Tuesday, December 3, 2019

माफ़ करा, सुप्रियाताई

Image result for supriya at assembly

अडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक्रीया देण्यासाठी सुप्रियाताईंचा मला फ़ोनही आलेला होता. आज त्याच लेखातील भूमिका वा मुद्दे यासाठी त्यांची माफ़ी मागायला नवा लेख लिहीण्याची वेळ माझ्यावर आलेली आहे. राजकीय नेता असो किंवा राजकीय विश्लेषक असो, ते माणूसच असतात. त्यामुळे त्यांच्याकडूनही चुका होऊ शकतात. त्या चुका झाल्या तर त्याची प्रामाणिकपणे माफ़ी मागणे गरजेचे असते. हे सुत्र मानत असल्याने मला सुप्रियाताईंची माफ़ी मागणे अगत्याचे वाटले. तेव्हा ताईंनी तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांच्यावर काही विशेष टिप्पणी केली होती. मला ती खटकली म्हणून मी त्याला लेखाचा विषय बनवले होते. आज मला वाटते राजकीय घटनाक्रमाने सुप्रियाताईंना खरे ठरवले आहे आणि मला चुकीचे ठरवले आहे. तेव्हा त्यांनी देवेद्र फ़डणवीस हा ‘ढ’ विद्यार्थी असल्याची भाषा केलेली होती आणि त्यांच्याच सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांच्या नावातच ‘यु टर्न’ असल्याचे मतप्रदर्शन केलेले होते. या दोन्ही गोष्टी मला अजिबात पटलेल्या नव्हत्या. म्हणूनच मी ताईंच्या त्या विधानांचा समाचार घेतला होता. पण अलिकडल्या दोन महिन्यातल्या राजकीय घटनाक्रमाने सुप्रियाताईंचे शब्द खरे केले असून मला चुकीचे ठरवले आहे. कारण ताईंच्या शब्दांना खरे ठरवित शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीमधून युटर्न घेतला आणि राष्ट्रवादी व कॉग्रेस अशा दोन्ही विरोधी पक्षांधी हातमिळवणी करून थेट मुख्यमंत्रीपद मिळवलेले आहे. असे होण्याची शक्यताही मला कधी वाटलेली नव्हती. पण सुप्रियाताई दुरदृष्टीच्या निघाल्या. त्यांना भवितव्य बघता आलेले होते आणि माझ्यासह मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनाही तितके दुरचे बघता आलेले नव्हते. मग ताईंची माफ़ी मागायला नको काय?

तेव्हा सत्तेत सहभागी झालेली शिवसेना धुसफ़ुसत होती आणि ती राजिनामा देऊन बाहेर पडत नाही, म्हणून अनेकजण अस्वस्थ होते. सेनेचे अनेक मंत्री व नेते राजिनाम्याची सतत धमकी देत होते. पण एक पाऊल पुढे टाकायची हिंमत दाखवित नव्हते. उलट अनेकदा तर धमक्या देऊन पुन्हा माघारी फ़िरत होते. म्हणून ताईंनी त्यांच्यावर सडकून टिका केलेली होती. पुढे झेप घ्यायची आणि हळूच माघारी फ़िरायचे; असा राजकारणाचा बाज होता. त्यापेक्षा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब कसे एका निर्णयावर ठाम असायचे; असेच ताईंना सुचवायचे होते. पण युटर्न फ़क्त उद्धव ठाकरेच घेत नाहीत. देशाच्या राजकारणात युटर्न घेण्याचा विक्रम ताईंचे पिताश्री शरद पवारांच्या नावावर नोंदलेला आहे, याकडे मी त्यांचे लक्ष वेधलेले होते. आताही महाराष्ट्राच्या निवडणूका रंगल्या, तेव्हा कितीही अडवणूक भाजपाने केली व अर्ध्या जागांचा शब्द पाळला नाही, तरी उद्धवरावांनी दिलेला शब्द पाळला होता आणि युतीमधून अजिबात युटर्न घेतला नव्हता. पण तोपर्यंतच माझे म्हणणे खरे होते. खुद्द पवारांची कहाणीही वेगळी अजिबात नव्हती. निकाल लागल्यापासून शरदरावांनीही सतत आपल्याला विरोधात बसण्याचा कौल जनतेने दिला असल्याचा उच्चार अखंड केलेला होता. पण जसजसे दिवस पुढे सरकत गेले, तसे पवारही युटर्न घ्यायला पुढे आले. जोपर्यंत उद्धवराव युटर्नच्या जवळ येत नव्हते, तोपर्यंत पवार साहेबही आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यांनीही जनतेच्या कौलाचा जाहिर सन्मान सांगितलेला होता. पण पुढे काही होत नसल्याचे बघितल्यावर ताईंचा दादा अस्वस्थ झाला आणि त्याने एका मध्यरात्री युटर्न घेऊन बंडखोरी केली. उद्धवरावांना युटर्न घेण्याचे काम सोपे होण्यासाठी अजितदादा  बंडखोरीच्या नाट्यात सहभागी झाले आणि युतीच्या एकजुटीवर अखेरचा घाव घातला गेला. युती आपण मोडली नाही या अटीतून उद्धवराव मुक्त झाले आणि त्यांनी विनाविलंब युटर्न घेऊन दोन्ही कॉग्रेस पक्षांशी गळाभेट घेतली.

