Tuesday, November 5, 2019

कॉग्रेसचा ‘पीएमसी’ प्रस्ताव

Image result for sonia pawar

नुकतीच एका मित्राने लिन्क पाठवल्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसने शिवसेनेला दिलेला पाठींब्याचा प्रस्ताव समजू शकला. ती दैनिक लोकमतच्या वेबसाईटवरची बातमी आहे. त्यामध्ये शिवसेनेला सलग पाच वर्षे मुख्यमंत्री मिळण्याची खात्री देण्यात आलेली असून, राष्ट्रवादी व शिवसेना यांचे संयुक्त सरकार स्थापन होऊ शकणार आहे. त्याला कॉग्रेस बाहेरून पाठींबा देण्याची हमी शरद पवार यांनी सोनिया गांधींकडून मिळवली असल्याचेही वृत्तात म्हटलेले आहे. सहाजिकच यासारखा उत्तम लाभदायक प्रस्ताव अन्य कुठूनही मिळू शकत नाही, हे मान्य करायलाच हवे. विशेषत: भाजपासारख्या कद्रू पक्षाने अर्ध्या मुदतीसाठी किंवा अडीच वर्षासाठीही मुख्यमंत्रीपद नाकारलेले असताना इतका फ़ायदेशीर प्रस्ताव अन्य कुणाकडूनही येऊ शकणार नाही. म्हणूनच विनाविलंब पत्रकार परिषदा घेण्याचे थांबवून शिवसेनेने हा प्रस्ताव व्यवहारात आणायची पावले उचलावीत; असे माझे प्रामाणिक मत आहे. अर्थात असे प्रस्ताव किंवा ऑफ़र ठळक शब्दात नेहमी सर्वत्र बघायला मिळत असतात आणि त्याच्या खाली सुक्ष्म टायपामध्ये त्यासाठीच्या अटी छापलेल्या असतात. तशाच काही जाचक वाटू शकणार्‍या अटी इथेही समाविष्ट केलेल्या आहेत. पण लाभासाठी उतावळ्या झालेल्यांनी अशा छोट्या टायपातल्या अटी कधी वाचायच्या नसतात. त्यांनी ठळक अक्षरातल्या अटी घाईगर्दीने वाचून ऑफ़र स्विकारायच्या असतात. तर पाच वर्षाचे मुख्यमंत्रीपद देण्यामागच्या राष्ट्रवादी व कॉग्रेस यांच्या अटी कोणत्या आहेत? पहिली अट सेनेचे केंद्रातील कॅबिनेट मंत्री अरविंद सावंत यांच्यावर गदा आणणारी आहे. पाठींबा मिळण्यासाठी त्यांनी मोदी सरकारमधून बाहेर पडले पाहिजे आणि नंतर् शिवसेनेने एनडीए आघाडीशीही काडीमोड घेतला पाहिजे. तसे झाल्यास राष्ट्रवादी सेनेशी संयुक्त सरकार स्थापन करण्याविषयी विचार करणार आहे. अर्थात विचार करायला फ़ार वेळ लागणार नाही. त्वरेने दोन्ही पक्ष राज्यपालांची ‘सदिच्छा’ भेट घेऊन आपला सरकार स्थापनेचा दावा सादर् करतील. त्याला कॉग्रेसचा बाहेरून पाठींबा असेल आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यात सत्तेवर बसवण्याचे स्वप्न पुर्ण होऊन जाऊ शकेल. ह्या प्रस्तावाला मी पॊएमसी प्रस्ताव असे कशाला म्हटले आहे? तर त्यातल्या छोट्या अक्षरातील अटींसाठी.

