Saturday, December 8, 2018

सुडबुद्धीचे राजकारण

agustawestland के लिए इमेज परिणाम

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि भाजपाला एकहाती बहूमत मिळाले, त्याला आता साडेचार वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे. आणखी सहा महिन्यात नव्या निवडणूका होतील आणि नवी लोकसभा निवडली जाईल. त्याचे निकाल कसे लागतील माहित नाही. पण सध्या तरी तमाम विरोधक म्हणवल्या जाणार्‍या पक्ष आणि व्यक्ती संस्थांचे धाबे मोदी पुन्हा जिंकतील म्हणून दणाणले आहे. कारण या पहिल्या साडेचार वर्षात मोदी सरकारने ज्या मूलभूत हालचाली केल्या आहेत, त्याच्या पायावर पुढल्या काळात सार्वजनिक जीवनात यापैकी अनेक पुरोगाम्यांना व कॉग्रेसी नेत्यांना सुखनैव आपल्या घरात लपून बसणेही शक्य होणार नाही. किंगफ़िशरच्या विजय मल्ल्याप्रमाणे दुरदेशी पळूनही जाणे मोदींनी शक्य ठेवलेले नाही. कारण तशा पळालेल्यांना उचलून मायदेशी आणण्याची प्रक्रीयाही मोदींनी सोपी करून टाकलेली आहे. सहाजिकच पुरोगामीत्व किंवा नेहरूवाद म्हणून जी मागल्या सहासात दशकात दिवसाउजेडी देशाची जी लुट झाली, ती थांबलेली आहे आणि वसुलीला आरंभ झाला आहे. त्याने अनेकांचे धाबे दणाणाले आहे. सोनिया वा अन्य कॉग्रेसवाल्यांच्या खिशात पैसे घालणार्‍या संरक्षण खरेदीचे जुने व्यवहार चव्हाट्यावर यायला लागले आहेत. राफ़ायलचा जप करणार्‍या राहुल गांधींची वाचा बसली आहे. नरेंद्र मोदींनी राफ़ायलचा करार करताना जनतेचे तीस हजार कोटी अनील अंबानीच्या खिशात टाकल्याची टकळी राहुलनी चार महिन्यापासून लावलेली होती. तिचा एकही पुरावा त्यांना सादर करता आलेला नाही. पण त्यांच्या मातोश्रीसहीत अनेक सहकार्‍यांना हेलिकॉप्टर खरेदीच्या दलालीत गुंतवून देणारा साक्षिदारही मोदींनी भारतात उचलून आणला आहे. तेव्हा त्याला कसे तोंड द्यायचे, ही चिंतेची बाब झाली आहे. ह्याला मग मोदींचे सुडबुद्धीचे राजकारण म्हणायची एक फ़ॅशन झाली आहे. पण खरेच मोदी सुडबुद्धीने निर्णय घेतात काय?