शिवसेना पक्षप्रमुखच पुढाकार घेताना दिसले आणि ताईंच्या पिताश्रींचा मार्ग सोपा झाला. त्यांनी विरोधी पक्षाच्या बाकापर्यंत केलेली वाटचाल सोडून माघारी वळण घेतले आणि बहूमतासाठी आवश्यक असलेल्या आमदारांची बैठकच घेतली. त्यांना जितेंद्र आव्हाडांकरवी शपथच घ्यायला लावली. हा युटर्न खुप मोठा भूलभुलैय्या असतो. आपण ज्यांना फ़सवायला जातो. तेही आपल्याला त्याच जंजाळात फ़सवू शकतात. म्हणून आधी आमदारांना घेता येणारा युटर्न बंद करण्याची गरज होती. शपथविधी उरकून साहेबांनी आधी तिन्ही पक्षांच्या आमदारांना युटर्न घेण्याची दारे बंद केली आणि बिचार्‍या दादांना युटर्न घेण्याखेरीज पर्याय राहिला नाही. उद्धवराव तर आधीच युटर्न घेऊन बसलेले होते. त्यामुळे ज्यांनी युतीला मते दिली वा आघाडीला मते दिली, त्या मतदाराला चकीत व्हायची पाळी आली. निवडणूकीपुर्वी इव्हीएम यंत्रातून मते फ़िरवली जातात, अशी वदंता होती. पण यंत्रातून मतांची गफ़लत झाली नाही. ती मते योग्य पडली व मोजलीही गेली. पण त्या मतांनी निवडलेले आमदारच इकडून तिकडे परस्पर फ़िरवण्याची नवी किमया काकांनी करून दाखवली. त्यातून नवे युटर्न सरकार महाराष्ट्रात स्थापन झालेले आहे. ही झाली उद्धवरावांच्या नावातील युटर्न खरा  करून दाखवणारी घटना. पण सुप्रियाताई एवढ्यापुरत्या खर्‍या ठरलेल्या नाहीत. त्यांचे अडीच वर्षे जुने आणखी एक भाकित खरे ठरले आहे. त्यांनी तात्कालीन मुख्यमंत्री फ़डणवीस हा ‘ढ’ विद्यार्थी असल्याचेही सिद्ध करून दाखवले आहे. सगळी निवडणूक रंगात आली असताना सतत उद्धव ठाकरे ‘आमचं ठरलंय’ असेच सांगत होते. पण काय आणि ‘कोणाशी ठरलंय’ त्याचा उल्लेख त्यांनी कधीच केला नव्हता. देवेद्र मात्र आपल्याशी ‘ठरलंय’ म्हणून गाजरे खात बसलेले होते आणि जे काही ‘ठरलेलं’ होते, ते पवारांशी ठाकरे ठरवून बसलेले होते. पण फ़डणवीस या ‘ढ’ विद्यार्थ्याला मात्र त्याचा थांगपत्ता ठाकरे सरकार सत्तेत बसण्यापर्यंत लागला नाही.

