Thursday, October 1, 2015

दादरीतल्या हिंसेला जबाबदार कोण?

   

सामुहिक भयगंड प्राण्यांच्या कळपामध्ये उपजत समुह मनोवृत्तीची जाणिव उत्पन्न करत असतो आणि मग त्यामुळे जे आपल्या कळपातले नाहीत असे वाटते, त्यांच्या विरोधा्त भयंकर क्रुर प्रतिक्रियेचा उदभव होतो - बर्ट्रांड रसेल

दिल्लीनजिक उत्तर प्रदेशातील दादरी येथे एका वस्तीत एक भयंकर घटना घडली. एका मुस्लिम कुटुंबात कोणी गोमांस शिजवुन खाणार असल्याची अफ़वा पसरली आणि अवघा गाव तिथे गोळा झाला. त्या जमावाने मग खरेखोटे न तपासता सरळ त्या कुटुंबावर हल्ला चढवला. त्या मारहाणीत कुटुंबाचा प्रमुख महंमद अखलाक हा मरण पावला, तर त्याचा मुलगा गंभीर जखमी झाला. अंगावर शहारे आणणारी अशीच ही घटना आहे आणि त्यामुळे कुणाही संवेदनशील व्यक्तीचे हृदय हेलावले पाहिजे. पण सोशल मीडियात ज्यांनी यावरून कल्लोळ माजवला, ती मंडळी खरेच इतकी संवेदनशील व मानवतावादी आहेत काय? त्यांच्या मनात जी चीड उफ़ाळून आली, ती मृत व्यक्ती माणुस आहे म्हणून आलेली आहे, की त्याचे नाव व मारणार्‍या जमावाच्या धर्मामुळे इतका उमाळा आला आहे? ही बाब तपासणेही अगत्याचे आहे. कारण अशा घटना निदान भारतात नव्या नाहीत, की भाजपाची देशात सत्ता आल्यानंतरच घडलेल्या नाहीत. तुमच्या भावना खरेच प्रामाणिक असतील, तर असे कुठेही वा कुठल्याही व्यक्तीच्या संबंधात घडले तरी हृदय द्रवले पाहिजे. संताप यायला हवा. तो धर्म वा नावानुसार चिकित्सक असता कामा नये. म्हणजे असे, की मृताचे नाव महंमद अखलाक ऐवजी मनोहर असते तरी तुमच्या तळपायाची आग मस्तकात जायला हवी ना? तसा अनुभव येतो काय? की पुरोगामी ठरण्यासाठी मुस्लिम नावाचा कुणी मारला गेला, मगच संवेदनशीलता जागते. उलट हिंदू असेल तर तीच संवेदनशीलता झोपा काढते. अनुभव असा आहे, की जमाव कुठल्या धर्माचा आहे, त्यानुसार पुरोगामी संवेदनशीलता कार्यरत होते किंवा झोपा काढते. तसे नसते तर ह्याच लोकांनी इतकाच कल्लोळ तीन वर्षापुर्वी मुंबईत रझा अकादमीच्या दंगलखोरी नंतरही केला असता. पण अनुभव तसा अजिबात नाही.


