Tuesday, March 31, 2020

पुरोगाम्यांपासून सोशल डिस्टंसिंग

Coronavirus India: 24 COVID-19 Cases After Delhi Markaz Nizamuddin ...

त्याला आता सात महिने होऊन गेलेत. ऐन पावसाळा सुरू होता आणि हळुहळू विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले होते. अशावेळी अकस्मात काही लोकांच्या छातीत दुखू लागलेले होते. जगात कुठेही कोरोनाचा उदभव झाला नसतानाही त्यांच्या फ़ुफ़्फ़ूसात घुसमट सुरू झालेली होती. कारण त्यांचे फ़ुफ़्फ़ूस त्यांच्या शरीरात नव्हतेच, तर मुंबई उपनगरात आरे कॉलनीच्या २७०० झाडांमध्ये सामावलेले होते. तीच झाडे मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी तोडली जाऊ लागताच अशा तमाम लोकांचा जीव घुसमटला होता आणि त्यांनी हातात फ़लक घेऊन भर पावसातही त्या परिसरात धुमाकुळ सुरू केला होता. आज अवघ्या जगाच्या प्रत्येक नागरीकाचे फ़ुफ़्फ़ूस घोक्यात आलेले असतानाही त्या पर्यावरणवादी लोकांचा श्वास घुसमटलेला नाही. ते सगळे आपापल्या घरात सुरक्षित श्वास घेत आहेत. कोरोना नावाच्या ज्या व्हायरसने जगाला भयभीत केले आहे आणि तीस हजाराहून अधिक नागरिक जगभर नुसत्या श्वास कोंडल्याने मृत्यूमुखी पडलेले आहेत. तेव्हा हे आरे कॉलनीतले फ़ुफ़्फ़ूसवादी कुठल्या कुठे गायब झालेले आहेत. हा सगळा प्रकार काय आहे? ज्यांचा जीव आरे कॉलनीतली २७०० झाडे तोडल्याने घुसमटला होता, त्यांचाही एवढ्यात जीव जायला हवा होता ना? कारण हा आजार फ़ुफ़्फ़ूसाचा आहे. मग ते सगळे सुखरूप कशाला राहू शकले आहेत? बहुधा त्यांच्या शरीरात फ़ुफ़्फ़ूस नावाचा अवयवच नसल्याने त्यांना कोरोनापासून कुठलाही धोका नसावा आणि त्यांना जगाला भेडसावणारी चिंताही सतावत नसावी. फ़क्त फ़ुफ़्फ़ूसाचाच विषय असेल तर त्यांनी आज तितक्याच आवेशात कोरोनाविषयक सामाजिक प्रबोधन करायला पुढे यायला हवे होते आणि २१ दिवसांच्या कर्फ़्यूविषयी लोकांचे जनजागरण करायला हवे होते. पण सगळे बेपत्ता आहेत. ही काय भानगड आहे? तर हे सगळे त्या लांडगा आलारे आला गोष्टीतली उनाड पोरे आहेत. त्यांना लोकांची तारांबळ उडवण्याची गंमत करायची असते आणि खरोखरचा लांडगा आल्यावर मेंढरासारखी माणसे मारली जातानाची विकृत गंमत बघण्याचा आनंद लुटायचा असतो.