सत्ता येऊन साडेचार वर्षे उलटल्यावरही मोदींनी कुणाही एका अन्य पक्षाच्या नेत्याला पुराव्याशिवाय गोत्यात घालण्याचे उद्योग केलेले नाहीत. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या विरोधात कसलाही पुरावा नसताना लागोपाठ कोर्टाचे दार ठोठावून किती विशेष तपासपथके नेमली गेली? त्यांना गोवायचे म्हणून इशरत जहान या जिहादी मुस्लिम तरूणीला निरागस ठरण्यासाठी किती खोटे बोलले गेले होते? शिवराज पाटिल हे युपीए कॉग्रेसचेच गृहमंत्री होते आणि त्यांनी अहमदाबादच्या चकमकीत पाकची हस्तक तोयबावाली इशरत मारली गेल्याची लोकसभेला ग्वाही दिलेली होती. तर त्यांचे शब्द त्यांच्यानंतर गृहमंत्री झालेल्या चिदंबरम यांनी फ़िरवले आणि मोदींना अडकवण्यासाठी इशरतला निष्पाप तरूणी ठरवले होते. त्याला सुडबुद्धी म्हणतात. जिथे एकाच पक्षाचे केंद्र सरकार अन्य पक्षाच्या मुख्यमंत्र्याला गोत्यात घालण्यासाठी आपलेच निवेदन व निष्कर्ष बदलून खोटे बोलू लागते, त्याला सुडबुद्धी म्हणतात. मोदींनी कुठल्याही बाबतीत तो उद्योग केलेला नाही. पण सोनिया वा युपीएच्या सरकारने सतत तेवढेच केलेले होते. कायदे व न्यायालये धाब्यावर बसवून देशाचा कारभार हाकलेला होता. मोदीच कशाला? युपीए वा सोनियांना सत्तेमध्ये आणायला ज्याचे कर्तृत्व कामी आले, त्या राजशेखर रेड्डी यांच्या सुपुत्राला आपले ऐकत नाही म्हणून सोनियांनी ईडी व सीबीआयच्या सापळ्यात किती वर्षे अडकवून ठेवले होते? किती वर्षे जगनमोहन रेड्डी जामिनाअभावी तुरूंगात खितपत पडला होता? चिदंबरम ज्या आरोपासाठी सुडबुद्धीची टकळी रोज वाजवतात, तेच अर्थमंत्री म्हणून काम करताना जगनला छळत नव्हते काय? जे त्यांनी जगनच्या बाबतीत केले ते सूडबुद्धीचे नसेल; तर मोदी सरकार कार्ति चिदंबरमच्या बाबतीत करते त्याला सुडबुद्धी कसे म्हणता येईल? अन्यथा या लोकांनी निदान आपला अनुभव तरी सांगून टाकावा.

म्हणजे चिदंबरम वा सोनिया गांधी हाती सत्ता असताना कायदा वाकवून किंवा पुराव्यांची हेराफ़ेरी करून सुडाचे राजकारण खेळत होत्या आणि त्यात आपण जसे वागलो तसेच नेमके मोदी वागत असल्याने त्याला सूडबुद्धीचे राजकारण म्हणतात, असेही सांगायला हरकत नाही. पण त्यात आधी आपल्या पापाची वा गुन्ह्याची कबुली तरी द्यायला हवी ना? चिदंबरम माजी मंत्री आहेत आणि तरीही ईडी वा सीबीआयच्या चौकशीत सहकार्य द्यायला राजी नाहीत. कोर्टाने सांगितले म्हणून त्यांच्या सुपुत्राला सीबीआयसमोर हजर व्हावे लागले. पिताजी अजून समोर यायला राजी नाहीत. पण तेच गृहमंत्री असताना मुख्यमंत्री असूनही मोदींनी सीबीआयच्या चौकशीला नकार दिला नव्हता. सोनिया वा चिदंबरम यांच्यावर सूडबुद्धीचा आरोप मोदींनी मुख्यमंत्री असताना केलेला नव्हता. चोरीच केलेली नसेल तर तपासाला त्यांनी घाबरावे का? म्हणून मोदी सामोरे गेले आणि हे चोर तोंड लपवून पळत आहेत. सुडबुद्धीचे प्रत्यारोप करीत आहेत. कारण सुडबुद्धीने तेच वागलेले आहेत आणि अशा यंत्रणा त्यांनी सतत सुडबुद्धीच्या कारवायांसाठीच वापरलेल्या आहेत. म्हणून तर इतके घोटाळे होऊनही अशा यंत्रणा हात चोळत बसल्या होत्या. कोर्टाने कान पकडला म्हणूनच कामाला लागल्या होत्या. अन्यथा खर्‍याखुर्‍या चोरांना हात लावण्याची त्या यंत्रणांची कधी हिंमत झाली नाही. उलट नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्या अगदी निर्धास्त होते आणि कुठलाही पुरावा किंवा गुन्हा नसताना नरेंद्र मोदी वा अमित शहा इत्यादिंना कोर्टाच्या, तपासाच्या पायर्‍या झिजवाव्या लागत होत्या. युपीए वा कॉग्रेसचा कारभार म्हणजे सुडबुद्धीने विविध शासकीय यंत्रणांचा राजरोस वापर होता. आता त्या स्वतंत्र झाल्यामुळेच झपाट्याने पापे चव्हाट्यावर येत आहेत, तर त्यातही खोडा घालण्याचे उद्योग चालू आहेत. नसेल तर सीबीआयमधील भांडण कशाला उकरून काढण्यात आले?