११ ऑगस्ट २०१२ रोजी आझाद मैदानच्या परिसरात हिंसेचे थैमान घातले गेले होते. अमर जवान ज्योती या स्मारकाची मोडतोड झाली, बसेस रोखून प्रवाश्यांना मारहाण झाली. अगदी पोलिसांवरही हिंसक हल्ले झाले व पोलिसांच्या गाड्याही पेटवल्या गेल्या होत्या. त्यातून पत्रकारही सुटले नव्हते. बोरीबंदर स्थानकात बंदोबस्ताला असलेल्या महिला पोलिसांशी राजरोस अश्लिल चाळे केले गेले. किती व कोण जखमी झाले, त्याचा तपशील इथे द्यायला नको. प्रकार इतका भीषण होता व लोकांमध्ये इतकी सतप्त प्रतिक्रीया उमटली होती, की मुंबईच्या पोलिस आयुक्तांना तडकाफ़डकी बदलावे लागले होते. पण या सर्व घटनाक्रमापासून तथाकथित पुरोगामी मैलोगणती दूर राहिले होते. कोणाच्या डोळ्यात अश्रू आले नाहीत, की कोणी कारवाईची मागणी केली नाही. फ़ार कशाला? राज्यात पुरोगामी सरकार होते आणि त्याने पोलिसांना आदेश दिले होते, की रमझानचे उपवास चालू असल्याने तोवर कुणाला पकडू नका. कुणाला त्या महिला पोलिस, रस्त्यावरचे प्रवासी वा पत्रकारांवरील हल्ल्याने विचलीत केले होते काय? अजिबात नाही! त्यात मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुढाकार घ्यावा लागला होता. हा सगळा घिंगाणा कशासाठी घातला गेला होता? तिकडे दूर कुठे इशान्येला म्यानमार नावाचा देश आहे. तिथल्या बौद्ध जनतेने रोहिंग्या मुस्लिमांवर अत्याचार केले. घरेदारे जाळली म्हणून मुंबईत हा हिंसक धुमाकुळ झाला होता. तेव्हा कोणकोण नामवंत पुरोगामी रस्त्यावर आले, कारवाईच्या मागणीसाठी खुलेआम पुढे सरसावले होते? उलट त्यातले बहुतांश पोलिसांनी लाठी उगारली नाही वा गोळीबार केला नाही, म्हणजेच शहाणपणा केला, अशी सारवासारवी करीत होते. आज एका दुरच्या खेड्यातल्या घटनेने अस्वस्थ झालेल्यांच्या संवेदना, अशा निवडक व चिकित्सक असतात. त्यांनाच आपल्याकडे पुरोगामी म्हणून ओळखले जाते.

याचा अर्थ दादरी उत्तर प्रदेशातील घटना योग्य वा समर्थनीय ठरत नाही. तिचाही निषेध व्हायला हवा आणि त्यातले जे कोणी गुन्हेगार असतील, त्यांना पकडून कठोर शिक्षा द्यायला पाहिजे. पण ती मागणी करणार्‍या सर्वांचा एकच सूर असला पाहिजे. त्यात पुरोगामी प्रतिगामी अशी विभागणी होण्याचे कारण नाही. ती विभागणी होते, तेव्हा मग हिंसाही पुरोगामी व प्रतिगामी अशी विभागली जाते. आज ज्यांना दादरीच्या घटनेने अस्वस्थ केले आहे, त्याच्या हेतूविषयी म्हणूनच शंका घेतल्या जातात. कारण असे लोक नेमक्या मुंबईच्या घटनेनंतर चिडीचुप गप्प बसतात. दोन्हीतला फ़रक काय आहे? दादरीची घटना एका छोट्या गावापुरती आहे आणि मुंबईची घटना एका मोठ्या आर्थिक महानगरातली आहे. तिथे प्रसंग घडला तेव्हा निदान पोलिस फ़ाटा हजर नसेल वा अपुरा असेल. पण मुंबईची घटना त्याहीपेक्षा भीषण व मोठी असताना पोलिस आयुक्त जातिनिशी हजर होते. तरीही दंगलखोरांनी धुमाकुळ केला. त्यातल्या एका दंगलखोराला कुणा दुय्यम अधिकार्‍याने पकडले, तर सोडून देण्य़ासाठी खुद्द आयुक्तच आदेश देत असल्याचे कॅमेराने टिपले होते. इतक्या टोकाचा पक्षपात झाला होता. कशासाठी पुरोगामी सरकार बोटचेपे धोरण घेत होते? कशासाठी आयुक्तच दंगेखोराला पाठीशी घालत होते? कशासाठी तमाम पुरोगामी तोंडे मुग गिळून गप्प बसली होती? दंगेखोर हिंसाचारी मुस्लिम होते म्हणून? आज त्यांनाच खुप दूरच्या घटनेने कंठ कशाला फ़ुटला आहे? जमाव हिंदूंचा व बळी मुस्लिम आहे म्हणून? पुरोगामीत्वाची व्याख्या इतकी सोपी व फ़ुटकळ करून ठेवल्याने त्याची विश्वासर्हता संपली आहे. अगदी माध्यमांच्या गाड्या जाळल्या असतानाही कोणी पत्रकार तेव्हा अविष्कार स्वातंत्र्यावरचा हल्ला म्हणून आक्रोश करताना दिसला नव्हता. फ़रक तिथे पडतो. या पक्षपातानेच भारतीय समाजात भाषा, प्रांत धर्म व जातीनुसार कळपाची मानसिकता जोपासली गेली आहे.