लांडगा आलारे ही गोष्ट काय आहे? उगाच अफ़वा पसरवून लोकांना धावपळ करायला लावायचा खट्य़ाळपणा तो मुलगा करीत असतो आणि हळुहळू अशा इशार्‍याकडे लोक दुर्लक्ष करू लागतात. थोडक्यात त्याच्या गंमतीमुळे लांडग्याविषयी लोक पुरते गाफ़ील होऊन जातात. त्यामुळेच खरोखरच लांडगा येतो, तेव्हा गाफ़ील होऊन मेंढरांचा फ़डशा पाडण्याचा मार्ग मोकळा होत असतो. आज भारतात जो कोरोनाचा धोका पसरला आहे व फ़ैलावत चालला आहे, त्याला परदेशी प्रवासी किंवा चीन दोषी नाही, इतके असे भंपक समाजसेवक पर्यवरणवादी लोक जबाबदार आहेत. कारण मागल्या दोन दशकात अशा भामट्यांनी विविध प्रकारे समाज जीवनात जनतेला व नागरिकांना बेकायदा जगण्याचे प्रोत्साहन दिलेले आहे. सरकारी आदेश धाब्यावर बसवणे, जनजीवनात व्यत्यय आणण्याला स्वातंत्र्य व अधिकाराचे नाव देऊन एकूण सार्वजनिक जीवनात अराजक माजवण्यास पोषक स्थिती निर्माण करून ठेवली आहे. तसे नसते तर कर्फ़्यु लागू झाल्यानंतर पोलिसांचा फ़ौजफ़ाटा आणून सक्तीने दिल्लीची शाहीनबाग रिकामी करावी लागली नसती. दिल्लीच्या केजरीवाल सरकारने कोरोनाला रोखण्य़ासाठी जमावबंदी लागू केली व एकावेळी २० पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमण्यालाही प्रतिबंध लावला होता. तरी शाहीनबागचा तमाशा चालू राहिला नसता. पोलिस खुप आधीच तो थांबवू शकले असते. पण रोगराईच्या परिस्थितीतही जमाव करून फ़ैलावाला कारण होणारे धरणे चालू राहिले. त्याचे प्रायोजक कोण होते? कॉग्रेसचे नेते आणि पुरोगामी बुरखा पांघरलेले तीस्ता सेटलवाड यांच्यासारखे मायावी राक्षसच नव्हते का? जेव्हा खरोखर तिथे रोगबाधा सुरू झाली, तेव्हा त्यातला कोणीतरी मागे थांबला होता काय? अशा धरणी वा निदर्शनांचे समर्थन करणारे सगळेच मोठे पुरोगामी सर्वात आधी अशा जागा सोडून फ़रारी झाले होते आणि त्यांनी करून ठेवलेली घाण कोणी साफ़ करायची?

शाहीनबागची घाण साफ़ करण्याची जबाबदारी पोलिसांच्या व सरकारच्या माथी मारलेली होती ना? अशा वागण्याचा बौद्धिक नव्हेतर व्यवहारी अर्थ असा, की आम्ही रोगराई फ़ैलावणार आणि सरकारने त्याचा प्रतिबंध केला पाहिजे. थोडक्यात आम्ही समस्या निर्माण करू आणि त्या समस्येचा निचरा निवारण मात्र सरकारी यंत्रणेने केले पाहिजे. अशी चुकीची धोकादायक शिकवण लोकांना कोणी दिलेली आहे? आरे कॉलनीतली २७०० झाडे मेली वा तोडली म्हणून मुंबईकरांचा जीव धोक्यात आला नसता व आलेला नाही. पण आज कायदा झुगारण्यातून कर्फ़्यू मोडण्यातून कोरोनाची बाधा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचते आहे. ती सरकारी आदेश मोडण्यातून. दिडदोन कोटी मुंबईकरांच्या फ़ुफ़्फ़ूसाला कोरोनाची बाधा होण्याचा सर्वात मोठा धोका आलेला आहे, तो नियम कायदे मोडून बेताल वागणार्‍या मुठभर लोकांपासून. कायदा मोडायला प्रवृत्त करणारे महान पर्यावरणवादी किंवा नागरी हक्काच्या अधिकारातली जबाबदारी विसरायला प्रोत्साहन देणार्‍यांनी हा भयंकर धोका लाखो मुंबईकरांना निर्माण केला आहे. कारण कोरोना आणि असे भंपक पुरोगामी पर्यावरणवादी यांच्यातले तेच भयानक साम्य आहे. कोरोना आपण होऊन कुणाला जीवानिशी मारत नाही. तो माणसाच्या शरीरात आधीपासून दबा धरून बसलेल्या अन्य घातक आजारांना प्रोत्साहन देऊन बेताल करतो. त्यामुळे रुग्णाला मृत्यूच्या दारात नेवून सोडत असतो. आज मुंबई वा जगभरच्या कोरोनाबाधीत रुग्णांना अशाच बेताल लोकांनी ठार मारले, हे निखळ सत्य आहे. त्यांनी दुबळी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या नागरिकांपर्यंत कोरोनाला आणून सोडले आणि पुढे त्या विषाणूने रुग्णाच्या देहातील असाध्य आजारांना बेताल करून मृत्यूचा मार्ग सुकर केलेला आहे. त्यातला खरा गुन्हेगार कोरोना आहे, तितकाच त्याला रुग्णापर्यंत आणून सोडणारा प्रसारकही आहे.

