भारतीय राज्यघटनेने अविष्कार स्वातण्ंत्र्य प्रत्येक नागरिकाला बहाल केलेले आहे. त्यामुळे काहीही बोलायला व कशाचाही अर्थ कसाही लावायची कोणालाही मोकळीक आहे. त्यात तथ्य असण्याची गरज नसते. त्यामुळे कोणी मुंगीला हत्ती ठरवू शकतो किंवा झाडूही पुष्पगुच्छ म्हणून दावा करू शकतो. सहाजिकच भाजपाचे नेते व अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी ९ तारखेनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असे म्हटल्यावर त्याला भाजपाची धमकी ठरवण्याला कोणी रोखू शकत नाही. त्यातले तथ्य वा सत्य शोधण्याची गरज कुठे असते? अशा इशार्यातून मनगुंटीवार यांना काय म्हणायचे आहे, सुचवायचे आहे, ते समजून घेण्याची गरज कुठे असते? सहाजिकच त्याच्याही पुढले काय परिणाम संभवतात, त्याची कोणाला पर्वा असते? ते परिणाम अशा अफ़वा किंवा खळबळजनक बातम्या पसरवणार्यांना भोगावे लागत नसतात. तर त्या राजकीय व्यवहारात गुंतलेल्यांना बरेवाईट परिणामांचे धनी व्हावे लागत असते. म्हणूनच बिहारचे उदाहरण देणे भाग आहे. महाराष्ट्राचा बिहार होईल का? असा प्रश्न विचारला, मग लगेच बिहारप्रमाणे इथेही अराजक माजेल का, असाच उलटा प्रश्न तात्काळ विचारला जाऊ शकतो. पण मुळ सवाल बिहारच्या अराजकतेशी जोडलेला नसून तिथल्या घटनात्मक प्रसंगाशी जोडलेला आहे, हे समजून घेण्य़ापर्यंत संयम असायला हवा. तरच त्या प्रश्नाचा रोख लक्षात येऊ शकतो. चौदा वर्षापुर्वी बिहारमध्ये आजच्या महाराष्ट्रासारखी घटनात्मक परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्याच्या परिणामी काय काय घडले, त्याचेही स्मरण आजच्या राजकीय विश्लेषकांना राहिलेले नाही. म्हणून मग मनगुंटीवार सावधानतेचा इशारा देतात, त्याला धमकी ठरवण्यापर्यंत अकलेची मजल जात असते. दोनचार पक्षांनी आपसात सत्तेचे वाटप करण्यापुरता घटनात्मक प्रश्न नसतो. नैतिकता दुरची गोष्ट झाली, अनेक मुद्दे नियमात व घटनात्मक कायद्यात बसवावे लागत असतात. अन्यथा बिहार होऊ शकत असतो. तिथे राज्यपाल किती उचापती करू शकतात आणि परिस्थिती हाताबाहेर कशी जाऊ शकते, त्याचा धडा तात्कालीन राज्यपाल बुटासिंग व तात्कालीन मनमोहन सरकारने घालून दिलेला आहे. कोणाला तो शिकण्याची गरज वाटलेली आहे काय?