दादरीसारख्या शेकडो घटना देशाच्या विविध भागात घडत असतात आणि त्याच्या बातम्याही कुठे येत नाहीत. तेव्हाही बळी व अन्यायकर्त्याच्या धर्मानुसार विभागणी केली जात असते. त्याचा परिणाम समाजमनावर होत असतो. सर्व बाजू व सत्य समोर येत राहिले, तर समाजात संवेदनशीलता जागरूक रहाते. अन्यथा तिचेही पक्षपाती विभाजन होत असते. दादरीच्या उलट्या घटना बंगालामध्ये अनेक घडल्याचे वृत्त तुरळक कुठल्या वर्तमानपत्रात बघायला मिळते. त्यावरून कितीजण विचलीत होऊन पुरोगामीत्वाची साक्ष द्यायला पुढे येतात? तेव्हा कितीजण धर्मनिरपेक्ष चेहरा सिद्ध करायला सरसावतात? जेव्हा समाजातला असा पुरोगामीपणा एका धर्माच्या बाबतीत पक्षपाती असल्याची धारणा होते, तेव्हा मग त्यातला दुर्लक्षित होत असल्याची टोचणी लागलेला दुसर्‍या धर्मातला वर्ग, त्यांना चुचकारणार्‍यांच्या आहारी जाऊ लागतो. हिंदू म्हणून घेणारा बहुसंख्य वर्ग मागल्या काही वर्षात कशामुळे विचलीत झाला आहे, त्याचे उत्तर त्यात सामावले आहे. मोदी म्हणजे मुस्लिमांचा कर्दनकाळ अशी प्रतिमा बारा वर्षे रंगवल्यानंतर मोदी देशातला लोकप्रिय नेता होऊ शकला, हे पक्षपाती पुरोगामीत्वाचे पाप आहे. मोदी हिंदूच्या गळ्यातला ताईत बनवायला हाच पुरोगामी मुर्खपणा व पक्षपात कारणीभूत ठरला. ज्या पुरोगामीत्वाने हिंदूंमध्ये मुस्लिमांसारखी कळपाची मानसिकता रुजवली व जोपासली. आता त्याचे उलटे परिणाम दिसू लागले आहेत. जर म्यानमारच्या मुस्लिमांवर अन्याय झाल्याच्या शंकेने मुंबईत कोणालाही शिकार बनवता येत असेल, तर दादरीत संशयाचे भूत धुमाकुळ घालणारच. रझा अकादमीची झुंड मोठी म्हणून हिंसा करणे ग्राह्य मानले गेले, तर दादरीत जी झुंड मोठी तिच्या हिंसाचाराला समर्थन मिळत असते. म्हणून दोष कुठल्याही धर्मांधांपेक्षा पक्षपाती पुरोगामी वर्तनाचा व प्रवृत्तीचा आहे. तेच यातले खरे गुन्हेगार आहेत.

9 comments:

  1. http://www.bbc.com/hindi/india/2015/10/150930_dadri_bisahara_violence_aa?SThisFB

    ReplyDelete
  2. bhau!! nishabd kelat!! kharokharch antarmukh vhyayachi vel ali ahe!! manus kiti amanush vagu shakto yache udaharan apan dilat!! kharokarach putogami ha shabd jari aikala ki angachi tilpapad hot ahe!! dhanyavad!!!

