Tuesday, August 28, 2018

तेव्हा वय किती होते?

rahul on sikh riots के लिए इमेज परिणाम

आजी आमच्या लहानपणीच्या उचापतींवर तक्रार करताना मालवणी भाषेत म्हणायची, माजो बाबा काय करी, तर असलेला नाय करी. म्हणजे कुठल्याही गोष्टीची नासाडी केली, मग हे विश्लेषण असायचे. अर्थात लहान मुलांविषयी यापेक्षा अधिक तक्रार कोणी करू शकत नाही. कारण समज कमी असलेल्या मुलांकडून आणखी काय अपेक्षा केली जाऊ शकते? सहाजिकच अशा मुलांपासून किंमती वस्तु वा अपायकारक गोष्टी आठवणीने दुर राखल्या जातात. राहुल गांधी पक्षाध्यक्ष झाल्यापासून खुपच आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्या आक्रमकतेमुळे आजीचे ते शब्द हल्ली नेहमीच आठवू लागलेले आहेत. जितके म्हणून राहुल गांधींच्या प्रतिमा संवर्धनाचे काम पक्षाने हाती घ्यावे, तितका हा मुलगा त्यांचे प्रयत्न मातीमोल करून टाकतो. अर्थात त्यात काहीच नवे नाही. दिडदोन वर्षापुर्वी त्याने प्रशांत किशोर या देशातील सर्वोत्तम निवडणूक चाणक्यालाही धुळीस मिळवून दाखवले होते. किंबहूना उत्तरप्रदेश कॉग्रेसला एकहाती जिंकून देण्यासाठी रणनिती बनवण्याचे कंत्राट प्रशांतने घेतले, तेव्हाच त्याने आपली अब्रु धुळीस मिळवण्याचा धोका पत्करला आहे, असे भाकित मी केलेले होते. उत्तरप्रदेश विधानसभेसाठी प्रत्यक्ष मतदान होण्यापुर्वीच राहुलने प्रशांतची पुर्ण वाट लावून टाकलेली होती. तेवढ्यावरच भागलेले नव्हते. अखेरचा प्रयास म्हणून प्रशांतने समाजवादी पक्षाशी आघाडी करून बघितली, तर राहुलने आपल्या सोबतच अखिलेश यादवलाही जमिनदोस्त करून टाकले. म्हणूनच आता कुठल्याही परिस्थितीत कॉग्रेसशी हातमिळवणी करायला अखिलेश राजी होत नाही. तर अशा सर्वज्ञानी पक्षाध्यक्षाला परदेशी नेवून अनिवासी भारतीयांसमोर पेश करण्याचे पाप मुळातच इतर ज्येष्ठ कॉग्रेस नेत्यांचे होते. त्यात राहुलचा काय गुन्हा होता? त्याने आपल्या परीने तिथेही यथेच्छ गोंधळ घातला. त्याच्या वयाला पेलवणारे काम नसेल तर राहुलचा दोष काय?