२००५ सालच्या फ़ेब्रुवारीत बिहारमध्ये विधानसभा निवडणूका झालेल्या होत्या आणि त्यातही आजच्या महाराष्ट्रासारखी स्थिती निर्माण झालेली होती. विधानसभा त्रिशंकू निवडली गेली होती आणि दिर्घकाळ कुठलेही सरकार स्थापन होऊ शकलेले नव्हते. मग पुढे काय घटनाक्रम घडलेला होता? तोपर्यंत बिहारमध्ये लालूंची हुकूमत होती आणि ते वाटेल त्याला मुख्यमंत्रीपदी बसवीत होते. १९९७ सालात त्यांच्यावर चारा घोटाळ्याचा आरोप झाल्यामुळे त्यांना राजिनामा द्यावा लागला. तर त्यांनी मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या पत्नीला रातोरात स्वयंपाकघरातून आणुन मुख्यमंत्री पदावर बसवले होते. त्यातून संतापलेल्या त्यांच्या सहकारी जॉर्ज फ़र्नांडीस व नितीशकुमार यांनी वेगळी चुल मांडली व लालूंची फ़ारकत घेतली. ते भाजपाच्या सोबत आले आणि बिहारचे राजकारण बदलून गेले. पुढल्या काळात तिथे लालू विरुद्ध नितीश अशी लढत सुरू झाली. त्यामुळेच २००५ च्या निवडणूका आल्या, तेव्हा भाजपा व नितीशची जनता दल संयुक्त यांची आघाडी झालेली होती आणि त्यांनी लालूंना शह दिलेला होता. त्या निवडणूकीत कॉग्रेससह आघाडी करूनही लालुंना बहूमत राखता आले नाही. कारण एव्हाना त्यांचे आणखी एक समाजवादी साथी रामविलास पासवान त्यांना सोडून गेलेले होते. त्यांनी लोक जनशक्ती पार्टी स्थापन करून भरपूर जागा लढवल्या होत्या आणि त्यांनाही २४३ सदस्यांच्या विधानसभेत २८ आमदार मिळालेले होते. नितीश भाजपा आघाडीला ९२ जागांवर समाधान मानावे लागले होते. तर लालूंना कॉग्रेसला सोबत घेऊनही ७५ जागाच मिळालेल्या होत्या. कॉग्रेसला अवघ्या दहा जागा मिळालेल्या होत्या. त्यांना पासवान यांच्या २८ आमदारांनी साथ दिली असती, तर सहज सरकार स्थापन होऊ शकले असते. पण पासवान अडून बसले आणि कुठलेही सरकार स्थापन होऊ शकत नसल्याने राज्यपालांना विधानसभा स्थगीत करून कारभार आपल्या हाती घ्यावा लागला होता. हा खेळ दिर्घकाळ चालत राहिला. पण राज्यपाल काय करू शकत होते? कुठलाही गट पुढे येऊन त्यांना बहूमत दाखवायला राजी नव्हता आणि लालू व पासवान यांनीच त्यातून तडजोड करायला हवी होती. पंण दोघेही रुसून बसलेले.
अखेरीस त्यात अनेक महिने उलटून गेले आणि बिहारमध्ये राष्ट्रपती शासन नावाखाली राज्यपाल बुटासिंग यांचा कारभार चालू राहिला. आज इथे निकालानंतर शिवसेना भाजपा यांच्यापाशी बहूमताचा आकडा असूनही मुख्यमंत्री कोणाचा, म्हणून जसे रुसवेफ़ुगवे चालू आहेत. तसाच काहीसा प्रकार बिहारमध्ये २००५ च्या पुर्वार्धात रंगलेला होता. साम्य किती असावे? कॉग्रेस, लालू व पासवान केंद्राच्या सत्तेत एकत्र बसलेले होते. पण त्यांना बिहारच्या सत्तेत एकत्र बसायचे नव्हते. मग आपोआप राष्ट्रपती राजवट येण्याला पर्याय राहिला नव्हता. निकालानंतर ठराविक मुदतीपर्यंत राबडीदेवी यांचे काळजीवाहू सरकार चालले होते. पण कुठलीच घटनात्मक व्यवस्था होत नव्हती व विधानसभेची मुदत संपलेली होती. नव्या विधानसभेची निवड झाली तरी सरकार स्थापना अडून पडल्याने नव्या विधानसभेचे गठन होऊ शकत नव्हते. सहाजिकच जुन्या विधानसभेची मुदत संपल्यावर आपोआप राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. त्याला कोणी धमकी म्हटले होते काय? ती आपोआप कार्यरत होणारी घटनात्मक व्यवस्था आहे. मात्र अशा त्रिशंकू