Saturday, December 21, 2019

‘व्यापक कटा’ची अंमलबजावणी?

Image result for CAA violence

तसे बघितल्यास ताज्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या संमतीनंतर उठलेला गदारोळ अपेक्षितच होता. किंबहूना हे विधेयक आणले नसते तरीही अशा दंगली करून त्यालाच एल्गार ठरवण्याचे कारस्थान खुप आधीपासून शिजलेले होते. कॉग्रेस खासदार व ज्येष्ठ संपादक कुमार केतकर ज्याला ‘व्यापक कटाचा भाग’ म्हणतात, त्याचाच हा एक अंक आहे. त्यामुळे या नव्या विधेयकात काय तरतुदी आहेत वा काय आक्षेपार्ह आहे, त्याचा उहापोह आताच करण्याची काहीही गरज नाही. जो काही हिंसाचार घडतो वा घडवला जातो आहे, त्याला असंतोषाचे लेबल लावायची घाई त्यामागचा हेतू साफ़ करणारी आहे. खरे तर हे सर्व लोकसभेच्या निकालानंतरच करायचे ठरलेले होते. पण त्याला इतका प्रतिसाद मिळण्याची शक्यता नसल्याने विलंब झाला. राममंदिराचा विषय निकालात काढला गेला, किंवा ३७० कलम रद्दबातल करण्याचा प्रस्ताव संसदेत मंजूर झाला, तेव्हाही असे घडू शकले असते. त्यासाठी चिथावण्या दिल्याही गेलेल्या होत्या. पण त्यातून प्रचंड प्रमाणात हिंसाचार होण्याची शक्यता नसल्याने त्या चिथावण्या निकामी ठरल्या. म्हणून विषय गुंडाळला गेला होता. कारण नवा कायदा वा अन्य बाबी दुय्यम असून भारतात हिंसाचार माजवून मोदी सरकारला बदनाम करणे; हेच मुळात कारस्थान आहे आणि त्याचे हवे तितके पुरावे आताही उपलब्ध आहेत. अन्यथा आयआयटी वा आयआयएम संस्थातही आंदोलन पेटल्याचा खोटारडेपणा सोनियांनी केला नसता. मुद्दा मोदींच्या वा भाजपाच्या सरकारला अपयशी वा पक्षपाती ठरवून भारतात हिंसाचार माजवण्याचा आहे. जसे नाटक अमेरिकेतही डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीच्या मुहूर्तावर रंगवण्यात आले होतेच. त्याचीच पुनरावृत्ती २०१९ च्या लोकसभेत मोदींचा विजय झाल्यानंतर इथे केली जाईल; अशी काही जाणकारांची अपेक्षा होती. तिथे वॉशिंग्टन डीसीमध्ये २०१५ च्या जानेवारीत काय घडले होते?

