Friday, October 9, 2015

अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेले वारस!

Image result for abhishek bacchan  

काही वर्षापुर्वी कुठल्या तरी चॅनेलवर ‘कॉफ़ी विथ करन’ नावाचा एक कार्यक्रम होत असे. त्यात विविध अभिनेते, चित्रपट कलावंत यांना आमंत्रित करून करण जोहर त्यांच्या मजेशीर मुलाखती घेत असे. त्यात खाजगी प्रश्नांपासून कुठल्याही विषयावर अघळपघळ गप्पा व्हायच्या. अशाच एका भागात जया भादुरी, अमिताभ बच्चन व शाहरुख खान यांच्या एकत्र गप्पांचा कार्यक्रम होता. त्यात करणने अमिताभला दुखरा प्रश्न विचारला होता. शाहरुख जिथे हजर आहे, तिथेच त्याचा समकालीन असलेल्या अभिषेक बच्चन याच्या चित्रपट सृष्टीतील अपयशाविषयी यशस्वी पित्याला प्रश्न विचारला, तर तो पिता अस्वस्थ होणारच ना? कारण मागल्या पिढीत अमिताभ सुपरस्टार होता आणि आजच्याही पिढीतल्या व मुलाच्या वयातील अभिनेत्यांशी अमिताभ टक्कर देतोच आहे. त्याच्या मुलाचे साधे चित्रपटही धंदा करू शकले नाहीत, तर पित्याची वेदना केवढी असेल? भले तो पिता ते दाखवत नसेल, पण दुखणे असतेच. म्हणून असा प्रश्न करणने विचारणेच गैरलागू होते. याचे आणखी एक कारण म्हणजे तिथेच यशस्वी अभिनेत्री व अभिषेकची आई जया भादुरीही गप्पात सहभागी होती. पण हसत हसत करणने तो प्रश्न विचारला आणि अमिताभही काही क्षण गडबडला होता. मनातल्या मनात पिता शब्द जुळवत असताना पलिकडे बसलेल्या शाहरुखने हस्तक्षेप केला. त्याने प्रश्नकर्त्या करणऐवजी अमिताभलाच विचारले, मी या प्रश्नाचे उत्तर तुमच्या वतीने दिले तर चालेल का? अमिताभ ते ऐकून सर्दच झाला. जया भादुरीही त्याच्याकडे बघतच राहिली. कारण उघड होते. त्यांचा मुलगा अभिषेक हा शाहरुखचा समकालीन प्रतिस्पर्धी म्हणून मैदानात आलेला. यशस्वी पित्याचा वारसा मिळालेला अभिनेता असल्याने त्याच्यासाठी चित्रसृष्टीत कुठलाच संघर्ष नव्हता. सहजपणे त्याला भूमिका व चित्रपट मिळालेले होते. शाहरुख झुंज देवून शून्यातून उभा राहिलेला.

गोंधळलेला अमिताभ व जया भादुरी बघतच राहिले तेव्हा शाहरुखने अक्षरश: गयावया करीत त्यांचा होकार मिळवला. प्रश्नकर्ता करण जोहरही गडबडला होता. पण शाहरुख आपल्या मागणीविषयी आग्रही होता. तो काय उत्तर देतो त्याबद्दल अभिषेकचे मातापिताही उत्सुक व अस्वस्थ होते. पण शाहरुखने त्यांच्या मुलाविषयी सांगण्यापेक्षा आपल्याच मुलाचे कथानक सुरू केले आणि उरलेले तिघेही बघतच राहिले. आजचा सुपरस्टार शाहरुख आणि तितकाच क्रिकेटचा सुपरस्टार सचिन तेंडुलकर यांची मुले एकाच शाळेत होती अतिशय श्रीमंतांच्या मुलांसाठी असलेल्या त्या शाळेत ही पाच सहा वर्षाची मुले इतरांसारखीच जा्यची व अभ्यास करायची. पण कुठल्याही स्पर्धेत भाग घ्यायची, तेव्हा त्यांची कशी तारांब्ळ उडायची. त्याची कहाणी शाहरुखने कथन केली. एका साध्या वार्षीक क्रिडा उत्सवात ही दोन मुले इतरांप्रमाणेच धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाली होती आणि धावताना दमून मागे पडली. तिथे पालक म्हणून आपण हजर होतो आणि पुत्राची तारांबळ बघून आपल्याला खुप दु:ख झाले, असे सांगताना शाहरुख हळवा झाला. पण तो मुलांनी मागे पडल्याने वा धावू न शकल्याने अस्वस्थ झाला नव्हता. आपल्या मुलाच्या मागे पडण्याविषयी जे काही कानी पडले वा स्पर्धेच्या दरम्यान बोलले गेले, त्याने हा तरूण पिता अस्वस्थ झाला होता. त्याचे त्याने केलेले विवेचनही अतिशय मर्मभेदी होते. सचिन वा आपला मुलगा इतर मुलांसारखेच धावत होते. पण सर्वांचे लक्ष त्याच दोन प्रसिद्ध पित्यांच्या मुलांवर होते. जमलेले तमाम पालक वा लोक त्याच दोन मुलांविषयी बोलत व चर्चा करत होते. त्यांच्याच बारीकसारीक हालचालीवर सर्वांची नजर लागली होती. आणि त्या बिचार्‍या कोवळ्या मुलांना धावण्यापेक्षा त्या नजरांचा मारा सहन करावा लागत होता. बाकीची मुले तशी मोकळी मुक्त धावत खेळत होती. या दोन मुलांना तितके स्वातंत्र्य नव्हते.

