व्यासंगी संपादक बुद्धीमंत कुमार केतकर यांचे एक भाषण मध्यंतरी खुप वादग्रस्त झालेले होते. त्यात त्यांनी दोन महत्वाचे मुद्दे उपस्थित केले होते. एक म्हणजे मागल्या चार दशकापासून भारतातल्या राजकीय सामाजिक व शासकीय बाबतीत एक मोठा आंतरराष्ट्रीय कट कार्यरत आहे आणि त्याच कटानुसार देशातल्या घटना घडतात. बांगला देशच्या शेख मुजीबूर रहमान यांच्या हत्याकांडापासून इंदिराजी-राजीव हत्या व थेट नरेंद्र मोदी पंतप्रधान होईपर्यंत सर्व गोष्टी त्या कटाबरहुकूम घडल्या असा त्यांचा दावा होता. दुसरा मुद्दा त्यांनी मांडला, तो शहा-मोदी या जोडगोळीबद्दल. भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शहा आणि विद्यमान भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकत्र येऊन काहीही करू शकतात, इतके कारस्थानी पाताळयंत्री आहेत. केतकरांनी त्याचा परिणामही आधीच सांगून ठेवलेला आहे. त्यांच्या मते २०१९ च्या निवडणूका होण्याची काही शाश्वती नाही आणि झाल्याच व त्यात मोदींचा पराभव झाला तर ते सत्ताही सोडण्याची बिलकुल शक्यता नाही. इतक्या व्यापक पातळीवर शहा-मोदी जोडगोळी देशाची सुत्रे हलवित असेल, तर ताज्या विधानसभा निवडणूकांचे मतदान व निकालही त्याच दुकलीच्या कारस्थानाचे परिणाम असू शकतात. पण निकालानंतर केतकरांनी तोंड उघडलेले नाही. त्यामुळे या निकालाचा व्यापक कटाशी काय संबंध आहे, त्याचा खुलासा देशाला मिळू शकलेला नाही. केतकर त्यासाठी पुढाकार घेणार नसतील, तर आपल्याला त्यांनी घालून दिलेल्या नियम व निकषांच्या आधारे या निकालातले कटकारस्थान हुडकून काढणे भाग आहे आणि तसे काही धागेदोरे समोर दिसतही आहेत. एक छत्तीसगड सोडला तर उर्वरीत दोन मोठ्या राज्यात भाजपाचा निर्णायक पराभव झालेला नाही. पण तिन्ही राज्यातले मुख्यमंत्री मात्र सत्तेतून बाहेर फ़ेकले गेले आहेत. हे तिन्ही मुख्यमंत्री भाजपाचे मोदींना समकालीन व तुल्यबळ नेते मानले जात होते, का योगयोग आहे की कारस्थान आहे?
दहाबारा राज्यात भाजपाची सत्ता आहे आणि भाजपाचे मुख्यमंत्री आहेत, असे त्या पक्षाचे प्रवक्ते अगत्याने नेहमी सांगत होते. त्यातले तीन मुख्यमंत्री आता कमी झाले आहेत. पण हे तीन मुख्यमंत्री नेमके मोदींचे समकालीन व मोदीपुर्व राजकारणात प्रस्थापित झालेले नेते असावेत, हा योगायोग मानता येईल काय? नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले, तेव्हा त्यांना तुल्यबळ म्हणून शिवराजसिंग चौहान यांना का पुढे केले नाही? असे सवाल राजदीप सरदेसाई बरखा दत्त हे जाणते पत्रकार भाजपाला विचारत होते. आज तसेच तीन मुख्यमंत्री एका फ़टक्यात बाद झाले आहेत. जे कधीही मोदींना आव्हान होऊ शकणारे व ज्येष्ठ होते. मग याला कारस्थान का म्हणायचे नाही? मोदी-शहा जोडगोळीने मतदानातून या तिघांचा परस्पर काटा काढलेला नाही काय? म्हणजे तसे काही पुरावे देता येणार नाहीत. पण कारस्थानाचे