कालपरवा ज्या ख्रिश्चन मिशेल नामक भामट्याला दुबईहून उचलून भारतात आणले गेले, त्याचा तपास कोणी केला होता? दोन वर्षे असे युपीएच्या पापाचे पुरावे शोधून काढण्याचे काम राकेश अस्थाना या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक करीत होते. त्यापैकीच अधिकार्‍यांनी मंगळवारी मिशेल याला दुबईतून भारतामध्ये आणलेले आहे. पण ते होऊ नये म्हणून किती आटापीटा झाला? स्पेशल संचालक म्हणून आस्थाना यांना आणले गेले. काही अधिकारी सीबीआयमध्ये बसून पुर्वीच्या मालकांशी निष्ठा असल्यासारखे काम करीत होते. त्यांना शह देण्यासाठीच अस्थाना यांना सीबीआयमध्ये आणले गेले होते. त्यांच्या खास तपास पथकाकडली प्रकरणे बघितली तरी त्याची साक्ष मिळते. मग त्यात गुंतलेल्यांना सोडवण्यासाठी अस्थाना यांच्यावर बालंट आणले गेले. ज्या अलोक वर्मा यांच्या नेमणूकीच्या विरोधात प्रशांत भूषण यांनी कोर्टात याचिका केली होती, तेच मग वर्मांना बाजूला करण्याच्या विरोधात याचिका घेऊन उभे राहिले. हा सगळा घटनाक्रम बघितला, मग लक्षात येते, की नरेंद्र मोदी अशा सर्व पुरोगाम्यांना कशाला नको आहेत? तर ना खाऊंगा ना खाने दुंगा, ही आपली घोषणा मोदी प्रामाणिकपणे राबवायला बघत आहेत. म्हणूनच त्यातले आरोपी संशयित आणि त्यांच्या विरोधात लुटूपुटूची कायदेशीर लढाई करणारे सगळे, मोदी विरोधात एकवटले आहेत. सगळे जणू सुडाला पेटले आहेत. हा माणूस आणखी पाच वर्षे सत्तेत राहिला, तर तमाम भ्रष्टाचारी व त्यांचे पोशिंदे पुरोगामी यांची पाळेमुळे खणून काढण्याच्या भयाने त्यांना पुरते पछाडले आहे. त्याच भयापोटी सुडबुद्धीचे आरोप आता वाढत जाणार आहेत आणि अतिशय खालच्या पातळीवरून मोदींच्या बदनामीच्या मोहिमा राबवल्या जाणार आहेत. कारण आजवर ज्यांनी सूडबुद्धीने राजकारण व समाजकारण केले, त्यांना आता आपल्याच पापाची भुते भयभीत करू लागलेली आहेत.

17 comments:

  1. भाउ परवाच्या सभेत मोदींनी सुप्रीम कोर्टाच नाव वेगळ्या प्रकारे घेत एक जज कसे चिदंबरमना वाचवतायत सांगितल.deep state किती खोलवर मुरलेत ७०वर्षात याचा पुरावाच आहे तो.