शाहीनबागचा तमाशा ऐन रंगात आलेला असताना आणि त्यांची समजूत घालायला सुप्रिम कोर्टाने मध्यस्थ पाठवले असताना धरणे सोडणार नाही; अशी शिकवणी देताना तीस्ता सेटलवाड आपण वाहिन्यांवर बघितल्या आहेत. पण जेव्हा ही बाधा देशात फ़ैलावू लागली, तेव्हा त्याच निरागस मुर्ख शाहीनबागी महिलांना जीवाचा धोका असल्याचे कोणी समजावून सांगायला हवे होते? अधिकार जबाबदारीचे ओझे घेऊन येतो, हे ज्यांनी सांगितले समजावले नाही, त्यांनीच मग अशा गर्दीला प्रोत्साहन देऊन कोरोनाचा मार्ग सुकर केला. त्यांनीच नसलेल्या समस्येसाठी लढायला ह्या निष्पाप मुस्लिम नागरिकांना गर्दी करण्याचा हक्क सांगून गर्दीतूनच रोगराई पसरवली. तेव्हा गर्दी टाळण्याविषयी पुर्ण अंधारात ठेवले. त्यातून ही भयंकर परिस्थिती उदभवली आहे. पोलिस यंत्रणा शाहीनबागच्या धरणेकर्‍यांना हाकलून लावण्यात तोकडी पडली, म्हणून मग तबलिगी जमात निझामुद्दीन दर्ग्यामध्ये दिड हजार लोकांना गोळा करून कोरोनाला प्रोत्साहन देऊ शकली. तिथले आयोजक कायदा आदेश झुगारण्याची हिंमत कशामुळे करू शकले? कारण शाहीनबागेतील अराजकाने त्यांना प्रोत्साहन मिळालेले होते. जे पोलिस प्रशासन शाहीनबागची गर्दी हटवू शकत नाही, ते प्रशासन आपल्याला दर्ग्याच्या गर्दीतून उठवू शकत नाही; हा आत्मविश्वास त्यातूनच आलेला आहे. म्हणून मग २० हून अधिक लोकांनी एकत्र जमू नये, हा दिल्लीच्या केजरीवाल सरकारचा हुकूम मोडून मर्कझ नावाचा समारंभ होऊ शकला. त्याचे आयोजक भले अनभिज्ञ असतील. त्यांना नागरी हक्काच्या मर्यादा शिकवण्यापेक्षा त्याचा दुरूपयोग ज्यांनी शिकवला तेच यातले खरे गुन्हेगार आहेत. त्याच मर्कझ समारंभातून बाहेर पडलेल्यांनी देशाच्या कानाकोपर्‍यात कोरोनाला नेवून पोहोचवले आहे. त्यासाठी वरकरणी ते आयोजक वा दर्गावाले गुन्हेगार ठरतील वा भासतील. पण तेही त्यातले बळी आहेत. ज्यांनी त्यांना कायदा व नियम झुगारण्याची शिकवण प्रोत्साहन दिले, ते खरे सुत्रधार आहेत, मारेकरी आहेत.