शिवसेनेला सलग पाच वर्षाचा मुख्यमंत्री मिळवण्यासाठी आधी पाठींब्याची गरज आहे आणि त्यासाठी त्याच्याही आधी सेनेला एनडीए बाहेर पडून आपला केंद्रातला मंत्री बाहेर घ्यावा लागेल. त्यानंतर ह्या प्रस्तावाची कार्यवाही सुरू होऊ शकते. म्हणजेच आधी जी काही रक्कम या प्रस्तावामध्ये खर्ची घालायची आहे, ती सर्व सेनेने खर्च करायची आहे. त्यात राष्ट्रवादी वा कॉग्रेसला एक छदामही खर्चायचा नाही वा कुठे सह्या वगैरेही करायच्या नाहीत. पण लाभ किती आहे जरा बघा. सलग पाच वर्षाचे मुख्यमंत्रीपद मिळणार आहे. एका बाजूला इतके मोठे पद आणि दुसर्‍या बाजूला भाजपा सारख्या मुजोर पक्षाला धडा शिकवण्याची अपुर्व संधी आहे ना? मग छोट्या टायपाकडे बघायचे कशाला? तात्काळ प्रस्ताव मंजूर करून लाभ पदरात पाडून घ्यायला पुढे सरसावले पाहिजे ना? त्या छोट्या टायपापेक्षा आणखी छोट्या टायपात इतरही अटी आहेत. त्यामध्ये शिवसेनेने पुढल्या काळात कुठलेही जहाल विधान वा निवेदन करता कामा नये. त्याची काळजी शरद पवार यांनी घ्यावी, अशी अट सोनियांनी घातली असल्याचेही म्हटलेले आहे. त्याचे पालन करण्यात कुठली अडचण आहे्? ‘सामना’ बंद करून टाकला तरी प्रश्न सुटॄ शकतो. कारण ‘सामना’ चालू ठेवला तर हिंदूत्वाचा ज्वलंत प्रचार प्रसार करणारी विधाने निवेदने करावी लागतील. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावे, अशा मागण्या लिहाव्या लागतील. पण ‘सामना’च बंद केला तर ह्या जाचातून सुटका होऊ शकते. हिंदूत्वाशी जवळीक संपेल आणि जहाल काही लिहीले छापले जाण्याचा धोकाही संपुष्टात येईल. किंवा मुखपत्र चालूच ठेवायचे असेल, तर त्यात काही जहाल नाही ना, याची तपासणी करायला नित्यनेमाने छपाईपुर्व पाने पवारांकदे धाडावी लागतील. पण अशा अटींचा विचार करण्यापेक्षा पाच वर्षाचे मुख्यमंत्रीपद मिळण्याकडे बघावे. माणसाने कसे सकारात्मक असावे. जाईल काय त्यापेक्षा मिळणार काय, त्याचा विचार करावा. नेमका असाच विचार अनेकजण करतात. नारदा, शारदा चिटफ़ंड वा पीएमसी बॅन्केच्या खातेदारांनी गुंतवणुकदारांनी तसाच सकारात्मक विचार केलेला नव्हता काय? म्हणून मी याला पीएमसी प्रस्ताव म्हणतोय.

Image result for PMC agitation

कुठल्याही मोठ्या बॅन्का किंवा अर्थसंस्था भरमसाट व्याज देत नाहीत. बचत खाते असो किंवा मुदतबंद ठेव असो, त्यावर राष्ट्रीकृत बॅन्क, आयुर्विमा वा पोस्ट खाते किरकोळ व्याज देते. त्यापेक्षा चिटफ़ंडवाले किंवा पीएमसी सारख्या बॅन्का भरपुर व्याज द्यायला राजी असतात.  एकाहून एक भरमसाट व्याजाच्या विविध योजना आखून गुंतवणूकदारांना आकर्षित करीत असतात. सामान्य लोकही आयुष्याची घाम गाळून मिळवलेली कमाई वा बचत, अशा भरपूर लाभ देणार्‍या योजनांमध्ये सहज गुंतवतात ना? तशी गुंतवणूक करताना त्यातील कागदपत्रांमध्ये छोट्या टायपातल्या अटीशर्ती कोण वाचत असतो? गुंतवणुक करणार्‍याला मिळणारे प्रचंड चक्रवाढ व्याज तितके दिसत असते. चारपाच वर्षात लाखाचे दोन लाख होण्याची इच्छा कोणाला नसते? कोणाला स्वप्ने साकारायची नसतात? त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी तर पीएमसी वा तत्सम बॅन्का अर्थसंस्था आकर्षक योजना व ‘प्रस्ताव’ तयार करीत असतात ना? मागल्या चाळीस वर्षात कित्येक पक्षांना वा नेत्यांना असे लाभदायक किती प्रस्ताव शरद पवारांनी दिले? किती लोकांनी आपापली स्वप्ने साकार करण्यासाठी पवारांच्या राजकारणात आयुष्याची प्रतिष्ठा वा पुंजी सहज गुंतवलेली नाही काय? शेतकरी कामगार पक्ष वा जनता दल, विविध रिपब्लिकन गट वा डाव्या पुरोगामी गुंतवणुकदारांनी अशाच लाभदायक योजनांतून आपली स्वप्ने साकार करण्यात पुढाकार घेतलेला नव्हता काय? आज त्यापैकी कुठले पक्ष कुठे नावाला तरी शिल्लक आहेत काय? अगदी अलिकडे राज ठाकरे यांनीही अशाच लाभदायक योजनेत आपली बारा तेरा वर्षाची प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे. मुख्यमंत्रीपद सोडा, त्यांनी तर विरोधी पक्षात बसायचे स्वप्न बाळगले होते. आज त्यांचा पक्ष कुठे आहे? त्यांचेही भविष्य पवारांच्या हाती सुरक्षित झाले आहे. मग शिवसेनेने ताज्या प्रस्तावावर अधिक विचार करीत बसण्याची काय गरज आहे? विनाविलंब प्रस्ताव स्विकारावा आणि एनडीएला लाथ मारून बाहेर पडावे. आपल्या केंद्रातील मंत्र्याचाही राजिनामा देऊन टाकावा. राष्ट्रवादीने देऊ केलेले ‘सोनिया बॉन्ड’ खरेदी करण्यात आपली सगळी बचत खर्ची घालावी. पाच वर्षे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न स्वस्तात पुर्ण होते आहे, मित्रांनो!