इथे आपल्याकडे निवडणूक पद्धत व मतदान यंत्रावर संशय व्यक्त करण्यात आला आणि तिकडे त्याच्याच मतदान पद्धतीविषयी संशय घेऊन ट्रम्प कसे हरलेले आहेत, त्याचा डंका पिटला गेला होता. पण त्याला न्यायालयामध्ये आव्हान देणे शक्य नसल्याने ‘नॉट माय प्रेसिडेन्ट’ अशी एक टुम काढली गेली. त्याच घोषणेचा गजर करीत देशाच्या प्रमुख शहरात धुमाकुळ घातला गेला होता. त्याला सामान्य लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही. मग असले तथाकथित निदर्शक राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे जमा करण्यात आले व शपथविधीमध्ये धुडगुस घालण्यापर्यंत मजल गेली होती. ट्रम्प त्याला पुरून उरले आणि आठ वर्षे राष्ट्राध्यक्षपदी बसलेल्या ओबामांना आपल्या सहकारी निर्लज्ज लोकांना साथ देणे शक्य झाले नाही. म्हणून त्यावर लौकरच पांघरूण पडलेले होते. जगभरच्या सहिष्णूता समर्थक उदारमतवादी लोकांचा तो पराभव होता. इजिप्त असो वा अन्य कुठल्याही प्रगत मागास देशात कुठेही केव्हाही हिंसाचार माजवून सामान्य जनतेत संभ्रमाचे वादळ निर्माण करणारी एक जागतिक व्यवस्था उदारमतवाद या मुखवट्याखाली उभारण्यात आलेली आहे. एका बाजूला असे लोक घटना व लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा हवाला देऊन विरोधाचा आवाज म्हणून पुढे येतात. पण व्यवहारात बहुसंख्य मतांमधून ज्यांना सत्ता मिळाली आहे, तो खराखुरा जनतेचा आवाज दडपून टाकण्यासाठी हिंसाचार करतात. हिंसाचारालाच आंदोलन वा चळवळ असे नवे नामाधिकरण देण्यात आलेले आहे. त्याचाच एक प्रकार २०१७ च्या अखेरीस पुण्यात एल्गार परिषदेचे नाव घेऊन करण्यात आला होता. आताही नागरिकत्व सुधारणा विधेयकाची मांडणी संसदेत होत असताना भारतात फ़ारसा आवाज उमटलेला नव्हता. पण त्यासाठी अमेरिकेत थेट भारताच्या गृहमंत्री अमित शहांना वर्णभेदी ठरवून प्रतिबंधित करण्याची धमकी देण्यात आली. ती इथे पेटलेल्या हिंसाचारासाठी पहिली चिथावणी होती.

भारताच्या संसदेत १० डिसेंबर रोजी गृहमंत्री अमित शहांनी हे विधेयक मांडले व दिर्घ चर्चेनंतर ते संमत करण्यात आले. त्याच दिवशी अमेरिकेतील धार्मिक स्वातंत्र्याच्या संबंधातील एका आयोगाने त्यावर सर्वप्रथम आक्षेप घेतला. त्यासाठी या विधेयकाला धार्मिक पक्षपात करणारा कायदा आणणारे म्हणून गृहमंत्री अमित शहांवर प्रतिबंध लागू करण्याचे आवाहन अमेरिकेतील ट्रम्प सरकारला करण्यात आले. तेव्हा भारतात या विधेयकावर फ़ारशी चर्चा सुद्धा सुरू झालेली नव्हती. उलटसुलट मतप्रदर्शन मात्र सुरू झालेले होते. इतक्यात अमेरिकेतील आयोगाने भारताच्या गृहमंत्र्याला गुन्हेगारही ठरवून टाकलेले होते. अलिकडेच गुजरात दंगलीचा चौकशी अहवाल सरकारला सादर झाला आहे आणि त्यात नरेंद्र मोदींवर कुठलाही आरोप होऊ शकत नसल्याचा निर्वाळा देण्यात आलेला आहे. पण सोळा वर्षापुर्वीच त्या दंगलीसाठी मुख्यमंत्र्याला धार्मिक अत्याचार करणारा म्हणून व्हिसा नाकारण्याचा अट्टाहास करणार्‍यात हेच बुद्धीजिवी लोक पुढे होते. ज्यांचा भरणा तिथल्या विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून केलेला असतो. आताही त्याचीच पुनरावृत्ती झालेली आहे. पण त्याची चर्चा इथल्या माध्यमात कुठे होणार नाही. तशी चर्चा केल्यास भारतात उसळलेल्या हिंसाचारामागे कुठली प्रेरणा व साधनसामग्री सामावलेली आहे, त्याचा बोभाटा होऊन जाईल याची भिती आहे ना? म्हणून सोनिया गांधी आता बोलत आहेत. पण सुरूवात त्यांनी केली नाही. इथल्या मुस्लिम वा धार्मिक संघटना किंवा विद्यापीठातही झालेली नाही. त्याची चिथावणी व प्रेरणा अमेरिकेतील प्रसिद्ध उदारमतवादी भडभुंज्यांकडून आलेली आहे. ज्यांच्या इशार्‍यावर इथल्या अनेक सेवाभावी संस्था चालत असतात. तिथून मिळणारे पैसे घेऊन त्यांच्या इशार्‍यावर पर्यावरणापासून कुठल्याही लहानसहान बाबतीत धुमाकुळ घालणे, इतकेच आता या सेवाभावी लोकांचे काम झालेले आहे. मोदींच्या कारकिर्दीत अशा लोकांना अमेरिकेतून मिळणारी रसद तोडली गेली, हे विसरता कामा नये.