    ReplyDelete
  3. आपल्या म्हण्याात बराच तत्यांश आहे. भारतातील मुंबई बाम्बस्फोट असो की बाबरी मस्जिद विध्वंस असो, दिल्लीतील दंगल असो की गुजरातची दंगल असो, मुंबईतील आझाद मैदानावरील रझा अकादमीने घातलेला गोंधळ असो, की उत्तर प्रदेशमधील दंगल असो, याशिवाय दलीत आणि आदीवासींवर सातत्याने होणारे हल्ले याबाबतीत एकजुटीने नि्षेध केला जात नाही, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. सत्तेच्य साठमारीत बेगुन्हा आणि निष्पाप लोकांचा बळी जात आहे.

    वास्तविकत: कोणी कोणत्या जाती अथवा धर्मात जन्म घ्यावा , हे जन्म घेणारांच्या हाती नसतं, कुण्या तरी जाती-धर्मात जन्मास येण्यासाठी कांही शौर्य गाजवावे लागत नाही, निव्वळ अपघाताने मिळालेल्या जाती आणि धर्माचा अभिमान बाळगणे हा निव्वळ वेडेपणाच नव्हे काय ? हल्ला करणारे माणसेच आणि हल्ल्यात बळी जाणारे पण माणसेच असतात ना !

    ReplyDelete
  4. भाउ यातील सत्यता कशी तपासावी...
    मला what's app वर हा संदेश आला....

    ===

    Bikau mediya
    बिकाऊ मिडिया हकीकत नही बताएगी
    बीफ खाने पर कत्ल की सचाई 👊🏾😡

    मुल्लावादी सरकार को ठाकुरो का मुहतोड़ जवाब

    पश्चिमी उत्तर प्रदेश में गाज़ियाबाद, नॉएडा के पास साठा चौरासी के नाम से काफी बड़ी जगह में फैला इलाका जिसे छोटा चित्तौड़ या राजपुताना भी कहा जाता है क्योंकि यहाँ शिशौदिया राजपूतो के 60 गाँव है और तोमर राजपूतो के 84 गाँव। इसके पास ही भाटी राजपूतो के गाँव भी हैँ धूम माणिकपुर, दादरी आदि।

    बंटवारे के वक्त कुछ मुसलमान यहाँ रह गए थे जिनको रहने के लिए छत दे दी थी ।। इनमे से दादरी के पास सिसोदिया राजपूतो का एक गाँव बिसाहदा भी है। उसमे ही एक मुस्लिम परिवार ने फूल जैसी कोमल गाय की सफेद बछिया को बेरहमी से काटकर खा लिया और ख़ुशी से ईद का त्यौहार मनाया। इसका पता पड़ोस में चल गया। हालांकि उत्तर प्रदेश की मुल्लावादी सरकार ने हिंदुओं के दिल में भय बैठाया हुआ है।
    लेकिन यह चित्तोड़ है यहां मुल्लावादी सरकार नही ठाकुरो का खौफ काम करता है। इस घटना की खबर लगते ही चित्तौड़ में तो जैसे आग लग गयी। गौ हत्या करने वालो के घर में घुसकर दो आदमियों को सरेआम बीच गाँव में लाकर काट दिया। ये बात पता चलते ही पूरे जिले का पुलिस फोर्स और प्रशासन वहॉ पहुँच गया और हमेशा की तरह बेशर्मी से मुस्लिमों को संरक्षण दिया लेकिन यह महाराणा के वंशजो का इलाका है, इसका फल उन्हें भुगतना पड़ा। SHO और CO और पूरे पुलिस बल का भी मार मार कर बुरा हाल कर दिया गया। जवाबी पुलिस फायरिंग में 1 राजपूत युवक की भी जान चली गई लेकिन राजपूताना पीछे हटने को तैयार नही है।