पीएमसी सारख्या बॅन्का वा चिटफ़ंड वगैरे योजना आकर्षक बनवतात. त्यात मोठ्या लाभाची आश्वासने असतात. पण लाभाचेही स्वप्नच विकत असतात. त्याची पुर्तता कधी होईल, त्याची कोणी हमी देऊ शकत नाही. सोनियांनी पाठींब्याचे आश्वासन दिलेले आहे. पण तशी आश्वासने इंदिराजींच्या जमान्यापासून कॉग्रेस प्रत्येकाला देत आलेली आहे. कालपरवा असेच आश्वासन शेजारच्या कर्नाटक राज्यात कुमारस्वामी यांना देण्यात आलेले होते. आज त्यांच्या स्वप्नाची काय परिस्थिती आहे? चरणसिंग यांच्यापासून देवेगौडांपर्यंत किती दिग्गजांनी कॉग्रेसच्या अशा लाभदायक योजनेत आपली आयुष्याची कमाई घातली? नंतरच्या काळात त्यांनाही पीएमसीच्या आजच्या खातेदाराप्रमाणे रस्त्यावर वसुलीसाठी फ़लक घेऊन उन्हातान्हात घोषणाच देत उभे रहावे लागलेले आहे. कारण गेल्या चार दशकात त्या पक्षाने ज्यांना म्हणून पाठींबा दिला वा देऊ केला, त्यांच्या पाठींब्याच्या मुदतीची कोणीही कधी हमी देऊ शकलेला नाही. तेही ठिक आहे. पण या गुंतवणूकॊत त्यांनी आयुष्यभर राब राब राबून मिळवलेली पत प्रतिष्ठेची मुद्दलही परत मिळू शकलेली नाही. कॉग्रेस वा राष्ट्रवादीच्या पाठींब्याची योजना मोठी आकर्षक असते आणि एकदा त्यात गुंतवणूक केली, मग हळुहळू स्वप्ने अधिकच स्वप्नवत होत जातात. हा आजवरचा अनुभव आहे. पण पुढल्यास ठेच, मागचा शहाणा असल्या म्हणी उक्ती वगैरे जुन्या कालबाह्य झालेल्या आहेत ना? मागचा आजकाल अतिशहाणा असतो. म्हणून पुढल्याला ठेच लागली, तरी मागचा अधिक पुढे जातो. त्याला ठेच म्हणजे काय तेच समजून घ्यायचे असते ना? त्यामुळे त्या प्रयोगातून जाण्यासाठी शिवसेनेसाठी ‘हीच ती वेळ’ आहे. सेनेने कॉग्रेस राष्ट्रवादीने दिलेला पीएमसी प्रस्ताव विनाविलंब स्विकारावा आणि भाजपाला चांगलाच धडा शिकवावा. सरकार कधी होईल वा किती चालेल, त्याची पर्वा कशाला करायची? भाजपाला धडा शिकवायची व अद्दल घडवण्याची इतकी उत्तम वेळ दुसरी नाही. अशी संधी वारंवार येत नसते. भाजपा वगळून १७५ आमदारांचे पाठबळ असलेला मुख्यमंत्री कधी मिरवता येणार आहे? बाकी पीएमसी बॅन्केचे प्रकरण चघळायला समोर आहेच ना?

https://lokmat.news18.com/maharashtra/if-shiv-sena-walk-out-nda-then-ncp-will-think-alliance-says-source-mhsy-417457.html

36 comments:

  1. भाजप ची तीच खेळी आहे असे वाटते!
    अमित शहा यांना चाणक्य का म्हणतात ते ही लवकरच कळेल वाघांना!!