ब्रुकिंग्स, हॉवर्ड वा तत्सम विद्यापीठे आणि संस्थांनी जगाची रचना कशी असावी आणि त्यात कशाला सत्य म्हणावे किंवा पुण्य ठरवावे, याचे अधिकार आपल्या हाती घेतलेले आहेत. ते राबवण्यासाठी त्यांनी सेवाभावी संस्था नावाची एक मायावी राक्षसी यंत्रणा जगभर विस्तारलेली आहे. त्यांना लागणारा खर्च व पैसे पुरवणारी फ़ौंडेशन्स इत्यादी उभी केलेली आहेत. त्यांच्याशी संलग्न असलेल्या लोकांकरवी ते आपले अघोषित निर्णय जगावर लादत असतात. यापैकी कोणी कधी इराक सिरीयातून युरोपात पळवून लावलेल्या मुस्लिमांविषयी आस्था दाखवलेली नाही. किंवा त्यांना सामावून घेण्य़ासाठी अमेरिकेवर दबाव आणला नाही. त्यांच्या असल्या तत्वांना सौदी अरेबिया वा मुस्लिम देशात होणार्‍या धार्मिक छळणूकीने बाधा येत नसते. पण श्रीलंका, भारत वा म्यानमार अशा देशातील कुठल्याही बाबतीत नाक खुपसायला ते तत्पर दिसतील. याचे खरे कारण जिथे सेवाभावी संस्थांचा विस्तार नाही, तिथे त्यांचे प्रशासन नाही, इतकेच आहे. भारतात अशा सेवाभावी संस्थांना मोकळीक असल्यानेच ‘व्यापक कटा’ची कार्यवाही लोकशाहीचा मुखवटा पांघरून होऊ शकते. पुतीन, ट्रम्प त्यांना दाद देत नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे. पण भारतात मोदी सरकार आल्यापासून त्यांची मोठी फ़ौज निकामी झालेली आहे. त्यातून मग इथले जिहादी, नक्षली व चर्चसहीत सेवाभावी यांनी चळवळी म्हणून नाचणार्‍या डाव्या उदारमतवादी टोळीला हाताशी धरले आहे. अशी या ताज्या हिंसाचाराची खरी पार्श्वभूमी आहे. तो हिंसाचार काही काळ चालणार आहे. त्यातून भारतात अधिकाधिक धार्मिक धृविकरणच होणार आहे. सध्या माजलेल्या हिंसाचारी घटनांच्या पुढला घटनाक्रम गोध्रानंतरचा असेल. त्या घटनेनंतर जे काहूर माजले, त्यातून भारताचा राजकीय चेहराच बदलून गेला हे विसरून चालणार नाही. गुजरात दंगलीचे अवडंबर माजवणार्‍यांनी हिंदूत्वाचा खोळंबलेला प्रवाह मोकळा करायला हातभार लावला होता. आता त्याची व्याप्ती किती व कुठवर असेल?

23 comments:

  1. NRC CAA ची अमलबजवानी कशी होणार भाऊ? Process करण्यासाठी प्रशासन आणि व्यक्ती यांना किती खर्च येणार? Illegal लोकांचे काय केले जाणार? दुसरे देश त्यांना परत घेणार का? काय त्यांचा कसाब होणार? याने GDP वाढणार का? Practically this is going to be Demo2 of Modi2? मी हिंदू असल्याने proof असून नाही दिले तरी फरक नाही पण माझे classmate मुस्लिम आहेत. त्यांना सर्व proof उभे करावे लागणार का?