पुरावे सहसा मिळत नाहीत की मागे कोणी ठेवत नाही. ज्यांना अशा कारस्थानाच्या संकल्पनेने पछाडलेले असते, त्यांच्यासाठी हे तिघे ज्येष्ठ व मोदींचे समकालीन असल्याचे धागेदोरे पुरेसे नाहीत काय? त्यामुळे ठरवून दुकलीने त्यांना राजकारणातून संपवले, असा आरोप एव्हाना व्हायला हवा होता. कारण हे तिघेच मुख्यमंत्री असे आहेत, ज्यांना मोदींच्या राजवटीत बहूमत मिळवून देत शहा-मोदींनी मुख्यमंत्रीपदी बसवलेले नाही. अन्यथा उरलेले तमाम भाजपा मुख्यमंत्री मोदीपर्वातले आहेत. मग कायम जे लोक कायम अशा कारस्थाने व कटांचा वास काढण्यासाठीच आपल्या नाकाचा वापर करीत हुंगत बसलेले असतात, यापैकी कोणी अजून यातल्या कारस्थान वा कटाचा गौप्यस्फ़ोट कशाला केलेला नाही? अडवाणी, मुरलीमनोहर जोशी अशा ज्येष्ठांना त्याच दुकलीने वाटेतून बाजूला केले आणि आता आपल्या समकालीन नेते मुख्यमंत्र्यांनाही संपवले; हा परिस्थितीजन्य पुरावाच नाही काय? अजून कोणी त्यावर जनहित याचिका करण्याविषयी बोलला कसा नाही?
अर्थात कारस्थान असेल वा नसेल, पण ह्यातला योगायोग नाकारता येत नाही. वसुंधरा राजे, शिवराजसिंग चौहान व रमणसिंग हे तिघे मोदींचे समकालीन होते आणि एकाच फ़टक्यात तिघेही आपापल्या राज्यात धाराशा्यी झालेले आहेत. रमणसिंग यांच्या विरोधात जनक्षोभ असल्याचेही मानता येईल. कारण त्यांच्या विरोधातला निर्विवाद मतप्रवाह मतांच्या मोजणीतून व्यक्त झाला आहे. पण तितका बाकीच्या दोघांविषयीचा क्षोभ मतातून व्यक्त होताना दिसलेला नाही. राजस्थान व मध्यप्रदेश या दोन्ही राज्यात जागा घटून भाजपाची सत्ता गेलेली असली, तरी मतांची टक्केवारी मुख्यमंत्र्यांच्या वा पक्षाच्या विरोधातले मत मानण्याइतकी मोठी नाही. मध्यप्रदेशात तर कॉग्रेसपेक्षा भाजपाची मतेही एक टक्का अधिक आहेत. पण सत्ता मात्र गमावण्याची पाळॊ पक्षावर आलेली आहे. मंगळवारी एकूण वाहिन्यांच्या चर्चेमध्ये हिंदी प्रदेशात मोदी विरोधातले मत, असा डंका पिटला गेला. पण ६५ लोकसभेच्या जागा असलेल्या तीन राज्यात फ़क्त ११ जागा असलेल्या छत्तीसगडमध्ये भाजपाचा निर्विवाद पराभव झाला आहे. उरलेल्या ५४ लोकसभा जागा असलेल्या दोन राज्यात पराभूत होतानाही भाजपाची मते कॉग्रेसच्या जवळपास सारखीच आहेत. म्हणजेच लोकसभा मतदान होईल, तेव्हा मोदींसाठी त्या ५४ जागा धोक्यात आलेल्या नाहीत. यातल्या ५२ जागा भाजपाने जिंकलेल्या होत्या आणि आजही या मतांच्या टक्केवारीतून त्यात पन्नास जागा भाजपा जिंकू शकतो, अशी स्थिती कायम आहे. मग मोदींनी गमावले काय? तर दोन तुल्यबळ नेते वा मुख्यमंत्री गमावले. पक्षाचे बळ कायम राखून दोन तुल्यबळ नेत्यांना अलगद बाजूला करण्याचे हे कारस्थान कशाला मानू नये? पक्षाबाहेरचे वा पक्षांतर्गत स्पर्धकांना संपवण्याला राजकारण व कारस्थानच म्हणतात ना? मग इतके मोठे कारस्थान केतकरांपासून टकल्यांपर्यंत सगळ्यांच्या नजरेतून कसे निसटलेले असावे?
