आज म्हणजे ७ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन त्यांना आपल्या पक्षाची निवडणुकीनंतर झालेली परिस्थिती कथन केलेली आहे. पण महायुतीतल्या भाजपाला बहूमत नसल्याने आपण सरकार बनवण्याचा दावा करू शकत नसल्याचेही त्यांनी सांगितलेले असणार. तरीही मोठा पक्ष म्हणून सत्तेचा दावा भाजपा करू शकला असता आणि राज्यपालांना तो नाकारता आला नसता. पण भाजपाने तो मोह टाळला असल्याने भाजपाला राज्यात घटनात्मक पेचप्रसंग उभा करायचा आहे, हे न बोलताही स्पष्ट झाले आहे. अर्थात नुसत्याच खळबळ माजवणार्या वाहिन्यांना त्याचा आशय समजला नसेल तर योग्यच आहे. पण ज्यांना पक्षाचे राजकारण चालवायचे असते, त्यांना सर्व बाजूंनी विचार करावा लागत असतो. त्यातल्या खाचाखोचाही समजून घ्याव्या लागतात. राष्ट्रपती राजवट कधी कशी लागू शकते आणि तिचे परिणाम काय असू शकतात; याचेही भान राखावे लागते. म्हणून दहा दिवसांपुर्वी मुनगंटीवार यांनी इशारा दिला, त्याची थट्टा करण्यात शहाणपणा नव्हता. त्यांनी तशी धमकी दिली नव्हती, तर दिवस संपत चालल्याचा इशारा दिलेला होता. किंबहूना भाजपाने उघडपणे राज्यपालांची भेट घेण्यास विलंब लावण्यातच सापळा होता. कारण तितके दिवस वाया घालवून विरोधकांना व शिवसेनेला पर्यायी सरकार स्थापनेची जुळवाजुळव करण्याची सवड कमी मिळावी; असा त्यातला डाव असावा. आज भाजपाने राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेतली असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे आता पर्याय उभा करण्याचे आव्हान शिवसेना वा त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या ‘१७५’ आमदारांसमोर आलेले आहे. पण वेळ एका दिवसाचाही उरलेला नाही. कारण उद्याच ८ नोव्हेंबर असून त्याच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत काही पर्याय समोर आला नाही; तर आधीच्या विधानसभेची मुदत संपेल आणि पर्यायाने आधीचे सरकारही बाद होईल. त्यामुळे आपोआपच राष्ट्रपती राजवट लागू होण्याची प्रक्रीया कार्यरत होईल. पण तो विषय पक्षांच्या नेत्यांसाठी महत्वाचा नसून नव्याने निवडून आलेल्या आमदारांसाठी निर्णायक महत्वाचा आहे. ८ नोव्हेंबरचा आणखी एक गंभीर अर्थ किती लोकांना ठाऊक आहे? नोटाबंदी आठवते कुणाला?
तीन वर्षापुर्वी २०१६ च्या नोब्व्हेंबर महिन्यात ८ नोव्हेंबरचा सूर्य नेहमीसारखा मावळला. पण मध्यरात्र होताना मोठी उलथापालथ घडलेली होती. संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास देशा़चे पंतप्रधान नरेंद्र मोदी अकस्मात दुरदर्शनच्या पडद्यावर झळकले आणि आधी तशी सुचना देण्यात आलेली होती. पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण करणार असल्याची ती सुचना होती. त्याप्रमाणे ८ वाजता दुरदर्शनवर आलेल्या नरेंद्र मोदींनी जगाला थक्क करून सोडणारी घोषणा केलेली होती. ‘आज रात्र बारा बजने के बाद पचसौ और हजार के नोट लिगल टेंडर नही रहेंगे’ असेच त्यांनी जाहिर केले होते ना? त्यानंतर काय झाले होते? ती रात्र उलटल्यावर देशात वा अन्य कुठेही असलेल्या भारतीय चलनातील ५०० व १००० रुपयांच्या नोटा मातीमोल होऊन गेल्या होत्या. ज्यांना त्या बदलून हव्या त्यांच्यासाठी सोय केलेली होती. पण बाकी व्यवहारातून त्या नोटांना मूल्य राहिलेले नव्हते. त्यामुळे काळापैसा किंवा साठवलेला प्रचंड पैसा खिशात बाळगून पुंडगिरी करणार्यांना त्या क्षणानंतर भिकारी व्हायची पाळी आलेली होती. योगायोगाने उद्या शुक्रवारीही ८ नोव्हेंबरच आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपल्यामुळे तिचे अस्तित्व संपणार आहे. पर्यायाने तिच्या पाठबळाने सत्तेत बसलेल्या काळजीवाहू सरकारचेही अधिकार संपणार आहेत. कुठल्याही विधानसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक तयार करताना आयोग आधीची विधानसभा कधी संपते, त्याचा हिशोब करून आधीच मतदान उरकून घेतो. कारण नवे मंत्रीमंडळ जुनी विधानसभा कायम असतानाच सिद्ध व्हावे. जुन्या मुख्यमंत्र्याने राजिनामा दिला तरी त्याला काळजीवाहू मुख्यमंत्री ठेवता येते आणि पुन्हा त्याचा पक्ष जिंकला असेल तर त्याला नव्या शपथेने सत्तेत कायम राखता येतो. किंवा नव्या पक्षाला बहूमत मिळालेले असेल तर नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी होऊन नवे सरकार अस्तित्वात येते. पण विधानसभेच्या कायम रहाण्यात अडचण येत नाही. जुना मुख्यमंत्री असतानाच नव्याचा शपथविधी उरकला तर नवे सरकार विश्वासदर्शक प्रस्ताव संमतीसाठी अधिवेशन बोलावते, तिथून पुढली विधानसभा मुदत सुरू होते. मात्र त्यात खंड पडला तर घटनात्मक पेच निर्माण होतो. म्हणून राष्ट्रपती राजवटीची तरतुद करण्यात आलेली आहे. ८ नोव्हेंबरचे रात्री बारा वाजण्याला म्हणून महत्व आहे.
उद्या शुक्रवारी विधानसभा बरखास्त झाली, मग नवे सरकार स्थापण्यात रुसवेफ़ुगवे करून बसलेल्या नेत्यांची कुठलीही समस्या नाही. समस्या आहे नव्याने निवडून आलेल्या आमदारांची. कारण ते आयोगाच्या मोजणीनुसार व मतदाराच्या कौलानुसार आमदार झालेले असले, तरी कायदे नियमांच्या तरतुदीनुसार अजून आमदार झालेले नाहीत. त्यांचा आमदार म्हणून विधानसभा भरवून शपथविधीही पार पडलेला नाही. कारण नवे सरकार नाही; तर विधानसभेचे अधिवेशनही नाही. पर्यायाने आमदारांचा शपथविधीही नाही. त्यामुळे राजदरबारी या नवनिर्वाचितांची आमदार म्हणूनही नोंद नाही. त्यांना घटनात्मक पातळीवर मान्यता नसेल तर पगार भत्तेही सुरू होऊ शकत नाहीत. थोडक्यात आजही कोणापाशी जुन्या पाचशे हजाराच्या नोटा असतॊल, तर तितकीच या आमदारांची चलनी किंमत असू शकते. निदान राष्ट्रपती राजवट असेपर्यंत या नवनिर्वाचित २८८ आमदारांची घटनात्मक किंमत शून्य आहे. त्यामुळे तशा किती नोटा कुणाच्या खिशात आहेत वा त्या कोणी कोणाला दिल्या आहेत, त्याला कसलाही व्यवहारी अर्थ उरत नाही. ती किंमत उद्या ८ नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंत असेल. पंण राष्ट्रपती राजवट लागू झाली, मग त्यांची किंमत शून्य होते. जोवर राष्ट्रपती राजवट लागू असेल वा विधानसभा भरवली जात नाही, तोवर ही स्थिती कायम असेल. म्हणून तर भाजपाच्या नेत्यांनी राज्यपालांकडे दावा केला नाही म्हटल्यावर पर्यायी राजकारण करणार्यांची तारांबळ उडालेली आहे. शरद पवार कराड येथून कोकणात शेतकर्यांना भेटायला जाणार होते, त्यांनी तो दौरा रद्द करून मुंबईकडे धाव घेतलेली आहे्. तर शिवसेनेच्या गोटातूनही भाजपा दावा करीत नसल्याने आगपाखड करण्यात आली आहे. मुद्दा इतकाच आहे, की इतके दिवस पेचप्रसंग भाजपासाठी उभा केलेला होता आणि भाजपाला अवाक करून सोडण्यात आलेले होते. आता भाजपाने सरकार स्थापनेतून अंग काढून घेतल्याने पेच विरोधकात उभा राहिलेला आहे. कारण भाजपाची खेळी राष्ट्रपती राजवटीचा मार्ग प्रशस्त करणारी आहे आणि ती स्थिती त्यांच्या विरोधात एकवटलेल्यांना सोयीची नाही. तर पेच त्यांच्याच समोर उभा राहिलेला आहे. कारण राष्ट्रपती राजवट भाजपासाठी अजिबात अडचणीचा विषय नाही. कदाचित लाभाचाच असू शकतो.