परिस्थितीने अनेक नवनिर्वाचित आमदार हळुहळू विचलीत होत गेले. कोणाला नव्या सत्तेतला हिस्सा हवा होता, तर कोणाला सत्तापदांची हाव शांत बसू देत नव्हती. म्हणून दोन्ही बाजूच्या आमदारात चलबिचल सुरू झाली. त्याचे भान लालूंना राहिले नाही की पासवान यांचा अहंकार शहाणा होऊ शकला नाही. त्यामुळे पासवान यांच्या २८ आमदारांपैकी सतरा अठरा आमदारांनी नितीश कुमार यांच्याशी संधान बांधून पाठींब्याचा छुपा पवित्रा घेतला. त्याची तयारी करून नितीशकुमार सर्वात मोठी आघाडी म्हणून ९२ आमदारांखेरीज अठरा आमदारांचे पत्र घेऊन राज्यपालांना भेटायला निघालेले होते. तर बुटासिंग यांनी राजभवनाच्या परिसरात जमावबंदी लागू केली आणि ते तात्काळ उठून दिल्लीला निघून गेले. तिथेच बसून त्यांनी केंद्र सरकारला राज्यात आमदारांचा घोडेबाजार भरल्याचा अहवाल लिहून दिला आणि दुसरा दिवस उजाडण्यापुर्वीच गृहमंत्री शिवराज पाटील यांनी तो स्विकारला होता. तात्काळ एकही बैठक न झालेली् बिहार विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
खरे तर अशा निर्णयावर राष्ट्रपतींच्या सहीनिशी शिक्कामोर्तब व्हावे लागते. पण केंद्राला किती घाई असावी? तेव्हा राष्ट्रपती रशियाच्या दौर्यावर होते. त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय फ़ॅक्सद्वारे कळवण्यात आला आणि तिथून त्यांची संमती घेतली गेली. दुसरा दिवस उजाडला तेव्हा विधानसभा बरखास्त झालेली होती. त्या नवनिर्वाचित विधानसभेची एकही बैठक झालेली नव्हती. नव्या आमदारांचा शपथविधी झाला नव्हता, की सभापतीही निवडला गेला नव्हता. बिचारे निवडून आले आणि तसेच माजी आमदारही ते होऊन गेलेले होते. त्याची किंमत आक्टोबर महिन्यातल्या मध्यावधी विधानसभा निवडणूकीत पासवान व लालुंना मोजावी लागेली होती. कारण त्यावेळी ज्या नितीशकुमारना सत्तेत येण्यापासून रोखायला हा बरखास्तीचा निर्णय लादला गेला होता, त्यांच्या भाजपासह असलेल्या आघाडीलाच मतदाराने निर्णयक बहूमत विधानसभेत दिले आणि बिहारमधून लालूंची हुकूमत कायमची संपून गेली. नितीश यांचा पक्ष ५५ वरून ८८ वर पोहोचला, तर भाजपा ३७ वरून ५५ आमदारांपर्यत वाढला. लालूंची स्थिती ७५ वरून ५४ अशी आणि पासवान तर २८ वरून १० आमदारांपर्यंत घसरून गेले. मतदार किती चोखंदळ व राजकीय जाणकार असतो, त्याची ही चुणूक होती व आहे. मात्र त्यापासून राजकीय नेते, पक्ष वा राजकीय विश्लेषक कुठला धडा शिकत नाहीत हे दुर्दैव आहे. निवडून आलेले आमदार् हे कुठल्याही पक्षासाठी वा त्यांच्या नेत्यांसाठी शक्ती जरूर असतात. त्याच्या बळावर राजकीय सौदेबाजी करता येत असते आणि डावपेचही खेळता येत असतात. पण असल्या डावपेचाचा सामान्य मतदारावर कुठलाही परिणाम होत नाही. कारण सामान्य मतदार जनता, नेत्यांप्रमाणे आपली विवेकबुध्दी गमावून बसलेली नाही. तिला नीरक्षीर निवाडा करता येतो. तेव्हा पासवान व लालूंना आपल्या पाठीराखा मतदार गुलाम वाटला होता. पण त्याच मतदाराने त्यांच्या अहंकाराचा बुडबुडा पहिली संधी मिळताच फ़ोडून टाकला होता. आताही इथे विधानसभा निकाल लागून आठवडा उलटून गेला आहे आणि निवडून आलेले पक्ष कुठल्या निर्णयाप्रत जाणार नसतील, तर पुन्हा सुत्रे त्या सामान्य मतदाराच्या हाती जाणार आणि त्यालाच निवाडा करावा लागेल, की कोण सत्ता राबवण्यासाठी किती योग्य आहे.
