राहुल गांधींनी सोमवार मध्यप्रदेशच्या प्रचारात गाजवला. पण त्यामुळे शिवराज चौहान कमालीचे संतापले आणि राहुलनी तात्काळ माफ़ी मागितली नाही तर मानहानीचा खटला भरण्याचा इशाराच देऊन टाकला. तेव्हा मात्र राहुल गांधींचा नक्षा उतरला. त्यांनी मंगळवारी उपरोक्त कथेतील मुलीइतके आपण निर्बुद्ध नसल्याची साक्ष देत आपल्याकडून चुक झाल्याचे मान्य करून टाकले. पण खुलासा देतानाही पुन्हा अकलेचे तारे तोडलेच. भाजपाचा भ्रष्टाचार इतका गुंतागुंतीचा आहे, की आपल्याकडून इकडची नावे तिकडे व तिथले आकडे इकडे होऊन जातात, याची कबुली राहुलनी देऊन टाकली आहे. मुळातच आपल्याला कळत नसलेल्या विषयात बोलले नाही तर नसलेली अक्कलही झाकली जात असते. पण राहुल गांधींची कथा सुजयासारखी आहे. जरा प्रोत्साहन मिळाले की नसलेल्या अकलेचे प्रदर्शन मांडण्याचा मोह त्यांना अनावर होतो. त्यामुळेच त्यांनी यावेळी आपण कन्फ़्युज आहोत, असेही पुढे येऊन सांगितले. ज्या पक्षाचा अध्यक्ष इतका कन्फ़्युज असेल, त्या पक्षाचे काय भवितव्य असू शकते? अर्थात राहुलचे दुखणेही समजून घेतले पाहिजे. खटला भरला गेल्यास कोर्टाच्या पायर्या झिजवाव्या लागतात, त्याचाही धडा त्यांनी गांधीहत्या वगैरे अनुभवातून गिरवला आहे. म्हणूनच शिवराज यांनी कोर्टाची धमकी देताच त्यांच्याशी आखमे आख मिलाकर बोलायची किंमत राहुलना झाली नाही. आखे चुराकर त्यांना पळ काढावा लागलेला आहे. शतायुषी पक्षाचे अध्यक्ष असताना आपण कन्फ़्युज असल्याची बेधडक कबुली त्यांनी देऊन टाकली आणि पणजोबापासून सगळा वारसा एका बकवास विधानासाठी धुळीस मिळवला.
अर्थात कॉग्रेस पक्ष व पुरोगामी गोटात सुजयांचा तुटवडा नाही. म्हणून तर मंगळवारी विविध वाहिन्यांवर हा विषय निघाला, तेव्हा अनेक कॉग्रेसी व पुरोगामी प्रवक्ते व पुरोगामी प्राध्यापक हिरीरीने राहुलचे समर्थन करीत मोदींच्या नावाने शिमगा करीतच होते. हा आता एक खाक्या झाला आहे. मोदीद्वेषाने भारावलेल्या या लोकांचा खुळेपणा आवाक्याच्या बाहेर गेलेला असून त्यातून त्यंना बाहेरही पडणे शक्य नाही. कारण मोदी व भाजपा विरोध आता बाजूला पडलेला असून राहुलला मुर्ख म्हटले तरी आपल्यावर मोदीभक्तीचा आरोप होईल; अशा भयगंडाने पुरोगाम्यांना पछाडलेले आहे. इतका भक्कम पुरोगामी फ़ौजफ़ाटा पाठीशी सज्ज असताना राहुलनी मुर्खपणा करण्यापासून स्वत:ला कशाला रोखावे? येत्या सहासात महिन्यात म्हणूनच राहूल अधिकाधिक मोकाट होत जाणार आहेत आणि पुरोगामी बुद्धीमान फ़ौजेला अधिकाधिक तोंडघशी पडावेच लागणार आहे. कारण विविध बेताल आरोप करताना तपशीलाविषयी राहुल गांधी कन्फ़्युज आहेत. पण आपण नेमके कुठले व कोणासाठी राजकारण करीत आहोत, याविषयी आता पुरोगामीही पुर्णपणे कन्फ़्युज होऊन गेलेले आहेत. अनेकांना तर आपण कॉग्रेसी आहोत की अन्य कुठल्या पक्षा़चे आहोत, तेही समजेनासे झाले आहे. व्हीजन आणि कन्फ़्युजन यांची इतकी सरमिसळ होऊन गेलेली आहे, की समाजवादी पक्षाचे घनश्याम तिवारी, मार्क्सवादी पक्षाचे सुनील चोप्रा अशा प्रवक्त्यांची तारांबळ मोठी विनोदी होत चालली आहे. जवळपास कुठल्याही इंग्रजी वाहिनीवर कॉग्रेसी प्रवक्ता नसतो आणि असे अन्य पुरोगामी पक्षाचे प्रवक्तेच ती जबाबदारी पार पाडू लागलेले आहेत. राहुल गांधी आरोपाच्या बाबतीत कन्फ़्युज आहेत तर पुरोगामी पक्षाचे नेते प्रवक्ते आपला नेमका पक्ष व भूमिका कुठली, याबद्दल कन्फ़्युज असल्याची साक्ष रोज देतच असतात.
हा हा हा ! भाऊ फुल कनफ्युजन ! जन जनमें कन्फ्युजन !येही है पप्पू का असली व्हिजन !
ReplyDeleteअप्रतिम सुंदर लेख. भाऊ, तुम्हाला रागा कसं वागणार हे कसं कळतं हो?
ReplyDeleteभाउ एवढच नाहीतर कालच लाल किल्ल्यावर राष्ट्रपती भाषण केले असे म्हनाले राहुल एकेरी उल्लेखपनकेला त्यांचा तसेच सात दिवसापुर्वी संसदेत जेटलींना नीरवमेोदी भेटला होता अस १५ मिनीट बोलत राहीले कालच मिजोराम एेवजी मणिपुर अस ट्विट केल हामाणुसPMझालातर धन्य आहे देशाच पुरोगामी लोकांना मानायला हव की राहुलची बाजु अजुन लढवतात.ते लढवत राहतीील जनतापुढे सुजयासारखे ते उघडे केव्हाच पडलेत मेोदी नाही का म्हनाले की २००४_२००१२ पर्यंत काही कल्पना नव्हती काय प्रकार आहे ते आता कळाल हे आहे जेव्तहा ते लेोकांसमेर आले
ReplyDeleteमोदी द्वेषाने भारावलेल्या लोकांचा खुळेपणा खरोखरच आवाक्याबाहेर गेला आहे .
ReplyDeleteभाऊ!
ReplyDeleteसत्याच्या फारच जवळ गेलात.
अहो बर आहे ना मोदींचा मार्ग अधिक प्रशस्त होत जाईल
ReplyDeleteYet another awesome speech bhau...!!!
ReplyDeleteएकदम सही !
ReplyDeleteHahahaha. Pappu's vision, Congresses confusion, 2019 illusion.
ReplyDeleteभाऊ राममंदिर प्रायवेट मेंबर बील,ऑर्डिनन्स या विषयावर आपल्या लेखाची प्रतिक्षा कधी संपेल!
ReplyDeleteThe other day Rahul Gandhi was so confused that he called Karnataka a city and Bangaluru as a state. IMHO Modiji is allowing Rahul a lot of leeway to make wild statements in connection with Rafale deal. Rahul has called Modi Brasht and said if the deal were investigated Modi will end up in jail. Now is the time to sue Rahul and ask hime to provide proof of what he says or he should shut up.
ReplyDelete