Saturday, September 8, 2018

गोरा पैसा, काळा पैसा

indian currency के लिए इमेज परिणाम

नोटाबंदीच्या निमीत्ताने किंवा अन्य काही बाबतीत देशातले एकाहून एक महान अर्थशास्त्रज्ञ आपले ज्ञान जगाला सांगत आहेत, तेव्हा मनात शंका येथे. बाकीचा अर्थ सोडून द्या, यांना शास्त्रातला ‘अर्थ’ तरी कळातो किंवा नाही याची शंका येते. उदाहरणार्थ नोटाबंदीनंतर आता दोन वर्षे होत असताना जवळपास सर्वच रद्द झालेल्या नोटा रिझर्व्ह बॅन्केत जमा झालेल्या असतील, तर काळा पैसा कुठे गेला, असा प्रश्न पांडित्याचा आव आणून विचारला जातो. ऐकायलाही तो दमदार मुद्दा वाटतो. पण काळा पैसा म्हणजे तरी काय असते? पुर्वी शाळकरी कवितेमध्ये ‘पाऊस आला मोठा आणि पैसा झाला खोटा’ अशी ओळ होती. तसेच काही काळ्यापैशाचे असते काय? काळापैसा म्हणजे नेमके काय असते? बोगस खोट्या चलनी नोटा म्हणजे काळा पैसा असतो काय? लपवून ठेवलेला पैसा म्हणजे काळा पैस असेल, तर तो खोटा असतो की लपवून ठेवला म्हणून त्याला काळा पैसा म्हणायचे? समजा तो पैसा खोटा असेल, तर जगभरच्या गोपनीय खात्यात असे काळेपैसे बॅन्का भरून तरू कशाला घेतात? ज्या अर्थी खात्यात असे पैसे भरले जाऊ शकतात, याचाच अर्थ त्याला खोटा पैसा किंवा बोगस चलन मानता येणार नाही. तोही खरा पैसाच असतो. मग त्याला काळापैसा कशाला म्हटले जाते? तर सरकारी आर्थिक भाषेत ते लपवलेले उत्पन्न असते. लपवलेले म्हणजे सरकारला उत्पन्नातून किंवा व्यवहारातून द्यायचा करभरणा चुकवला, म्हणून तो पैसा काळा मानला जातो. करचुकवेगिरीतला बेहिशोबी पैसा म्हणजे काळा पैसा. काळ्या कागदावर छापलेल्या नोटा वगैरे असे काही नसते. तर करबुडवेगिरीतून तुंबवलेला पैसा म्हणजे काळा पैसा. तो नोटाबंदीमुळे नाहिसा होऊ शकत नाही की त्याच्या नोटा रद्द होत नाहीत. त्या सरकारला दाखवणे भाग पडते म्हणजे त्यावरचा कर निमूट भरावा लागतो.

सामान्य कुवतीच्या माणसाने कार्यकर्त्याने असे प्रश्न उपस्थित केले तर समजू शकते. कॉग्रेसचे कोणी तिवारी बुर्जीवाला यांनी अशी काही मुक्ताफ़ळे उधळली तरी समजू शकते. पण दिर्घकाळ अर्थ मंत्रालय संभाळलेले चिदंबरम असला प्रश्न विचारतात, तेव्हा त्यांच्या बुद्धीची कींव करावीसे वाटते. नोटाबंदी बाजूला ठेवा. ठराविक मुदतीत आपले लपवलेले उत्पन्न जाहिर करून त्यावर पंधरावीस टक्के एकरकमी कर भरायच्या योजना खुद्द चिदंबरम यांनी कशाला राबवल्या होत्या? त्यातून किती रक्कम जमा झाली व किती करचुकव्यांनी ती रक्कम जाहिर केली? त्याचे आकडे खुद्द चिदंबरम यांनीच समोर आणलेले होते. तेव्हा जमा झालेल्या रकमा किंवा नोटा काळ्या किंवा कशा होत्या? त्यातून किती काळापैसा नाहिसा झाला होता? तेव्हाही अशा रितीने गुपचुप नावे लपवून किंवा गोपनीय ठेवून करोडो रुपयांचा काळा पैसाच पांढरा करण्यात आला होता ना? मग त्याचे विश्लेषण चिदंबरम कसे करणार आहेत? की त्यांनी पांढरा केला म्हणून आधी असेल तो काळापैसा होता आणि मोदींनी नोटाबंदीतून लपवलेल्या रकमा बॅन्केत भरायची सक्ती यशस्वी केली, तर आधीच्याही काळ्यापैशाच्या नोटा पांढर्‍या होत्या, असे चिदंबरमना म्हणायचे आहे? पैसा काळा गोरा असा काहीही नसतो. उत्पन्नाची रक्कम कागदोपत्री दाखवून त्यावर आवश्यक असलेला कर भरलेला असेल तर शिल्लक उरलेला पैसा पांढरा असतो. उलट उत्पन्न लपवून करबुडवेगिरी केली, तर ती रक्कम लपवण्यासाठी व्यवहार रोखीत केले जातात आणि बिले चलने प्रत्यक्षात लपवली जातात. पर्यायाने त्यावरचा करभरणा बुडवला जातो. म्हणून अशा सर्वप्रकारच्या व्यवहारांना काळेधंदे म्हणतात आणि पर्यायाने त्यात गुंतलेल्या वा कमावलेल्या पैशाला काळापैसा असे संबोधन मिळालेले आहे. तर अशा पैसा नोटांमधून लपवलेला असतो तो बिळातून बाहेर काढण्यातला एक उपाय नोटाबंदी होती.