आता राष्ट्रपती राजवटीचा लाभ कोणाला कसा होऊ शकतो वा त्रास कोणाला किती आहे ते बघूया. अर्धा महाराष्ट्र अतिवृष्टी व महापुराने बेजार झालेला आहे. मग त्यातून दिलासा शासनाने द्यावा अधी अपेक्षा स्वाभाविक असून; त्यात नव्याने निवडून आलेल्या आमदाराकडेच गावोगावचे मतदार बघणार आहेत. पण त्यांनाही आमदार म्हणून कुठले अधिकार नसतील, तर त्यांची मजल कुठवर जाऊ शकते? त्यांना अधिकार्यांच्या मेहरबानीवर अवलंबून रहावे लागणार. तिथेही राजकीय सरकार नसल्याने ज्यांचा केंद्र सरकारमध्ये दबदबा, त्यांनाच प्रतिसाद चांगला मिळू शकतो. कारण राज्यपाल हा केंद्रातील सत्ताधारी पक्षाचा प्रतिनिधी व सहकारी असतो. तोही पक्षाचा जुना नेता असला, मग त्या पक्षाला राष्ट्रपती राजवटीत झुकते माप मिळत असते. थोडक्यात आजच्या परिस्थितीत नव्याने निवडून आलेल्या कुठल्याही पक्षाच्या (शपथही न घेतलेल्या) आमदारापेक्षा भाजपाच्या तालुका जिल्हा पदाधिकार्याचे राज्यपालांच्या दरबारातील वजन अधिक असेल. त्यांच्याकडून असा पदाधिकारी जे काम सहज करून घेऊ शकेल, ते अन्य पक्षाच्या आमदारालाशी शक्य होणार नाही, गावोगावी लोक बेजार आहेत आणि मदतीसाठी आशाळभूत आहेत, त्यांना कुठल्याही पक्षाशी वा विचारधारेशी कर्तव्य नसून, उध्वस्ततेतून नव्याने उभे रहायचे आहे. अशा वेळी जो कोणी त्यांना झटपट सहाय्य वा मदत मिळवून देऊ शकेल, तो आमदार असण्यापेक्षा संकटमुक्तीत हातभार लावणारा म्हणून महत्वाचा असेल. अशा कामात भाजपाचा पदाधिकारी अधिक कार्यक्षम व पात्रतेचा ठरणार आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवटीतून अप्रत्यक्षपणे भाजपा सरकारच लोकांच्या माथी मारले जाणार आहे. मात्र तेव्हाच विविध पक्षाचे हातपाय गाळून बसलेले नवनिर्वाचित आमदार लोकांच्या रागाचे लक्ष्य होऊ शकणार आहेत. राष्ट्रपती राजवटीचा आमदारांसाठी हा अर्थ आहे. ज्याच्याशी कुठल्याही पक्षाच्या नेत्याला काडीमात्र कर्तव्य नाही. ती स्थिती अन्य प्रसंगी राजकारण म्हणून खपून गेली असती. पण आज सर्व महाराष्ट्र व्याकुळलेला असताना झालेले राजकारण सर्वच पक्षांच्या चलनी नोटा रद्दबातल करणारे ठरणार आहे. योगायोग असा की या २८८ नोटांवरून चाललेला जुगार ८ नोव्हेंबरच्ता मध्यरात्रीपर्यंतच चालू शकणार आहे.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteइतरत्र दिलेली प्रतिक्रिया परत देतो.
