चोचीत मासा असलेल्या एका कावळ्याला उत्तम गायक असल्याचे सांगून लबाड कोल्हा कसा फ़सवतो, त्याची कहाणी खुप प्रसिद्ध आहे. मराठीतले अनेक विद्यमान संपादक त्यापैकीच आहेत. अन्यथा त्यांनी वेळोवेळी नसलेल्या अकलेचे विदारक प्रदर्शन कशाला मांडले असते? एकवेळ माणसाला अक्कल कमी असली म्हणून बिघडत नाही. अशी माणसे कमी असलेली अक्कल कुठे वापरू नये, इतकी नक्कीच शहाणी असतात. पण मुळातच अक्कल नसली आणि अशा व्यक्तीला कोणी तो शहाणा असल्याचे सांगितले, की नसलेली अक्कल पाजळण्याची खुमखुमी त्याचा मुर्खपणा चव्हाट्यावर आणत असते. शिवसेनेने गुलाम अली यांच्या मुंबईतील कार्यक्रमाला प्रतिबंध केला आणि अशा पादर्यांना ‘पावट्या’चे निमीत सापडले. त्यांनी लगेच मुंबई शिवसेनेची गुलाम नाही, असा फ़ुसके बार सोडले तर नवल नाही. असे लेख लिहायला हरकत नाही. पण छापायला देण्यापुर्वी पुन्हा एकदा वाचले तर आपलाच मुर्खपणा तरी ध्यानात येऊ शकेल. किंबहूना स्वत:लाच पोरकट ठरवू शकणारे अजब तर्कट तरी लोकांपुढे जाणार नाही. हे समजावून सांगणारा कोणी ख्यातनाम माध्यमात शिल्लक उरलेला नाही काय? अशा पावट्यांचे एक वैशिष्ट्य असते. त्यांना मराठीत अकारण इंग्रजी शब्द घुसडून आपले पांडित्य लोकांना खरे वाटेल अशीही खात्री असते. म्हणून मग ‘आयडीया ऑफ़ इंडिया’ किंवा ‘पिपल टू पिपल कनेक्ट’ असे काहीसे निरर्थक शब्द ते सातत्याने वापरत असतात. त्याचा वास्तविक अर्थही अशा अर्धवटांना ठाऊक नसतो. भारत पाकिस्तान यांच्यातले वैर अर्धशतकाहून अधिक चालू आहे आणि कितीही सामंजस्याने वागण्याचा भारताने प्रयत्न केला, तरी कुत्र्याचे शेपूट वाकडे म्हणावे तसे पाकिस्तानी वागत असतात. त्या वाकड्या शेपटाला गायन वा क्रिकेटच्या नळीत घालून सरळ करण्याचा उद्योग मग असे काही पावटे करीत असतात.
शिवसेनेची पाकिस्तान विरोधातली कडवी भूमिका आजची नाही. किमान दोनतीन दशकापासून शिवसेनेने त्यात सातत्य दाखवले आहे. म्हणूनच गुलाम अली या गायकाच्या मुंबईतील कार्यक्रमाला सेनेने आक्षेप घेण्यात नवे काही नाही. पण सेनेने अडवणूक केली, की ज्यांना पाकिस्तानी क्रिकेटर वा गायक कलावंतांचा पुळका येतो त्यांचे मात्र नवल वाटते. उदाहरणार्थ मुंबईतल्या काही रसिकांनी जगजित सिंग यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. तेच मुंबईबाहेर त्यांचे चहाते कधीच करू शकले असते. कोलकाता, दिल्ली वा अन्यत्र गुलाम अलींना ते बोलावू शकले असते आणि त्याबद्दल शिवसेना काहीही करू शकली नसती. पण तसा विचार यापैकी कोणाच्या डोक्यात आला नाही. पण शिवसेनेने त्याला विरोध करताच अकस्मात गजल गायकीचे अनेक रसिक रातोरात जन्माला आले आणि गुलाम अलीवर आमंत्रणांचा पाऊसच पडला. अशांना ‘पावटे’ म्हणतात. त्यांना गुलाम अली वा गजल याच्याशी काहीही कर्तव्य नसते. त्यांना शिवसेनेच्या विरोधासाठी निमीत्त हवे असते. त्यासाठी मग गजल गायकीचे रसिक बनून फ़ुसक्या सोडू लागतात. त्यातून भारत पाकिस्तान यांच्यातले संबंध सुधारत असल्याची दिवास्वप्ने त्यांना पडू लागतात. ती स्वप्ने खरी असती, तर आजवर त्या दिशेने एकही पाऊल पुढे कशाला पडू शकलेले नाही? अनेकांनी ‘अमन की आशा’ नावाचाही तमाशा मांडून झाला आहे. त्यांच्या असल्या प्रयत्नांना कॊणते यश आले? तर अशा पावट्यांच्या पादण्याने ‘पिपल टू पिपल कनेक्ट’ करण्यासाठी अजमल कसाब दारुगोळा घेऊनच समुद्रमार्गे मुंबईत येऊन पोहोचला,. त्यावेळी यातले किती पावटे त्याच्याशी संवाद साधायला पुढे सरसावले होते? त्यासाठी सामान्य नागरिकांना आपल्या प्राणाचे मोल मोजावे लागले आणि सामान्य पोलिसांना प्राण गमवावे लागले. ती गजाल कशी होती? त्यातून काय साध्य झाले?