परदेशात अनेक लोकांशी जाहिर संवाद करताना वा मुलाखती देताना राहुलनी आपल्या ज्ञानाची कवाडे इतकी सताड उघडून टाकली, की नंतर चिदंबरम यांच्यापासून थेट सुरजेवाला यांच्यापर्यंत अनेकांना राहुल चौदा वर्षाचा तर होता, असले खुलासे करावे लागले. ब्रिटन येथील संवादात राहुलने अकारण मधमाशांचे मोहळ उठवून दिले. तिथे कोणी त्याला १९८४ च्या शीख हत्याकांडाचा प्रश्न विचारला, तर त्याविषयी गप्प रहाणे शहाणपणाचे होते. पण मुळातच शहाणा असलेल्या राहुलने गप्प कशाला रहावे? गप्प रहायचे नसेल, तर त्याने तिथल्या तिथे तेव्हा आपण अवघे चौदा वर्षाचे होतो आणि बाहेर काय घटना घडतात आपल्याला ठाऊकही नव्हते; असे प्रतिपादन करायला काही अडचण नव्हती. पण आज आपले वय किती आणि शिखांची कत्तल झाली, तेव्हा आपले वय किती होते, त्याचा हिशोब कोणी मांडायचा? सहाजिकच हा प्रयत्न राहुलने यशस्वीरित्या मातीमोल करून दाखवला. ज्यामुळे पक्षाची व राहुलची प्रतिमा उजळ व्हावी म्हणून प्रयत्न केलेला होता, त्यातच त्याने पक्षाला अडचणीत आणुन दाखवले. आता चिदंबरम वा अन्य कॉग्रेसी जाणते नेते राहुल दंगलीच्या वेळी अवघा चौदा वर्षाचा असल्याचा खुलासा करीत आहेत. म्हणूनच शिख दंगलीविषयी राहुलला जबाबदार धरणे योग्य नसल्याचीही सारवासारव करीत आहेत. पण हे राहुलला कधी कळायचे? शिवाय आणखी प्रश्न असा येतो, की गांधी हत्येच्या वेळी राहुल गांधींचे वय किती होते? कारण शिख हत्याकांडाविषयी राहुल जितकी ठामपणे विधाने करतात, तितक्याच खात्रीपुर्वक ते गांधीहत्येविषयी देखील बोलत असतात. मग गांधीहत्येच्या वेळी राहुलचे वय किती होते? त्याचाही खुलासा चिदंबरम यांच्यासारख्यांनी करायला नको काय? शंभर वर्षापुर्वी कधीतरी अमेरिकेत कोकाकोला बनवणारा माणूस लिंबू सरबत विकत असल्याची इत्थंभूत माहिती राहुलपाशी असते, तर शीख हत्याकांड वा गांधी हत्येचे काय घेऊन बसलात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रत्येक परदेश दौर्‍यात तिथे कामानिमीत्त वा कायमस्वरूपी स्थायिक झालेल्या भारतीयांशी संवाद साधण्याचे तंत्र सुरू केले. म्हणून त्यांना तितकेच समर्थ उत्तर देण्यासाठी कॉग्रेसने आपले पंतप्रधान पदाचे उमेदवार राहुल गांधींनाही तशाच पद्धतीत पेश करण्याचा केलेला प्रयास योग्यच होता. परंतु आपला उमेदवार म्हणजे विनोदाचा बादशहा असल्याचे लपवावे कसे, याचा कॉग्रेसच्या चाणक्यांना न सुटलेला प्रश्न आहे. सहाजिकच ते जितका म्हणून राहुलची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करतात, तितक्याच वेगाने राहुल आपल्यासह पक्षाची प्रतिमा धुळीस मिळवण्यासाठी राबत असतात. त्यातून मग अशा केविलवाण्या स्थितीत पक्षाला जावे लागत असते. परदेशात राहुलनी अतिशय आत्मविश्वासाने बालिशपणा करून दाखवला, त्यासाठी त्यांचे कौतुक करावेच लागेल. तुम्ही पंतप्रधान असता, तर डोकलामचा प्रश्न कसा सोडवला असता, असा प्रश्न कोणी विचारला. तर राहुलनी अतिशय प्रामाणिकपणे आपल्याला डोकलामविषयी कसलीही माहिती नसल्याचे सांगून टाकले. म्हणजे कुठलाही तपशील वा माहिती नसताना आपण बेछूट आरोप करीत असल्याचे कबुल केले. हा प्रामाणिकपणा कौतुकाचा नाही काय? बाकी पक्ष उघडा पडला हा वेगळा विषय आहे. जर्मनीच्या पंतप्रधान अंजेला मरकेल वा आणखी कुणा राष्ट्रप्रमुखाने राहुलनी मागितलेली भेट नाकारली. कारण असल्या माणसाशी काही खाजगीत बोलले, तर तो बाहेर जाऊन वाटेल तशी मुक्ताफ़ळे उधळण्याची भिती त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. अर्थात त्याची कॉग्रेसने पर्वा करण्याचे काही कारण नाही. सवाल देश वा पक्षाचा नसून नेहरू-गांधी खानदानाची भलावण करण्याचा आहे. त्यासाठी कॉग्रेस रसातळाला गेली तरी बेहत्तर. समस्या बिचार्‍या पुरोगामी व समविचारी पक्षांसाठी आहे. कारण त्यांना झळ सोसून राहुलचे समर्थन करावे लागते आहे.