ReplyDeleteएकदम बरोबर. ही फडणवीसांची स्टाईल आहे. गेल्या ५ वर्षातील अडचणी बघता; सोनार संप, एस् टी संप, मूक मोर्चा वगैरे; ते फारसे बोलत नाहीत पण काम सुरू असते. आणि गोडीगुलाबीने नाही नीपटलं तर सरळ मोडून कढतात.
आताही ३ शक्यता आहेत.
१.राष्ट्रपती राजवट: सेनेचंच नुकसान. ना तुला ना मला, घाल कुत्र्याला. वरून नाव खराब.
२.सेना+कॉं+राष्ट्रवादी: तात्पुरता फायदा नक्कीच होईल पण असंगाशी संग प्राणाशी गाठ. सरकार कधी कोसळेल काही सांगता येणार नाही. आहे तोपर्यंत सुद्धा द्यावी लागणारी पाठिंब्याची किंमत मोठी असेल. पुन्हा नाव खराब झाल्याने पुढची निवडणूक जड जाणार.
३. युतीचे सरकार: माझ्या मते सगळ्यात फायदेशीर. प्रथमदर्शनी माघार वाटली तरी सरकार स्थीर असेल. त्यामुळे नाव वाचेल आणि चुका सुधारायला दुसरी संधी मिळेल.
भाऊ, किती गोष्टी तुमच्या डोक्यात असतात.🙏🙏🙏
ReplyDeleteहा लेख फक्त उद्या रात्री १२ नंतर टाकायला हवा होता 🤫🤫😊😊.
हे सत्तेचे निखळ सत्ताकारण, भाजप व शिवसेना, दोघांना अडचणी चे होईल. कारण त्यांनी सत्तेसाठी निवडणूक पूर्व युती केली. पर्यायाने विरोधकांना फायद्याचे ठरेल.दोघांचाही दोष आहे.
ReplyDeleteसरकारपेक्षा राष्ट्रपती राजवट चांगली. खाणारी मोठ्ठी तोंडे कमी होतात.
ReplyDeletecorrect
Deleteछान विश्लेषण!
ReplyDeleteभाऊ आपला लेख वाचला म्हणजे मराठी इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पोटावळे पत्रकार किती बिनडोक आहेत हे लक्षात येते, संजय राउत यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवून अलगदपणे या माध्यमांनी सेनेच्या वाघाला अमित शहा नावाच्या धूर्त शिकार्याच्या जाळ्यात ढकलून दिले आहे कारण गेली पाच वर्षे एकीकडे सत्ता भोगायची आणि दुसरीकडे सामना मधून सरकारला झोडपून काढायचे मग नानार असो की आरे असो,मराठा आरक्षण असो अशा सगळ्या विषयात सेनेने सामना मधुन सरकारला झोडपून काढले आहे, आता उद्यापर्यंत सेनेने भाजपला पाठिंबा दिला नाही की महाराष्ट्रात एक तर राष्ट्रपती शासन येईल किंवा भाजप सोडून उरलेल्या सगळ्यांचे सरकार येईल आणि अमित शहा यांना नेमके तेच हवे आहे कारण 2014 मधे भाजपने युती तोडली आणि जनतेची सहानुभूती सेनेच्या बाजूने वळली,नेमके यावेळी भाजपला हेच टाळायचे आहे म्हणूनच विंडीज विरुद्ध खेळताना स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू सुनील गावस्कर ज्या शिताफीने सोडून देत असे त्याच शिताफीने संजय राऊत यांची गोलंदाजी भाजप खेळून काढत आहे, म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचे उत्तर देण्यात येत नाहीये उलट भाजपचे सगळे नेते महायुतीचेच सरकार बनेल असे सांगत आहेत, म्हणजे भाजपला सेनेशी युती तोडून तर टाकायची आहे पण ते काम स्वतः न करता सेनेच्या हातून करायचे आहे म्हणून उद्या आठ नोव्हेंबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत भाजप अशीच सामंजस्याची भाषा करणार आहे आणि त्यानंतर एकदा का राष्ट्रपती शासन आले की मग मात्र अमित शहा सूत्रे हातात घेतील आणि आपण वर म्हटल्याप्रमाणे निवडून आलेल्या आमदारांची स्थिती होईल, हे बेचैन झालेले आमदार अलगदपणे भाजपचे समर्थन करतील, यात आज संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदा एन्जॉय करणाऱ्या माध्यमांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही तर भाऊसाहेब तुम्ही तुमच्या शेकापवरच्या ब्लॉगमध्ये तो पक्ष हळूहळू ज्या पद्धतीने कसा नामशेष होत गेला याचे वर्णन तुम्ही मार्मिकपणे केले आहे त्याच रस्त्याने शिवसेनेची वाटचाल सुरु आहे कारण गेल्या पंधरा दिवसांत संजय राऊत यांनी शिवसेनेला अशा मार्गाने नेले आहे की तिथून मागे फिरणे आता केवळ अशक्य आहे.