असो, हे सत्य स्विकारण्याला पर्याय नाही. आज कदाचित सुप्रियाताई आपल्या कार्यबाहुल्यामुळे माझा तो लेख विसरूनही गेल्या असतील. त्यांना नव्या युटर्न ठाकरे सरकारचे यजमानपद भूषवण्यातून सवड मिळालेली नसेल, तर माझ्या जुन्या लेखाचे तरी स्मरण कुठून व्हायचे? पण त्यांना सवड वा आठवण नसेल, म्हणून आपली चुक झाकली जाऊ नये; असे माझे प्रामाणिक मत आहे. त्यासाठी हा लेखनप्रपंच करावा लागला. पण याच निमीत्ताने आणखी एक गोष्ट सांगणेही भाग आहे. आज उद्धवरावांनी ताईंना खरे ठरवित युटर्न घेतला आहे. पण म्हणून त्यांचे नाव बदललेले नाही. सहाजिकच त्यांच्या नावातच असलेला युटर्नही संपलेला नाही. म्हणूनच भविष्यात उद्धवराव आपल्या भूमिकेवर ठाम रहातील, अशी कोणी खात्री देऊ शकणार नाही. आपल्या राजकीय भूमिका वा धोरणावर ठाम रहाण्यापेक्षा आजकाल ‘ठरलंय’ हा ठामपणा झालेला आहे. सहाजिकच उद्या जे काही करायचे आहे, त्याबद्दल कोणाशी काय ठरलेलं असेल, त्याला महत्व आहे. राजकारणात आता युटर्न ही भूमिका झालेली आहे आणि मुख्यमंत्री पदावर आरुढ झालेल्या नेत्याच्या नावातच युटर्न असेल; तर सुप्रियाताईंनी सुद्धा सावध असायला हवे. कारण आजचे मुख्यमंत्री पुर्ण पाच वर्षापर्यंत युटर्न घेणार नाहीत, याची खात्री त्याही देऊ शकणार नाहीत. कारण कोणाच्या नावात युटर्न आहे, ते त्यांच्याकडूनच मला शिकता आलेले आहे. तर मुद्दा इतकाच, की आज मुख्यमंत्री पदासाठी पक्षप्रमुख इतक्या सहजपणे युटर्न घेत असतील, तर त्यांनाच आदर्श मानणार्‍या शिवसैनिक कार्यकर्ते यांनाही आपापल्या ठरलेल्या गोष्टी गाठण्यासाठी युटर्न घेण्याची मुभाच मिळालेली नाही काय? अशा युटर्न राजकारणाने महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यात किती वळणे व घडामोडी लिहून ठेवल्यात ते बघावे लागणार आहे. कारण युटर्न नंतर पुन्हा युटर्न घेताना गोल गोल प्रदक्षिणा करण्यापेक्षा अधिक काही साध्य होत नाही, हे निखळ सत्य आहे. बघूया युटर्न मुख्यमंत्री राज्याला कुठे घेऊन जातात.

पुन्हा एकदा सुप्रियाताईंचे दुरदृष्टीसाठी अभिनंदन आणि  क्षमायाचना!


=======================


ज्यांना जुना लेख वाचायचा असेल, त्यांच्यासाठी दुवा
दाखवायचे सुळे
https://jagatapahara.blogspot.com/2017/06/blog-post_22.html


23 comments:

  1. राजकारण जावूदे गाढवाच्या ....., इकडे रस्त्याची कामे थांबतील, मेट्रो प्रोजेक्ट थांबतील, बुलेट ट्रेन समुद्रात बुडू लागलीये. परवाच कराड चिपळूण रोडनी प्रवास केला. कमरेचा पार खुळखुळा झालाय. हे येडे सरकार सगळा पैसा भलतीकडेच घालेल अशी दाट शक्यता आहे. यांच्या भंपकपणाने महाराष्ट्राचे वाटोळे होणार अशी शक्यता दिसतेय.