On Munguntivar's comment of a possibility of President's rule can happen hear that idiot Uddhav Thakare asked whether BJP controls the President. This shows Thakare's level of intelligence. However there is a real possibility that the next government could be a Congress-NCP-Sena combine.
ReplyDeleteराष्ट्रपतींची राजवट ही एक घटनात्मक व्यवस्था आहे । कलम 356 नुसार राज्याचे कामकाज निवडून आलेले विधीमंडळ घटनात्मक पद्धतीने करण्यास असमर्थ ठरले ( म्हणजे तसे राज्यपालांचे मत बनले )आणि त्यांनी तसा अहवाल दिला की केंद्राच्या शिफारसी वरून असा निर्णय जाहीर होतो । यात महाराष्ट्राचा अपमान वगैरे ओरडाआरडा करण्यात काही अर्थ नाही । कधीही लोकांना सामोरे न जाता ज्यांना गुलगुलीतपणाने पदे मिळत गेली आहेत असे संजय राऊत यांच्या सारखे बिनबुडाचे नेते परिस्थिती बिघडवण्यास कारणीभूत होत आहेत । खरं तर एकदा शरद पवार आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याच्या खुमखुमीचा फुगा फुटूच द्या ।
ReplyDeleteभाऊ, तुम्ही बिहार चा, तो इतिहास नेमक्या रीतीने सांगितला आहे.पण शिवसेनेचे कार्यकर्ते व नेते ही, भडकणारे आहेत.पण ते साथीदार आहेत.त्यामुळे राजकीय समजूतीने भाजप महाराष्ट्र नेत्यांनी बोलले, वागले पाहिजे. नाहीतर शहा मोदींना निस्तरावे लागेल. लेखाबद्दल धन्यवाद.
ReplyDeleteBhau ha Maharashtra aahe ithe rashtrpati rajvaticha fatka bhajap la Basel lihun ghya
ReplyDeleteIf Sena gets support from congress and ncp it will be disastor for Maharashtra and Sena will be wiped out in next election!
ReplyDeleteI think BJP wants that. Hence they are not asking support from anyone else. If Sena, ncp and Congress come to power, pawar will not continue the support for 5 years. BJP will become a very strong opposition plus central government will make use of ED and CBI against Congress and ncp. It will prove the corruption cases to be true as they won't need support from ncp for anything. Within 2 years the government will collapse and bip will be in power with clear majority.
DeleteShivsenecha pan lavakrach Paswan ani Chandrababucya TDP sarakhi avasthya honar ahe.
ReplyDeleteIf we are forced an election upon us again, and if BJP numbers reduce, then what? It looks that from all of India, people of our State have started rejecting Modi - Shah duo. It is only a matter of time that others shall follow suit.
ReplyDeleteSS is not playing a fair game.Maharashtra citizens HV voted for utee govt.Both parties shud initiate discuss and finalize the process of forming govt.Otherwise in future voters will teach a lesson to both.
ReplyDeleteProblem is created by the so called self declared leaders like Sanjay Raut. He never has to face elections nor has to face common public.
Deleteएकदा एका माणसाला १ कोटीची लॉटरी लागते. तो तिकीट घेऊन दुकानदारां कडे जातो.
ReplyDeleteदुकानदार : Tax वगैरे कापून तुम्हाला ६५ लाख मिळतील ..
माणूस : येडा समजला का रे ?
घेईन तर एक कोटी घेईन नाही तर तिकिटाचे १० रुपये परत दे...
यालाच म्हणतात शिवसेना...
There is a process to get a presedential rule. And as bhau has rightly mentioned BJP could do a Boota Singh here without going through the proper process which is as below:
ReplyDeleteFirst BJP will be invited and will be asked to probe the majority if they fell then Secondly, Second largest party and so on and so forth.