हे चिदंबरम वा तत्सम अर्थशास्त्रींना कळत नाही असे बिलकुल नाही. त्यांना जे समजते त्याचा ते इतरांमध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी वापर करीत असतात. त्यात नोटाबंदीही आली. उदाहरणार्थ नोटाबंदी नंतरच्या काळात म्हणजे गेल्या पावणेदोन वर्षात आयकर भरणार्‍या करदात्यांची संख्या सत्तर टक्केहून अकस्मात वाढलेली असेल, तर त्याचे काही कारण असले पाहिजे. आधीच्या दहाबारा वर्षातल्या सरासरी करदात्यांची संख्या वा प्रमाण आणि नोटाबंदीच्या अल्पावधीत वाढलेली करदात्यांची संख्या; याचे गणित रस्त्यावरल्या सामान्य माणसाला कळणार नाही. पण त्यातला जमिन अस्मानाचा फ़रक दिर्घकाळ अर्थमंत्री राहिलेल्या चिदंबरम यांना कळत नसेल, तर त्यांचे अर्थशास्त्र आणि जगभर वापरले जाणारे अर्थशास्त्र यात काही मूलभूत फ़रक असला पाहिजे. हे नव करदाते अकस्मात सदबुद्धी होऊन सरकारच्या कचेरीत येऊन हजर झाले आणि त्यांनी प्रामाणिकपणे कर भरायची याचिका सादर केली असे झालेले नाही. तसे असते तर चिदंबरम यांनी जाहिर केलेल्या सवलतीचे फ़ायदे घेऊनही यापेक्षा अधिक करदाते सरकार दरबारी दाखल झाले असते. पण चिदंबरम त्यांना सवलतीच अशा देत होते, की ठराविक काळ काळेधंदे करा, त्यातून बेफ़ाम काळा पैसा कमवा आणि फ़ारच बोंबाबोंब झाली तर कुकरमधली वाफ़ काढावी तशा योजना चिदंबरम जाहिर करायचे. किरकोळ काळापैसा पांढरा व्हायचा आणि नव्याने काळापैसा निर्माण करायची मोकळीक सुरू व्हायची. प्रतिवर्षी काळापैसा कमी होण्यापेक्षा फ़ोफ़ावत गेला होता आणि पांढर्‍या धंद्यापेक्षा काळे धंदे वधारले होते. नोटाबंदी झाल्यावर सगळ्या अशा काळ्य़ा बेहिशोबी धंद्यावर एका रात्रीत अकस्मात गदा आली आणि त्यासाठी वापरला जाणारा अधिकृत नोटांमधला काळा पैसा बॅन्केत जमा करण्याची सक्ती झाली. तिथे सगळा गोंधळ झालेला आहे. चिदंबरमना तेच तर झोंबलेले आहे.

यातली आणखी एक गंमत लक्षात घेतली पाहिजे. झाडून जितके म्हणून अर्थशास्त्रज्ञ आहेत, ते एका बाजूला आहेत आणि मोदींना अर्थशास्त्रातले काय कळते म्हणून सवाल करीत असतात. पण सत्तर वर्षात इतक्या प्रगल्भ अर्थशास्त्र्यांना कधी करबुडवेगिरीत कमी आणता आलेली नव्हती. सुदैवाने मोदींनी अर्थशास्त्र हाती घेतले म्हणून ती गळती कमी होऊ लागली आहे. चिदंबरम वा तत्सम अर्थशास्त्र्यांच्याच हाती कारभार राहिला असता, तर काळा पैसा तसाच फ़ुगत राहिला असता आणि करदाता संख्या कधीच वाढली नसती. चिदंबरम किंवा यशवंत सिन्हा यांच्यासारखे एकाहून एक अर्थशास्त्रज्ञ नोटाबंदीमुळे किरकोळ धंदे व सुक्ष्म उद्योग व्यापारातील करोडो लोकांचा रोजगार बुडाला, म्हणून मागली दोन वर्ष शंख करीत आहेत. पण हे छोटे उद्योग आपापला व्यवहार देवाणघेवाण रोखीतून करून कर बुडवित होते, यावद्दल चकार शब्द बोलत नाहीत. त्यांच्या बुडवेगिरीमुळे प्रामाणिकपणे कर भराव्या लागणार्‍यांचा भुर्दंड सातत्याने वाढत राहिलेला होता. त्याबद्दल यांनी कधी दु:ख व्यक्त केले होते काय? थोडक्यात जी काळ्या धंद्याची अर्थव्यवस्था या जाणत्यांनी दिर्घकाळ पोसली व जोपासली होती, त्यातून देशातील अर्थकारणाला पर्यायी समांतर अर्थव्यवस्था आरामात चालत होती.  आज शरद पवार यांच्यासारखा दिग्गज आपल्या पक्षाच्या तिजोरीत खडखडाट असल्याची तक्रार करतो आहे. असे त्यांनी यापुर्वी कधी़च म्हटले नव्हते. त्याला नोटाबंदी नाहीतर काय म्हणायचे? कॉग्रेसलाही पैशाची चणचण जाणवत असल्याच्या तक्रारी आहेत. हे सगळे व्यवहार रोखीतले असायचे. त्यातला रोजगार बुडाला आहे. उलट कायदेशीर मार्गाने व्यवसाय करून करभरणा करणार्‍यांची संख्या वाढते आहे. ही सुदृढ वाढ चिदंबरमना कळत नाही, असे थोडेच आहे? पण सत्य बोलण्यासाठी मोठी हिंमत लागते. प्रामाणिकपणाही आवश्यक असतो.