    ReplyDelete
  2. चार हाणा पण मुख्यमंत्री म्हणा !

    ReplyDelete
  3. खुप छान भाऊ पी एम सी च्या उदाहरणाने खुप छान विषय पटवून दिलात. हे शिवसेनेच्या अनेक नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि सर्व समंजस शिवसैनिकांना ही चांगले कळते आहे. पण जबाबदार नेतृृत्वाला कळू नये हे शिवसेनेचे दुर्दैव आहे. आज हे सत्तेच्या मोहा पायी आत्महत्याच करताहेत. राष्टीय लेव्हल ला बलाढ्य बळ असुन ही ज्या पक्षांची दुकानदारी बंद झाली ते शिवसेनेला कुठे घेऊन जातील हे शिवसेनेच्या नेतृृत्वाला कळले पाहीजे अशी शिवसेनेचे हितचिंतक अपेक्षा करीत आहेत.आम्ही अजुन ही आशा वादी आहोत महाराष्टाची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी कृृृपेने शिवसेनेला सुबुध्दी सुचावी आणि शिवसेना भाजपा युती अखंड रहावी हेच हिंदू हितरक्षक समस्त मराठी जनांंची इच्छा आहे.
    दिनेश वाघ.धुळे

    ReplyDelete
  4. जय श्री राम
    जय शिवराय.

    ReplyDelete
  5. इतर वृत्तपत्रे आज "सामना" त काय छापले याच्या बातम्या करतात. भाऊ तुम्ही तर टुकार "लोकमत"...असो. हल्ली लोकमतच काय पण सर्व पत्रकार असल्या थेरिज प्रश्नचिन्ह (?) लावून सर्रास छापत आहेत. त्यांना आपण फक्त मनोरंजन म्हणून पहावे. जास्त सिरीयसली घेऊ नये :)

    ReplyDelete
  6. If, as luck would have it,such unholy alliance takes place - which is very unfortunate to happen - this will have disastrous consequences - both short as well as long term - on all the three parties involved i.e Shiv Sena,NCP & Congress since that borders dangerously close even to their credibility. BJP will definitely emerge much stronger, resilient as well as aggressor as they no longer will have to carry old baggage which has become a millstone around their neck neither you can squirm nor you can squeal.Very interesting situation to watch / study as it unfolds in the immediate future with all its trappings.LOL

    ReplyDelete
  7. खरे म्हणाल तर फडणवीस सरकार 2014 साली NCP च्या अशाच PMC ऑफर वर बहुमतात आले. त्यामुळे आता शिवसेनेने काँग्रेस बरोबर गेले तर पोटशूळ उठायला नको.

    ReplyDelete
    Replies
    1. 2014 साली PMC ऑफर भाजपने मागितली नव्हती तर NCP ने आपल्या मागच्या भ्रष्टाचाराच्या केसेस उकरून निघू नयेत म्हणून "मान न मान, मैं तेरा मेहमान" किंवा "अगं अगं म्हशी मला कुठं नेशी" प्रमाणे न मागता भाजपाला पाठिंबा देऊन टाकला होता. पण आता राऊत हा उत आल्यासारखा NCP च्या मागेच लागलाय आम्हाला पाठिंबा द्या म्हणून.

      Delete
    2. भीक मागितली किवा मिळाली काय एकूण एकच. आणि त्याच 2014 च्या PMC ऑफर मधील बारीक अक्षातरतील अटींमुळे 5 वर्षात ना काकाची केस निघाली ना पुतण्याची. काय बरोबर ना?

      Delete
  8. आपल्या केंद्रातील मंत्र्याचाही राजिनामा देऊन टाकावा. राष्ट्रवादीने देऊ केलेले ‘सोनिया बॉन्ड’ खरेदी करण्यात आपली सगळी बचत खर्ची घालावी. पाच वर्षे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न स्वस्तात पुर्ण होते आहे, मित्रांनो!