काय अडचण होती त्या दोन मुलांना? बड्या प्रसिद्ध व्यक्तीची मुले वा नातलग म्हणून जग त्यांच्याकडे बघणारच. पण त्याचा त्या बालकांवर काय परिणाम होतो? कोवळ्या वयातही त्या मुलांना स्वच्छंदी बागडता येत नाही, की मनमोकळे खेळता वागता येत नाही. जातील तिथे शाहरूख वा सचिनचे मुल म्हणून त्यांना पित्याला खांद्यावर ओझ्यासारखे वाहून न्यावे लागत असते. त्या साध्या धावायच्या स्पर्धेतही त्या मुलांना आपल्या पित्याची प्रसिद्धी व तिचा बोजा उचलून धावावे लागत होते. तो बोजा उचलून धावताना त्यांची दमछाक झाली होती. ज्या मुलांना तसा बोजा उचलावा लागत नाही, त्यांना आपल्या चपळाई वा गुणवत्तेच्या आधारावर यश मिळवता येते. पण मोठ्या व्यक्तीच्या मुलांना मात्र पित्याच्या कर्तृत्व पराक्रम-यश असे अनेक बोजे डोक्यावर घेऊन दौडावे लागत असते. आपल्या मुलाची कोवळ्या वयातली ती तारांबळ बघितली आणि अभिषेक बच्चन किती ओझे घेऊन चित्रपटसृष्टीत आला त्याची मला कल्पना आली. असे शाहरुख म्हणाला, तेव्हा अमिताभ व जया दोघेही कमालीचे भारावून गेलेले होते. आपल्या मुलाचा व्यावसायिक प्रतिस्पर्धी यशस्वी अभिनेता इतक्या सहजपणे हे सांगतो, त्याचे कौतुक अमिताभच्या चेहर्‍यावरून लपले नव्हते. किंबहूना करण जोहरने विचारलेल्या प्रश्नाचे इतके समर्पक उत्तर अमिताभकडेही नव्हते. म्हणून की काय एकप्रकारे शाहरुखच्या त्या उत्तरानंतर त्या पित्यानेही नि:श्वास सोडला. जगाकडे बघण्याची ही दृष्टी खुप मोलाची असते. अभिषेकच्या अपयशाला त्याच्या पित्याच्या यशाच्या बोजाचे कारण असू शकते, याचा कोणी कधीच विचार केला नसेल. ज्यांना सोपी संधी मिळते त्यांना पुर्वजांच्या यशावर स्वार व्हायला मिळते, त्यांना मोठेच यश मिळवण्याची सक्ती असते आणि ज्यांना असा बोजा नसतो, त्यांना मुक्तपणे आपला संघर्ष करून यशाचे शिखर गाठता येते.