    ReplyDelete
    Replies
    1. मुस्लिमांना कुठलेही proof लागणार नाही कायदा समजावुन घेतला तर सगळ Clear होईल उगाच काहीतरी घोळ करता आहेत

      Delete
    2. NRC CAA chi amalbajavani kashi honar te mahit nahi.process sathi kharch yenar ha nakki pn suraksha vyavstha mahatvachi. Illegal lokanna tyancha mulcha deshi deport karav lagnar. Bahutansh lok bangladesh che ahet. Bangladeshane tyanna parat ghyaychi tayari darshvali ahe. GDP ani NRC cha sambandh yet nahi. Proof cha asa ahe ki CAA indian citizens vr lagu hot nahi ani tyamule hindu kinva muslim dighanna hi proof dyave lagnar nahi. Rahili gosht NRC chi tr tyat hindu aso va muslim aso proof dyave lagnar

      Delete
  2. भाऊ,
    असे वाटते की हे फार मोठे जगद्व्यापी जाळे आहे. जगातील अति श्रीमंत अशी काही कुटुंबे याची सूत्रे नियंत्रित करतात. पिढ्यानपिढ्या त्यांनी हे केले आहे असे दिसते. त्याचे केंद्र अमेरिका अथवा इंग्लंड असावे असे वाचनात आले आहे. आणि जगातील सर्व देशातील भ्रष्ट राजकारणी त्यात गुंतलेले आहेत. 'The Untold History Of The United States' या पुस्तका मधे प्रख्यात सिनेमा दिग्दर्शक ऑलिव्हर स्टोन यांनी अमेरिकेचा खरा इतिहास मांडला आहे. तुम्ही वर म्हंटले आहे त्याप्रमाणेच त्यांनी लिहिले आहे की तेथील सर्व विद्यापीठांत पदाधिकारी, प्राध्यापक असलेली मंडळी जनमत प्रभावित करायचे सत्कार्य करीत असतात.
    जगभरातील टॅक्स हेवन चालवणारी मंडळी आणि संस्था आणि राक्षसी वित्त संस्था या सर्व गोष्टींच्या पाठीमागे आहेत असे चित्र दिसते. कुठे कुणाशी कुणाचे आणि कधी युद्ध होणार अथवा नाही होणार हेही याच शक्ती नियंत्रित करतात अथवा करू पाहतात असे दिसते. हा राक्षसी खेळ आहे.

    पुष्कराज पोफळीकर

    ReplyDelete
  3. भाऊ,
    आणखी एक गोष्ट. हा व्यापक कट जितका राक्षसी आणि व्यापक असेल तितका तो लोकांना खोटा वाटतो. सामान्य लोकं त्यावर विश्वास ठेवायला तयार होत नाहीत. एखादा दुसरा वाईट मनुष्य वाईट कृत्य करेल हे खरे वाटते. परंतु इतक्या प्रचंड प्रमाणावर कुणीतरी अपकृत्य करेल हे लोकांना खरे वाटत नाही. The more audacious the conspiracy, the more incredible it seems. म्हणून तर भ्रष्ट लोकं पुन्हा पुन्हा सत्तेत येत रहातात.

    - पुष्कराज पोफळीकर

    ReplyDelete
  4. कम्युनिस्ट पक्षाला नेमकं काय हवंय भाऊ, एकदा फक्त कम्युनिस्ट पक्षावर काही लेख लिहावेत. शिवाय अर्बन नक्सल ना जे फंडस् येतात हे सरकार ला कळत नाहीत काय बँक नेटवर्क मार्फत. त्याची चौकशी करणारी यंत्रणा नाही ?