    इसके बाद आसपास के जिलो से पुलिस फ़ोर्स pac आने लगी और पूरा इलाका छावनी बना हुआ है। लेकिन यहाँ मुजफ्फरनगर नही बन सकता इसलिए आज सब उल्टा था। मसूरी ,नरौली,दादरी,ऊँचा गाँव,समाना,सौलाना,धूम,ntpc,प्यावली जैसे 17 ठाकुरों के गाँव ने पहले से आकर वहां डेरा डाल लिया ताकि बन्दूक का जवाब राइफल से और एकता से दिया जाए ।
    कोई भी गाँव वापिस जाने को तैयार नही है जब तक पुलिस बल वापिस नही चला जाता।
    अभी दो हिन्दू भाई पुलिस फायरिंग में गंभीर रूप से घायल होने से अस्पताल में भर्ती है।

    माननीय मुल्लायम आजम से अपील है, ये मुजफ्फरनगर नही ठकुरास है, यहाँ जोश से नही होश से काम लो, वरना महंगा पड़ जाएगा। धर्म के लिये ये राजपूत मरने मारने से पीछे नही हटते, तुम्हारे मुकदमो से क्या डरेंगे। इस खबर के फैलते ही आसपास के मुसलमानो में खौफ पैदा हो गया है। मुसलमान डरे हुए हैँ, गाँव वालो में इतना गुस्सा था की अगर पुलिस फ़ोर्स नही आती तो कोई नही बचता।

    गौरतलब है कि जब पिछले साल औवेसी ने हिन्दुओ के खिलाफ भड़काऊ भाषण दिए थे तो ये ही साठा चौरासी के राजपूत थे जो दिल्ली में ओवैसी के बंगले पर तोड़ फोड़ कर आए थे।

    ReplyDelete
  5. एक साधा कोणताही अजेंडा नसलेला - पण मत असलेला एक मध्यमवर्गीय व्यक्ती म्हणून हे मांडत आहे. रझा अकादमीचा संदर्भ घेतलात. त्यांनी जे केलं ते घृणास्पदच होतं - आणि त्यावर पांघरूण घालणारे काँग्रेसी नेते हे त्याहून घृणास्पद होते. हे असं का झालं? धर्मवेड्या मुसलमानी संस्थानी हळी दिली आणि धर्मवेड्या मुसलमानानी हे कृत्य केलं. मुसलमान मतं चुचकारण्यासाठी काँग्रेसी नेत्यांनी ते दाबलं. हे सर्वांना मान्यच आहे - कारण ते प्रच्छन्न आणि स्पष्ट आहे. दादरीला काय घडलं? गाय मारून गोमांस खाल्याचा संशयावरून हिंदू जमावाने मुसलमान व्यक्तीची हत्या केली. हे का झालं त्याबद्दल कुणी बोललं तर त्यात काय चूक आहे? गेल्या वर्षभरात संघ आणि भाजपा परिवारातील अनेकांनी ज्या प्रकारची विधान केली आहेत त्यामुळे सामान्य हिंदूमधेपण इस्लाम थाटाच्या अतिरेकीपणाची लागण् झाली आहे. त्र्याणवच्या मुबई दंगलीत हेच घडलं. २००२ च्या गोध्रात हेच झालं. इस्लामचा धर्माध हिंसाचार जगजाहीर आहे. पण् म्हणून हिंदू धर्मांधतेबद्दल बोललं तर लगेच बोलणारे असंवेदनशील आणि छद्म-मानवतावादी?

    ReplyDelete
  6. Bhau tumhi je lihile aahe aani questions vicharale aahet tech hya video madhe vicharale jaat aahe. hopefully aaple so called purogami sudharatil !!!
    https://www.youtube.com/watch?v=cAoXgZLRee0&feature=youtu.be

    ReplyDelete
  7. Bhau tumhi je questions vicharale aahet tech hya video madhe ek lady vicharate aahe.
    Hopefully so called purogami aata tari sudharatil !!!

    https://www.youtube.com/watch?v=cAoXgZLRee0&feature=youtu.be

    ReplyDelete
  8. Well said...toooo good !! perfect analysis n observation

    ReplyDelete