नोटाबंदीने लोकांचे खुप हाल झाले अशा तक्रारी करणार्‍यांचे नेमके काय हाल झाले ते कधी सांगितले जात नाही. पवारांना पैशाची चणचण जाण्वू लागली आहे. पण कधी सामान्य लोकांनी नोटाबंदीने आपल्याला किती त्रास झाला, ते पुढे येऊन सांगितले नाही. कारण अर्ध्याहून अधिक भारतीय लोकसंख्या पाचशे हजाराच्या नोटा किती बाळगू शकत असते? त्यांच्यासाठी आधीच्या नोटा व नंतरच्या नव्या नोटा यांनी कुठलाही फ़रक पडला नाही. नोटांमध्येच लोळणार्‍यांना तकलीफ़ झालेली आहे. ज्यांचे व्यवहार अधिकृत व कागदोपत्री चालतात, त्यांना नोटांची गरजच पडत नाही. नोटाबंदीच्या काळातही चेक वा डीजीटल व्यवहाराला कोणी निर्बंध घातलेला नव्हता. मग व्यवहार कशाला थंडावले होते? ज्यांना पांढरे व्यवहार करायचेच नसतात वा नव्हते, त्यांची मात्र कोंडी झालेली होती. काही लाख खात्यामध्ये मग अशा अनधिकृत पैशाचा भरणा सक्तीने करावा लागला आणि लपवायचे असेल तर त्या नोटांची माती करायची वेळ आणली गेली. त्यामुळेच ७० टक्के नव्या करदात्यांना साक्षात्कार झाला आहे. नोटाबंदीच तोच लाभ आहे. किंबहूना पुन्हा कधी नोटा रद्द होतील या भयाने अशा नोटा जमवून ठेवण्याला मोठा पायबंद घातला गेला आहे. चिदंबरमना तेही कळते. पण कबुल करण्याचा प्रामाणिकपणा नसेल तर रडण्याला पर्याय नसतो ना? ही एक बाब झाली. नोटाबंदीचा दुसरा मोठा लाभ परदेशातून वा इथेही छापून वापरात आणल्या जाणार्‍या करोडोच्या खोट्या नोटा एका फ़टक्यात बाद झाल्या. नव्या नोटाही खोट्या पद्धतीने छापल्या जाणार नाहीत, असे अजिबात नाही. पण ज्या उपलब्ध होत्या, त्या तर तात्काळ विनासायास निकालात निघाल्या ना? ह्याला लाभ नाहीतर काय म्हणतात, अर्थशास्त्रात? राहिला मुद्दा सामान्य लोकांना ताटकळत रांगेत उभे रहायला लागण्याचा वा कालापव्ययाचा. ते हाल सामान्य भारतीयांच्या नशिबी कधी नव्हते?