आज मर्कझ वा तत्सम गर्दी वा जमावातून कोरोनाचा फ़ैलाव झाल्याचे कारण दिसते आहे. पण अशा प्रसंगी कसे वागू नये, त्याची शिकवण नियम देतात, कायदे शिकवतात. प्रसंगी कायदा सक्तीही करतो. पण कायदा योग्य वेळीच सक्ती करतो, हे सत्य त्यांच्यापासून लपवले गेलेले आहे. त्यांना कायदा व सरकार अकारण सक्ती करते आणि ते आदेश झुगारण्यालाच मानवी हक्क म्हणून ज्यांनी शिकवले; ते खरे गुन्हेगार आहेत. म्हणूनच कोरोनाचे महाभयंकर संकट डोक्यावर घोंगावत असतानाही शाहीनबागचा तमाशा सुरू राहिला आणि मर्कझ हा समारंभ योजला गेला. त्यांचे खरे प्रायोजक असे छुपे पुरोगामी आहेत. त्यांनी त्या मुर्ख मुस्लिम धर्मांधांना त्या भरीला घातले आहे. देशावरचे वा सार्वत्रिक जगावरचे संकट आलेले असतानाही त्यांचा धार्मिक अधिकार अधिक मोलाचा असल्याचे वेडेपण मुस्लिमांच्या मनात ठसवणारे खरे गुन्हेगार आहेत. जवळचे किंवा तात्काळ मिळणारे लाभ माणसाला तातडीने मोहात पाडत असतात. त्यातले दुरगामी तोटे बघायची माणसाची प्रवॄत्ती नसते. सोयीचे लाभ बघून मुस्लिम समाज वा त्यातल्या धर्मवेड्यांना अशा बेताल वागण्याला प्रवृत्त करणारे म्हणुन यातले खरे आरोपी आहेत. पीएमसी बॅन्क वा येस बॅन्केत अधिकचे लाभ बघून फ़सलेल्या सामान्य खातेदारापेक्षा मर्कझ वा शाहीनबागेतले महिला दोषपात्र नाहीत. त्यांना त्यासाठी बौद्धीक प्रोत्साहन देऊन चिथावण्या देणारे खरे कोरोनाचे साथीदार आहेत. भागिदारही आहेत. कारण त्यांनी सरकार वा प्रशासन सक्ती करते तेव्हा अन्याय करते; अशी चुकीची समजूत जनमानसात रुजवून कोरोनाला देशव्यापी रोगराई महामारी होण्याचा मार्ग सोपा केलेला आहे. सरकारी कारवाई वा आदेशावर संशयाचे ढग पसरवून त्यांनीच लांडगा आलारे आला, अशी अराजकाची गाफ़ील रहाण्याची मानसिकता उभारलेली आहे. देशव्यापी कर्फ़्युला पडलेली खिंडारे वा विरोधात दिलेल्या चिथावण्या पुरोगामी अतिरेकातून आलेल्या आहेत. म्हणूनच कोरोनाने शिकवलेला मोठा धडा म्हणजे बेताल बिनबुडाच्या पुरोगामी अपप्रचारापासून अधिक सावध होणे इतकाच आहे. कारण हे भामटे तुम्हाला संकटाच्या खाईत लोटून फ़रारी होतात. आपला जीव मात्र सुरक्षित ठेवत असतात.

तात्पर्य: अशा पुरोगामी, पर्यावरणवादी वा तथाकथित उदारमतवादी भामट्यांपासून सोशल डिस्टंसिंग. त्यांच्यपासून चार हात दुर रहाणे म्हणजे आपल्याला कोरोनापासून वाचवणे आहे. फ़क्त कोरोनाच नव्हेतर कुठल्याही संकटापासून आपल्याला सुरक्षित ठेवण्याचा उपाय, म्हणजे या भामट्यांपासून कायम चार हात दुर रहाणे आरोग्यदायी आहे.

22 comments:

  1. माननीय भाऊ, लेख उत्तम, मनांतलच लेखात उतरवलय. धन्यवाद.
    एक शंका, दिल्ली विधानसभा मोदींना काबीज करता आली असती तर.... शाहिन बाग, दिल्लीतील,राज्याबाहेरील हजारो कामगारांच, संचारबंदी असुनही, सामुदायीक पलायन व निजामुद्दीन मरकज हि प्रकरणे निराळ्या प्रकारे हाताळली गेली असती का ?

    ReplyDelete
  2. भाऊ, अत्यंत परखड लिहिले आहात. समाजात कायदे, नियम तोडण्याची सवय हळूहळू सगळ्यांनाच लागली आहे. त्याची सुरवात वहातूकीचे नियम तोडल्यावर चिरीमिरी घेऊन सोडणारे पोलीस, कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या गुंडाची पोलिसांना फोन करुन सोडवणूक करणारे तथाकथित जनतेचे नेते, मोठ मोठे भ्रष्टाचार करुन ताठ मानेने फिरणारे राष्ट्रीय नेते, एकगठ्ठा मतांसाठी वेगवेगळ्या समाजाचे लागूनचालन करणारे राजकीय पक्ष यांनी भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार हेच मनावर ठसवल आहे आणि त्यात हे पुरोगामी म्हणवणारे मुर्दाड यांना ते म्हणतील तो पुरोगामीपणा व बाकीचे प्रतिगामी हाच यांचा खाक्या आहे. २०१४ पासून यांचा लोकांना सरकारविरोधात भडकवण्याचा खेळ जोरात चालू झाला आहे कारण मोदी यांना भीक घालत नाहीत व यांची दुकाने बंद पडायची वेळ आलेली आहे, शिवाय अनेक NGO च्या मागे हिशेब देण्याचा तगादा लावल्यामुळे तीही दुकाने बंद पडली आहेत मग यांनी काय करायचं? त्यामुळे जे लोक मोदींना विरोध करतील ते यांना आपले जवळचे वाटतात मग ते शाहीनबाग सारख्या कोणत्याही बेकायदेशीर मेळाव्यात सामील होतात. यांना कोणताच विधिनिषेध नाही हेच खरं.