    ReplyDelete
    Replies
    1. Krd chipn rlve Ka band Keli BJP ne

      Delete
    2. १००%सत्य! कारण कमिशन घातल्याशिवाय ही बांडगुळं स्वतःच्या शयनकक्षात तरी शिरतात की नाही कोणास ठाउक?

      Delete
    3. Are bhava to rasta koni Nahi banavala ? Fadanvis ne na ? He Sarkar tar attach ala bhava.. ashi Kashi vicharsarni ahe re tuzi ? Doka ahe ki Nahi ? Faddya la bol na 5 varsha complete kele tyane.. nirbuddha kuthla.. BJP Kay paisa dete Kate andha bhakt? Kahi mahinyanni mhan ki rasta Nahi banavala...attach cm zala, 3 divas zale ani rasta bhangar ahe mhne...chutya gurichi hadd aste

      Delete
  2. नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा सोहळा चांगलाच रंगला !!!!
    विधानभवनाला अगदी मंगलकार्यालयाचे
    रूप आले होते .
    "दोन नवरदेव"
    घोड्यावर बाशिंग बांधून तयारच
    होते .
    त्यांना यजमान "आत्त्याबाईंनी "
    लाडाने जवळ घेऊन पापा घेतला .
    काळा तीट लावला नि दृष्ट काढली .
    मामा जरा जास्तच रुसल्यामुळे आत्याबाईंनी त्यांचीही बरीच
    आर्जव केली , गळाभेट घेतली .
    पण मामांचा रागीट चेहरा कॅमेऱ्यापासून लपू शकला नाही .
    आता काय विधानभवन आपल्याच मालकीचे .त्यामुळे आपणच "यजमान "
    म्हणून सगळ्यांची स्वागत करण्याची जबाबदारी आपलीच . अश्या थाटात
    आत्याबाई स्वागताला ऊभ्या होत्या .
    येणारे नवनिर्वाचित आमदार त्यांचे
    पाय पकडून आशीर्वाद घेऊन अगदी कृतार्थ होत होते .
    पाच वर्ष अशीच "कृपादृष्टी "
    राहो . हि भावना डोळ्यातून लपत नव्हती .

    खरंच राजकारण , समाजकारण आणि 'पुरोगामी ' महाराष्ट्राला घराणेशाहीच्याशिवाय पर्याय नाही ?
    वर्षानुवर्षे रुजलेल्या राजेशाहीला कुठेतरी 'शह ' मिळतोय . असे वाटत असताना .
    परत "पहिले पाढे पंचावन्न "!!!!

    ReplyDelete
  3. भाऊ, तुमची विनोद बुध्दी अतिशय नेमकेपणाने लक्ष्यवेध करणारी आहे.