कधीकाळी कॉग्रेस पक्ष नुसता देशव्यापी संघटनाच नव्हती, तर तिची एक कार्यकारिणीही होती. त्या कार्यकारीणीमध्ये दिग्गज नेते असायचे आणि ते देशासमोरच्या अनेक प्रश्न समस्यांवर उहापोह करायचे. पक्षाचीच नव्हेतर देशाची ध्येयधोरणे ठरवण्यासाठी या नेत्यांच्या नियमित बैठका व्हायच्या. त्यात काय चर्चा झाली वा कोणते निर्णय झाले, त्याची माहिती घेण्यासाठी पत्रकारांची झुंबड उडत असे. पण दोन दशकापुर्वी सोनिया गांधी कॉग्रेसच्या अध्यक्ष झाल्या आणि कॉग्रेस कार्यकारिणीला फ़क्त आपल्या अध्यक्ष वा नेत्यांच्या चुका कशा देशहिताच्या आहेत, त्याचे खुलासे देण्यापुरतेच काम शिल्लक राहिले. त्याहीपेक्षा महत्वाचे काम म्हणजे नेत्याच्या नाकर्तेपणाचे गुणगान करून त्यालाच कर्तबगारी ठरवण्याच्या कुशाग्र बुद्धीला कार्यकारिणीत स्थान मिळू लागले. आता तर राहुल गांधी पक्षाध्यक्ष झालेले आहेत. त्यानंतर पक्षाच्या पराभवातला नैतिक विजय समजावून सांगू शकतील, त्यांनाच कार्यकारिणी व संघटनेत महत्वाचे स्थान मिळत असते. सहाजिकच एकूण कॉग्रेस कार्यकारिणी व नेतृत्व आता चौदा वर्षाचे होऊन गेलेले आहे. त्या वयातला गोंधळ व धरसोडवृत्तीचा आपल्याला नित्यनेमाने अनुभव येत असतो. या परदेश दौर्‍यात राहुलनी कोणता मुर्खपणा केला, त्याचे खुलासे विचारायला पत्रकारांची झुंबड उडाली आणि सगळी कॉग्रेस राहुलच्या चुकांना समजूतदारपणा ठरवण्याच्या कामाला जुंपली गेली. हेच आता पक्षकार्य बनुन गेले आहे. रोजच्या रोज राहुलनी काहीतरी नवा मुर्खपणा करायचा वा मुक्ताफ़ळे उधळायची आणि पक्षाने सारवासारव करण्याचे काम हाती घ्यायचे, हा परिपाठ झाला आहे. चिदंबरम वा तत्सम लोकांची विधाने व खुलासे ऐकले असते, तर इंदिराजी, यशवंतराव, चंद्रभानु गुप्ता किंवा त्या काळातले दिग्गज किती केविलवाणे होऊन गेले असते, त्याची कल्पनाच आंगावर शहारे आणते.

8 comments:

  1. भाउ काॅंगरेस राहुल यांच काय व्हाहायच ते होइलचपन केवळ मोदी विरोधी पुरोगामी लोकांची त्यांनाा वाचवायची तारांबळ बघुन मजा येते खर यावेळी२०१३आठवल निवडनुकीला एवढेच महिने राहीले होते तेव्हा सरकारविरोधी किती वातावरण तापल होत मोदी असेच संवाद साधत होते लोक त्यांना येउन मिळत होते पन यावेळी सरकार राहिल बाजुला विरेधी पक्षांनांच उत्तरे द्यावी लागतायत

    ReplyDelete
  2. Don't know but who arranged his interviews.if they r planned why didn't interviewr give question list to rahul first n then he should think or take advice which ans he will give. If no such arrangement u throw him in public don't expect good thing.and this for Congress or rahul image saving as we Indians don't want rahul PM even opposition leader.India deserves good opposition leader too

    ReplyDelete
  3. सुयोग्य हेच शब्द ईथे चपखल वाटतील!

    ReplyDelete
  4. असल्या विदूषकाला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या शिक्षणसंस्थेने आमंत्रण दिले असेल तर त्यामुळे संस्थेच्या नावलौकिकावरच प्रश्नचिन्ह उभे राहिल. एकेकाळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये फ्रेडरीक हायेक हे अर्थशास्त्रातील उत्युंग व्यक्तिमत्व प्राध्यापक म्हणून होते. त्यांच्या हाताखाली एल.एस.ई मध्ये भारतीय बी.आर.शेनॉय यांनी पी.एच.डी केली. बी.आर.शेनॉय हे भारतातील एक विसरलेल्या नायकांपैकी (फरगॉटन हिरो) आहेत. १९९१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था खुली करायचा निर्णय घेतला गेला त्याच्या अनेक वर्षे आधी बी.आर.शेनॉय यांनी भारताने हाच मार्ग पत्करावा हे सांगितले होते. १९९१ मध्ये तो निर्णय घेतला गेला तेव्हा आणि त्यानंतरही बी.आर.शेनॉय यांची कोणालाही आठवणही नाही. त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डाव्यांचे साम्राज्य पसरले. हॅरॉल्ड लास्की आणि राल्फ मिलिबँड यासारखे डावे प्राध्यापक तिथे झाले. आजही तिथे डाव्यांचीच मक्तेदारी आहे. अशा डाव्यांचे विचार अगदी अजिबात पटत नसले तरी हे प्राध्यापक उच्च दर्जाचे intellectuals आहेत, निदान एखाद्या गोष्टीचा सखोल अभ्यास करायची त्यांची सहजप्रवृत्ती आहे हे मान्य करायला काहीच हरकत नसावी. अशा intellectuals च्या वातावरणात राहुल गांधी या विदूषकाला कसे आमंत्रण दिले गेले? आणि त्याला तिथे लोकांनी सहन कसे केले? लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये नक्की कोणत्या विषयांवर व्याख्याने आणि वादविवाद होतात हे https://digital.library.lse.ac.uk/collections/publiclectures/speaker अशा वेबपेजवरून सहज समजून येईल. अशा वातावरणात राहुल गांधींसारख्या माणसाला स्थान देणे म्हणजे आकाशगंगा आणि ताऱ्यांच्या मालिकेत एखाद्या ४० वॉटच्या पिवळट बल्बने हजेरी लावण्यासारखे आहे.