हा किस्सा आठवण्याचे कारण राहुल गांधी! मागल्या दहाबारा वर्षात या तरूणाकडून ज्या अपेक्षा बाळगल्या जात आहेत, या कसोटीवर तो उतरत नाही. म्हणून किती टोकाची टिका टिंगल होत असते. पण अल्पवयात त्याच्याकडून कुठल्याही अनुभवाशिवाय बाळगल्या जाणार्‍या अपेक्षा हा त्याच्यावर अन्याय नाही काय? अमिताभ, सचिन वा शाहरुख यांच्या मुलांवर फ़क्त पित्याचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे ओझे असल्याने ते थकून जात असतील. इथे राहुल गांधी यांच्याकडून किती अपेक्षा पुर्ण करण्याचे ओझे चढवलेले आहे? पणजोबा, आजी व पित्याने देशाचे पंतप्रधानपद भूषवले. देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळापैकी अर्धी वर्षे पुर्वजांनीच देशावर राज्य केलेले आहे. म्हणूनच त्यांचा वारसा चालवण्यासाठी तितकेच मोठे वा त्यांना साजेसे यश राहुलने मिळवावे, अशा अपेक्षांचा बोजा त्याच्या डोक्यावर चढवलेला आहे. तो नाकरण्याचेही त्याला स्वातंत्र्य नाही. पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यापासून नेहरू इंदिराजींच्या चहात्यांपर्यंत आणि सत्तालोलूप कॉग्रेसजनांपासून पत्रकारांपर्यंत प्रत्येकाला राहुलने पंतप्रधान व्हावे असे वाटते आहे. पण त्यासाठी बहुमताचा पल्ला पक्षाला गाठून द्यावा लागतो. तितकी लोकप्रियता जनतेमध्ये संपादन करावी लागते. त्या लोकप्रियतेचे जनतेच्या मतांमध्ये रुपांतर करण्याची किमया साधावी लागते. मोदी वा अन्य कुणा नेत्यावर इतक्या मोठ्या अपेक्षांचा बोजा नाही की सक्तीही नाही. मातापित्यांच्या यशस्वी वारशाचे संधी मिळण्यात लाभ जरूर असतात. पण त्यातून जे अपेक्षांचे ओझे खांद्यावर डोक्यावर चढवले जाते, त्याखाली कितीजण अपयशाने चिरडून जातात, तिकडे जग सहानुभूतीनेही बघत नाही. राहुल गांधींच्या मागे मोठा वारसा असल्याने त्यांना मिळालेली संधी व लाभ नेहमी बोलले व सांगितले जातात. पण अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून गेलेला राहुल गांधी कोणी कधी समजून तरी घेतला आहे काय?

21 comments:

  1. खरे आहे हे तोरसेकर सर..... या दिशेने कोण कधी विचारच करत नाही... किंबहुना आपल्या आपेक्ष्याच एवढ्या आहेत कि या दिशेने विचार करायला मनच तयार होत नसेल.........बहुतेक.

    ReplyDelete
  2. Sorry Bhau...this once, it is difficult to agree with you. While I appreciate Shahrukh's perspective, I do not quite understand how it can be applied to Rahul Gandhi. In Rahul's case....not only High Expectations were foisted on him...but it is his folly that he started believing that 'he has' the qualities and qualifications that his 'sycophants' attributed to him. But so is not the case with sons of Sachin or Shahrukh. Rahul Gandhi's is a case of "Emperor's Clothes" - The New Designer Suit in this case.

    ReplyDelete
  3. अमिनाभ ह्यांचे वडिल अभिनेते नव्हते .... सचिन ह्यांचे वडिल क्रिकेटर नव्हते . त्यामुळे त्यांची मुले तसेच बनतील ही अपेक्षा ठेवण मुळातच गैर आहे ......पण हा सर्वस्वी खाजगी प्रश्न झाला आणि त्या अपेक्षांमुळे देशाचे आणि समाजाचे काही नुकसान होत नाही. पण पप्पूच तसं नाही..... ही ब्याद म्हणजे असून अडचण नसून खोळम्बा ..... डोक्यावर बसवून कॉंग्रेसचे म्हणजे तसे समाजाचे एक प्रकारे नुकसानच..... (आपणा कोन्ग्रेस मुक्त भारत नव्हे तर गांधी मुक्त आणि लाचारी नसलेला कोन्ग्रेसाची गरज आहेच ... नाहीतर भाजपाची वाटचाल ही "कोन्ग्रेस" होण्याकधेच आहे .....

    ReplyDelete
  4. He's to work hard for that........

    ReplyDelete
  5. If Rahul is feeling so burdened by the legacy of the past in politics, why doesn't he take up some other profession? No one forced him to join politics, no one forced Abhishek to join films. Both of them wanted to join the profession made easy by their lineage.
    So I do not agree with the contention of this post. Abhishek could have been CA, doctor, engineer, mechanic anything. Same with Rahul, but they wanted to ride on the wave created by their fathers.

    ReplyDelete
  6. लेख छानच आहे. पण..

    ReplyDelete
  7. अभिषेक अन राहुल यांत महत्वाचा फरक आहे की अभिषेक अयशस्वी झाल्याने बाॅलिवुडचे काही अडुन राहीले नाही. पण काँग्रेसचे म्हणाल तर राहुलने देशाच्या एका महत्वाच्या पक्षाचे (माजी अन भावी सत्ताधारी, आजी विरोधी) अन पर्यायाने देशाचे मोठे नुकसान केले आहे.

    ReplyDelete
  8. Bhau, the examples of the sons of Shahrukh Khan and Sachin Tendulkar at the school competition on the one hand, and those of Abhishek and Rahul Gandhi on the orher are incongruous. In the first case, those two children had no choice but to participate in that school race. In the second, these two individuals had no compulsion to enjoin the trades that they joined. They had all other choices in the world to go their own different ways. And they didn't do that. They opted to work in the same professions as their parents. In that case, it is inevitable people will expect them to live with the bar set high by their parents.