    - पुष्कराज पोफळीकर

    ReplyDelete
  4. Bhau ATA parat Supriya tai cha call yeil

    ReplyDelete
  5. भाऊ शिवसेनेचा हा यु टर्न आजचा नाही,1996 मध्ये सेनेने भाजपकडून ठाण्याची लोकसभा हिसकावून घेतली, राष्ट्रपती निवडणुकीत दोनदा काँग्रेसला पाठिंबा दिला, अगदी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत किरीट सोमय्यांना उमेदवारी देऊ दिली नाही, त्यामुळे आता शिवसेना जे वागली त्यात जे सेनेला अगदी जवळून भाजप संघ कार्यकर्ते ओळखतात त्यांना यात काहीही नवीन वाटलेले नाही,मात्र या वेळी एक गोष्ट घडली आहे ती म्हणजे सेना आता या यु टर्नच्या दुसऱ्या टोकाला पोहोचली आहे आता तिथून मागे फिरणे अवघड आहे कारण भविष्यात परत मागे फिरून यु टर्न घ्यायचा तर गाठ भेट मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत आहे आणि मोदी शहा म्हणजे वाजपेयी अडवाणी आणि प्रमोद महाजन नाहीत आणि याचा प्रत्यय 24 ऑक्टोबर नंतर आला आहे,सत्तेवर पाणी सोडण्यात आले पण दिल्लीतून मातोश्रीवर समेट करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा संपर्क करण्यात आला नाही, देवेंद्र फडणवीस यांचे फोन नाकारणाऱ्या सेनेला अमित शहा यांच्याकडून पुढाकार घेण्याची अपेक्षा होती मात्र शहा यांनी झुकायला नकार दिला आणि पहिल्यांदा सेना नेतृत्व मातोश्री बाहेर पडले आणि समोरच्याला हव्या तशा तडजोडी करत गेले, भविष्यात परत भाजप सोबत जायचे तर सेनेला भाजपच्या दारात जावे लागेल त्यामुळे शिवसेनेला या नव्या मित्रांसोबत काही काळ तरी नांदावेच लागेल यु टर्न इतका सोपा नाही

    ReplyDelete
    Replies
    1. हेच अमित शहा नितीशकुमार यांच्याशी बिहार मध्ये जाऊन युती करू शकतात त्यामुळे राजकारणात काहीच अशक्य नाही असं वाटतंय

      Delete
  6. Bhau devendra Ajit br Ka shapath ghetali tyaver mota lekh liha

    ReplyDelete
  7. भाऊ, राजकारण व नैतिकता याचा दुरान्वये संबंध नसतो हे तुम्ही कायम म्हणता, पण हे ठरवले कोणी व पायंडा कसा काय पाडला गेला? हे असंच चालू राहणार काय कायम?

    ReplyDelete
  8. काहीही म्हणा, मतदाराचा विश्वासघात केलाय याची जाणीव नसते काय या पक्ष प्रमुखांना. की आपल्याला दिसतं ते यांना बघायचं नसतं?

    ReplyDelete
  9. पवार आणि भरोसा हा शब्द विरोधारथी आहे म्हणुन जे झालं त्यात काहीच अजब नाही।

    ReplyDelete
  10. भाऊ, जे होते ते चांगल्यासाठी होते हे नक्कीच. गेली पाच वर्षे किंबहूना उद्धव ठाकरे प्रमुख झाल्यावर शिवसेना हे लोढणेच झाले होते, याला कारण त्याचा महत्वाकांक्षी स्वभाव. (बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेतल्या पदाची अपेक्षा कधीच ठेवली नाही कारण त्यांना त्यांच्या मर्यादा माहिती होत्या आणि सेनाप्रमुख म्हणून जो मान मिळतो तो मुख्यमंत्री झाल्यावर मिळणार नाही हे ही ते जाणून होते.)
    माया, ममता, जयललिता ही लोढणी भाजपाच्या गळ्यातून गळून पडली तशी शिवसेनेचे लोढणे गळून पडेल की नाही हे कळत नव्हते. गेली पाच वर्षे तळ्यात मळ्यात चालले होते आणि अचानक निवडणुकीत युती झाली वाटले आता बरे चालेल पण कसंच काय. पण झाले ते चांगले झाले प्रत्येक पक्षाला आपण कोठे आहोत हे कळेल.

    ReplyDelete
  11. Bhau Yalach mhantat Shal Joditle.

    ReplyDelete
  12. भाऊ,

    जुना 'दाखवायचे सुळे' लेख वाचला. फार उत्तम लिहिला आहे तुम्ही. जे तुम्ही लिहिलेत ते अत्यंत योग्यच लिहिले भाऊ. तुम्ही क्षमा मागायची आवश्यकता मुळीच नाही! यू टर्न घेणाऱ्या व्यक्ती ओळखू आल्या नाहीत यातून फसणाऱ्याचा सरळ आणि विश्वास ठेवणारा स्वभाव व्यक्त होत असतो. यू टर्न घेणारे निर्लज्ज होते, अद्याप निर्लज्जच आहेत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणारे क्षमा याचना करीत आहेत. का? तर हा निर्लज्जपणा वेळीच ओळखता आला नाही म्हणून.