    ReplyDelete
    Replies
    1. एकदम योग्य. पोलिस सुद्धा नेत्यांच्या फोनवर पकडलेल्या लोकांना सोडतात. यामुळे कायद्याची कुणालाच भीती राहिली नाही. आपली ओळख आहे ना मग तर झाले. वरिष्ठ अधिकारी जर सिग्नल तोडणाऱ्या व्यक्तीसाठी फोन करत असतील आणि आपल्या पदाची प्रतिष्ठा पणाला लावत असतील तर काय म्हणायचे?

      Delete
  3. शाहीनबाग येथील निदर्शक व निजामुद्दीन येथील तब्लीगवाले बेजबाबदार आहेतच. परंतु त्यांचा बेजबाबदारपणा देशास घातक ठरणार हे सत्ताधाऱ्यांनी आधीच ओळखून वेळेवर कारवाई करणे आवश्यक होते व तशी कारवाई करण्याचे संपूर्ण कायदेशीर अधिकार केंद्र सरकारकडे होते.

    शाहीनबागेतून २ महिने भडकविलेल्या वातावरणामुळे शेवटी दिल्लीत दंगल होऊन त्यात ५५ नागरिक मारले गेले. पोलिस बळाचा वापर करून तेथील निदर्शक आधीच हटविणे आवश्यक होते.

    निजामुद्दीन येथे मार्च महिन्याच्या प्रारंभापासून मुस्लिम जमा होत होते ज्यात इंडोनेशिया व मलेशियातील अनेक मुस्लिम होते. १३ मार्चपासून तब्बल २९ मार्चपर्यंत हजारो मुस्लिम तेथे जमा झाले होते. कोरोनाचा प्रसार सर्वत्र होत असताना त्यांना भारतात का प्रवेश दिला व प्रवेशानंतर क्वारंटाईनची सक्ती का केली नाही? दिल्लीत १५ मार्चपासून जमावबंदी असतानाही या जमावावर कायदेशीर कारवाई का केली नाही? त्यांना हटविण्यासाठी २९ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत का थांबले होते?

    शाहीनबाग व निजामुद्दीन प्रकरणे देशासाठी घातक ठरतील हे यांना का समजले नाही?

    ही दोन्ही प्रकरणे मोदी-शहांनी योग्य पद्धतीने हाताळली नाहीत असे मला वाटते.

    ReplyDelete
    Replies
    1. माणुस दुसर्यावर ढकलून मोकळा होतो, मशिदीच्या प्रमुख लोकांची काहीच जबाबदारी नाही का

      Delete
    2. मुळात परदेशी लोकांना अताच्या काळात येवू का दिले? बिहार, रांची येथे अनेक परदेशी मौलाना सापडले. यातून सरकारचा हलगर्जी पणा दिसतो. तसेच सर्व जबाबदारी एकाच समूहावर टाकणं योग्य आहे का? जनता कर्फ्यु नंतर ढोल बडविनारे येडे होतेच की. त्याला काय होतंय म्हणणारे अनेक तरुण, म्हातारे नमुने अजून फिरत आहेत की. पोलिसांचे हात अडवानारे नेते मंडळी आहेतच की. त्यांच्या मूर्खपणा सरकार का खपवून घेत आहे? कर्नाटकात lockdown असताना मोठा लग्न समारंभ झाला त्याचा जाब कोण विचारणार?

      Delete
    3. एखाद्या गटारीत किती डुक्कर लपून बसलेत मोदी शाह कशाला बघायला जात्यात

      Delete
    4. संडास बांधले, पाणी कोण देणार?
      हीच घातक वृत्ती.