    ReplyDelete
  9. भाऊ, आज पहिल्यांदा तुमच्याशी मी असहमत आहे. जसा एखादा कुशल धन्वंतरी काही सेकंदात अचूक नाडीपरीक्षा करतो तसं नेहमी तुमचं विश्लेषण असत, पण आज वाटलं कि भाऊ आपल्या नेहमीच्या शैलीला चुकले.

    अभिषेक आणी राहुलमध्ये बराच फरक आहे. अभिषेकने कधीही आपण सुपर स्टार असल्याचा किंवा चित्रपटसृष्टीचा शेहेनशहा असल्याचा दावा केलेला नाही. आपल्या मर्यादा पुरेपूर ओळखून त्यानी आपली career बनवली आहे. प्रेस कॉन्फरन्स मध्ये किंवा सार्वजनिक जीवनात त्यानी अतिशय cultured आणी सभ्य अशीच वागणूक ठेवलेली आहे. जी गोष्ट अभिषेकची तीच बर्याच इतर मुलांची जसं सुनील गावस्करचा मुलगा, किंवा सचिनचा मुलगा आणि इतरही अनेक मुले.

    राहुलने मात्र आपली मर्यादा ओळखायचा किंवा स्वतःमध्ये प्रगती करायचा कधी प्रयत्नच केलेला नाही. भारताचा पंतप्रधान होण्याचा आपला जन्मसिद्ध हक्क आहे अशाच थाटात तो बोलतो आणी वागतो. तो जेव्हा जेव्हा तोंड उघडतो स्वतःचे हसू करून घेतो. तो जे काही बोलतो आणि ज्या पद्धतीने बोलतो त्याची टिंगल होणार नाही तर काय? आता राजकारणात येवून राहुलला कितीतरी वर्ष झाली, तुम्हाला कधीतरी वाटलाय कि राहुलने एक चांगला मुद्धा मांडलाय किंवा देशाला एक नवी दिशा द्यायचा प्रयत्न केलाय?

    ReplyDelete
  10. आज पहिल्यांदा इतकी असहमती पाहिली आणि तीही तर्कशुद्ध.
    वाचक जागरूक आहेत, बोलौन दाखवतातच असे नाही.
    असहमती माझी ही

    ReplyDelete
  11. मला वाटत की ही राहुल बाबामुळे ओढवलेली असहमती भाऊ एन्जोय करत असतील. त्यांना हेच अपेक्षित असेल कदाचित. नाहीतर भाऊ काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत ;-)

    ReplyDelete
  12. I am not agree with comparison between Sachin son and Rahul Gandgi

    ReplyDelete
  13. सावधान !
    आता वारसा बदलला आहे.
    एक चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान झाल्यामुळे इतरेजनांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. म्हणजेच चि. राहुलला यापुढे मोठ्याच स्पर्धेला सामोरे जावे लागणार, जी काँग्रेसमध्ये कधीच नव्हती.
    आणि श्री मोदीजींचा वारसा चालवायचा तर . . .
    तर ब-याच वैयक्तिक गोष्टी सोडाव्या लागतील. चांगला गुरु करावा लागेल.
    मुख्य म्हणजे विचार करावा लागेल.
    नेमकी तिथेचतर अडचण आहे.

    ReplyDelete
  14. मलाही थोड चुकल्यासारख वाटतंय .....सर्वसाधारण माणसांची राहुल गांधींकडून नक्कीच कोणतीही अपेक्षा नव्हतीच कधी .........हा पण प्रियांका गांधीना मात्र बहुतेक लोकं दुसरी इंदिरा गांधी म्हणूनच पाहत होते......तोही भ्रमच होता .......

    ReplyDelete
  15. Sorry but disagree here for the first time! They have the option of choosing different field than their parents where they will not be compared with their ever successful parents and they can establish themselves separately. If they choose the same field as their parents then the comparison is inevitable.

    ReplyDelete
  16. असहमत आहे....अपेक्षांचे ओझे जरी असले तरी ते पेलता आले पाहिजे..

    ReplyDelete
  17. भाऊ, सहमत आहे.
    बिचार्‍यावर परिपक्वतेची जबरदस्ती होतेय

    ReplyDelete
  18. योग्य विश्लेषण आहे. इंदिरा गांधीना संधी मिळाली. स्वत:च्या कट-कारस्थानी का होईना कर्तबगारीने त्यांची राजवट गाजवली. बिचाऱ्या राजीव गांधींना तसे करता आले नाही. या दोघांच्या तुलनेत तो अगदीच साक्षात मंदबुद्धीच आहे. कारस्थानी सोनिया गांधीना काॅंग्रेस पक्षाच्या माथी त्याचे नेतृत्व लादतांना या गोष्टीचे आकलन कसे झाले नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे.

    ReplyDelete