बहूधा केतकर वा अन्य मोदीत्रस्त भाजपाची सत्ता जाण्याने इतके झिंगलेले असावेत, की त्यांना पक्षांतर्गत कारस्थानाचा सुगावा अजून लागलेला नसावा. झिंग उतरली मग त्यातले बारकावे आणि धागेदोरे त्यांना शोधावेसे वाटू लागतील. यातली एक गोष्ट विसरता कामा नये. राजस्थानात वसुंधराच्या विरोधात वातावरण असतानाही पक्षश्रेष्ठी म्हणून शहा-मोदी वसुंधरांच्याच कलाने उमेदवारीचे वाटप करू शकले. त्यातले बहुतांश वसुंधरानिष्ठ पराभूत झाले आहेत. त्या मंत्र्यांना आधीच सत्तेतून बाहेर करणे अशक्य नव्हते. महाराष्ट्रात खडसेंना खड्यासारखे बाजूला करणार्यांना वसुंधराच्या लाडक्यांना हलवता आले नाही ना? तिथेच वसुंधरा व शिवराज यांची वरीष्ठता लक्षात येऊ शकते. मागल्या लोकसभेतही गांधीनगरला उमेदवार करून मोदी आपल्याला पाडतील, अशा भयाने अडवाणींनी मध्यप्रदेशात शिवराजसिंग यांच्या आश्रयाला जाण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्याचा सुड म्हणून आता शिवराजच संपवलेला असेल काय? धागेदोरे खुप आहेत. पण पुरोगामी विणकरांची झिंग उतरली पाहिजे ना? मग खर्याखुर्या व्यापक कटकारस्थानाचा उलगडा होऊ शकेल. पण आज तरी भाजपात आता मोदी-शहा जोडगोळी सोडून कोणी ज्येष्ठ नेता उरला नाही, हे मान्य करावे लागेल. ह्या तीन राज्यात आता जुने मुख्यमंत्रीपदाचे दावेदार उरलेले नाहीत आणि त्यांच्याजागी आपल्याशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांना आणून बसवण्याचा शहा-मोदींचा डाव यशस्वी झालेला नाही काय? तेच पुन्हा सत्तेत बसले असते, तर या तिन्ही राज्यात शहा-मोदी फ़ारशी ढवळाढवळ वा हस्तक्षेप करू शकत नव्हते ना? मग नुसती जनतेची नाराजी म्हणून ही तीन राज्ये भाजपाच्या हातून निसटली, की राहुलच्या नेतॄत्वाची तिथल्या जनतेला भुरळ पडली? की व्यापक कट कारस्थानाचा भाग म्हणून या तिन्ही मुख्यमंत्र्यांचा परस्पर बळी देण्याता आला आहे? केतकर-टकलेंची झिंग उतरेपर्यंत त्या प्रश्नाची उत्तरे मिळणार नाहीत.
मोदी सत्तेत आल्यावर आधी राजनाथ सिंग यांच्या मुलाचे प्रकरण बाहेर आले. मग सुषमा स्वराज यांचे आले, गडकरी यांच्या नावावर चिखलफेक आधीच झाली होती. त्यामुळे संभाव्य प्रतिस्पर्धी आधीच बाजूला फेकून दिले गेले. जेटली, जावडेकर, परिकर, प्रभू यांची भीती नव्हतीच. आता हे तीन प्रतिस्पर्धी गारद झाले आहेत. मोदी-शाहच नव्हे संघ सुद्धा या पाठीमागे आहे.
ReplyDeleteसंघाला दूसरी कामच नाहियेतना!@
Deleteविश्राम साहेब तुमचे प्रतिपादन म्हणजे मोदी द्वेष दुसरे काही नाही।
Deleteबहुदा केंद्र सरकारच्या २०१९ मधील कॅबिनेट मध्ये हि तिन्ही नावे दिसतील.
ReplyDeleteएकदम मान्य
Deleteभाऊ तुमच्या राजकारणाच्या आघाद ज्ञानाला सलाम जे न दिसे कोणाला ते दिसे भाऊना; भाऊ आता थोड्या ताळ्यावर या आणि भाजपच्या एवढं पण प्रेमात पडू नका की त्यांचा पराभव का झाला ह्याचा विचार करायच्या आधी त्याच्या विजय का झाला ह्याच कारण शोधत बसताल असो 2019 च घोडा मैदान जवळच आहे आणि माझा अंदाज अगोदरच खरा ठरला आहे
ReplyDeleteतुमचाच AmitG
काय झालं मगं शर्यतीमध्ये ?
Deleteतुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे दोघे जरी मोदींना तुल्यबळ असतील पण ते मुख्यमंत्री म्हणूनच राहिले असते ना..त्यांनी मोदींच्या प्रतिमेला धक्का लागला म्हणून बाजूला केलं गेलं ..हे समर्पक होईल बहुदा
ReplyDeleteमहाराष्ट्र टाइम्स , लोकसत्ता आणि दिव्या मराठी मधून केतकरांची ' गच्छंती ' हाही याच ' व्यापक ' कटाचा भाग होता की काय ? युवराज आणि केतकर एकाच ' ब्रॅण्डचा ' गांजा पितात की काय कोण जाणे !! नाहीतरी युवराज म्हणायचे की ' इधरसे आलू डालो और उधारसे सोना निकालो ' आणि केतकरही तेच वेगळ्या शब्दात सांगत आहेत.' इधरसे कुछभी डालो और उधरसे ' व्यापक कट/कारस्थान ' पाओ !! इकडे कुबेरही अस्वस्थ आहेत की त्यांना आता ' राज्यसभेवर ' जायचे डोहाळे लागलेत. कुबेरांनी केतकरांच्या पावलावर पाऊल ठेऊन ह्या व्यापक कटकारस्थानाचे ' बळी ' व्हावे म्हणजे राज्यसभेवर लवकरच वर्णी लागेल हे निश्चित. गेलाबाजार ४ वर्षांची पोटापाण्याची सोय होईल हे निश्चित.
ReplyDelete6 varsh
Delete4nahi
भाऊ, सुमार केतकरांच्या नावाखाली तुम्ही तुमच्या मन की बात तर नाही ना सांगत आहात? 😉 कारण ४० वर्षांच्या व्यापक कटाचा भाग सोडला तर बाकीचा संदर्भ अनायसे लागतोय पण 😁😁
ReplyDeleteActually... Logic अजब असलं तरी चूक वाटत नाही...
DeleteCG सोडलं तर बाकी राज्यात सत्ता clear नाहीये ...
पण भाउ काल zee news चॅनलवर पण हेच सांगत होते की आता मोदी किंबहुना शहांना कोणी सिनिअर राहिला नाही मोदींशिवाय.गडकरी जेटली,स्वराज आजारी असतात.हे तिघे पुढे काही येउ शकत नाहीत.
ReplyDeleteजाऊ द्या हो,त्या केटकारा कडे नका लक्ष देऊ!
ReplyDeleteMast bhau.... Zing nahi utarat te changalch ahe... Congress chi nasha utare paryant LS jinkali asel
ReplyDeleteपुढील लोकसभेत या तिघानाही संधी मिळेल आणि मंत्रीपदही मिळेल.या तिघांसमोर पुढच्या विधानसभेत निवडून येऊन मुख्यमंत्रीपद घेण्याएवढी ताकद नाही, त्या मुळे मोदींनी दिलेली संधी साधावी लागेल.
ReplyDeleteस्वताच्या पक्षाच्या लोकांना गारद करून... शत्रुपक्षा ला सत्ता बहाल करणे हे चातुर्य असू शकेल का. काँग्रेस च दृष्टीने बघितले तर त्याच प्रगती झाली आहे. 2019 ल पूरक असे energy सध्या काँग्रेस ल मिळाली आहे. अगोदर केलेले भस्तचाराचे आरोप किती सिद्ध झाले? मोदी ह्याची फेकू ही भूमिका आता सिद्ध होत चालली आहे. शेवटी सत्ता महत्त्वाची....कुठल्या ही प्रकारे येवो... एनडीए चे मित्र पक्ष दूर करणे हे भोवेल का २०१९ मध्ये
ReplyDeleteग्रेटच. कसं काय सुचतं हो तुम्हाला ?