    ReplyDelete
  2. मिशेल इंग्लडचा नागरीक आहे तियाला दुबइतुन भारतात आणणे खायचे काम नव्हे.मोदींनी दुबइच्या शेखशी उत्तम संबंध जोडले त्याचा परीणाम आहे त्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले कारण एक देश दुसर्या देशाचा नागरीक तिसर्या देशाला देत नाही याची खात्रीच होती सर्वांना

    ReplyDelete
  3. पूर्वी कधी काळी भारतातून सोन्याचा धूर निघत होता असे शाळेत सांगितले जायचे. ते खरे होते असे म्हणावी लागेल. आता सुद्धा निघतो की सोन्याचा धूर, पण भारतातील काही घरातूनच. पूर्वी सर्वजण काम करत होते व मोबदला घेत होते. आता सुद्धा सर्वजण काम करतात पण मोबदला (मलई) ठराविक लोकच घेतात / खातात. ह्या ठराविक लोकांना भसम्या रोग झाला आहे आणि भारत कुरतरडत आहेत.
    सुज्ञ मतदार याची दखल घेतली व विस्कटलेली घडी परत नीट बसवतील असे वाटते.

    ReplyDelete
  4. ओ.पी.सैनी या न्यायाधीश महाराजांवर चिदंबरम यांनी केंव्हा कधी काय उपकार केले माहित नाही ...पण त्याची जाण ठेऊन हे महाशय चिदंमबरं याना ' पोलीस कोठडीत ' नेण्यापासून वाचवत आहेत. आत्तापर्यंत ५ वेळा पुढील तारखा या महाशयांनी दिल्या आहेत.१८ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण ....!! यावरही काही उपाय असतीलच ...!! त्यावरील कोर्टात जावे तर तेथेही चिदंबरम यांचा मित्रपरिवारच बसलेला / पसरलेला आहे. पंतप्रधान मोदी खरोखर एकांड्या शिलेदारासारखे या सर्व ' हरामखोरांविरुद्ध ' लढत आहेत. देव त्यांना या लढ्यात जास्तीत जास्त शक्ती देवो आणि या लढ्यात यशस्वी करो हीच परमेश्वर चरणी मनापासून प्रार्थना !!

    ReplyDelete
  5. भाउ आपला लेख उत्तमच सुज्ञ मतदारांनी याची दखल घ्यावी

    ReplyDelete
  6. यात भाजपचे आमदार खासदार नगरसेवक यांची काही गंभीर गोष्टी, वक्तव्ये, नरेंद्र मोदींना मागे खेचण्यासाठी कारणीभूत आहे.त्यांनी एकहाती यश मिळवुन सुद्धा, बाकी लोकांच्या फालतुगिरी मुळे विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.

    ReplyDelete
  7. सगळेच जज आपल्या कामाला लायक असतील असे नसते. काही प्रमाणात तिथे वशिलेबाजी असणार. कोळशाच्या उदाहरणावरून स्पष्ट दिसते.

    ReplyDelete
  8. नेहमीप्रमाणे भारीच भाऊ !

    ReplyDelete
  9. पुन्हा मोदी फक्त विचार केला जरी तरी विरोधी पक्षाचे धाबे दानंतात त्यांच्या विरोधात सगळे एक होणे हीच त्यांची हार आहे

    ReplyDelete
  10. सत्यमेव जयत ।

    ReplyDelete
  11. मस्त लेख लिहिला आहे चिदंबरम देखिल लवकरच येतील आत तो आणखी किती तारिख घेणार .

    ReplyDelete
  12. भाऊ मोदींनी गेम टाकला आहे मस्तं. निवडणुकीच्या तोंडावर हा आणि मल्ल्या दोघांना घेऊन येतायत. म्हणजे विरोधक जे बोंबा मारत होते मल्ल्या ला जाऊ दिलं वगैरे त्यांची तोंड बंद. आता २०१९ च्या आधी दाऊदला घेऊन आले तर मजा येणार आहे.

    ReplyDelete
  13. भाऊ, तुमचे बाणेदार व सव्यसाची लेख वाचतच आमची पिढी घडली आहे ! तुमचं विश्लेषण तर अत्यंत रोखठोक आणि चोख असतं ! खूप आवडला हा लेख ही!
    अरविंद कुलकर्णी !

    ReplyDelete
  14. Modi ni pan hyanna jasas tase karayla pahije ajun hi sandhi ahe; adharmi lokanna adharmani marane ha hi dharmach asto

    ReplyDelete