ReplyDeleteएकदम बरोबर.
Deleteभाजप वगळता उर्वरित पक्षांचे सरकार आता येणे आवश्यक आहे
Deleteम्हणजेसेनेला कळेल सरकार चालवायला काय तडजोड करावी लागेल ते.
चपखल तुलना!
ReplyDeleteनाही पटलं. विचार एकतर्फी वाटले. अमित शहानी लोकसभेच्या वेळेस काय शब्द दिला होता हे जाहीर केले पाहिजे. पारदर्शकता यालाच म्हणता येईल. नाहीतर आहेच आपली बिरुदावली पार्टी विथ डिफरन्स
ReplyDeleteअप्रतिम भाऊ असे विषय लोकांच्या गावीही नाहीत
ReplyDeleteचांगली खेळी आहे. आत्ता शिवसेनेला कळेल की कुवती पेक्षा जास्त मागितले की हाती भोपळा येतो
ReplyDeleteसरकार स्थापन न होता मध्यावधी निवडणुक झाली तर सेना पूर्ण संपेल, भाजपला ६०-७० जागा मिळतील व कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्तेवर येईल.
ReplyDeleteAmazing detailed analysis by bhau.
ReplyDeleteSuperb analysis bhau...!!
ReplyDeleteWhat a brilliant analysis supported by cogent reasons. A big thank you
ReplyDeleteउत्तराखंडचे भाजपचे माजी मुख्यमंत्री व सांप्रत माननीय राज्यपाल (महाराष्ट्र राज्य) भगतसिंग कोशयारी हे राज्यपाल राजवटीमुळे परवापासून घटनात्मक प्रमुख बनून राज्यकारभार करतील.
ReplyDeleteआणि उद्याच्या उद्या कुणी दावा केला तर काय होईल भाऊ?¿?
ReplyDeleteराज्यपाल दावा करणाऱ्या पक्ष्याकडून समर्थक आमदारांच्या पाठिंबा असलेली पत्रे घेऊन पडताळणी करतील आणि खात्री पटली तरच सरकार स्थापनेचे आमंत्रण देतील
Deleteनमस्कार भाऊ! ��
ReplyDeleteराज्य स्तरीय आणि राष्ट्रीय राजकारण किती सुस्पष्ट करून तुम्ही मांडता! कारण तुमच्या दृष्टी समोर ते स्वच्छ सुस्पष्ट आहे. आणि तुम्ही ते जसे च्या तसेच सर्वां समोर मांडता. जवळपास इतर सर्व नावाचे पत्रकार हे करीत नाहीत. कारण असे की एक तर ते बुध्दी वंचित आहेत आणि दुसरे म्हणजे देश द्रोह हेच त्यांच्या जीवनाचे मार्गदर्शक तत्व आहे. त्यामुळे जनतेच्या दृष्टीत दोष निर्माण करून त्यांची दिशाभूल करणे हेच त्यांचे ध्येय आहे.