काळा पैसा लपवण्याच्या जागा अनेक असतात. कोणी सोन्याच्या स्वरूपात पैसे द्डपून ठेवतो, तर कोणी मालमत्तेत गुंतवून पैसे लपवित असतो. राजीव गांधींनी संमत करून घेतलेला मालमत्ताविषयक कायदा मोदींनी नोटाबंदीनंतर प्रत्यक्ष अंमलात आणण्याची पावले उचलली. तीन दशके अनेक सरकारे आली नि गेली. त्यात चिदंबरम वा यशवंत सिन्हा यांच्यासारखे महान अर्थशास्त्री कार्यरत होते. त्यांना मालमत्ता रुपाने दडवलेला काळापैसा बाहेर काढण्यासाठी हाताशी असलेल्या हत्याराला साधी धार लावायची इच्छा कशाला झालेली नव्हती? कायदा तीन दशकापुर्वी झाला. पण तो अंमलात आणायला लागणारी नियमावली मोदी सरकार येईपर्यंत कशाला तयार केली गेली नव्हती? तर त्यातून जन्माला येणारा व बोकाळणारा काळापैसा अशा अर्थशास्त्रींना प्रमाणपत्रे व शिफ़ारसपत्रे देणारा होता ना? रेरा व तत्सम कायदाच्या अंमलात कुठली अडचण या अर्थशास्त्र्यांना भेडसावत होती? पण यापैकी कुठलेही पाऊल उचलण्यासाठी लागणारी हिंमत त्यांच्यापाशी नव्हती, किंवा त्यांचेच हितसंबंध असल्या व्यवहारात सामावलेले होते. अन्य काही कारण असू शकत नाही. अशा रितीने जो काळा पैसा पांढरा झाला, तो उधळून राजकारण्यांना खिरापत वाटायला शिल्लक उरलेला नाही. म्हणून मग पवार किंवा चिदंबरम यांच्या पक्षीय तिजोरीत खडखडाट झालेला आहे. समस्या गरीबांची अजिबात नसून, अशा लब्धप्रतिष्ठीतांची आहे. त्यांना नोटाबंदीने घुसमटून टाकलेले आहे. आपण जोपासलेल्या व बाळसेदार झालेल्या काळ्या पैशाच्या नरडीला मोदीने नख लावले असेल, तर या माऊल्यांचा तडफ़डाट अपरिहार्य नाही काय? कारण नुसत्या नोटाबंदीवर भागलेले नाही, तर मालमत्तांमध्ये बिल्डर्सच्या उद्योगात गुंतवलेल्या पैशाची सोडवणूक करण्यात आता रेरा वगैरे कायदे आडवे येणार आहेत. म्हणून तिजोरीत खडखडाट झालेला आहे.

कालपरवा कुठल्या नव्या बॅन्केच्या उदघाटन समारंभात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरव मोदी व मल्ल्या यांच्या बुडीत कर्जाविषयी आपले मौन सोडले आणि ही इतकी अवाढव्य बिनतारणाची कर्जे कशी व कोणी दिली होती, त्याचा भंडफ़ोड करून टाकला. युपीएच्या कालखंडात कोणीही भुरटा मंत्र्यांना पुढार्‍यांना सांगून फ़ोन करायचा आणि कुठल्याही छाननीशिवाय करोडो रुपयांची खिरापत वाटली जात होती. त्यावर कुठलाही खुलासा चिदंबरम देऊ शकलेले नाहीत. आपला गुन्हा मान्य करण्याची हिंमत नाही, की स्पष्टीकरण देता आलेले नाही. पण शहाजोगपणे उलट तेच महोदय म्हणतात, एनडीएच्या काळात किती एनपीए खात्यांना कंपन्यांना नवी कर्जे वाटली, ती मोदींनी सांगावी. समजा मोदी सरकार चुकले वा बदमाश असेल, म्हणून चिदंबरम सोवळे ठरत नाहीत. एकप्रकारे आपण केलेल्या गुन्ह्याची कबुलीच ते देत नाहीत काय? तशा बिनतारणाच्या कर्जाने बॅन्का बुडवल्या गेल्या असतील, तर आज पळून गेलेल्या मल्ल्या नीरव यांचे साथीदर चिदंबरम व कॉग्रेस पक्षच ठरतो. पण तोंड वर करून हेच बेशरम लोक म्हणतात, मल्ल्या नीरव यांना पळून कसे जाऊ दिले? तिजोरी उघडून नोटा चोराच्या बॅगेत यांनी मॅनेजर असताना भरून दिल्या आणि नंतर चोर पळाल्यावर गेटवरच्या राखणदाराला जाब विचारतात, त्याला पळून कसे जाऊ दिले. याला सामान्य भाषेत बेशरमपणा म्हणतात. अर्थकारणाच्या भाषेत बहुधा युक्तीवाद म्हणत असावेत. एकूण काय, अर्थशास्त्रज्ञ म्हणून जे कोणी आपली अक्कल पाजळत असतात, त्यांनीच जगातल्या मोठमोठ्या अर्थव्यवस्था बुडवलेल्या आहेत. महाशक्ती असलेल्य देशांनाही धुळीस मिळवलेले आहे. चिदंबरम किंवा मनमोहन सिंग यांच्यासारखे त्याला अपवाद कशाला असतील? नोटाबंदीने देशाची आर्थिक प्रकृती सुधारत असेल, तर त्यांना जीवघेण्या वेदना झाल्यास नवल नाही.

18 comments:

  1. नोटाबंदी यशस्वी झाली की नाही ते सांगा. UPA हरामखोर होती हे नव्याने सांगायची गरज नाही. सारख सारख तेच. त्याना वाईट ठरवून किती दिवस काढणार. चमचेगिरी करायची पण हद्द असते. संबित 'अ'पात्रा अनौपम अखेर नंतर तुम्हीच

    ReplyDelete
  2. Ok agreed
    पण खडखडाट bjp च्या तिजोरात का नाही झाला

    ReplyDelete
  3. जे वाचक हा लेख वाचतील त्यांना नोटबंदीचे महत्व कळेल, बाकीच्यांच काय