    ReplyDelete
  5. अगदी योग्य विश्लेषण भाऊ. कालच एक विडिओ बघितला. एक गोरा अमेरिकेमध्ये भाषणे देत फिरतोय.
    त्या व्हिडिओत मुले "ब्राह्मणवाद से आझादी" असे बॅनर्स घेऊन उभे आहेत . हा नक्कीच व्यापक कटाचा भाग आहे. अन्यथा CAB , NRC आणि ब्राह्मणवादाशी काय संबंध ? त्याने केलेल्या अनर्गळ बडबडीचा हा विडिओ पहा - https://www.youtube.com/watch?v=wEB7bT4524w

    ReplyDelete
  6. सत्य त्रिवार सत्य विष्लेषण

    ReplyDelete
  7. आज काही लोक खूप शेरोगिरी करत आहेत , पण उद्या त्यांचा जोगेंद्रनाथ मंडल होणार आहे हे नक्की .

    ReplyDelete
  8. ...कुछ मत बोलो सेक्युलॅरिझम है.

    ReplyDelete
  9. भाऊ काका या देशात सध्या खूप अतिशहाणे लोक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा या देशाला असतानाही हा देश अतिशहाण्या लोकांमुळे इंग्रजांच्या ताब्यात गेला . मुघलांना तर परकीय आक्रमक तर मानतच नाहीत. गेले जवळपास हजार वर्ष या देशावर वेगवेगळ्या परकीय लोकांनी राज्य केले. पण यापासून आपण काहीच शिकलो नाहीत.

    ReplyDelete
  10. ओवेसीचा भाऊ जे म्हणाला होता ते काही दशकांनी नक्कीच खरे होईल असे दिसते आहे .

    ReplyDelete
  11. भारतातील पुरोगामी ,वोक लिबरल म्हणजे कत्तलखान्याकडे धावत सुटलेले बोकड आहेत

    ReplyDelete
  12. भारताचा नायजेरिया /लेबनॉन होण्याची शक्यता आहे का?

    ReplyDelete
  13. शहीद इशरतजहाँ अश्या नावाने अँब्युलन्स सुरु करणारे राष्ट्रवादी नेते आणि त्यांना निवडून देणारी जनता आणि साथ देणारे बुद्धिवादी ,विचारवंत ,अजेंडा राबवणारे कुत्रकार असल्यावर आणखी काय अपेक्षा ठेवता . शेवटी नेते,विचारवंत,ही जनतेमधूनच येतात . आता ह्या सगळ्यांनाच देशाचे वाटोळे करायचे आहे मग त्यात थोडी परकीय मदत घेतली तर बिघडते कुठे?

    ReplyDelete
  14. या आंदोलनात सहभागी हिंदु आपली बुद्धी गहाण ठेऊन जातात काय

    ReplyDelete
  15. भाऊ, सर्वांना न्यायालयात जाण्याचा अधिकार असताना फक्त दंगे घडवणे म्हणजे आपली व्होट बँक मजबूत करणे हाच उद्देश आहे

    बघा ना, ज्या राज्यात खांग्रेस सत्तेवर आहे तिकडे फारश्या दंगली झालेल्या नाहीत, कारण तिकडे खांग्रेस अगोदरच सत्तेवर आहे, जिकडे सत्तेत नाही तिकडेच मुख्यत्वेकरून झालेल्या आहेय

    ReplyDelete
  16. खूपचं वास्तववादी माहिती कळली. भाऊ, परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो हीच सदगुरु चरणी प्रार्थना!

    ReplyDelete
  17. भाऊ, आपण व्यक्त केलेले मत भारतातील दंग्या-धोप्यांच्या बाबतीत खरे आहे, आणि ट्रम्प यांच्या विषयाने आपण लिहिलेली माहिती (नॉट माय प्रेसिडेंट इत्यादी) बरोबर आहे, परंतु या तुलनेतून एक धोका दिसतो, तो म्हणजे अमेरिकेत ज्याला "उजवे" राजकारण म्हणतात त्या राजकारणाशी हिंदुत्वाच्या राजकारणाची तुलना होऊ देण्याचा धोका दिसतो. माझ्या मतानुसार ही तुलना अगदी सर्रास होते पण ती चुकीची तुलना आहे. पण हा गैरसमज पाश्चात्य माध्यमांमध्येपण आहे आणि त्यामुळेच सरसकट भाजपाला वैचारिक विरोध होत असतो.