So getting a presedential rule is not a Joke as Mungantivar has commented there is a proper process to it. Hence Shivsena is sensing a danger in it and has commented. As we all know what had happens in 2014? voice of vote where predominantly voice was NO for BJP, still they could prove the majority as House president was of BJP.
And why अमित Shah is not coming out and open and say that he has notnpromised Uddhav Thakrey of CM post for two and half years? as उद्धव said in open that they have been promised behind the closed doors by अमित शह.one confession will solve the issue here.
पुन्हा निवडणूक झाली तर आज काय स्थिती होईल?
ReplyDeleteभाऊ कर्नाटक मध्ये ज्या चपळाईने काँग्रेसने कुमारस्वामींना पाठिंबा दिला त्याचे एक कारण म्हणजे दोघेही एका विचारसरणीचे म्हणजेच कथित धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत आणि महाराष्ट्रात सेनेची अडचण नेमकी इथेच आहे, मुंबई पाठोपाठ सेना लोकप्रिय झाली ती मराठवाड्यात, तिथल्या जनतेने बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेचे अतिशय मनापासून स्वागत केले आणि सेनेचा मराठवाडा हा बालेकिल्ला झाला, उद्या राऊत यांच्या सल्ल्याने सेना काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेलीच तर सेना या पट्ट्यातून कायमची उखडली जाईल, दुसरे म्हणजे काँगेसची पंचाईत देखील नेमकी इथेच आहे, अयोध्येचा निकाल अगदी तोंडावर आला आहे, बाबरी ढाचा धाराशयी झाला तेव्हा अडवानी लटपटले
ReplyDeleteहोते मात्र बाळासाहेब ठाकरे अतिशय खंबीरपणे करसेवकांच्या पाठी उभे राहिले होते, आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे बाळासाहेब ठाकरे यांचे दैवत होते तेंव्हा सेना काँग्रेस सोबत गेलीच तर ती आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांना तिलांजली दिल्यासारखे होईल आणि ती सेनेची आत्महत्या ठरेल, अमित शहा यांच्या सारखा चाणक्य सेनेची ही मजबुरी पुरेपुर ओळखून आहे म्हणूनच भाजप संजय राऊत यांच्या पोकळ धमक्यांना अजिबातच धूप घालत नाही सेना भाजपशिवाय कोठेही जाऊ शकत नाही हे त्याला पुरेपुर ठाऊक आहे.
Nice and eye opener. Shivsena is doing blunder and will pay heavy price going forward.
ReplyDeleteआता ७० वर्षे होऊन गेली पण हा अपरिपक्व आणि कसलीही ठोस ध्येय धोरणे नाहीत अशा पक्षांनी आजवर केलेला आकडेबाजीचा खेळ याचा अजून भारतीय जनतेला उबग कसा आला नाही याचेच राहून राहून आश्चर्य वाटते! आम्ही 'हिंदू आणि राष्ट्र हेच सर्वप्रथम मानतो' असे आजवर म्हणत आलेल्या पक्षानेही सत्तेसाठी आता चक्क देश द्रोही (होय खरे तर त्यांच्या आजवरच्या प्रतापांमुळे ते देशद्रोहीच आहेत पण आमची लोकशाही इतकी दुर्बल आहे की त्यांना देशद्रोही म्हणून बंदी घालणे तर राहोच उलट त्यांच्या नेत्यांना अजून आम्ही डोक्यावर घेतो) पक्षांची मदत घेणे अस्पृश्य मानलेले नाही. जोवर आमची सध्याची सो कॉल्ड लोकशाही चालू राहील तोवर ना आमची खरी सुधारणा होईल, ना समाजातील व राजकारणातील दुर्गती समाप्त होईल.
ReplyDeleteविख्यात ज्योतिर्विद रुपेन आर शहा यांनी भविष्यकथन करताना स्पष्ट केलं आहे की महाराष्ट्रात ५ वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील. कारण गुरू काहीतरी स्वगृही जातोय आणि उध्दवजींचीही गुरुमहादशा लागली आहे.