    पुष्कराज पोफळीकर

    ReplyDelete
    Replies
    1. भाऊ,
      एक गोष्ट उशिरा लक्षात आली. परंतु अतिशय महत्त्वाची म्हणून लिहीत आहे. क्षमा मागून तुम्ही एक अतिशय उत्तम गोष्ट केलीत. पारदर्शकता, प्रामाणिकता, निर्मलता म्हणजे काय याचा वस्तुपाठच संबंधित व्यक्ती समोर ठेवलात. आंग्ल भाषेत याला एक उत्तम शब्द आहे - Accountability!

      - Pushkaraj Pophalikar

      Delete
  13. भाऊ सही विश्लेषण व आपण सांगितलेले भाकित लगेचच सत्य म्हणुन प्रत्यक्षात येत आहे.. आरे कारशेड आंदोलनातील सो काॅल्ड पर्यावरण वादी (आठवा नर्मदा व एनराॅन बंद करणारी मेधा पाटकर) यांच्या विरोधी भाजप सरकार ने घातलेले खटले मागे घेतले आहेत.. तसेच अर्बन नक्षलवादी यांचे पुर्ण झालेले ईन्हेस्टीगेशन परत करण्यासाठी तयारी  चालु झाली आहे.. या मागील रिमोट कंट्रोल कोण आहेत. हे सहज समजले असेल..
    यावरून भाऊ घाटकोपर केस मध्ये बाॅम्ब ब्लास्ट मध्ये ज्या पोलिस व आधिकारीनी अतिरेकी/ व साथ देणारे या संशया खाली काही समाज कंटकाना अटक केले होते पण धर्माचे नावाखाली अशा कर्तव्यदक्ष पोलिस दलाला गुन्हेगार ठरवले व न्यायालयाने सस्पेंड केले.. यामागे याच दोन काँग्रेसचे राजकारण होते.. अशामुळे कारवाई करणार्या पोलिस आधिकारी चे खच्चीकरण झाले.. व अतिरेकी कारवायांना खतपाणी घातले गेले.. व संशयीत म्हणुन कारवाई करणाराचे खच्चीकरण झाले ...
    आता पांच वर्षानी पुन्हा दोन्ही काँग्रेस सत्तेवर आल्यावर हे चालू झाले..
    भाऊ प्रसन्न जोशी, खांडेकर, राजदिप सरदेसाई, प्रसुन वाजपेयी यांना हे सोनिया गांधी शरद पवार या दोन रिमोट ना हे ठणकावून विचाण्याची हिम्मत आहे का? व काय गिळुन(?) हे गप्प बसतात व बसवले जातात.. असा लोकशाही चा चौथा खांब पुर्ण उध्वस्त केल्यावर मतदार कसे चांगले सरकार निर्विवाद पण बहुमत देत निवडुन देणार की एकदा भिजला म्हणुन पक्षाचे उमेदवार निवडुन देणार व त्याला लपवण्यासाठी वेस्टन म्हणुन भाजपला अहंकार झाला होता म्हणुन लोकांनी धडा शिकवला...
    यावर भाजप प्रवक्त्याने चॅनल वर एका बाजुने खडे बोल बोलत या चॅनल वाल्यांना विचारले पाहिजे की गेल्या पाच वर्षे कसे अतिरेकी हल्ले थांबले.. कसा भ्रष्टाचार थांबला कशी फेक नावाखाली वाटली जाणारी दिड लाख करोडची सबसीडी वाचवली गेली ही सबसिडी आता पर्यंत कैक वर्षे कसे शासकीय आधीकारी व सत्ताधारी पक्ष कसा वाटुन खात होता ... आता कसे हे थांबले होते... आता परत हे रिमोट वाले शिवसेना मुख्यमंत्री च्या हातानी हे करुन कायमचे हात कलम करणार का?(यामुळे युती परत होऊच शकत नाही अशी तरतुद करत) व पुढे यामुळे सत्तेवर अशा देशद्रोही काँग्रेस सत्तेवर मांड ठोकणार का? व मिडियावाले व भ्रष्टाचारी सत्ताधारी पक्ष यांची भागिदारी अशीच दशकानु दशके चालत परत देशाला खाईत घेऊन जाणार....
    भुजबळ यांना मंत्री केले पण मिडियावाले चिडीचुप आहेत .. मिडियावाले बुमर त्यांना व भिझत्या राजाला..पण लाजे खातर थातुरमातुर मातुर प्रश्न विचारतील.. व ऊत्तर तयारच असेल ते परत परत बजाते रहों करतील..
    यावरून हे सरकार असे सहजा सहजी पडेल या भ्रमात (जशे शिवसेना व काँग्रेस कधी युती करणार नाहीत या भ्रमात ढ मुलगा ग शहा राहिले होते) राहु नये..
    कारण सर्व केसेस निपटायच्या आहेत... व तिन्ही पक्षाच्या कार्यकर्ता मध्ये जान फुंकत परत संजीवनी द्यायची आहे...
    पुढे थोडे जरी काम केले तरी मिडियावाले ढोल पिटत परत पाच वर्षे सत्ता हातात देतील..
    यात गाठ मुरब्बी भिजत्या राजा शी आहे..
    हे सर्व मोदी शहा कसे पलटवतात.. हे पहाणे रोमांचित असेल..