    ReplyDelete
  4. नोटबंदीच्या निर्णयामुळे फायद्यापेक्षा तोटे अधिक झालेले आहेत हे कळण्यासाठी कोणा अर्थ-शास्त्रज्ञाची गरज नाही. काळा पैसा कमावणारे सरकारपेक्षा एक पाऊल नेहमीच पुढे असतात. कुठलेही सरकार ह्या लोकांपेक्षा जास्त स्मार्ट होऊ शकत नाही.सर्व लपवलेला काळा पैसा पांढरा झाला याचा अर्थ कोणीतरी त्या संपत्तीचा मालकी हक्क घेण्यासाठी पुढे आला हाच आहे. सरकारचा असा भ्रम होता की फक्त रोख रक्कमेच्या रूपातच काळा पैसा दडवून ठेवलेला आहे. तो भ्रम होता की भ्रमाचा आव होता हा संशोधनाचा विषय आहे.प्रत्यक्ष कराच्या संकलनात वाढीची अनेक कारणे असू शकतात. 2 वर्षात त्याचा संबंध नोटबंदीशी लावणे हे आतताईपणाचे लक्षण ठरेल. कदाचित प्रत्यक्ष करदात्यांमध्ये झालेली वाढ ही काही वर्षांपूरती असलेली हंगामी ठरू शकेल.
    आपण ज्या कार्यालयात ज्या पदावर काम करतो त्या पदाची संपूर्ण जबाबदारी आपल्याला घ्यावी लागते. माझ्या आधी असलेल्या कर्मचाऱ्याने घाण करून ठेवली होती त्यामुळे हे आता असे उलटे होते आहे असे आपण फार काळ नाही बोलू शकत, फार तर फार सहा महिने.

    ReplyDelete
  5. लोकसत्ता दैनिकाचे संपादकही सदानकदा या ' नोटबंदीच्या ' यशाबद्दल दुगाण्या झाडत असतात. या कुबेरासारख्या संपादकांचे फुकटाचे ' दाना - पाणी ' ( सहापानाचा सहजानंद ) बंद झाल्यामुळे हे सैरभैर झालेले संपादक महाशय सारखे मोदींवर ' नोटबंदीबद्दल ' पिचकाऱ्या टाकत असतात. काँग्रेसने ' राज्यसभेचे ' तिकिटाचे गाजर दाखविले तर या पिचकाऱ्यांचे प्रमाण वाढत जाईल हे निश्चित.

    ReplyDelete
  6. वरिल न्युज धक्कादायक आहे मी आधीच्या माझ्या नोटबंदी वरिल मेसेजेस मध्ये हा मुद्दा पण कव्हर केला होता. यात करन्सी इन सर्कुलेशन याचे आकडे चुकीचे होते व यामुळे 99% नोटा परत जमा झाल्या असे दिसते. हे सर्व व्यवस्थीत मांडले पाहिजे. मग नोटबंदी चे खरे स्वरुप बाहेर येईल. आनंद देवधर सर सारख्यांची किंवा ईतर इकॅनाॅमिस्ट ची हेल्प घेणे योग्य होइल.

    ReplyDelete
  7. नोटबंदी वर आक्षेप टिका ही आरबीआय चा रिपोर्ट जुलै आॅगस्ट 2017 मध्ये आल्यावर चालू झाला.. यात लोकांन/नागरिकांन कडे असलेली रोकड रक्कम RBI ने गृहीत धरताना खालील गोष्टीत गफलत आहे असे वाटते..
    1. 1000 व 500 च्या खोट्या नोटा खुप प्रमाणात होत्या 20% पर्यंत सहज असतील ज्या बँकेत जमा झाल्या नाहीत.
    2. महत्वाचे म्हणजे आरबीआय ने वरील लोकांन कडील मनी इन सर्कुलेशन काढताना नोटा वापरा मुळे ठराविक काळात त्या फाटतात असे गृहीत धरले जाते व नविन नोटा छापल्या जातात. यात गफलत अशी आहे की अशा सर्व नोटा बाद झाल्या असे धरणे चुकीचे आहे कारण काळा पैसा मोठ्या प्रमाणात सुरक्षीत साठवून ठेवला जातो त्यामुळे वापरातील नोटा जर दोन वर्षांत खराब होत असतील तर अशा साठवलेल्या नोटा 6-7 किंवा जास्तच वर्षे खराब होत नाहीत. यामुळे आरबीआयने घोषित केलेली रक्कम खुप चुकीची आहे. व वरिल खालील मुद्दे आपण नोटबंदी वर मोदी वर टिका करणार्यांना सांगितले पाहिजेत.

    खरोखरच सामान्य माणसाला नोटबंदी मुळे जरी थोडा त्रास झाला तरी त्यांनी तो सहज सोसला पण मोठ्या धेंडाची सांगताही येत नाही व सहन ही होत नाही अशी अवस्था झाली.
    कदाचित मोदी सरकारचा वारु आडवण्यासाठी काही देशद्रोही /बिनडोक लोकसभा निवडणूकीत परत जुन्या नोटा बदलून देण्याचं आश्वासन पण देतील.
    तसेच मोदींनी अनेक भाषणात नोटबंदी मुळे बँकेत पैसा जमा झाल्यावर सरकारचे काम चालु झाले असे सांगितले. परंतु पुढील कारवाई इन्कमटॅक्स खात्याने चालु करायची आहे.