ReplyDeleteतुमचा लेख विस्मरणात गेलेल्या आठवणींना उजाळा देणारा आहे. पण ज्यांनी हा लेख वाचावा अशी अपेक्षा करणे म्हणजे गाढवापुढे वाचली गीता असा प्रकार आहे. निवडणूकीत निवडून आलेल्या आमदारांनी शपथ न घेतल्यामूळे भत्ते मिळणार नाही. निवडणूकीतील खर्च भरून निघणार नाही. अशा आमदारांचा पक्षनेतृत्वावरचा विश्वास उडेल. काहीजण पक्ष सोडतील. परत झालेल्या निवडणूकीत आता मिळालेल्या जागा परत मिळतील याची शाश्वती नाही. हा सर्व खटाटोप केवळ 'आपला तो बाब्या' करता आहे.
ReplyDeleteAll are useless
ReplyDeleteइथे इंग्रजी बोलणाऱ्या जास्त शिकलेल्या महाशयांना सांगतो हा मराठी ब्लॉग आहे आणि इथे मराठी बोला.तुम्ही काय आम्ही दुसऱ्या पेक्षा जास्त शिकलेले आहोत हे दाखवण्यासाठी इंग्रजी मध्ये टिप्पणी करत हा का?आजकल पान पत्ती वरच्या मुलाला पण गरजेपुरते इंग्रजी येते.जिथे गरज नाही तिथे इंग्रजी मध्ये बोलून शो ऑफ करू नये ही नम्र विनंती.आम्हाला माहित आहे तुम्ही खूप शिकलेले प्रकांड पंडित आहात आणि इंग्रजी भाषा शिकली म्हणजे विज्ञान,गणित चे आपोआप ज्ञान मिळते त्यासाठी वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया योग्य आहे, पण अनेक वेळा संकेतस्थळावर मराठी भाषेत प्रतिक्रिया देण्याची सोय उपलब्ध नसते. अश्यावेळी पुलं म्हणतात तसे "व्हटेवर यु कॅन राईट इन मराठी अक्षराज इस मराठी" हेही शक्य होत नाही. त्यामुळे कृपया व्यथित होऊ नका असे सांगावेसे वाटते.
Deleteभाऊ, हे सगळं जरी खरं असलं, तरी पुन्हा निवडणूक झाल्या तर काय होईल हे सांगणं कठीणंच आहे. माझ्या मते लोकांची सहानुभूती ही सेनेला असेल. सेनेकडून तसा प्रचार होण्याची शक्यता आहे. बिहार मध्ये, चालतं, हरियाणा मध्ये चालतं तर महाराष्ट्रात का नाही? त्यामुळेच, पुन्हा निवडणूक झाल्यास, सेनेला 100 तरी जागा मिळतील. माझं एकंच म्हणणं असेल सेनेला. विखारी प्रचार करून तोडून टाकू नका. अपमानकारक शब्द हे तालवारीपेक्षा घातक असतात, ते न वापरता सुद्धा टीका करता येते हे त्या संजय राऊतना कोणी तरी सांगायला हवंय.
ReplyDeleteस्वतःला निम्मी मत असताना, जुना इतिहास बघता, सेनेने असे मुख्यमंत्री पदासाठी अडवणूक करणे योग्य आहे, असे तुम्हाला खरोखरच वाटते का? लोकसभेचा निकाल आणि नंतरचे मोदी सरकारचे शासन बघता भाजपला पूर्ण बहुमत देणे जास्त सयुक्तिक वाटत नाही का?
Deleteभाऊ, आता राष्ट्रवादीने - म्हणजे शरद पवारांनी - भाजपला - काही काळापुरती ईडी चौकशी पुढे जाऊ न देण्याच्या बोलीवर पाठिंबा दिला तर? कारण भाजपला सत्ता स्थापन करणे आणि पुढील ५ वर्षे टिकवणे जास्ती महत्वाचे असेल कि पवारांचा पाठिंबा न घेणे?
ReplyDelete