अजमल कसाब पाकिस्तानी नागरीक होता आणि तो इथे असल्याच पावट्या भारतीयांना एके ४७ बंदुकीतून अस्सल गजाल ऐकवायला आलेला होता. (मालवणीत गावगप्पांना गजाल म्हणतात). थेट जनतेशी संपर्क साधायला आलेला होता. ज्याला ‘पिपल टू पिपल कनेक्ट’ असेच म्हणतात ना? मग त्यासाठी पोलिस वा सेनादलाचे कमांडो कशाला आणावे लागले होते? मागल्या दोन तीन दशकात शेकड्यांनी पाकिस्तानी गायक वा क्रिकेटर्सचे कार्यक्रम इथे भारतात सादर झाले. त्यातून कुठले सौहार्द दोन देशात निर्माण होऊ शकले आहे? प्रत्येकवेळी विपरीतच परिणाम होत असतील, तर पिपल टू पिपल असले भोंगळ शब्द वापरण्यातून अक्कल लयाला गेल्याची साक्ष मिळत असते. कारण गुलाम अलीच्या गाण्याला सेनेने प्रतिबंध केल्याने जसे दोन देशातले संबंधा सुधारणार नसतात, तसेच त्या गाण्यातूनही परराष्ट्र संबंधात काडीमात्र फ़रक पडत नसतो. ज्यांनी असली अक्कल पाजळून दाखवली आहे, त्यांना अशा विषयातले किती कळते हा प्रश्नही विचारला पाहिजे. सेनेने पाक क्रिकेट संघाला विरोध करण्याचे कारण राजकीय होते आणि आहे. कारण श्रीनगर येथे पाक संघ सामना खेळायला राजी नव्हता. कारण त्यांच्या राजकीय धोरणानुसार काश्मिर भारताचा नसून पाकचा अविभाज्य हिस्सा असल्याने भारतात आलेल्या पाक संघाने श्रीनगरचा सामना खेळण्यास नकार दिला होता. असा खुलासा क्रिकेटचे तात्कालीन पंच गोठोस्कर यांनी केलेला होता. पाकचा संघ जर राजकीय भूमिका घेऊन क्रिकेट खेळत असेल, तर त्याकडे खेळ म्हणून बघणे हा शुद्ध मुर्खपणा असतो, शिवाय दक्षिण आफ़्रिकेला कित्येक वर्षे खेळातून वाळीत कशाला टाकलेले होते? त्यामागे राजकारणच होते ना? इंग्रजी शब्द फ़ेकले, म्हणून मुर्खपणा लपत नसतो. सेनेच्या भूमिकेला विरोध असायला हरकत नाही. पण तो मांडताना आपली अक्कल उकिरड्यावर पडणार नाही, याची तरी काळजी घ्यायला हवी ना?