    ReplyDelete
  9. सर तुम्ही हा ब्लॉग गूगल ट्रेनलाशन अँप वापरून हिंदी मध्ये पण सुरू करू शकता.कृपया यावर विचार करावा.

    ReplyDelete
  10. भाऊ, काही दिवसांपूर्वी आपण शिवसेनेच्या हातात हुकमी एक्का असल्याचे लिहिले होतेत. पण शरद पवारांनी इथे बाजी मारली असे वाटते. कारण जर सेना NDA तुन बाजूला पडली, तर पवार शेतकऱ्यांना "सरसकट कर्जमाफी" म्हणून स्वतःचे उखळ भरून घेतील, भरपूर भ्रष्टाचार करतील, वर पुन्हा शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला जबाबदार धरण्याची तजवीज करतील, किंवा कदाचित सेना NDA तुन बाहेर पडली कि ईडी ने चौकशी न करण्याच्या बदल्यात भाजपलाच पाठिंबा देतील. आणि एकूण चित्र बघता भाजप तो घेतिलही...

    ReplyDelete
  11. काय भाऊ.. तुम्ही सुद्धा?? मराठीलोक आपल्याच सर सर वर जाऊ इच्छिणाऱ्याचे पाय ओढता? त्यांना जमिनीवर आणू पहाताय? त्यांना बागुलबुवाची बागुलमावशीची...( बागुलबुवाचे स्त्रीलिंग सुचत नाही) भिती दाखवताय? आपण पहिलीत एक धडा शिकलो होतो खारूताईचा.. सर सर झाडावर.. सर सर खाली! आता नवीन सिल्याबसमधे ते शिकवत नाहीत त्यामुळे सेना आपला खारीचा बरीक मोठा वाटा घेऊन धावत निघाली आहे शेंड्यावर बसून मजेत चाखायला
    जोशी साहेबही बाजूला बसून सावध करत नाहीत का.. त्यांनी कदाचित सांगितलेही असेल.. आहे मनोहर तरीही

    अन् इथे तुम्ही रक्त आटवताय!

    ReplyDelete
  12. मागे शरद पवारांच्या कुठल्या सभेत आलेल्या कुत्र्याला पाहून ते "शिवसेनेची लोक आली वाटत" म्हणाले. जर शिवसेनेने हा प्रस्ताव मान्य केला, तर पवार "द्रष्टे" ठरतील असा विचार उगाचच येऊन गेला मनात....

    ReplyDelete
  13. एकदा वाटते की फारच रोमहर्षक आहे ही घडामोड. पण दुसऱ्यांदा खेद होतो की शिवसेनेचा मृत्युलेख लिहायची वेळ झाली असावी का? आपण दिलेली लोकमतची लिंक वाचली. फर्स्टपोस्ट ह्या ऑनलाईन साईटवर अश्याच आशयाची बातमी आहे.

    थोडक्यात, शिवसेनेच्या वाघाने नखे आणि दात आपणहून उपटून आपल्या मित्रपक्षांच्या स्वाधीन करावेत, अशीच ही अट आहे. त्या दातांच्या जागी नवे दात उगवत नाहीत ना, आणि नवी नखे वाढत नाहीत ना, हे पाहण्याची जबाबदारी पवारांनी घ्यायची असा बेत दिसतोय.

    भाऊ, आपणच पूर्वी आपल्या एका लेखात म्हाताऱ्या सिंहाची गोष्ट सांगितली होती. अगदी तंतोतंत त्याच प्रकारचा प्रस्ताव आहे हा. त्या सिंहाचे काय झाले हे आपण तेव्हा सांगितले होतेच. आता हा शिवसेनेचा वाघ नक्की अजून स्वतःची काय काय अवस्था करून घेतो ते पाहायचे. थोडक्यात शिवसेनेची उठबस आता इफ्तार पार्ट्या, बिहारी पुढारी यांच्याबरोबर होणार तर. (ह्यात काही वावगे आहे असे नाही पण स्वर्गात बाळासाहेब कपाळावर हात मरून घेत असतील).

    एक गोष्ट मात्र मान्य केलीच पाहिजे. सोनियांकडून दाखवला गेलेला धूर्तपणा कौतुकास्पद आणि पवारांनी सगळे पत्ते काढून एकदम टेबलावर ठेवले हेही आश्चर्य. ह्या अश्या अटी गुलदस्त्यात ठेवल्या तर आश्चर्य वाटले नसते पण सरळ सरळ माध्यमांमध्ये उघड केल्या जातायत त्याचे रहस्य काय असावे?