    परंतु नोटबंदी मुळे खालील फायदे नक्कीच झाले
    1. रीझर्व बँके देशातील पत धोरणाने जी रक्कम बँकेत जमा असते त्यावर विविध मेझर्स (monetary policy measures) द्वारा देशाच्या अर्थ व्यवस्थेच्या जरुरी प्रमाणे कंट्रोल ठवते. परंतु जी रक्कम काळ्या पैशाच्या स्वरुपाने सरक्युलेशन मधे असते त्यावर रीझर्व बँकेचे कंट्रोल नसते. अशी रोकड रक्कम बँकेत जमा झाली त्यामुळे रीझर्व बँकेचे या पैशावर नियंत्रण आले. (यामुळे भाववाढ नियंत्रणात मदत झाली)
    2.असा काळा पैसा साठेबाजी करुन अन्नधान्याच्या किमती वाढवुन फायदा कमवण्यासाठी उपयोग करतात. यामुळे महागाई वर अंकुश ठेवला गेला.
    3. असा काळा पैसा निवडणूक प्रचारात वापरला जायचा त्यावर अंकुश आला.
    4. बँकेचे डिपाॅझीट वाढली त्यामुळे पहिल्यांदाच बँकांनी सुमारे 0.90% ते 1% नी बँकांनी कर्जा वरिल व्याजदर कमी केले.
    5. यामुळे वस्तूंची प्राॅडक्शन काॅष्ट पण कमी झाली.
    6. टॅक्स रुपाने पण सरकारने रेव्हेन्यु वाढवला.
    7. डिजिटल व्यवहार वाढले.
    8. बँकेत ठेवी जमा झाल्या व अनेक डबघाई ला आलेल्या बँकांना संजीवनी मिळाली.
    9. काळ्या बाजारी लोकांना जरब बसली.
    10. अतिरेकी काळा पैसा गायब झाल्या मुळे अशा कारवाईत घट झाली.

    असे अनेक फायदे झाले आहेत. पण हे मिडियावाले लोकांन पर्यंत पोहचवणार नाहीत.
    पहा मिडियावाले याला नोटबंदी म्हणतात असेच न्युजपेपर व बिबिसी व पुरोगामी इंदिरा गांधी च्या लोकसंख्या नियंत्रणाच्या प्रयत्नांना नसबंदी म्हणुन हा प्रयत्न हाणून पाडला व आज देश जवळ जवळ आराजकात लोटला गेला आहे त्यावेळी लोकसंख्या 65-67 करोड होती व पहिल्यांदा लोकसंख्या वाढीचा दर निगेटिव्ह झाला होता.
    इंदिरा गांधी त्यावेळी नसबंदी ची आवश्यकता लोकांना समजून सांगायला कमी पडल्या परंतु मोदींनी हे आवाहन पेलून जनतेचा पाठिंबा मिळवला.
    परंतु जस जश्या निवडणूक जवळ येतील तस तसे नोटबंदी फेल म्हणुन मोदी विरोधक प्रचार करत आहेत व मिडियावाले यात मोदी ना टारगेट करत आहेत.
    यावर मोदी कशी मात करतात हे पहावं लागेल. व देशाचे भवितव्य ठरवेल.
    वरिल मुद्दे आपल्या तील इकाॅनाॅमीस्टना पडताळुन पहायला सांगितले पाहिजेत. ( कारण आरबीआय काही अधिकारी किती भ्रष्ट आहेत हे फार कमी लोकांना माहिती आहे.. त्यामुळे अशा लोकांनी दिशाभूल करणे शक्य आहे.)

    ReplyDelete
  8. भाऊ एकदम सही फार महत्वाचे विश्लेषण
    याच बरोबर काही मुद्दे असे आहेत
    नोटबंदी वर आक्षेप टिका ही आरबीआय चा रिपोर्ट जुलै आॅगस्ट 2017 मध्ये आल्यावर चालू झाला.. यात लोकांन/नागरिकांन कडे असलेली रोकड रक्कम RBI ने गृहीत धरताना खालील गोष्टीत गफलत आहे असे वाटते..
    1. 1000 व 500 च्या खोट्या नोटा खुप प्रमाणात होत्या 20% पर्यंत सहज असतील ज्या बँकेत जमा झाल्या नाहीत.
    2. महत्वाचे म्हणजे आरबीआय ने वरील लोकांन कडील मनी इन सर्कुलेशन काढताना नोटा वापरा मुळे ठराविक काळात त्या फाटतात असे गृहीत धरले जाते व नविन नोटा छापल्या जातात. यात गफलत अशी आहे की अशा सर्व नोटा बाद झाल्या असे धरणे चुकीचे आहे कारण काळा पैसा मोठ्या प्रमाणात सुरक्षीत साठवून ठेवला जातो त्यामुळे वापरातील नोटा जर दोन वर्षांत खराब होत असतील तर अशा साठवलेल्या नोटा 6-7 किंवा जास्तच वर्षे खराब होत नाहीत. यामुळे आरबीआयने घोषित केलेली रक्कम खुप चुकीची आहे. व वरिल खालील मुद्दे आपण नोटबंदी वर मोदी वर टिका करणार्यांना सांगितले पाहिजेत.