      Delete
  4. भाऊसाहेब,
    नेहमी प्रमाणे उत्तम लेख.
    सोशल डिस्टंसींग सोबतच कम्युनल डिस्टंसींगची आता गरज आहे असे वाटते.

    ReplyDelete
  5. सतीश यांच्या मताशी मी सहमत आहे
    कदाचित मोदीजी आणि शहासाहेब यांचा वेगळा हेतू असेल.आजपर्यंत त्यांनी अनेक धक्का दायक निर्णय घेतले आहेत

    ReplyDelete
  6. छान प्रखरपणे लिहिले आहे. अति पुरोगामी, पत्रकार, पुरोगामी मिडिया,वकील ,एनजीओ, माओवादी, जिहादी, सेक्युलर राजकीय पक्ष.... आणि न्यायाधीश यांची युती कडेलोट करत आहे.मध्येच दिल्ली दंगल सुध्दा झाली. लेखाबद्दल धन्यवाद. शेअरिंग

    ReplyDelete
  7. Bhau,
    Kayadyaane dharmaprasaar aani Prachaar karanyavar bandee aahe ase malaa vatate. Tevha, Tablig he ase kase karu shakate yavar aapan kaheetaree lihave. Sarkaar yavar kahee karnaar aahe kaa?

    ReplyDelete
  8. Modi aani Shaha yyanni kahi action ghetli tar hech lok tyanna jatiywadi aasa shikka marayla mokle.

    ReplyDelete
  9. ही तथाकथित फुरोगामी जमातीपासून आता कायमचेच सोशल डिस्टंसिंग ठेवले पाहिजे.... ही जमात म्हणजे सुद्रुढ समाजाची रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारा व्हायरसच आहे....
    (भाऊ ..तुम्हाला शतश: नमन) 🙏

    ReplyDelete
  10. बैल गेला आणि झोपा केला असं का होतंय प्रत्येक वेळी. आधी च का नाही निर्णय होत. माझी दहि वर्षां ची मुलगी पण विचारते. आई. पहिलं विमान अडकवून ठेवायला हवं होतं एकविस दिवस. काय सांगू

    ReplyDelete
  11. आणिबाणी ला पर्याय नाही

    ReplyDelete
  12. भाऊ साहेब मला एक कळत नाही भारतात जन्म घेऊन अरबी नाव ठेवणे,अरबी संस्कृति,अरबी कपडे,अरबी मधे अज़ान,अरबी दिसायचा प्रयत्न करने,हे म्हणजे एका घरात जन्मने आणि शेजाऱ्यला बाप मानने. काय अल्लाह ला फक्त अरबी भाषा समजते,अरबी बुरखाछाप संस्कृती आवडते का?
    मला कळत नाही मुहम्मद ने अरबी लोकांना चंद्राचे तुकडे करून चमत्कार दाखवन्या एवजी अरब मध्ये सुपीक जमीन हरियाली, नद्या वाहून चमत्कार दाखवले असते तर अरबी लोकांचे कल्याण झाले असते आणि त्यांना जगण्यासाठी इतर देशावर आक्रमण करून तिथे स्थायिक होण्याची वेळ आली नसती.
    आणि मुस्लिम पुरुषांना ७२ वर्जिन हूर देण्याच लॉजिक पण कळत नाही आणि मुस्लिम महिलांना काय देतो माहित नाही
    दिवसातून ५ वेळा लाऊड स्पीकर वरून एकतो अल्लाह खरा आहे बाकी सारे नकली देव आहेत यावरून एकमात्र असली देव अल्लाह मानून हे सर्व प्रश्न पडले कृपया यावर सविस्तर लिहावे

    ReplyDelete
  13. भाऊ, एकदम मस्त लेख

    ReplyDelete
  14. Modi aani Shaha yyanna dosh denare he visrtat ki, Dillit Kejriwal yyanche Rajya aahe.

    ReplyDelete
  15. आजचा लोकसता संपादकीय म्हनजे तुमच्या नुसार निर्बुधीछा कसा छान देखावा केला जातो! खरच हा संपादकीय उत्तम नमूना! कृपा कारुन आपण आशा..... ‘खतरेमें’.. ! अग्रलेखवार सेक्युलर वलयांच पितल उखड़े कारावे कारण अभी उँट पहाड़ के नीचे आया हे

    ReplyDelete