लोकशाहीत निवडून आलेली माणसे हीच (निदान पुढची निवडणूक होई पर्यंत) खरी संपत्ते असते. ते जुन्या चालना प्रमाणे कधीच कालबाह्य होत नाहीत. निवडून आलेली हि संपत्ती काही पक्ष रिसॉर्ट / हॉटेल रुपी लॉकर्स मध्ये कुलूपबंद ठेवतात तर काही पक्ष त्यांचा घोडा-बाजार करतात. आणि भाजपची तर यात हातोटी आहे, आणि हे नजीकच्या: कर्नाटक, गोवा व ईशानेकडील सत्ता पालटातून त्यांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे जुन्या चालनाशी केलेली तुलना अर्थशून्य वाटते.
ReplyDeleteभाजप शिवसेना युती होईल व तेच सरकार स्थापन करतील हे नक्की
ReplyDeleteशिवसेनेचा प्रवास आत्महत्येचा दिशेने चालू आहे.विनाश काले विपरीत बुद्धी...दुसरे काय..?
ReplyDeleteपण दुरगामी विचार करता यात भाजपचंच नुकसान आहे . बेडकी फुगून बैलाइतकी झालीय . आता तिची फुटायची वेळ आलीय इतकंच .
ReplyDeleteसत्तालोलुपता फार वाईट असते .
भाऊंच्या भाषेत ही wishful thinking ahe भाऊंची
ReplyDeleteभाऊ आश्चर्य या गोष्टीच वाटत कि अजूनही कोणाला खरं राजकारण कसं कळत नाहीये ...
ReplyDelete२०१७ च्या BMC नीवडणुकांमध्ये भाजप सेनेइतक्या जागा मिळून सुद्धा तटस्थ राहिलाय ... सेनेला हे कळत नाहीये का कि अमित शहांसारखा स्ट्रॅटेजिस्ट आणि फडणवीसांसारखा बेरकी राजकारणी शिवसेनेच्या पोपटाचा मुंबई महापालिकेच्या सत्तेत अडकलेला प्राण सहज कोंडू शकतात... ज्या बालिश पणे सेनेने हा तमाशा चालवला आहे ते बघून सेनेचा शेवट जवळ आला आहे असं वाटतं
सेना आता कॉंग्रेस च्या 28नगरसेवकांचा सपोर्ट घेईल
Deleteभाऊ, एक शंका आहे की ह्या संपूर्ण प्रकरणात अमित शाह मध्यस्थी का करत नाहियेत ? देवेंद्र जी एकटे पडले आहेत का?
ReplyDeleteनाही
Deleteहा रणनीती चा भाग आहे
ढढ
ReplyDeleteविषय कसा मांडला पाहिजे जे भाऊ कडुन शिकले पाहिजे. नविन काही तरी शिकवतात भाऊ
ReplyDeleteउत्तम विश्लेषण
ReplyDelete"भाजपाच्या तालुका जिल्हा पदाधिकार्याचे राज्यपालांच्या दरबारातील वजन अधिक असेल. त्यांच्याकडून असा पदाधिकारी जे काम सहज करून घेऊ शकेल, ते अन्य पक्षाच्या आमदारालाशी शक्य होणार नाही, गावोगावी लोक बेजार आहेत आणि मदतीसाठी आशाळभूत आहेत, त्यांना कुठल्याही पक्षाशी वा विचारधारेशी कर्तव्य नसून, उध्वस्ततेतून नव्याने उभे रहायचे आहे" हीच गोष्ट भाजप ला महाग जाईल, भाजप नेत्यांना झुकते माप मिळतंय दिसले की पुढे येणाऱ्या निवडणूक निकालात ते त्यांना समझेल.☺️
ReplyDeleteभाऊ शिवसेनेच्या अरेरावी बद्दल आपले काय मत आहे
ReplyDeleteSuperb analysis.
ReplyDeleteआमच्या लक्षात न आलेल्या गोष्टी तुमच्या लेखातून कळतात.
अस्मिता फडके, पुणे.
आचार्य अत्रे यांच्या नंतर तुम्ही एकमेव. बाकी सगळे चमचे
ReplyDelete