गुलाम अलीच्या चार गजला ऐकल्या वा उधृत केल्या, म्हणून कोणी काव्य-गायकीचा रसिक होत नसतो. वर्तमानपत्र हे सकाळी उठल्यावर वाचण्याचे साधन असले, तरी ते ‘सकाळचे पहिले’ काम नाही, एवढी तरी अक्कल संपादकाने राखावी ना? तितकी अक्कल वापरली तर मग ‘पक्षाच्या नावातच सेना असेल तर युद्ध करण्याची खुमखुमी असणारच! युद्ध करायचे म्हणजे शत्रू हवा. मग शत्रू शोधायचा, युद्ध पुकारायचे आणि आपला विजय आपणच घोषित करायचा,’ असले काही थिल्लर लिहीले जाणार नाही. नावात सेना असल्याने युद्धाची खुमखुमी आपोआप येत असती, तर शांतीसेना म्हणतात त्यांनाही लढायची खुमखुमी असते काय? अशा सेना राष्ट्रसंघ विविध संघर्षरत जागी खुमखुमी भागवातला पाठवतो काय? त्या शांतीसेना शत्रू शोधायला अशा प्रदेशात जातात काय? दुसर्याची खिल्ली उडवताना आपण़ण हास्यास्पद विधान करतोय, याचे भान असे सुटते. राजीव गांधींनी श्रीलंकेत भारतीय सेनेच्या तुकड्या युद्ध खुमखुमी म्हणून धाडल्या होत्या काय? किती बाष्कळपणा असावा? सेनेच्या भूमिकेला राजकीय विरोध असू शकतो. पण म्हणून कुठल्या थराला जाऊन बालीश विधाने करावीत? आणि करायचीच असतील, तर अशा शहाण्यांनी कसाबची टोळी इथे आली, तेव्हा ‘पिपल टू पिपल कनेक्ट’ सिद्ध करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. दोन देशातील सामान्य लोकांचा परस्पर संबंध जोडण्याचा जो हव्यास आहे, त्यासाठी कसाबसारखी उत्तम संधी दुसरी कुठली होती? तेव्हा असले इंग्रजाळलेले शहाणे बिळात असे दडी मारून बसतात की फ़ुसकीचाही आवाज बाहेर जाऊ नये. सगळा शहाणपणा व अक्कल तेव्हा कुठे जात असते? आपला सिद्धांत प्रत्यक्ष कृतीतून जनतेसमोर मांडायची संधी आली, की फ़रारी व्हायचे आणि सगळीकडे शांतता प्रस्थापित झाली, मग ‘सकाळचे पहिले’ काम करीत फ़ुसक्या सोडायच्या. यापेक्षा गुलाम अलीच्या या सलाम अलींना दुसरे काय जमले आहे? नुसत्यो गजाली!
Apratim...
ReplyDeletei do not agree with your view. sena politics is always of gunda gardi no body has given you right to these things
ReplyDeleteSir latho k bhhhot bato se nahi mante
Deleteमला स्वतःला शिवसेनेने जे केले ते काही चुकीचे केले असे वाटत नाही.
Deleteजयंतराव , अजमल कसाब तुमच्या बरोबर प्रेम करायला आला होता का तुम्हाला लावनी दाखवायला आला होता. ते प्रथम ठरवा .तुम्हाला नक्की काय करायच किंवा म्हनायच आहे ते पन ठरवा . पाकीस्तान किंवा पाकीस्तानी चांगले आसतात अस म्हनायच आहे का? तर तुम्ही एक दिवसा स्वप्न पाहनारे आहात जसे की तुम्हाला पाकीस्तानात बसुन गजल एैकायला खुप आवडते पण सप्रे आडनावामुळे किंवा शरीरात तो फरक नसल्यामुळे तुम्हाला पाकीस्तान चा विजा मिळत नाही आहे म्हनुन तुम्हाला नाईलाजास्तव महाराष्टात राहून जय शिवाजी जय भवानी एैकाव लागत आसेल तर क्रुपया घरातच बसा
Deleteआपला नावडता
एक महाराज शिवछञपतीच्या कुळातला कट्टर शिवप्रेमी प्रगत आणी उच्चशिक्षीत शेतकरी .तुम्हाला राग आला असेल तर गेला xxxxx वर
माझा प्रतिसाद :
ReplyDeletehttps://www.facebook.com/permalink.php?story_fbid=477009909137137&id=172939776210820&comment_id=477454032426058
-गा.पै.
भाऊ सुरेख लिहीलात . अर्थात तुमच्या लिखाणाने पावटे आपलं कर्म करणं सोडतील असं नव्हे .
ReplyDeleteभाऊ, आपल्या नेहमीच्या शैली मध्ये आपण फारच अप्रतिम लेख लिहिला आहे. सकाळ दैनिका वरती केलेले उपरोधिक भाष्य बहुतेक त्या पेपर मधील लोकांच्या डोक्यावरून गेले असेल. :-)
ReplyDeleteमला स्वतःला शिवसेनेने जे केले ते काही चुकीचे केले असे वाटत नाही.
खुपच छान भाऊ विषेश म्हनजे
ReplyDeleteएक पावटा ईथे पन पादलाच