    खरोखरच सामान्य माणसाला नोटबंदी मुळे जरी थोडा त्रास झाला तरी त्यांनी तो सहज सोसला पण मोठ्या धेंडाची सांगताही येत नाही व सहन ही होत नाही अशी अवस्था झाली.
    कदाचित मोदी सरकारचा वारु आडवण्यासाठी काही देशद्रोही /बिनडोक लोकसभा निवडणूकीत परत जुन्या नोटा बदलून देण्याचं आश्वासन पण देतील.
    तसेच मोदींनी अनेक भाषणात नोटबंदी मुळे बँकेत पैसा जमा झाल्यावर सरकारचे काम चालु झाले असे सांगितले. परंतु पुढील कारवाई इन्कमटॅक्स खात्याने चालु करायची आहे.

    परंतु नोटबंदी मुळे खालील फायदे नक्कीच झाले
    1. रीझर्व बँके देशातील पत धोरणाने जी रक्कम बँकेत जमा असते त्यावर विविध मेझर्स (monetary policy measures) द्वारा देशाच्या अर्थ व्यवस्थेच्या जरुरी प्रमाणे कंट्रोल ठवते. परंतु जी रक्कम काळ्या पैशाच्या स्वरुपाने सरक्युलेशन मधे असते त्यावर रीझर्व बँकेचे कंट्रोल नसते. अशी रोकड रक्कम बँकेत जमा झाली त्यामुळे रीझर्व बँकेचे या पैशावर नियंत्रण आले. (यामुळे भाववाढ नियंत्रणात मदत झाली)
    2.असा काळा पैसा साठेबाजी करुन अन्नधान्याच्या किमती वाढवुन फायदा कमवण्यासाठी उपयोग करतात. यामुळे महागाई वर अंकुश ठेवला गेला.
    3. असा काळा पैसा निवडणूक प्रचारात वापरला जायचा त्यावर अंकुश आला.
    4. बँकेचे डिपाॅझीट वाढली त्यामुळे पहिल्यांदाच बँकांनी सुमारे 0.90% ते 1% नी बँकांनी कर्जा वरिल व्याजदर कमी केले.
    5. यामुळे वस्तूंची प्राॅडक्शन काॅष्ट पण कमी झाली.
    6. टॅक्स रुपाने पण सरकारने रेव्हेन्यु वाढवला.
    7. डिजिटल व्यवहार वाढले.
    8. बँकेत ठेवी जमा झाल्या व अनेक डबघाई ला आलेल्या बँकांना संजीवनी मिळाली.
    9. काळ्या बाजारी लोकांना जरब बसली.
    10. अतिरेकी काळा पैसा गायब झाल्या मुळे अशा कारवाईत घट झाली.

    असे अनेक फायदे झाले आहेत. पण हे मिडियावाले लोकांन पर्यंत पोहचवणार नाहीत.
    पहा मिडियावाले याला नोटबंदी म्हणतात असेच न्युजपेपर व बिबिसी व पुरोगामी इंदिरा गांधी च्या लोकसंख्या नियंत्रणाच्या प्रयत्नांना नसबंदी म्हणुन हा प्रयत्न हाणून पाडला व आज देश जवळ जवळ आराजकात लोटला गेला आहे त्यावेळी लोकसंख्या 65-67 करोड होती व पहिल्यांदा लोकसंख्या वाढीचा दर निगेटिव्ह झाला होता.
    इंदिरा गांधी त्यावेळी नसबंदी ची आवश्यकता लोकांना समजून सांगायला कमी पडल्या परंतु मोदींनी हे आवाहन पेलून जनतेचा पाठिंबा मिळवला.
    परंतु जस जश्या निवडणूक जवळ येतील तस तसे नोटबंदी फेल म्हणुन मोदी विरोधक प्रचार करत आहेत व मिडियावाले यात मोदी ना टारगेट करत आहेत.
    यावर मोदी कशी मात करतात हे पहावं लागेल. व देशाचे भवितव्य ठरवेल.
    वरिल मुद्दे आपल्या तील इकाॅनाॅमीस्टना पडताळुन पहायला सांगितले पाहिजेत. ( कारण आरबीआय काही अधिकारी किती भ्रष्ट आहेत हे फार कमी लोकांना माहिती आहे.. त्यामुळे अशा लोकांनी दिशाभूल करणे शक्य आहे.)

    ReplyDelete
  9. खुप चांगला लेख ईतर भाषात translate केला पाहिजे पण सत्तेवरच्या धुंदीत भाजपचे पुजारी वर्ग हे करत नाहीत.
    एका पक्षाची निर्विवाद बहुमत आले की भारताच्या लोकशाही ला हा शापच आहे. ममता समता जरललीता यांना चटणीवर आणायला सत्तेवर पाहिजे होत्या

    ReplyDelete
  10. नोटबंदी फेल झाली? ओह रियली..??