    हा प्रस्ताव जर सेनेने घेतलाच तर पुढच्या पाच वर्षात अनेक भाजप नेत्यांवर ईडी कारवाई, आणि केंद्र विरुद्ध राज्यसरकार हा पंगा पाहायला मिळणार. शिवसेनेचा वाघ तर शरपंजरी पडला असे म्हणावे लागेल.

    आणि आता वाघ पुन्हा युतीच्या गुहेत परत आला तर त्याला काय काय सोसावे लागेल?

    शिवसेनेने स्वतःच्या पायावर धोंडा मरून घेतला आहे हे आता जाणवते. बघू या उद्धवजी काय प्रतिडाव खेळतात.

    ReplyDelete
  14. आणि आता वाघ पुन्हा युतीच्या गुहेत परत आला तर त्याला काय काय सोसावे लागेल?

    शिवसेनेने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे हे आता जाणवते. बघू या उद्धवजी काय प्रतिडाव खेळतात.

    पण, ह्या प्रसंगात भाजपने जर मुख्यमंत्रीपद ठेवून बाकी मंत्रीपदे ५०-५० वाटली तर त्यांची प्रतिमा खरोखरच मोठ्या भावासारखी होईल. मला वाटते भाजप तसेच काही करेल. पण पुढच्या निवडणुकीत युतीला साग्रसंगीत तिलांजली. थोडक्यात, शिवसेना खरोखरच पेचात सापडली आहे. निवडणुकीनंतर सौहार्दाने सरकारात सामील झाले असते तर ही लक्तरे निघाली नसती.

    ReplyDelete
  15. शिवसेना इतकी सता लोभी असेल असं वाटलं नव्हतं. शिवसेना शरद पवारांच्या सापळ्यात अलगद सापडते असं वाटतं.कारण शरद पवारांचा सापळा म्हणजे उंदरांचा सापळा असतो, त्यात जाण्यासाठी मार्ग खुला असतो पण बाहेर यायला मार्ग नसतो. शिवसेना परतीचे दोर स्वताच कापल्या सारखे वाटत.शरद पवारांची ज्यांनी ज्यांनी संगत केली ते ते सर्व संपल्यात जमा आहेत. सध्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचा नेता.

    ReplyDelete
  16. भाऊ , फारच सुंदर अवलोकन व पूर्ण गोषवारा सहज सुलभ रित्या सांगितला आहे, धन्यवाद!

    ReplyDelete
  17. true. and accurate estimation of the fact.

    ReplyDelete
  18. शरद पवारांच्या आजच्या मुलाखतीनंतर संजय राऊत तोंडावर आपटले असेच म्हटले पाहिजे

    ReplyDelete
  19. भाऊ तुम्ही यांचे डोळे कितीही उघडण्याचा प्रयत्न केला तरी काही उपयोग होणार नाही.सत्तेसाठी आंधळेपण चे सोंग घेतले आहे. औट घटकेचे राज्य करुदेत.जनताच त्यांना धडा शिकवल्यशिवाय राहणार नाही

    ReplyDelete
  20. भाऊ, अगदी पोटतिडकीने लिहिलेत, पण ज्यांच्यासाठी आहे ते वाचायला शुद्धीवर आहेत कुठे?

    ReplyDelete
  21. नमस्कार भाऊ!
    तुमच्या कडून खूप शिकायला मिळते. भारतात प्रामाणिक पत्रकार आहेत यावर विश्वास ठेवणे अवघड झाले असताना तुम्ही भेटलात. तुमचा अत्यंत आभारी आहे. ��

    ReplyDelete
  22. What a brilliant analysis. Beautiful. You are really a visionary - vision is the art of seeing the invisible.Hats of.

    ReplyDelete
  23. कौरवांच्या नाशासाठी शकुनी मामा व शिवसेना नाशासाठी संजय राऊत

    ReplyDelete
  24. Bhau, SHivsena is un-necessarilry stretching this. If Democracy is all about numbers, then BJP has more numbers then SS. also out of 162, 57 Constituencies have rejected BJP and of 124, 68 have rejected SS. (the same logic prople debate when they doubt Modi's success.) and Hon. Babasaheb Ambedkar had not written Constitution with this aspect that someone will blackmail even if they have lesser no. for SS, BJP will always be best partner in future also. if Aditya had not stretched last time in 2014, Uddhav would have been CM.