ReplyDeleteSahi hain
ReplyDeleteभाऊ निवडणूक निकालानंतर माध्यमातल्या सगळ्यांना हर्षवायू झाला आहे. आजच्या लोकसत्ताच्या अग्रलेखात अमित शहा यांच्या पन्ना प्रमुख बुथ यंत्रणा या व्यवस्थांची खिल्ली उडवण्यात आली आहे.तेलंगणाच्या निकालाचा उल्लेख देखील नाही. मुळात काँग्रेसचा जो भव्य दिव्य विजय झाला आहे त्यात फक्त छत्तीसगडमध्ये काँग्रेसला निर्विवाद यश मिळाले आहे,मध्यप्रदेशात लढत बरोबरीत सुटली आहे तर राजस्थानात अक्षरशः धापा टाकत कसेबसे बहुमत मिळाले आहे.याचे एकमेव कारण म्हणजे अमित शहांनी प्रस्थापित केलेली बुथ यंत्रणा, भाजपच्या मतदारांना बुथवर आणण्यात आले की मतदानाची टक्केवारी वाढते आणि त्याचा फायदा पक्षाला मिळतो. हेच कर्नाटकात घडले आणि आता मध्यप्रदेश आणि राजस्थानात,त्यामुळे राजस्थानात जिथे पोलपंडितांनी काँग्रेसला 140 जागा दाखवल्या होत्या आणि भाजपला 30 ते 35 जागा दाखवल्या होत्या तिथे ते साफ तोंडावर आपटले आहेत. उद्या 2019 मध्ये हीच बुथ यंत्रणा अधिक मोठ्या प्रमाणात कामाला लागणार आहे आणि आज ज्यांना हर्षवायू झाला आहे त्यांच्यावर मे महिन्यात अक्षरशः रडायची वेळ येणार आहे.
ReplyDeleteबेशुद्ध पडलेला रडणार कसा? :)
Deleteभाऊ वरील लेखातील रमण सिंग सोडले सोडले तर शिवराजसिंग आणि वसुंधरा राजे हे सत्तेच्या वर्तुळात मोदींच्या आधी प्रस्थापित झालेले नेते आहेत मोदी सोडा अमित शहा तर त्यांच्या समोर अगदी साधे किरकोळ आमदार होते. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर या दोन राज्यात त्यांना कोणतेच मनासारखे संघटत्मक निर्णय घेता येत नव्हते आता मोदी शहा यांची ती अडचण दूर होईल आणि या तीन राज्यात पक्षाची नव्याने बांधणी करता येईल.
ReplyDeleteWah bhau spendid
ReplyDeleteAchuk ani satik vishleshan
हात शेकणयासाठी कोणि घराला आग लावत नाही
ReplyDeleteपण त्यानिमित्तान भरगच्च इंश्युरन्स मिळणार असेल तर काय हरकत...नाही का..
Delete..पण त्या निमित्ताने भरगच्च इंश्युरन्स मिळणार असेल तर काय हरकत..
Deleteभाऊंनी हा लेख सुमार केतकरांना उल्लेखून उपहासात्मक पध्दतीने व विनोदी अंगाने लिहीलाय आणि तुम्ही उगाच घराला आग लावून शेकण्याच्या गोष्टी करताय समजून घ्या थोड
DeleteBJP lost 6 seats by less than 6 seats. More than 5 lakh votes for NOTA
ReplyDeleteParabhav fakta ani fakta anti-incumbency mule zalay ani he aadhi ch jag Jahir hota ani 2019 suddha jag Jahir ahe. Vishwas nasel tar 10-15 loka shi bolun bagha loka ajun ek chance modi la zaroor denar.
ReplyDeleteतर्क कुतर्क करण्यास वाव आहे पण i don't think this risk would've been taken. पण खूप चिकित्सक वृत्ती मुळे अशा लिंक लागतात.
ReplyDeleteहे पटत नाही।शिवराजसिंह चौहान 2014 च्या रेसमधे होते इतके ते पॉप्युलर नाहीत.
ReplyDeleteसंघावर चिखलफेक करणाऱ्यांनी "ना फुल चढे ना दिप जले" हे पुस्तक वाचावं म्हणजे समजेल संघ काय आहे ते
ReplyDeleteGreat analysis....bhau you have written this with so much intensity that first I thought it is true analysis...later I understood how you sarcastical you have written......great...
ReplyDelete