    असल्या विदूषकांना अशा उच्चशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये नक्की का बोलावतात हे न उलगडणारे कोडे आहे. २००५ मध्ये आय.आय.एम अहमदाबादने लालूप्रसाद यादवला भारतीय रेल्वे मध्ये घडविलेल्या 'चमत्काराबद्दल' बोलायला आमंत्रित केले होते. असे म्हणतात की लालूने स्वत:च 'मी येणार' हा हट्ट धरल्याने संस्थेचे तत्कालीन डायरेक्टर बकुल ढोलकिया यांनी 'उगीच केंद्र सरकारशी का पंगा घ्या' म्हणून नाही म्हटले नाही. शेवटी आय.आय.एम ही केंद्र सरकारने चालविलेली संस्था आहे. २०१० मध्ये राहुल गांधी तिथे यायचे म्हणत होता तेव्हा त्याकाळी डायरेक्टर असलेल्या समीर बारूआ यांनी असला विचार न करता त्याला थारा दिला नाही म्हणून राहुल शेवटी आणंदच्या इन्स्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेन्ट मध्ये जाऊन बोलला.

    भारतातल्या शिक्षणसंस्थांचे एक वेळ समजू शकतो. पण परदेशातील संस्थांचे काय? त्यांना भारतातील असल्या लोकांना नक्की का बोलवावेसे वाटते यामागची प्रेरणा समजत नाही. मागच्या आठवड्यात एल.एस.ई ने राहुल गांधीला बोलावले. मागे हार्वर्डने लालूला पण बोलावले होते.

    ReplyDelete
    Replies
    1. मूळ लेखाइतकेच सुंदर विवेचन. आभारी आहे. अधिक माहीती कळली.

      Delete
  5. ब्रिटिश लोकांची ही खासियत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा गांधी घराण्याबाहेरील एक भारतीय राजकारणातील व्यक्ती दीर्घकाळ अशा एका राज्य सरकारचे ( गुजरात ) यशस्वी नेतृत्व करून प्रचंड बहुमताने केंद्रीय राजकारणात उतरते व दिवसेंदिवस त्या व्यक्तीची भारतातच न्हवे तर परदेशातही वाहवा होते आहे ही या ब्रिटिश राजकारण्यांची मोठी ' पोटदुखी ' आहे. विश्वास ठेवा अथवा ठेवू नका पण या युवराज ' गांधीला ' अनेक कार्यक्रमासाठी लंडनला बोलावले जाते. यापूर्वीही युवराज तेथे गेले होते पण आत्ता या कार्यक्रमाचा जरा ' गाजावाजा ' झाला आहे इतकेच. तीच गोष्ट ' नोबेल पारितोषिक ' वाटपाबाबत. अमेरिका , ब्रिटन हे मुख्यतः आणि काही इतर युरोपिअन देश हे अशा व्यक्ती नोबेल पारितोषिकासाठी निवडतात ( निवडलेल्या लोकांपेक्षा इतर अनेक तुल्यबळ लोक या पारितोषिकासाठी स्पर्धेत असतात. पण शेवटी निवड ही पूर्णतः ' राजकीयच ' असते. ) ज्यांचा उपयोग हा ते ज्या देशांमधून आलेले असतात तेथे हुकुमानुसार ' पिचकाऱ्या ' मारायचे काम करतात. बरं हे ' नोबेल पारितोषिक ' वाले असल्याने याना बोलायचीही पंचाईत. सध्याचे डोळ्यासमोरील एकमेव उदाहरण म्हणजे ' अमर्त्य सेन ' हा माणूस येता जाता भारतावर / भारत सरकारवर पिचकाऱ्या टाकत असतो. मागील सरकारने याला ' नालंदा युनिव्हर्सिटी ' ची जबाबदारी दिली होती. तिथे या माणसाने काहीही ' ढिम्म ' केले नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. Right.same with arundhati roy. Her so called 'Booker' book is rubbish no one knows but what is she famous for demeaning India in every platform BBC takes her inter views tell all

      Delete