    ReplyDelete
  14. सेनेत नीलम गोर्हे व राष्ट्रवादीत सुप्रियाताई यांचे बोलणे समंजसपणाचे, समतोल आणि खानदानी आब राखून केलेले असते .त्यामुळे त्याचा प्रभाव पडतो .

    ReplyDelete
  15. भाऊ, त्यावेळी राहीलेली खरडपट्टी माफिनाम्यात काढून टाकलीत. छान ..

    ReplyDelete
  16. भविष्यात उ ठा आघाडीशी जुळवून घेण्याच्या नादात शिवसैनिक हे कट्टर हिंदुत्ववादी असल्याचे आजही वागत आहेत।पण त्यांचा सेनापती किमान समान कार्यक्रमात काय कबुल केले हे जस जसे सामोरे जातील तेंव्हा कळेल,भीमा कोरेगाव प्रकरणात शिवसैनिकांनी हिंदू ऐक्यासोबतच वंचित ऐक्यासाठी प्रयत्न केले पण आघाडीला हे मान्य नाही आणि सर्व गुन्हे मागे घेण्यास आग्रही आहेत।
    आता मा मु उ ठा हिंदू ऐक्य आघाडीसोबत कसे पाळतील व शिवसैनिकांना कसा संदेश देतील हा पण लक्षवेधक असेल करण आज शिवसैनिकांचा बहुतांश गट हा bjp सोबत दिसत आहे कारण युती ही भावनिक आधारावर आहे महाविकासआघाडी ही व्यावहारिक ते वर आहे शिवसैनिक बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर विश्वास ठेवून आहेत आणि आघाडीचे कार्यकर्ते सत्तेवर यात पवार साहेबानी महाराष्ट्रात फक्त दोनच पक्ष पर्याय म्हणून ठेवलेत एक महाविकासआघाडी आणि bjp स्पर्धा खूपच लहान झालीये capsulizationof politics।
    आता शिवसैनिक ही व्यवहरिकता स्वीकारतील का रक्त जाळून सेनेचा केलेला प्रचार निवडत bjp चा मार्ग धरतील हे पहायचे आहे।

    ReplyDelete
  17. I sincerely appreciate your courage of conviction which is a very rare commodity in this rapidly changing world. Hats off to you Bhau

    ReplyDelete
  18. राजकारणात सगळेच U टर्न घेतात. आपल्या लाडक्या ढ-विद्यार्थ्याने पण "नाहि नाही नाही, एकवेळ एकटे राहू पण, हे लग्न होणे नाही" असे सांगून शेवटी Naturally Currupt बरोबर 2 दिवस live-in केलीच ना?

    ReplyDelete