    खरेतर भारताचा इतिहास, परकीय धर्मांधांची आक्रमणे, जिझिया कर, इथे हिंदूंवर झालेले अत्याचार, हिंदू धर्माची बुद्ध धर्मासमोर झालेली पीछेहाट आणि नंतर आदी शंकराचार्यांनी केलेले पुनरुज्जीवन हे सगळे पारंपरिक ख्रिस्ती धर्माच्या प्रवासापेक्षा इतके वेगळे आहे की, हिंदुत्वाच्या प्रवाहाची पाश्चात्य उजव्या विचारसरणीशी तुलनाच होऊ शकत नाही. आधुनिक पाश्चात्य उजवी विचारसरणी ही गोऱ्या वसाहतकारांना त्यांचे जात चाललेले वर्चस्व आणि वैभव टिकवून ठेवण्याच्या हेतूने केलेली चळवळ आहे. ह्याची पूर्वपीठिका म्हणजे ह्या गोऱ्यांनी आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांनी केलेल्या मूळ स्थानिक रहिवाश्यांच्या बेसुमार कत्तली आणि मिशनऱ्यांनी केलेली बळजबरीची धर्मांतरे आणि इतर हाल. ह्याद्वारे मूळ संस्कृतींचे, भाषांचेच नव्हे तर स्थानिक लोकसंख्येचे समूळ हत्याकांड केले गेले. आफ्रिकेसारख्या देशांतून कृष्णवर्णीय लोकांना बळेबळे आणून त्यांना गुलाम बनवून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले गेले. आता ते पीडित जागे होऊन संघर्ष करताहेत, त्यांना त्यांचे अधिकार परत मिळवायचे आहेत, तर काही वसाहतवादी गोर्यांचा त्याला विरोध आहे आणि त्यातून ही उजवी चळवळ सुरु झाली आहे.

    हे असे वर्चस्व हिंदूना यापूर्वी कधी मिळाले होते बरे? मला तर वाटते की किमान हजार वर्षे हिंदु धर्मावर आणि संस्कृतीवर आक्रमणे होत आलेली आहेत. ततपूर्वी बुद्ध धर्माचा प्रसार भारतात मोठ्या प्रमाणावर झाला, आणि तो मोठ्या लोकसंख्येने सामावून घेतला. हाही हिंदू धर्मावर घालाच म्हणायचे, पण आपण असे म्हणतो काय? बुद्धाला आपण शत्रू मानतो काय? आपण तर त्याला विष्णूचा अवतार ठरवून हिंदू धर्मात त्याची विचारधारा विलीन करून घेतली आणि नरबळी पशुबळी वगैरे अघोरी रूढींना तिलांजली दिली. अगदी ब्रिटिशांच्या काळातही हिंदूना फार वर्चस्वाचे स्थान होते असे म्हणता येत नाही. त्यामुळे भारतातील हिंदुत्त्वाची चळवळ ही अस्तित्वासाठी केलेला संघर्ष असेच म्हणावे लागेल. ही तुलना उजव्या चळवळीशी करण्याचा मोह हा आपण भारतीय पत्रकारांनी पहिला टाळायला हवा.

    ReplyDelete
  18. खूपच वास्तववादी माहिती आपण ह्या लेखनाव्द्वारे दिली. शतशः आभार!
    भाऊ,ईश्वर आपणास उदंड आयुष्य प्रदान करो हीच प्रार्थना!

    ReplyDelete
  19. हे सगळं अतिशय भयानक आहे भाऊ... किती काळ ही बांडगुळ आपल्याला त्रास देत राहणार आहेत??? यांचा कायमचा बंदोबस्त व्हायलाच हवा.

    ReplyDelete