    ReplyDelete
  25. सत्तेसाठी आसूसलेल्या मावळ्याना कोण मुख्यमंत्री बनतो त्याची पर्वा असेल असे वाटत नाही.

    ReplyDelete
  26. हल्ली उद्धव ठाकरे काही बोलत नाही..संजय राऊत एकटेच रोज तारे तोडत आहेत. भाजपने मन घट्ट करून पुढील निवडणुकीत वेगळे लढावे.. आणि शिवसेनेला योग्य जागा दाखवावी...सद्ध्या राष्ट्रपती राजवटीची वाट मोकळी करावी..

    ReplyDelete
  27. भाजप मायावती सोबत सरकार स्थापन करून तिला अडीच वर्षे मुख्यमंत्री बनवू शकते, ते चालते. भाजप मेहबुबा मुफ्ती बरोबर 3 वर्ष सरकार चालवते ते पण चालते कारण त्यामध्ये म्हणे दूरदृष्टी आहे. भाजप स्वतःच्या सीट जास्त निवडून आलेल्या असताना शेपूट घालून नितीश कुमारला मुख्यमंत्री बनवते ते पण चालते. तो नितीशकुमार या भक्तांच्या देवाला शिव्या घालून एनडीए सोडतो पण परत हीच भाजप त्याचे पाय चाटत जाते आणि लोकसभेच्या निवडणुकीत 2014 ला जिंकलेल्या 7 जागा नितीशकुमार ला सोडते. ते पण चालते. 2014 सली महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजप सरकार बनवते अगदी ते पण चालते.
    पण
    फक्त शिवसेनेने युती करताना *ठरल्या प्रमाणे* सत्तेत वाटा मागीतलेला आजिबात चालत नाही. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर भेटी घेतलेल्या चालत नाहीत.
    याचे कारण काय असेल ? शिवसेनेला "च" एवढा विरोध का? सर्वात जुना मित्र आणि 2009 साली सगळे मित्र सोडून गेले तरी यांच्यासोबत राहिलेली शिवसेना आता का नको झाली आहे?

    ReplyDelete
    Replies
    1. बिलकुल सही, वरून अजनू बोलायला मोकळे की आमची युती हिंदुत्वाच्या आधारावर आहे.☺️☺️

      Delete
  28. ज्या तर्हेने गेल्या ५ लर्षात शिवसेनेला केंद्रात व राज्यात दुय्यम वागणूक मिळाली त्यानुसार त्यांची सध्याची वाटचाल अभिमानास्पद वाटते. ५६ आमदार असूनही महाराष्ट्र राज्यात शिवसेना किंगमेकर ठरतेय हे नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. १९६६ साली स्थापन झालेली शिवसेना संपण्याची व संपविण्याची मनिषा व स्वप्ने कित्येक राजकीय पक्ष व नेत्यांनी बाळगली. परंतु शिवसेना आजही ताठ मानेने आपली राजकीय वाटचाल शिवसेना पक्षप्रमुख श्री. उध्दव ठाकरे यांच्या नेत्रुत्वामुळे प्रगल्भतेने करित आहे. अतिशय शांतपणे व धुर्तपणे शिवसेनेने राज्यातील व केंद्रातील प्रमुख पक्षातील राजकीय धुरिणांना पाठिंबा देण्यात भाग पाडले हे दुर्लक्षित करण्यासारखे नाही. श्री.उध्दव ठाकरे सुरवातीपासून शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार हे ठासून सांगत होते. त्यावेळी सर्वांनी त्यांची खिल्ली उडविली. आज त्यांची राजकीय प्रगल्भता दिसून आली. त्यांच्या या धाडसाचे कौतुकच झाले पहिजे. या वाटचालीत दोन प्रमुख राजकीय पक्षांनी घातलेल्या सुक्ष्म व अतिसुक्ष्म अटींंकडे शिवसेना उन्मादामुळे काणाडोळा करील असे नाही वाटत. असो. शिवसेनेच्या प्राप्त राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.������

    ReplyDelete
  29. Adarniy Bhau

    Ajit pawarana barobar ghene anni satta sthapan karane. Yavar savistar lekh lihnar ka. Shah/Phadavnisanchi kruti moral values thevun keleli asanr nahi ka?
    Regards
    Sanjay

    ReplyDelete