    २०१३ मध्ये, माहितीच्या अधिकारा अंतर्गत (आरटीआय) मिळालेल्या माहिती मध्ये असे उघडकीस आले होते की, आरबीआयच्या वॉल्ट (तिजोरी)मध्ये जमा झालेल्या नोटांची संख्या प्रेसमध्ये छापलेल्या नोटांच्या एकूण संख्येपेक्षा अधिक होती. शेकडो कोट्यावधी रुपये जे ऑफिशियली कधी मुद्रित झालेच नाहीत, ते रहस्यमय रीतीने भारतीय रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या तिजोरी मध्ये आले..!!!! महत्त्वाचे म्हणजे, छापखाने (सेक्युरिटी प्रेस) कोणताही स्टॉकला ठेऊ शकत नाही, कारण पैसे धारण करण्यासाठी कोणतीही व्हॉल्ट, प्रेस मध्ये नसते. ह्या 'घोस्ट नोट्सचा' गूढ कधी तपासला गेला नाही. 'भारतीय रिझर्व बँक नोट मुद्रण', भारतीय रिझर्व्ह बॅंकेची संपूर्ण मालकीची सहायक कंपनी भ्रामक माहिती देत असे. दोन आरटीआय क्वेरी (१० नोव्हेंबर २०११ आणि २४ डिसें २०११) मधील छापलेल्या नोटांच्या महितीत ४६०८ कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या असलेल्या ७२.७८२ दशलक्ष नोट्स चा फरक होता. आता, ही एक अशी माहिती आहे जी पब्लिक डोमेनमध्ये आहे आणि मी गूगल वर शोधू शकलो.

    यूपीएच्या काळात केलेल्या चुकांची प्रामाणिकपणे चौकशी झाली तर असे किती गाडलेले मुडदे बाहेर पडतील याची कल्पना न केलीली बरी. अखेरीस, ९९ टक्केच काय तर माझ्या अंदाजा प्रमाणे जर सरकारनी वेळेच्या मर्यादा टाकल्या नसत्या तर तब्बल १२०% 'लीगल' टेंडर सिस्टममध्ये परत येऊ शकत होती..!!!! आरबीआय च्या रेप्यूटेशन चे बारा वाजले असते, जर सखोल चौकशी केली असती तर. त्यातच, चिदंबरम वाचला, कारण मोदी पीएम झाले तेंव्हा प्रणबदा राष्ट्रपती होते..!!!! ( चिदंबरम आणि प्रणबदा दोघेही फाइनांस मिनिस्टर होते यूपीएच्या वेळी ). जशी आरबीआय, तसेच राष्ट्रपती भवन पण एक इंस्टिट्यूशन आहे ज्याची क्रेडिबिलिटी जपणे आवश्यक होतं..!!!!

    बाकी, यूपीए च्या घोटाळेबाजांनी (मोदीजी म्हणतात तसं) अर्थव्यवस्थेत लॅंडमाइन्स पेरुन ठेवल्या होत्या, हे मात्र १००% खरं आहे..


    Source ...

    Millions of notes not printed in mints land in RBI vaults - http://toi.in/0J_Wga/a31gj

    Download https://timesofindia.onelink.me/efRt/wapsharewhatsapp

    ReplyDelete
  11. भाऊ
    वरिल न्युज धक्कादायक आहे मी आधीच्या माझ्या नोटबंदी वरिल मेसेजेस मध्ये हा मुद्दा पण कव्हर केला होता. यात करन्सी इन सर्कुलेशन याचे आकडे चुकीचे होते व यामुळे 99% नोटा परत जमा झाल्या असे दिसते. हे सर्व व्यवस्थीत मांडले पाहिजे. मग नोटबंदी चे खरे स्वरुप बाहेर येईल. आनंद देवधर सर सारख्यांची किंवा ईतर इकॅनाॅमिस्ट ची हेल्प घेणे योग्य होइल.

    ReplyDelete
  12. नोटबंदी फेल झाली / पास झाली ही चर्चा चालतच राहणार. ज्या बोकील सरांची ही कल्पना त्यांच्यानुसार नोटबंदीचे परिणाम ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. त्यामुळे फेल का पास असा निर्णय करणेच मुळात चुकीचे आहे.

    पण ते जाऊं देत.. माझ्या दृष्टीने नोटबंदी चा निर्णय घेण्यासाठी लागणारी हिम्मत व स्वतःच्या राजकीय करिअरला पणाला लावण्याची किंमत, हे दोन्ही मोजण्याची पात्रता.. या एका निकषावर देखील मी या व्यक्तीला पुन्हा पंतप्रधानपदी पाहू इच्छितो. या व्यक्तीचा इरादा योग्य आहे आणि त्यासाठी निर्णय घेण्याची ताकदही आहे. त्याबद्दल जर काही चुका झाल्याजरी असतील तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्याची माझी स्वतःची तयारी आहे. :-)

    ReplyDelete
  13. Good artical pan Hindi asale aste tar khup lokana kalale aste

    ReplyDelete